अलीकडे काय पाहिलंत? - २४

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

कुणाशी तरी बोलताना, सहज राजा गोसावींची आठवण झाली, म्हणून तू नळीवर 'लाखाची गोष्ट' पुन्हा पाहिला. राजा गोसावींचा सहजसुंदर अभिनय, गोड गाणी आणि ग.रा. कामतांच्या त्या दोन मुली! नवीन पिढीने पाहिला नसेल तर एकदा पहावा.
मुलीच्या बापाचे काम, ग.दि. माडगुळकरांनी झकास केले आहे. थोर माणूस!

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

https://media.giphy.com/media

ट्रंप ला टीव्हीवर बघून मांजरं सुद्धा पळून जातात....
.
.
https://media.giphy.com/media/3oz8xO7HKRy2srhMWc/giphy.gif

रुस्तम

काल थेटरात अक्षय कुमारचा "रुस्तम" बघितला. स्टोरी "नानावटी केस"वर आधारित आहे. हिंदी पिक्चरच्या स्टाइलने थोडा मसाला घातला आहे, नेहमीप्रमाणे पावसात भिजलेली नायिकापण आहे.. पण तेव्हडे चालायचेच. डायरेक्टरने जुन्या काळचे वातावरण छान दाखवले आहे म्हणजे चौकात उभा राहिलेला निळ्या गणवेशातला ट्रॅफिक हवालदार, जुनी कुलपे, काड्यापेटी वगैरे. गाणी उगीचच टाकली आहेत.

अक्षयकुमार एकदम फिट दिसतो आणि नौदलातला अधिकारी या रोलमध्ये शोभून दिसतो. इलियाना डिक्रूझ ही नटी मलातरी माहित न्हवती. पण गब्बरने तिचे फोटु खरडवहीत लावावेत, इतके पोटेन्शियल आहे. (दात काढत) एकंदरीत सिनेमा फुल टाइमपास आहे, मला तरी आवडला. एकदा जरूर बघा.

वैधानिक इशारा - अर्वाच्य

वैधानिक इशारा - अर्वाच्य भाषा.
.
.

अलिकडेच मी एक लफडं पाहिलं

अलिकडेच मी एक लफडं पाहिलं

:D :D :D

(दात काढत) :D (दात काढत)

actions not reactions..!...!

काल सुसाइड स्क्वाड पाहिला...

अपेक्षेइतका रंगतदार नाही. विल स्मिथ सुपर हिरो-विलन चित्रपटात शोभत नाही हेच खरयं.

actions not reactions..!...!

ऑलिंपिक

काल रियो ऑलिंपिकचा ओपनिंग सेरेमनी पाहिला. सामान्य वाटला...
त्यातून एनबीसी एखाद्या कार्यक्रमाचं अजून वाटोळं कसं करु शकते ते बर्‍याच दिवसांनी एनबीसी पाहिल्यामुळे अधोरेखित झालं!
आता प्रत्यक्ष स्पर्धा जास्त एक्सायटिंग असतील अशी आशा करतोय.
त्या डोंगरावरच्या हातपसर्‍या जेजूला काळजी!!

दोन ब्रिटीश चित्रपट

दोन निरनिराळ्या सत्यकथांवर आधारित दोन ब्रिटीश चित्रपट बघितले. 'वुमन इन गोल्ड' आणि 'प्राईड'.

वुमन इन गोल्ड
'वुमन इन गोल्ड' हे गुस्ताव क्लिम्टने काढलेलं प्रसिद्ध चित्र. त्याचं मूळ नाव होतं अडेल ब्लॉख-बाऊर. ह्याच नावाच्या स्त्रीचं ते व्यक्तिचित्र होतं; तिच्या नवऱ्याने ते क्लिम्टकडून काढवून घेतलेलं. ही दंपती ऑस्ट्रीयन ज्यू. नाझींनी हे चित्र त्यांच्या घरातून उचलून नेलं; युद्धानंतर ते व्हिएनाच्या बेल्व्हडेर संग्रहालयात स्थानापन्न झालं. चित्रपटातल्या एका पात्राच्या तोंडी येतं, अडेल आता ऑस्ट्रियाची मोनालिसा आहे.

कॅलिफोर्नियात राहणाऱ्या मारिया ऑल्टमनसाठी ते तिच्यावर प्रेम करणाऱ्या काकूचं चित्र आहे. तिच्या काका-काकूंची, तिच्या एकेकाळच्या आयुष्याशी नातं सांगणारी ती वस्तू आहे. ही माणसं आणि ते आयुष्य तिच्याकडून नाझींनी हिरावून घेतलं होतं. ते परत मिळवण्यासाठी तिने आणि तिच्या तरुण वकीलाने केलेले प्रयत्न हा चित्रपटाचा विषय. हे चित्र तिला परत मिळावं म्हणून एक ऑस्ट्रियन पत्रकार तिला मदत करतो. ते चित्र ऑस्ट्रियातच राहावं म्हणून सरकारी अधिकाऱ्यांनी मुद्दाम काही कागदपत्रांकडे कानाडोळा केला, ऑस्ट्रियन जनतेला ते चित्र आपली ओळख, अस्मिता वाटते अशा परिस्थितीत हा पत्रकार मारियाला मदत का करतो? तो उत्तर देतो, "ही वेगळ्या ब्रँडची देशभक्ती आहे. माझा देश कोणावरही अन्याय करत नाही ह्याची काळजी घेणं ही राष्ट्रभक्तीच आहे."

जनमताच्या रेट्याच्या उलट पोहोणं, सरकारी यंत्रणा काही गैरवर्तन करत असेल तर त्याचा विरोध करणं सामान्य माणसांना किती कठीण जात असेल हा चित्रपटाचा एक भाग झाला. युद्धानंतर चित्र ऑस्ट्रियाच्या सरकारी संग्रहालयात आलं. ते चित्र ६०+ वर्षं ऑस्ट्रियन जनतेचं होतं. आता अचानक एका परदेशी व्यक्तीची मालकी त्या चित्रावर असणं ही गोष्ट ऑस्ट्रियन जनतेसाठी अन्यायकारक नसेल का? पण हे एक प्रकारे आरक्षण ठेवण्यासारखं आहे. एकेकाळी एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर मोठा अन्याय केला. त्याचे परिणाम अन्यायग्रस्त वर्गाची पुढची पिढीही भोगत असेल तर त्याचं निवारण करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. (जर्मनी आणि) ऑस्ट्रियात नाझींना बहुतांश जनतेने विरोध केला नव्हता. नाझींचं स्वागतच झालं होतं. अडेलचं चित्र परत करणं, हे एक प्रकारे आपलं भूतकाळातलं अन्याय्य वर्तन मान्य करणंच होतं. आजही ते मान्य करण्यासाठी मोठा विरोध दिसतो.

