Skip to main content

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - २

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.

या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.

---

पुण्यात फ्रेंच शिकवणारी 'आलिऑन्स फ्रॉन्सेज' ही संस्था अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. फ्रेंच सिनेमे दाखवणारा त्यांचा 'सिने-क्लब' उपक्रम ह्या वर्षी जोमानं सुरू झाला आहे. मार्च महिन्यातल्या सिनेमांचा तपशील संस्थेच्या संकेतस्थळावर इथे पाहायला मिळेल. काही सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शकांचे सिनेमे त्यात पाहायला मिळतील. सर्व खेळ फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असतील. सोमवार आणि गुरुवार ६:३० अशी वेळ आहे. प्रवेशमूल्य नाही.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 22:24

अवांतर - मुंबईत असताना मुद्दाम फ्रेन्च शिकले होते. पण त्या वर्गात मला नेहमी त्या अनोळखी शब्दांच्या अन ध्वनीच्या सरमिसळीत "सत श्री अकाल" ऐकू येत असे. पुढे अर्थात कॅनडाला स्थाईक होण्याच्या आधी अमेरीकेचा नंबर लागला त्यामुळे फ्रेन्च शी परत संबंध आला नाही.

सुशेगाद Sat, 14/03/2015 - 00:06

फिल्म इन्स्टिट्यूट मधला थेटर पुरातनकालीन आहे. साऊंड खूप खराब आहे. एनएफएआय मध्ये का नाही स्क्रीन करत हे फ्रान्सिस अलायन्सवाले लोक?

घाटावरचे भट Tue, 24/03/2015 - 17:18

श्री रामकृष्ण मठ - पुणे येथे त्यांच्या मंदिराच्या वर्धापन दिना निमित्त महोत्सव चालू आहे. त्यात शास्त्रीय संगीताचे (गायन) ३ कार्यक्रम होणार आहेत. तपशील येणेप्रमाणे -

रविवार दि. २९ मार्च - श्री. शेखर कुंभोजकर
सोमवार दि. ३० मार्च - श्री. आनंद भाटे
मंगळवार दि. ३१ मार्च - विदुषी मालिनीताई राजुरकर

वेळ - सायंकाळी ७ ते ९
स्थळ - मठाचे प्रांगण
पत्ता - रामकृष्ण मठ, दांडेकर पुलाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे
तिकीट दर - विनामूल्य

घाटावरचे भट Fri, 27/03/2015 - 17:28

In reply to by घाटावरचे भट

सध्या पुण्यात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. कसले कसले महोत्सव चाल्लेत, फुल्टू धमाल. आणि सगळे कार्यक्रम फुकट आहेत, उदा. जंगली महाराज मंदिर उत्सव, बेडेकर गणपती उत्सव, दगडूशेठ गणपतीचा रामनवमीचा उत्सव, रामकृष्ण मठाच्या मंदिराचा वर्धापन दिन वगैरे. रोज सकाळी पेप्रात जाहिरात पाहायची आणि आवडेल त्या कार्यक्रमाला संध्याकाळी जाऊन बसायचं. कालच जंगली महाराजला सौ.पद्मा तळवलकरांचं गाणं होतं. हापिसातून यायला उशीर झाल्याने म्हटलं आता कार्यक्रम गेला. जेवण वगैरे आटपून साडेनवाच्या सुमाराला मरत मरत पोचलो. पण पाहातो तर काय तिथे पं. सुरेश तळवलकरांचं सोलो तबलावादन चाल्लेलं. जेमतेम अर्धा पाऊण तासच ऐकायला मिळालं पण जे होतं ते लैच भारी. एकुणात पुण्यात बरेच कलाकार रोटेट होतात, उदा. शौनक अभिषेकी तेरवा बेडेकर गणपतीला गायले अन परवा जंगली महाराजला, आनंद भाटे रविवारी जंगली महाराजला गाणारेत आणि सोमवारी रामकृष्ण मठात (जंगली महाराजला आनंद भाटे आणि अमर ओक असा ज्वाईंट प्रोग्रॅम आहे). असो. सध्या फुल्टू धमाल चालूए.

आदूबाळ Fri, 27/03/2015 - 18:20

In reply to by घाटावरचे भट

जंगली महाराजला आनंद भाटे आणि अमर ओक असा ज्वाईंट प्रोग्रॅम आहे

बस्स्स्स्स्स्स....

इनोत धुतलेला शर्ट वापरावा म्हणतो.

घाटावरचे भट Mon, 30/03/2015 - 13:37

In reply to by घाटावरचे भट

जंगली महाराज मंदिरात रविवारी श्री. आनंद भाटे यांचे गायन नव्हते तर श्री. राहुल देशपांडे यांचे गायन होते. कार्यबहुल्यामुळे कार्यक्रमास जाता आले नाही.

चिंतातुर जंतू Thu, 30/04/2015 - 13:43

सध्या वसंत व्याख्यानमाला सुरू आहे. त्यात १ मे रोजी -
वक्ते - राजीव साने
विषय - 'आधुनिकता व भारत'
स्थळ - टिळक स्मारक मंदिर
वेळ - सा. ६:३०

उदय. Fri, 01/05/2015 - 20:24

In reply to by चिंतातुर जंतू

एक बाळबोध प्रश्न. हे व्याख्यान किंवा ललित लेखाचं अभिवाचन या प्रकाराला कितपत प्रतिसाद मिळतो.फार पूर्वी रुईयात असताना, "अभाविप"ने असाच एक व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला होता. विषय पण असाच काहीतरी, 'आधुनिकता', 'आपण स्वतःला आणि देशाला कसे बदलावे', 'नवे युग' वगैरे वगैरे. तो प्रकार बघून त्यानंतर कधी व्याख्यानाचे धाडस केले नाही. विचारायचा मुद्दा असा की याला अजून कितपत प्रतिसाद मिळतो? लोकांकडे इतका मोकळा वेळ असतो का?

चिंतातुर जंतू Sat, 02/05/2015 - 16:16

In reply to by उदय.

>> विचारायचा मुद्दा असा की याला अजून कितपत प्रतिसाद मिळतो?

कालच्या व्याख्यानाला पुष्कळ गर्दी होती. टिळक स्मारक मंदिर तसं मोठं आहे, तरीही ७५% भरलेलं असावं. व्याख्यानाला ५ रु. तिकीटही होतं आणि तरीही गर्दी होती, हे आणखी एक विशेष. आज प्रा. समर नखाते यांचं व्याख्यान आहे. विषय - 'प्रतिमा आणि वास्तव'.

पिवळा डांबिस Sun, 03/05/2015 - 10:43

In reply to by चिंतातुर जंतू

व्याख्यानाला ५ रु. तिकीटही होतं आणि तरीही गर्दी होती,

काय सांगता?
अग्गोबाई, ऐकावं ते नवलच हो!!!
:)

(स्वगतः चिंजं हाणण्यापुर्वी इथून फुटावे हे बरें!!!)

चिंतातुर जंतू Thu, 30/04/2015 - 14:21

महेश एलकुंचवार यांच्या 'यथा काष्ठं च काष्ठं च' ह्या ललित लेखाचं अभिवाचन
वाचक : मोहित टाकळकर
स्थळ, वेळ : शनिवार २ मे, सायं. ७:३० वा, सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ.

चिंतातुर जंतू Thu, 30/04/2015 - 14:34

कलेचा इतिहास म्हणजे काय? कलाव्यवहार म्हणजे काय? कलेतिहास, कलासमीक्षा आणि दृश्यसंस्कृती यांचा परस्परांशी संबंध काय असतो? समकालीन कला, कलाव्यवहार यांच्या बदलत्या व्याख्या काय आहेत? या संदर्भातील महत्त्वाच्या कलाकृती, कलाकार आणि घटना कोणत्या? कलाकारांनी आजच्या घडीला हे समजून घेण्याची काय गरज आहे? यातून कलाव्यवहार कसा घडतो आणि बदलतो आहे? कलाभ्यास करताना, कलेची विविध रूपं समजून घेताना वापरल्या जाणाऱ्या संज्ञा आणि संकल्पना सोप्या पद्धतीनी कशा समजून घेता येतील?

या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर -
'चित्रबोध' कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे हे नाईन स्कूल ऑफ आर्ट, नवी दिल्ली यांच्या सहयोगाने दोन दिवसाची कार्यशाळा पुण्यात आयोजित करत आहे. कार्यशाळेत मांडणी इंग्रजीतून असेल. कार्यशाळेत भर हा इंग्रजीतील लिखाणावर नसून प्रत्यक्ष कृती, खेळ, साहित्य-सामुग्री आणि चर्चेतून विषय समजून घेण्यावर असेल.
वक्ते: राहुल भट्टाचार्य, आभा शेठ आणि समुद्र सैकिया
दिनांक: ७ आणि ८ मे, २०१५
वेळ: सकाळी १०.०० ते संध्या. ६.००
स्थळ: सुदर्शन कलादालन, शनिवार पेठ, पुणे
नोंदणी शुल्क: रु. १२००/-
नोंदणीसाठी संपर्क आणि अधिक माहिती इथे
टीप : दृश्यकलांचे विद्यार्थी आणि नवोदित कलाकार यांना प्राधान्य. प्रवेश मर्यादित.

ह्या आधीच्या 'चित्रबोध'विषयी

उत्पल Wed, 13/05/2015 - 20:04

नमस्कार,

येत्या ३० मे २०१५ रोजी लिंगभाव समतेसाठी काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुषांच्या काही संघटनांनी एकत्र येऊन 'मर्दानगी' या विषयावर चर्चा करण्यासाठी युवकांना डोळ्यासमोर ठेवून एक दिवसाची ‘पुरुषभान परिषद’ आयोजित केलेली आहे. युवकांनी बोलतं व्हावं या उद्देशाने ही परिषद आयोजित केली जात आहे. राष्ट्र सेवा दल, पर्वती पायथा, पुणे येथे ही परिषद होणार आहे.

