आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ३
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
पुण्यात फ्रेंच शिकवणारी 'आलिऑन्स फ्रॉन्सेज' ही संस्था अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. फ्रेंच अॅनिमेशन सिनेमांचा एक महोत्सव त्यांनी आयोजित केला आहे. तो उद्यापासून सुरू होतो आहे. सिनेमांचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर इथे पाहायला मिळेल. प्रवेशमूल्य नाही.
रात्री ९.३०,पुणे
रात्री ९.३०,पुणे -अशक्य.
संकलन: चिन्मय दामले -मायबोलीवरच्या अन्नं वै प्राणा: चे लेखक चिनुक्स.त्यामुळे संधी सोडता कामा नये.
//जाहिरातीतलं चित्र: लज्जागौरी शिल्प, बदामिच्या वस्तुसंग्रहालयात आहे.तिथे कोणी जात नाही. तलावाच्या दुसय्रा कडेच्या बदामि गुंफांकडे मात्र अतोनात गर्दी असते.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१७
यंदाचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (पिफ) १२ ते १९ जानेवारीदरम्यान होणार आहे. ऑनलाईन सदस्यनोंदणी महोत्सवाच्या संकेतस्थळावर चालू झाली आहे. २९ तारखेपासून सिटीप्राईड (कोथरूड आणि सातारा रस्ता), मंगला आणि आयनॉक्स (बंडगार्डन) इथेही नोंदणी करता येईल (सकाळी ११ ते सायंकाळी ६.३०).
विद्यार्थी आणि फिल्म क्लब सदस्य तसंच ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांच्यासाठी नोंदणीशुल्क - ६००. इतरांसाठी नोंदणीशुल्क - ८००. रोख रकमेबरोबरच क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.
अधिक माहिती मायबोलीवर आहे.
हो, अगदी हाच (माझाही )अनुभव,
हो, अगदी हाच (माझाही )अनुभव, असं ऐनवेळी दिल्यामुळे सुट्ट्यांचं निट नियोजन करताच येत नाही. शिवाय बरेचदा कॅटलॉग मिळेपर्यंत काही चांगले सिनेमे होऊन गेलेले असतात. २०१४ ला र्हायनो सिझन असाच निसटला हातातून, नंतर समजलं आयनॉक्सला शेवटचा शो म्हणून धावत पळत गेलो तर ऐनवेळी तिथे वेगळाच सिनेमा दाखवला (लव्ह-स्टीक्स), म्हणे प्रिंट पोहचलिच नाही. व्यवस्थापनाचा सावळा-गोंधळ.
यंदा नागपुरातही ओसीआयएफएफ
यंदा नागपुरातही ओसीआयएफएफ नावाने फेस्टीव्हल होतोय.
30 सिनेमे दाखवणार आहे म्हणे. बघूया.
ओसीआयएफएफ फिफ नंतर आहे त्यामुळे पिफला जाणार्या ऐसीकरांना विनंती आहे की त्यातले चांगले सिन्मे कोणते याची इथे नोंद करावी म्हणजे ते नागपूरात आले तर आम्हाला चूझ करणे सोपे जाईल व मनस्ताप टाळता येईल.
पुण्याबाहेर
पुण्याबाहेर चार शहरांत निवडक फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत. त्याच्या तारखा मायबोलीवरून -
पुण्याबाहेरच्या महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे -
१. मुंबई - यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २० जानेवारी ते २६ जानेवारी, २०१७
२. नागपूर - ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २७ जानेवारी ते २९ जानेवारी, २०१७
३. औरंगाबाद - ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०१७
४. सोलापूर - १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, २०१७
नागपुरात ऐसीकरांशी भेट
>> यंदा नागपुरातही ओसीआयएफएफ नावाने फेस्टीव्हल होतोय.
30 सिनेमे दाखवणार आहे म्हणे. बघूया.
वाघमारे यांची महोत्सवादरम्यान भेट झाली. ऐसीसदस्य उसंत सखूदेखील उपस्थित होत्या. वेळेअभावी कट्टा, गप्पा, चर्चा वगैरे शक्य झालं नाही. वाघमारे आणि सखूबाईंनी महोत्सवाविषयीचा अभिप्राय ऐसीवर जरूर कळवावा.
