एक हवाई उद्घाटन (धागा प्रतिसादासाठी खुला केला आहे)

एका शुभमुहूर्तावर एका पुलाचं उद्घाटन होणार असतं. मंत्रीमहोदयांचं हेलिकॉप्टर पुलावर मुहूर्ताच्या ठीक पंचवीस मिनिटं आधी लॅंड होणार. लोकल नेत्यांची बत्तिशी तपासून व त्यांना आपली बत्तिशी दाखवून झाली की मंत्रीसाहेब तात्पुरत्या उभारलेल्या पोडियमवर भाषण करणार. भाषणाचा मसूदा तीन तीन वेळा त्यांनी घोकलेला आहे. राष्ट्रीय एकात्मता, ग्लोबलायझेशन, भारत आणि इंडियाला जोडण्याची स्वप्नं वगैरे ठरलेली वाक्यं बोलून झाली की भाषणाचा मुख्य भाग सत्ताधारी पार्टीने हा पूल निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न केले आणि विरोधकांनी कसा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तरीही हा पूल झालाच, हे सांगण्यात जाणार होता. दोनतीन आयत्या वेळी केल्यासारखे वाटणारे विनोदही ठरले होते. कोण फोटो काढणार, ते कुठे कुठे प्रसिद्ध होणार याचं सगळं सेटिंग झालेलं.

प्रत्यक्ष हेलिकॉप्टर घिरट्या घालायला लागतं. खाली बघतात तो काय, पुलावर ९० स्पीड लिमिट असताना १२० च्या स्पीडने ट्राफिक चालू.

मंत्रीजी चक्रावतात. खाली सिक्युरिटीला कॉल लावतात.
'हे काय चाललंय?'
'साहेब... कसं सांगू... ट्राफिक चालू झाला साहेब.'
'ते दिसतंच आहे. पण कोणी चालू केला.'
'लोकांनीच केला साहेब.'
'लोकांनीच?'
'होय साहेब.'
'त्यांना कळलंच कसं?'
'आता साहेब एवढा मोठा पूल होतोय, लोकांपासून कसं लपून रहाणार. तुम्हीच घोषणा केलीत ना पूल होतोय, पूल होतोय म्हणून...'
'हो, पण त्यांना नुसतं पूल बघायला सांगितलं होतं. कुठे रंग वगैरे लावायचा राहिला तर सांगायला...'
'पण लोकांनी गाड्याच घातल्या सरळ. काय करणार?'

मंत्री महोदय अजूनच चक्रावलेले

'बरं मग ते रिबिनीचं काय?'
'कुठची रिबिन साहेब?'
'तीच, उद्घाटनाची, कापायची रिबिन...'
'साहेब ती लावायला पण झेपली नाही. इतका ट्राफिक... तो कंट्रोल करतानाच नाकी नऊ आले. काल रात्री रिबिन लावून ठेवली होती. पण आज ती कुठाय कोण जाणे.'
'मग उद्घाटन कसं करणार? मी कातरी घेऊन आलो आहे. '
'तुमची कातरी ठेवा तुमच्याकडेच साहेब. इथे फार वापरावी लागेल असं वाटत नाही. '
'मग काय करू?'
'साहेब, मी काय म्हणतो, नुसतंच तुमच्या हेलिकॉप्टरच्या मायक्रोफोनमधून सूचना द्या. उद्घाटन पार पडलं म्हणून. आणि द्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा...'

मंत्रीमहोदय चक्रावलेले. फोटो अपॉर्च्युनिटी गेली म्हणून. पण त्यांनी युक्ती लढवली. त्यांच्याबरोबरच्या कॅमेरामनला खालचं व्हिडियो शूटिंग करायला लावलं. मग कॅमेरासमोरच एक पट्टी धरली, ती कापली. आणि सोबतच्या रिपोर्टर्सना म्हणाले
'हवाई उद्घाटन करणारा मीच पहिला हे तुमच्या सगळ्यांच्या रिपोर्टात आलं पायजे'

तर सांगायचा मुद्दा काय, की दिवाळीच्या शुभमुहुर्तावर ऐसी अक्षरे डॉट कॉम चं अधिकृतरीत्या हवाई उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ribbon cutting
कापाकापीच करा तुम्ही!

आता सुरू केलीच आहेत वेबसाईट तर येते मी पण तिथे. Wink

फोटो जालावरून साभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला विशेष आनंद होतो की, उद्धाटनापूर्वीच पुलावर गाडी घालण्यासाठी उत्सुक असलेल्या पहिल्या रांगेत जे दोघेतिघे होते त्यात मीही होतो. मंत्री येवोत वा ना, पण त्या पूलावरून प्रवास करताना निखळ आनंद होणार हे त्याचवेळी जाणवले.

