अलीकडे काय पाहिलंत - १८

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.

***

'पर्मनंट रुममेट' नावाची भारतातील पहिली वेब-सिरीज बघितली.(याबद्दल इथे वाचता येईल).

प्रासंगिक नर्मविनोदी सिरीज हल्लीच्या सासबहु आणि मेक-अपचे दुकान असणार्‍या सिरीयर्ल्सच्या पार्श्वभूमीवर आवडून जाते. अगदी हल्लीचे विषय, भाषा, सहजता, विनोद लगेच कनेक्ट करते. त्यात सिरीजचा हा पहिला सिझन आहे केवळ ५ भागांचा.

सिरीजमध्ये सेक्स, लिव्ह इन इत्यादीबद्दल उघड संवाद आहेत. मी ही सिरीयल बघत होते तेव्हा माझी आई व काकूही काय बघतोयस म्हणून आल्या (त्यांच्या सिरीयल्सचा ब्रेक चालु होता). नी तिथेच बघत बसल्या. वरच्या रिव्ह्यूमध्ये दिलेल्या नवरदेवाच्या नी मिकेशच्या संवादात त्या खुदूखुदू हसून एजॉय करत होत्या - तेव्हा या अनवट विषयावर येणार्‍या सिरीयर्ल्सचे आकर्षण फक्त तरूणांना नसावे.

नंतर त्या स्वतःच्या सिरीयर्ल्सना वार्‍यावर सोडून ही सिरीयल संपेपर्यंत बघत होत्या इथेच ही सिरीयल जिंकली म्हणायला हवे!

(सिरीयल युट्यूबवर रिलीज झाली आहे व मोफत उपलब्ध आहे)

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

रायबेशे आणि ढाली

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

विदग्ध उन्हाळा

हे पाहिले :

मराठी चित्रपटांचे हिन्दीकरण

हो, ते मितवा गाणं अर्धं हिन्दीत असावं. मी फॉर्वर्ड केलं. सत्यम शिवम सुंदरम ह्या तीन शब्दांपैकी शिवम हा एकच नाव देण्यायोग्य असल्यामुळे हीरोचं नाव "शिवम" असतं. (दात काढत)>
आधी एक सोनालीचं इन्ट्रो सॉंग भारी क्रीएटिव होतं. त्यात बर्फाचा गोळा, बार्बी शी खेळली, असले कायकाय शब्दप्रयोग ऐकून चक्कर आली, मग पुढची गाणी बघितली नाहीत. (स्माईल) सावर रे चांगलंय. ठेका तरी.

एकूणच, दुनियादारी, प्यारवाली लवस्टोरी पासून (की त्या आधीपासूनच) मराठी चित्रपटांचं हे हिन्दीकरण इतकं डोक्यात जायला लागलंय! जांभळ्या भिंतींसमोर केशरी कपडे घातलेली नायिका हिरवी फुलं ( (जीभ दाखवत) ) घेऊन एन्ट्री मारते असले "नयनरम्य" देखावे आदिचोप्राने काय कमी पडले, म्हणून तुम्ही पण उभे करता!!!!!!!!! फ्रेमफ्रेमला कुछकुछ/कभीखुशी चा भास होयला लागला आणि पिक्चर हिन्दी आहे का मराठी ते कळेनासं झालं.

हॅपी जर्नीतही जरा हिन्दीकरण होतं तरी प्रिया बापट इइइइतकी गोड आहे कि तक्रार नव्हती. चित्रपटाचा विषयही वेगळा होता.

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

रेगे पाहीला, आवडला.

रेगे पाहीला, आवडला.

आवडला!!?? आम्ही पहिल्या २०

आवडला!!??
आम्ही पहिल्या २० मिनिटांत उठून बाहेर आलेलो. एखाद्या भडक सिरीयल सारखे भिकार चित्रीकरण Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आँ ?

मला तर अभिनय, कथानक अन मेमेंटो धाटणीचे एडीटींग असा एकुणच रोचक प्रकार वाटला. सॉलिड चित्रपट आहे की ? अगदी सहकूटुंब बघता येइल असा... नक्कि काय डोक्यात गेले ?

actions not reactions..!...!

नक्की काय डोक्यात गेले: एक तर

नक्की काय डोक्यात गेले:

एक तर चित्रीकरण, मराठी सिरीयलसारखी सगळी पात्रे अर्धवर्तुळ करून गप्पा मारतात, नसल्यास पात्र शरीर क्यामेरासमोर राहिल या बेताने ठेवत फक्त मान हलवून बोलतो, भडक खरंतर कर्कश्श संगीत, पडद्यावर एकतर नुसते क्लोजअप्स किंवा मोठे अवकाश उगाच राखलेले, वास्तववादी पार्श्वभूमी, ध्वनी, प्रकाश सगळ्याच बाबतीत आनंद. प्रत्येक संवादाला मागे काही तरी ढँटॅढॅ किंवा टण्याव वाजतेच्चे, ढोबळ प्रकाश योजनेचा तर कळस आहे, मी पाहिलेली पहिली २०-२५ मिनिटे तरी फ्लडखाली चालली होती. अगदी पोलिस स्टेशनमध्ये इतका प्रखर प्रकाश!

