मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

a

field_vote: 
0
No votes yet

मला आंजावर सापडत नाहीये उत्तर.

~१९.५० चौसेमी?

=3*25*(1-pi/4)+(15-25*atan(1/2))

बरोबर.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बरोबर उत्तर हे आहे - दोन शुभ्र वर्तुळे एकाशेजारी एक असल्यावर प्रेक्षणीय दिसतात. विशेषत: त्यांचा केंद्रबिंदू गुलाबी असेल तर.

बिंदू की गुलाबी लहानसे वर्तुळ?
वर्तुळ असल्यास, ......... बाह्य वर्तुळ : अंतरवर्तुळ असे कोणते प्रमाण आकर्षक असते? उदा - १०:३ किंवा १०:४ वगैरे Wink
या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही न दिल्यास, विक्रमा तुझ्या डोक्याची हजार शकले ....

मिहीर कसं सोडवलंत?

image
माझे उत्तर = तुमचे उत्तर - डाव्या कोपऱ्यातला तळाचा भाग.
डाव्या कोपऱ्यातला तळाचा भाग = त्रिकोण ABC - त्रिकोणाचा करडा भाग - वर्तुळाचा AC खालचा काप.
वर्तुळाचा खालचा काप = वर्तुळपाकळी DEC - त्रिकोण DEC.
कोन ECA = tan-1(1/2)
कोन DEC = पाय - 2*tan-1(1/2)
ह्या कोनांवरून पाकळी आणि त्रिकोणाची क्षेत्रफळे काढता येतात.

धन्यवाद. कळलच असे नाही पण ट्राय करेन.

आता A, B, C, D, E चं चित्र लाव. मी आधीपेक्षाही आता अधिक गोंधळल्ये.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


आपल्याला ADG ह्या भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे.
त्रिकोण ABC = ADG भाग + DFCG भाग + CBG भाग.
त्रिकोण ABC व भाग CGB ह्यांची क्षेत्रफळे माहीत आहेत.
DFCG भाग = DECG वर्तुळपाकळी - त्रिकोण DEC
आता कोन EDF = कोन ECF (समांतरभूज त्रिकोण)
तसेच कोन ECF = कोन FAB (व्युत्क्रम कोन (झेड)) = tan-1(1/2) (कारण BC = 5, AB = 10).
आता काटकोन त्रिकोण EFC मध्ये, कर्ण EC = 5 सेमी.
म्हणून, EF = sqrt(5), FC=2*sqrt(5).
ह्यावरून काटकोन त्रिकोण EFC चे क्षेत्रफळ काढता येते.
तसेच वर्तुळपाकळी DECG चे क्षेत्रफळ = (कोन DEC / pi) * pi*r^2
कोन DEC = pi - कोन ECF - कोन EDF = pi - 2*tan-1(1/2)
आता हे सगळं वर घालायचं आणि ADG ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं.

उत्तरात atan 1/2 आहे म्हणजे उत्तर बरोबर असावे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

21.42 चौ से मी हवे ना ?

100 - 25pi

त्यातून डाव्या कोपऱ्यातला भाग वजा करायला हवा ना.

माझी (नजर)चूक झाली.

९० - २५ pi (१- (atan (३/४) / ३६0))

~ १९.५

O चे coordinates (०, ०) धरले तर A चे coordinates (-५, -५) , C चे coordinates (0, -५)
B चे coordinates (-३, -४) येतात ----> line AB (x = 2y + 5) आणि वर्तुळाचा (x^2 + y^2 = 25) छेद
X चे coordinates (0, -४)

त्रिकोण ABC = १/२ (५ X |(-५ - (-४))|) = ५/२
त्रिकोण OBC = १/२ (OC X BX) = १/२ (५ X |(-३ - 0)|) = १५/२
कोन BOC = atan (BX/OX) = atan (3/4), वगैरे

इथे सगळे उत्तर बघता येईल

भारीय गणित.

यंदाच्या लाल किल्ल्यावरील भाषणात सांगण्यासारखे फारसे नसेल - तवलीन सिंग

-------------------------------------

एकीकडे १२० कोटींपैकी फारच थोडे कर भरतात. बरेचसे (व्यावसायिक) लोक करचुकवेगिरी करतात त्यांच्याकडून कर वसूल केला पाहिजे असे सामान्यतः लोकांना वाटते. म्हणजे करवसुली अधिकार्‍यांनी त्यांच्यामागे लागून कर वसूल करायला हवा असे आपले म्हणणे असते.

दुसरीकडे हे करवसुली अधिकारी बसुलीचा ससेमिरा लावतील तेव्हा आपणच इन्स्पेक्टर राज* आहे असे म्हणू.

*आम्ही रुग्णांवर उपचार करू की कर अधिकार्‍यांना हव्या असलेल्या कागदपत्रांचे गठ्ठे सांभाळत बसू? असं डॉक्टर विचारतील. इतरही असेच कायकाय म्हणतील.

दोन्हीचा सुवर्णमध्य कोणता?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

दोन्हीचा सुवर्णमध्य कोणता?

१. प्रत्यक्ष कर बंद करुन, जिथे वसुल होऊ शकतील अश्या टॅक्स पॉईंट वर अप्रत्यक्ष कर लावणे. अधोरेखित शब्द महत्वाचा. उदा - इंधने, स्टील आणि बाकीची मेटल्स, कार, दुचाकी, एसी, टीव्ही, फ्रीझ अश्या गोष्टी जिथे उत्पादकाला कर चुकवणे शक्य नाही. हे कराचे दर थोडे जास्त असतील पण सर्व सुरळीत होइल.

२. सैन्य, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व सरकारी आस्थापनांना कॉस्ट सेंटर पासुन प्रोफीट सेंटर बनवणे. : पोलिस आणि न्याय संस्था गुन्हेगारांकडुन त्यांचा खर्च वसुन करतील. तुरुंग फुकट लेबर पुरवणार्‍या संस्था बनतील. पासपोर्ट वगैरे महाग करुन विदेश मंत्रालयाचा खर्च काढला पाहिजे. थोडक्यात सरकारी सेवा पे अ‍ॅज यु गो अश्या असतील.