उद्घाटनाचा कार्यक्रम
उद्घाटनाचा कार्यक्रम अजिबात चुकवू नका. स्पेनहून आलेल्या कलाकारांचं फ्लॅमेंको नृत्य आणि त्यानंतर Thank You for Bombing हा चित्रपट आहे. युद्धसदृश परिस्थितीत काम करणाऱ्या तीन वार्ताहरांच्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत.
कट्टा २०१७ !!!!!आचरट राव आणि
कट्टा २०१७ !!!!!
आचरट राव आणि मनोबा यांच्या सजेशन नि मळवली इथे पुणे ठाणे मुंबई एकत्र कट्टा होईल असे दिसत आहे ... जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ... एखाद्या रविवारी .....
गेल्या कट्ट्याचे यशस्वी कलाकार सर्वश्री : चिंतातुर जंतू , मनोबा , ढेरे शास्त्री , घनु, ऋषिकेश , आबा, गंबा , ढेरेशास्त्री याना आग्रहाचे निमंत्रण !!!
खास आकर्षण : सोलापूरचे अभ्या शेठ आणि ठाण्याचे अच्च्यु काका
गुप्त बातमी : कट्ट्याकरिता विलायतेहून आदूबाळ येणार ... बहुतेक .....
अमेरिकेहून अदिती आणि राजेश गुर्जी आणि तिसरे गुप्त जे कोण असतील ती मालक चालक मंडळी या वेळी येण्याचे मनावर घेतील काय ? ( बघा तरी तुमच्या राज्यात काय काय गॉसिप चालतं ते )
बॅटमॅन ... गेल्या वेळ सारखी कारणे न काढता येणे ( मनोबा येणार आहे , अभ्या येणार आहे , आम्हाला बॅटमॅन मनोबा चर्चेचे रोचक ग्राफिक चित्र मिळेल अशी आशा )
अच्चू काका नि थत्ते ना निरोप पाठवला आहे ...
इतर सर्वे ... येणे करावे .... धाग्यांवरची भांडणे समोरासमोर करण्याची सुवर्णसंधी सोडू नये !!!!
आपापल्या सोयीच्या तारखा कळवा हो पब्लिक !!!!
(संपादक : प्रतिसाद योग्य धाग्यावर हलवला आहे.)
कट्टा २०१७ अपडेट
कट्टा २०१७ अपडेट :
२२ जानेवारी , MTDC कार्ला
नक्की येणार :
आचरट , मन , अरुण जोशी , अभ्या , बापट , अभिजित अष्टेकर , नील लोमस ( आणि ते मिपाकर वल्ली प्रचेतस ?)
थोड्यावेळ तरी येऊन जाणार : राहुल बनसोडे ...
बहुतेक येणार :
बॅटमॅन , ऋषिकेश , ढेरेशास्त्री ( जरा वरच्या रो मध्ये व्हा आता , या नक्की )
प्रयत्न करू असा आशीर्वाद :
चिंतातुर जंतू ( या हो जंतू , तुमचा पिफ मध्ये येत नाहीये याच्या )
इच्छा आहे पण येऊ शकत नाही :
आदूबाळ , अतिशहाणे, अदिती .
कोणाची नावे अनवधानाननी राहिली असतील तर त्यांनी कृपया कळवणे.
व्हीजुवलायजिंग अँड लूकिंग फॉरवर्ड टू ... चर्चासत्र :
१. अरुण जोशी आणि बॅटमॅन
२. अभ्या/ऋषिकेश आणि मनोबा
( रिलक्टंट मॉडेरेटर : हू एल्स , कपाळावर आश्चर्य भाव घेऊन जंतू )
३. प्रतिगामी पुरोगामी वाद : अरुण जोशी आणि बॅटमॅन ( चक्क एका पार्टीत ) विरुध्ध बापट आणि जंतू
मॉडेरेटर : कधी या तर कधी त्या पार्टीत असलेला न्यूट्रल अंपायर : ऋषिकेश !!!!
PPT प्रेसेंटेशन बाय स्टार अट्रॅक्शन : अभ्या शेठ सोलापूरकर
दिलखुष जगिरा , चैनगेट वरील रोचक कहाण्या , ( अभ्या , मी पत्रिकांचा विषय लिहिला नाहीये , पण कोणीतरी तो काढेलच )व इतर ( बार वगैरे फिकट प्रिंट मध्ये छापा )
तत्वज्ञानी सत्संग : आचरट बाबा ,राहुल बनसोडे आणि निल लोमस
( खाजगीत चर्चासत्र , तुमचं का माझं कर्वेनगर खरं ? अभिजित अष्टेकर आणि मनोबा . )
असं झालं तर काय मजा येईल राव ?