अशा प्रकारच्या लाजिरवाण्या इतिहासाबद्दल 'द नास्टी गर्ल' हा जर्मन चित्रपट आहे. नाझींनी पळवलेल्या अनेक चित्रांबद्दल आज वाद आहेत. अनेक लोकांना त्यात न्याय मिळालेला नाही; मारीया आल्टमनला न्याय मिळाला तसाच लेआ बाँडीला 'पोर्ट्रेट ऑफ वॉली' ह्या चित्रासंदर्भात मिळाला. त्याबद्दलही एक माहितीपट आहे.

दुसरा चित्रपट बघितला 'प्राईड'. हा चित्रपटही सरकारशी सामान्य लोकांनी दिलेल्या लढ्याबद्दल. पण पार्श्वभूमी पूर्ण निराळी. १९८४ साली ब्रिटनमध्ये कोळसा खाणकामगारांचा संप झाला. लंडनमधल्या लेस्बियन आणि गे समूहाने त्यांना पाठिंबा दिला आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. जनमत आणि सरकारविरोधात जसे आपण (LGBTQ) लढत आहोत तसेच हे खाणकामगारही लढत आहेत; आपण त्यांना मदत केली पाहिजे, ह्या विचारातून मार्क अॅश्टन ह्या गे कार्यकर्त्याने LGSM - Lesbians and Gays Supporting Miners - या समूहाची स्थापना केली. सुरुवातीला खाणकामगारांच्या संघटनेने 'असल्या' लोकांकडून मदत घेणं नाकारलं. म्हणून थोडं 'फसवूनच' LGSM ने वेल्समधल्या एका खाणींच्या, रँडम खेड्यात फोन केला. फोनवर आपण LGSM असल्याचं सांगितलं, पण LGSM म्हणजे नक्की कोण हे सांगितलं नाही.

एका छोट्या खेड्यातले धार्मिक आणि कमी शिकलेले खाणकामगार आणि लंडनमधले, हिप्पी छापाचे लेस्बियन आणि गे ह्यांची युती होणं एरवी अशक्य वाटतं. लहान खेड्यात ह्या क्विअर लोकांना झालेला उपद्रव, त्यांच्या स्वतःच्या घरांमधून असणारी विपरीत मतं, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी, त्याच काळात वाढत्या प्रमाणात पसरणारा नवा रोग - एड्स, ह्या गोष्टींचा आंदोलकांवर होणारा परिणाम चित्रपटाला एक खरबरीत पोत देतात. खाणकामगारांचा संप यशस्वी होतो; वेल्श खाणकामगार पुढच्या प्राईड परेडमध्ये मोठ्या प्रमाणावर सामील होतात. इथे चित्रपट संपतो.

१९८४ मध्ये ब्रिटनमध्ये थॅचरचं टोरी (उजवं, भांडवलशहाधार्जिणं) सरकार होतं. पुढच्या निवडणुकांमध्ये मजूर पक्ष निवडून आला; तेव्हा LGBTQ लोकांवर असणारी बरीच कायदेशीर बंधनं सैल झाली. तोपर्यंत ह्यासाठी झालेले प्रयत्न फसले होते; अर्थातच हे बदल होण्याचं एक कारण खाणकामगारांची मतं हे होतं. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने धनंजयचा हा लेख आठवला - अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो उत्तर देतो, "ही वेगळ्या

तो उत्तर देतो, "ही वेगळ्या ब्रँडची देशभक्ती आहे. माझा देश कोणावरही अन्याय करत नाही ह्याची काळजी घेणं ही राष्ट्रभक्तीच आहे."

क्या बात है!

. . अर्नब गोस्वामी इज अ गॉन

.
.
अर्नब गोस्वामी इज अ गॉन केस ... अथ पासून इति पर्यंत ...

यार तुम पाकिस्तानिओं को अपने चॅनल पे बुलाते हो ... और फिर उनपर चिल्लाते हो !!! या फिर उन्हे बोलने का अवसर ही नही देते हो !!!
.
.
.

'डाऊनटन अॅबी' : स्मरणरंजनी कळा

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही दिवसांपूर्वी सुलतान

काही दिवसांपूर्वी सुलतान पाहिला. अतर्क्य गोष्टी दाखवलेल्या असल्या तरी निव्वळ मनोरंजन म्हणून सिनेमा झकास आहे. हरियाणवी बोली ऐकायला छान वाटते. संगीतही छानच. गाणी कॅची आहेत, विशेषतः 'बेब्बी को बेस पसंद है' (हो, बेब्बीच) आणि 'लग गये ४४० व्होल्ट'...पैकी 'लग गये' हे गाणं मिकाने लै भारी म्हटलंय. 'जग घूमेया' हे लोकांना आवडणारं गाणं त्यामानाने सुमार आहे. कदाचित झोपून ढुंगण हलवण्याच्या सलमानच्या स्टेपमुळे लोकांना आवडत असावं... असो, कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं...

रॉकीचे काही काही सीन्स

रॉकीचे काही काही सीन्स चोरलेयत या चित्रपटात. विशेषतः शेवट.

गर्दीतला दर्दी

जय हो !!!.. हा सीन बघितलात का

जय हो !!!.. हा सीन बघितलात का ? लई मस्त आहे....
.
.

हा व्हिडीओ लै आवडलाय. लैच

हा व्हिडीओ लै आवडलाय. लैच entertaining.

मैं तो पिया से नैना लगा आयी रे..

हार्डकोअर हेन्री

ज ब र द स्त चित्रपट

Mandar Katre

(No subject)

a

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ब्राह्मण नमन चार गटणिश

ब्राह्मण नमन

चार गटणिश किशोरवयीन मुलं. ऐंशीच्या दशकातलं हिरवंकंच बंगलोर. मुलींप्रति अभिलाषा आणि भीती एकाच वेळी वाटणे. ब्राह्मणत्त्वाचा दुराभिमान आणि गंड हेही एकाच वेळेला वाटणे. माज. बस सुटल्यावर वाटतं, त्यात चढायला हवं होतं. असो, कमिंग ऑफ एज.

--------

सिनेमा तसा बरा आहे. आणखी बरा होऊ शकला असता.