तुरुंग फुकट लेबर पुरवणार्‍या संस्था बनतील

शॉशॅन्क रिडेम्पशन आठवला!

*********
आलं का आलं आलं?

लै भारी आहे शॉशॅन्क रिडेम्पशन

गर्दीतला दर्दी

आमच्या ऑफिसकडून radia client automation service नावाचे काहीतरी आम्हाला मिळू शकेल अशी मेल आली आहे. हा काय प्रकार आहे, त्याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला असला तरी मेल वाचून ओ की ठो कळलं नाही. गुगलवर वाचूनही कळलं नाही. ही काय service आहे? ऑफिसच्या काँप्युटरवर किंवा लॅपटॉपवर ती इन्स्टॉल केल्याने काय होईल? पीडीएफ/ वर्ड फाइलींचे वाचन व वर्डमध्ये लिखाण यासाठी काँप्युटरचा मुख्यत्वे वापर करणार्‍या आम्हा पामरांना या सुविधेचा काही फायदा आहे का?

अहो ते म्हणजे तुमच्या मशिन वर वेगवेगळी सॉफ्ट्वेअर केद्रीय पद्धतीने मॅनेज, कंट्रोल करता येतात. नविन टाकता येतात, नविन व्हर्जन टाकता येतात, सिक्युरीटी पॅचेस वगैरे. तुम्हाला आम्हाला काही फायदा नाही.

अच्छा, धन्यवाद

प्रश्न : windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही.
एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच.
या windows १० मधे तो Update नहिच्चे, त्यामुळे uninstall करण्याचा प्रश्न नाही. System Restore करायचं म्हटलं तर २ दिवसांपुर्वी फक्त Adobe Acrobat update केलं होतं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही.
Event Log मधे १५० च्या वर events आहेत. आणि त्यातही नेमकं कशामुळे असं झालंय ते कळेना. Google बाबा कडुनही काही उत्तर मिळेना. म्हणून हा लेखन प्रपंच.
जाणकारांनी कृपया मदत करावी.

- ITतली बिचारी.

मॉनिटर्स किती आहेत? दोन किंवा अधिक?

एकच

एकच

१. try this: settings:system: tablet mode -> turn it off (if on.) if off already, try turning it on and then off and see if it works.)
2. Can he/she see icons in the explorer mode for desktop? (win+e -> desktop)

Tablet mode मधे जाण्याची शक्यता नाही, कारण आणखी ३ युझर्सचा सेम प्रोब्लेम आहे. तरी एकदा चेक करुन बघते.
(win+e -> desktop) यात Icons दिसताहेत.

प्रत्येक संस्थळाचा पिंड वेगळा आहे आणि आइडीदेखील वेगवेगळ्या हेतूंनी येतात.वरची सर्व व्हर्जनस पटताहेत.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही महोदय बाई आता बहकल्यासारखे करायला लागली आहे का?

मला तर हा प्रकार मूर्खपणाचा वाटतो ( दोन्ही बाजुनी ).

http://www.loksatta.com/desh-videsh-news/husband-goes-alone-on-honeymoon...

कल्चरल वॉर
a

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

इजिप्तच्या खेळाडू मुलींचे ड्रेस इतके टाईट आहेत की त्यातून सर्व फिगर स्वच्छ दिसते. मुल्लांना हे फार दिवस मान्य होईलसे वाटत नाही.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पण ह्या कल्चरल वॉरमधे कोण जिंकलं ? नाही म्हणजे त्यावरुन कमी /जास्त कपडे घातल्यामुळे जिंकले / हारले असा सोपा निष्कर्ष काढणे बरे पडेल म्हणून विचारले ! Smile

हल्ली औषधांच्या ट्रायल्स उंदरांवर घेण्यास बंदी आहे असे कळले. त्या ट्रायल्स कंप्युटर सिम्युलेशनद्वारा केल्या जातात.

त्यावरून आलेला प्रश्न -
१. ठार मारून खाण्यासाठी कोंबड्यांची, डुकरांची, बोकडांची पैदास केली जाते आणि त्यांना खाण्यासाठी ठार मारले जाते. मानवी कारणासाठी मुद्दाम पैदास केलेल्या प्राण्यांना मारले जाते. त्यांचे दूध काढले जाते, अंडी खाल्ली जातात.
२. मानवांना पगार देऊन, इतर सुखसोयी सवलती देऊन सुरक्षेच्या कामावर नेमले जाते. युद्ध वगैरे झाल्यास त्यांचा बळी देण्याची अपेक्षा असते. बर्‍याच मानवांच्या हितासाठी काही मानवांना मरण्यासाठी तयार केले जाते.

त्याचप्रमाणे बर्‍याच मानवांच्या हितासाठी उंदीर मारण्यास का बंदी असावी?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

माझं ह्या विषयावर काहीही मत नाही.

पण मुद्दा क्र १ बद्दल - खाण्यासाठी मारल्या गेलेल्या प्राण्यांच्या आयुष्यात एकच दिवस खराब असतो; प्रयोगशाळांतल्या उंदीर आणि इतर प्राण्यांचे सगळेच (किंवा बरेच) दिवस वाईट असतात; असं कारण दिलं जातं.
प्रत्यक्षात फ्री-रेंज नसलेल्या कोंबड्या काय प्रकारे खुराड्यांत ठेवल्या जातात हे बघितलं तर बहुदा अंडी खाणं सोडून द्यावं लागेल. मोठ्या प्रमाणावर पाळल्या गेलेल्या कोणत्याही प्राण्यांचे बहुतांश दिवस वाईट असतात हे मान्य आहे.