गेल्या काही वर्षात खून, बलात्कार, संस्कृती रक्षकांचे वारंवार होणारे हल्ले, निवडून आलेल्या सांप्रदायिकतावादी सरकारातील मंत्र्यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये यातून मर्दानगी आणि सत्तासंबधाची एक परिभाषा आपल्या मनावर ठसवली जाते आहे. ती अधिक दृढ करण्यासाठी मूलतत्त्ववादी मंडळींनी तरुणांना हाताशी धरले आहे. मूलतत्त्ववादी लोक ज्या तरुण मुलांना हाताशी धरून त्यांच्याकडून पद्धतशीरपणे हल्ले घडवून आणतायत, ती सारी तरुणाई, ‘मर्दानगी’ या विषयावरील वैचारिक चर्चाविश्वाच्या परिघाबाहेर वावरणारी आहे. किंबहुना आपण (स्त्रीवादी आणि सामाजिक संघटना) मांडत असलेल्या विचारविश्वाच्या परिघाकडे या तरुणाईने अजिबात फिरकूच नये म्हणून हे मूलतत्त्ववादी लोक जाणीवपूर्वक जुन्याच संकल्पना, आयकॉन्स त्यांच्या मनात पेरत आहेत आणि नव्या ‘मर्दानी अस्मिता’ त्यांच्या डोक्यात घुसवत आहेत. त्यामुळे आपली परिभाषा त्या तरुणाईपर्यंत पोचत नाहीये. आपली निषेधाची परिभाषादेखील त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये.

त्यासाठी या तरुणाईला नेमकं काय वाटतं आहे हे आपल्याला आधी समजून घ्यायला हवं. या तरुणाईचं अनुभवविश्व नेमकं काय आहे, त्यांच्या विचार आणि मतांच्या चौकटी काय आहेत, त्यांच्या नेमक्या कोणत्या भावना-संवेदनांची आपण दखल घ्यायला हवी आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आपण त्यांचं म्हणणं आधी ऐकून घ्यायची तयारी दाखवायला हवी असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणूनच ही ‘पुरुषभान परिषद’ आयोजित केली आहे.

२० ते ३५ या वयोगटातील अधिकाधिक पुरूषांनी या परिषदेत सहभागी व्हावं अशी अपेक्षा आहे. इतर सर्व यात प्रेक्षक, निरीक्षक म्हणून भाग घेऊ शकतील. परिषदेची रजिस्ट्रेशन फी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० रुपये असून प्रवासखर्च ज्याचा त्यांनी करायचा आहे. संघटना म्हणून आपण यात सहभागी होणार असाल तर त्याचे सहभाग शुल्क १००० रुपये आहे. आपला चेक ‘नारी समता मंच’ या नावाने काढावा. ऑनलाईन ट्रान्सफरच्या तपशीलासाठी 'नारी समता मंच' च्या कार्यालयात अलका पोतनीस यांना संपर्क करावा (०२०-२४४९४६५२, सोमवार ते शुक्रवार, १२ ते ५) किंवा खालीलपैकी कोणत्याही मोबाईल नंबरवर फोन केल्यास माहिती मिळू शकेल.

आपला सहभाग कृपया २५ मे पर्यंत नक्की कळवावा, म्हणजे परिषदेच्या आखणीसाठी ते सोयीचं होईल. परिषदेची कार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर करत आहोत. परिषदेच्या आयोजनाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी व्यक्तिगत/संस्थात्मक पातळीवरील देणग्यांचंही स्वागत आहे.

सस्नेह,

कुंदा प्रमिला निळकंठ : ९९६९१४८६५४
गीताली विनायक मंदाकिनी : ९८२२७४६६६३
उत्पल वनिता बाबुराव : ९८५०६७७८७५

लिंगभाव समता, 'मर्दानगी' या विषयावर चर्चा , ‘मर्दानी अस्मिता’, पुरुषभान परिषद, युवकांनी बोलतं व्हावं, निषेधाची परिभाषा, तरुणाईला नेमकं काय वाटतं, २० ते ३५ या वयोगटातील अधिकाधिक पुरूषांनी, विचारविश्वाच्या परिघाकडे, रजिस्ट्रेशन फी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० रुपये, चेक ‘नारी समता मंच’ या नावाने, कार्यक्रम पत्रिका !


Yuck!!

काय सपक जिंदगी आहे!!

काव्या Wed, 13/05/2015 - 20:46

In reply to by बिटकॉइनजी बाळा

यक हा शब्द इतक्या जाड ठशात लिहीण्यापेक्षा नक्की काय खटकतय हे लिहीण्यात वेळ घालवला असता तर सत्कारणी लागला असता.

काव्या Wed, 13/05/2015 - 20:52

In reply to by बिटकॉइनजी बाळा

तरुण अन गरम रक्ताचे आहात हे मी प्रतिक्रियेवरुन ओळखलं पण जर सविस्तर मांडलत तर नीट पोचू शकेल, पुढे तुम्हालाही त्या सवयीचा उपयोग होइल हे वेगळे. पण निदान इथे ऐसीकरांना कळेल की काय खटकतय.

आदूबाळ Wed, 13/05/2015 - 21:21

In reply to by काव्या

मला थोडं समजतंय नीळदादांन्ला काय म्हणायचंय. विशी-ते-पस्तिशीमधल्या तरुणांना (!) काय वाटतं हे समजून घेण्यासाठी भाषाही त्यांचीच वापरली पाहिजे. असं जडजंबाल भाषेत लिहिलं तर (१) भाषेला घाबरूनच कोण येणार?; आणि (२) जे येतील ते (सखाराम गटणे) वि-ते-प-तरूणाईचा क्रॉससेक्शन असतील का?

बिटकॉइनजी बाळा Wed, 13/05/2015 - 23:05

In reply to by आदूबाळ

यप! पण काही अंशी!

भाषा "गटणी"(मला फक्त सर्वसाधारण कल्पना आहे ह्या कॅरॅक्टर बद्दल) आहेच, आणि क्लिशेड आहे. शिवाय मुद्दा फक्त भाषेचा नाहीच!

सहज म्हणून कल्पना तरळली, या कार्यक्रमाला कोण कोण येतील ते :
१) वरील मंडळींचे मित्रमंडळ (आग्रहापायी, मागच्या किंवा दाराच्या कडेच्या सीट्स धरणारे, कल्टी मारण्याच्या सतत बेतात असलेले)
२) युनिवर्सिट्यांतले मराठी, ललित कला, सामाजिक शास्त्रे शिकणारे काही होतकरू तरुण (एन् एस एस् च्या शिबिरांत श्रमदान करून भरून पावणारे आणि त्यावर आपाप्ल्या डिपार्ट्मेंट्सच्या मॅगजिन्समध्ये पानभर लेख पाडणारे लिहिणारे). अशाच असंख्य स्कीमा, योजना, मंड्ळं यांत बिझी प्राध्यापकांनी हाकरून आणलेली काही विशी-ते-पस्तीशीतली मंडळी.
३) दैनिक लोकमतची मंथन पुरवणी सिरीयसली वाचणारे. निर्माण, प्रकाश आमटे यांविषयी आदर बाळगून असणारे कार्यकर्ते तरुण.
४) साहित्यसंमेलनांतल्या कविकट्याला गर्दी करणारे
५) फेसबुकवरचे चर्चा-झोडकरी, वय बसत नसेल गोदरेज हेअर डाय लावून. आणि वय बसत असेल तर थोडक्यात काम नसलेली वि-ते-प मंडळी. या दोन्हीतही न बसणारे पण टाईम्स ऑफ इंडिया, आपलं लोकसत्ता किंवा तत्सम पेप्रांतले लेख वाचून आणि बलात्कराच्या बातम्या शेअर करून स्टेट्सी पेटलेले सेन्सीबल तरूण.
६) विद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धक
७) हीच अ‍ॅड जर इंग्रजी-हिंदीत केली तर एलजीबीटी पंथातले काही विचारी तरुण. (त्यातही पॉवर बॉटम्स आणि बेअर टाईप हार्डकोअर टॉप्स असे मर्दानगी-स्केलवरचे टोकाचे सवंगडी फिरकणार देखील नाहीत.)
८) सखी विचार मंच, तनिष्का आणि अशा ग्रुप्सची लंप सम लागलीच तर ऐनवेळेस आलेली मंडळी.
...
...
अजुन...

बिटकॉइनजी बाळा Wed, 13/05/2015 - 23:07

In reply to by आदूबाळ

यप! पण काही अंशी!

भाषा "गटणी"(मला फक्त सर्वसाधारण कल्पना आहे ह्या कॅरॅक्टर बद्दल) आहेच, आणि क्लिशेड आहे. शिवाय मुद्दा फक्त भाषेचा नाहीच!

सहज म्हणून कल्पना तरळली, या कार्यक्रमाला कोण कोण येतील ते :
१) वरील मंडळींचे मित्रमंडळ (आग्रहापायी, मागच्या किंवा दाराच्या कडेच्या सीट्स धरणारे, कल्टी मारण्याच्या सतत बेतात असलेले)
२) युनिवर्सिट्यांतले मराठी, ललित कला, सामाजिक शास्त्रे शिकणारे काही होतकरू तरुण (एन् एस एस् च्या शिबिरांत श्रमदान करून भरून पावणारे आणि त्यावर आपाप्ल्या डिपार्ट्मेंट्सच्या मॅगजिन्समध्ये पानभर लेख पाडणारे लिहिणारे). अशाच असंख्य स्कीमा, योजना, मंड्ळं यांत बिझी प्राध्यापकांनी हाकरून आणलेली काही विशी-ते-पस्तीशीतली मंडळी.
३) दैनिक लोकमतची मंथन पुरवणी सिरीयसली वाचणारे. निर्माण, प्रकाश आमटे यांविषयी आदर बाळगून असणारे कार्यकर्ते तरुण.
४) साहित्यसंमेलनांतल्या कविकट्याला गर्दी करणारे
५) फेसबुकवरचे चर्चा-झोडकरी, वय बसत नसेल गोदरेज हेअर डाय लावून. आणि वय बसत असेल तर थोडक्यात काम नसलेली वि-ते-प मंडळी. या दोन्हीतही न बसणारे पण टाईम्स ऑफ इंडिया, आपलं लोकसत्ता किंवा तत्सम पेप्रांतले लेख वाचून आणि बलात्कराच्या बातम्या शेअर करून स्टेट्सी पेटलेले सेन्सीबल तरूण.
६) विद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धक
७) हीच अ‍ॅड जर इंग्रजी-हिंदीत केली तर एलजीबीटी पंथातले काही विचारी तरुण. (त्यातही पॉवर बॉटम्स आणि बेअर टाईप हार्डकोअर टॉप्स असे मर्दानगी-स्केलवरचे टोकाचे सवंगडी फिरकणार देखील नाहीत.)
८) सखी विचार मंच, तनिष्का आणि अशा ग्रुप्सची लंप सम लागलीच तर ऐनवेळेस आलेली मंडळी.
...
...
अजुन...