--------

नेटफ्लिक्सवर हे नाव पाहिलं आणि उत्सुकतेपोटी सिनेमा बघायला घेतला. जात हे अटळ वास्तव आहे. पण त्यावर काहीही लिहिणे किंवा सिनेमा काढणे हा वेडेपणा आहे. कोणाच्या बावना दुखावल्या जातील आणि क्षयझ सेनेचा मोर्चा दारावर येईल, सांगता येत नाही. किमान तेवढ्यासाठी तरी बघण्यासारखा सिनेमा आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

कोलबेर

काय खतरनाक माणूस आहे हा!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मल्लखांब

व्हिडो बघा यातला. मस्तं आहे.

http://thewire.in/53400/mallakhamb-hardest-sport-youve-never-heard/

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

. काश्मिर मधे नुकत्याच ज्या

.
काश्मिर मधे नुकत्याच ज्या दंगली झाल्या त्यांच्या सदर्भात एम्जे अकबर यांचे हे भाषण ... संसदेतले. १७ मिनिटांचे आहे. तेच तेच तेच तेच तेच ...... आणि तेच.
.
.
.

Live Aid १९८५ बी बी सी documentary : Against All Odds

Live Aid १९८५ बी बी सी documentary : Against All Odds , पुन्हा बघितली , १९८५ मध्ये दूरदर्शन नि अर्धवट प्रसारित केलेला कार्यक्रम ..आणि आता हा कार्यक्रम यू ट्यूब वर वारंवार बघताना सुध्दा या कार्यक्रमाची उंची बघताना अजूनही अवाक व्हायला होतं !!! ( nostaligia म्हणा.... काही म्हणा )

अ‍ॅस्ट्रोटर्फ

व्हिडीओ तसा गत वर्षीचा आहे. फेसबुक/व्हॉट्सअ‍ॅप वरल्या पोष्टीच नव्हे तर विकिपिडीया पेजेस सुद्धा विश्वसनीय राहिली नाहीत हे सांगणारा हा १० मिनिटांचा टेड-एक्स चा व्हिडीओ पाहिला. विकिपिडीयाची पानं जाणून बुजून आपल्याला हवी तशी लिहिणारे "अजेंडा ड्रीव्हन" फोर्सेस असतात. जेणे करून एक जनमत बनेल. हे फोर्सेस मुद्द्यातली दुसरी बाजू जाणून बुजून सतत काढून टाकत राहतात. आणि हे फक्त पॉलिटिक्सच नाही तर इतरही बर्‍याच क्षेत्रात दिसून येतयं.

https://www.youtube.com/watch?v=-bYAQ-ZZtEU&feature=youtu.be

सिक्रेट लाइफ ऑफ पेटस - लहान

सिक्रेट लाइफ ऑफ पेटस - लहान मुलांना खूप आवडेल.
आऊटसोर्सिंग - अमेरीकेतून जे जॉब्स भारतात "आऊटसोर्स" केले जातात त्याबद्दल विनोदी सिनेमा. आवडला.एक गोरा, भारतियांना प्रशिक्षण द्यायला येतो. त्याला भारत कसा वाटतो. रोमँटिक-कॉमेडी आहे.

हॉलीवुड खूप झाला म्हणून छोटी

हॉलीवुड खूप झाला म्हणून छोटी छोटी बातें बघितला।

मोतीलाल, कुमार, मुबारक, लीला मिष्रा, नादिरा यांची चांगली टीम होती।

१९६० च्या दशकांतील हा सब कुछ मोतीलाल चा चित्रपट होता।

रोज च्या आयुष्यांत घडणारया छोट्या छोट्या गोष्टीं मधून छान संदेश दिला होता।

त्यातील मीना कपूर यांनी म्हटलेली गझल कुछ और जमाना कहता है... अप्रतिम होती।

नादिरा गुणी कलाकार होती याचा प्रत्यय पुन्हां आला। जूली तिचा बेस्ट चित्रपट।

आपण मोतीलाल चे पंखे। अख्खं कथानक त्यांच्या वर बेतलेलं। मोतीलाल चं काम झकासच।

एकाएकी मिळालेल्या पैशांवर लोभ न ठेवता जवाबदारी तून मुक्त झालेल्या व शांति, समाधान शोधणारया मोतीलाल ची स्टोरी मनाला चटका देणारी होती।

लॉटरी या विषयावर १९६०-७० च्या दशकांतील काही सुरेख चित्रपट आले होते।

त्यापैकी छोटी छोटी बातें हा एक होता।

रवींद्र दत्तात्रय तेलंग

कोडमंत्र

कालच 'कोडमंत्र' हे मराठी नाटक पाहिले. 'ए फ्यु गुड मेन' या अमेरिकन नाटकावर ते आधारित आहे, हे सुरवातीलाच सांगितले. हेच नाटक गुजराती रंगमंचावरही चालू आहे.
लष्करी शिस्त ही कधीकधी कशी अतिरेकी होऊ शकते , हे या नाटकांत फार चांगल्या तर्‍हेने दाखवण्यांत आले आहे. लष्करातील अनेक गोष्टी सामान्य लोकांपर्यंत येत नाहीत आणि लष्करी गुपिते शत्रुच्या हाती पडू नयेत, या दृष्टीने ते बर्‍याचवेळा आवश्यकही असते. पण कधीकधी अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यालाही होतो आणि मग ते निस्तरताना तो कोणाचा तरी बळी देतो.
रवी शेलार हा मराठा रेजिमेंटचा एक जवान असतो. लष्करातील अतिखडतर प्रशिक्षण त्याला तब्येतीमुळे झेपेनासे होते. त्याबद्दल तो वरिष्ठांना अनेकवेळा विनवणीही करतो. पण आपल्या रेजिमेंटची शान जाईल या भीतिने त्याचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. उलट, बळजबरीने त्याला 'टफ' बनवण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांत त्याचा दुर्दैवी मृत्यु होतो. त्याविषयीची केस लष्करी कोर्टात लढली जाते आणि तिथे सत्य पुढे आणण्याचा कसा संघर्ष होतो, या घटनांवर नाटक रंगते.
केस लढवणारी मुक्ता बर्वे आणि कर्तव्यकठोर अधिकारी संजय पूरकर यांनी उत्तम कामे केली आहेत. त्याशिवाय नाटकांत वावरणार्‍या चाळीस कॅडेटसनीही जबरदस्त साथ दिली आहे. नाटकांत काढायच्याच म्हटले तर काही चुका आहेत, पण एकंदरीत , नाटक आपल्याला खिळवून ठेवते व विचार करायला लावते. नाटकाच्या कथेबद्दल यापेक्षा जास्त लिहिले तर नाटक बघताना मजा येणार नाही, म्हणून संक्षिप्त वर्णन केले आहे. अशा प्रकारचे लष्करी कोर्ट खटल्याचे मराठी नाटक याआधी आलेले नाही.
नाटकातील नेपथ्य, संगीत व पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना हे सर्व उत्तम आहे. नाटक , एकदातरी जरुर बघण्यासारखे आहे, असे माझ्यासारख्या जातिवंत टीकाकाराचे मत झाले, यामधेच या नाटकाचे यश आहे.

