Skip to main content

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - २

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.

या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.

---

पुण्यात फ्रेंच शिकवणारी 'आलिऑन्स फ्रॉन्सेज' ही संस्था अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. फ्रेंच सिनेमे दाखवणारा त्यांचा 'सिने-क्लब' उपक्रम ह्या वर्षी जोमानं सुरू झाला आहे. मार्च महिन्यातल्या सिनेमांचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर इथे पाहायला मिळेल. काही सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शकांचे सिनेमे त्यात पाहायला मिळतील. सर्व खेळ फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असतील. सोमवार आणि गुरुवार ६:३० अशी वेळ आहे. प्रवेशमूल्य नाही.

चिमणराव Sat, 10/09/2016 - 21:49

काहीवेळा स्क्रीनशॅाट कमी पिक्सेलसचे येतात ना म्हणून.अभ्या..चं इकडे लक्ष गेलं नसेल कारण सुशिलकुमार शिंदे यांच्या सत्काराला सोलापुरात बडी मंडळी येणार होती.