अलीकडे काय पाहिलंत? - २५

बरखा दत्त आणि अयान हरीसी अली या दोघांमधली चर्चा. अर्थातच इतर स्त्रिया आहेतच. विषय : इस्लाम मधे स्त्रियांचे भावी स्थान काय ?

चर्चा मजेशीर आहे. एकीकडे सगळ्या धर्मांत स्त्रिविरोध, स्त्रियांचे दमन करण्याच्या प्रक्रिया असतात असं म्हणायचं. आणि दुसरीकडे इस्लाम ला एकटं पाडू नका असं म्हणायचं. Do not pick on Islam असं म्हणायचं. बरखा दत्त ची स्टाईल आवडली आपल्याला.
.
.
.

field_vote: 
0
No votes yet

"भारतीय डिजिटल पार्टी" नावाचा एक मराठी वेब सीरीज प्रकल्प निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ (दिल दोस्ती फेम) करत आहेत. त्यातला "कास्टिंग काऊच विथ राधिका आपटे" हा पहिला भाग पाहिला.

https://youtu.be/QglmzUb2TWM

निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांच्या "नाटक कंपनी" या संस्थेबद्दल काही मित्र भरभरून बोलत (आणि फेसबुकी लिहीत) असतात. त्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या की काय कोण जाणे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर निराशा झाली.

मराठी तारकांच्या "कँडिड" मुलाखती असा काहीसा फॉर्म आहे. अतिशय ढिसाळ पटकथा, ओढून ताणून केलेले विनोद, एकंदरच दिशाहीनपणा या गोष्टी अतिप्रचंड खटकल्या. या सर्वांचा अभाव आपल्या स्क्रीन प्रेझेन्सने झाकायचा धर्मा-वाघ जोडीचा प्रयत्नही साफ फसला आहे.

धर्मा-वाघ यांच्याबद्दल जे ऐकलं-वाचलं आहे त्यानुसार त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. असले पुचाट अर्धटुच्चे प्रयोग करण्यात ते वाया घालवू नये असं कळकळीने वाटतं. "इफ यू हॅव फेल्ड टु प्रिपेअर, बी प्रिपेअर्ड टु फेल" हे मा. ना. पै. रविभाऊ शास्त्री यांचं सुवचन ध्यानात ठेवावं.

*********
आलं का आलं आलं?

निपुण धर्माधिकारीला समोर ठेऊन व्हाईट बॅलंस करतोय वगिरे लोक बोल्ड क्याटेगरीत वाटले मला. असे जोक फार रेअरली दिसतात आपल्याकडे. मला आवडले दोन पाहिलेले भाग.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

असे जोक फार रेअरली दिसतात आपल्याकडे.

हां हे अजून एक.

"... मराठीत प्रथमच" प्रकारचं काही करायचं उद्दिष्ट असेल तर वरची प्रतिक्रिया रद्दबातल समजावी.

जागतिक स्तरावरच्या भारी गोष्टींची मराठी प्रेक्षक/वाचकासाठी सुलभ पाचक गुटिका करायची हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे. मेहता-अनुवाद-फ्याक्टरी, "डॅन ब्राऊन स्टाईल थ्रिलर म० प्र०", वगैरे. म्हणजे एकीकडे मराठी कलात्मक अभिव्यक्तीला परप्रकाशित राहण्यासाठी इन्सेन्टिव्ह द्यायचं आणि मग मराठीत पाब्लो नेरुदा होत नाही अन् मराठीला (नोबेल फार दूरची गोष्ट पण किमान) ज्ञानपीठ मिळत नाही म्हणून गळा काढायचा ही एक गम्मतच आहे.

*********
आलं का आलं आलं?

हा हा हा. कर्त्यांच उद्दिष्ट काये माहिती नाही पण मराठीत असे जोक पाहिलेले आवडलं. दुसर्‍या भागात महागुरुंच्या मुलीची छान उडवली आहे. पण एकंदर मराठी सिरियल हे नाव घेतल्यावर जे डोळ्यासमोर येतं त्या बारच्या मानाने बरच भारी आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सिद्धीने ऑलरेडी या प्रकल्पाचा उल्लेख कोणत्यातरी साखळी-धाग्यावर केलेला आहे, मला सापडत नाहीये. तेव्हाच ठरविलेले की हा प्रयोग पहायचा.

सहमत आबा. आपट्यांची राधिका असल्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या पण सर्वच बाजूंनी निराशा झाली.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

+१११११११ तेच पुचाट पुणेरी जोक्स आणि तेच तेच मंद चेहरे.

माझेही हेच मत झाले . नाटक कंपनी मधली लोकं ' सराईत ' आर्टिस्ट झालेत खरे , पण कन्टेन्ट च्या दृष्टीने ते अजून कॉलेजातच अडकून पडलेत असे वाटते . त्यांचेच ( तरुण पब्लिक मध्ये) बहुचर्चित दळण बघितले . तेही पुरुषोत्तम च्या अलीकडं पर्यंत ठीक होते असे वाटले . ( अर्थात त्या नाटकाला २०-२५ वयाच्या पब्लिक ची तुफान गर्दी आणि रिस्पॉन्स होता.

आणखी एक "अमर फोटो स्टुडियो" नावाचंही नाटक आहे ना? तेयाला जायचा विचार आहे.

*********
आलं का आलं आलं?

बरखा दत्त आणि इतरांमधली चर्चा ऐकली , पाहीली. -- रोचक आहे.
त्या सर्वांना आपली मते आणि विचार मांडायला अजून जास्तं वेळ मिळायला हवा होता. ३० मिनिटे हा काळ अपुरा वाटला.
सबळांनी दुर्बळांचे शोषण करणे .. ही घटना नैसर्गिक असावी. कारण कमी अधिक प्रमाणात ती सर्वत्रच अढळते. आणि हे शोषण धार्मिक कारणासाठी झाल्यास त्याला नैतिकता सुद्धा प्राप्तं होते.

पण या सर्वांचे ऐकताना एक जाणवले --- "दुनिया में इतना गम है | मेरा गम कितना कम हैं | "

(ह्या धाग्यालाही २४ नंबर दिलेला आहे, पण तिथे ९४ प्रतिसाद झाल्यामुळे ह्या धाग्यावर लिहीत आहे.)

हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. १९४० च्या दशकातल्या न्यू यॉर्क शहरात चित्रपट घडतो.

फ्लॉरेन्स फॉस्टर जेनकिन्स ही उतारवयीन, श्रीमंत आणि सोशलाईट्समध्ये प्रसिद्ध स्त्री हे चित्रपटातलं मुख्य पात्र. फ्लॉरेन्सला संगीताबद्दल आत्मीयता आहे. अनेक संगीतकार आपले संगीताचे कार्यक्रम, जलसे सुरू ठेवण्यासाठी तिच्याकडे देणगी मागत असतात आणि ती अतिशय उदारपणे त्यांना मदत करत असते. सांगीतिकांमध्ये छोटीशी भूमिका करायची, तेव्हा नाटकांमध्ये अतिभरजरी कपडे घालायचे ही तिची मुख्य हौस असते. पण एक दिवस तिला लहर येते की आपण गायला सुरुवात करावी. तिच्या गाण्याच्या धड्यांसाठी, दररोज घरी येऊन साथ देईल असा पियानिस्ट आणि संगीत शिक्षक शोधते. गाण्याचा पहिला धडा सुरू होतो तेव्हा आपल्याला समजतं, बाईंना संगीताबद्दल जिव्हाळा आहे, गाणं गावंसं वाटतं, फक्त एकच अडचण आहे. बाईंना गाता येत नाही! गाता येत नाही, ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या बाबतीत खरी असेल. पण बरेच लोक कानसेन असतात. फ्लॉरेन्सला गाता येत नाही हे तिला स्वतःलाही समजत नाही. तरीही तिच्या सुरुवातीच्या गाण्याच्या कार्यक्रमांबद्दल सकारात्मक समीक्षा छापून येते. ह्याचं कारण, तिचा जोडीदार सेंट क्लेअर. तिच्या कार्यक्रमाची तिकीटं फक्त संगीत-बधीर लोकंच विकत घेतील, तिच्या कार्यक्रमांना येणाऱ्या पत्रकारांकडे वेळेत 'पाकीट' पोहोचेल, तिच्या समोर कोणीही तिची टिंगल करणार नाही म्हणून सेंट क्लेअर बऱ्याच उचापाती करत राहतो.