चिंतातुर जंतू Tue, 09/02/2016 - 15:05

विषय : हवामानविषयक परिषदेतला पॅरिस मसुदा आणि त्याचे भारतावर परिणाम (चर्चासत्र)
वेळ : शनिवार १३ फेब्रुवारी, सं. ६
स्थळ : बाल शिक्षण मंदिर शाळेचे सभागृह, कोथरुड
प्रवेश विनामूल्य
अधिक माहिती

चिंतातुर जंतू Thu, 25/02/2016 - 14:36

या वर्षीचं राजेंद्र व्होरा स्मृतिव्याख्यान -
वेळ : आज सायं ६ वाजता.
स्थळ : पत्रकार संघाचं सभागृह.
वक्ते : जेएनयूमधले प्रा गोपाल गुरू.
विषय : आजकालच्या आंदोलनांतील सामाजिक व राजकीय तत्त्वे.

प्रकाश घाटपांडे Thu, 03/03/2016 - 10:08

विषय - जे एन यू विद्यार्थी आंदोलन आणी राष्ट्रद्रोहाची संकल्पना
वक्ते १) अन्वर राजन
२) प्रा. नितेश नवसागरे
३) डॉ विश्वंभर चौधरी
अध्यक्ष- डॉ कुमार सप्तर्षी
स्थळ - गांधीभवन कोथरुड
वेळ- सायंकाळी ६
कार्यक्रम स्थळी- ४ व २ चाकी मोफत व पुरेसे पार्कींग, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय आहे

अनु राव Thu, 03/03/2016 - 10:11

In reply to by प्रकाश घाटपांडे

असे बापरे, गांधीभवनच्या भागात फिरायला जाणार्‍या लोकांना वॉर्न केले पाहिजे.

नितिन थत्ते Sat, 05/03/2016 - 09:36

In reply to by अनु राव

वॉर्निंग कशाची?

सभेला खूप गर्दी होण्याची शक्यता आहे का? ;)

की

अल्ट्रा-राष्ट्रवादी तिथे काही धुडगूस घालण्याची शक्यता आहे? :P

अनु राव Mon, 07/03/2016 - 09:11

In reply to by नितिन थत्ते

आपले खिसे, पैसे, पाकीटे, सोन्याच्या चेन वगैरे सांभाळा ही पहिली वॉर्निंग, डाकू येत आहेत.

आपल्या टीन एजेर मुलांना घरात डांबुन ठेवा. त्यांच्या ( आपल्या मुलांच्या ) जीवावर ही समाजवादी/ डावी लोक तुफान मजा मारतील. ही दुसरी वॉर्निंग.

घनु Wed, 29/06/2016 - 15:39

'पुणे इंटरनॅशनल सेंटर' च्या वतीने १ ते ४ जुलै इराणी चित्रपट मोहोत्सव.
स्थळ : एन.एफ.ए.आय, प्रभात रोड, पुणे, ०४ https://goo.gl/maps/5aySXEPhkLQ2
वेळ : १ जुलै सं.६:३० वा. आणि २ ते ४ जुलै स.१०:३० ते सं.६:००.
शुल्क : विनामुल्य
प्रवेश सर्वांसाठी खुला.
ह्या चित्रपट मोहोत्सवात दाखवल्या जाणार्‍या चित्रपट आणि वेळापत्रकाबद्दल आधिक माहिती खाली दिलेल्या PDF मधे मिळेल :
http://nfaipune.nic.in/pdf/Iranian%20Film%20Festival%202016.pdf

चिंतातुर जंतू Tue, 12/07/2016 - 13:26

उद्यापासून (१३ जुलै) नॅशनल फिल्म आर्काइव्ह पुणे येथे युरोपियन चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. अधिक माहिती इथे मिळेल.
प्रवेश विनामूल्य आणि खुला.

चिंतातुर जंतू Thu, 14/07/2016 - 15:48

Anne Feldhaus lecture

रा.चिं. ढेरेंसाठी दुखवटा सभा म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळात अ‍ॅन फेल्डहाउस यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
विषय : "Revealing and respecting divinity in Lilacharitra"
वेळ : शनिवार १६ जुलै संध्याकाळी ६ वाजता
स्थळ : संस्थेचे राजवाडे सभागृह

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 16/07/2016 - 01:56

सस्नेह निमन्त्रण !!

डॉ. वा. के. लेले स्मृति-व्याख्यानमालेचे चौथे पुष्प

विषय – गुरुचरित्र पारायण – एक बहुआयामी आकलन

वक्त्या – डॉ. मुग्धा येवलेकर (पोस्टडॉक्टोरल फेलो, डिपार्टमेंट ऑफ थिऑलॉजिकल स्टडीज़्, लॉयोला मेरीमाउंट युनिव्हर्सिटी, लॉस एंजलिस, अमेरिका)

या कार्यक्रमास आपण अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.

श्री. शं. बहुलकर

मानद सचिव

वेळ – मंगळवार, दि. १९ जुलै २०१६, सायं. ६.०० वा.

स्थान – भांडारकर संस्थेचे टाटा सभागृह

सारांश

गुरुचरित्र हा सोळाव्या शतकात लिहिला गेलेला ग्रन्थ गुरुभक्तीविषयीचा मराठीतील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रन्थ मानला जातो. प्रासादिक शैली, वैदिक, पौराणिक, आणि धर्मशास्त्रीय सन्दर्भ आणि सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातील ऐहिक आणि प्रापंचिक अडचणींवर मात करण्यासाठी गुरूचे मार्गदर्शन, अशा विविध वैशिष्ट्यांमुळे हा ग्रन्थ केवळ पंडित आणि अभ्यासक यांच्या पलीकडे सर्वसामान्य धार्मिक मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय झाला नसता तरच नवल! या ग्रंथाची पारायणे केल्याने प्रापंचिक अडचणींवर मात करता येते अशी श्रद्धा असल्याने संपूर्ण वर्षभर आणि विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयन्तीपूर्वी अनेक लोक त्याची वैयक्तिक किंवा सामूहिक पारायणे करतात.

इ.स. २०११ ते २०१३ ह्या दरम्यान प्रबंध-संशोधनाच्या निमित्ताने मी दोनशेहून अधिक गुरुचरित्र- पारायणकारांशी संवाद साधला. वाचनाच्या अनुषंगाने त्यांना आलेले अनुभव आणि गुरुचरित्राविषयी उपलब्ध वाङ्मय यांच्या संगमाचा परिपाक म्हणजे अॅरिझोना स्टेट युनिवर्सिटी येथे मी सादर केलेला "Gurucaritra Pārāyaṇ: Social Praxis of Religious Reading" हा माझा डॉक्टरेटसाठी लिहिलेला प्रबंध! सदर व्याख्यान-संवाद हा माझ्या संशोधनात वाचन आणि आकलन याबद्दलच्या ज्या कळीच्या प्रश्नांना मी हात घातला आहे त्याचा आढावा घेणारा आहे.

एखादी सर्वसामान्य कथा, कादंबरी, कविता वाचताना वाचकाचे होणारे आकलन आणि गुरुचरित्रासारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन करताना होणारे वाचकाचे आकलन यात नेमका काय फरक असतो? धार्मिक ग्रंथांचे वाचन अथवा पारायण करताना अर्थनिष्पत्ती कशी होते? ह्या प्रश्नांचा वेध घेणारे असे ह्या व्याख्यान-संवादाचे स्वरूप असेल.

चिंतातुर जंतू Wed, 20/07/2016 - 11:01

Dhere Reading

रा. चिं. ढेरे यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे, यांनी ’लौकिक ​आणि​ अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ढेरे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचा हा कार्यक्रम आहे.

तारीख : गुरुवार, दि. २१ जुलै
स्थळ : ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, पुणे
वेळ : संध्या. ७ वाजता
सहभाग : ज्योती सुभाष, माधुरी पुरंदरे, ओम भूतकर, हर्षद राजपाठक आणि कल्याणी देशपांडे
संयोजन : चित्रपट-दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी
संहिता-संकलन : चिन्मय दामले
दृश्य-संरचना : सुनीत वडके
कार्यक्रम सर्वांसाठी खुला

माहिती इथून साभार

May Mon, 01/08/2016 - 14:38

पुण्यात The Institutions of Engineers Hall मधे इंग्रजी पुस्तकांचं प्रदर्शन भरलंय. books 100 Rs per kg. प्रदर्शनाची शेवटची तारिख ७ ऑगस्ट.
(या प्रदर्शनात ढिगानी पुस्तकं असतात. डोळ्यांच्या चाळण्या करून हवी ती पुस्तकं शोधावी लागतात. अतिश्य सुंदर अशी coffee table books भरपूर आहेत. पण सगळी युरोपातल्या निसर्गावरची पुस्तकं आहेत. प्रदर्शन भरून साधारण ३ आठवडे झालेत. आता प्रदर्शन संपत आल्यामुळे स्टॉक बराच कमी झालाय. हे प्रदर्शन दर वर्षी भरतं. मला चित्रकलेची उत्त्त्त्तमोत्तम पुस्तकं या प्रदर्शनात किलोच्या भावात मिळालीत. ईच्छुकांनी लाभ घ्यावा. किलोच्या भावात पुस्तकं कशी काय असा प्रश्न पडला असेल तर कोणी interest दाखवल्यास इथे आणखी माहीती देईन.)

