ही बातमी समजली का - १११
Bankruptcy Code चे विधेयक लोकसभेत पारित. = एक महत्वाचे विधेयक. तपशील पहावे लागतील. nonwaivable केलाय का Bankruptcy फाईल करण्याचा अधिकार ?
---------------
आर्थिक विषमता ही भारतात व चीन मधे सर्वात जास्त ___ इति आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. = अमीर और अमीर होता जा रहा है और गरीब और गरीब होता जा रहा है.
ते साठ टक्के जनता शिडीवरून वर
ते साठ टक्के जनता शिडीवरून वर चढल्यामुळे झालं की किंमती (तुलनेत) कमी झाल्यामुळे झालं आहे?
या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वस्तूंच्या किमती दहापटीने कमी झाल्या, त्यामुळे त्या वस्तू जर दहापट लोकांना परवडत असतील तर 'लोक तितकेच गरीब आहेत, पण आता त्यांना जास्त वस्तू परवडतात' असं म्हणता येत नाही. कारण जास्त वस्तू परवडणं आणि जास्त जास्त गरजा भागवता येणं हीच श्रीमंतीची व्याख्या आहे.
तळातले वीस टक्के आणि सर्वात वरचे वीस टक्के यांच्या उत्पन्नाची तुलना करून फारसं हाती लागत नाही. समानतेचा किंवा विषमतेचा इंडिकेटर तयार करायचा असेल तर मूलभूत गरजांचं भागणं किती प्रमाणात आहे याची तुलना हवी. टीव्ही फ्रीज फोन वगैरे जर पाच टक्क्यांऐवजी पन्नास टक्क्यांना परवडत असतील तर याचा अर्थ सुस्थितीतल्या लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. सुस्थिती म्हणजे काय याचा बार श्रीमंत लोक किती खोऱ्याने पैसे ओढतात याप्रमाणे बदलत ठेवला तर असमानता जातच नाही असंच दिसत राहाणार.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news…
वाळवंटी माणुस लंडनचा महापौर होणार म्हणे. हे असेच चालू राहिले तर मी पुण्यात आहे ते काय वाईट आहे?
गोमांस - मारता नाही पण खाता येणार!
महाराष्ट्रात गोमांस बाळगायला आणि खायला आता बंदी नाही पण गोवंश मारायला मात्र बंदी!!!
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/HC-upholds-Maharashtras-…
जीडीपी
अर्थकारण किंवा एकंदरीत परिस्थिती जीडीपीनं मोजण्याबद्दल इकॉनॉमिस्टमध्ये एक रोचक लेख आला आहे. युरोपमध्ये लैंगिक सेवांचा समावेश जीडीपीत करतात ही बाब मला माहीत नव्हती -
the paid-sex market is assumed to expand in line with the male population, and the charges at lap-dancing clubs are taken as a measure of the price of sex.
इतरही अनेक मुद्दे लेखात आहेत. उदा -
As commerce goes online, less is spent on bricks-and-mortar shops, which again means less GDP. Just as rebuilding after an earthquake (which boosts GDP) does not make people wealthier than they were before, building fewer shops does not make them poorer.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/city/chennai/Tamil-Nadu-election-Bis…
ही सेक्युलर पार्टी आहे बर का रे मित्रांनो!
government pay to teachers working in minority institutions appointed after 1990, revoking the property tax levied on minority institutions,
सोनिया गांधी शेरनी आहेत. इति
सोनिया गांधी शेरनी आहेत. इति ज्योतिरआदित्य सिंदिया..
शेरनी च्या बाजूने बोलायला इतरांची गरज नसते ओ. शेरनी स्वत: चे रक्षण स्वतः करते. आणि बिनबुडाचे आरोपांबद्दलच म्हणाल तर तुम्ही त्यात वर्ल्ड कप जिंकलेले खिलाडी आहात.
ये कौन पत्रकार है?
ऑगस्टाने मीडीयालाही ५० कोटी वाटले म्हणे.
संसदेत मनोहररावांचं डीटेलवार भाषण झालं पण कोणी टीव्ही पत्रकार त्याची पॉइंटवाईज चर्चा करायला तयार झाले नाही. ५ तारखेच्या भाषणानंतर तर रवीशकुमारांची केविलवाणी धडपड बघण्यासारखी होती.कालही उत्तराखंड,ऑगस्टा चर्चा आणि लोकशाही बचाव आंदोलन एकाच दिवशी आल्यावर ऑगस्टाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बाकीच्या दोन मुद्दांवर लक्ष देण्यात आलं.निष्ठा व द्वेष बडी चीज है.
मी स्वत: सरकारी खरेदीशी संबंधित आहे.त्यामुळे संरक्षण मंत्र्यांनी मांडलेले मुद्दे मी मुद्दाम नीट ऐकले. एकाला आरएपपी द्यायची आणि दुसर्यालाच ऑर्डर द्यायची याला उच्च प्रतीचा आत्मविश्वास लागतो.कंपन्यांचे AOA, MoA यासारखी औपचारिक डॉक्युमेंट्स सुद्धा एकदा 'प्रकरण' निर्माण झालं की कशी महत्वाची ठरतात हे लक्षात आलं. अनेक मुद्दे इतके सिरिअस आहेत की सरकारला करायचं असेल तर काहीही करता येईल.इथे खालच्या पातळीवर एजीच्या ऑडीट पॉंइंट्सना उत्तर देता देता आम्हाला घाम फुटतो त्याचवेळी हे बडे लोक किती सहीसलामत सुटतात हे पाहून मजा वाटते.