फ्लॉरेन्सचं नाव चित्रपटाला आहे; मेरील स्ट्रीपने ह्या भूमिकेचं सोनं केलेलं आहे; तिचं गाणं सुरू झालं की (शब्दशः) हसून पोट दुखायला लागतं; तरीही मी बराच काळ सेंट क्लेअर ह्या पात्रामध्ये अडकले. ह्यू ग्रांटला अभिनय करता येतो का, हे कोडं कधी सुटेल का अशी शंका बरेचदा येत असे; आता ती शंका दूर झाली. फ्लॉरेन्स हे पात्र सरधोपट आहे. तिला तरुण वयात तिच्या वडलांमुळे संगीत शिकता आलेलं नसतं. पुढे लग्नाच्या पहिल्या रात्रीच सिफलीस (एक प्रकारचा गुप्तरोग) होतो; ह्यासाठी ती पारा आणि आर्सनिक औषधं म्हणून घेत असते (१९४० चं दशक); ह्यामुळे तिच्या श्रवणावर परिणाम झालेला असेल. ती लहानपणापासूनच ऐषोआरामात वाढलेली आहे; तिच्या फार मोठ्या महत्त्वाकांक्षाही नाहीत. सेंट क्लेअरचं तसं नाही. तो एका ब्रिटीश 'अर्ल'चा अनौरस वारसदार आहे. त्याला अभिनयाचं अंग आहे, महत्त्वाकांक्षा आहे, खरं तर महत्त्वाकांक्षा होती. आता त्याचं आयुष्य फक्त फ्लॉरेन्सभोवती फिरतं.

सुरुवातीला वाटतं की तो हे फक्त तिच्या पैशांसाठी करतोय. कारण त्याची एक मैत्रीण आहे. दिवसभर तो फ्लॉरेन्सच्या आगेमागे फिरत असला तरीही रात्री तो मैत्रिणीबरोबर असतो. तिचे चित्रविचित्र पोशाख आणि भीषण गाणं ह्यांतला विनोद त्याला समजत नसेल असं त्याचं वर्तन बघून वाटत नाही. हळूहळू त्याची अपरिहार्यता काय हे दिसायला लागतं. सेंट क्लेअर फार थोर अभिनेता नाही आणि हे त्याला स्वतःलाही माहीत आहे. अभिनय करून आपल्याला फार महत्त्व मिळणार नाही; पण प्रेमळ फ्लॉरेन्सच्या आजूबाजूला राहिलं तर ती तिचा जीवही आपल्या‌वर ओवाळून टाकेल हे त्याला समजतं. 'एकदा महत्त्वाकांक्षेच्या गोंधळातून मुक्तता मिळाली की आयुष्य फार सोपं होऊन जातं'; तो तिच्या पियानिस्टला सांगतो. पारंपरिक जेंडर-रोल्सची उलटापालट करण्याची बंडखोरी करूनही फ्लॉरेन्स-सेंट क्लेअरचं नातं आक्रमक-बंडखोर नाही. त्यात प्रेमळ आपलेपणा आहे.

एवढं गांभीर्य ह्या चित्रपटासाठी पुरे. मेरिल स्ट्रीपचं भीषण गाणं ऐकलंच्च पाहिजे, एवढं भारी आहे. ह्या ट्रेलरमध्ये थोडे तुकडे आहेत; पण प्रत्यक्षात ह्या बाईने काय हैदोस घातलाय हे सिनेमात बघण्यासारखं आहे. कौशल्य, गुणवत्ता, असं काहीही नसणाऱ्या बाईचं काम करायला मेरिल स्ट्रीपसारखी गुणवान अभिनेत्रीच हवी. स्वतःला लेडी म्हणवून घेण्यासारखं अन्य वर्तन पण भीषण कपडे आणि अतिविनोदी गाणं हे सगळं पेलण्याची क्षमता फार अभिनेत्यांमध्ये नाही.

टिपिकल ब्रिटीश सिनेमाप्रमाणे ह्या सिनेमातली इतर पात्रंही लक्षवेधक आहेत. तिच्या पियानिस्ट - कॉस्मे मकमूनचं पात्र बरंच मोठं आहेच. पण दुसरं उल्लेखनीय पण छोटंसं काम असणारा तिचा संगीत शिक्षक. हिला जेव्हा लोकांसमोर गाण्याचा ताप चढतो तेव्हाची त्याची वाक्यं आंतरजालावर लिहिणाऱ्यांनी खवचटपणाचा परिपाक म्हणून अभ्यासायला हरकत नाहीत. उदाहरणार्थ - "There’s no one quite like you," "You’ve never sounded better," आणि सगळ्यात हलकट वाक्य - "You’ll never be more ready."

आपल्याच जगात रमलेली फ्लॉरेन्स एकदा सेंट क्लेअर गावाबाहेर असताना कार्नेगी हॉल बुक करते. महायुद्धातून परतलेल्या १००० सैनिकांना त्याची फुकट तिकीटं देते. तिथेही ती गाते. त्याबद्दल लोक तिची तोंडावर काही प्रमाणात खिल्लीही उडवतात. पण तिचा निरागसपणा आणि तिचं it's so bad that it's good गाणं ह्यामुळे त्यांची करमणूकही होते. समोर माणूस दिसत नाही तोवर लोक त्यांची खिल्ली उडवतात, पण प्रत्यक्षात माणूस दिसल्यावर वर्तन बदलतं. फ्लॉरेन्सला ही गुंतागुंत फारशी समजत नाही; तिची तेवढी कुवतच नसते. तसे इंटरनेटवर आचकट-विचकट ट्रोलिंग करणारे बरेच लोक प्रत्यक्षात डासाएवढेही उपद्रवी नसतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा चित्रपट पाहिला नाही तर मी पापी ठरेन! धन्यवाद!

ह्यू ग्रांटची ह्या चित्रपटाच्या निमित्ताने घेतलेली एक मुलाखत यू ट्यूबवर पाहिली. त्याला विचारलं की, आजच्या काळात आणखी एखादी फ्लॉरेन्स बनू शकते का? तो नाही म्हणाला. मला त्याचं उत्तर नाही पटत. डॉनल्ड ट्रंपबद्दल ह्यू ग्रांटला काहीच माहीत नसेलसं वाटत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नुकताच अहमदाबादला गेलो होतो. तिथून तासाभराच्या अंतरावर गांधीनगर आहे. नातेवाईकांच्या आग्रहावरुन तिथे गेलो. पाऊस पडत होता तरी 'सत - चित- आनंद वॉटर शो' ची तिकीटे काढली. हा वॉटर शो खुल्या जागी असून बहुतांशी टेक्नॉलॉजी, लास वेगसच्या हॉटेल्ससमोर जे वॉटर शो आणि फायर शो आहेत त्याचीच कॉपी वाटली. फरक इतकाच की धार्मिक थीम वापरुन इथे नचिकेताची कथा सांगण्यात येते. कारंज्यांच्या पडद्यावर, नचिकेता (त्यांचा उच्चार) कसा बापापेक्षा शहाणा निघाला आणि यमाला जाऊन त्याने कसे प्रश्न विचारुन भंडावून सोडले, त्यांतून तीन वर कसे मिळवले ... इत्यादिंचे भडक चित्रण बघितले. नुसता कारंजी आणि प्रकाशाचा खेळ म्हणून चांगलाच आहे. पण त्याला धार्मिक डूब दिल्याने आणि शेवटी 'प्रमुख स्वामींचे' दर्शन घडवल्याने माझी नास्तिक मन कासावीस झाले.
एकंदरीत शो स्पेक्टॅक्युलर आहे. एकदा बघायला हरकत नाही.

http://www.swaminarayan.org/activities/cultural/watershow/index.htm

एकच योगी
बाकी सारे भोगी

अशोक पाटील यांनी इथे संदर्भ दिलेला http://www.aisiakshare.com/node/342#comment-8682 नो कंट्री फॉर ओल्ड मेन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर वीकेंडला पाहिला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवणारा आहे, न्वॉर आहे वगैरे वगैरे ठीक, टेक्सासचं वाळवंट वगैरे मस्त. पण चित्रपट पाहून झाल्यावर तो काहीच झेपला नाही असं वाटलं.

काही प्रश्न
{{स्पॉयलर आहेत}}
१. पैशाची पेटी सापडल्यावर नायक झक मारायला परत तिथं कशासाठी जातो? ड्रगचे पैसे आहेत इतकं कळल्यावर कुठलाही शहाणा माणूस गावातून लगेच पळून जाईल.
२. एखादं भूत असल्यासारखा वागणाऱ्या खलनायकाला त्या पैशामध्ये काय इंटरेस्ट आहे? तो निव्वळ खून करण्याच्याच मागे लागलाय असं दिसतंय. त्याचा ड्रग ग्यांगशी काही संबंध आहे असे वाटत नाही.
३. इतके सटासट सीरियल खून करणाऱ्या खलनायकाचा शोध घेण्यासाठी केवळ एक हवालदार आणि एक सबइनस्पेक्टर इतकेच दोघं कसे काय?
४. बरं खलनायकाच्या मागे लागलेल्या पोलीस ऑफिसर (टॉमी ली जोन्स)च्या पात्राचं नक्की काय ते कळलं नाही? धड फिलॉसॉफिकल नाही आणि डार्क कॉमेडी नाही असं काहीतरी विचित्र पात्र वाटलं.
५. त्या पैशाचं काय होतं?
६. चित्रपटाच्या नावाचा चित्रपटाशी काय संबंध?
{{/स्पॉयलर आहेत}}

कोएन ब्रदर्सचा चित्रपट, ऑस्कर वगैरे असल्यामुळे या शंका विचाराव्या वाटल्या.