वरील मेन्यू न आवडल्यास मी जबाबदार नाही . हवा तसा बदलू शकता .
सर्वाना आमंत्रण !!!
अहो स्वप्नील घनोबा , काही उत्तर नाही तुमच्याकडून , आम्हाला भेटायला नाही तर निदान MTDC च्या फूड मेन्यू च उदरभरण लिहायला तरी या !!! (बुक्की पासून सेफ डिस्टन्स राहायला पाहिजे मला )
'अक्षर नंदन'कडून आलेले
'अक्षर नंदन'कडून आलेले आवाहन:
–-------------
'वाहतूक ते पर्यावरण' हे सर्व मुद्दे उपस्थित करत
'अक्षर नंदनची' मुलं, शिक्षक व पालक
उद्या 8 ते 10:30 ह्या वेळात,
अक्षर नंदन ते अक्षर नंदन,
प्रभातफेरी व सायकल रॅली काढत आहेत.
आपण सर्वच सतत ह्या मुद्यांना काही नं काही प्रकारे तोंड देत असतो आणि त्यासाठी आपापल्या परीने पर्यायी जीवनशालीही निवडत असतो.
आपल्यासारखे सर्व समविचारी लोक एकत्र आले तर पर्यायांची ताकद वाढेल आणि सकारात्मक भविष्याची वाटचाल सोपी होईल.
उद्याच्या प्रभातफेरीत जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी होवूया आणि पर्यायी विचार आपल्या आचरणातून पसरवूया.
अक्षर नंदनची मुलं, शिक्षक, पालक.
लॅटिन अमेरिकन सिनेमाचा आढावा
मुंबईत भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे चित्रपट व्याख्यानमाला
मार्च १० - मार्च १४
विषय : लॅटिन अमेरिकन सिनेमाचा आढावा
१९५०पासून ब्राझिल, क्युबा आणि अर्जेंटिना येथे पसरलेल्या चित्रपट चळवळीवर आधारित ५ दिवसीय व्याख्यानमाला. कोलंबिया विद्यापीठातील चित्रपट अभ्यास विभागातील प्राध्यापक आणि न्यू यॉर्क फिल्म फेस्टिवलचे संचालक रिचर्ड पेना ही व्याख्याने सादर करतील.
मर्यादित आसनव्यवस्था. नोंदणीसाठी इमेल : education@bdlmuseum.org
अधिक माहितीसाठी
विनोद दोशी नाट्य महोत्सव
कालपासून पुण्यात 'विनोद दोशी नाट्य महोत्सव' सुरू झाला आहे. महोत्सवाविषयीची 'लोकसत्ता'त आलेली बातमी
शिंचा कोण ते ओळखा पाहू
>> सुरऊ झाल्यावर काय बातम्या देतात शिंचे! तेही फक्त पेपरात वगैरे.
म्हणजे यंदाही मिस होणार हा महोत्सव! Sadया इंटरनेट निरक्षर कलावंतांचा वीट आलाय अगदी!
??? वरची बातमी २३ फेब्रुवारीची आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'मध्येही २२/२३ला बातमी होती. शिंचा असलो तर मी आहे, कारण मी ती आज इथे दिली. शिवाय, महोत्सवाचं फेसबुक पान काही वर्षांपासून आहे. गेले काही दिवस त्यावर सातत्यानं पोस्ट्स येत आहेत.
रजत कपूरसोबत ऑंखो देखी
रजत कपूरसोबत ऑंखो देखी चित्रपटाचा खेळ आणि नंतर चर्चा
वेळ : उद्या २१ मार्च संध्याकाळी ६:३०
स्थळ : सी. व्ही. रमण सभागृह आयसर पुणे
कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे.
अधिक माहिती :
Ankhon Dekhi (English translation: Through My Own Eyes) is a 2013 Indian Hindi drama film written and directed by Rajat Kapoor. It stars Sanjay Mishra and Rajat Kapoor in lead roles. It was the opening film at the 8th annual Mosaic International South Asian Film Festival (MISAFF) 2014 in Toronto. It is Rajat Kapoor's fifth feature film and was dedicated to his idols and teachers: filmmakers Mani Kaul and Kumar Shahani. At the 2015 Screen Awards ceremony, Ankhon Dekhi won the awards for Best Supporting Actress for Seema Pahwa, Best Story and Best Ensemble Cast.