मला डीफेंस प्रोक्युरमेंटची
मला डीफेंस प्रोक्युरमेंटची फारशी माहिती नाही.तरी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे - शॉर्टलिस्टेड वेंडर्सनाच आरएफपी देण्यात येते व याप्रकरणात तशी ऑगस्टा वेस्टलॅंड इटाली ला तशी देण्यात आली पण त्याला रिप्लाय/ कोटेशन ऑगस्टा वेस्टलॅंड इंटरनॅशनल यू.के. (जे त्यांच्या आर्टीकल्सनुसार ओईएम नसून कस्टमर सर्विस प्रोवायडर आहेत)या कंपनीने भरले.फायनल ऑर्डरही या यूकेच्या कंपनीलाच देण्यात आली. अधिक केबिन हाईटचा जो मुद्दा आहे त्यासंदर्भात त्याकाळी त्या विविक्षित उंचीचे ते एकच हेलिकॉप्टर होते असे म्हणतात. हे सगळं सीएजी रिपोर्टमध्ये आहे म्हणतात.
अर्थात आपल्याकडे जसे सु.को.ला सगळ्यातले सगळे कळते असा समज आहे तसा सीएजीचाही आहे. अनेकदा एजी ऑडिटला टेक्निकल कंप्लशंस समजावून सांगतांना नाकी नऊ येतात. त्यामुळे त्यांचे म्हणणेही १००% योग्य व प्रॅक्टीकेबल असेलच असे नसते.असो.
अच्छा.... तुम्ही एका
अच्छा.... तुम्ही एका ऑगस्टाच्या एका कंपनीला आर एफ पी देऊन ऑगस्टाच्या दुसर्या कंपनीला ऑर्डर दिली असं म्हणताय.....
मी असंही ऐकलंय की आधीच्या आरएफपी नुसार ऑगस्टा आपोआप डिस्क्वालिफाय होणार होती. आरएफपी (मधील स्पेसिफिकेशन) बदलल्याने ऑगस्टाला प्रपोझल देणे शक्य झाले. म्हणजे इथे पाणी मुरत असल्याची शक्यता आहे. [अर्थात रिव्हर्स शक्यताही- पैसे खाऊन ऑगस्टाला बिड करता येणार नाही असे आरएफपी पहिल्यांदा बनवणे- आहेच].
टेक्निकॅलिटीजमध्ये जाणे शक्य नाही. उदा. आधी केपेबिलिटी टु फ्लाय मध्ये जास्त अल्टिट्यूडचे स्पेसिफिकेशन होते नंतर ते कमी करण्यात आले. जे जास्त अल्टिट्यूडचे स्पेसिफिकेशन होते ते योग्य होते की ओव्हरस्पेसिफिकेशन होते आणि नंतर कमी केलेले स्पेसिफिकेशन inadequate होते याबद्दल भाष्य करणे शक्य होणार नाही.
आणि अजून गंमत अशी आहे की
आणि अजून गंमत अशी आहे की कॉंग्रेस किंवा मीडीया या केस स्पेसिफिक फॅक्टसबाबत उहापोह करतच नाहीएत.पर्रीकरांनी एवढं मोठं भाषण घरूनच कसं काय लिहून आणलं असे तद्दन बालिश प्रश्न गुलाम नबीं सारखे ज्येष्ठ नेते विचारत होते. कॉंग्रेसची ही अवस्था पाहून खरंच वाईट वाटतं आणि काळजी वाटते(गंभीर).
पाणी नुसतं मुरलंच नाहीए तर त्याचं चांगलं रेनवॉटर हार्वेस्टींग होवून दुसरीकडून निघालं सुद्दा असावं अशी शंका येते.या प्रकरणाचा पनामा पेपर्सशीही संबंध आहे या संशयावरून ईडीने तपास चालू केल्याची आजच्या इकॉनॉमिक टाईम्सची बातमी आहे.
अनुभव असा सांगतो की खर्या 'अनियमतिता' या टेक्निकल रिक्वायरमेंट पातळीवरच होतात.उदा.या प्रकरणात फारसं Competitive Bidding नसल्यामुळे रिगिंग, प्राईस बिड मान्युपुलेशन इ.मध्ये गडबड करायला जास्त वाव नाही.त्यामुळे अशा खरेदीत टेक्निकल रिक्वायरमेंट मध्ये मान्युपुलेशन हा अधिक सिरिअस ऑफेंस ठरतो. पण संरक्षण खरेदीत हे सिद्ध करणे फार अवघड आहे आणि त्यामुळेच संरक्षण खरेदीत सर्वात अधिक भ्रष्टाचार आहे असे म्हणतात.
ती विवक्षित उंची १.८ मीटर
ती विवक्षित उंची १.८ मीटर होती. जगभरातर ष्ट्यांडर्ड १.४५ मीटर असते. तरी यांनी ती १.८ केली. जी फक्त ऑगस्टा पूर्ण करत होती. यापुढे कॉस्टींगमध्येही झोल आहेत. सैन्याकडून रफ एस्टिमेट मागवली या खरेदीसाठी. जी ८०० कोटी आली. नंतर कुठली तरी प्राय्सिंग कमीटी बसवली गेली ज्यांनी ती ४२०० कोटी केली. ऑगस्टाची बिड ३८०० कोटीला होती जी आपल्या एस्टिमेटपेक्षा कमी होती. त्यामुळे प्रायसिंग निगोशिएशन्स झालीच नाहीत. याखेरीच ज्या चाचण्या करणं अपेक्षित होतं हेलिकॉप्टरवर त्या ज्याची ऑर्डर द्यायचीये त्यावर न करता वेगळ्याच हेलिकॉप्टरवर केल्या गेल्या.
हे मुद्दे स्वामींनी राज्यसभेत मांडले होते.
Very strong words!
http://www.thehindu.com/opinion/interview/i-want-a-break-from-this-male…
We are fighting small fights — Hindus versus Muslims, Dalits versus upper castes. Gender is the bigger battle. I am tired of the man within me. I also want to change. You get unconsciously trapped in male values. You are superior only because you happen to be a man. I want a break from this male-dominated world.