May Mon, 01/08/2016 - 17:45

In reply to by आदूबाळ

युरोपातुन भारतान जहाजामार्गे काही व्यापार चालतो. जहाज इतंकं मोठं अंतर समुद्रातुन पार करतं, तेव्हा ते जहाज तितकं वजनदार\जड असावं लागतं. कधीकधी व्यापाराचा माल तितका जड नसतो. अश्या वेळेला ते तिथली त्यांना नको असलेली सेकंड हॅन्ड पुस्तकं जहाजात भारून पाठवतात. त्यात बरिचशी फर्स्ट हॅन्ड पण असतात. ही पुस्तकं ते बहुतेक पणजीला उतरवतात. मग ही पुस्तकं विकण्यासाठी आणि गोडाऊन रिकामं करण्यासाठी असे पुस्तक प्रदर्शन भरवून पुण्यात, मुंबईत (बहुतेक नागपूरलाही) विकतात (ही सगळी मोघम माहिती आहे). लॉटरीमधे वाट्टेल ते नंबर निघतात तसे इथल्या खोक्यांमधे कोणत्याही रॅन्डम विषयावर पुस्तकं निघतात. मुख्यत्वे करुन ४ भाग करता येतील. educational books, novels, लहान मुलांसाठी आणि coffee table books. हि सगळी पुस्तकं (९५टक्के) ब्रिटनची आहेत. काही पुस्तकांवर 'To- with love- from' असंही लिहीलेलं दिसतं. या सगळ्या पसार्‍यात मला चित्रकलेची, the art of dried flowers, philosophical books, book of british birds अशी सुंदर पुस्तकं मिळाली आहेत. या वेळेला मला जर्मन भाषेतली लई भारी अशी ३ पुस्तकं मिळालीत.
या खेपेला आणखी एक नवीन गोष्ट कळली. ती अशी कि, आपल्याइथे एखादं पुस्तकांचं दुकान कायमचं बंद करायचं असेल तर उरलेली पुस्तकं (पुस्तकांना माल म्हणवत नाही) या लोकांना विकतात. आणि हे लोक परत गोडाऊन रिकामं करण्यासाठी असे पुस्तक प्रदर्शनात विकतात. मला या प्रदर्शनात दिनानाथ दलालांची आणि मिलींद मुळीकांची १-२ पुस्तकं मिळाली. दुकानदार लोक्स या प्रदर्शनावर डोळा ठेउन असतात. गठ्याने सगळी पुस्तकं घेउन जातात.
दिनानाथ दलालांच्या या पुस्तकाचं मराठी व्हर्जन मिळालं.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=%20Deenanath…
दिनानाथ दलालांच्या आणि मिलींद मुळीकांच्या पुस्तकांचे गठ्ठे संपलेत.(प्रत्येकी एकच पुस्तक) मिलींद मुळीकांचं बारकसं स्केचिंगचं पुस्तक होतं. फर्स्ट हॅन्ड पुस्तक ७० का ८० रुपये.
याच ठिकाणी आणखी एक वेगळं प्रदर्शन भरतं. any book for 50 \ 100 \ 200 Rs. हे सुध्धा सेम प्रकरण. खलील जिब्रान, किपलींग, william wordsworth यांची पुस्तकं मी १००-१०० रुपयांना आणलीत. परत तेच >>दुकानदार लोक्स या प्रदर्शनावर डोळा ठेउन असतात. आणि गठ्याने सगळी पुस्तकं घेउन जातात.
English classic literatureची readers digest ची पुस्तकं देखील या प्रदर्शनांमधे ढिगाने असतात.

मी वर उल्लेखलेली सगळी पुस्तकं अपवादात्मक आहेत आणि दर वेळेला मिळतीलंच असं नाही. वाट चुकुन ही पुस्तकं या प्रदर्शनांत आली आणि माझ्या नशिबाने मला मिळाली. हे माझं गेल्या ५-६ वर्षातलं कलेक्शन आहे. डोळ्यांची चाळण करून ही पुस्तकं शोधून मिळवलीत. पुस्तकांमधले हिरे पाचू माणिक मोती मला इथेच मिळालेत. 0:)

आदूबाळ Mon, 01/08/2016 - 18:16

In reply to by May

जबरदस्त!

जहाज इतंकं मोठं अंतर समुद्रातुन पार करतं, तेव्हा ते जहाज तितकं वजनदार\जड असावं लागतं. कधीकधी व्यापाराचा माल तितका जड नसतो. अश्या वेळेला ते तिथली त्यांना नको असलेली सेकंड हॅन्ड पुस्तकं जहाजात भारून पाठवतात.

याला बॅलास्ट म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे बॅलास्टवर साडेसात टक्के कस्टम्स ड्यूटी असते, आणि काउंटरव्हेलिंग ड्यूटीही असते. ती भरूनही वजनावर विकणं जमतंय तर!

अवांतरः इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट असेल तर अँटी डंपिंग ड्युटीही असते. तैवानमधून बॅलास्टरूपात आलेल्या एका रेझिस्टरने भारतीय उत्पादकांना झोपवलं होतं. तेव्हापासून अँटी डंपिंग ड्युटी लावण्यात आली.

आदूबाळ Mon, 01/08/2016 - 19:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टेक्निकल माहिती आता आठवत नाही, पण असं काहीसं घडलं होतं:

कोणत्याशा इलेक्ट्रॉनिक यंत्रात रेझिस्टर्स लागत. ते कन्झ्युमेबल होते - म्हणजे वापरून खराब होत, आणि काही काळाने बदलावे लागत. हे रेझिस्टर्स भारतीय उत्पादक बनवत असत. कोण सर्वोत्तम क्वालिटीचे, लौकर खराब न होणारे, लाँग लास्टिंग रेझिस्टर्स देतो याची स्पर्धा असे. प्रतिरेझिस्टर किंमत क्ष रुपये होती असं धरू.

एक दिवस मार्केटमध्ये एक नवा खिलाडी आला. भारतीय उत्पादकांनी त्याचे नवे रेझिस्टर्स पाहिले आणि त्यांच्या लक्षात आलं की अत्यंत हलक्या दर्जाचे आहेत. सगळे निवांत बसले. पण नव्या खिलाड्याने किंमत ०.१क्ष ठेवली, आणि रेझिस्टर्सच्या ग्राहकांना म्हणाला - भारतीय रेझिस्टर्स १०० दिवस चालतायत असं धरू. माझे रेझिस्टर्स अकरा दिवस चालले तरी तुम्ही फायद्यात जाल. प्रत्यक्षात रेझिस्टर्स पन्नास-साठ दिवस चालायचे. सगळा धंदा नव्या खिलाड्याकडे गेला.

भारतीय उत्पादकांच्या नाड्या थंड झाल्या. ०.१क्ष किमतीमध्ये उत्पादनखर्चही निघणार नाही याची त्यांना खात्री होती. मग या बाब्याला परवडतं कसं? हा काय गेम आहे? दया, पता करो.

तहकीकात के बाद यह पता चला, की हे रेझिस्टर्स तैवानमध्ये असलेल्या रेझिस्टर्स कारखान्याचा क्यूए रिजेक्टेड स्टॉक आहे. नया खिलाडी तैवानमधून भलतंच काही आयात करायचा, आणि बॅलास्ट म्हणून हे रेझिस्टर्स भरले जायचे. बॅलास्टच असल्याने त्याला हे फुकटच मिळत असे. या टाकाऊतून काहीतरी टिकाऊ करावं म्हणून त्याने डोकं चालवलं आणि वरचं रामायण घडलं.

ही कर्मकहाणी घेऊन ते उत्पादक डीगॅडकडे गेले (Directorate General of Anti-Dumping And Allied Duties). मग डीगॅडने अँटी डंपिंग ड्युटी बसवून तैवानी रेझिस्टर्सची किंमत भारतीय रेझिस्टर्सच्या जवळपास आणली आणि हा टाकाऊतून टिकाऊ बनवण्याचा उद्योग बंद पडला.

.शुचि. Mon, 01/08/2016 - 19:21

In reply to by May

हाहाहा. किती पॉझिटिव्ह आहे ना. खफवरती गोविंदाग्रजांची म्हणजे राम गणेश गडकरी यांची "राजहंस माझा निजला" देखील टाकली आहे. किती करुण कविता आहे. माझ्यामते सर्वोच्च!

तिरशिंगराव Sun, 07/08/2016 - 17:57

अरे, बॅलास्ट म्हणून आमच्यासारख्या हेवी ड्युटी लोकांना तरी घ्यायचं. भरपूर प्रवासाची हौस तरी भागली असती. शिवाय बॅलास्ट मूळ देशाला परत आलं असतं.

अबापट Wed, 24/08/2016 - 14:02

आदूबाळ पुण्यात येत आहेत . त्यानिमित्त कट्टा करूयात काय ? आदूबाळ यांनी त्यांच्या ३ तारीख ( शनिवार ) दुपार हि preferred date अँड time दिलेली आहे .

त्यांचा चॉईस : कॅफे paradise , कर्वे रोड ( मला OKK , पण इतरांनी बघा बुवा !!! ) किंवा गुडलक ( डेक्कन जिमखाना ) असे दिले आहेत .

चला ,कोणकोण येणार , अजून काही जागांचे चॉईस वगैरे लिवा पटापट !!!

बादवे , archives मधील २०१४ च्या कट्ट्याचे आद्य जनक ऋषिकेश हे हल्ली दिसत नाहीयेत , कुठे असतात ते ?

अबापट Thu, 25/08/2016 - 12:35

In reply to by चिंतातुर जंतू

खरे आहे तुम्ही म्हणता ते , परंतु paradise ला हि तोच प्रॉब्लेम आहे. अर्थात सकाळी भेटायचं असेल तर paradise ला गर्दी कमी असते . सकाळी चालेल का ? अजून फक्त ढेरें नि कन्फर्म केलंय . त्यांना आणि आदूबाळ याना व्यनि करून विचारतो . मला सकाळी चालू शकेल . ( इन फॅक्ट मला दुपारपेक्षा बरे , कारण वर्किंग डे आहे . दुपारी मी अशीच मध्ये कन्नी मारून येणार होतो. सकाळी आरामात गेलेले चालते मला ) क्या बोलते , आदूबाळ आणि ढेरे ?

अबापट Thu, 25/08/2016 - 13:44

In reply to by आदूबाळ

मला सकाळी ७ पासून केव्हाही चालेल ... ( इन फॅक्ट paradise सकाळी ७ वाजता शांत शांत असते , आणि कमी गलिच्छ ) तुम्हा लोकांचे बोला !!!!

अबापट Fri, 26/08/2016 - 22:37

In reply to by अनुप ढेरे

ठरले !!! हुश्श , शनिवार 3 सप्टेंबर ला मी म्हणजे बापट , आदूबाळ , ढेरे ,जंतू कॅफे पराडाईज येथे सकाळी 9 वाजून 1 मिनिटांनी भेटणार आहोत . ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांचे स्वागत P.S.1. ढेरे , तुम्ही 9 च्या पुढे केव्हाही चालेल असा आशीर्वाद दिल्यामुळे वेळ 7 वरून 9.01 केली आहे तेव्हा या , झेल देऊ नका.P.S.2 : जंतू आपणास विनम्र विनंती, आपण आदल्या दिवशीचे आकस्मित कार्यक्रम टाळून उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा

चिंतातुर जंतू Fri, 26/08/2016 - 11:02

In reply to by अबापट

>>चिं ज , बॉल तुमच्या कोर्टात आहे आता

सकाळी ७ला माझ्या कोर्टात (बोले तो अंगणात) पहाटदेखील झालेली नसते हो! ज्यांना शनिवारी सुटी नाही त्यांना सकाळी उशीरात उशीरा किती वाजता जमेल?

