दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ एप्रिल
जन्मदिवस : गणितज्ञ, डॉक्टर व विनोदी लेखक जॉन आरबथनॉट (१६६७), चित्रकार राजा रविवर्मा (१८४८), गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता आँरी प्वॉंकारे (१८५४), ग्रीक कवी कॅव्हाफी (१८६३), ४० पेटंटे घेणारे आणि २०० शोध नावावर असणारे वैज्ञानिक शंकर आबाजी भिसे (१८६७), समस्थानिकांबद्दल संशोधन करण्यासाठी नोबेल मिळवणारा हॅरल्ड उरे (१८९३), जाझ पियानोवादक व संगीतकार ड्यूक एलिंग्टन (१८९९), सिनेदिग्दर्शक, कवी व छायाचित्रकार माया दरेन (१९१७), तबलावादक अल्लारखा (१९१९), पाश्चात्य संगीतसंचालक झुबिन मेहता (१९३६), अभिनेत्री, गायिका, बालसाहित्यिक व भाषांतरकार माधुरी पुरंदरे (१९५२), अभिनेता डॅनिएल डे ल्यूईस (१९५७), अभिनेत्री मिशेल फीफर (१९५८), टेनिसपटू आंद्रे आगासी (१९७०), अभिनेत्री उमा थर्मन (१९७०), गायक आनंद भाटे (१९७१), क्रिकेटपटू आशिष नेहरा (१९७९)
मृत्युदिवस : ग्रीक कवी कॅव्हाफी (१९३३), तत्त्वज्ञ लुडविग विटगेनश्टाईन (१९५१), समीक्षक श्री. के. क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी (१९८०), सिनेदिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक (१९८०), अभिनेता मोहन गोखले (१९९९), सिनेदिग्दर्शक, गीतकार व लेखक केदार शर्मा (१९९९), अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गॅलब्रेथ (२००६), LSDचा शोध लावणारा रसायनशास्त्रज्ञ अल्बर्ट हॉफमन (२००८), अभिनेता इरफान खान (२०२०)
--
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस (आधुनिक बॅलेचा जनक जाँ-जॉर्ज नोव्हेरच्या जन्मदिनानिमित्त)
जपानी 'गोल्डन वीक'ला प्रारंभ
वर्धापनदिन : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड
१९३७ : फिलिपिनो स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी मतदान; ९०% जास्त मते मिळून स्त्रियांना मताधिकार मिळाला.
१९४५ : डाखाऊ छळछावणी मुक्त; जर्मनीची दुसऱ्या महायुद्धात बिनशर्त शरणागती, युद्ध सुरूच.
१९४६ : जपानी सम्राट तोजो आणि २८ इतर जपानी नेत्यांवर युद्धगुन्ह्यांबद्दल खटला सुरू.
१९५३ : जगातल्या प्रथम 3-D दूरचित्रवाणीचा कॅलिफोर्नियात प्रयोग.
१९६१ : लुशियानो पाव्हारोत्तीच्या ऑपेरा कारकीर्दीला सुरुवात.
१९६८ : 'हेअर' संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग.
१९८२ : चीनच्या लोकसंख्येने १०० कोटींचा आकडा गाठला.
१९९१ : बांगलादेशात भीषण चक्रीवादळ; १,३८,००० मृत.
१९९२ : लॉस अँजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
१९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
१९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- अबापट
प्रतिक्रिया
कारण हा स्वातंत्र्याचा समतेचा
मला सोईस्कर वाटणारी गोष्ट वापरायला मिळणे हे स्वातंत्र्य आहे.
तसेच हा स्वातंत्र्याचा सोस फक्त ओएस वगैरे गोष्टीं मधेच का? सर्व तंत्रज्ञानाची / औषधांची पेटंट ही गुलामगीरीच नाही का तुमच्या लॉजिक ने. आता स्वताची कार किंवा औषध मुक्त स्त्रोत नसेल तर अस्मिता दुखवली जाते का? ( कदाचित असली फॅडं फक्त अश्या गोष्टीतच जमतात ).