मुद्दा क्र. २ बद्दल असं काही कारण दिलं जात असेल तर कल्पना नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उंदीर मारण्यास का बंदी असावी?

उंदीर मारण्यास बंदी नसावी!!

अगदी अगदी!! अगदीच मान्य.

हल्ली औषधांच्या ट्रायल्स उंदरांवर घेण्यास बंदी आहे असे कळले.

ही नक्की कुठे आहे? माझी बायको एका कॅन्सर रीसर्च सेंटरमध्ये काम करते. तिथे अशा ट्रायल्ससाठीचे प्रयोग ती स्वतः करते.

भारतात बंदी आहे बहुधा. सरसकट नाही पण बर्‍याच रिस्ट्रिक्शन असतात.

--------------------------
कहानी चित्रपटाच्या सुरुवातीस विषारी वायूचा प्रयोग उंदरांवर (गिनिपिग्स) केल्याचे दाखवले आहे. त्या दृष्यापूर्वी No animals were harmed, it is the work of computer simulation अशी कॅप्शन दाखवतात.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

माझ्या माहितीत अशी बंदी अमेरिकेत तरी नाही. मानवतेच्या भूमिकेतून प्राण्यांवरचे प्रयोग कमीत कमी करण्याकडे कल जरूर आहे, पण तो स्वेच्छेने . भारतात यासंबंधीच्या पूर्वीच्या मंत्री मनेका गांधी या अशा प्रयोगांच्या विरोधात होत्या असे ऐकले (माझ्या एका बायोलॉजिस्ट मित्राशी त्यांची एका बैठकीत खडाजंगीही झाली होती.)

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

त्याचप्रमाणे बर्‍याच मानवांच्या हितासाठी उंदीर मारण्यास का बंदी असावी?

बंदी अजिबात नसावी. उंदिरांच्या जीवनाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य अजिबात नसायला हवे. खरंतर एक्सप्लिसिट पणे हे कायद्यात्/संविधानात नमूद केले पाहिजे. उंदिर हे ना मत देतात ना टॅक्स. व त्यांच्या वतीने जे मत व्/वा टॅक्स देऊ शकतात त्यांच्याकडून कर वसूल करण्याची सुद्धा सोय नाही.

रक्षण केले नाही तर अनेक स्पिसीज एक्स्टिंक्ट होतील चा मुद्दा तर अगदीच कैच्याकै आहे. जगातल्या प्रत्येक स्पिसिज ला एक्सटिक्ट होण्यापासून वाचवणे ही सरकारची जबाबदारी झाली तर कुबेर सुद्धा भिकेस लागेल.

हल्ली औषधांच्या ट्रायल्स उंदरांवर घेण्यास बंदी आहे असे कळले.

असत्य

त्या ट्रायल्स कंप्युटर सिम्युलेशनद्वारा केल्या जातात.

केल्या तरी त्या प्रत्यक्ष उंदरांच्या ट्रायल्स इतक्या ग्राह्य समजल्या जात नाहीत.

अवांतरः ट्रायल्स्साठी वापरले जाणारे उंदीर हे त्या कारणासाठीच ब्रीड केले जातात. मुनिशिपालिटले उंदीर पकडून त्यांच्यावर ड्रग ट्रायल्स केल्या जात नाहीत.
बहुत काय लिहिणे? आपले अगत्य असो द्यावे...
Smile

'दिवंगत' शब्दाची व्युत्पत्ती काय?

मृत व्यक्तीच्या नावामागे वापरायचा स्वर्ग, कैलास, पैगंबर, ख्रिस्त वगैरे नसलेला हाच एक शब्द आठवतो म्हणून कुतुहल.
कोर्टात 'मयत' शब्द वापरतात पण तो तितका डिसेंट वाटत नाही.

दिव्,दिव,= स्वर्ग.
गत=गेलेला.
स्वर्गी गेलेला

हात्तिच्या
इथे पण स्वर्ग आलाच का?? Smile

द्राक्षा म्लानमुखी जाता, शर्करा चाश्मतां गता।
सुभाषितरसस्याग्रे, सुधा भीता दिवं गता।।

हे (सेल्फ-ट्रम्पेटिंग ;)) सुभाषित आठवले

स्वर्गात राहणारा, कैलासात राहणारा इथवर ठीक आहे. पण पैगंबरात/ख्रिस्तात राहणारा??????

(हे काहीसे अश्लील - आणि म्हणूनच कदाचित ब्लास्फेमस (मराठी?) - वाटत नाही काय?)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

ब्लास्फेमस (मराठी?)

पाखंडी?
अलीकडेच कुठेतरी मृत बौद्ध व्यक्तींच्या नावामागे आयु. का असेच काहीतरी लावलेले पाहिले. ह्या न्यायाने नास्तिकांना मेल्यावर बेपत्ता किंवा गायब म्हणायचे का?

कार्बनवासी?

*********
आलं का आलं आलं?

पाखंडी?

सूक्ष्म अर्थच्छटेचा फरक असावा (बोले तो, वृत्ती वि. वचन), परंतु चालून जावे. आभार.

अलीकडेच कुठेतरी मृत बौद्ध व्यक्तींच्या नावामागे आयु. का असेच काहीतरी लावलेले पाहिले.

"आयु." बोले तो?

ह्या न्यायाने नास्तिकांना मेल्यावर बेपत्ता किंवा गायब म्हणायचे का?

त्यापेक्षा, ('भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:'-न्यायाने) 'चार्वाकवासी' म्हटले तर?

अर्थ तोच राहील (पाहा विचार करून ), आणि पैगंबरवासी/ख्रिस्तवासीच्या ट्रेण्डशी मिळतेजुळतेही होईल.

..........