असो यादीच होईल मोठी

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दया कुच तो गडबड हय... बहुदा

दया कुच तो गडबड हय...
बहुदा मीच चित्रपट लक्ष देउन बघितला नसावा.

स्वगतः- परत एकदा बघुन कंन्फर्म करावा म्हणतो, थँक्स फॉर इनपुट. *

actions not reactions..!...!

डूप्रकाटाआ

डूप्रकाटाआ

काय माहीती. मला आवडला बुवा.

काय माहीती. मला आवडला बुवा.

मी टीव्हीवर पाहीला.

ईर्षा

स्वप्नील जोशी "मी मराठीतला शाहरूख होऊनच दाखवीन, आणि झालो नाही, तरी स्वतःला शाहरूखच समजेन" ह्या ईर्ष्येने वावरतो.
घ्या!बाळगून बाळगून ईर्षा काय, तर शाहरुख होण्याची! अरे पांड्या, जीवन हो, मुक्री हो, मदन पुरी हो, सत्येन कप्पू हो...

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

>>अरे पांड्या, जीवन हो,

>>अरे पांड्या, जीवन हो, मुक्री हो, मदन पुरी हो, सत्येन कप्पू हो...

अगदी राजेंद्रनाथ झालास तरी काही हरकत नाही...

चिल्ड्रन ऑफ हेवन आणि मितवा

चिल्ड्रन ऑफ हेवन (नेटफ्लिक्स वर उपलब्ध) जितक्या वेळा बघते, तितक्या वेळा हेलावल्यासारखं होतं. लहान मुलांची कामं केवळ अप्रतीम. आजकाल एकूणच सुस्थितीतिल मुलांमधे कृतज्ञतेची भावना कमी असते, असं म्हटलं जातं. माझ्या ४ वर्षाच्या मुलाने माझ्या बरोबरीने अख्खा चित्रपट अतिशय समरसून पाहिला, आणि त्याला त्या मुलांबद्दल आत्मियता/सहानुभूती वाटली, हे मी त्या सिनेमाचं मोठं यश समजते. हे काल झालं.

आज "मितवा" बघितला. मराठी चित्रपटसृष्टीत शाहरूख/करण ही बडी धेंडं नाहीत, त्याची कमी तुम्हाला हा चित्रपट जाणवू देणार नाही. "तुमचं, (आणि एकूणच) प्रेम संपत नसतं" हे मला पटलंय, पण चित्रपट संपवायचा असतो, ह्याचा विचार मध्यंतरापर्यंत केलाच नाही हो दिग्दर्शिका-बाई तुम्ही!" धाकटी सोनाली कधीकधी डोळ्यांखाली काळी वर्तुळं अभिनयाच्या नावाखाली खपवते, तर स्वप्नील जोशी "मी मराठीतला शाहरूख होऊनच दाखवीन, आणि झालो नाही, तरी स्वतःला शाहरूखच समजेन" ह्या ईर्ष्येने वावरतो. तिसरी नायिका (प्रार्थना बेहेरे) तिच्या त्यातल्यात्यात लॉजिकल भूमिकेमुळे भाव खाऊन जाते. सो, थोडक्यात, "स्किपवर्दी".

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

त्याचा "प्यारवाली लव्हस्टोरी"

त्याचा "प्यारवाली लव्हस्टोरी" नावाचा अत्याचार (खरंतर मेंदूवर विकतचा बलात्कार!) चालु असताना इंटरवलला मितवाचे ट्रेलर पाहिलेले. तेव्हाच पाहायचा नाही ठरवले! आता तुमचा प्रतिसाद वाचुन अंदाज न चुकल्याचे बघुन बरे वाटले (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तू ही रे

ते "तू ही रे माझा मितवा" गाण्याची भानगड नक्की काय आहे ते कळाले का? ते अर्धवट हिंदीत आहे, की खरोखरच तू ही म्हणजे तू सुद्धा या अर्थाने आहे? (स्माईल)

मि(मित्र) त(तत्त्वज्ञ)

मि(मित्र) (तत्त्वज्ञ) वा(वाटाड्या) - (friend philosopher and guide) अशी फोड आहे म्हणे. एका ट्रेलरमधे पाहिलं.

हे सही

हे सही आहे. मलाही ते जाहिरातीत बघितल्याचे आठवते. पण मितवा हा त्याचा शॉर्ट फॉर्म होत असेल असे डोक्यात आले नव्हते.

पण जरा "तू ही" चा संदर्भही सांगा काय आहे

खपले, वारले, सुटले!