याचे सविस्तर परीक्षण, लोकसत्तामधे, रवीन्द्र पाथरे यांनी केले आहे.

http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-play-code-mantra-review-...

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

काही दिवसांपूर्वी कोडमंत्रचं

काही दिवसांपूर्वी कोडमंत्रचं हे ऑडियो व्हिज्युअल परिक्षण पाहिलं होतं:
https://www.bobhata.com/entertainment/meri-najariyese-marathi-web-series...

तेव्हापासून ते नाटक बघायची इच्छा आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान. बघावसं वाटतय नाटक.

छान. बघावसं वाटतय नाटक. सिनेमा खूप आवडतो. तो सिनेमा एका नाटकावरूनच घेतलेला आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

+ सहमत, ह्या विषयावरचा

+ सहमत, ह्या विषयावरचा हॉलिवूड सिनेमा फार आवडतो. जॅक निकोलसन ने माशाअल्लाह काम केलंय. डेमी मुर सिनेमात साधीच पण तरीही कमालीची मादक दिसली आहे (तिच्या अवाजाप्रमाणे).

बादवे, अधिकार्‍याच्या भुमिकेत संजय पुरकर नसून अजय पुरकर आहे. अजय पुरकरच्या अत्तापर्यंत मवाळ भुमिका पाहिल्या आहेत ('अस्मिता' नावाची बाल-सिरीयल मी अजिबात बघतली नाहिये, त्यात म्हणे त्याने केलं होतं खलनयिकी काम). ह्या नाटकात त्याला अधिकार्‍याच्या भुमिकेत पहायला नक्कीच आवडेल. नाटक पहाण्याअधीच मुक्ताचा एकसारखाच अभिनय असेल असं वाटतं (आय नो ती वेगवेग्ळ्या भुमिका करते पण ती भुमेकत शिरण्याएवजी ती साकरते ती भुमिकाच मुक्ता होऊन जाते असं वाटायला लागलं आहे).

धन्यवाद

चुकीच्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद. तो अजय पूरकर आहे, चुकून संजय असं लिहिलं गेलं.

आय नो ती वेगवेग्ळ्या भुमिका करते पण ती भूमिकेत शिरण्याएवजी ती साकारते ती भुमिकाच मुक्ता होऊन जाते असं वाटायला लागलं आहे

सहमत, पण यामधे जरा वेगळा प्रयत्न केला आहे.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

https://m.youtube.com/watch?v

https://m.youtube.com/watch?v=SDYFqQZEdRA

हा व्हिडिओ पाहिला .

हे राष्ट्रं देवतांचे ... हे राष्ट्रं प्रेषितांचे |
आचंद्रसूर्य नांदो ... स्वातंत्र्य भारताचे ||

‘ए स्ट्रेंजर इन टाउन’

‘ए स्ट्रेंजर इन टाउन’ बघितला...

1943 सालचा हा चित्रपट 67 मिनिटांचा होता...

जॉन जोसेफ ग्राँट (फ्रैंक मोर्गन) यूनाइटेड स्टेट्स मधील सुप्रीम कोर्टचा ऑनरेबल जस्टिस असला म्हणून काय झालं, त्याला देखील सुट्‌टी हवीय की...

तो सुट्‌टीत शिकार करायला (डक हंटिंग) जातो...पण...

सुप्रीम कोर्टचा जस्टिस म्हणजे गांभीर्य आलंच की...

त्याचे विनोद देखील लै भारी...थेट मनाला भिडणारे...

चित्रपटांत तो जेव्हां आपली ओळख देतो तेव्हां त्याची 7-8 मिनिटांची सलग स्पीच आहे...ती बघण्या-ऐकण्या सारखी आहे....

1943 सालची ती स्पीच आज देखील प्रासंगिक आहे...

या चित्रपटाबद्दल आंतरजालावर ही कमेंट होती-

This is another film about the rights of men, and how they should hold government responsible in the name of justice. But if one watches carefully, the film demonstrates the unfortunate truth that the law is not about justice. Real knowledge of law is only available to attorneys. The common man must avail himself of their services, knowing that laws are created by (mostly lawyer) politicians. We all know how highly politicians are held in the public’s esteem.

जजच्या भूमिकेत फ्रैंक मोर्गन नी अप्रतिम काम केलंय...त्याचे रिफ्लेक्सेस तर झकास...

ही लिंक पहा

https://www.google.co.in/?ion=1&espv=2#
--------------

रवींद्र दत्तात्रय तेलंग

‘ए स्ट्रेंजर इन टाउन’

‘ए स्ट्रेंजर इन टाउन’ बघितला...

1943 सालचा हा चित्रपट 67 मिनिटांचा होता...

जॉन जोसेफ ग्राँट (फ्रैंक मोर्गन) यूनाइटेड स्टेट्स मधील सुप्रीम कोर्टचा ऑनरेबल जस्टिस असला म्हणून काय झालं, त्याला देखील सुट्‌टी हवीय की...

तो सुट्‌टीत शिकार करायला (डक हंटिंग) जातो...पण...

सुप्रीम कोर्टचा जस्टिस म्हणजे गांभीर्य आलंच की...

त्याचे विनोद देखील लै भारी...थेट मनाला भिडणारे...

चित्रपटांत तो जेव्हां आपली ओळख देतो तेव्हां त्याची 7-8 मिनिटांची सलग स्पीच आहे...ती बघण्या-ऐकण्या सारखी आहे....

1943 सालची ती स्पीच आज देखील प्रासंगिक आहे...

या चित्रपटाबद्दल आंतरजालावर ही कमेंट होती-

This is another film about the rights of men, and how they should hold government responsible in the name of justice. But if one watches carefully, the film demonstrates the unfortunate truth that the law is not about justice. Real knowledge of law is only available to attorneys. The common man must avail himself of their services, knowing that laws are created by (mostly lawyer) politicians. We all know how highly politicians are held in the public’s esteem.

जजच्या भूमिकेत फ्रैंक मोर्गन नी अप्रतिम काम केलंय...त्याचे रिफ्लेक्सेस तर झकास...

ही लिंक पहा

https://www.google.co.in/?ion=1&espv=2#
--------------

रवींद्र दत्तात्रय तेलंग

'A Serbian Film' पाहिला.