अबापट Fri, 26/08/2016 - 11:14

In reply to by चिंतातुर जंतू

सोयीची वेळ सान्गा चिंतातुर जंतू , त्याप्रमाणे ठरवू . मी आणि अदूबाळाने preferred वेळ सांगितली . ढेरेंना पण ७ वाजता काकडआरती वेळ वाटत आहे. सांगा तुम्ही , तुमची preferred लवकारातली लवकर वेळ , मग सगळे मिळून ठरवू !!!

चिंतातुर जंतू Fri, 26/08/2016 - 11:27

In reply to by अबापट

>>सोयीची वेळ सान्गा चिंतातुर जंतू

रोज सुमारे अकरा वाजता मी लोकांना भेटण्यासाठीच्या लायकीची किमान पातळी गाठतो, पण कामावर जाणारे लोक हे जमवू शकतील का? अन्यथा दहा वाजता येण्याचा प्रयत्न करू शकतो, पण आदल्या रात्रीच्या आकस्मिक घटनांमुळे उपरनिर्दिष्ट लायकीची पातळी न गाठताच घटनास्थळी दाखल होण्याचा (किंवा लाजेकाजेस्तव दाखलच न होण्याचा) धोका संभवण्याची शक्यता असते.

अबापट Fri, 26/08/2016 - 12:54

In reply to by मधुमुक्त

हि काय चुकून कॉपी पेस्ट आहे का आपण येणार आहात पॅराडाईज ला असे समजायचे ? ( cryptic message वरून काही नक्की लक्षात येत नाही हो , म्हणून हा प्रतिप्रश्न )

दाह Sun, 28/08/2016 - 22:43

In reply to by अबापट

अहो तसं नाही. म्हणजे काहीजण इथे अगोदरपासून एकमेकांना ओळखतात. केवळ त्यांचंच गेट टुगेदर आहे की सर्वांसाठी आहे इतकंच विचारायचं होतं.

May Thu, 01/09/2016 - 11:28

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लवकरच पर्शियन/फारसी भाषेचा वर्ग सुरु होत आहे.फारसी तज्ज्ञ राजेंद्र जोशी शिकवणार आहेत
अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
सुरुवात: दि. २४ सप्टेंबर २०१६ पासुन
कालावधी: ६ महिने
वेळ: दर शनिवार सकाळी ९.३० ते ११.३०
शुल्क: रु १०००/-
इच्छुकांनी ०२०-२४४७२५८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अबापट Fri, 02/09/2016 - 07:28

पुन्हा आठवण करून देतो उद्याच्या कट्ट्याची :

शनिवार ३ मे , सकाळी ९ वाजता कॅफे पॅराडाईज , कर्वे रोड , पुणे , सह्याद्री हॉस्पिटल च्या समोर .

ज्यांनी येणे कन्फर्म केले आहे असे सभासद :
आदूबाळ
अनुप ढेरे
मन
चिंतातुर जंतु
बापट
गंबा

अभ्या , अभिजित अष्टेकर , मधुमुक्त , बॅटमॅन .... चला लवकर यायचं ठरवा आणि या कट्ट्यावर ( आणि तसे कळवा इथे !!!)

उद्या एकमेकांना ओळखायचं कसं ? काही आयड्या आहेत का ?

चला अजून कोण कोण येणार ? सर्वांचे स्वागत !!!!

चिंतातुर जंतू Fri, 02/09/2016 - 12:49

In reply to by अबापट

>>उद्या एकमेकांना ओळखायचं कसं ? काही आयड्या आहेत का ?

मी मनोबाला ओळखतो. त्यामुळे तुम्हीही मनोबाला ओळखायला शिका, मग पुढचा मार्ग सुकर आहे ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 03/09/2016 - 00:12

In reply to by चिंतातुर जंतू

मी मनोबाला ओळखतो...

तो तुम्हाला ओळख दाखवणार का, हा प्रश्न कळीचा आहे.

असो; जंतूचं चित्र आहे की दिवाळी अंकात; तो सहज ओळखता येईल. (चित्रश्रेय : अमुक; संदर्भ )
जंतू

तिरशिंगराव Sat, 03/09/2016 - 11:12

मनोबाला की मनो बाला ? त्यावर अवलंबून आहे.

adam Sat, 03/09/2016 - 22:01

In reply to by अनुप ढेरे

फारसं लक्षात काही नाही. गप्पा भरपूर झाल्या. मनसोक्त झाल्या. पण खूपदा ग्रुपमध्ये लै गप्पा झाल्या, टाळ्या दिल्या....भरपूर हसलो नि मग उथून आपल्या कामाला लागलो की मुळात नक्की काय आणी किती बोललो ते नेमकं लक्षात रहात नाही (निदान माझ्या तरी). तसं सध्या झालय. त्यामुळं अगदिच त्रोटक अति अति संक्षिप्त आठवतय ते दोन चार वाक्यात लिहितो.
मी गेलो तोवर लोक ऑलरेडी जमलेच होते. मी जॉइन केलं टेबल. माझ्या डावीकडे अण्णा बापट (काका ?) बसले होते. थोड्यावेळाने चष्मिश फ्रेंच दाढीवाले जंतू आले. ते उजवीकडे होते. माझ्या बरोब्बर समोर दाढीवाला,हॅण्डसम,दाट लांब केसांचा आदुबाळ. आदुबाळच्या डावीकडे गम्बा(काका ?) . आदुबाळच्या उजवीकडे दाढीवाला चश्मिश अनुप ढेरे. अनुप ढेरेच्या उजवीकडे ऋ (तोच तो संतुलितसम्राट ऋ) त्याच्या बरोब्बर समोर भरदार,धिप्पाड घनु. जंतू आल्यावर एकदम मंडळी उठून उभी राहिली. चिंजंना साइट वगैरे चालवायचे पैसे मिळत नाहित म्हणे.
अनुप ढेरे व अण्णा बापट फुके आहेत. सिगारेट पितात. आदुबाळ व ढेरे दोघे भरपूर दाढी वाढवून आलेले. आदुबाळ हॅण्डसम दिसतोच. बोलायची ढबही मस्तय. थेट्रात ट्राय करु शकेल. गब्बर, बॅट्या, अजो, पटाइत, शुचि , न वी बाजू ह्या सदस्यांची (आणी ऑफकोर्स अनुराव ह्या बॉट/कॉम्प्युटर प्रोग्रामची!) विविध कारणांनी आठवण निघाली. तेवढ्यात भरदार घनु आला.
चर्चेतले काही रॅण्डम मुद्दे/वाक्य --
युरोपही काही सगळा स्वच्छ स्वच्छ , भारी वगैरे नाहिये. तिथेही काही ठिकाणी घाण, अस्वच्छता आहे. युरोपातलाही मोठ्ठा समाज काही दशकांपूर्वीपर्यंत दारिद्र्यात होता.
काही दशकांपूर्वीचे "कट्टा" अनियतकालिक भारी आहे. त्याकाळातला तो टारगटपणा, वात्रटपणा आहे. थोडक्यात जालिय टवाळगिरीची छापील आवृत्ती. म्हटलं तर भंकस/टैम्पास. पण त्या भंकसमध्येही एक क्वालिटी. झक्कास आणी धम्माल प्रकार.
जंतूंना फ्रेंच शिकून दोनेक दशकं झालित. विशेष कारण ट्रिगर असा काही नाही शिकायचा. फक्त हौस्/आवड म्हणून.
राकु, अजो मस्त आय डी होते.
युरोप/पश्चिम जगत समृद्ध आहे म्हणून तिथे तुलनेने प्रगती वगैरेचा विचार होतो की मग प्रगती/उन्नतीसाठी ते प्रयत्न करतात म्हणून ते समृद्ध आहेत ?
उत्तम कांबळे ह्यांचा समलैंगिकांबद्दलचा ताजा लेख....
नारायण मूर्ती ह्यांचा तथाकथित साधेपणा.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या गमतीजमती. पर्सिस्टंटचं आय पी ओ ऐनवेळी पुल आउट करावं लागणं.

.
.
निघताना ड्रग्ज, अफू, गांजा, हिप्पी, महेश योगी, बीटल्स , त्या काळातलं पश्चिमेतलं समाज जीवन, हिप्पीगिरी त्यांना परवडू शकण्याची कारणं, मुळात हिप्पीगिरीची ती मर्यादित का असेना पण ती क्रेझ निर्माण होण्याची संभाव्य कारणं वगैरे बाबींबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या.

बाकींच्यांना जे असं आठवतय त्यांनी अधिक भर घालावी. मला ऋ, घनु, ढेरे ह्यांच्या बाजूचं फारसं काही ऐकू येत नव्हतं. खुर्च्या सरकवण्याचा सतत आणी भरपूर आवाज होत होता.शिवाय ट्राफिकचे भोंगे वगैरे होत होते.
वृत्तांतातून वाटत्य तसं सगळं शिरेस वगैरे नव्हतं. गप्पा विंट्रेश्टिंग होत्या. शिवाय हसणं खिदळणं वगैरेही झालं. पण सविस्तर नेमकं आठवत नाहिये. मी जरा व्यग्र असेन. काही दिवस तरी लॉगिन होणार नाहिये सध्या.
.
.
कट्टेकर्‍यांनो, नारायण मूर्तीने जो लेख अझीम प्रेमजी ह्यांच्याबद्दल मोठ्या आदराने, कौतुकाने लिहिलाय , तो हा लेख --
http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/the-azim-premji-i…
जरुर वाचा.

मुळात नक्की काय आणी किती बोललो ते नेमकं लक्षात रहात नाही

यापुढे कट्ट्यांना टंकनिका (की टंचनिका? ;)) ठेवावी अशी सूचना करते.
.

मी गेलो तोवर लोक ऑलरेडी जमलेच होते.

म्हणजे तू लेट्लतिफ होतास ;)
.

घनु. जंतू आल्यावर एकदम मंडळी उठून उभी राहिली.

हाहाहा
.

गब्बर, बॅट्या, अजो, पटाइत, शुचि , न वी बाजू ह्या सदस्यांची (आणी ऑफकोर्स अनुराव ह्या बॉट/कॉम्प्युटर प्रोग्रामची!) विविध कारणांनी आठवण निघाली

काय रे सांग की आमची काय काय बदनामी केलीस ते. :(
.
बाकी वृत्तांताचे प्रत्येकाचे (अनसेन्सॉर्ड) व्हर्जन येऊ द्यात ;)

आदूबाळ Mon, 05/09/2016 - 12:12

कट्ट्यांना मी नेहेमी लवकरच पोचतो. कारण क्रमाक्रमाने येणार्‍या प्रत्येकाशी शेप्रेट गफ्फा मारता येतात.