Aankhon Dekhi opened to immense critical appreciation. Most critics praised all the performances and the deeply rich philosophical undertones of the script. Rajeev Masand of CNN-IBN gave the film 3.5/5 stars stating, "Through the wonderfully whimsical Ankhon Dekhi, writer-director Rajat Kapoor shows us how the journey could be more meaningful if we lived life the way we choose to.”
Review by The Hindu : Ankhon Dekhi: Story with a vision
Won – Filmfare Award for Best Film (Critics) 2014
Won- Filmfare Award for Best Actor (Critics) 2014 – Sanjay Mishra
Won- Filmfare Award for Best Story 2014 – Rajat Kapoor
Won – Star Screen Award for Best Story – Rajat Kapoor
Won – Star Screen Award for Best Supporting Actress – Seema Pahwa [Shared with Tabu who won it for Haider]
शंकर पळशीकर
चित्रसंवाद : भाग :४७
“आनंदस्वामी” चित्रकार शंकर पळशीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे विदयार्थी आणि प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या 'कलेपासून कलेकडून' पुस्तकातील 'सर' ह्या लेखाचे सदीप अभिवाचन.
हा लेख ऐसी दिवाळी २०१६मध्ये प्रकाशित झाला होता : पळशीकर : शिक्षक
सहभाग : किरण भुजबळ
वेळ :सकाळी ११. ०० वाजता
दिनांक : २६ मार्च २०१७
ठिकाण : सुदर्शन कला दालन ,पुणे
संदेश भंडारे लिखित 'तमाशा'
प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. संदेश भंडारे लिखित बहुचर्चित आणि पारितोषकप्राप्त "तमाशा" या पुस्तकाची दुसरी आवृत्ती परम मित्र प्रकाशन यांच्यातर्फे प्रकाशित होणार आहे.
समारंभ : रविवार २ एप्रिल २०१७, सायंकाळी ५ वाजता
स्थळ : राष्ट्र सेवा दलाचे बॅ. नाथ पै सभागृह,
साने गुरुजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ,
सिंहगड रस्ता, पुणे.
या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ आणि लोकप्रिय लोक-कलावंत श्री. रघुवीर खेडकर यांच्या हस्ते होणार आहे. पद्मश्री डॉ. गणेश देवी समारंभाचे अध्यक्ष आहेत.
पुस्तकाची किमत रु.- ९५०/-
प्रकाशन दिवस सवलत रु.- ७००/-
The Salesman - Asghar Farhadi
आजपासून पुण्यात (आणि मुंबईतही) असगर फरहादीचा 'सेल्समन' प्रदर्शित झाला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहायचा राहिला असेल तर आवर्जून पाहा. अधिक तपशील
व्यंकटेश माडगूळकर चित्रपट महोत्सव
व्यंकटेश माडगूळकरांच्या नव्वदाव्या जयंतीच्या निमित्ताने एक चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे -
स्थळ : नॅशनल फिल्म आर्काइव्ह, पुणे
शनिवार ८ एप्रिल :
स. ११ : पुढचं पाऊल
सं. ६ : मु.पो. ढेबेवाडी
रविवार ९ एप्रिल :
स्. ११ : सांगत्ये ऐका
सं. ६ : बनगरवाडी
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. प्रवेशमूल्य नाही.
भारतीय कला - पुण्यात फक्त आजच
भारतीय कलेतिहासात महत्त्वाच्या ठरलेल्या विसाव्या शतकातल्या काही चित्रकारांची निवडक चित्रं दिल्ली आर्ट गॅलरीतर्फे आज कोरेगाव पार्कातल्या वेस्टिन हॉटेलात प्रदर्शनार्थ ठेवलेली आहेत. काही ठळक नावं : हुसेन, रझा, गायतोंडे, अमृता शेरगिल, नंदलाल बोस, जामिनी राय, अवनींद्रनाथ टागोर. वेळ : स. ११ ते रात्री ९. अधिक माहिती -
Delhi Art Gallery: Masterpieces by Husain, Raza and others on display
लेथ जोशी
'लेथ जोशी' ह्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पारितोषिकप्राप्त चित्रपटाचा एक खास खेळ १ मे म्हणजे कामगार दिनाच्या निमित्तानं पुण्यात आयोजित केलेला आहे. तपशील -
स्थळ - नीलायम
वेळ - सकाळी ९ वा.