कथानक कोएन ब्रदर्स यांचं सिग्नेचर वगैरे आहे. त्यांचे इतर सिनेमे पाहिल्यास कळेल. थोडा अभ्यास केल्यास इतर प्रश्न सुटतील. (एक उदा), पण सगळे प्रश्न सुटायलाच पाहिजेत असं कोएन ब्रदर्सचे सिनेमे पहाणारा म्हणत नाही. असो.

कोएन बंधुंचा अलिकडचा "हेल, सीजर" कुणी पाहिला का?

पाहायची इच्छा आहे पण अद्याप संधी मिळाली नाही. फार्गो, द बिग लेबॉस्की, ओ ब्रदर हे तुफान आवडले होते. त्या तुलनेत ऑस्करच्या मांदियाळीतला "नो कंट्री..." खूप ओवररेटेड वाटला ब्वॉ.

मालिकाही जबरी आहे. सेकंड सीजन जास्त आवडला. निर्मिती कोएन ब्रदर्सचीच आहे.

बघतो मग. चित्रपट आता अनेकवेळा पाहिलाय. मालिकाही कायदेशीर उपलब्ध आहे त्यामुळे लवकरच पाहता येईल.

लेबॉस्की आवडला/झेपला पण नो कंट्री नाही? गंमतच आहे.

हॉलिवूड स्टिरीओटाईप्सची छान उडवली आहे. रेफरंसेस लागले तर आवडेल असा सिनेमा आहे. ओ ब्रदर, फार्गो, किंवा नो कंट्री इतका चांगला नसला तरी पहाण्यासारखा आहे. बादवे, इनसाईड ल्यूअन डेव्हीस हा पाहिला नसल्यास पाहणे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

आम्ही सहसा चित्रपट रेकमेंड करत नाही. पण आज रिलिज होणारा 'आयलंड सिटी' हा मस्ट वॉच आहे. थिएटर्समध्ये सध्या तरी फक्त ४ दिवस दाखवतोय. अजिबात चुकवू नका.

http://www.pahawemanache.com/review/island-city-2016-review

ट्रेलर वरुन काही फार रोचक नाही वाटला.
जर हा जितकं परीक्षण म्हणतं तेव्हढा चांगला असेल तर यथावकाश माझेपर्यंत पोचेलच.

आनंद भैरवी नावाचा तेलुगु सिनेमा तुकड्या तुकड्यांत पाहिला. [इंग्रजी सबटायटल्स असती तर पूर्ण पाहिला असता.] सिनेमा 'कूचिपूडी' नृत्यावर आधारित आहे आणि कुचिपुडी नृत्यगुरूच्या भूमिकेत आहेत गिरीश कर्नाड! अर्थातच कर्नाड यात कुचिपुडी परंपरेतील नृत्यं करताना, शिकवताना दाखवले आहेत. मजा आली पाहताना!

वा! तुम्हाला तेलुगु येतं का चार्वी?
सिनेमा भन्नाट वाटतोय.

.
नेतानयाहूंचा हा व्हिडिओ ...
.
.
.

हे प्रकरण कधी बघायला मिळेल?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लवकरच. मी ही आतुर होऊन बसलो आहे!!! कधी एकदा पुढचा चित्रपट येतोय असं झालेलं!

मला हे प्रकरण कालच समजलं. ह्याचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र ह्याबद्दल काही लिहाल का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा एक डेरा सच्चा सौदा नामक शीख संप्रदायाचा बाबा आहे.त्याने आधी एम. एस. जी. द मेसेंजर नावाची स्वत:ची लाल करणारी "सबकुछ 'गुर्मी'त राम रहीम सिंगजी इन्सान" छाप फिल्म काढली. ट्रेलर येणेप्रमाणे :

अर्थात नवीन सुपरहीरो अवतरल्यावर सीक्वेल तो बनता हैच म्हणून एम. एस. जी. द मेसेंजर २ आला.

मग आता वरील तिसरा भाग पाहणे आलेच.

शिवाय बाबा स्वतःला रिलीजियस रॉकस्टार समजतात. त्यामुळे त्यांचे सबकुछ छाप कॉन्सर्ट्स ही अवर्णनीय अनुभूती तुम्हाला युट्युबवर घेता येइलच!!

BiggrinBiggrinBiggrin
.

हा सिनेमा पाहिला. एकूण आवडला . तीन चोर एका माणसाची माहिती काढतात की ज्या माणसाला युद्धात compensation म्हणून भरपूर पैसे मिळाले आहेत आणि ते त्याच्या घरातच आहेत. मग त्यांना कळते की तो अंध आहे . त्यांना मग हे काम खूप सोपे वाटते आणि ते रात्री त्या घरी जातात. आणि मग पुढे काय होते याबद्दल सिनेमा आहे . त्या अंध माणसाला ऐकू येणारे आवाज आणि त्यावरून तो काढत असलेला माग आणि या चोरांची वाचण्यासाठी धडपड खूप छान रंगवली आहे . मी ज्या थिएटर मध्ये गेलो तिथे जवळ जवळ अर्धा तास इनटर्वल घेतला त्यामुळे लिंक तूटते आणि थरार पातळ होतो. पण तरी हा सिनेमा आवडला आहे .

स्पोईलर अलर्ट सुरू : पण हे तिघे पळ्ण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सगळे मिळून त्याच्यावर हल्ला का करत नाहीत हे काही मला समजले नाही . तिघे त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करतात पण एकेकटे. त्यात तो केव्हाही भारी आहे त्यांच्यापेक्षा . स्पोईलर अलर्ट समाप्त

A Squad

Gender Discrimination

गम्मत म्हणून छान आहे. परवाच आमच्या ऑफिस मध्ये Men, Women Synergy हा विषय घेवून एक कट्टा(फोरम ह्या अर्थी) सुरु झाला. त्याची आठवण झाली.

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

Men, Women Synergy हे शब्द एका श्वासात नाही म्हणता येत हो. Wink अशक्य कल्पना आहे.

'द वायर' ही सिरीज पाहात आहे. दोन सीझन पाहून झाले. पोलिस प्रोसीजर डीटेलिंग जबरी आहे.

देर आए लेकिन दुरुस्त आए! तुम्ही वायर पाहायला इतका वेळ लावलात?

अतिशय आवडलेली सिरीज. नवर्याशी शुद्ध प्रतारणा करून, त्याच्या अनुपस्थितीत हावरटासारखे संपवलेले सिझन्स आठवले Smile डेव्हिड सायमन स्वतः गुन्हेगारी पत्रकार असल्याने आणि एड बर्न्स फोरेन्सिक डिटेक्टिव्ह असल्याने हे डिटेलिंग जबरदस्त झाले आहे यात संशय नाही पण त्यात आवडलेल्या इतर अनेक गोष्टींपैकी अतिउत्तम कास्टिंग आणि अभिनय (आठवा: इद्रिस अल्बा (स्ट्रिंगर बेल) :love:, डॉमिनिक वेस्ट (मॅकनॉल्टी), मायकल केनेथ (ओमार), आन्द्रे रोयो (बबल्स)), एकाच समस्येच्या वेगवेगळ्या अंगांकडे पहाणारे सिझन्स, धीम्या गतीची पण उत्कंठा वाढवत नेणारी पटकथा अशा अनेक बाबींचा उल्लेख करावा लागेल.
देर आये दुरुस्त आये खरंच!

हो इतर सिरीज च्या गर्दीत राहून गेली होती आत्तापर्यंत.

त्या फ्रॅन्क सोबोत्का वाल्या अ‍ॅक्टरचेही काम जबरी आहे. वाईट वाटते त्याच्याबद्दल. डार्क शेडस वगैरे असलेले पण प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणारे कॅरेक्टर असावे तर असे. त्याचा पुतण्या निक, तो ही.

दुसर्‍या सीझन पासून संवादही मला खूप जबरी वाटत आहेत. कदाचित पहिल्या सीझन मधेही असतील पण तोपर्यंत कॅरेक्टर्सची ओळख नसल्याने भारी वाटले नसतील. फक्त त्या मॅक्नल्टीचा एक संवाद अंधुक आठवतोय.
judge: ".....we are in the land of the free"
McNulty: "No. we are in Baltimore"

त्या सगळ्या ड्रग वाल्यांची स्लॅन्ग जबरी आहे. तिसर्‍या सीझन मधली एक भन्नाट रनिंग थीम म्हणजे ड्रग वाल्यांच्या "बिझिनेस" मीटिंग्ज :).