मी पॅरेडाईजला पोचलो तेव्हा बाहेर चार लोक घोळका करून उभे होते. एकाच्या हातात पुस्तक, आणि त्याबद्दल तो पुस्तकधारी माणूस तावातावाने बोलत होता. बाकीचे लोक भक्तिभावाने ऐकत होते. ऐसीच्या कट्ट्याला पुस्तक असणे हा प्रंप्रेचा भाग असल्याने मला वाटलं हेच ते. पण आयडींची जी प्रतिमा बाळगत होतो त्याप्रमाणे काही वाटेनात. तरी रेंगाळलो, पण ते आपापल्या दुचाक्यांवरून लवकरच निघून गेले.

मग अ० बापटांना फोन लावला, तर ते आत मोक्याचं टेबल धरून बसले होते. त्यांच्यासमोर एक माणूस बसला होता. पण मी आल्यावर तो उठून, माझ्याकडे ढुंकूनही न पाहता चालता झाला. बॉडीगार्ड असावा.

अ० बापट मध्यमवयीन आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरून आणि देहबोलीवरून त्यांनी भरपूर ग्रामारक्तीकरणलीळा केल्या असाव्यात असा माझा समज झाला, आणि पुढे तो खरा ठरला. माझ्या ओळखीच्या अन्य बापटांच्या पठडीत ते बसत नसल्याने त्या अर्थीही ते "अबापट" आहेत. ते काय व्यवसाय करतात ते त्यांनी समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला, पण ते मला नीटसं समजायला नाही. पण कॉर्पोरेट / कन्सल्टिंग क्षेत्रात कमावलेला सर्वज्ञ चेहरा करून मी मान डोलावली.

थोड्या वेळाने एक उंचसा माणूस आत येऊन शोधक नजरेने इकडेतिकडे पाहू लागला. अबापटांनी "कोणाला शोधताय?" असा खडा सवाल टाकल्यावर ते गम्बा निघाले. गम्बा धरून आता पुढील सर्व कट्टेकरी सॉफ्टवेअर / टेक्नॉलॉजी क्षेत्रातले आहेत. गम्बा मिपा आणि ऐसीवर बहुदा-वाचनमात्र-आणि-क्वचित-प्रतिसादमात्र असतात. एकदम शांत माणूस आहे. त्यांनी जास्त लिहायला हवं.

मग भाग मिल्खा भागमधल्या मिल्खासारखा दिसणारा एक माणूस आला. ते ढेरेशास्त्री आहेत हे कळल्यावर मला कैक रिश्टर स्केलचा धक्का बसला. माझ्या डोळ्यांसमोर ढेरेशास्त्रींची प्रतिमा ग्रंथांचे भारे वागवणार्‍या प्रकांड पंडिताची होती. मान तिरकी करून क्लासिक माईल्डसचा धूर इंजिनासारखा वर आणि मागे सोडून द्यायची त्यांची हातोटीही वाखाणण्यासारखी आहे.

एव्हाना गप्पांची गाडी "मराठी आंजाचा सुरस आणि चमत्कारिक इतिहास" या विषयाकडे वळली होती. तेव्हा ढेरेशास्त्रींनी त्यांच्या हपीसात अनेक लोक मआंजा उघडून बसतात अशी माहिती दिली. यातच अबापट तात्या अभ्यंकरांना ओळखतात असं त्यांनी सूचित केलं. "तुम्हाला ऐसीचा शोध कसा लागला" हा प्रश्न त्यांना विचारून घेतला, तेव्हा "रँडमली लागला" असं गूढ उत्तर मिळालं.

मनोबा आला तेव्हा नेमकी ढेरेशास्त्रींची इंजिनवेळ झाली होती. त्यामुळे त्यांना तो प्रथम दिसला. मनोबा बसने येणार होता, पण आयत्या वेळी दूरवरून मोटरसायकल हाणत आला. चर्चेचा रोख त्यानिमित्ताने मूळस्थानांकडे वळला, तेव्हा उपस्थितांपैकी बरेच लोक पुणे-३०च्या "वन स्क्वेअर माईल"मधले आजी किंवा माजी रहिवासी आहेत हे निष्पन्न झालं. त्यावरून आधीचा मआंजाचा धागा पकडून संस्थळांचा डावे-उजवेपणा यावर एक बारीक चर्चा झाली. त्यात "गब्बर इतक्या उजवीकडे आहे की जग डावीकडे दिसतं" वगैरे चर्चाही झाल्या.

मग थोड्या वेळाच्या अंतराने ऋ आणि घनु आले. ऋला मी आधी कट्टा-वृत्तांतात पाहिलं होतं, आणि त्याचा जालीय वावर आणि प्रत्यक्ष वावर यात काही फरक वाटला नाही. त्याने "बोभाटा डॉट कॉम" नावाच्या नव्या इन्फोमर्शियल संस्थळाची माहिती दिली. इन्फोमर्शियल हा शब्द ऐकल्यावर मी परत तो कॉर्पोरेट चेहरा करून मान डोलावली.

घनु या आयडीनामावरून आणि जालीय वावरावरून माझ्यासमोर स्वप्नील जोशी टैप चित्र उभं राहिलं होतं. पण प्रत्यक्षातला घनु कोणालाही बुक्कीत ठार करू शकेल. पण त्याला गणपतीची खरेदी करण्यासाठी हायर अ‍ॅथॉरिटीजनी रविवार पेठेत पिटाळलं आहे हे समजल्यावर तो बाऊन्सर नसून स्वप्नील जोशीत्व कायम आहे यावर विश्वास बसला.

या दोघांशी माझं जास्त बोलणं होऊ शकलं नाही, कारण दोघेही टेबलाच्या टोकाला बसले होते. फिर कभी...

मग थोड्या वेळाने चिंजं आले. चिंजं मोजकंच बोलतात. पूर्वी ते भरपूर लिहीत असत, पण हल्ली दोन्हीकडे लंघन करायचं ठरवलेलं दिसतंय. अबापटांनी त्यांना मालक मालक म्हणून लय त्रास दिला. त्यावर ऐसीचे मालक नक्की कोण असा परिसंवाद झडायला लागला, पण चिंजंनी "व्यवस्थापन अपौरुषेय असतं" वगैरे सांगून विषयाला कात्रज दाखवला. गम्बा यांनी ऐसीवर मोजकं लेखन होतं अशी तक्रार केली. त्यावर मनोबा, ढेरेशास्त्री यांनी अजो आणि राकु या मेगाबायटींच्या मक्तेदारांची आठवण काढली. मग त्याच अनुषंगाने बॅट्या (आणि त्याचं संशोधन), अनुराव, शुचि (आणि त्यांचे आयडी) वगैरे चर्चा निघाल्या.

बाकी मनोबाने चर्चांचे गोषवारे लिहिले आहेतच. (मनोबा उत्तम नोट्स काढतो असं निरीक्षण आहे. त्याने मागे बसच्या तिकिटावर लिहिलेल्या व्याख्यानाच्या नोट्सवरून आख्खा धागा काढला होता. कॉलेजमध्ये त्याच्या नोट्सवर पुढच्या पाचसहा पिढ्या पास झाल्या असणार.)

मध्येमध्ये चहाचं आचमन सुरू होतंच. मी आठेक कप तरी चहा प्याला असेल.

बाहेर एक फोटोसेशन झालं. त्यात क्यामेरा माझा आणि फोटोग्राफर पॅरेडाईजचा वेटर असल्याने गाडीच्या आरश्याचं रिफ्लेक्शन येणे वगैरे प्रकार झाले. ते गोड मानून घ्यावेत.

फोटोसेशननंतर माझ्या मनात सध्या असलेला एक प्रश्न विचारला - "ऐंशीच्या दशकात लोक नार्कोटिक्सची नशा कशी करत होते?". त्यावर माहितीचा अक्षरशः धबधबा कोसळला. त्याचं संगतवार संकलन केलं तर एक उत्तम लेख किंवा किमानपक्षी विकीपान तरी होईल. (कुठे आहेत माहीतगारमराठी?)

मला आणखी टायमपास करायची इच्छा होती, पण घरगुती शक्तींनी बोलावल्यामुळे नाईलाज होऊन मी निघालो.

जास्त भावुक होत नाही, पण मला मस्त मजा आली.

____________
Painting the town red
पण बुचडाविरहित
शब्द चुकला असेल कदाचित

अभ्या.. Mon, 05/09/2016 - 14:06

In reply to by आदूबाळ

सुरेख. जोरात झालाय कट्टा.
सगळ्या पुणे तीसात एक सोलापूर चार लावायची फार इच्छा होती पण दैवगतीपुढे आणि दारातल्या गिर्‍हायकांपुढे विलाज नाही. मनोबा अगदीच शाळकरी दिसतोय फोटोत. मी त्याला दै. सकाळचा डीटीपी ऑपरेटर म्हणायला कमी केले नसते. चिजं मात्र अपेक्षेबरहुकुम. ऋ ची इमेज पण वेगळीच वाटली(फोटो पाहता) तो सकाळचाच सोलापूर निवासी संपादक म्हणून खपून जाईल. ढेरेशास्त्री जोरात. स्वीसआर्मीच्या अटेन्शनात एकदम. आन्ना बापट हे कुणी जुने मिपाकर निघताहेत की काय ही भीती होती. खोटी ठरवल्याबद्दल धन्यवाद. आदूबाळा हा साखरसम्राटाच्या ज्येष्ठ पुत्राप्रमाणे (जो स्वतः राजकारण करतो पण दिसत नसतो. बॅनरावर धाकटे राजे असतात. कार्यकर्ते मात्र बाळासाहेबाचा फोन आल्याशिवाय जागेवरुन हलत नसतात) वाटतोय. खिशात घातलेल्या हातात एकात दोन आयफोन आन दुसर्‍यात ग्लॉक पिस्टल असावे असा दाट संशय आहे. चर्चाविषय पाहता कट्ट्यात एखादा इंटेलिजन्सवाला असावा अशी पण शंकाय. घनुरावांशी परिचय नाही पण फोटोवरुन त्यांच्या बुक्कीचा अंदाज येतोय.