(लोळून हसत) खपले, वारले, सुटले!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ताई, आपण एकत्रच त्याचं पोस्टर

ताई, आपण एकत्रच त्याचं पोस्टर बघत "हा सिनेमा बघूच या" असं म्हणत होतो. त्या पोस्टरवर 'मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या' असं लिहिलेलं होतं. लक्ष कुठे होतं आपलं?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण

पण या ताई चित्रपटांचे पोस्टर्स (म्हणजे आपले साधे) बघताना त्यातील टर्म्स/टॅग्ज असतात त्याचे विविध शॉर्टफॉर्म करून बघत असतील असे का वाटले तुला?

लिहिलं होतं तिथे. त्या तीन

लिहिलं होतं तिथे. त्या तीन शब्दांतले मि त वा हे शब्द (बहुतेक) ठळकही केलेले होते. नसते केले तरीही "भिकारडा सिनेमाच बघायचा" अशी चर्चा करताना समोर पोस्टर असल्यावर एवढं समजावं अशी अपेक्षा मेघनाकडून ठेवली ब्वॉ मी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा भारीये!!

हाहाहा भारीये!!

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

काल हंटर बघितला.

महाअश्लिल चित्रपट. सइ ताम्हणकरने मात्र अपेक्षीत उष्णता व्यवस्थीत निर्माण केली आहे. गुड जॉब बेब (अभिनय).

actions not reactions..!...!

मिसेस अगस्ती

सई ताम्हणकर ही अगस्तीची बायको शोभेल. अगस्ती नी समुद्राला पिऊन टाकले होते. सई अशाच कुठल्यातरी बेटावर गेली होती व ..... She set the entire ocean on fire.

She set the entire ocean on

She set the entire ocean on fire.

जिथेतीथे जाळपोळच... बरी सुचते हो (डोळा मारत)

actions not reactions..!...!

हिंदीत अश्लिल विनोदी चित्रपट

हिंदीत अश्लिल विनोदी चित्रपट येणार म्हटले की धडकीच भरते. आजवर हा विधा हाताळलेले चित्रपट हे "अ‍ॅडल्ट कॉमेडी" नसून शालेय विनोदांनी भरलेले बालिश चित्रपट होते.
हा चित्रपट त्याहुन बराय का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा (बालीश) शालेय विनोदांनी

हा (बालीश) शालेय विनोदांनी भरलेला चित्रपट नाही, अर्थात यात विनोदाचे शालेय प्रसंग आहेत तसेच तरुण वा मिडलाइफचे ही आहेत. वासुगीरी या विषयाला इंटलेक्चुअल फोडणी देण्याचा काहीसा अपुरा प्रयत्नही चित्रपट प्रामाणीकपणे करतो. अपुरा क्लाय्मॅक्स आणी रोचकता निर्माण करण्यासाठी मधुनच चुकीच्या ठीकाणी घुसडलेले फ्लॅशबॅक मात्र कोहेरन्स ब्रेक करतात म्हणजे घटनाक्रमांची मांडणी रोचक न्हवे तर चक्क विस्कळीत बनवतात. तेव्हडा रसभंग सोडला तर चित्रपट एकदा बघण्यासारखा नक्किच आहे. अजुन विनोदी करता आला असता. शक्यतो थेटरात बघा.

actions not reactions..!...!

उजवी बाजू

बाकी स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या पुढे असणारे दोन टोकांचे पर्याय हे पटले. फक्त चौकटी बदलल्या तरी स्त्रियांचं स्थान बदलत नाही, हा मुद्दाही पटला, पण "हिंदुत्त्व"/उजवे-विरोधी पवित्रा घेऊन त्या परिस्थितीवर जास्त टीकात्मक दृष्टीकोन आहे, हे खटकले. उदाहरणार्थ, ज्या प्रकारचे प्रश्न दुर्गावाहिनीतल्या मुलीला विचारले जातात, त्याच्या उत्तरांतुन सहाजिकच उजव्या बाजूची अतिशयोक्ती होते. अधिक स्पष्टीकरण खालच्या दुव्यावर दिले आहे.

https://aavarta.wordpress.com/

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

'द वर्ल्ड बिफोर हर' नावाचा

'द वर्ल्ड बिफोर हर' नावाचा शिणुमा पाहिला. आजच्या घडीला भारतातल्या नवतरुणीसमोर असलेलं जग. एकाच काळातल्या, एकाच देशातल्या, एकाच वयोगटातल्या तरुणींची दोन समांतर विश्वं या चित्रपटात दिसतात - 'दुर्गावाहिनी'च्या शिबिरात सहभागी झालेल्या मुली आणि मिस इंडिया स्पर्धेसाठीच्या 'ग्रूमिंग सेशन'मधे प्रशिक्षण घेत असलेल्या मुली. दोन्ही गटातल्या तरुणींच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, आत्मविश्वास आहे, स्वतःला एक व्यक्ती म्हणून सिद्ध करायची धडपड आहे, स्वतंत्र श्वास घेण्याची, सबल होण्याची इच्छा आहे. पण त्यांच्यासमोरचं जग त्यांना काय देतंय? एका जगात स्त्रीकडे सुंदर, प्रमाणबद्ध, बेतशीर शरीर म्हणून पाहिलं जात आहे, दुसरीकडे हिंदू पुरुषांना त्यांच्या मागे राहून त्यांच्या कामात साथ देणारी दुय्यम पण कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून. वरवर पाहताना ही दोन्ही विश्वं अगदी वेगळी दिसतात - कुठे त्या चि.कु. इंडिया कांक्षिणी आणि कुठे त्या लाठी फिरवणा-या, कमरेला ओढणी बांधणा-या, जोरजोरात घोषणा देणा-या दुर्गा! पण तशी ती दोन्ही विश्वं एकच आहेत.