चित्रपटाला इंग्रजी उपशीर्षकं असतील.
प्रवेश : तिकीट नाही. मोफत पाससाठी आयोजकांशी संपर्क साधावा.
आयोजक - CITU पुणे. अजित अभ्यंकर ९४२२३०३८२८, वसंत पवार ८२७५४२४७७३
माहितीसाठी:
माहितीसाठी:
रविवार, एपिल ३०, २०१७
वेळ: सकाळी- १०.३० वा
स्थळ: राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय,
लाॅ कॅालेज रोड, पुणे ४'गगनिका' पुस्तक प्रकाशन
ले. सतीश आळेकर
हस्ते: महेश एलकूंचवार
राजहंस प्रकाशन, पुणेह्याचवेळी साहित्या अकादमीनी निर्मीलेला, महेश एलकुंचवारांच्या जीवनावरील चरित्रपट, 'चिरेबंदी' (रंगीत, २७ मिनीटे) दाखवण्यात येईल.
कोणी प्रकाशनाला जाणार आहे का? असल्यास या पुस्तकाची एक प्रत माझ्यासाठी घेऊन ठेवता येईल का? मी पुण्यात आलो की (पैसे देऊन) घेऊन जाईन.
Towards Resistance: A Mixed-media Art Exhibition
साधू वासवानी चौकातल्या पूर्वीच्या शालिमार हॉटेलच्या इमारतीत आता टिफा वर्किंग स्टुडिओ नावाचा उपक्रम राबवला जातो आहे. त्यामार्फत एक बहुमाध्यमी प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. अधिक माहिती इथे मिळेल.
प्रदर्शनाचा एक भाग म्हणून ३ जूनला 'सिसक' हा लघुपट दाखवण्यात येणार आहे. प्रदर्शनाला प्रवेशमूल्य नाही, पण चित्रपटाला आहे. अधिक माहिती इथे.
मुंबईत पाहण्याजोगे
आवर्जून भेट देण्याजोगी काही प्रदर्शनं मुंबईत सध्या चालू आहेत -
मान रे छायाचित्रं - तर्क आर्ट गॅलरी, गेटवेजवळ.
विलिअम गेडनी छायाचित्रं - प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय.
नेपाळ प्रकल्प छायाचित्रं - मॅक्स म्युल्लर भवन, काळा घोडा.
'मेमरी अॅन्ड आयडेंटिटी' - भारताबाहेर स्थायिक झालेल्या भारतीय कलाकारांच्या कलाकृती - दिल्ली आर्ट गॅलरी, काळा घोडा.
कलागजर
कलागजर
तिसरे कलाप्रदर्शन
२२-२३-२४ जून २०१७, बालगंधर्व कलादालन, पुणे.
गुरुवार २२ जून
उद्घाटन, संध्याकाळी ६ वाजता : विख्यात गायक/संगीतज्ञ श्री. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते.
बीजभाषण : खयाल : एक अाकलन : एका कलावंताचा त्याच्या कलामाध्यमाकडे पहाण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन
कलागजर २०१७ पुस्तिकेचे प्रकाशन हस्ते : श्री. नचिकेत पटवध॔न
शुक्रवार २३ जून
संध्याकाळी ६ वाजता, सुप्रसिद्ध लेखक अाणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजन खान हे गंगाजमुनी परंपरा या विषयावर बोलतील.
असं काही नाही. पूर्वी होती
असं काही नाही. पूर्वी होती कांही थोडी अमृततुल्ये अशी. पण त्यांचा खरा मेन्यु चहा ,क्रीमरोल अन सिगारेट्.
पण आता अमृततुल्य अशी राहिली नाहीत. नव्या पिढीला आवडणारे बदल त्यांनी करून घेतलेत. आता वडापाव भजी, इडली अन काहीबाही मिळते.
पण चहाचा दर्जा हरवलाय त्याचं काय?.
चिल्ड्रेन आॅफ पॅराडाइज (१९४५)
दुसऱ्या महायुद्धानंतरचा एक अभिजात फ्रेंच चित्रपट 'चिल्ड्रेन आॅफ पॅराडाइज' आलियाॅंस फ्राॅंसेज संस्थेतर्फे पुण्यात दाखवला जाणार आहे.