अभ्या.. Mon, 05/09/2016 - 15:15

In reply to by आदूबाळ

सुरेख. जोरात झालाय कट्टा.
सगळ्या पुणे तीसात एक सोलापूर चार लावायची फार इच्छा होती पण दैवगतीपुढे आणि दारातल्या गिर्‍हायकांपुढे विलाज नाही. मनोबा अगदीच शाळकरी दिसतोय फोटोत. मी त्याला दै. सकाळचा डीटीपी ऑपरेटर म्हणायला कमी केले नसते. चिजं मात्र अपेक्षेबरहुकुम. ऋ ची इमेज पण वेगळीच वाटली(फोटो पाहता) तो सकाळचाच सोलापूर निवासी संपादक म्हणून खपून जाईल. ढेरेशास्त्री जोरात. स्वीसआर्मीच्या अटेन्शनात एकदम. आन्ना बापट हे कुणी जुने मिपाकर निघताहेत की काय ही भीती होती. खोटी ठरवल्याबद्दल धन्यवाद. आदूबाळा हा साखरसम्राटाच्या ज्येष्ठ पुत्राप्रमाणे (जो स्वतः राजकारण करतो पण दिसत नसतो. बॅनरावर धाकटे राजे असतात. कार्यकर्ते मात्र बाळासाहेबाचा फोन आल्याशिवाय जागेवरुन हलत नसतात) वाटतोय. खिशात घातलेल्या हातात एकात दोन आयफोन आन दुसर्‍यात ग्लॉक पिस्टल असावे असा दाट संशय आहे. चर्चाविषय पाहता कट्ट्यात एखादा इंटेलिजन्सवाला असावा अशी पण शंकाय. घनुरावांशी परिचय नाही पण फोटोवरुन त्यांच्या बुक्कीचा अंदाज येतोय.

अबापट Mon, 05/09/2016 - 16:34

In reply to by आदूबाळ

नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण. फोटो सेशन नंतरच्या उत्तरार्धाची वाट बघतोय . अदिती आणि घासकडवीं यांच्या वरील मालकविषय तू न लिहिल्यामुळे तुझा वेलींगकर होणार बहुधा. (आणि ते dc चे बापट कोण ? ) मालक लोक ( जे कोण आहेत ते ) या विषयावर प्रकाश टाका. आदूबाळ , बॉडीगार्ड नि तुला नीट बघून ठेवला आहे....

चिंतातुर जंतू Tue, 06/09/2016 - 11:53

In reply to by आदूबाळ

>>"ऐंशीच्या दशकात लोक नार्कोटिक्सची नशा कशी करत होते?". त्यावर माहितीचा अक्षरशः धबधबा कोसळला. त्याचं संगतवार संकलन केलं तर एक उत्तम लेख किंवा किमानपक्षी विकीपान तरी होईल. (कुठे आहेत माहीतगारमराठी?)

हा विषय निघाल्यावर मी मोजकंच बोललो की अधिक? - जस्ट क्यूरियस ;-)

अबापट Tue, 06/09/2016 - 12:30

In reply to by चिंतातुर जंतू

" हा विषय निघाल्यावर मी मोजकंच बोललो की अधिक? - जस्ट क्यूरियस (डोळा मारत)"

आपण मोजकंच बोललात पण तेही अधिक होतं :) आता एकदा मोजक्यापेक्षा अधिक बोलण्यासाठी तुमची सवडीची वेळ सांगावी , म्हणजे अधिक जानकारी प्राप्त कर सकेंगे , कसें ?

आदूबाळ Tue, 06/09/2016 - 12:48

In reply to by चिंतातुर जंतू

जे बोललात ते मी ज्यासाठी विचारत होतो त्यासाठी रिलेव्हंट होतं. तुम्हाला सविस्तर व्यनि करणार आहे. (मी काही नावं चुकीची ऐकली असण्याची शक्यता आहे.)

चिंतातुर जंतू Wed, 07/09/2016 - 11:29

In reply to by आदूबाळ

>>आता एकदा मोजक्यापेक्षा अधिक बोलण्यासाठी तुमची सवडीची वेळ सांगावी , म्हणजे अधिक जानकारी प्राप्त कर सकेंगे , कसें ?

>>तुम्हाला सविस्तर व्यनि करणार आहे.

वेलकम!

ऋषिकेश Wed, 07/09/2016 - 09:13

In reply to by आदूबाळ

मला आदुबाळ बघायचा होता. त्यामुळे कट्टा टाळणं सर्वस्वी अशक्य होतं. मराठी सारस्वतात (किती दिवसं लिहायचा होता हा शब्द) एकापेक्षा एक अनमोल रचना प्रसवणार्‍या हा बाळआदूला पुण्यात अवतरूनही न पाहणं म्हणजे साक्षात सरस्वती समोर 'चा चा चा' करत असताना कानात मराठी चित्रपट संगीत लाऊन डोळे मिटून बसण्यासारखंच होतं (कट्ट्याला न आलेल्यांचं हे वर्णन आहे बरं!..). आदुबाळ माझ्या अपेक्षेविरहीत अतिशयच न-पुणेकर वाटला. चक्क हसत वगैरे होता, एरवीही चेहर्‍यावर आठी नव्हती. त्यामुळे आवडूनच गेला. बाकी कोणताही एक विषय २ मिनिटांवर न टिकल्याने कट्टा रंगला असेच म्हणायला हवे. अर्थात कट्टोत्तर उभ्या गप्पा बर्‍याच 'नशील्या' असल्याने तेव्हाचं काही फारसं लक्षात नै. :प (आणि होय ढेरेशास्त्रींची धुरावण्याची इष्टाईल खासच नजाकतभरी ए याच्याशी सहमती! प्यायची तर तशी नजाकत असेल तर! असं वाटून जावं इतकी!)

या विठोबासोबत पॅरेडाईजचंहं बर्‍याच वर्षांनी दर्शन झालं. बरंच माणसाळलंय पॅरेडाईज असं वाटलं. गिरण्या बंद पडल्यावर लालबाग-परळ भागात चिमण्या दिसायच्या पण धूर काही यायचा नाही. तसं काहीसं इथे फुकाडे दिसत तर होते पण हाटील धुरावलंय असं झालं नाही (पुर्वीचं पॅरेडाईज र्‍हायलं नाही)

एकुणात बर्‍याच दिवसांच्या तकातकीनंतर चार घटका मस्त मजेत गेल्या!

(टिपः बापटांना भेटाल तर पेनाने लिहायची प्रॅक्टिस करून ठेवा. मला पेन वगैरे इतक्या पुरातन आयुधांनी काही करायचं इतकं अप्रूप वाटलं म्हणून सांगू! ;) )

अबापट Sat, 10/09/2016 - 16:06

In reply to by ऋषिकेश

>>>टिपः बापटांना भेटाल तर पेनाने लिहायची प्रॅक्टिस करून ठेवा. मला पेन वगैरे इतक्या पुरातन आयुधांनी काही करायचं इतकं अप्रूप वाटलं म्हणून सांगू!

च्यायला , मी तुमच्या आधीच्या पिढीतला वगैरे आहे हे ठीक आहे , पण पेन वापरणे हे इतके निअँडर्थल वगैरे काळातील होते हे ऐकून नवल वाटले ... आणि राव तुम्हीही अगदी काही फार भावी काळातले वगैरे वाटला नाहीत ;) , ( आणि हे उगाचच : मनोबा तर अगदी आमच्या पिढीतला वाटला , तश्याच ओझ्यांसकट ... @ मनोबा : सबुरी व थंडावा वगैरे )

>>>>चार घटका मस्त मजेत गेल्या!
हे महत्वाचें ,,, कसें ?

चिमणराव Tue, 06/09/2016 - 06:33

आता रात्री अभ्या..ने फोटो टाकल्यावर वृतान्ताकडे आलो.सर्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या लिखाणशैलींतून प्रतित होणाय्रा अपेक्षित वयाप्रमाणेच आहे.पॅरडाइज नावही सार्थ आहे.
एकदा का समोरासमोर भेटलो की त्यानंतर त्या व्यक्तीच्या लेखन/विचारांवर टिका करण्याची धार कमी होते अथवा तसे करताना हात आखडतो असं मला वाटतं.मराठी आंजावरचा कुणीएक हे न राहता आपल्या सोसायटीत राहणारा एक मेंबर होतो आणि त्याच्याशी जसे जातायेता भेटल्यावर संयमित वागतो तसं होतं.

बिटकॉइनजी बाळा Tue, 06/09/2016 - 11:32

>>आता रात्री अभ्या..ने फोटो टाकल्यावर वृतान्ताकडे आलो.

कुठे आहेत फोटो?
मलाच दिसत नाहीत की अजून कोणाला दिसत नाहीत?

अबापट Wed, 07/09/2016 - 15:24

In reply to by चिमणराव

>>> तुमची शैली पाहता आणि फोटो पाहून :::

फोटो आणि शैली यावरून हा प्रश्न का आला हे काही समजले नाही ,,

>>>> इतक्या वर्षांत मराठी संस्थळं कशी काय सापडली नाहीत?

शोधलीच नाहीत म्हणून सापडली नसावीत .

Actually " रॅन्डमली " असं उत्तर देणार होतो , पण ते उत्तर आदूबाळ यांनी ऑलरेडी ' गूढ ' वगैरे ठरवलंय , त्यामुळे ते उत्तर बाद झाले आहे

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/09/2016 - 22:08

In reply to by अबापट

" रॅन्डमली " हे उत्तर गूढच आहे. नक्की काय शोधत होतात तेव्हा मराठी संस्थळं सापडली, ह्याचं ठोस, न्यूटोनियन, प्रेडिक्टेबल, वगैरे उत्तर हवंय.

अनु राव Thu, 08/09/2016 - 09:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"पॉर्न" बद्दल काही सर्च मारला "रँडमली" तर ऐसी चे नाव येण्याची शक्यता आहे ना अदिती तै.

चिमणराव Thu, 08/09/2016 - 07:27

तुम्ही कट्ट्याचा उल्लेख केल्यावर "अण्णा बरेच रिसॅार्सफुल आहेत" असा एकाने ( अभ्या..?)म्हटलं होतंच.दुसय्रा एका लेखात "जालावरचा कंटेंट'मध्ये एक मुद्दा मांडायचा राहिला तो म्हणजे गुगलशोध करताना मराठी/देवनागरी शब्दांनी काही शोधतात का लोक? तसं केल्यानेच मी मराठी संस्थळांवर पोहोचलो होतो.

अबापट Sat, 10/09/2016 - 11:26

In reply to by चिमणराव

म्हणजे गुगलशोध करताना मराठी/देवनागरी शब्दांनी काही शोधतात का लोक ?