बोले तो, चार्वाक पूर्वी कधीतरी मेला असावा अशी आमची समजूत आहे. (चूभूद्याघ्या.) म्हणजे तत्कालीन प्रथेनुसार कोणीतरी त्याचा देह भस्मीभूत केला असणार. समजा नसला, आणि त्याऐवजी दफनित केला असला अथवा तसाच सडण्यासाठी/गिधाडांकरिता सोडून दिला असला, तरीही तो आतापावेतो अस्तित्वात नसणार. आणि जे अस्तित्वातच नाही, तेथे जाणे म्हणजे बेपत्ताच होणे की हो! (पण मग त्या न्यायाने 'स्वर्गवासी'ही चालू शकेल.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

मृत!
Wink

नाही हो नाही.
मृत नाही जीवंत.
आयु. म्हणजे आयुष्यमान किंवा आयुष्यमती.

आयु. म्हणजे आयुष्यमान किंवा आयुष्यमती.

असेच वाटले होते. आणि म्हणूनच मृत व्यक्तीकरिता वापरण्याच्या ज़िक्राने हैराण झालो होतो.

मृत नाही जीवंत.

खुलाश्याबद्दल अनेकानेक आभार.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

चांगल्यापैकी भडाग्नी दिला असेल तर कार्बनवासीही रहाणार नाही. त्या कार्बनचा कार्बन डाय-ऑक्साईड होईल. तेंव्हा ,
पर्यावरण -वासी म्हणता येईल.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

आध्यत्मिक बाबा /गुरु हि या लोकोत्तर विभूती अत्यंत हुशार आणि एकंदरीतच थोर असतात .
त्यांच्या व्यवसायाला जगभर डिमांड तर भरपूर आणि कायम आहेच पण हे मार्केट तसे tricky आहे. Organised religions हे खरे तर यांचे इंटर्नल established competitors . पण आपला ब्रँड एस्टॅब्लिश कसा करावा , त्यातिल आपले niche मार्केट कसे डेव्हलप करावे , सस्टेन्ड ग्रोथ कशी करावी या बाबतीत कुठल्याही मॅनेजमेंट बाबा /गुरु ला लाजवतील अशी टेक्निक्स हि मंडळी वापरतात . स्वतःच्या व्यवसायाबद्दल अत्यंत ऑब्जेक्टिव्हली आणि रॅशनली विचार करणारी हि मंडळी असावीत . एकेकाळी या व्यावसायिकांच्या वर मी भयंकर चिडून बिडून असायचो (आदूबाळ च्या भाषेत तरुण था मय ) आजकाल मात्र या थोर व्यावसायिकांची मार्केटिंग टेक्निक्स बघून मी थक्क होतो . स्पेक्ट्रम च्या एका बाजूला महाराष्ट्रातील निमग्रामीण आणि निमशहरी भागातील आर्थिक कनिष्ठ वर्गात गेल्या १० -१५ वर्षात प्रचंड एस्टॅब्लिश झालेला ब्रँड नरेंद्र महाराज आणि दुसऱ्या एन्ड ला ओशो ते श्री श्री .... निखळ करमणूक ...... केव्हातरी मी या धाग्यावर मी नरेंद्र महाराजांच्या मार्केटिंग टेक्निक बद्दल लिहीन या धाग्यावर .... कोणाकडे असले काही इनपुट्स असले तर इथे शेअर केल्यास धमाल येईल टीप : यात एस्टॅब्लिश्ड धर्म पकडत नाहीये आणि मी कोणाच्याही श्रध्दा स्थानाच्या धोतराला हात घालायच्या हेतूने हे लिहीत नाहीये ( मी सफाईने टणाटण चे नाव घेतले नाहीये )

नव्या धाग्यात लिहा. मला लैच इंट्रेस आहे.

हे नरेंद्र महाराज काय प्रकरण आहे?

*********
आलं का आलं आलं?

याचा नवीन धागा होईल ? म्यांनीजमेंट आलाव करलं का ?

नक्की लिहा.
आमच्या रत्नांग्रीचं नाव दशदिशांत पोहोचविणार्‍या या नरपुंगवाविषयी तुम्ही एक धागाच काय , हेडरमध्ये हिरव्या अक्षरातला अख्खा टॅब काढलात तरी 'भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.'
बोलो गणी गण गणात बोते ,
जगा आणि जगू द्या!

Wink

उद्या लिहितो . पण याचा नवीन धागा कसा करायचा ? म्यांनीजमेंट नि मार्ग नाही दाखवला तर स्वामी नक्की दाखवतील

नरेंद्र महाराजांचा एक किस्सा आमच्याकडे सुद्धा आहे. छोटासाच आहे. पण तुम्ही धागा काढलात की आम्ही लिहूच. व रत्नाग्रीबद्दल (एकंदरित कोकणाबद्दल) आम्हालाही अत्यंतिक प्रेम आहे. एक तृतीयांश बालपण चिपळूणात गेले माझे. बेस्ट डेज ऑफ माय लाईफ. एक मामाश्री आजही रत्नाग्रीत राहतात व दुसरे खेड मधे रहायचे. रविंद्र पिंगेंची कोकणमहात्म्यं वाचत होतो एकेकाळी.

( जाताजाता : पावस ला विसरू नका ओ. तिथली प्रसादात मिळणारी शाबुदाण्याची खिचडी लाजवाब असते. )

पावसला मुगडाळतांदुळाची खिचडी मि ळते ना?
#महाराज/ मठाच्यामागे काही उद्योगपतीच असतात.वेगळा धागा काढा हवा तर परंतू नाव न घेता लिहिन कारण आरोप होतात.मठात तीन वेगवेगळे गट एकत्र येतात.तिघांचाही हेतू वेगळा असतो.काही एकच मुद्दा पकडून लिहिलं तर दुसय्रांवर अन्याय होतो.आजच्या काळाचा मंत्र "तू तेरा देख." टॅक्स बेनफिट मिळतो आस्थापनांना यात अर्थ आहेच.

NEW YORK (The Borowitz Report)—Clarifying his position on a key national-security issue, Donald Trump said on Friday that as President he would be willing to use nuclear weapons, “but only in a sarcastic way.”