ट्रेलर

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उडान

उडान हा चित्रपट पाहिला. बालकांवरील (पालकांकडून) अत्याचार या थीमवर आहे.
======================
राम कपूर पाहून मला उलटी येते. तो स्टार टीवीच्या मालिकांत तसलीच कामे करणारा अजून एक अ‍ॅक्टर आहे. तो त्या मालिकांत अजूनच जास्त मूर्खांसारखी कामे करतो. तो तर प्रचंडच डोक्यात जातो.

पण या सिनेमात याच दोघांनी खूप्पच छान रोल केलेत. माझं मागचं असह्य वाईट मत असताना देखिल त्यांनी माझ्याकडून आवडवून घेतलं!!! कथा देखिल पकड घेणारी आहे. आणि हिरो - म्हणजे तो अन्याय सहन करणारा मुलगा - तो तर खूपच उच्च आहे.

संक्षेपात - राम कपूर आणि (जो कोणी तो - चेहरा पाहिला कि कळेल तुम्हाला कोण आहे ते) आवडत नाहीत म्हणून पाहायचा नाही असे करू नकात.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

माझाही आवडता सिनेमा.

माझाही आवडता सिनेमा. सगळ्यांचीच कामं उत्तम पण त्या सगळ्यात छोट्या मुलाने क्लास काम केलय.
(फार वाईट वाटतं जेव्हा तो हॉस्पीटल मधे असतो आणि पहिल्यांदा सिनेमा पाहिला तेव्हा त्या शेवटच्या सिन ला मी हळवा झाला होतो जिथे त्याचा मोठा भाऊ पळत असतो (घर सोडून पळून जातो) आणि लहान भावाला बरोबर घेत नाही, पण नंतर त्यालाही बरोबर घेतो तेव्हा खूप आनंद झाला होता. फार कमी सिनेमात असं इनव्हॉल्व्ह व्हायला होतं)

रोनीत रॉय म्हणतात त्याला.

रोनीत रॉय म्हणतात त्याला. सिनेमा मस्तच आहे. पार्टली अनुराग कश्यपच्या लहानपणावर आहे.
(एक उणीव भासली मला. तो पोरगा मला लेखक व्हायचय असं स्वप्न बाळगत असतो. तो त्याने लिहिलेल्या एक दोन गोष्टी देखील सांगतो. त्या होतकरू लेखकाच्या मानाने देखील पिचकवणी होत्या. त्या गोष्टी जरा बर्‍या घ्यायला पाहिजे होत्या.)

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

होतकरू लेखक

>> तो पोरगा मला लेखक व्हायचय असं स्वप्न बाळगत असतो. तो त्याने लिहिलेल्या एक दोन गोष्टी देखील सांगतो. त्या होतकरू लेखकाच्या मानाने देखील पिचकवणी होत्या. <<

मराठीतले फारसे होतकरू लेखक आपल्याला भेटले नसावेत बहुधा.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करेक्शन

मराठीतले फारसे होतकरू लेखक आपल्याला भेटले नसावेत बहुधा.

तुम्ही डोळा मारायची स्मायली टाकली नाही. आणि लेखक च्या पुढे 'ऑर फॉर दॅट मॅटर समीक्षक' असे लिहायला पण विसरलात. (डोळा मारत)
लेखकांच्या दुर्दर्जाला समीक्षकांचा दुर्दर्जा कारणीभूत आहे असे नोंदवून पळ काढतो. (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

नीना कुलकर्णी ही कितपत मोठी

नीना कुलकर्णी ही कितपत मोठी नटी आहे? तिचं ’ध्यानीमनी’मधलं काम खूप आवडलं होतं, तसं ’सवत माझी...’मधलंही. पण ’हमीदाबाईची कोठी’मधे ती अगदीच सामान्य वाटली, तशी अगदी टुकार मराठी मालिकांमधूनही दिसली. मग तिला मोठ्या नट्यांच्यात गणण्याची पद्धत आहे, ती का?