Ivy League Economist Racially
Ivy League Economist Racially Profiled and Interrogated for Doing Math on American Airlines Flight
तो तरुण विमान सुरु व्हायच्या आधी काहीतरी लिहित होता. ते त्याच्या शेजारच्या बाईने बघितले आणि तिला वाटले की हे अरबी भाषेतले कोडवर्ड्स आहेत. बाईंच्ची बुद्धिमत्ता व सामाजिक बांधिलकी जागी झाली आणि त्यांनी पॅनिक बटण दाबले. आणि एक थरारनाट्य घडले.
Had the crew or security members perhaps quickly googled this good-natured, bespectacled passenger before waylaying everyone for several hours, they might have learned that he — Guido Menzio — is a young but decorated Ivy League economist. And that he’s best known for his relatively technical work on search theory, which helped earn him a tenured associate professorship at the University of Pennsylvania as well as stints at Princeton and Stanford’s Hoover Institution.
They might even have discovered that last year he was awarded the prestigious Carlo Alberto Medal, given to the best Italian economist under 40. That’s right: He’s Italian, not Middle Eastern, or whatever heritage usually gets ethnically profiled on flights these days.
------
Fifth Column: Tinkering and tokenism? ___________ Tavleen Singh - बाईंनी मस्त आढावा घेतलाय. Modi missed many opportunities.
------
मला हे आक्रमण आवडले. सोनिया गांधी ह्या सर्व चेक्स-अँड-बॅलन्सेस च्या अबव्ह आहेत असं काहीसं जे चित्र निर्माण केलं गेलं आहे त्याला रोखणे शक्य होईल. "मै किसीसे नही डरती" असें विधान जे सोनियांनी केले ते सुद्धा ह्याच मग्रूरीतून केले. तुम्ही कोणालाही घाबरत नाही म्हंजे काय ?? कायद्याला सुद्धा घाबरत नाही ? कोर्टाला सुद्धा घबरत नाही ? शेरनी म्हंजे काय ? तुम्ही हवं तसं वागाल आणि आम्ही ते ऐकून घ्यायचं ?
अजून एक उदाहरण
>>> होता. ते त्याच्या शेजारच्या बाईने बघितले आणि तिला वाटले की हे अरबी भाषेतले कोडवर्ड्स आहेत. बाईंच्ची बुद्धिमत्ता व सामाजिक बांधिलकी जागी झाली आणि त्यांनी पॅनिक बटण दाबले. आणि एक थरारनाट्य घडले.
--- निदान वेपन्स ऑफ मॅथ डिस्ट्रक्शन सापडले, हे काय कमी आहे?
ऑन अ सिमिलर नोट -
एका अपंग महिलेने तिची गाडी टो करून नेण्यासाठी फोन करून बोलावलेल्या एजन्सीच्या ड्रायव्हरने तिच्या गाडीवरचा बर्नी सॅंडर्सचा स्टिकर पाहून, गाडी टो करण्यास नकार दिला:
He goes around back and comes back and says, ‘I can’t tow you.’ My first instinct was there must be something wrong with the car,” McWade told WLOS. “And he says, ‘No, you’re a Bernie supporter.’ And I was like, ‘Wait, really?’ And he says, ‘Yes, ma’am,’ and just walks away.”
McWade has a Bernie Sanders bumper sticker on her rear fender, but never thought her support for the presidential hopeful would cause her to be left on the side of the road.
Shupe told WLOS that he supports Republican candidate Donald Trump and he believes God had something to do with his decision that day.
“Something came over me, I think the Lord came to me, and he just said, ‘Get in the truck and leave,” Shupe said. “And when I got in my truck, you know, I was so proud because I felt like I finally drew a line in the sand and stood up for what I believed.”
काय आहे ती लिंक? उघडत नाहीये.
काय आहे ती लिंक? उघडत नाहीये.
_____
http://www.rawstory.com/2016/05/trump-loving-tow-truck-driver-says-god-…
या दुव्यावर सापडली. हे असले रेड्नेक आणी रेमेडोके लोकं ट्रंपचे सपोर्टर्स आहेत.
रिअली? असा अर्थ काढला तुम्ही?
रिअली? असा अर्थ काढला तुम्ही? "मी कोणाला घाबरत नाही म्हणजे मी काही चुकीचं केलेलं नाही मग मी कशाला घाबरायचं ?" असा अर्थ नाही होत?
होतो. पण फक्त इन-प्रिन्सिपल.
The moment you ignore the "who" part you inch closer to anarchy situation.
"कोण" या मधे एन्फोर्समेंट, कोर्ट हे येतातच. कठोर एन्फोर्सर्स च्या अनुपस्थितीत व्यक्ती कोणास घाबरेल ? नियम कागदावरच राहतील. व राहतातच.
नियम व एन्फोर्सर्स हे दोघेही "व्यवस्था" राबवण्यासाठी आवश्यक असतात. पुरेसे असतातच असे नाही.
खरंतर आपल्या देशात अशी स्थिती आहे की तुरुंगात घातले की नेते लज्जित होण्याऐवजी बाहेर येऊन लोकांनाच ते मिरवून दाखवतात की "बघा ओ बघा, मी तुमच्यासाठी तुरुंगात गेलो". एखादे वीरचक्र मिळाल्याच्या आवेशात. आणि फडतूसांची सेना अशी आहे की अशा नेत्याच्या मागे मोठ्या संख्येने उभी राहते. व सोनियांचे ते वाक्य अशाच लोकांना उद्देशून होते. की बघा ओ बघा मला मोदी छळायला टपलेले आहेत. पण मी तुमच्यासाठी लढतच राहणार.
मोदी सोनिया गांधींना अटक
मोदी सोनिया गांधींना अटक करायला घाबरतात - इति केजरीवाल!
We made you the PM to investigate the case… not to leave everything to the Italian court. Our chests too would swell to 56 inches if the PM stood up and said he had sent Sonia Gandhi to jail. But when my PM says it wasn’t he who named her, it was the Italian court, I wonder if he is so scared of Sonia Gandhi.