“People who are worried about me having the nuclear-launch codes should stop worrying, O.K.?” Trump told CNN’s Wolf Blitzer. “If I ever used nuclear weapons, it would be really obvious that I was just being sarcastic.”

Pressed by Blitzer to explain the difference between a sarcastic and non-sarcastic nuclear attack, Trump responded, “You’d use the weapons and everything, but then you’d say, ‘Just kidding.’ ”

Trump did not specify which nations he would target for a sarcastic nuclear attack. “I can’t say right now,” he said. “But there are a lot of countries that need to lighten up.”
xxx

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ट्रंपबद्दल काहीही ऐकलं तरी आता नवल वाटतच नाही. गॉन केस आहे तो.

आज सकाळी ही गंमत दिसली.

दुधाच्या बाटल्याचं झाकण आपसूक, नियमितपणे थडथडत होतं. त्याचा आवाजही व्हिडीओत ऐकू येईल.

दूध नासलेलं नाही; निदान तशी चव, वास आणि वर्तन (गरम केल्यास नासणं) नाही. दुधाची एक्स्पायरी २८ ऑगस्ट लिहिलेली व्हिडीओतही दिसत्ये; आज १८ ऑगस्ट. एक गॅलन (~ ३.७५ लिटर) दुधापैकी साधारण ७५% संपलेलं होतं; ते ही व्हिडीओच्या शेवटी दिसेल. आजूबाजूला पंखा, एसी, हीटर असं काहीही सुरू नव्हतं. काही दिवसांपूर्वी, एका रिकाम्या बाटलीचं झाकणही असंच थडथडत होतं. त्या बाटलीत आधी संहत लिंबू सरबत होतं; ते संपवून बाटली घासायला ठेवली होती आणि बूच असंच थडथडलं. लिंबू सरबताचा कोळ कदाचित खराब झाला असेल असं प्यायल्यावर जिभेवर जाणवलं.

लिंबू सरबताच्या बाटलीचं झाकण मी पूर्ण उघडलं आणि बंद केल्यावर थडथडणं (अपेक्षेनुसार) थांबलं. दुधाच्या बाटल्याच्या 'जादू'ची वारंवारिता कमी होत गेली आणि आपोआप थांबली. उद्या सकाळी पुन्हा हा प्रयोग करून, हाच परिणाम दिसतोय का हे बघेन. पण ते झाकण योग्य पद्धतीने ठेवायला जमेल का नाही ह्याबद्दल जरा शंका आहे.

ह्याचं कारण काय असावं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२% दिसतय Wink

हा प्रयोग मी लहानपणी साध्या पाण्यानेही केलेला आहे. बाटलीत जी हवा असते ती थंडगार असते. फ्रिजमधून काढून बाहेर आणली की ती उबदार होते आणि प्रसरण पावते. जर झाकण आणि बाटलीचं तोंड यामध्ये कुठच्यातरी द्रवाचा थर असेल तर तो भाग हवाबंद होतो. मग वाढलेल्या दाबापोटी झाकण वर उचललं जातं, आणि पुरेसं उचललं गेलं की हवा बाहेर पडते, आणि हा प्रकार पुन्हा सुरू होतो.

पाण्याच्या रिकाम्या बाटलीनेही हे करून बघता येतं. ती फ्रिजमध्ये ठेवून नुसतीच थंड करायची किंवा त्यात थंड पाणी थोडा वेळ ठेवून ओतून द्यायचं. मग त्या बाटलीचं झाकण बाटलीच्या तोंडावर उलटं ठेवायचं. ते झाकण थोडंसं ओलं केलं की कडांना चिकटतं आणि हवाबंद होतं. मग हे झाकणही टप टप आवाज करतं. त्या बाटलीला आपण हातांनी धरून उष्णता दिली की हा टपटपाट भराभर होतो.

आज सकाळी पुन्हा हा प्रयोग करून बघितला; पुन्हा झाकण थडथडलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घर झपाटलेले असेल.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

जवळपास, एखादा डायनॉसोर आला असेल. (स्पिलबर्ग इफेक्ट)

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

भरलेल्या कॅनचं झाकण अजिबातच थडथडलं नाही; हा नकारात्मक पुरावाही प्रयोगातून मिळवला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्लास्टिकचे झाकण असल्याने टिंगटांग आवाज येणार निघणार नाही अथवा बभ्राटा.

गेल्या आठवड्यात पुण्यातल्या रविवार पेठेत गेलो होतो. तिथे मोती चौकाच्या गल्लीत सोनेचांदी पॉलिश, व्हॅल्युएशन वगैरे करणारी दुकानं आहेत... त्या प्रत्येक दुकानावर 'टंच', 'टंच काढून मिळेल (की मिळतील?)' असं काहीतरी लिहिलेलं होतं. ही 'टंच' काय भानगड असते?

मला वाटते टंच हे इंग्लिश 'टच'चे मराठीकरण असावे. आपण ह्याला 'कस' असे म्हणू शकू. शुद्धता तपासताना जे सोने/दागिना तपासायचा तो एका कठिण दगडावर थोडासा घासतात. त्यातल्या सोन्याची एक पिवळी रेघ त्या दगडावर उमटते. हा पिवळेपणा आणि चकाकी एका आधीच शुद्धता माहीत असलेल्या सोन्याच्या रेघेशी ताडून पाहातात. अनुभवी आणि सराईत नजरांना दोहोतला फरक चटकन कळतो. त्यांना शुद्ध सोने दगडावर घासून त्याची उज्ज्वलता परत परत पाहाण्याचीसुद्धा गरज वाटत नाही. या कठिण दगडाला टच स्टोन म्हणतात. जुन्या पेढ्यांवर हे छोटेसे दगड पूर्वी असायचे. अर्थात हा 'टच' मोजण्याचा प्रश्न सराफांना जुने दागिने विकत घेताना येतो. नवीन ब्रँडेड दुकानात असे जुने सोने (भांगर) विकत घेतले जात नाही. त्यामुळे पेठांतल्या जुन्या पेढ्यांकडेच असे दगड आणि पाट्या दिसू शकतात.