बाय द वे - ते एकेक मेजर ला "कॉमस्टॅट" मधे उभे करून तो ब्युरेल व राउल्स त्याला झाडतात ते सीन्स नक्की कोणत्या मीटिंग्/इव्हॅल्युएशन्स चे आहेत?

हा Parched चा ट्रेलर पाहिला आत्ताच. आवडलाय. १.०५ ते १.१५ मधला 'मायेरी मायेरी, मैं बादल कि बिटीया' हा म्युझिक पिस खासच आवडलाय.
बाकी राधिका आपटे फॅन्स ने देखील जरूर बघा हा व्हिडो.

नुकताच ग्रँडमा हा चित्रपट पाहिला :

आपले दात व्यवस्थित राहावेत यासाठी अतोनात काळजी घेणार्‍या हुशार आजीच्या आणि तिच्या मूल पाडायला निघालेल्या टीनेजर नातीच्या प्रवासाची कथा.

१) चित्रपटाचा कालावकाश मर्यादित आहे तरीही नात्यांच्या अनेकपदरी विणी कथेत जैसे हाताळल्यात त्याला सलाम.
२) फेमिनिस्ट चळवळींचा बहरकाळ अनुभवलेली कवयित्री आज्जी (एल) आणि तिची आजन्म पार्टनर यांचं पुरुन उरणारं गोड प्रेम कथेच्या पार्श्वभूमीवर पाझरत राहतं.
३) नातींचं (सेजचं) अ‍ॅबॉर्शन करायला आज्जी आणि नात कमी काळात पैसे जुळवायला बरीच खटपट करतात. आज्जी-तिची मुलगी(ज्युडी) आणि ज्युडी-सेज अशा नात्यांच्या तिहेरी तर्‍हा हळू हळू उलगडत जातात.
४) आज्जीनं नुकतंच एक चार महिन्यांचं दुसरं प्रेम तोडलेलं असतं. हे प्रेमपात्र(ऑलिव्हिया) आज्जीहून वयानं बरंच कमी असतं, आज्जीवर बेहद्द फिदा झालेलं असतं. तिच्या बाबतीत थोडी क्रूर वागणारी आज्जी असं का करते तेही कळत जातं.

कथा काळाने मर्यादित असली तरी वरील अनेक बारकावे एकात एक गुंफत, स्त्री-चळवळींवर थोडासा आडून प्रकाश टाकत, आणि काही सनातन नात्यांचा मागोवा घेत अशक्यरित्या गुंतवून ठेवते! मास्टरफुल स्टोरीटेलिंग, अ‍ॅक्टींग!

हा सिनेमा पहावासा वाटत आहे. प्रतिसादातून पुरेशी उत्कंठा निर्माण होते. प्रतिसाद खूप आवडला.

Chair Force One

कुठुनतरी अवदसा सुचते आणि आपण मूर्खासारखं काहीतरी पाहतो.
सचिन कुंडलकर आवरा आता. संपलं तुमचं.
भरत जाधवची माकडचेष्टा जितकी असह्य तितकीच ह्या कसलेल्या कलाकारांची सुमार प्रिटेन्शियस कामगिरी असह्य. उरले सुरले सतीश आळेकर, नवीन अभिनय-पिल्लं, एव्हरग्रीन प्रायोगिक आज्जी थोरल्या सुभाष, आणि कुलकर्णी-खेडेकर यांचा लाजवाब अभिनय पाहून आयुष्यातले दोनेक तास सार्थकी लावायचे असतील तर राजवाडे आणि सन्स वन्स तरी पाहाच.
थेटरात हा पाहून शे दोनशे रुपये न्यू व्हेव मराठीवर उधळता आले नाहीत याबद्दल मी आजन्म खंतावला राहीन.

आता इथे दोन वेगवेगळ्या प्रकारे या सिनेमाची मारली आहे:
ही थेटः http://www.pahawemanache.com/review/rajwade-and-sons-2015-review
आणि ही तुपात-साखरेत घोळवून: http://www.pahawemanache.com/review/rajwade-and-sons-second-review

याहून वेगळं काही म्हणायचंय का? Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा फटू पाहिला. Smile
a

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अता बाप्पाचा 'परश्या' पण केला लोकांनी तर ये क्या चिज हय भाऊ. अच्छे दिन आ गये, देवही माणसात आला - हुर्रे!!!. काय करणार म्हणा, अता इथे लोक माणसालाच देव मानायला लागले म्हंटल्यावर देवाला त्याचं देवपण वाचावायला प्रवाहात यायला नको Smile

परशाच्या बिरादरीतले लोक सर्वसाधारणपणे नैतिक उच्चासनावर बसण्याचा आव आणत नाहीत. पण हाफचड्डीधारीच्या पायाशी पारंपरिक गणपती! अरेरे, देव श्रद्धाळू गणपतीभक्तांचं भलं करो!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उंदीरमामा पण शाखेत जातात हे पाहून बरं वाटलं. आता ऋद्धी-सिद्धी समितीच्या गुलाबी काठाच्या पांढर्‍या साड्यांत आल्या तर बरं होईल.

*********
आलं का आलं आलं?

पण मूर्ती उजव्या सोंडेची नाही. तळ्या-मळ्यातला सेवक गणपती.

"अल्लो अल्लो" ( हॅल्लो हॅल्लो ) ही ब्रिटीश कॉमेडी टीव्ही सिरीयल कोणी बघितली आहे का? माझा आज तिसरा सिझन संपला.

धमाल आहे, टोरंट वर सर्व सिझन्स आहेत.

René Artois runs a small café in France during World War II. He always seems to have his hands full: He's having affairs with most of his waitresses, he's keeping his wife happy, he's trying to please the German soldiers who frequent his café, and he's running a major underground operation for the Resistance. Quite often, the Germans' incompetence itself is what nearly lands René and his cohorts in hot water; they are not helped either by the locals, who are dreadfully keen to get rid of the Germans, but their blatant and theatrical attempts at espionage and secrecy often create problems that René must solve quickly.

FTII Open Day होता आज आणि काल. पाहायला गेलो होतो. तुडुंब गर्दी. मजा आली पण. छान आहे आत मध्ये. संग्रहालय आहे. वेगवेगळे विभाग ते फिरवून आणतात. त्यांनी असे उपक्रम कायमस्वरूपी केले पाहिजे.

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

असा धागा नसल्यामुळे इथेच लिहितो. जर या धाग्याला डिमांड आली तर वेगळा काढावा.
दिवेआगारला जाणे झाले. आजकाल कोकण विकास विकास करत असल्याने आणि किनाऱ्यांवरती गिटार घेऊन जाणं ग्लॅमरस झाल्याने दिवेआगार सारखे सुंदर किनारे घाण, बाटल्या आणि मुख्य म्हणजे माणसं यांनी करप्ट झाले आहेत. शिवाय जिथे तिथे रिसॉर्ट्ज, होमस्टे यांचं पीक अतोनात वाढले आहे. एकेकाळी सुंदर असणारे गाव आता फुल कमर्शियल झालंय.
सीझनमध्ये अजिबात न जाण्यासारखं ठिकाण.
ऑफ सीजन मध्ये वादळी वातावरण टाळून जाणं चांगलं, कारण कोळी जहाजं लोटत नाहीत आणि ताजे स्वस्त मासे मिळत नाहीत.
इथे पाटील खानावळ म्हणून अतिशय ओव्हररेटेड महागडी खानावळ आहे. तिथे काहीच खाऊ नये.
भरडखोल येथे जाऊन बाजारातून वितंड-घासाघीस करून ताजे मासे, कोळंबी असं सगळं घ्यावं आणि दिवेआगर मधल्या कुठल्याही बऱ्या दिसणाऱ्या घरात करायला द्यावं.
आता समुद्र किनारा म्हंटलं की धास्ती वाटते.

'द लॉस्ट ऑनर ऑफ कातारीना ब्लुम' नावाचा जर्मन चित्रपट बघितला. (प्रतिसाद वाचल्यामुळे चित्रपटाच्या आस्वादात कमतरता येईल असं वाटत नाही.)

ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारिक हा चित्रपट आहे. सरकारी यंत्रणा आणि पीत-पत्रकार ह्यांच्यामुळे सामान्य माणसांची कशी ससेहोलपट होते, हा चित्रपटाचा गाभा.

हाईनरिख बल (Heinrich Böll) ह्याने लिहिलेली ही कादंबरी आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला प. जर्मनीत ऑथॉरीटेरियन (मराठी?) सरकार होतं. त्याच काळात अराजकवादी (anarchist) लोकांची चळवळ, जी हिंसेच्या वळचणीला गेली, जोरात होती. बलचा सरकारी धोरणांना विरोध होता. सरकारी यंत्रणा, पोलिस आणि पत्रकार (स्प्रिंगर प्रकाशनाचं पत्र) ह्यांच्याकडून त्याला बराच त्रास झाला. त्याने त्या वर्तमानपत्रावर बदनामीचा दावा गुदरला पण त्यात त्याला यश मिळालं नाही. ह्याचा बदला म्हणून त्याने ही कादंबरी लिहिली.