=))
प्वॉइंट मे दम है! आता काँग्रेस अध्यक्षांवर किमान केस दाखल करायची राजकीय संधी आहे (तथ्याधारित आहे की नाही ही बाब अलाहिदा.) मोदींना आपल्या समर्थकांमध्येच दुबळे असल्याची प्रतिमा नको असेल तर आता त्यांना काहीतरी करावेच लागेल.
केजरीवाल चतुर आहे हे खरं :)
ढोंगी माणूस
केजरीवाल चतुर आहे हे खरं
असं मलाही आधी वाटायचं. पण आता नाही. केजरीवाल म्हणजे दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था होणार आहे.इतका ढोंगी माणूस मी अद्याप पाहिला नाही. बायदवे केजरीवालांनी मराठी वृत्तपत्रात दोन-दोन पान जाहीराती द्यायचं आणि यांनी तोंड वर करून त्या घ्यायचं कारण काय? पूर्वी अशा जाहीराती मायावती द्यायच्या.
मोदी काय सगळे पत्ते एकदम टाकायला एवढे 'हे' नसावेत :)
India moves up by 2 points in
India moves up by 2 points in A T Kearney's FDI Confidence Index 2016
२०१५ मधील ११ व्या स्थानावरून २०१६ मधे ९ व्या स्थानावर. पण २०१४ मधे ७ व्या स्थानावर होता.
टाटांचं नाव यात बघून थोडं
टाटांचं नाव यात बघून थोडं आश्चर्य वाटलं. माझ्या माहितीप्रमाणे टाटा फक्त कोरस स्टीलचा पोर्ट टालबोटचा कारखाना विकत आहेत. कोरसचे (आणि आर्सेलरमित्तलसारख्या इतर युरोपियन स्टीलमेकर्सचे) बाकी तोटे हे चीनच्या स्टील डंपिंगमुळे उद्भवलेले आहेत. हे प्राईस-प्रेशर आहे, त्याचा अर्थ अॅसेट आजारी आहेत असा नव्हे. (कोणतंही डंपिंग, आणि विशेषतः कमोडिटीच्या क्षेत्रातलं डंपिंग, अमर्याद काळापर्यंत चालू शकत नाही. प्रत्येक डंपिंगला अंत आहे म्हणून टाटा शांत आहे.)
उलटपक्षी, मी रोज ज्या रेल्वेने प्रवास करतो तिच्या अंगभर टाटा कम्युनिकेशन्स (पूर्वाश्रमीचं विदेश संचार निगम) ओन्स २५% ऑफ द वर्ल्ड्स क्लाऊड्स अशा जाहिराती आहेत. टाटा अॅसेट विकत आहेत वगैरे बिलकुल वाटत नाहीये.
ग्रीस मधे राडा; नवीन काटकसरी धोरण जाहीर. पेन्शन्स चे योगदान वाढव
ग्रीस मधे राडा; नवीन काटकसरी धोरण जाहीर. पेन्शन्स चे योगदान वाढवले; शेतकर्यांनी निदर्शने केली.
The reforms will reduce Greece's highest pension payouts, merge several pension funds, increase contributions and raise taxes for those on medium and high incomes.
पण गरीबांना नेहमीप्रमाणे सवलत देऊन सोडून दिले. प्रधान मंत्री सिप्रास यांचा पक्ष डाव्या प्रवृत्तीचा आहे.
Mr Tsipras defended the reforms on Friday, telling politicians from his left-wing Syriza party — which holds a slim majority of 153 seats in the 300-seat parliament — that they would spare the poorest.
------
'You can't take away my love for India': Sonia hits back at PM Modi
एक चतुर नार.
बाईंनी त्यांच्या उत्तरामधे कुठेही मुद्द्यास हात घातलेला नाही.
She alleged that Prime Minister Narendra Modi found enormous time for internationals visits and discussions, but not for the farmers and the poor people of the country.
हो हो. तुम्ही फार वेळ दिलात त्यांना आणि त्यांची लई म्हंजे लई प्रगती झाली तुमच्या १० वर्षांत (२००४ - २०१४).
ही जेन्युआइन शंका आहे.
हो हो. तुम्ही फार वेळ दिलात त्यांना आणि त्यांची लई म्हंजे लई प्रगती झाली तुमच्या १० वर्षांत (२००४ - २०१४).
मला एक अॅकॅडेमिक शंका आहे. जर सत्ताधारी पक्ष निठल्ला होता. नंतर तो विरोधी पक्ष झाला. नवा सत्ताधारी पक्षही निठल्ला आहे तर मग विरोधी पक्षाने ब्र ही काढायचा नाही का? ( आपले निठल्लेपण आठवून)
की
आपली चूक झाली ती झाली म्हणून निदान आता स्वतःचे म्हणजे विरोध करण्याचे कर्तव्य बजवायचे?
मला एक अॅकॅडेमिक शंका आहे.
मला एक अॅकॅडेमिक शंका आहे. जर सत्ताधारी पक्ष निठल्ला होता. नंतर तो विरोधी पक्ष झाला. नवा सत्ताधारी पक्षही निठल्ला आहे तर मग विरोधी पक्षाने ब्र ही काढायचा नाही का?
थेट व मस्त प्रश्न.
युपीए च्या कालात जर लाँग टर्म हिताचे काम केलेले असते तर आज ह्या समस्या उद्भवायलाच नको होत्या. उदा. जर युपीए च्या कालात जलसिंचनावर फक्त महाराष्ट्रात Rs 1,18,235 crore खर्च झाले तर आज शेतकर्यांची इतकी दयनीय अवस्था का आहे ? सोनिया गांधींनी याचे उत्तर न देता मोदींनाच प्रश्न विचारणे म्हंजे निर्लज्जपणा आहे. जलसिंचन व पाण्याची उपलब्धता ही अशी गोष्ट आहे का की जी वर्षदोनवर्षांत सुधारता येईल ?? मुख्य म्हंजे = सोनियाच्या ऑगस्टावेस्टलँड मधल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल आरोप केले तर त्या भलत्याच विषयावर बोलल्या. ऑगस्टावेस्टलँड बद्दल व त्यात जे राडे झालेत त्याबद्दल बोलायचे सोडून ....
