"ऐसी अक्षरे" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी

नमस्कार. "ऐसी अक्षरे" या संस्थळावर आपले सगळ्यांचे स्वागत आहे.
प्रस्तुत धागा या संस्थळावर मॉडरेशनची जबाबदारी स्वीकारलेल्या आयडीज् यांच्या संदर्भात घोषणा करण्याकरता काढलेला आहे. मॉडरेटर्स ची यादी येणे प्रमाणे :

चिंतातुर जंतू
३_१४ विक्षिप्त अदिती
मुक्तसुनीत
राजेश घासकडवी
बिपिन कार्यकर्ते

मॉडरेशनबद्दलची प्रस्तुत संस्थळाची धोरणं आदिंबद्दल एक वेगळी घोषणा करण्यात येईल.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

आम्हाला कळवायला आनंद होतो की, "ऐसी अक्षरे" वरील सभासद श्री. ऋषिकेश यांनी "ऐसी अक्षरे" वरील संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ऋषिकेश या संकेतस्थळाच्या स्थापनेपासून सभासद आहेत. अनेकविध विषयांतली त्यांची गती, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि एकंदर अनुभव या त्यांच्या गुणांमुळे "ऐसी अक्षरे"ला त्यांचा अभिमान वाटतो. प्रस्तुत संस्थळाबद्दलची त्यांची आत्मीयता, विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार या सार्‍या गोष्टींमुळे ते या पदाला सर्वार्थाने भूषण ठरतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

काही वैयक्तिक कारणामुळे मला यापुढे संपादन व व्यवस्थापनाची जबाबदारी पेलणं शक्य नाही. तेव्हा मी व्यवस्थापक/संपादक हे पद मी आजपासून सोडले आहे.
हे पद मी आजपासून सोडल्याचे इतर व्यवस्थापकांना आधीच कळवले आहे. आजपासून येथील कोणत्याही धोरणात्मक निर्णयात, व्यवस्थापकीय निर्णयात, अंकांच्या कामात/प्रकाशनात तसेच इतर कोणत्याही प्रकाशनात माझा सहभाग व जबाबदारी नसेल. माझे संपादकीय अधिकारही मी सरेंडर केले आहेत. अर्थात, एक सामान्य सदस्य म्हणून माझा येथील वावर कायम असेल.

मला 'ऐसी अक्षरे'ने व्यवस्थापक म्हणून अनुभव घ्यायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आजवरच्या या काळात मी व्यवस्थापन करताना अनेक गोष्टी शिकलो, त्याचा आनंद घेतला आणि सदस्यांचे तसेच व्यवस्थापनाचे खूप सहकार्य लाभले. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. या दरम्यान व्यवस्थापकीय अधिकारात काही गोष्टी केल्याने कोणाची मने दुखावली असतील तर त्याबद्दल दिलगीर आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!