'A Serbian Film' पाहिला. कोणीतरी माझी कवटी उघडून भेज्याच्या गुबगुबीत गुंताड्यावर शंभरेक शिग्रेटी विझवल्यागत वाटतंय. ह्या डागण्या लई दिवस छळतील......... का ?... का ? मी पाहीला हा सिनेमा. आयXव

गर्दीतला दर्दी

आमच्या गावातली ४ जुलै ची परेड

आमच्या गावातली ४ जुलै ची परेड जस्ट पाहून आले. दर वर्षीप्रमाणे या परेडमध्ये या वर्षीही "प्रो लाइफ" फ्लोट्/प्रेझेन्स होता. आमचं गाव आणि इन जनरल बहुतेक विस्कॉन्सिनच जरा पारंपारीक विचारसरणीचे आहे. गे लोकांचे मात्र काहीही प्रतिनिधीत्व नव्हते. जरी इतक्या लहानशा गावात गे क्लब असला तरी.

. याच्यापेक्षा जास्त रोमँटिक

.
याच्यापेक्षा जास्त रोमँटिक गाणं कोणतं ?? ( चार ग्लास पिल्यावर जे सुचलं ते लिहितोय... )
.
.
.

फारएन्ड

नुसत्या प्रतिक्रियेवर आमची बोळवण करु नका. चला, लिहायला घ्या आणखी काही फारएन्डी परीक्षणे.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

काही स्निपेट्स

नाचे नागिन गली गली चा शेवटचा भाग चालू होता. नितीश भारद्वाज चा डबल रोल. एक इच्छाधारी नाग. एक नॉर्मल माणूस. पहिल्याचे मीनाक्षी शेषाद्री बरोबर अनेक पोजेस मधे डान्सेस. (चित्रपटाच्या) क्लायमॅक्स मधे सुमारे दहा बारा प्राणी एकमेकांशी मारामारी करतात. सत्येन कप्पूचा सदाशिव अमरापूरकरने लिटरली पोपट केलेला असतो. शेवटी स.अ मरतो. श्रीराम लागू व आशालता यांना स्क्रिप्ट ऐकवल्यावर त्यांचे जे चेहरे झाले ते पटकन शूट करून ते पीसेस यात वापरले असावेत.

"हाँ ये सच है के मै एक इच्छाधारी नाग हूँ" सारखे जबरी संवाद होते. जेवढा वेळ बघितला तेवढा वेळ सदाशिव अमरापूरकर पुंग्या वाजवत गावभर फिरत होता.

नंतर चॅनेल बदलले तर तिकडे 'हिफाजत'. नूतनकडून खानदान का चिराग ई मिळत नाही म्हणून प्राण दुसरे लग्न करतो. मग ही घर सोडून निघते तर तिला थांबवतो. "पती पत्नी का रिश्ता तो अमुक अमुक होता है" वगैरे ऐकवत तिच्या पाठीवरून हात फिरवतो. क्लोज अप. नंतर स्क्रीनवर एक गुलाब. मग डायरेक्ट 'मुबारक हो..." सीन.

त्या आधी 'राजतिलक' ची सुरूवात. कोणाचे तरी बाळ हिसकावून घेउन 'धरमवीर' स्टाईलने आपले दुसरे बाळ तेथे अजित पाठवतो व मूळचे हिसकावलेले बाळ थेट फेकून देतो दुसर्‍या रूम मधे. पण तेथे ते सुलोचना कॅच करते. तिला स्लिप्स मधे उभे राहायची सवय असल्याने असे खाली वाकून रिफ्लेक्स अ‍ॅक्शन ने बाळे पकडणे सहज शक्य असावे. हा कॅच व विधाता मधला संजीवकुमार ने घेतलेला संजय दत्तचा (संजय दत्तच्या) बाल्यावस्थेतील कॅच पाहता ७०-८० च्या दशकात कॅचिंग स्किल्स भारतीय टीम पेक्षा टीम बाहेर जास्त होते असे अनुमान काढले.

एकाच वेळेस तीन तीन अचाट अतर्क्य सिनेमे दाखवू नयेत असे केबलवाहिन्यांवर लिमिट आणले पाहिजे. फार टेन्शन.

(No subject)

(लोळून हसत) (लोळून हसत)

:ड

सुलोचना कॅच करते. तिला स्लिप्स मधे उभे राहायची सवय असल्याने ...

हे स्लिप्स म्हणजे क्रिकेटमधला शब्द असून वस्त्रप्रावरणाचं नाव नाही हे समजेस्तोवर वेळ गेला. तेवढ्यात सुलोचना बाई ठराविक वेषात असल्याचं डोळ्यांसमोर येतायेताच अंधारी आली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(No subject)

(लोळून हसत)

बागी

नुकताच वोल्वो प्रवासात 'बागी' बघितला. जॅकीपुत्र टायगर यांत हिरो आहे. नुसत्या कुंग फू,कराटे टाईप मारामार्‍या. अत्यंत चीप विनोद, न पटणारे, विस्कळीत कथानक. थोडक्यांत, डोकं उठवणारा ! तरीही बरा गल्ला जमवून गेला म्हणे.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

+११११११११११११११११११११

अगदी अगदी सहमत. मीही मध्ये प्रवासातच पाहिलेला. लय डोस्के फिरले. त्यातल्या त्यात श्रद्धा कपूर बरी दिसते तेवढाच एक प्लस प्वाइंट.

(बाकी, शक्ती कपूरसारख्याची पोरगी अशी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं हां कधी.)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

व्होल्वोत भिकार सिनेमे

व्होल्वोत भिकार सिनेमे लावायचे हा अखिल भारतीय नियम आहे. 'परदेसी बाबू', 'कैदी' वगैरे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

प्रचंड सहमत.

प्रचंड सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

झक्कास

.
झक्कास ...
.
.

अच्रटपणाचे एव्हरेस्ट आहे

(दात काढत) (दात काढत) (दात काढत)
अच्रटपणाचे एव्हरेस्ट आहे (लोळून हसत)