शुचि - माझ्या साठी "काय"
शुचि - माझ्या साठी "काय" म्हणले आहे ह्यापेक्षा "कोणी" म्हणले आहे हे महत्वाचे आहे. नॉर्मली ( अपवाद असतील ), जाहीररित्या सर्वच लोक थियरॉटीकली बरोबर बोलतात. म्हणुन कोण बोलते आहे हे महत्वाचे जास्त. नीच लोकांच्या तोंडातुन कीतीही मानवतावादी तत्वज्ञान आले तरी त्याला काहीही अर्थ नसतो.
समर्थन
>> शुचि - माझ्या साठी "काय" म्हणले आहे ह्यापेक्षा "कोणी" म्हणले आहे हे महत्वाचे आहे. नॉर्मली ( अपवाद असतील ), जाहीररित्या सर्वच लोक थियरॉटीकली बरोबर बोलतात. म्हणुन कोण बोलते आहे हे महत्वाचे जास्त. नीच लोकांच्या तोंडातुन कीतीही मानवतावादी तत्वज्ञान आले तरी त्याला काहीही अर्थ नसतो.
जर असाच नियम उदाहरणार्थ ऐसीवरच्या श्रेणींना लावायचा झाला, तर 'कुणी तरी मला हेतुत: ऋण श्रेणी देतं आहे' अशी तक्रार करण्याचा कुणाला हक्कच उरणार नाही, कारण तुम्ही काय बोलतायत हे पाहण्यापेक्षा केवळ अनुताई बोलत आहेत म्हणून लोक तुम्हाला ऋण श्रेणी देत असतील तर ते तुमच्या ह्या तर्कानुसार फुल्ल टू समर्थनीयच ठरतं :-)
पुरोगाम्यांनी राबवलेली
पुरोगाम्यांनी राबवलेली असहिष्णुता.
We progressives believe in diversity, and we want women, blacks, Latinos, gays and Muslims at the table — er, so long as they aren’t conservatives. Universities are the bedrock of progressive values, but the one kind of diversity that universities disregard is ideological and religious. We’re fine with people who don’t look like us, as long as they think like us.
पुरोगाम्यांचा विविधतेच्या नावानं जयघोष चालू असतो. आपण विविध गटांप्रति सहिष्णु असलं पाहिजे वगैरे वगैरे. पण सनातन्यांना विविधतेत अंतर्भूत करायची वेळ आली की लगेच ट्याट्या सुरु. आम्हाला सगळे चालतील पण फक्त हिंदु हितास प्राधान्य देणारे मात्र नकोत. तिथे मात्र लगेच सॅफ्रनायझेशन वगैरे वगैरे. आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो अगदी देशद्रोह्यांचं सुद्धा. परंतु देशभक्त आले की लगेच आम्ही त्यांना "तुमची देशभक्तीची व्याख्या आमच्यावर लादू नका, आम्हाला देशभक्तीचे सर्टिफिकेट द्यायला लावू नका" वगैरे ट्या ट्या ट्या सुरु. आम्ही मात्र तुमच्याकडून तुमच्या "सेक्युलर असण्याचं व कम्युनल नसण्याचं" सर्टिफिकेट मागणारच.
"The next time some academics tell you how important diversity is, ask how many Republicans there are in their sociology department." --- Thomas Sowell
----------------
धांद्रटच आहे मेलं ते
>>> हा हलकटपणा ट्विटरपण करतं. अनेक ट्रेंड सप्रेस केले जातात.
--- याला काही विदा/पुरावा आहे का - फेसबुकच्या बातमीसारखा निदान मर्यादित संदर्भात तरी? कुतूहल म्हणून विचारतो आहे; जाब किंवा आरोपीच्या पिंजर्यात उभं करून नव्हे. असे आरोप मी गूगल आणि अॅपलच्या विरोधातही ऐकलेले आहेत रशकाका लिम्बॉ आणि मंडळींकडून. (गंमत म्हणजे फेसबुकबद्दलची ही बातमी सध्या ट्विटर ट्रेंड्समध्ये आहे).
शीर्षकाचा संदर्भ - नारायण (अण्णू, भीमीचा भाचा). कन्फर्मेशन बायसचे एक उदाहरण म्हणून ;)
ओके
नाही. पुरावा नाही. नाराज पार्ट्यांनी केलेले आरोप एवढाच बेस आहे त्याला.
धन्यवाद, अशा बेसलेस आरोपांची उज्ज्वल परंपरा आहे. काही महिन्यांपूर्वीच स्टारबक्स ख्रिसमसविरोधी आणि पर्यायाने ख्रिश्चनविरोधी आहे, अशी आवई उठली होती. ट्रम्पने मग त्यावर 'लवकरच तुम्ही मेरी ख्रिसमस म्हणू शकाल' अशी ग्वाही देऊन 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'ची चुणूक दाखवली होती ;)
(कुणाला शंका असेल तर ओबामाकाका व मिशेलकाकूंचे 'मेरी ख्रिसमस' या शब्दांत शुभेच्छा देणारे व्हिडिओज दर ख्रिसमसच्या सुमारास येत असतात; पण कट्टर लोकांना 'ख्रिश्चॅनिटी खतरें में' वाटत राहणं, हे त्यांचं जीवनविषयक सूत्र आहे!)