काही कल्पना नाही हो . (मी कसा इथे पोचलो हे मलाच माहित/आठवत नाहीये. त्यामुळे रॅन्डमली असे उत्तर दिले होते ते एक्दम गूढ वगैरे करून टाकले पब्लिक ने )

अबापट Fri, 09/09/2016 - 17:32

अरे लेको , सगळे सगळे टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर वाले म्हणवता( मी सोडून ) , ते खरडफळ्यावरचे फोटो मूळ धाग्यावर चिकटवा कि जरा , ( गेल्या कट्ट्याचे बघा कसे झळकताहेत )

अबापट Fri, 09/09/2016 - 19:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती ,,, धन्यवाद !! बघा लेको शेवटी मदत अमेरिकेहूनच मागवावी लागते ... ( मोगॅम्बो, गब्बर खुश हुआ !)

अबापट Sat, 10/09/2016 - 19:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

1. अमेरिकेचं अप्रूप असे नसून , देशी लोकांच्या तांत्रिक अस्मितेची तीव्र शब्दात निर्भत्सना होती ती . ( काय लिहिलंय मी हे ?) 2. जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल जाहीर निषेध। 3. मी निर्मळ मनाने आपणास धन्यवाद दिले ना ? मग ताडनं किं निमित्तम ?

बॅटमॅन Sat, 10/09/2016 - 22:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटी बाईलाच असल्या म्हारक्या करायला लावता!

एरवी टोकदार फडतूसवादी अस्मिता असूनही खुश्शाल जातिवाचक शब्द वापरणे यातून छुपा मनुवादच दृग्गोचर होतोय खरा. लाज कोळून प्यालेल्यांना त्याचे काय म्हणा.

अरविंद कोल्हटकर Sun, 11/09/2016 - 02:42

In reply to by बॅटमॅन

ह्यात नवीन काहीच नाही. ह्याच लिबरल फेमिनिस्ट बाईंनी एकदा 'कोणाला कशाचं तर बोडकीला केसांचं' असे म्हणून जगातल्या सर्व बोडक्यांचा उद्धार केला होता. आम्ही ते विसरलो नाही आहोत.

अनु राव Wed, 14/09/2016 - 10:16

In reply to by बॅटमॅन

संतुलन शिरोमणी ऋषिकेश संपादक राहीले नसल्यामुळे असेल कदाचित.
---
अदिती तै, तू काही चुकीचे लिहीले नाहियेस. लोक उगाचच जुने स्कोअर सेटल करतायत.

बॅटमॅन Wed, 14/09/2016 - 16:32

In reply to by अनु राव

अदिती तै, तू काही चुकीचे लिहीले नाहियेस. लोक उगाचच जुने स्कोअर सेटल करतायत.

म्हणजे जातिवाचक आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे काही वाटत नाही तर तुम्हांला.

अबापट Wed, 14/09/2016 - 17:17

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन , मला असे वाटते कि केवळ वादाकरिता वाद वाढवू नयेत . संदर्भ बघा . 'त्यांच्या ' उर्वरीत लिखाणावरून त्या सरंजामशाही जातीय वादी प्रवृत्तीने मागासवर्गीयांच्या बाबतीत तुच्छता पूर्वक उल्लेख करत असतील असे वाटत नाही ( unless तुम्ही संपूर्ण पुरुष वर्गाला मागासवर्गीय मानत असलात..... ) , तेव्हा सोडा आता . फार तांत्रिक होऊ लागलंय
अवांतर : मी मात्र ' भटजीगिरी ' हा शब्द बऱ्याच वेळा तुच्छतेने वापरतो , माझ्या अनेक पूर्वजांनी उदर्निर्वाहाकरिता तेच केलेलं असणार . तरीही . तेव्हा संदर्भ बघणे महत्वाचे. कसें ?

बॅटमॅन Wed, 14/09/2016 - 17:29

In reply to by अबापट

बॅटमॅन , मला असे वाटते कि केवळ वादाकरिता वाद वाढवू नयेत . संदर्भ बघा .

बापटाण्णा, वादाकरिता वाद वाढवत नैये. बिनदिक्कतपणे असे शब्द वापरणार्‍यांना त्यामागची पार्श्वभूमी वगैरे जरातरी काही जाण आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होते. आणि कायम मॉरल हाय ग्राउंडवरून इतरांना जज करू पाहणार्‍यांच्या इंटेग्रिटीबद्दल प्रश्न उत्पन्न होऊन त्यांच्या एकूणच मानसिक बैठकीबद्दल, वैचारिक अवस्थेबद्दल अतिशय काळजी वाटू लागते.

अबापट Wed, 14/09/2016 - 17:42

In reply to by बॅटमॅन

>>>> त्यामागची पार्श्वभूमी वगैरे जरातरी काही जाण आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित होते.

हे जरी खरे वाटले/असले , तरी हा दोष आपल्या जवळ जवळ संपूर्ण समाजातच आहे असे मला वाटते . काहींच्या लेखणीत , तर बहुतेकांच्या मनात .
लिहिताना संवेदनशीलतेचा आणि तारतम्याचा अभाव या सदरात मी तरी हे टाकीन . संपूर्ण समाजाचे आपण काय करणार. का सापडला तो आणि फक्त तोच चोर.. नाही सापडला तो .... असे म्हणायचे आहे तुम्हाला

>>> कायम मॉरल हाय ग्राउंडवरून इतरांना जज करू पाहणार्‍यांच्या इंटेग्रिटीबद्दल प्रश्न उत्पन्न होऊन त्यांच्या एकूणच मानसिक बैठकीबद्दल, वैचारिक अवस्थेबद्दल अतिशय काळजी वाटू लागते.

या बद्दल मी काय बोलणार ? आख्खे पुणे ( आणि पुणेरी पणा बद्दल लिहिणारे इतर सर्व ) याच काळजीस लायक नाहीयेत का ?

>>> त्यांच्या ' उर्वरीत लिखाणावरून त्या सरंजामशाही जातीय वादी प्रवृत्तीने मागासवर्गीयांच्या बाबतीत तुच्छता पूर्वक उल्लेख करत असतील असे वाटत नाही ( unless तुम्ही संपूर्ण पुरुष वर्गाला मागासवर्गीय मानत असलात..... ) ,

याबद्दल काय म्हणता ?

बॅटमॅन Wed, 14/09/2016 - 17:53

In reply to by अबापट

ऐसीवरच्या घमासान चर्चा ज्याने पाहिल्या नसतील त्याला असे वाटणे साहजिक आहे. असूदे.

शिवाय ज्या व्यक्तीने ही मुक्ताफळे ओरिजिनली उधळली त्याला आपण काहीतरी चुकीचे बोललो इतकेही कळत नसेल आणि कळूनही वळत नसेल तर अवघड आहे.

अनु राव Wed, 14/09/2016 - 17:23

In reply to by बॅटमॅन

जातीमुळे त्या प्रकारच्या कामाला ते नाव पडले असे नसुन त्या कामामुळे ते करणार्‍यांना ते नाव पडले.
केस कापणारा न्हावी मग तो कोणत्याका जार्तीचा असो.

.शुचि Wed, 14/09/2016 - 17:59

In reply to by बॅटमॅन

रोचक हा नवीन तिरकस शब्द मुसुंनी काढला माझ्या आठवणीप्रमाणे. मला तो धागा आठवत नाही. पण क्षण आठवतो आहे जेव्हा मला त्या कल्पनेचे कौतुक वाटले होते :) एखाद्याची चूक लक्षात आणुन द्यायचा प्रचंड पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह मार्ग :)

गब्बर सिंग Thu, 15/09/2016 - 04:02

In reply to by अनु राव

जातीमुळे त्या प्रकारच्या कामाला ते नाव पडले असे नसुन त्या कामामुळे ते करणार्‍यांना ते नाव पडले.
केस कापणारा न्हावी मग तो कोणत्याका जार्तीचा असो.

अनु राव ला थेट प्रश्न -

व्यक्ती ज्या कुटुंबात जन्मास येते त्या कुटुंबाचा व्यवसाय त्या व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय म्हणून स्वीकारलाच पाहिजे व स्वीकारत नसेल तर तिला बलपूर्वक तो तसा स्वीकारायला लावावा - हे अनु राव च्या मते योग्य की अयोग्य ?

( माझ्या मते अयोग्य. )

अनु राव Thu, 15/09/2016 - 09:12

In reply to by गब्बर सिंग

स्वतःचा व्यवसाय म्हणून स्वीकारलाच पाहिजे व स्वीकारत नसेल तर तिला बलपूर्वक तो तसा स्वीकारायला लावावा - हे अनु राव च्या मते योग्य की अयोग्य ?

माझ्या मते पण पूर्ण पणे अयोग्य.

गब्बर सिंग Sat, 10/09/2016 - 22:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला अमेरिकेचं अप्रूप! मी म्हटलं असतं, शेवटी बाईलाच असल्या म्हारक्या करायला लावता!

(सर्व प्रकारचा भेदभाव हा योग्य असतो असं मी मानतो. सिरियसली. पण ...)

डॉक्टर, तुम्ही सुद्धा !!!

अट्रॉसिटीज अ‍ॅक्ट वगैरे वगैरे...

अबापट Sun, 11/09/2016 - 15:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती अक्का , जरा जपून गो बाये .तू जातेस ( बहुधा ) मराठी म्हणींचा उद्धार करायला ,पण गडबड होते काही शब्दांनी!!

अरविंद कोल्हटकर Thu, 15/09/2016 - 04:25

In reply to by अबापट

चिक्षिप्तबाईच्या 'कोणाला कशाचं तर बोडकीला केसांचं' ह्या म्हणीच्या वापरासंबंधाने मी जे वर लिहिले होते ते मला हा संवाद खेळकर मूडमध्ये चालला आहे अशी माझी समजूत झाल्यामुळे लिहिले होते. त्याला आता वितंडवादाचे स्वरूप येऊ लागले आहे असे मला वाटते. सबब माझी वरची प्रतिक्रिया मी मागे घेत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/09/2016 - 04:48

In reply to by अरविंद कोल्हटकर

मी बरेच दिवस हा धागा उघडला नव्हता. जातीयवादी कॉमेंटवरून खरडफळ्यावर काहीतरी चालू होतं ते दिसलं होतं, पण वेळ नव्हता म्हणून सोडून दिलं. ते मूळ इथे आहे होय!

कोल्हटकर, तुम्ही प्रतिसाद मागे घेण्याची गरज नाही. तुम्ही माझी टिंगल केलीत, मी त्यावर हसले किंवा आपण एकत्र हसलो, विषय संपला. ज्यांना विनोद समजत नाहीत त्यांचं नुकसान झालं तर ती आपली जबाबदारी नाही.

अण्णा बापट, मी तुमच्याशी मस्करीच करत होते. बाकीच्यांना जो वाद, गोंधळ, आणखी काही घालायचंय ते घालू दे.