रामन राघव २.०

एक धक्का और दे,
सब धागे तोड दे
पीने के पानीमे
तु जेहेरकी नाली छोड दे

इतनाभी तू कर ना सके
तो फिर काहे का गुदा
तेरी खालमे रेंगे कीडे
तु सच्चा बेहुदा

तु सच्चा बेहुदा
जिसकी किस्मतमे है
सिर्फ हारी शर्ते

तु पक्का बेहुदा
जिसकी नियत लगे
फफुंदकी पर्तें

तु एसा बेहुदा
तेरा खून है
सौमे नब्बे काला

तु ऐसा बेहुदा
तुने नाखुनोंसे
फोडा छाला छाला

एक धक्का और दे,
सब धागे तोड दे
पीने के पानीमे
तु जेहेरकी नाली छोड दे

अपनेही अक्सकी आ
गर्दन तु घोट दे
चार दिनके चेहेरेपे
काली रातें पोत दे

दूरदूरतक कोई ना रिश्ता
तु है इतना सूखा
तेरी खालमे रेंगे कीडे
तु सच्चा बेहुदा

आपण देवाचे डोळे आणि यमदूत आहोत अशा समजाखाली खून करत सुटणार्‍या रामनची आणि त्याच्या तपासावर असलेल्या ड्रग अ‍ॅडिक्ट पोलिस अधिकार्‍याची गोष्ट काटा आणणारी आहे. नॉट फॉर द वीक हार्टेड! प्रत्यक्ष रक्तं फार न दाखवता इतकी हिंसा दाखवणं फार स्किलच काम आहे. बर ही हिंसा केवळ शारिरीक नाही. खूप प्रमाणात मानसिक हिंसा देखील आहे. नवाझुद्दिनच्या पात्राच एकदम छपखल वर्णन करणार हे गाणं इतक्या विवक्षीत ठिकाणी सुरू होतं. 'शैतान'मधल्या 'खोया खोया चांद'ची आठवण आणून देतं हे गाणं. अधून मधून डार्क ह्युमरचे तुकडे आहेतच. जे घडतय त्याच्या एकदम विरुद्ध असे इतर कुठल्यातरी सिनेमातले डायलॉग बॅकग्राउंडला ऐकू येणं टीव्ही/रेडिओवर हे इथेही आहे.

नेहेमीप्रमाणे कश्यप कधीही न दिसलेली मुंबई याही सिनेमात दाखवतो. मुंबईतली झोपडपट्टी आधीही दिसली असेल पण याच्या सिनेमात काय वेगळं तो करतो समजत नाही पण सिनेमातली लोकेशन्स डोक्यात खूप राहतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बाप रे फारच डार्क विषय.

बाप रे फारच डार्क विषय.

हा व्हिडो पाहिला. मस्तं

हा व्हिडो पाहिला. मस्तं आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अकाऊंट डिलिट करण्यापूर्वी

(लोळून हसत)

अकाऊंट डिलिट करण्यापूर्वी आपल्या संतुलितपणाला सलामी म्हणून एक व्हिडिओ टाकतोय. (व्हिडिओ तुमच्या व्हिडिओइतका जुना नाही म्हणून क्षमस्व).

Hope is NOT a plan!

अकाउंट डीलीट???

???

मग हाही बघा. १० जुन २०१६1:50

(दात काढत)

मग हाही बघा. हा ही तुमच्या व्हिडो इतका जुना नाही. १० जुन २०१६

1:50 पासून पुढे बघा.

If you are a millennial you may never have known the concept of paying for things.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ढेरेशास्त्री, हा पण एक बघून

ढेरेशास्त्री, हा पण एक बघून टाका जोडीला ....

समाजवादाचा आस्वाद घेण्याची अपूर्व संधी व्हेनेझुएला च्या जनतेला मिळत आहे...
.
.

एक्झॅक्टली. सिंगापूरमध्येही

एक्झॅक्टली. सिंगापूरमध्येही नॅनी स्टेटचा सोशलिजम इतका यशस्वी झाला आहे की लोक आणखी-आणखी मागताहेत. सरकारला गृहीत धरताहेत. फ्री-मार्केट, कॉम्पिटिशन नको म्हणतात. ब्रिटनमध्येही तेच.

Hope is NOT a plan!

काय ओ ढेरेशास्त्री, तुमचा

काय ओ ढेरेशास्त्री, तुमचा ऑटोग्राफ मिळेल काय ?

गेम ऑफ थ्रोन्समधील खलीसी ऊर्फ

गेम ऑफ थ्रोन्समधील खलीसी ऊर्फ एमिलिया क्लार्क एका टीव्हीवरील मुलाखतीत अगदी सुरेख लाजते ते पाहिलं.

https://www.youtube.com/watch?v=KAzZuf8UgRo

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

क्याबातहै...!

गॉट मधे हिने हे लाजनं सोडुन बाकी सगळ केलं आहे पण ह्याची मज्याच वेगळी. बर्‍याच स्त्रिया ब्लश होतात तेंव्हा जास्त लोभस भासतात.

actions not reactions..!...!

ती अंतर्बाह्य लोभसच आहे.

ती अंतर्बाह्य लोभसच आहे. अ‍ॅटिट्यूड दाखवायचा प्रयत्न करते पण ते कै तिला जमत नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ऑफिसातून उघडत नाही. बॅट्याला

ऑफिसातून उघडत नाही. बॅट्याला काय सुरेख वाटते हे पहाण्याची आकांक्षा होती (स्माईल)

कथावस्तू आकर्षक आहे.

कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मिती विलोभनीय आहे. कथा वेस्टेरोस, इसॉस या दोन भागांत घडते...

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

घे बाबा रोचक घे.

घे बाबा रोचक घे.

मागच्या वीकेंड ला The

मागच्या वीकेंड ला The Patience Stone चित्रपट पाहिला. २ दिवस झोपू शकले नाही. mind disturbing चित्रपट आहे. उत्कृष्ट असं काही बघायचं असेल तर हा चित्रपट नक्की पहा.

The Patience Stone - In a war-torn Muslim country, a woman (Golshifteh Farahani) alleviates her silent suffering by confessing her dreams, desires and secrets to her comatose husband.

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

आतिक राहिमी

साहित्य आणि चित्रपट दोन्ही माध्यमांवर पकड असलेली माणसं दुर्मीळ असतात. ह्याचा दिग्दर्शक आतिक राहिमी त्यांच्यापैकी एक आहे. त्याच्याच कादंबरीवर त्यानं दिग्दर्शित केलेला 'अर्थ अ‍ॅन्ड अ‍ॅशेस' चित्रपट काही वर्षांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिला होता. नंतर पुन्हा त्याच्याच कादंबरीवर आधारित हा (संग-ए-सबूर) चित्रपटही पाहिला होता. ह्या कादंबरीला फ्रान्सचं सर्वोच्च साहित्यिक पारितोषिक (गोंकूर) मिळालं होतं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'अर्थ अ‍ॅन्ड अ‍ॅशेस' चित्रपट

'अर्थ अ‍ॅन्ड अ‍ॅशेस' चित्रपट बघेन या वीकेंड ला. माहितीसाठी धन्यवाद.

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

आत्ता फाइंडींग डोरी पाहून

आत्ता फाइंडींग डोरी पाहून आले. सुपर बोअरींग आहे Sad

परवा उडता पंजाब पाहिला.