आणखी : फेसबुक मधल्या
आणखी : फेसबुक मधल्या पुरोगाम्यांचा चावटपणा : Former Facebook Workers: We Routinely Suppressed Conservative News
भारतात नेट न्युट्रॅलिटी अजून यांच्या दावणीला बांधली गेली नाहिये म्हणून नाहितर अशा खाजगी कंपन्यांमार्फेत सत्ताधार्यांनी जनमत कसे प्रभावित केले असते याचा ढळ्ढळीत पुरावाच म्हणावा!
त्यात गब्बरसारख्या नेट न्युट्रॅलिटीच्या विरोधकांनी याला चावटपणा म्हणावा हे अधिक चावट आहे!
ट्रम्प टॅक्स कट्स आणि/किंवा इन्क्रिझ
ट्रम्प टॅक्सेस कमी करणार आहे की वाढवणार आहे, याबाबत नक्की कुणी सांगू शकेल का? खुद्द ट्रम्पला काय म्हणायचंय, तेही धड कळत नाही (दुवा):
In the CNN interview, Mr. Trump – who has made his political mark as the “tell-it-like-it-is” candidate – tried to counter questions that he was flip-flopping on policy issues.
“Let me just set it straight,” Mr. Trump said in talking of his past tax proposals. “I put in the biggest tax decrease of anybody running for office by far, O.K., and many people think it’s great, and if anything, I was criticized because it’s too steep a cut, but that’s O.K., but I put in by far the biggest tax decrease.”
He added, “What I said – and that really is a proposal because we have to go to Congress, we have to go to the Senate, we have to go to our congressmen and women and we have to negotiate a deal. So it really is a proposal, but it’s a very steep proposal.”
Then he said, “I said that I may have to increase the section – and by the way, everybody across the board, businesses, everybody’s getting a tax cut, especially the middle class. And I said that I may have to increase it on the wealthy. I’m not going to allow it to be increased on the middle class. Now, if I increase on the wealthy, that means they’re still going to be paying less than they pay now.”
But he added, “I’m not talking about increasing from this point, I’m talking about increasing from my tax proposal.”
अमेरिकन प्रायमरीज्: एक परिप्रेक्ष्य
Hillary Clinton has won 12,575,576 votes out of 23,376,193 counted in Democratic contests. That represents:
- 5.6% of all eligible voters in the United States
- 5.0% of all adult residents in the United States
- 3.9% of all people living in the United States
Trump has won 10,706,130 votes out of 26,590,345 counted in Republican contests so far. That represents:
- 4.7% of all eligible voters in the United States
- 4.3% of all adult residents in the United States
- 3.3% of all people living in the United States
दुवा: http://www.fairvote.org/how_few_votes_it_takes_to_become_a_presumptive_…
RangeNo of returnsSum of
| Range | No of returns | Sum of tax payable (in Rs crore) |
|
| <0 | 24 | 0 | |
| 0 | 162,47,598 | ||
| >0 and <=1,50,000 |
111,28,419 | 23,446 | |
| >150,000 and <= 2,00,000 |
3,02,339 | 5,254 | |
| >2,00,000 and <=2,50,000 |
2,14,437 | 4,790 | |
| >2,50,000 and <= 3,50,000 |
2,64,990 | 7,818 | |
| >3,50,000 and <= 4,00,000 |
86,701 | 3,243 | |
| >4,00,000 and <= 4,50,000 |
69,077 | 2,930 | |
| >4,50,000 and <= 5,00,000 |
58,241 | 2,762 | |
| >5,00,000 and <= 5,50,000 |
48,197 | 2,527 | |
| >5,50,000 and <= 9,50,000 |
1,78,654 | 12,580 | |
| >9,50,000 and <= 10,00,000 |
10,506 | 1,024 | |
| >10,00,000 and <=15,00,000 |
63,876 | 7,746 | |
| >15,00,000 and <= 20,00,000 |
30,016 | 5,171 | |
| >20,00,000 and <= 25,00,000 |
16,795 | 3,740 | |
| >25,00,000 and <= 50,00,000 |
29,881 | 10,229 | |
| >50,00,000 and <= 1,00,00,000 |
11,077 | 7,474 | |
| >1,00,00,000 and <=5,00,00,000 |
5,042 | 8,907 | |
| >5,00,00,000 and <=10,00,00,000 |
266 | 1,788 | |
| >10,00,00,000 and <=25,00,00,000 |
90 | 1,393 | |
| >25,00,00,000 and <=50,00,00,000 |
21 | 707 | |
| >50,00,00,000 and <=100,00,00,000 |
8 | 590 | |
| >100,00,00,000 and <=500,00,00,000 |
3 | 437 | |
| Total number of individuals who filed income tax returns |
287,66,258 | 1,14,556 | |
| Total number who paid tax |
125,18,660 |
अरे हे टेबल इथे पडले वाटते. मी उगाचच ट्रायल करत होते.
हा ३-४ वर्षापूर्वीचा भारतातला आयकर रीटर्न भरणार्यांचा विदा आहे.
एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न असलेले लोक ६००० पेक्षा कमी आहेत म्हणे
शहरी फडतूस
रोचक लेख! ट्रेंडी पण कफल्लक लोकांबद्दल हा लेख
https://www.buzzfeed.com/gayatrijayaraman/broke-hungry-and-on-trend?utm…
असे लोक खरच बघण्यात आहेत काय कोणाच्या?
फारच रोचक लेख.
माझ्यापेक्षा १५-१६ वर्षे लहान असलेल्या माझ्या नात्यातल्या मुलांची व त्यांच्या मित्रमंडळींची कॉलेजमध्ये असतानाची (आईवडिलांच्या पैशावर चालणारी) लाईफस्टाईल बघता असे लोक इन मेकिंग आहेत बघण्यात असे म्हणता येईल. भारी भारी रेस्टॉरंट्समध्ये पार्ट्या, गोव्या-बिव्याला रेग्युलर ट्रिपा, अगणित फोन्स अनेक मोटरबाईक्स, आईवडिलांनी फ्लॅट सकट सगळं घेऊन दिलेलं असणे वगैरे कॉमन झालं आहे मध्यम शहरांत सुद्धा. पुढे स्वतः कमवायला लागले की खर्चात भरच पडणार. ह्याच मुलांपेक्षा थोडी मोठी असलेली, मेट्रोत वाढलेली माणसे म्हणजे लेखातली माणसे.