स्थळ : सीझन्स हाॅटेल औंध
वेळ : बुधवार २८ जून सायं. ८ वा.
प्रवेशमूल्य नाही, पण आसन आरक्षित करावे - +91 8308174419.
#NotInMyName
काल दिल्ली, कोलकाता, मुंबई आदि ठिकाणी #NotInMyName मोर्चे आयोजित केले गेले.
#NotInMyName protests: Thousands hit the streets against mob lynchings
मोकाट झुंडशाहीशी देशभर मूकलढा
86% killed in cow-related violence since 2010 are Muslim, 97% attacks after Modi govt came to power
झुंडींची मानसिकता - विश्वास पाटील
आज संध्याकाळी पुण्यात मोर्चा आहे.
वेळ : ६:३०
स्थळ : पुणे स्टेशनजवळचा आंबेडकर पुतळा ते गांधी पुतळा.
काळे कपडे घालून येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहिती इथे मिळेल.
हा हिंदुत्ववाद तो नव्हे!
जेएनयूच्या वेळी मला फार वाचायला मिळालं नव्हतं. ही केस मी पूर्णपणे वाचली, पूर्ण पाठपुरावा केला.
ह्यावेळी हिंदूंच्या विरुद्ध माझं मत झालेलं आहे.
हिंदु(त्व?)वाद्यांनी इथेच्च का आणि तिथेच्च का नाही हे आर्ग्युमेंट सोडून दुसरं काहीतरी बोलण्याची गरज आहे, अथवा गप्पच बसावं.
मोदी हग
त्या निमित्ताने हेही पाहा -
if Modi can hug a beef-eater... pic.twitter.com/wxrnl9hS4G
— Prasanto K Roy (@prasanto) June 28, 2017
लाल हेरिंगमासा?
बीफ खाणाऱ्यास हगताना स्वत: बीफ खाल्लेच पाहिजे, असे अपेक्षित नाही. त्या बीफ खाणाऱ्यास मारून न टाकणे पुरेसे आहे.१
स्वत: बीफ न खातासुद्धा (आपले हितसंबंध पुढे आणण्यासाठी म्हणा - विच, इन ऑल प्रॉबेबिलिटी, इज़ व्हॉट मिष्टर मोदी इज़ डूइंग -किंवा अन्यथा म्हणा) बीफ खाणाऱ्यास (किंवा मुस्लिम बॅन आणू पाहाणाऱ्यास किंवा एच१बी बॅन आणू पाहाणाऱ्यास) हगणे सर्वथा शक्य असावे.
(तसेही, प्रस्तावित मुस्लिम बॅन कोर्टात किती काळ टिकतो, ते पाहायचे.)
..........
१ बाकी, मोदीजी ज्या बीफ खाणाऱ्यास हगले, त्या बीफ खाणाऱ्यास मारून टाकण्याचा प्रयत्न जरी झाल्यास (१) भारत हे दहशतवादी राष्ट्रांच्या यादीत त्वरित डेसिग्नेट होणे, आणि (२) भारतीय ट्रॅवल बॅन / हिंदू ट्रॅवल बॅन / भारतातून एच१बीवर त्वरित व अधिक कडक निर्बंध आदि रोचक शक्यतांचा संबंधितांनी विचार केला असेलच.
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/india-news/86-killed-in-cow-related-viole…
The source of this idiot survey is English media.
फेबू- COPIED
हा कार्यक्रम विनाशुल्क आहे. सर्वांना प्रवेश.
येत्या २९ जूनची संध्याकाळ राखून ठेवा. जागतिक कीर्तीच्या दोन माणसांना भेटूया.
अक्षर मानव आयोजित
|| गप्पा ||
आंतरराष्ट्रीय पातळीचे भाषातज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देशभर आंदोलन उभं करणारे
| मा. डॉ. गणेश देवी |
आणि
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रसायनशास्त्रविद, त्या विषयाच्या नोबेल पुरस्कार समितीच्या दोन वेळा सदस्य राहिलेल्या
| मा. डॉ. सुरेखा देवी |
या दोघांशी मनमोकळ्या गप्पा.
२९ जून २०१७, संध्याकाळी ६ वाजता.
स्थळ : राष्ट्र सेवा दल, दांडेकर पुलाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे.
जरूर या.