हे एक नविन प्रकारचे फियर माँगरींग आहे. असले काही होत नसते, इतकी काळजी करु नका. १०० वर्षापर्यंत खुटखुटीत जगायचे असेल तर निरर्थक गोष्टींकडे लक्ष देऊ नका असे गविं नी आत्ताच सांगितले आहे. आणि गवि सांगतात ते बरोबरच असते.
आणि गवि सांगतात ते बरोबरच
"भडकाऊ" अशी श्रेणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एकदोघांनीही द्या रे.
ये जरुर उन नवी बाजुअोंका काम
ये जरुर उन नवी बाजुअोंका काम होंगा. उपरवाल्या अनुरावोंको भडकाऊ श्रेणी देनेको विनंती किया तो खुद्द हमारेंही विनंतीवजा प्रतिसादको भडकाऊ श्रेणी देके मोकले.
...
आदरार्थी बहुवचन काय?
इदं मात्र न मम|
बोले तो, तुमच्या विनंतीस मान देऊन 'उपरवाल्या अनुरावोंक्या' प्रतिसादास मी भडकाऊ दिली, हे खरे आहे. परंतु तुमच्या प्रतिसादास मी भडकाऊ दिली नसल्याकारणाने ते श्रेय मी लाटू इच्छीत नाही. (उगाच खोटे का बोलू?)
अवांतर, तुमच्या स्वाक्षरीबद्दल:
हे१ 'अकेले अकेले कहॉं जा रहे हो'च्या चालीवर गाता येते, ही बातमी आतापावेतो बहुधा शिळी झाली असावी. परंतु कधी हे१अ 'ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है'२ किंवा 'जिन्हें नाज़ है हिंद पर, वो कहॉं है' यांच्या चालींवर गाऊन पाहिले आहेत काय?
..........
१, १अ किंवा समग्र मनाचे श्लोक.
२ विशेषत: त्यातील ते 'जला दो इसे, फूक डालो ये दुनिया'वाले कडवे.
(No subject)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
.
.
इथला क्राऊड कसा आहे त्याबद्दल
अहो काळजी करु नका. तुम्ही माझ्या वरुन इथल्या क्राऊड च्या बद्दल मत बनवू नका.
माझ्या मतांशी पटणारे इथे फारच थोडे आहेत. चुकुन कोणाला कधी माझे मत पटले तर ते इतकी रेअरेस्ट ऑफ रेअर गोष्ट असते की तसे ती व्यक्ती मुद्दाम मेंशन करते.
लिनक्सबद्दल थोडा धाक आहे.
लिनक्सबद्दल थोडा धाक आहे. ऑफिसमध्ये युनिक्सवर काम करुनही घरच्या पीसीवर विंडोजच आहे. आळशीपणा आणि उबंटू वैगेरे सगळं फार टेक्नोक्रॅट्सचं काम आहे असं वाटत असल्यानं विंडोजला नावं ठेवतही त्यावर विसंबून होते. आता परत लिनक्स वापरून बघावं असं वाटत आहे.
इथे चर्चेत लिनक्सबद्द्ल सविस्तर,माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत, माझ्यासारखेच "वापरुन बघूया" असे प्रतिसाद आहेत ते न बघता चार दोन प्रामाणिक शंका विचारणार्^यांवर का चिडताय? तुमचा उद्देश लिनक्सबद्द्ल जागृती करावी असा आहे ना? मग त्यांच्या शंकांना प्रामाणिक उत्तरे द्या, त्या खवचट वाटत असतील तर दुर्लक्ष करा उगाच सरसकट सगळ्यांविरुद्ध त्रागा का करताय? त्यामुळे तुम्ही मांडलेल्या विषयापासून तुम्हीच दूर नाही का जात?
+१
+१. एकंदरीत अभिनव येउन तलवार फिरवून जातो नी नंतर अदिति येउन जखमींची विचारपूस करून, मलमपट्टी करून जाते - "हे औषध कुठल्याही केमिस्टकडे मिळेल ते घ्या हवंतर चार दिवस" वगैरे
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
.