An Indian teen was raped by
An Indian teen was raped by her father. Village elders had her whipped. सुन्न करणारी बातमी आहे. लहानशी मुलगी - टीनएजर :(
_______
Bernie Sanders हे आता हळूहळू सँटा क्लॉज वाटू लागले आहेत मला. Can manifest in only fiction. कॉलेज फी कमी करणार, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना फुकट शिक्षण देणार, पेन्शन मध्ये कापाकापी होतेय ती थांबवणार. हे सगळं टॅक्स वाढवुन. सं- वरील दुवा + http://www.ontheissues.org/Bernie_Sanders.htm
You are ruling the nation,
You are ruling the nation, take action: A K Antony to PM Modi -- ते ठीकाय ओ. पण अॅक्शन घेतली की तुमचं बाळ हा "पोलिटिकल व्हेंडेट्टा" आहे म्हणून ट्याहॅ ट्याहॅ ट्याहॅ करतं त्याचं काय ?
-----
मटा मधली बातमी : टॅक्स हेव्हन असलेल्या देशांशी संबंध तोडण्याचा प्रस्ताव. - ३०० अर्थतज्ञांनी केलेला प्रस्ताव.
त्यांना ट्यांहा करायला स्कोप
त्यांना ट्यांहा करायला स्कोप मिळतो कारण अॅक्च्युअली काहीच अॅक्शन घेतलेली नसते.
ह्या बाकी खरा हां !!!
ऑगस्टावेस्टलँड प्रकरणात सरकारने नेमकी कृती काय केलीय याचं उत्तर देताना भाजपाच्या लोकांची भंबेरी उडते. सीबीआय च्या लोकांनी त्यागी बंधूबद्दल काहीतरी डायलॉग्स मारलेले आहेत पण "सोनियांच्या इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल" नेमके काय केले ? चौकशी, आरोपपत्र, आदेश ... नेमके काय ?
कोर्टाचा आदेश येऊन किती दिवस
कोर्टाचा आदेश येऊन किती दिवस झाले? थांबा की जरा. खान्ग्रेसला विचारता का कधी असे?
हे सुद्धा खरं आहे.
Bribes were taken in the VVIP helicopter deal, admits AK Antony - असं ते २५ मार्च २०१३ ला म्हणाले होते. त्यांनी डील कॅन्सल केले. पण आरोपींना सजा देण्याच्या दिशेने कोणती पावले उचलली ? किमान १ वर्ष होते त्यांना. काय दिवे लावले ?
कोणता शहाणपणा?
विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द केल्यामुळे, त्यांना भारतात पाठवू शकत नाही, यूकेची परराष्ट्र मंत्रालयाला माहिती
जो भारतात आहे आणि पळून जाण्याची शक्यता आहे, तो पळून जाऊ नये म्हणून त्याचा पासपोर्ट रद्द करणे हे समण्यासारखे आहे.
पण तो अगोदरच बाहेर गेला आहे त्याचा पासपोर्ट रद्द करणे ह्यात कोणता शहाणपणा?
Hungry Venezuelans Hunt Dogs,
Hungry Venezuelans Hunt Dogs, Cats, Pigeons as Food Runs Out - समाजवाद्यांचे नव-नंदनवन असलेल्या व्हेनेझुएला मधे अन्ना ची इतकी टंचाई झालेली आहे की लोक आता श्वान, कबूतरं आणि मांजरं मारून खायला लागलेली आहेत. हे वाईडस्प्रेड नसेलही आणि श्वान, कबूतरं आणि मांजरं मारून खाण्यात तसं बघितलं तर काही चुकीचं नाहिये. पण ....
२ आठवड्यांपूर्वी व्हेनेझुएला मधे सुपरमार्केट मधे लुटालुटी झाल्या.. आयमेफ म्हणते की अर्थव्यवस्था ८% नी घटणार आहे व महागाई ७२०% च्या आसपास आहे.
पो मोने मोदी - सेज गॉड्स ओन कंट्री
निवडणुकीच्या तोंडावर तोंड उघडून आत पाय घालणे?
#PoMoneModi: Angry Kerala responds to PM Modi’s Somalia comparison
एका गावातल्या दारु बंदीची
एका गावातल्या दारु बंदीची कहाणी आली आहे लोकमत मधे.
---------------
आडवी बाटली उभी होते, तेव्हा..
नागराज मंजुळे यांची पत्नी
नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...
मालेगाव ब्लास्टमधील आरोपी
मालेगाव ब्लास्टमधील आरोपी साध्वी प्रज्ञा यांना क्लीन चिट. नक्कीच भगवी चाल आहे ही.
http://www.news18.com/news/politics/sadhvi-pragya-thakur-gets-clean-chi…
हाच तो न्यु यॉर्क टाईम्स मधला
हाच तो न्यु यॉर्क टाईम्स मधला संपादकीय - ज्यात त्यांनी पाकिस्तानची बिन पाण्यानं हजामत केलीय. - (अर्थातच - जोपर्यंत आपण पाकिस्तानची खोड मोडत नाही तोपर्यंत हे असंच पाहुण्याच्या काठीवर विसंबून रहायची पाळी येणारच आपल्याला. दर वेळी - अहो युद्ध परवडणार नाही, अहिंसा, गांधी, वगैरे वगैरे बोलत राहिलं की मग वाट बघत बसायची ... पाहुण्याची काठी केव्हा पडत्ये विंचवावर त्याची. worse yet पाहुण्याच्या काठीचा आपल्यालाच धाक जास्त आहे असं म्हणण्या इतपत वेळ येऊ नये म्हंजे मिळवली. कारण पाहुणा हा काही फार आपल्याशी प्रेमळ वागतो असं नाही. आणि हे सगळे तू मारल्या सारखं कर मी रडल्यासारखं करतो टाईप असू ही शकते. पण बॉटमलाईन चे काय ?? )
उत्तर म्हणून पाकिस्तानने नेहमीप्रमाणे अफगाणिस्तानचा विषय कॉम्प्लेक्स आहे, आंतरराष्ट्रीय कम्युनिटीचे अपयश आहे वगैरे ट्या ट्या केलेले आहे. - त्या बेबी पिक्चर मधे पण - It is not that simple चा डायलॉग मारला गेलेला होता.