खरंच प्रश्न विचारला आहे का ते माहीती नाही तरी पण. नवर्‍याला नीना कुलकर्णी फार्फार आवडते. म्हणली तर स्वतंत्र बाण्याची आणि मॉडर्न, म्हणली तर एकदम समंजस, घरगुती वगैरे. म्हणली तर दिसायला चांगली पण अगदी कत्रीना वगैरे प्रचंड सुंदर बाहुल्यांसारखी नाही ( म्हणजे आवाक्यातली वाटते ). दिसते तरी शिकलेली आणी हुशार वगैरे, पण प्रेमळ वाटते. थोडक्यात बायको म्हणुन एकदम बेस्ट मटेरियल असे मत आहे. आणि बाईचे फक्त बाईपण च बघायचे असल्यामुळे अ‍ॅक्टींग वगैरे बद्दल विचार करायची गरज नाही.

मिलिंद बोकिलांबद्दल इथे कुणाचं काय मत? (होय, प्रश्न खवचट आहे.))

अगदी वाईट वाईट मत आहे. गवत्या वाचुन तर असे वाटले की सत्ता असती तर त्या माणसाला जन्मठेपच केली असती. तसाही त्याचा समाजवादी पींड डोक्यात जातो. समोर आला आणि शक्य झाले तर त्याचे गाल लाल करायला आवडेल.

बाकी ठीक. पण - कत्रीना वगैरे

बाकी ठीक. पण -

कत्रीना वगैरे प्रचंड सुंदर बाहुल्यांसारखी

Shock

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

?

यात नक्की काय आश्चर्यकारक आहे ते कळलं नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

(प्रश्नाची जागा चुकलेली

(प्रश्नाची जागा चुकलेली असल्यास जरूर हलवा)

अलीकडे मराठी व्यावसायिक नाटकं थंडावलेली आहेत काय? कुणी काही पाहिल्याचा उल्लेख करत नाही, काही आवर्जून पाहण्याजोगं आहे म्हणून शिफारस करत नाही, काही गाजत नाही.... की माझे स्रोत गंडलेले आहेत?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(शिफारशीशिवायची) यादी

इतक्यात गाजलेली काही मराठी व्यावसायिक नाटकं -
समुद्र
वाडा चिरेबंदी
सर्किट हाऊस
बेगम मेमरी आठवण गुलाम
लग्नबंबाळ
काटकोन त्रिकोण
छापा-काटा
अलिबाबा आणि चाळिशीतले चोर

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लग्नबंबाळ काटकोन

लग्नबंबाळ
काटकोन त्रिकोण
छापा-काटा
अलिबाबा आणि चाळिशीतले चोर

ही इतक्यात??? ओके!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लग्नबंबाळ', इ.

'लग्नबंबाळ'ला ह्या वर्षी 'म.टा. सन्मान'मध्ये मानांकन होतं. मी ते काही वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे. बाकीच्यांचे अजूनही प्रयोग होत असतात. 'काटकोन त्रिकोण' आणि 'अलिबाबा'वाल्या विवेक बेळेचं नवीन नाटक येऊ घातलं आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हं. मध्यंतरी ’नेव्हर माइंड’

हं. मध्यंतरी ’नेव्हर माइंड’ आलं होतं, ते त्यांचंच होतं ना? (मध्यंतरी म्हणजेसुद्धा सहज २ वर्षं झाली असतील. जास्तच, पण कमी नाही.)

अवांतर:
- ’बेगम मेमरी आठवण गुलाम’ राहिलं आहे माझं बघायचं.
- ’समुद्र’बद्दल मुळातच उत्सुकता नाही. (चिन्मय मांडलेकर स्टेजवर कसला अवघडलेला आणि नाटकी असतो... नि त्यात पुस्तक ’समुद्र’. असोच. बादवे, हे अजून अवांतर: मिलिंद बोकिलांबद्दल इथे कुणाचं काय मत? (होय, प्रश्न खवचट आहे.))
- त्रिनाट्यधारेचं ’वाडा’ नामक संक्षिप्तीकरण काही वर्षांपूर्वी पाहिलं आहे. काही खास छाप पडल्याची आठवण नाही. एक दागिन्यांचा प्रवेश, नंतर तळ्याकाठचा प्रवेश.. असे मोजकेच प्रवेश लक्षणीय वाटले होते. तुटकी मूर्ती बघितल्याचा फील.
- मध्यंतरी ’अलिबाबा..’ परत पाहिलं, तर त्यांनी शेवटाकडचा एक प्रवेश चक्क गाळला होता. खूप चिडचिड झाली.
- नीनाचं ’छापाकाटा’ पाहिलेलं नाही, पण रीमाचं पाहिलं आहे. पुन्हा बघावं इतकी उत्सुकता नाही वाटली. (पुन्हा अवांतर: नीना कुलकर्णी ही कितपत मोठी नटी आहे? तिचं ’ध्यानीमनी’मधलं काम खूप आवडलं होतं, तसं ’सवत माझी...’मधलंही. पण ’हमीदाबाईची कोठी’मधे ती अगदीच सामान्य वाटली, तशी अगदी टुकार मराठी मालिकांमधूनही दिसली. मग तिला मोठ्या नट्यांच्यात गणण्याची पद्धत आहे, ती का?)
- ’लग्नबंबाळ’मधे आनंद इंगळे मस्त बागडतो. त्यात सुबोध भावे असत असे, तेव्हाचा प्रयोग पाहिला आहे. त्याला अक्षरश: पुरुषदेहरूपी बेट म्हणून वापरल्यासारखी त्याची भूमिका होती, म्हणजे, फार काही नव्हतीच.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तो नाटकांच्या प्रमोशनचा एक