कादंबरीकार पुरुष असला तरी त्याने मुद्दामच मध्यवर्ती पात्र म्हणून स्त्री पात्र रंगवलं आहे. त्यात मुद्दाम स्त्री पात्र मध्यवर्ती. कारण आद्य पाप - स्त्री असणं - हे असतं. मग पुढचं सगळं. तिने कोणावर प्रेम केलं तरी पाप, प्रेम केलं नाही तरी पाप. ती रोज चर्चात जात नाही - पाप. तिने मार्क्स स्वतः वाचला नाही - पाप. मार्क्सच्या लेखनातलं एक उद्धरण, एका धर्मगुरूने तिला दाखवलेलं आहे - पाप. ह्या सगळ्या पापांबद्दल तिला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेणं, पीत-पत्रकाराने तिची बदनामी करणं, लोकांनी तिला गलिच्छ संदेश पाठवणं हे सगळं क्षम्य ठरतं.

चित्रपटाची दिग्दर्शकद्वयी म्हणते, हा चित्रपट आम्ही बनवला म्हणून आम्हालाही बऱ्याच सरकारी यंत्रणांनी त्रास दिला; विमानतळावर कसून झडती घेणं, निराळी - हिणकस वागणूक मिळणं, त्यामुळे विमान चुकणं नित्याचं झालं होतं. आम्ही सुस्थित असल्यामुळे आम्हाला त्याचा फार त्रास झाला नाही. पण कातारिनासारख्या सामान्य माणसांकडे फक्त त्यांची अब्रू असते. अब्रूवर डल्ला मारला तर अब्रू वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात. कातारिनाही तिच्या अब्रूसाठी टोकाचं पाऊल उचलते.

हाईनरिख बलनेसुद्धा टोकाचं पाऊल उचललं; तो साहित्यिक, त्याने सरकारी यंत्रणा, पत्रकार, सामान्य लोकांची उदासीनता ह्याचं अतिशय उदास चित्रण केलेलं आहे. १९७० च्या दशकातली कादंबरी आणि चित्रपट आता का बघायचे?

मोहम्मद अकलाखला मारून झाल्यावर दोन बातम्या वाचनात आल्या होत्या - १. त्याच्या घरातलं उरलेलं मांस मथुरेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं गेलं; ते गोमांस आहे का नाही हे बघायला. २. मोहम्मद अकलाखच्या मुलाला शंका होती की हे मांस परस्पर बदलण्यात आलं. हे एक उदाहरण मला आठवलं; छोट्या मोठ्या प्रमाणात अशा अनेक गोष्टी घडत असतील. ते आपल्यापर्यंत पोहोचतही नसेल.

पण लोकांचं चारित्र्य, व्यक्तिगत आयुष्य ह्यावरून त्यांना जोखायला आपलं आतुर असणं, ह्याचा फायदा घेणाऱ्या सरकारी यंत्रणा आणि त्यातून नफा कमावणारी माध्यमं तशीच राहतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या सिनेमाची तू अकलख यांच्या उदाहरणाबरोबर घातलेली सांगड अत्यंत चपखल वाटते आहे.

.
मला (प्रथमच) अर्णब गोस्वामी ने उपस्थित केलेले मुद्दे रिलेव्हंट वाटले.
.
अर्थात शांतिखोर मंडळी नेहमीचेच मुद्दे उपस्थित करतील - (१) हल्ला हा पाकी आर्मीला आयते कोलीत देईल, पाकिस्तानी लोकशाही कमकुवत होईल, मुल्लामौलवींचे, मूलतत्ववाद्यांचे स्थान बळकट करेल, (२) ह्या असल्या चर्चा ओपनली नाय व्हायला पायजेत, (३) शांति शांति शांति ची चर्चा करा, हा गांधींचा देश आहे, बातचीत करा, (४) १७ जण मृत्युमुखी पडले म्हणून आणखी १७,००० जणांना मारायचे का ??
.
.

गब्बु, मे २०१४ पासुन अर्णव नी पलटी मारली आहे. आता तो एखाद्या अभाविप च्या माणसासारखे बोलतो. कन्हय्या कुमार च्या वेळेला पण बजरंग दला सारखा बोलत होता. त्याची किम्मत कीती असावी? ऐसीवर माझ्या बाजुनी दिवसात फक्त ५ मिनिटे जोरात भुंकायचे कीती पैसे लावेल??

गब्बु, मे २०१४ पासुन अर्णव नी पलटी मारली आहे. आता तो एखाद्या अभाविप च्या माणसासारखे बोलतो. कन्हय्या कुमार च्या वेळेला पण बजरंग दला सारखा बोलत होता.

२०१४ च्या आधी बरखा दत्त वगैरे मंडळी नैका सेक्युलरिझम च्या नावाने शंखनाद व महाआरत्या करत होती !!!

जणू काही सामान्य माणसाच्या दृष्टीने सेक्युलरिझम हे अन्न वस्त्र निवारा ह्यापेक्षा अधिक महत्वाचे असल्यासारखे. आता अर्णब ची "कमाओनी रेजिमेंट" जॉईन करण्याची पाळी आहे.

Matthew Gentzkow ची थियरी बरोबर सिद्ध होत्ये ... एका वेगळ्या अर्थाने.

काल अमिताभचा 'पिंक' चित्रपट पहाण्याचा योग आला. मुद्दलातच गंडला आहे. कोर्टाचे काम फक्त साक्षी - पुराव्यांवर चालते, भावुक भाषणांवर नाही.
तीन मुली चार सोट्यांबरोबर डिनरला जातात. ड्रिंकस सहित. त्यानंतर त्यांच्या हॉटेलच्या रुमवरही जातात. तिथेही एखादा पेग होतो. दोघींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होतो. त्या विरोध करतात. त्यातली एक, मुलाच्या डोक्यांत बाटली हाणते. त्या पळ काढतात. मुले म्हणजे सोटे, वेल कनेक्टेड असतात. धमक्या, त्रास देणे, वगैरे सुरु होते. अमिताभ ज्येष्ठ वकील असतो. मग कोर्ट ड्रामा. तात्पर्य काय ? तर मुलीने 'नो' म्हटलं, की पुढे काही करायचं नाही. मग ती मैत्रिण असो, पत्नी असो की वेश्या!
मुलगी 'नो' म्हणल्याचा प्रत्यक्ष पुरावा काहीच नाही. विरोधी फॅब्रिकेटेड पुरावे भरपूर. तरीही निव्वळ डायलॉगबाजीवर अमिताभ जिंकतो.
कच्चे दुवे फार, पण अभिनय चांगला.

एकच योगी
बाकी सारे भोगी

मी सिनेमा बघितला नाहीय. पण commercial सिनेमामध्ये ड्रामाबाजी असणारच. वास्तववादी दाखवला तर पब्लिक झोपेल. चालायचंच.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

कोर्टाचे काम फक्त साक्षी - पुराव्यांवर चालते, भावुक भाषणांवर नाही.

नाही पटलं. बच्चन पूर्णपणे भावूक आधारावर बचाव करत नाही. त्या मुलाने FIR कशी उशीरा दाखल केली आहे ते अगदी सप्रमाण सिद्ध करतो. केसमध्ये हा बराच महत्वाचा मुद्दा असतो. त्या मुलाचा इन-जनरल दृष्टीकोण काय आहे 'तसल्या' मुलींबद्द्ल हे देखील खुबीनी बाहेर आणतो. हे दोन मुख्य मुद्दे भावनिक भांडवलावर अजिबात मांडले नव्हते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अजुन पूर्ण पाहीला नाही. काल अर्धा पाहीला.
____
३ टीनएजिश मुले आहेत. त्यांना नग्न स्त्री पहायची आहे. मग आपल्या खेड्यातून ही मुले सायकलवर शहरात जातात, एखाद्या गणिकेला भेटून स्त्रीचे नग्न शरीर पहायला. येणार्‍यजाणार्‍या स्त्रियांना "तू वेश्या आहेस का?" असे विचारुन मार खातात. मध्येच एक गुंड त्यांचे पैसे लुबाडयचा प्रयत्नही करतो, सायकल चोरीला जाते. शेवटी ही मुले नग्न स्त्री पहातात का आणि अशा मजामजा या सिनेमात आहेत.