------
अमेरिकन सिनेट ने फेसबुकच्या चावटपणाची चौकशी करायची तयारी चालवलेली आहे. - काय झालंय या लोकांना तेच समजत नाही. काँझर्व्हेटिव्ह फॉक्स न्युज चॅनल जे पुरोगाम्यांवर टीकेची झोड उठ्वतं ते चालतं. एमेसेन्बीसी पुरोगामी आहे ते चालतं. सीएनेन चालतं. मग फेसबुक-ट्रेंडिंग न्युज हे तर मोफत चॅनल आहे. मग चौकशी का करायची ? अशी चौकशी करायचा सरकारला अधिकार का असावा ?
-------
>>अहो युद्ध परवडणार नाही,
>>अहो युद्ध परवडणार नाही, अहिंसा, गांधी, वगैरे वगैरे बोलत राहिलं की मग वाट बघत बसायची
बर्याचदा युद्ध परवडणार नाही म्हणून अहिंसा-गांधी वगैरे बोलायचं असतं.
(दुर्दैव म्हणजे सध्याच्या सरकारला हा अहिंसा-गांधी वगैरे बोलण्याचा ऑप्शन नाही आणि युद्ध परवडणार नाही की कदाचित वस्तुस्थिती असण्याची शक्यता आहे)
सॉलिडच
शेणकीडा म्हणे आकाशात बघुन एक "celestial-snapshot" घेतो & तारकांच्या त्या मनातल्या फोटोनुसार त्याचे मार्गाक्रमण करतो. आणि शेणाचा मौल्वान गोळा, अन्य शत्रुंपासून वाचविण्याकरता =)) त्याला भराभर घेऊन जावा लागतो. त्यालाही माहीत असते की २ बिंदूंमधील कमीत कमी अंतर हे सरळ रेघ असते.
http://gizmodo.com/dung-beetles-navigate-by-storing-star-maps-in-their-…
आपल्या टीन एजर्स ना भरपूर फळे
आपल्या टीन एजर्स ना भरपूर फळे , गाजरे, भोपळा, रताळी म्हणजे ज्या भाज्यांत alpha-carotene मिळते, ते खायला घाला. (खरच? तुम्हाला वाटतं, टीनएजर्स ऐकतात कोणाचं! Least of all their parents.) त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कर्करोग?) ची शक्यता कमी होते.
http://www.forbes.com/sites/alicegwalton/2016/05/13/teenage-girls-diets…
खायला घाला म्हणजे नुसते कडबा
खायला घाला म्हणजे नुसते कडबा दिल्यागत बेचव भाज्यांद्वारे नका देऊ. जरा छानछान मसालेदार भाज्या, लोणची, चटण्या, पराठे, पिझ्झा, इ. माध्यमांतून द्या मग खातील पोरं सगळं.
(चिंचगुळाची गोडमिट्ट ग्वळ्ळ आमटी, शेपूची भाजी, इ. पोषणमूल्ये खाऊन वैतागलेला एक्स टीनेजर) बॅटमॅन.
अमेरिकेतही भगवीकरण !
थोडा मटास्टाईल मथळा देण्याचा प्रयत्न करतो : अमेरिकेतही शिक्षणाचे भगवीकरण ?
यावर हार्वर्डमधील एका प्राध्यापकांचं हे पत्रही वाचण्यासारखं आहे.
गंमत आहे,इकडे आपले विद्वान कधी इंग्रजांच्या आधी इंडिया नव्हताच म्हणतात तर कधी मोदी सरकार 'आयडिया ऑफ इंडिया' मिटवायच्या मागे लागले आहे असा आरोप करत कोलांट्या उड्या मारतात पण तिकडे मात्र लोक इंडियाच्या जागी साऊथ एशिया असा शब्द वापरून आमची ओळख़ मिटवू नका असा दबाब आणताहेत. माझा अमेरिकेशी काही संबंध नसल्याने मी फार भाष्य करू शकत नाही.
तरी पण मोदीभक्तांची आणि संघी लोकांची इतकी पहुंच ? खूपच झालं हे.


यात मला आश्चर्य करण्यासारखं
यात मला आश्चर्य करण्यासारखं काय ते कळत नाही. सर्वच जनता अत्यंत गरीब असते तेव्हा इक्वॅलिटी असते. त्यानंतर प्रगती होते, ग्रोथ होते, तेव्हा इनइक्वॅलिटी वाढते. जेव्हा पुरेशी ग्रोथ होते त्यानंतर इक्वॅलिटी पुन्हा वाढू शकते. आत्ता हे दोन देश ग्रोथ स्पर्टमध्ये आहेत.
तसंही इक्वॅलिटीसाठी जिनी इंडेक्स वापरणं हे मला चुकीचं वाटतं. तीसचाळीस वर्षांपूर्वी भारतात फक्त दोनतीन टक्के श्रीमंतांकडे टीव्ही, फ्रिज, फोन होतं. आता याच गोष्टी - जास्त चांगल्या प्रतीच्या - साठसत्तर टक्के जनतेला उपलब्ध आहेत. तरीही जिनी इंडेक्स बदललेला नाही.