तो नाटकांच्या प्रमोशनचा एक कार्यक्रम लागतो ना झी मराठीवर. गुड मॉर्निंग महाराष्ट्राचा एंकर, भाऊ कदम, भारत गणेशपुरे वगैरे असतात.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

चला हवा येऊ द्या? निलेश साबळे

चला हवा येऊ द्या? निलेश साबळे एंकर?
त्यात 'नांदी' नाटकाचं प्रमोशन केलं होतं, त्या व्यतिरिक्त आठवत नाही कुठल्या नाटकाचं प्रमोशन केल्याचं (अर्थात मी फार नियमितपणे पहात नाही, त्यामुळे पार्शियल पास)

आम्हाला जवळ असलेलं नाट्यगृह

आम्हाला जवळ असलेलं नाट्यगृह रिनोवेट होतंय. नी दूर जावं इतकं चांगलं नाटक लागल्याचं कोणी सांगितलं नाहिये

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निखिल रत्नपारखीचं नवं नाटक

निखिल रत्नपारखीचं नवं नाटक कसंय? साहिब, बिवी आणि कायतरी?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाडा चिरेबंदी लागलेलं दिसतं

वाडा चिरेबंदी लागलेलं दिसतं अधून मधून. चांगलय असं ऐकलं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अगदी मनातला प्रश्न विचारलास

अगदी मनातला प्रश्न विचारलास मेघना. माझ्या माहितीत 'छापा-काटा' नाटक हे शेवटचं चर्चेतलं होतं त्यानंतर कोणत्या नाटकाबद्दल फार काही ऐकण्यात आलं नाही.
का कोणास ठाऊक पण तुझ्या ह्या प्रश्नाने एकदम भीती-वजा धडकी भरली की हळू हळू नाटकं लोप तर पावत नाहियेत ना Sad

http://www.loksatta.com/lokrang-news/chapa-kata-marathi-play-106

आवारा

राज-नर्गीसचा "आवारा" पाहीला. पृथ्वीराज कपूर खरच राज कपूरचा "बाप" वाटला - अभिनयात.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

नाईटक्रॉलर

२०१४ साली आलेला हॉलीवूडपट "नाईटक्रॉलर"

वर नगरीनिरंजन यांनी सिनेमातून त्यांना काय दिसलं ते लिहिलेलं आहे. ननिंना सिनेमातल्या मध्यवर्ती पात्रामधे आजकालच्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या विधिनिषेधाची पर्वा न बाळगणार्‍या प्रवृत्तींची चुणूक आढळलेली आहे. ते मला विचार करण्यासारखं वाटलं.

<चित्रपटाचा गोषवारा : सुरवात (नेहमीचीच डिस्क्लेमर्स)>
जेक जिलेन्हालने रंगवलेला लॉस एंजल्समधे रहाणारा तरुण म्हणजे रात्रीबेरात्री रस्त्यांमधून/गल्ल्यांमधून हिंडणारा कुणीतरी. हे हिंडणं इनोसंट नाही तर कुठून तरी चोरीमारी करून आहे तो माल कुणाला तरी विकून त्यातून आपली उपजीविका करणारी ही निशाचर प्रवृत्ती. हे करताना साहेबांना रात्रीच्या वेळी गुन्हे किंवा अपघात घडताना तिथे सर्वात आधी पोचण्याची अहमहमिका असणारे फोटोग्राफर्स (जे स्वतःचा उल्लेख "नाईटक्रॉलर्स" असाच करताना दिसतात) आणि त्या फोतोग्राफर्सनी टिपलेला "माल" विकत घेणारे टीव्ही चॅनल्स यांच्या विश्वाचं दर्शन घडतं . हे पाहताक्षणी "आपल्याला यात कायतरी जोरदार करून दाखवता येईल" याचा साक्षात्कार होतो. आणि मग या कामामधे प्रावीण्य मिळवल्यावर, अधिकाधिक रक्तपात, अधिकाधिक धोक्याच्या किंवा दुर्दैवी बातम्या टिपल्यावर अधिकाधिक मोबदला मिळतो हे त्याच्या लक्षांत येतं. मग त्यानंतर गुन्हे टिपण्याकरता नैतिकतेच्या कक्षा ओलांडणं इतपतच स्वतःला मर्यादित न ठेवता, घातक गुन्ह्यांबद्दल हाती आलेल्या गोष्टींना वापरून त्याद्वारे अधिकाधिक धोकादायक गुन्हे कसे घडतील याला खतपाणी देण्यापर्यंत त्याची मजल कशी जाते याचं चित्रण असलेलं कथानक.
<अखेर>