मात्र हेही सांगणे अगत्याचे वाटते की, पूल देखणा असला तरी नवा असल्याने वाहतुक सजगपणे करण्याची अंतिम जबाबदारी 'मंत्रीमहोदय व त्यांचे सहयोगी' यांची नसून ड्रायव्हिंग करण्यार्‍यांची आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जास्तीतजास्त चांगले चालक बनण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवीन पुलाच्या बांधकामात कोणताही भ्रश्टाचार नसल्याने पूल बरीच वर्षे टिकेल अशी १००% खात्री वाटते
माझ्याकडून ड्रायविँग व्यवस्थित होईल ही हमी देते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मी पण आले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आली महामाया.. एक संस्थळ मोकळं ठेवलं नाहिये..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेका तुझं नाव अर्धवट आहे पण तू बोलतोस पूर्ण हां! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मी पण आलेय....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचीच भीत्री

या या या. सगळ्यांनीच मिळून इकडेपण कंपुबाजी करुया आणी सर्वांच्या डोक्याला वात आणूया.
काय बोलता?
(दुर्बिणीतून दुर्बिणीचेच निरि़क्षण करणारा) कॉस्मोलॉजिकल टार्‍या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

नवीन संस्थाळाच्या चालक/मालक यांचे हार्दिक अभिनंदन
बाकी चालू दे..
केशवसुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदघाटन झाल्याची सांगण्याची पद्धत आणि त्याला भरभरून प्रतिसाद देणारी सगळी जुनीच मित्र-मंडळी दिसताहेत. तुमचं लिखाण, मतं वाचल्यावर मी असा अगंतुक असल्यासारखा वाटत आहे. मी बापडा खेड्यातला. बाबानों, घ्या रे, मला सांभाळून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या हो तुम्हीपण. खेड्यातले असाल नाहीतर शहरातले, संस्थळावरचे आहात म्हणजे विषय संपला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटतं रिबिन कापून झालीच आहे,
दीपप्रज्वलन देखिल करायला हवं..
Shubheccha!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'ऐसी अक्षरे'ला माझ्या देखील शुभेच्छा... येथील मित्रांशी काही गोष्टी बोलायच्या आहेत... अक्षर माध्यम एक अतिशय प्रबल माध्यम आहे ह्याची जाणीव असून सुद्धा ध्वनी ह्या माध्यमाशीच माझी स्वाभाविक मैत्री झाली... वाचन लेखनाची फारशी गोडी नाही (परंतु ती लागावी असे जरूर वाटते.. ) त्यातून मराठी, ही माझी मातृभाषाही नाही.. मग ह्या संस्थळावर मी का आले? तर मला वाटते.. इथे अक्षर माध्यमाची ताकद आणि गांभीर्य ओळखलेली जाणकार मंडळी वावरतात.. त्यांच्या मदतीने मी मराठी व अन्य भाषान मध्ये काही चांगले वाचन करू शकेन.. काही (बाळबोध) प्रश्न विचारू शकेन.. त्याच बरोबर संगीकला क्षेत्रात मला येत असलेले बरेवाईट अनुभव देखील नमूद करू शकेन.. इथे उपस्थित असलेल्या कलावंत विचारवंत सदस्यांच्या सहवासात मी कदाचित अधिक संवेदनशील कलाकार आणि माणूस होईन अशी स्वार्थी सदिच्छा घेऊन मी आलेय.. त्यातून.. आगे आगे गोरख जागे.. !!! - दिलतितली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

तुमच्या प्रतिसादातून समृद्ध अपेक्षा दिसल्यामुळे पुन्हा एकदा जबाबदारीची जाणीवही झाली आहे.

"ऐसी अक्षरे" हे अक्षरांपुरतंच, लिखित कला, साहित्याइतपत मर्यादित राहू नये अशी इच्छा आहे. तेव्हा कलाकारांसाठी काही विशेष तांत्रिक सोयी, गोष्टी करायच्या असल्यास तुमच्याकडून इन्पुट्स घेऊन आम्ही गृहपाठही करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीअक्षरेला शुभेच्छा!
या संस्थळावर वेगळं काही घडावं अशी इच्छा असली तरी अपेक्षा अशी नाही.
प्रतिक्रियाश्रेणी देण्याची कल्पना चांगली वाटली. हीच कल्पना पुढे लेखांना वापरता आली तर चांगलेच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचे चालक मालक संपादक कोण कोण आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रश्नाचे उत्तर प्रशासन देणार का?
सर्व ईंग्रजी संकेतस्थळांवर मालक कोण, तसेच गटातील इतर सभासद ई. ची सर्व माहिती दिलेली असते.
तसे मराठी संकतस्थळावर का नसते? हे पारदर्शकतेच्या व व्यावसायीकरित्या काम करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर 'संस्थळाची माहिती' असा टॅब आहे. तिथे गेल्यास "ऐसी अक्षरे संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी" असा धागा दिसेल. तिथे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0