तिथी हा भन्नाट कन्नड सिनेमा पाहिला. कन्नड माझ्या जीवाजवळची भाषा असली तरी मी कन्नड चित्रपटांपासून खूप दूर आहे.
तिथी पाहिला आणि वाटलं, कितीतरी दिवसांत कन्नड मध्ये काहीतरी नवं आलंय.
संगीताचा अजिबात फालतुचा अवाजवी वापर नाही (ऑस्करला पाठवलेला पिच्चर संगीतात गंडलाय असं ट्रेलरवरून वाटलं), अस्सल संवाद, फिल्मी कथा तरीही नव-वास्तववादाची डूब, गडप्पा नावाचं अतिभन्नाट कॅरॅक्टर, जबरदस्त कुशल हाताळलेला विनोद (कधी आपली कुलकर्णी-जोड विनोदी संवांदाच्या बाबतीत जरा जादाचं करते, पण तिथीत तसं नाही), एकनंबरी.

कथेबाबत सांगणार नाही. पाहाच!

"Russia's Mermaids" ही डॉक्युमेन्ट्री फिल्म पाहिली आज .
सिंक्रोनाईझ्ड स्विमींग प्रकारामध्ये ऑलेंपिक गोल्ड मेडलिस्ट Natalia Ishchenko and Svetlana Romashina यांच्या बद्दल आहे.
वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासूनच त्यांच्या ट्रेनिंग ची सुरूवात होते. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना प्रशिक्षण दिले जाते. दिवसातले ८-१० तास त्या सराव करत असतात. या दोघींनी आजवर अनेक मेडल्स मिळवली आहेत. आत्ताच्या रिओ ऑलेंपिक मधेही सुवर्ण पदक मिळवले आहे. पाण्याखाली असताना अतिशय सहज आणि जलद हालचाली करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. आणि ते अनेकांना विस्मयकारी वाटते. एका शास्त्रज्ञाने त्याचा शोध घ्यायचा प्रयत्नं केला. आणि काही निष्कर्ष काढले. त्याच्या म्हणण्यानूसार इश्चेन्को ही इतर सामान्य मुलींपेक्षा काहीशी वेगळी आहे. सामान्यतः पाण्यामधे असताना ऑक्सीजन चा पुरवठा कमी होतो, त्यामुळे हालचाली मंदावतात. कारण वेगाने हालचाली करण्यासाठी जास्तं ऑक्सीजन ची जरूरी असते. पणा या मुलीबाबत वेगळेपणा असा की पाण्याखाली गेल्यावर देखिल तिला पुरेसा ऑक्सीजन पुरवठा होत असतो. आणि अगदी थोड्याकाळाकरता पाण्यावर येऊन ती परत पाण्यात जाते. आणि हे करताना तिला काही विशेष प्रयास पडत नाहीत.
हे कशामुळे होत असेल याची शास्त्रीय कारणे त्याने दिली आहेत.
आणि या दोन मुलींचा सराव, आणि पर्फेक्शन चा ध्यास ... अवर्णनीय.
कुठल्याही क्रीडाप्रकाराचा किती बारकाईने विचार करून खेळाडु घडविले जातात हे तर बघायलाच पाहिजे.

"Rude Britannia" (2010) हा BBCवरील तीन भागांचा कार्यक्रम पाहिला. ग्राम्यता, अश्लीलता, अशिष्ट भाषा, चावटपणा हे सर्व पूर्वापार इंग्रजी साहित्य, चित्रकला, म्यूझिक हॉलमधील करमणुकीचे कार्यक्रम, स्टॅन्ड-अप कॉमेडी उत्यादींमधील विनोदाचा अविभाज्य भाग कसे आहेत हे ह्या माहितीपटात नर्मविनोदी पद्धतीने दाखवले आहे. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही त्याप्रमाणे "अश्लाघ्य" उपहास व विनोदास कायद्याने व/वा सांस्कृतिक दबानाने कितीही अटकाव केला तरी तो मार्ग काढतोच.आजच्या PC काळाने विनोदनिर्मितीवर लादलेल्या असंख्य अतर्क्य, अव्यवहार्य व अनाठायी बंधनांवर हा माहितीपट प्रकाश टाकत अप्रत्यक्षपणे टीका करतो.
माहितीपटाच्या तीनही भागांच्या नावांवरून त्यांचे स्वरूप व व्याप्ती लक्षात येईलः
भाग १: "A History Most Satirical, Bawdy, Lewd and Offensive"
भाग २: "Bawdy Songs, Lewd Photographs and the Most Hand-Wringing Moral Melodramas of Victorian Values"
भाग ३: "You've Never Had It So Rude!!"
शीर्षक "Rude Britannia" व "You've Never Had It So Rude!!" ही,अर्थात, अनुक्रमे 'Rule Britannia' ह्या देशभक्तीपर गीतावर, आणि "You've Never Had It So Good" ह्या इंग्लंडचे माजी पंतप्रधान हॅरॉल्ड मॅक्मिलन ह्यांच्या प्रसिद्ध वाक्यावर केलेले शब्दच्छल आहेत.

(माहितीपटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे संगणक तंत्रज्ञानाच्या वापराने माहितीपटातील तज्ज्ञ त्यात दाखवलेल्या जुन्या चित्रांमध्ये व व्यंगचित्रांमध्ये प्रवेश करून, त्यांतील पात्रांपैकी एक होऊन बोलताना दाखवले आहेत.)

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

नेटफ्लिक्सवर हॅपी व्हॅली नावाची सिरियल आहे. यॉर्कशरमधल्या एका महिला सार्जंटची कथा. बलात्कार, नशेखोरी, गुन्हेगारी इ. गोष्टींभोवती नायिकेचे भावविश्व गुंतवले आहे. यॉर्कशर अ‍ॅक्सेंट आणि मजबूत कास्ट या जमेच्या बाजू- विशेषतः सारा लँकशर.

जाऊ दे. एंबेड होत नाहिये नीट.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

एकच प्याला हे युट्यूब वरचं नाटक पाहिलं. फार छान नाटक आहे. रवी पटवर्धन यांचं व्यक्तिमत्व आणि स्टेज प्रेझेन्स जरी जोरदार असला तरी त्यांना पिलेल्याची भूमिका काही खास जमलेली नाही. बाकीचे कलाकार जेमतेम आहेत, पण त्यांचे रोल पण तसे छोटेच आहेत. संगीत नाटक असून मी गाणी पळवली त्यामुळे गायनाबद्दल बोलू शकत नाही. तळीराम केलेल्या अभिनेत्याने मात्र नाटक गाजवले, झकास.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

>>तळीराम केलेल्या अभिनेत्याने मात्र नाटक गाजवले, झकास.

ते चित्तरंजन कोल्हटकर आहेत. तळीराम ही त्यांची गाजलेली आणि हातखंडा भूमिका होती एकेकाळी.

ते चित्तरंजन कोल्हटकर आहेत. तळीराम ही त्यांची गाजलेली आणि हातखंडा भूमिका होती एकेकाळी.

:D>

टाळ्या हे emoticon व्यवस्थित येत नाहीय.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

.
बर्‍याच दिवसांनी ऐकलं हे. किशोर व मदनमोहन एकत्र आलेली फार कमी गाणी आहेत. त्यातलं हे एक. किशोरदांनी झक्कास सूर लावलाय.
.
.

क्रिएटीविटीचा हा आविष्कार पाहिला. ROFL

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अरारारारारारारारारारारारारारारारारारारारारारारारारारारारा!!!!!!!!!!
ROFLROFLROFL
ROFLROFL
ROFL

लोलवा!

*********
आलं का आलं आलं?

निव्वळ थोर आहे हा प्रकार.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

:Sp
कुणाकडे तरी बराच फावला वेळ दिसतोय..

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

"हावडा ब्रिज" पहाते आहे. गाणी सुभानल्ला. मधुबाला सुंदरच.
.

.

चौरंगी के चौक में देखो मतवाले बंगाली
रसगुल्ले की मीठी बातें इनकी शान निराली
कहीं मुखर्जी कहीं बनर्जी
कहीं घोष कहीं दत्ता है
सुनोजी ये कलकत्ता है
.
ईंट की दुक्की पान का इक्का
कहीं जोकर कहीं सत्ता है
सुनोजी ये कलकत्ता है

अहाहा मस्त!!
.
ही कोण नटी आहे माहीत नाही. गोड आहे पण.

अर्पणटॅग : हा प्रतिसाद रुचीताईंना अर्पण!

आयरिश माणसांना कवितेचं आणि रॉक बँड्सचं भारदस्त वलय आहे असं ऐकलं होतं.
ड्ब्लिनतर नवनव्या बँड्सनी सतत फसफसत असतं म्हणे.

त्यामुळे सिंग स्ट्रीटला "डोळे" घातले.

वरच्या अपेक्षेला अगदी पुरुन उरेल असं काही नसलं तरी सिंग स्ट्रीट या वर्षी मी पाहिलेल्या अतिशय भारी पिच्चरांत मानाचं स्थान पटकाऊन बसला आहे.

थोडसं कमिंग ऑफ एज वळणावर जात गाण्यांची भरगच्च मेजवानी एखाद्या लज्जतदार बॉलिवूड रेसिपीची आठवण करून देईल असा आहे.