चित्रपटात कलाटण्या दिलेल्या घटना शेवटी काहीशा अतिशयोक्त वाटतात हे ग्राह्य धरलं तरी निव्वळ माहिती अद्ययावत ठेवून योग्य त्या संधीचा फायदा घेऊन मग प्रसंगी लोकांच्या जिवीताला असलेल्या धोक्याबद्दल यत्किंचितही विचार न करणार्‍या प्रवृत्तीची आठवण यावी हे या सिनेमाचं यश आहे. मध्यवर्ती पात्राची मूल्यव्यवस्था, त्याची थंड नजर, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि संस्थांना तो कसं मॅनिप्युलेट करतो, त्यांच्यातल्या नैतिकतेच्या कच्च्या दुव्यांना हेरून तो त्याला हवं ते कसं साध्य करतो आणि यातून माणूसपणाच्या सीमारेषेवरच त्याच्यासारखी माणसं कशी उभी असतात याचं चित्रण मार्मिक आहे. सिनेमातला बाँडपटात शोभेल असा पाठलागाचा प्रसंग टाळता आला असता तर सिनेमा शेवटी तद्दन धंदेवाईक वाटतो तसा वाटला नसता. या पाठलागाचा क्लायमॅक्स वगळतां बाकी पटकथेचं लेखन आणि जेक जिलेन्हाल या नटाचं काम उत्कृष्ट आहे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मस्त चित्रपट. तुमच्या रेफरन्सवरच बघितला. मजा आली.

आख्खा चित्रपटच आवडला आहे. खतरनाक स्टाइल आहे. काही माझ्या व्यक्तीमत्वाचेही अंश सापडले त्यामुळे चित्रपट बर्‍याच प्रमाणात जगलो म्हटले तर चुक नाही. यातले माझे आवडते वाक्य आहे "FEAR... False evidence appearing real..." (स्माईल)

अतिशय धन्यवाद.

actions not reactions..!...!

त्याचं "इट्स माय जॉब; दॅट्स

त्याचं "इट्स माय जॉब; दॅट्स व्हॉट आय डू!" हे वाक्य आणि जोडीदाराला सॉरी एम्प्लॉयीला रिक्रूट आणि "प्रमोट" करण्याचे प्रसंग अंगावर काटा आणतात.

Hope is NOT a plan!

"बाजी" पाहिला. या बात! एकच

"बाजी" पाहिला.

या बात! एकच नंबर!

दिग्दर्शक निखिल महाजन यांचा पहिला चित्रपट - पुणे ५२ - नीट समजला नव्हता. त्यामुळे हा जरा भीतभीतच पाहिला.

आवडलेल्या गोष्टी:
(१) साहसकथेचं जॉनर. अगदी भा रा भागवतांच्या साहसकथेत आल्यासारखं वाटलं. (किंबहुना चित्रपटात नायिका फास्टर फेणे आणि "निर्जन बेटावर धाडसी वीर" वाचताना दाखवली आहे.)
(२) श्रेयस तळपदेचा "चिदू"च्या भूमिकेतला अभिनय
(३) चित्रपटातली रंगसंगती, विशेषतः भडक/सॉलिड रंगांचा वापर
(४) नागराज मंजुळेची छोटीशी भूमिका (एक शंका: मंजुळे या सिनेमात, आणि फँड्रीमध्येही "वड पाच्ची" असं म्हणतात. म्हणजे काय?)

न आवडलेल्या गोष्टी:
(१) हिर्वीन अमृता खानविलकर. झोपेतून उठल्या उठल्या ब्रश करण्याच्या आधी जसे भाव असतात तसे कायम ठेवून हिंडते
(२) व्हिलन मार्तंडचं स्थित्यंतर नीटसं पटत नाही.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

सर्वप्रथम अभिनंदन...

आपण आख्खा चित्रपट बघु शकलात म्हणून. आपलि सहन क्षमता माझ्याप्रमाणेच अफलातुन आहे.

"बाजी" पाहिला म्हटल्यावर पटकन आमिरखानचा बाजी आठवला अन पुढील वाक्यांचा मेळ बसायला अंमळ वेळ गेला...

आवडलेल्या गोष्टी
१) टायटल्स, चित्रपटाच्या तांत्रिक बाबी.

नावडलेल्या गोष्टी
अतिशय संथ चित्रपट. रटाळ. ७० च्या दशकातला फॉर्म्युला. बाकी पुढे सांगवत नाही.

साहसकथेचं जॉनर... ? आँ ? असं म्हणू नका हो... यामुळेच तर आमिरखानचा बाजी डोक्यात पटकन आला. स्पॉयलर: पुढे संपुर्ण प्लॉट लिहला आहे साधं सरळ गावच्या जुलमी जमीनदाराविरोधात संघर्षाला सामान्य हिरो उभा ठाकतो हा ७० च्या दशकातला फॉर्म्युला... यात साहसकथा नक्कि कुठे आली ? साहस कथेचे जॉनर न्हव फक्त "प्रोमो" म्हणा (स्माईल) यड्यात काडलं राव पब्लिकला.