पानिपत येथे बूआलि कलंदर नामक दर्गा आहे. लोकली नोन अ‍ॅज़ 'कलंदरपीर'. तिथे एकाला लागून एक असे दोन खांब एका ओळीत, आणि अशा चार ओळी मिळून एकूण आठ खांब हे अशा कसोटीच्या दगडाचे आहेत असे शेजवलकरांनी पानिपत १७६१ या पुस्तकात नमूद केलेले आहे. १२ जानेवारी २०१३ रोजी मित्रांसोबत तिथे जाणे झाले तेव्हा ते खांबही पाहिले. तसेच एकदम तुळतुळीत, अंमळ ओशट वाटावे अशा पोताचे दगड आहेत. बहुधा अशा दगडाचे पिलर्स अन्यत्र कुठेही नसावेत. तत्रस्थांना विचारून मुद्दाम त्या खांबाचे दोनचार फोटो काढले, रेकॉर्ड राहूदे म्हणून.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

छान माहिती. पानिपत वाचलेले आहे पण हे आठवले नाही. विकीवर अर्थात टच स्टोन वर बरीच माहिती आहे. मुंबईत भुलेश्वरच्या छोट्या छोट्या दुकानात पाहिले होते. आता मुंबादेवीच्या जव्हेरी बाजारातली दुकाने खूपच मोठी आणि कडेकोट सुरक्षाबंद झाली आहेत. पण काही वर्षांपूर्वी काळबादेवीपर्यंत अशी छोटीछोटी दुकाने होती. तिथे हे काळे दगड किंवा दगडी पट्ट्या असायच्या. रेघेतला फरकही इतरत्र पाहिलेला आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

जरुरीपेक्षा अधिक वीज निर्माण करून भारताने एक नवीन कामगिरी केली आहे हे चांगलेच. पण ही ऊर्जा मुख्यतः अत्यंत प्रदूषणकारी , कमी दर्जाच्या खनिज कोळशापासून निर्माण केली जात आहे . भारतात हवा प्रदूषण इतके वाढले आहे की वर्षाला सुमारे पाच लाख लोक संबंधित रोगांनी मरत आहेत . दिल्लीतील विदेशी दूतावासांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा दिल्ली पोस्टिंगचा काळ कमी केला आहे . इतके सर्व करून परत जे तीस कोटी लोक विजेपासून वंचित होते ते तसेच आहेत. एक सोनेरी कांदा म्हणजे तामिळ नाडूकडे आता 1 गिगावॉट इतकी अतिरिक्त पवन ऊर्जा असून ती त्यांनी विकायला काढली आहे . कार्बन प्रदूषण न करणारे महत्वाचे तंत्रज्ञान म्हणजे अणु-ऊर्जा. त्याचे दोन्ही नवे महत्वाकांक्षी प्रकल्प मात्र राजकीय विरोधामुळे ठप्प झालेले दिसतात -नाहीतर एव्हाना जैतापूर सुरु व्हायला हरकत नव्हती . तिथल्या जमीनधारकांना बाजारभावाच्या कित्येक पट मोबदला कधीच दिला गेला आहे .
http://blogs.scientificamerican.com/plugged-in/india-achieves-historical...

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

वर्षाला सुमारे पाच लाख लोक संबंधित रोगांनी मरत आहेत

याचा विदा कुठे मिळेल? कारण भारतात काही लाख स्त्रिया स्वयंपाकघरात प्रदूषित हवेमुळे मरतात हे माहीत आहे. हा पाच लाखांचा आकडा त्यापलिकडचा आहे का?

थोडा शोध घेतल्यावर हा लेख सापडला. त्यात पाच ते सहा लाख लोक सुमारे साडेतीन वर्षं आधी मरतात असा निष्कर्ष काढलेला आहे.

पण गंमत अशी की अमेरिकेसारख्या देशात, जिथे प्रदूषण निश्चित कमी आहे, तिथे दरवर्षी २ लाख लोक मरतात असा निष्कर्ष या लेखात आहे. मग भारताची लोकसंख्या तिप्पट असताना तिपटीपेक्षा कमी लोक मरतात? नक्की काय गोंधळ आहे?

थोडक्यात ही आकडेवारी मिठाच्या मोठ्ठ्या खड्याबरोबर घ्यावी.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Quarter million, half million, one million dead: what is the difference? We need to address this burning issue! The thinking in policy circles seems to be "development first, at any cost!" Is this the national consensus?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

_________________________

डिस्क्लेमर - अर्धवट ज्ञान आहे हे ध्यानात घेऊन वाचावे. ज्योतिषात रस नसेल तर वाचू नये आणि याउप्परही वाचले व अंधश्रद्धा म्हणुन टीकेची झोड ओठवली तर उत्तराची अपेक्षा ठेऊ नये.
.

https://scontent-ord1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/14054993_1742449799362365_4147776172816712542_n.jpg?oh=3d4c0c2cc0bd010dad9779e9be93f992&oe=58104564

.
या लेखामुळे सिरीया ची कुंडली व तीवरील लेख वाचण्याची बुद्धी झाली.
सिरीयाचे लग्न आहे "तूळ" म्हणजे चवथे घर मकरेचे. सध्या मकर राशीत प्लूटो आहे. म्हणजे सिरीयाच्या चवथ्या घरात प्लूटो आहे.
,
हे पूर्वी मी लिहीलेल्या लेखातून
.

चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.
भेसूर, भीतीदायक, थंड रक्ताचा, चेहरा लपवलेला खुनी कोणी असेल तर तो प्लूटो. मुळापासून उखडून काढणारा, Transformative , संपूर्ण उलथापालथ करणारा ग्रह कोणता असेल तर प्लूटो. असा अनुभव (ग्रह) खरं तर कुंडलीतील कोणत्याच घरात स्वागतार्ह नाही पण least of all चवथ्या घरात. जे घर कुंडलीचे गर्भाशय मानले जाते , कुंडलीतील सर्वाधिक vulnerable स्थान. लहानपणीचे घरातील वातावरण, घरातली परिस्थिती पोषक होती की अन्य काही ते जे स्थान पाहून कळते ते चवथे घर. खरं तर भावी आयुष्यात subconscious reflexes कसे होणार ते ठरविणारे स्थान.
.
प्लूटो इथे पडला की त्याला विषारी दूध म्हटले जाते. दूध जे अर्भकाच्या पोषणाकरता अत्यावश्यक असते तेच विषारी झाले तर त्या व्यक्तीने पाहायचे कोणाकडे? बालपणीचे abusive , lethal वातावरण - trauma कसा कळणार जगाला. मूक किंचाळी .... silent scream = चवथ्या घरातील प्लूटो. प्रतीकच घ्यायचे झाले तर साप असलेली काळी dark विहिर. जिथे पडलो असता किंचाळले तर ऐकायला कोणी नाही.
प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडलेले असते ज्यात काहीतरी दबा धरलेले संकट ऊभे ठाकते , आसपास लोकं असतात, पण तोंडामधुन आवाज फुटत नाही. त्या लोकांपर्यंत कसे पोचायचे ते कळत नाही.
प्रौढत्वातील स्व-रक्षणाचे आपले reflexes कसे होणार आहेत हे चवथे घर ठरविते. बरेचदा प्लूटो चवथ्या घरात पडलेली मुले अकाली प्रौढ तर होतातच पण त्यांच्या स्वसंरक्षणाचे एक callous mechanism तयार होते. स्वतःला वास्तवापासून तोडून टाकून स्वप्नसृष्टीत रममाण होण्याची, अगतिकता, लाचारी, हतबलता.
.
प्लूटो हतबलता जाणवून देणारा अत्यंत dark, omnipotent ग्रह आहे. आणि चवथे घर सर्वाधिक vulnerable घर. हे दोन forces एकत्र येतात तेव्हा खूप क्लेश-यातनादायक अनुभव जरुर येतो.

.
मग तसा तर प्रत्येक तूळ लग्नाच्या व्यक्तीच्या चवथ्या घरात ट्रान्झिटिंग प्लूटो येइल. मग काय प्रत्येक तूळ राशीच्या लग्न जातकास हे अनुभवास येणार का?
ऊत्तर - ज्योतिषांच्या मते ट्रान्झिटिंग आऊटर ग्रह हे पिढ्यांवर परिणाम करतात. त्यांचा परिणाम पिंढ्या व व्यापक प्रमाणावरती पहातात.
.
जालावरील अन्य काही लेखांमधुन -
एक ताणाचा अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल आस्पेक्ट आहे "स्क्वेअर". म्हणजे काटकोनात रस्सीखेच. एका ग्रहाला पूर्वेस जायचे आहे तर अन्य ग्रहास दक्षिणेला किंवा उत्तरेला. यात अतोनात ताण + ग्रोथ पोटेन्शिअल असते.
ट्रान्झिटिंग प्लुटो व युरेनस सध्या स्क्वेअर आहेत. युरेनस म्हणजे "अचानक होणारे बदल" = सडन चेंज, तर प्लूटो म्हणजे मूर्तिमंत पर्जिंग आणि डार्कनेस.
या ताणाचा पर्रिणाम पिढ्यांवरती होतो. Transiting Uranus Square Pluto is a generation transit, so when you feel it, so will everyone else you grew up with at school.

.
देशाच्या कुंडलीचा कलेक्टिव्ह कॉन्शसनेस वरती परिणाम होत असावा असा निष्कर्ष काढता येऊ शकतो

सं - Uranus Square Pluto Natal and Transit

कुंडली मांडण्याची गोल पद्धत प्रथमच पाहतो आहे. यात काही विशेष असतं का? (म्हणजे चौकटीच्या कुंडलीपेक्षा जास्त एफिशियंट असणे वगैरे?)

*********
आलं का आलं आलं?

आबा मला ही पद्धत गेल्या काही महीन्यांपर्यंत माहीतच नव्हती. मग स्वतःची कुंडली त्या रुपात बघून बघून शिकले. या पद्धतीमध्ये बाह्यवर्तुळात जे ग्रह दाखविले आहेत ना ते ट्रान्झिटिंग ग्रह म्हणजे सध्या प्लूटो कोणत्या राशीतून भ्रमण करतो ते.
.
आतील वर्तुळात जे ग्रह आहेत ते नेटल प्लॅनेटस म्हणजे तुमची कुंडली मांडताना प्लुटो कुठे होता ते.
प्लूटोचा सिंबॉल हा-
https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSCr8CuOV4M5LAgRABuFKt4X92cpZ7gYr3tuH3uoAgthnuy4KihxWYArZU

हा पहा दोनदा दाखविला आहे. एकदा सिंहेत व आतील वर्तुळात तर एकदा मकरेत व बाह्य वर्तुळात.
कोणताही ग्रह घ्या दोनदा आहे. एकदा बाह्यवर्तुळात एकदा अंतरवर्तुळात.
.
ही नेटल व ट्रान्झिट दोन्हीची स्थिती दर्शविणारी कुंडली मी चौकोनी पद्धतीत पाहीली नाही. तेव्हा हे गोल पद्धतीचे वैशिष्ट्य किंवा बलस्थान म्हणावे लागेल.

मला नीटसं समजलं नाहीये.

ट्रान्झिट = सध्या ग्रहस्थिती काय आहे.
नेटल = कुंडली मांडतानाची ग्रहस्थिती.