चित्रपटाचा विषय अतिशय गंभीर आहे आणी चित्रपटाची पटकथा बॉलीवुड मसाला डोक्यात ठेउन अंगावर येणारी लिहली आहे. डार्क ह्युमर वापरुन विषयाचे गांभीर्य व रोचकता वाढवायचा प्रयत्न यश्वस्वी झालेला नाही. चित्रपटात ड्रामा अजिबात रंगत नाही परिणामी स्टारकास्ट वाया गेली आहे. अर्थात अलियाभट्चे उपकथानक याला अपवाद आहे. अनुराग कश्यपचा अग्लिनेस हा अनथिंकेबल असतो त्याच्या दुरुनही जवळपास हा चित्रपट फिरत नाही परीणामी ना धड डिटेल डॉक्युमेंट्री ना धड नाट्य ना धड व्यावसायीक चित्रपट अशी त्रिशंकु अवस्था पाहणार्‍याची होते. चित्रपट उरकायचा म्हणून उरका असे प्रसंग अनेक आहेत. अछ्चे दिनवर मस्त भाष्य केलय त्याला "अछ्चा टाइम" असे संबोधुन संवाद लिहले आहेत, अलिया भटटने तिच्या भुमिकेचे सोने केले आहे आणि शाहीदने जबरा साथ दिली आहे. आलियभट्टसाठी न्हवे तर तिने ताकतीने साकारलेल्या भुमीकेसाठी हा चित्रपट पैसा वसुल ठरावा.

चित्रपटात उडदा पंजाब हे टायटल साँग टाकलेले नाही व तो एकमेव कट असावा. बाकी कोणत्या कारणासाठी चित्रपट सेंसॉरने रोखला हा साँशोधनाचा विषय आहे.

actions not reactions..!...!

चित्रपटात उडदा पंजाब हे टायटल

चित्रपटात उडदा पंजाब हे टायटल साँग टाकलेले नाही

आहे. पार्टी चालू असताना चालू असतं.

तो एकमेव कट असावा

कट केलेला सीन हा नाही. शाहिद त्याच्या नंतरच्या काँसर्टमध्ये प्रेक्षकांवर शू करतो तो कट केलाय.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पार्टी चालु असताना ते गानं चालु होतं

ते सुध्दा बॅकग्राउंडला दुरुन कुठुन तरी ऐकु आल्यासारखे, अन लगेच पार्टी संपते. गाणं पुर्ण नाही, आतली कडवीही नाहीत.

कट केलेला सीन हा नाही. शाहिद त्याच्या नंतरच्या काँसर्टमध्ये प्रेक्षकांवर शू करतो तो कट केलाय.

हम्म मग ठिक आहे, कारण जेवडा सिन दाखवला आहे त्यात तो काय करतोय हे तसही स्पश्ट होतं.

असो चित्रपटातील प्रमुख पात्रांचे न पटणारे झालेले मनःपरिवर्तन आणी अतिशय निरस कॅमेरावर्क ह्या बाजु सुध्दा सादरीकरण अतिशय कमकुवत बनवतात.

actions not reactions..!...!

आत्ता जस्ट Daddy's home

आत्ता जस्ट Daddy's home पाहीला.
खूप आवडला. नायिकेला पहील्या नवर्‍यापासून (अल्फा मेल सॉर्ट ऑफ) दोन मुले आहेत. तिने दुसरे लग्न केले आहे. मुलांचे व नायिकेचे मन जिंकण्यासाठी, सावत्र वडील (कुटुंबवत्सल) आणि खरे वडील (अल्फा मेल पण बेजबाबदार) यांच्यातील विनोदी चुरस आहे.
___________

Sisters देखील पहात होते पण नायकही आवडला नाही आणि ड्रग्ज बद्दल फारच बोलणं होऊ लागलं, तसेच तोच्तोच्पणाचाही कंटाळा आल्याने बंद केला.

वेटिंग !

खादीचे सुरेख शर्ट घातलेला नसिरुद्दीन शहा,' प्रोफेसर शिव' च्या भूमिकेत प्रसन्न चेहेऱ्याने साधना करावी तशी आठ महिन्यांपासून कोमात असलेल्या पत्नीची मनोभावे सेवा करत असतो.भीषण अपघात होऊन कोमात गेलेल्या तरुण पतीला बघून हादरून गेलेल्या ताराच्या भूमिकेत अफलातून काम करणाऱ्या कल्की केकली हिला , 'नहाना ,खाना और सोना रुकना नही चाहिये ' असे सोपे तत्व सांगतो.आपला जीवनसाथी कोमातून बाहेर येण्याच्या प्रतीक्षेतले सहयात्री असलेले प्रोफेसर शिव आणि तारा यांची अनोखी मैत्री होते.कोमात असलेल्या पेशंटचे ऑपरेशन करायचा निर्णय कोणी घ्यायचा ? लाइफ़ सपोर्टवर आयुष्य किती काळ लांबवायचं असल्या गंभीर प्रश्नांचा मागोवा घेताना चित्रपट प्रचारकी किंवा बोजड न होता गुंतवून ठेवतो.शिव आणि तारा यांच्यातल्या जनरेशन गॅपमुळे होणारे वाद आणि संवाद हास्य फुलवतात.
नसिरुद्दीन आणि कल्की यांच्यावर जीव ओवाळून टाकावा असा हा चित्रपट अवश्य पहावा.

http://www.ndtv.com/video/new

या मुद्द्याचे टायमिंग लक्षणीय

या मुद्द्याचे टायमिंग लक्षणीय आहे. यूपी च्या विधानसभा निवडणूका आलेल्या आलेत आणि ... यूपी मधे मुस्लिम्स हा एक व्होटिंग ब्लॉक मानला जातो असं मी ऐकलंय.

मग्न तळ्याकाठी

एखाददोन आठवड्यापूर्वी 'मग्न तळ्याकाठी'चा पहिला प्रयोग पाहिला.
कंटेंट फारसा नाहीच. 'आशयघन' वगैरे बिलकुल नाही. संघर्ष भिडलाच नाही. ओढूनताणून आणलेला वाटला. बाकी अभिनय एक नंबर. वर्‍हाडी लहेजा सुंदर उचललाय सर्वांनी.
नटनट्यांनी निभावून नेलेले नाटक. (इतका नन्नाचा पाढा लावायचा नव्हता, पण..)

लोल

बहुधा पुढचे वर्जन - 5D मध्ये, पडद्यावरील खाण्याच्या पदार्थांचे वासदेखिल येतील असे वाटते! >>> (दात काढत)

X-Men: Apocalypse - एक 4D अनुभव

गेल्या आठवड्यात X-Men: Apocalypse पाहिला. अर्धा डोक्यावरून गेल्यामुळे चित्रपटाविषयी लिहिण्यासारखे काहीही नाही!

पण 4D मध्ये चित्रपट पाहण्याची पहिलीच वेळ. त्यामुळे बराच काळ लक्षात राहीलसे वाटते.