.
आलं म्हणून बोलले.
बोलावं का न बोलावं याचा बराच विचार केला. आता (शिंक येते तसं बोलणं) आलं म्हणून बोलते.
समजा कोणी त्रास देण्याच्या हेतूने बोलतही असेल, तर त्यांच्या आवाजावर आणखी टिपेचा आवाज चढवून काय साध्य होणार? ऋषिकेश आणि तुमची जी बोलाचाली झाली त्यावरून "लिनक्स वापरायला कठीण असतंच, वर मदत मिळणंही कठीणच दिसतंय" असं त्यातून दिसायला लागतं. तुम्हाला लिनक्स विकायचंय, लिनक्समागचं तत्त्वज्ञान विकायचंय तर गोडबोलेपणा करावा लागणार. त्या बाबतीत गुजराथी दुकानदार किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आदर्श बाळगायला काय हरकत आहे?
किंवा चिलॅक्स! आपल्याला त्रास देणं वगळता इतरांना बरीच जास्त कामं असू शकतात.
(काय दिवस आल्येत! मी असं काही लिहित्ये! हेच का ते म्हातारपण?)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काय दिवस आल्येत! मी असं काही
नको गं असं म्हणूस. तू म्हातारी तर माझं काय? एक पाय स्मशानात?
अगदी म्हातारपण नाही...
... पण 'मावशी'पण नक्की म्हणजे बघा, जिच्याबद्दल एकदा गविने "...अवांतर पुरे अन्यथा ती येईल..." असं लिहिलं होतं, म्हणजे हॅरी पॉटरमधे कसा नुसता नाव न घेता 'तो', 'त्याचा' असे उल्लेख असतात ना? तसं, त्या 'ती'ने हे लिहावं म्हंणजे 'मावशीपणा' नाहितर दुसरं काय म्हणणार मग?? !! असो. फार बोलत नाही कारण मला अजून उबंटू बसवायचंय
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
.
.
लेख
अभिनव साहेब, हा तर एक मोठ्ठा दोष आहे ना. वैयक्तीक फायदा नसेल तर एकुणच उत्पादन आणि सेवेच्या दर्जा बद्दत शंका निर्माण होते.
जागृती वगैरे उगाचच मोठे शब्द आहेत. मला वाटते इथे सर्वांना बेसिक माहीती असतीलच.
एखाद्या हजार रुपयात लॅपटॉप बरोबर विंडो येतच असेल तर मी तरी उगाचचा व्याप स्वताला लाऊन घेणार नाही.
बाकी तुमचा तांत्रीक ऑर्गॅझम चालू राहु दे.
.
.
कोणी स्वताहुन आवडीने व्हिस्की
कोणी स्वताहुन आवडीने व्हिस्की पित असेल तर त्याला "व्हिस्कीचे तोटे आणि रम कशी चांगली आहे" हे का सांगावे?
खरे तर इथे इतकाही फरक नाहीये, ब्लु लेबल पेक्षा मी पितो ती डबल ब्लॅक कशी चांगली आहे हे पटवण्याचा उगाचच प्रयत्न चालू आहे.
लोक आपापले चॉईस फार विचारपूर्वक करतात हो. मूर्ख नसतात ते. अशी माहीती नाही वाचली तरी आजुबाजुने डोक्यात माहीती शिरत असतेच. विंडो वापरणार्याला दुसरे काही बरे वाटले तर तो ते वापरेल.
आणि त्याही पेक्षा बर्याच लोकांना कोणती ओएस वापरतो आहोत हा प्रश्न फारच ट्रीव्हिअल वाटत असेल.
विंडोज वापरणारे आमच्या सारखे अँड्राइड फोन नाही का वापरत? आमचा काही विंडो वापरणार्यांचा कल्ट नाहीये.
आम्ही मुक्त स्त्रोत वापरत नसलो तरी मुक्त आहोत.