संपर्क : ८८८८८९५२२६
अखलाक, पहलू खान, जुनैद
अखलाक, पहलू खान, जुनैद ह्या तिघांच्याही हत्या भारतिय संविधानावर घाला घालणाऱ्या आहेत. कुठल्याही सुबुद्ध, विवेकी माणसाने त्याचा निषेधच केला पाहिजे. हिंदू धर्माभिमान्याने सर्वात आधी. गौरक्षेच्या नावाखाली जो अनिर्बंध हिंसाचार चालू आहे तो मोडून काढणे इस्लामीक दहशतवादाचा मुकाबला करण्याइतकेच महत्वाचे आहे. वरील कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे परंतू दुर्दैवाने होता येत नाही.
गौरक्षेच्या नावाखाली जो
गौरक्षेच्या नावाखाली जो अनिर्बंध हिंसाचार चालू आहे तो मोडून काढणे इस्लामीक दहशतवादाचा मुकाबला करण्याइतकेच महत्वाचे आहे.
साफ अमान्य.
कारणे पुढीलप्रमाणे -
(१) इस्लामिक दहशतवाद ही गौरक्षेच्या नावाखालील हिंसाचाराच्या किमान १०० पट व आंतरराष्ट्रिय स्तरावरची समस्या आहे. गौरक्षेच्या नावाखालील हिंसाचार हा स्थानिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे.
(२) गौरक्षेच्या नावाखाली जो हिंसाचार चालू आहे तो राज्यसरकारच्या अखत्यारीत आहे व केंद्रसरकारने त्यात लक्ष घालणे (उदा. मौन सोडणे) हे वैकल्पिक असायला हवे.
(३) इस्लामिक दहशतवाद हा केंद्र व राज्य सरकार दोघांच्या अखत्यारीत आहे.
काल मला तुम्ही देशातल्या
काल मला तुम्ही देशातल्या अति-असहिष्णुतेबद्दल खुप कन्सर्न्ड वाटलात आणि मोर्चा काढणाऱ्या लोकांचे सहानभुतीदार वाटलात्. म्हणुन मला वाटले तुम्ही मोर्चाला हजेरी लाऊन तुमचे २ सेंट नक्की देणार सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी.
पण तुम्ही तर क्लोजेटेड संघी निघालात्.
स्तुतीबद्दल धन्यवाद अनुताई .
स्तुतीबद्दल धन्यवाद अनुताई . लेबलं काहीही हि द्या , पण काही विशिष्ट निवडक गोष्टींवरून कोणालाही ठेचून काढणे ( वन ऑफ घटना नव्हे , तर वारंवार ) हे मला चूकच वाटते .( तुमचे विचार वेगळे असावे . )
बाय द वे , काल मोदींनी सुद्धा हेच विचार मांडले ( आणि तेही मोर्चाला गेले नव्हते )
ढेरे सरकार म्हणतात तसे काल ( आणि आजपण ) GST GST खेळतोय .. काय करणार शेवटी आम्ही पोटार्थी फडतूस व्यावसायिक .. कामं पण करावी लागतात . तर असो .
आता एकदा क्लोजेटेड संघी म्हणजे काय ते कृपया सांगावे .
काल मोदींनी सुद्धा हेच विचार
काल मोदींनी सुद्धा हेच विचार मांडले ( आणि तेही मोर्चाला गेले नव्हते )
अहो मोदींचे अश्रु मगरीचे आहेत्. तुमचे तसे नाही असे वाटत होते...
ढेरे सरकार म्हणतात तसे काल ( आणि आजपण ) GST GST खेळतोय
काय हो बापटण्णा, इथे शेकडो लोक रोजच्या रोजच्या रोज मारली जातायत्. २०१४ पूर्वी च्या तुलनेत १००० पट जास्त खुन होतायत्. लोक स्वताच्या पैश्यानी काळे डगले विकत घेउन भर पावसात मोर्चे काढतायत्. पण तुम्ही पैश्याच्या मोहमायेत अडकले आहात्. सो सॅड्
आता एकदा क्लोजेटेड संघी म्हणजे काय ते कृपया सांगावे .
ऐसीवर बरेच आहेत असे. ऐसीच्या मालकीण बाई ह्या त्यांच्या प्रमुख. थत्ते चाचा माजी संघी आहेत कारण संघ काही करत नाही म्हणुन वैफल्यग्रस्त आहेत्.
चिंजं आणि मीच इथे संघी नाहीये.
Je suis desole. मला येता
Je suis desole. मला येता येणार नाही. ;)