आधीच खिसा रिकामा झालेला, त्यातून गदागदा हलणारी खुर्ची! त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा वाटतोय म्हणून डुलकी काढावी तर तीदेखिल सोय नाही!

बरं, रिकाम्या खुर्च्यासुद्धा हलत होत्या. ते पाहून अगदीच विचित्र वाटत होते. ते बंद करण्याची सोय करता येणार नाही काय, असा विचार मनात आला!

पडद्यावर धुरळा वगैरे उडल्याचा सीन आला की इथे खुर्चीतून वार्‍याचे झोत येत होते. हेच ते 4D म्हणे!

बहुधा पुढचे वर्जन - 5D मध्ये, पडद्यावरील खाण्याच्या पदार्थांचे वासदेखिल येतील असे वाटते!

असो.

५डी...

बहुधा पुढचे वर्जन - 5D मध्ये, पडद्यावरील खाण्याच्या पदार्थांचे वासदेखिल येतील असे वाटते!

फक्त खाण्याच्या पदार्थांच्याच वासापुरते सीमित ठेवले, म्हणजे मिळवली. (शक्यता अनेक आहेत.)
..........
उदाहरणादाखल, उद्या कोणास 'हम दिल दे चुके सनम' या (अगोदरच भिकार) चित्रपटाची ५डी आवृत्ती काढण्याची दुर्बुद्धी न होवो, ही त्या जगन्नियंत्याचरणी प्रार्थना. ('समीऽऽऽऽऽऽर! हवा का झोंऽऽऽकाऽऽऽऽऽऽ!!! फिदीफिदीफिदी.'१अ)

१अ तो प्रसंग पाहिल्या+ऐकल्यावर, ४डी/५डी वगैरे तर मरोच, पण सायलेंट मूव्हीज़चा जमाना कित्तीकित्ती छान होता, अशी भावना झाल्याचे आठवते.

चित्रपट कसा वाटला

एक्स मेन सीरिज मला आवडते. हा चित्रपट थेटरात पैशे मोजून पाहण्यासारखा आहे का नाही एवढाच प्रश्न आहे.

युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये एक

युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये एक असा सिनेमा पाहीला होता. त्यात थ्री डी ऊंदीर अंगावर यतात. आणि तेव्हाच पायातून सैरावैरा फोकस्ड वारा वहातो. माय गॉड!! खरच ऊंदीर पायातून धावतायत असे वाटले होते (स्माईल)

फोबिया पाहिला. खूप

फोबिया पाहिला. खूप आवडला.राधिका आपटेने कमाल केलीये

http://pahawemanache.com/review/phobia-2016-radhika-apte-marathi-review

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणी लिहिलाय हा रिव्ह्यू?

कोणी लिहिलाय हा रिव्ह्यू? "सुरक्षिततेची भीती" हे वाचून दोन मिनिटं कळायचं बंद झालं. आणि व्हिडिओतले प्रश्नकर्ते ॲग्रोफोबिया का म्हणतात?

Hope is NOT a plan!

अगोराफोबिया (गर्दीची भीती) का

अगोराफोबिया (गर्दीची भीती) का अॅक्रोफोबिया (उंचीची)? लेखन वाचताना समजलं नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोबिया चित्रपटाची माहिती

फोबिया चित्रपटाची माहिती गुगल्यावर तो अगोराफोबिया (मात्र अर्थ केवळ गर्दीची भिती नव्हे) असल्याचे समजते.
चित्रपटातील संवादात उच्चार पात्रानुरूप बदलतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परंपरा

आणि पी. के. मिश्रा हसला. (संदर्भ)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

..तारिक फताह यांनी अयान

.
.
तारिक फताह यांनी अयान हरीसी अली ची घेतलेली मुलाखत.
.
.

.
.
तारिक फतेह शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेतोय (तिला मधेमधे इंटरप्ट करत नैय्ये) हे अत्यंत महत्वाचे.
.
.
.

मायकेल हेडन हे सीआयए व एनएसए

मायकेल हेडन हे सीआयए व एनएसए चे संचालक होते. त्यांनी नुकतेच एक पुस्तक प्रकाशित केलेले आहे "Playing to the Edge: American Intelligence in the Age of Terror". त्यात त्यांनी काही महत्वाचे गौपस्फोट केलेले आहेत. उदा. २६ नोव्हे च्या मुंबई हल्ल्याबाबत आयएसआय चे प्रमुख शुजा पाशा यांनी हेडन यांना सांगितले होते की त्या हल्ल्याचे पाकी हल्लेखोर हे आयएसाय कडून प्रशिक्षिण घेऊन आलेले होते. (अर्थात यात फारसं नवीन काही नाही.).

त्याच मायकेल हेडन यांची मुलाखत. आयस्सिस बद्दल.
.
.
.
.

मिस्टर रोबोट ही नेटजगतावरची

मिस्टर रोबोट ही नेटजगतावरची सीरिज . पहिला सीझन चांगला वाटला . दुसरा सीझन बहुधा जुलै मध्ये येणार आहे ..

बघताना थोडासा "ब्लॅक मिरर" पहात असल्याचा फील आला ..

अवश्य पहा !

Mandar Katre

ग्रेज अ‍ॅनॉटमी

ग्रेज अ‍ॅनोटमी चा दुसरा सीझन आजच संपवला ... ठीक आहे
शिकागो होप चा पहिला सीझन जबरदस्त. मेडिकल ड्रामा मध्ये हायलाइट ठरावा

कॅप्टन अमेरिका अजिबात आवडला नाही. मुळात अनेक सुपरहिरो एकाच मूव्हीत कोम्बण्याचा मार्व्हल चा अट्टाहास कशासाठी? अजिबात कळले नाही. मला तर हा निव्वळ बिनडोकपणा वाटला .

सैराट पाहिला ,चांगला आहे पण ओव्हरहाइप्ड आहे ...

अफ्घाणिस्तान वॉर वरचा कॅनेडियन मूव्ही हायेना रोड पाहिला. खूप आवडला. जबरदस्त ...

Mandar Katre

..माईक ब्युकॅनन व

.
.
माईक ब्युकॅनन व पुरुषद्वेष्ट्या (??) स्त्रीवादी स्त्रिया.
.
.
.

-
.
.
अरुण जेटलींनी प्रथमच लबाडी न करता आणि लक्षणीय व insightful विधानं केलेली आहेत.
.
.

. कोणत्याही परिस्थितीत इस्लाम

.
कोणत्याही परिस्थितीत इस्लाम वर आरोपपत्र दाखल होऊन द्यायचे नाही - ही बरखा दत्त यांची भीष्मप्रतिज्ञा आहे.
.
.