.
.
ऐसीची नाईटिंगेल
अदितीला 'जागतिक वीलौयू फेडरेशन'कडून ऐसीची नाईटिंगेल पुरस्कार देण्यात येत आहे.
.
.
आधीच्या प्रतिसादांमध्ये
आधीच्या प्रतिसादांमध्ये लिनक्स इनस्टॉल करण्याचं सोपं गाईड दिलेलं होतं, त्यात एक मुख्य भर -
कंप्यूटरवर कोणतीही नवीन ओएस चढवण्याआधी सगळ्या डेटाचा बॅकप घेऊन ठेवा. विशेषतः फोटो, व्हिडीओ यांसारख्या व्यक्तिगत गोष्टींची. पैसे देऊनही या स्मृती पुन्हा मिळत नाहीत.
अशी फुकटची फॅडं डिजिटल तंत्रज्ञानात असणं सोपं आणि सहज शक्य असतं. टोरंटवरून शिणेमे डाऊनलोड करता येतात, अनधिकृत प्रती का असेनात. तशी जीएम पिकांची वाणं किंवा कृत्रिम धाग्यांची बनवलेली कापडं डाऊनलोड करता येत नाहीत.
आबा, लिनक्सवरून काही गोष्टी विंडोजमध्येही गेल्या आहेत; अशा गप्पा मी मित्रांकडून ऐकते. त्यातले तपशील अर्थातच 'संस्कृत' असतात, म्हणून सोडून देते. पण मुद्दा असा की सॉफ्टवेर विकणारे लोकही लिनक्ससाठी पाठबळ पुरवतात. (रॉकफेलर तेल विकून सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्त्या पुरवतात तसंही काही.)
अंतराआनंद, लिनक्सचा धाकबिक बाळगायची गरज नाही. थोडं चुकलं-माकलं तर तपासून बघून दुरुस्त करू, असं म्हणता येत असेल तर अजिबातच नाही.
नवीन भाषा शिकताना माझं असं होतं. शब्द चुकला, व्याकरण चुकलं तर काय अशी भीती वाटत राहते. मराठी, इंग्लिश बोलताना, लिहिताना असं वाटत नाही. चुका होतच नाहीत असंही नाही, पण आत्मविश्वास असतो. सवयीची गोष्ट वापरतानाही तसाच आत्मविश्वास आलेला असतो. तसा विश्वास वाटण्यासाठी मी बरेचदा लोकांना म्हणते, "फारतर काय, लिनक्स पुन्हा इनस्टॉल करावं लागेल. थोडा वेळ जाईल. जगबुडी वगैरे येणार नाहीये." याचा फायदा झाला तर पहा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
पण आंतरजाल आहे म्हणून जशी
जर क्रांतीचे पितृत्व जाला ला देत असात तर त्या क्रांती नंतर इजिप्त ची जी पूर्वी पेक्षा वाईट स्थिती झाली त्याची जबाबदारी पण जालावर ढकलणार का?
आणि सध्या इजिप्त मधे नॉर्मल्सी आणण्यासाठी जालकरी काय करतायत?
.
.
समहाऊ लिनक्स वापरणारे लोक
समहाऊ लिनक्स वापरणारे लोक शिष्ठं असतात असं वाटायचं. बरोबर आहे बहुधा ते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
चालेल. ३_१४ शिष्ठ अदिती असं
चालेल.
३_१४ शिष्ठ अदिती
असं चालेल.
चालेल नव्हे, धावेल.
मला चालेल नव्हे, धावेल. प्रशंसा आवडणार नाही असं होईल का!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
लाइनक्सवाल्यांनी ते
लाइनक्सवाल्यांनी ते पेन्ग्विनचे चित्र का ठेवलं आहे? बागेतल्या कचरापेटींनाही तसाच आकार दिला आहे. हा पक्षी उडू शकत नाही. बदक हवे. हवा,जमिन,पाणी तिन्हीकडे संचार करते. किंवा काळा कारमोरंट.
पाने