मग जन्मवेळेची ग्रहस्थिती कुठे असते? कुंडली जन्मवेळ आणि जन्मस्थानावर ठरते ना? मग सीरिया या राष्ट्राची कुंडली कशी मांडता येईल?

*********
आलं का आलं आलं?

सॉरी नेटल म्हणजे जन्मवेळेची ग्रहस्थिती.
.
Syria proclaimed its independence again in 1941 but it wasn't until 1 January 1944, that it was recognized as an independent republic.
.
तेव्हा सिरीआचा जन्म मानलेला आहे.
जन्मवेळेमुळे लग्नघर व त्यामुळे सर्व घरे बदलतात.
तेव्हा लग्न चूकीचे येऊ शकते म्हणजे सिरीआला दुपारी २ वाजता स्वतःत्र राष्ट्र म्हणुन जाहीर केले तर २ वाजता क्षितीजावर उदित राशी = सिरीआचे लग्न.
पण ग्रहांच्या राशी मात्र दिवसभर साधारण तीच रहाते काही मायनर अंशाने बदलत असेल.
तेव्हा राष्ट्राची कुंडली पहाताना लग्नास महत्त्व न देता फक्त ग्रह व राशी पहायच्या .
वरील कुंडली मी astromatrix.org वरुन १ जानेवारी १९४४ ला, ००:०१ अशी वेळ देऊन काढली.
खालील कुंडली मला अजुन एका साइटवरती मिळाली. आता खालील कुंडलीत पहा घरे दाखवलेलीच नाहीत फक्त ग्रह व राशी आहेत, तेव्हा राष्ट्राची कुंडली पहाताना ग्रह व राशींवर कॉन्सन्ट्रेट करावे.
http://www.jessicaadams.com/wp-content/uploads/2013/09/Syria-Horoscope.jpg
.
जन्मस्थान = syria capital - Damascus घेतले आहे.

देशांच्या कुंडल्या आणि त्यांचे भाकित तितकेसे समजले नाहीये.
अगदी ही कुंडली एखाद्या जातकाची असती तरी नेटलमध्ये चवथ्या घरात काही ग्रह नसावेत हे पटते.दुर्दैवाने कोणाच्या नशिबी येतात आणि फटकाही देतात.चलित ग्रह कुंडली मांडण्याची पद्धत आवडली.पण गोचरी ज्योतिष्यांच्या डोळ्यासमोर चलित कु्ंडली येते आणि ती मांडायला लागत नाही.

सुंबरान चित्रपटात दाखवलेले मंदिर कोणते आणि कुठे आहे, याची कोणाला माहिती आहे का?

'तिथे' हा शब्द वाचून कुतुहल जागृत झाले आहे.
श्री अरविंद कोल्हटकर यांनी उपक्रमावर लिहिलेली संस्कृतातून मराठीत रुळलेल्या शब्द- वचनांची मालिका तपासून आले.
त्यातही या शब्दाचा उगम दिसला नाही.

नक्की संदर्भ आठवत नाही पण बहुतेक सांबराला किंवा काळवीटाला शिंगांमूळे सारखं झाडाझुडूपात अडकून पडायला होत असे. आणि त्यामुळे त्याची शिकार होण्याची त्याला भिती वाटत असे.
तर तो देवाला म्हणाला की माझी शिंगे गायब कर.
मग शिंगे गायब झाल्यावर त्या शिंगांच्या भितीने त्याला वचकून रहाणारे प्राणी त्याला घाबरेनासे झाले.

आता सांबराला शिंगे असूनही नुकसान आणि शिंगे नसूनही.

या प्रकारच्या डायलेमाला शृंगापत्ती म्हणतात असं वाचल्याचं आठवतं.

एक्झॅक्ट सुभाषित आत्ता आठवत नाही आहे.

शोधून सांगते.

(मी तो धागा वाचल्यापासून तेच शोधत आहे. तर गुगल मेलं 'शृंगारपट्टी' नावाचा कंबरपट्टा दाखवतंय.)

नैच क्या कोई माई का लाल किंवा लालीण?

इतका वेळ झाला पण कुणीच कन्फर्म काय ते सांगायला तयार नाही.

Smile

सांबराचा शिंगाचा संदर्भ असलेला श्लोक मीही वाचलेला आठवतोय.बहुतेक संस्कृतच्या परीक्षा घेतल्या जायच्या( पारडी इथल्या सातवळेकरांच्या संस्थेतून) त्यासाठी असलेल्या पद्य पुस्तकात होता बहुतेक -संस्कृत सुभाषितानीमध्ये.

एखाद्या संस्थळावर जेंव्हा जुने धागे वारंवार वर काढले जातात तेंव्हा त्या संस्थळाची क्रियेटिव्हिटी संपून आता म्हातारपण (प्लॅटो) आलाय असे समजावे का?
जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत...

किंवा नवेनवे सदस्य येऊन त्याच त्याच धाग्यांचा आनंद घेत असतील.

(संदर्भः मोकलाया दाहि दिशा)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मोकलाया दाहि दिशा

ते दिशा नसून दिश्या असं आहे. तुमच्यासारख्या जुन्याजाणत्या झंटलमन लोकास्नी कळंना कस्काय ओ?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

( लेखक पेन सोडून खुरपणी हाती घेतात त्यामुळे हे होतय अशी तक्रार कोणी केली तर? ) :ड

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हां, ते एक बाकी खरंय!!
Smile

Gender Wage Gap

इस्कू बोलते करारा जवाब. मान गये सॉमर्स म्याडम.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

कुलकर्ण्यांच्या झाडाला १३ आंबे तर पाटलाच्या विहिरीला पाणी किती!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेबर ला कॅपिटल ने सब्स्टिट्युट करा. हीरीला इंजान बसवा ... की पाणी किती ते मोजता पण येईल व वापरता पण येईल.

"जेंडर पे गॅप" हा किमान वेतनासारखाच बकवास मुद्दा आहे. सोमर्स बाई म्हणतात ते योग्यच आहे.