स्टोरीत इतक्यात न जाता मला आतवर भिडलेल्या नायकाच्या थोरल्या भावाविषयी बोलतो. स्टोरीचा छोटा पण महत्त्त्वाचा भाग. अनेक धाकट्या लोकांच्या आयुष्यात असा थोरला भाऊ किंवा थोरली बहीण असते. "मितवा" (मित्र, तत्त्वज्ञ वाटाड्या) ची भूमिका ते साध्या बेसिक ह्युमन आत्मीयतेने आणि निरपेक्ष प्रेमाने निभावतात, अशा अत्यंत नशिबवान लोकांपैकी एक म्हणजे या चित्रपटाचा नायक. कुणी "वास्तुपुरूष" पाहिला आहे का? तिच्यातली "रेणुका दफ्तरदार"?

गाणी बेहद्द आवडली. टिपीकल आयरिश हेल आवडला.

चौदा-पंधराव्या वर्षी एका मुलीला पटविण्यासाठी कॉनर एका बँडची जुळणी करतो, तेही तिला त्या बँडचे विडिओज करता यावेत म्हणून. तिथपासून ते जोडपं आपलं डब्लिन सोडून लंडनला आयुष्य घडवायला निघतात इथपर कथानक.

१९८५ चं वातावरण, डेविड बॉवीने त्या सर्व मुलांना दिलेला "स्वीट मोमेंट ऑफ इन्क्लुजन (खालचा विडिओ ०.५४ मिनिटे)", नुकतेच बनू लागलेले डिजीटल म्युझिक विडिओज.

पाहाच अशी शिफारस करेन.

.
Donald Trump 2005 tape: I grab women “by the pussy.” - असे विधान ट्रंप यांनी २००५ मध्ये केले होते व त्याचा व्हिडिओ आज उघडकीस आलेला आहे. त्या संदर्भात हे व्यंगचित्र.
.
.
.
.
Enough

ट्रम्पच्या या वक्तव्यानंतर रिपब्लिकन काँग्रेसमेनची आज टेलिकॉन झाली . त्यात सभापती पॉल रायन याने आता "निवडणुकीला" उरलेला महिनाभर सर्वांनी आपापल्या मतदारसंघाचे भान ठेवावे व निवडून येण्याची शर्थ करावी, कारण आता आपल्याला प्रेसिडेंट हिलरींना मनमानी करण्यापासून रोखायचे आहे ' असा पवित्रा घेतला आहे!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आडमाप हिरो + कमनीय हिरवीण + शेती/ट्रॅक्टर/बुलेट/स्लो-मो मध्ये उधळली जाणारी फुलं इत्यादी:

शनिवारी आठवड्याभरची कामे झाल्यावर, रविवारी "नक्षत्रांचे देणे" मधील, २७ नक्षत्रांपैकी एक नक्षत्र ऐकणे होते. आज "सुधीर फडके" यांच्यावरील नक्षत्र पाहीले. सुरावटींत पार चिंब भिजुन जायला झाले.
- तू माझा होशील का
- चला सयांनो हलक्या हाते, नखानखांवर रंग भरा
- जाळीमधी पिकली करवंद

अशा जुन्या मराठी गाण्यांची उजळणी तर झालीच पण सुधीर फडके यांनी दिलेल्या हिंदी गाण्यांचीही झलक मिळाली. त्यांनी २० हिंदी गाण्यांना चाली लावल्या. पैकी
- दिन है सुहाना , आज पेहेली तारीख है.
- ज्योती कलश छलके
आदि अजरामरच.
.
सुधीर फडके यांच्या कीर्तीचा आढावा, आणि "गीत रामायणाचा उल्लेख नाही." हे स्वप्नातही शक्य नाही. गीत रामायणातील गाण्यांची १-२, एक दोन कडवी सलग अर्धा-पाऊण तास ऐकून अंगावरती अक्षरक्षः काटा आला.
.
खूप नामवंतांनी फडके यांबद्दलचे अपुले विचार बोलुन दाखविले. पैकी पं. भीमसेन जोशी यांनी त्यांच्या "विचारपूर्वक लावलेल्या चालींची" आठवण काढली म्हणजे चित्रपटाचा बाज काय, प्रसंग काय आदि ध्यानात घेऊन लावलेली चाल.
तर कोणी म्हटले "त्यांच्या चाली आइकल्या की गाणे पूर्ण ऐकावेसे वाटे असा प्रमळ दरारा त्या चालीत होता. रसिक श्रोता गाणे ऐकून मगच पुढे जाऊ शके."
.
मलाही त्यांची सर्वच गाणी आवडतात. पण अग्नीदेवाच्या भावना व्यक्त करणारे,
- "दशरथा घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट जाहलो, हा माझा सन्मान....." खूपच आवडते.
- "रामाविण राज्यपदीं कोण बैसतो ? घेउनियां खड्ग करीं, मीच पाहतो" या गाण्याला लावलेली क्रोधाचा अविष्कार करणारी चालही आवडते.
- "निरोप माझा कसला घेता,जेथे राघव तेथे सीता.." या गाण्याची.
- दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ............. या गाण्याची
.
किती वैविध्य आही त्यांनी लावलेल्या चालींमध्ये खरोखर!
.

वेदमंत्राहून अम्हां वंद्य 'वंदे मातरम्‌'
वंद्य वंदे मातरम्‌
माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र 'वंदे मातरम्'

अजरामरच. "वंदे मातरम" सिनेमात पु.लं आणि सुनीताबाई नायक-नायिका आहेत हे या क्पनक्षत्रातूनच कळले.
___________

गीतरामायण लिहीणारे गदिमा "जाळीमधी पिकली करवंदं ..." किंवा 'अशी ही सातार्‍याची तर्‍हा" अशी अतोनातच शृंगारीक गाणी लिहून जातात हे खरेच वाटत नाही.
रादर पूर्वी वाटले नसते आता पटते.

"Do I contradict myself? Very well, then I contradict myself,
I am large, I contain multitudes."

असे थोर सत्य सांगुन गेलेला व्हिटमन आता आकळलेला आहे.

Clinton

जाऊंद्याना बाळासाहेब पाहिला.

मला जे काही बोलायचे आहे ते ऋषिकेश यांनी पाहावे मनाचे नावाच्या संस्थळावर जसंच्या तसं मांडलं आहे. किंबहुना कलमवाली बाई (!) (लेखनशैली पाहता त्या मेघना भुस्कुटे असाव्यात) यांनी देखील नेमकं लिहिलं आहे.

नाटक माझा वीक पॉईंट आहे. कोल्हापूर् माझा वीक पॉइंट आहे. सतीश आळेकर, माधुरीताई, एव्हरग्रीन प्रायोगिक आज्जी थोरल्या सुभाष, रीमा, पेठे, एलकुंचवार, दुर्गाआज्जी भागवत, एक शून्य मी, सुदर्शन, ललित विभाग, कुलकर्णीद्वय ह्या सगळ्यांकडे ओढ आहे, घरातल्या किरकिर मुत्त्याविषयी जितका जिव्हाळा आणि अढी असायची तेवढी सगळी यांच्या बाबत आहे. पुण्याचं आणि माझं नातं तर लव्ह-हेट झालंय.

आणि मायमराठीची, मुलुखाची जोरदार खाज उठते. जरतारी पदर आणि कुंकवात माखलेल्या परडीतल्या कवड्या आणि विठ्ठलाचं चांदीचं अंबर आणि औदुंबरातून संथ वाहती धुक्याळ कृष्णा आणि चंबुखडीचा डोंगर आणि कोल्हापूरानं आयुष्यावर पांघरलेली निरामय सावली आणि जी. ए. बेळगाव आणि कऱ्हाडचे कुलकर्णी आणि काय काय भसक्कन येऊन एक हातात न येणारं कोलाज तयार करतात. मन कशातही रमत नाही, लायब्ररीकडे पावलं वळतात, लाज न सोडलेली माणसं वर्षा-दोन वर्षातून काहीतरी देतील म्हणून थेटरांकडे जाणं होतं.

मला असलंच काहीतरी वाटू लागलं आणि मी सिनेमा पाहिला.

काय आवडलं ते वरती दोघांनी सांगितलंयच. मी अजय अतुल सहसा मुद्दाम ऐकत नाही, पण गोधळाने गाणं म्हणून स्वतंत्ररित्या ठाव घेतला. तसंच वाट दिसू दे या गाण्याचं. वाट दिसू दे मध्ये अजय अतुल जरा सैल हात सोडतात आणि त्याचं स्वतंत्र गाणं म्हणून विचार न करता ब्यागराउंडचं मुजिक म्हणूनच कंपोज करतात असं वाटतं. असो. ही गाणी आवडण्याचं खरं कारण कदाचित रूह( उमेश कुलकर्णी) नावाचा गीतकार असेल. वाट दिसू दे हे कितीतरी दिवसात उत्तम लिरिक्स ऐकलं.

पिच्चर चांगला रटाळ वाईट असा न्याय मी या चित्रपटाला लावू शकत नाही. कारण हा फक्त वरच्या खाजेपायी पाहिला आहे. त्याला झीचं क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष् पॅकेजिंग असले तरीही. काही आक्षेप आहेत ते मात्र नोंदवावेत असे. झीचं गाण्यांचं आणि मार्केटिंगचं लचांड असतं हे मान्य. तरीही इतका अनुभव असलेले गिरीश कुलकर्णी दिग्दर्शनात मात्र ढिसाळ पडलेत. अजय अतुल यांनी भान ठेवावं. असो.

"जरतारी पदर आणि कुंकवात माखलेल्या परडीतल्या कवड्या आणि विठ्ठलाचं चांदीचं अंबर आणि औदुंबरातून संथ वाहती धुक्याळ कृष्णा आणि चंबुखडीचा डोंगर आणि कोल्हापूरानं आयुष्यावर पांघरलेली निरामय सावली आणि जी. ए. बेळगाव आणि कऱ्हाडचे कुलकर्णी आणि काय काय भसक्कन येऊन एक हातात न येणारं कोलाज तयार करतात."
क्या बात है ! केवळ थोर!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

प्रतिसाद आवडला. प्रतिसाद वाचून व ऋषिकेश आणि मेघनाचे लेख वाचून चित्रपट पाहण्याची इच्छा होते आहे.

लेखनशैली पाहता त्या मेघना भुस्कुटे असाव्यात

त्या सायटीवरचा मेघनाचा एक आयडी नक्की माहिती आहे. तो हा नाही.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नेट्फ्लिक्स वर " Today's Special " हा सिनेमा पाहिला.फार छान वाटला. भारतीय मसाले फार पुर्वीपासून प्रसिध्द आहेत. त्यांच्या चवीमुळे लंडनमधील एका भारतीय माणसाचे,डबघाईला आलेल्या हॉटेलचे नूतनीकरण कसे होते ते छान दाखविले आहे. नसरुद्दिन शहाची भूमिका, छोटी असली तरीही भाव खाऊन जाते.

.
हा व्हिडिओ अवश्य पहा. ट्रंप ने माघार घेतली तर काय होईल त्याबद्दल...
.
.
.

खालील मेंढा का बकरा का काय तो प्राणी आहे त्याचा व्हिडीओ पाहीला आणि फुटले. हा व्हिडीओ ऑफिसमध्ये तीघांना पाठवला कोणी chuckle (खुदुखुदु हसणे) ही केले नाही Sad
पण भोवताली वातावरण जरा लाईट वाटतय. लोक कॉम्प्युटरमधुन डोकं काढुन हसत बोलतायत. आय अ‍ॅम शुअर ही या व्हिडीयोचीच कमाल आहे. Smile

https://www.facebook.com/peacefulnaturee/videos/678188399001504/?hc_ref=...
___
हाण्ण!! काय खालच्या एकेक कमेंटस-

Does this goat have a Facebook or Instagram??? I would totally follow him
.
Hahhaha this goat is actually what I want to do to people honestly
.
Hello????!! That would be one dead goat!!
.

सहसा अवार्ड शो पाहत नाही, पण फेसबुक वर हा विडीयो पहिला. फार मस्त आहे -

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

(वेळेअभावी हे लिहायला खूप उशीर झाला आहे, कारण हे प्रदर्शन केवळ उद्यापर्यंत मुंबईत आहे.)

इब्राहिम अल्काझी यांच्या नाट्यकारकीर्दीचा आढावा घेणारं एक प्रदर्शन मुंबईच्या 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट'मध्ये (एनजीएमए) चालू आहे. कलासक्त असलेल्या प्रत्येकानं पाहावं असं हे प्रदर्शन आहे. त्यात अल्काझी आणि सुलतान पदमसी यांची चित्रं पाहायला मिळतात; भारतीय रंगभूमीवर मैलाचे दगड ठरलेल्या कित्येक नाटकांची पोस्टर्स आणि दुर्मीळ छायाचित्रं पाहायला मिळतात; अलकनंदा समर्थपासून सीमा बिस्वासपर्यंत नाट्यकर्मींच्या कित्येक पिढ्या ज्यांनी घडवल्या त्या अल्काझींची दृश्यकलेची जाण किती सखोल होती हे दाखवणारे त्यांच्या नाटकांचे सेट्स पाहायला मिळतात (एलिअटच्या 'मर्डर इन द कथीड्रल'साठी चित्रकार एम एफ हुसेन यांनी रचलेला एक सेट पाहिला तरी प्रदर्शनाला गेल्याचं सार्थक होईल) आणि आणखी बरंच काही. शक्य असेल, तर १८ तारखेला एक दिवस काढून दक्षिण मुंबईत आवर्जून जा आणि हे प्रदर्शन पाहा. प्रदर्शनाविषयी अधिक
१. शर्मिला फडके ह्यांच्या ब्लॉगवरून -
http://shamaaemahafil.blogspot.in/2016/10/blog-post.html

२. लोकसत्तामध्ये प्रदर्शनाविषयी आलेला लेख -
http://epaper.loksatta.com/c/13089038

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गेल्या वीकांताला सुदर्शन रंगमंच येथे 'रिंगण' निर्मित रा.चिं ढेरे यांच्या काही लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम पाहिला. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित कार्यक्रम होता. ढेरे यांबद्दल फक्त ऐकून होतो. त्यांनी लिहिलेलं काही वाचलं नव्हतं. कार्यक्रमात त्यांच्या ८ लेखांचा, एका मुलाखतीचा आणि त्यांच्या बहिणीने त्यांच्या बालपणाबद्द्ल लिहिलेला एक लेख याच्या समावेश होता.
त्यांनी लिहिलेल्या लेखांपैकी खालील विषयांवरचे लेख समाविष्ट होते.
१. मूलदेव आणि चौरकर्माचा इतिहास
२. बांशिंगामागच्या संकल्पना
३. लज्जागौरी
४. खलील जिब्रान
५. मिथ/मिथकं यांबद्दलच प्रकटन
६. विट्ठलाबद्दलच चिंतन
७. (विसरलो)
८. ( एकुणच त्यांचं आत्मकथन वाटावं असा एक लेख )

यशिवाय एक मुलाखत देखील होती. मुलाखत एका कलाकाराने ढेरे आणि एकाने मुलाखत घेणार्‍या अशा प्रकारे प्रश्नोत्तरांमध्येच सादर केली. हा प्रकार उत्तम जमला होता. मुलाखतीचा गोष्वारा किंवा शब्दा़ंकन वाचण्यापेक्षा खूप परिणामकारक.

कार्यक्रमात त्यांच्या कामाचा स्पेक्ट्रम आणि त्यांचं व्यक्तिमत्व बाहेर आणणं या दोन्ही गोष्टींचा छान मेळ जमवला आहे. माधुरी पुरंदरे, ज्योती सुभाष, अशी नामवंत लोक आहेत कार्यक्रमात. प्रकाश योजना आणि संगीत याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. लाईव सतार वादनाने खूप छान एफेक्ट येतो. नक्की बघावा असा कार्यक्रम.

(अजून एज प्लस पॉईंट म्हणजे ऋ भेटला कार्यक्रमाला.)

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

>>यशिवाय एक मुलाखत देखील होती. मुलाखत एका कलाकाराने ढेरे आणि एकाने मुलाखत घेणार्‍या अशा प्रकारे प्रश्नोत्तरांमध्येच सादर केली. हा प्रकार उत्तम जमला होता. मुलाखतीचा गोष्वारा किंवा शब्दा़ंकन वाचण्यापेक्षा खूप परिणामकारक.

तपशील : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी ढेरे यांची घेतलेली ही मुलाखत आहे. त्यातला काही अंश कार्यक्रमात वाचला जातो. मुलाखत मुळातून संपूर्ण वाचण्यासारखी आहे. ती एका पुस्तकात समाविष्ट आहे, पण आता नाव आठवत नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाव आठवत नव्हतं!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

क्र. ७: कुरुंदकरांनी ढेर्‍यांबद्दल केलेलं एक भाषण.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

मस्तं! बरेच दिवसांनी बघितलं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

A Stranger in Town हा चित्रपट पाहिला .छान आहे. सुट्टीवर गेलेल्या एका न्यायधिशाची कथा आहे. कायद्याच्या ज्ञानाचा , फायदा कसा करावयाचा असतो हे सोदाहरण पटवून देतो. कोर्टातील शेवटचे भाषण अतिशय मार्मिक आहे. ते पाहून स्व.राजकपूर यांच्या ' जागते रहो ' ह्या चित्रपटाची,विशेषत: शेवटच्या भाषणाची हमखास आठवण होते. जरूर पहावा. तूनळी वर सापडेल.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!