आमी आमच्या आबा आज्यापासुन राकेश रोशन फॉर्म्युला चित्रपट बघत आहोत म्हणजे चित्रपटाच्या पुर्वाधात नायक भुमिकावाले पात्र काही कारणाने फक्त सोज्वळ,दुर्बल व बदला घेण्यास अपरिपक्व दाखवायचे व मध्यंतरानंतर त्याचे स्थित्यंतर होउन एकदम त्याला ढिंचाक माचोमन बनवायचे हा तो फॉर्म्युला उदा. किशन क्न्हैया, कोयला, क्रिश, कहो ना प्यार है अगदे सगळेच चित्रपट हा फॉर्म्युला घेउन बनवलेले, अपवाद करन अर्जुन... त्यात नायक भुमिकावाले पात्र मध्यंतरापर्यंत न ताणता मध्यंतराच्या मध्यंतरामधेच गचकते.... आणी बाजी मधे तर असह्य मारा आहे सगळ्या मेलोड्रामॅटीक फारम्युलाचा...

काय हो इथे चांगला रिव्हु लिहाय्चे पैसे घेतले काय ?

actions not reactions..!...!

आख्खा तीन तासाचा पिक्चर.

आख्खा तीन तासाचा पिक्चर. त्यात चांदोबातल्या कथा एकदम ग्रेट वाटाव्यात असली काहीतरी कथा. किंवा बर्‍या कथेचं पटकथेत केलेलं वाट्टोळं. पिस्ता (?) रंगाची बोट!! महेश कोठारेचा संदर्भ आहे म्हणजे आजकालच्याच जमान्यातली. त्याच्याशी सुसंगत काहीही नाही. 'चिदू ' जमला नाही. मंजुळे चेहरा कोरा ठेवतो हे वगळलं तर त्याची संवादफेक भारी आहे.
वेशभूषाकारा/रीने जे काही काही एकंदरीत खानविलकरकाकू आणि भाटेआजींच्या वेशभूषेचं कडबोळं केलंय त्याला तोड नाही. बर्‍याचशा गोष्टी न पटणार्‍या आणि अधांतरी सोडलेल्या आहेत.

माझी सहनशीलता अफाट आहे म्हणूनच पूर्ण सिनेमा पाहू शकले..

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

खलनायकाचे काम चांगले आहे

जीतेन्द्र जोशीने केलेला मार्तण्डचा रोल मस्त आहे. लयभारीमधला शरद केळकरचा 'संग्राम'ही मस्त. बाजी आणि लयभारी दोन्ही चित्रपट एकाच फॉर्म्युलाचे आहेत. पण फुल्ल टाईमपास.

>>>(एक शंका: मंजुळे या

>>>(एक शंका: मंजुळे या सिनेमात, आणि फँड्रीमध्येही "वड पाच्ची" असं म्हणतात. म्हणजे काय?)>>

मला पण हा प्रश्न पडला होता.पण फँड्री २-३ वेळा पाहिल्यावर "वड पाच्ची"("ओढ ५ ची" चा अपभ्रंश) म्हण्जे ५ रूपयाची दारु असे वाटते.

+१

मलाही असेच वाटते.

Hope is NOT a plan!

हां... रैट्ट.

हां... रैट्ट.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

परफेक्ट

(१) हिर्वीन अमृता खानविलकर. झोपेतून उठल्या उठल्या ब्रश करण्याच्या आधी जसे भाव असतात तसे कायम ठेवून हिंडते

खरंय. हिला बघून मला का कोण जाणे पण कायम टॉम हँक्सची आठवण येते. तोसुद्धा कायम कपाळावर आठ्या घालून असतो.

व्यवसायापुढे भावभावनांची

व्यवसायापुढे भावभावनांची क्षिती न बाळगणे इत्यादी आजकालचे आदर्श, हवेसे वाटणारे व यशस्वी (म्हणजे श्रीमंत)

अधोरेखीत करण्यात आलेला भाग हे फारच सरसकटीकरण आहे. व्यवसायात यशस्वी माणसांना चांगल्या, कोमल भावना नसता वगैरे हा अत्यंत चुकीचा ( आणि टीपीकल हिंदी सिनेमा वाल्यांचा ) ग्रह आहे.

मुलांना भिक मागायला लावणार्‍या, मुलीला विकणार्‍या गरीबांच्या भावभावनांबद्दल तुमचे काय मत आहे?

व्यवसाय करणार्‍यांना सरसकट

व्यवसाय करणार्‍यांना सरसकट कोमल भावना नसतात असे माझ्या प्रतिसादातून ध्वनित होते असे मला वाटत नाही. कामापुढे (बहुदा इतरांच्या) भावनांना महत्त्व न देणे असे गुण वाखाणले जातात असे मला म्हणायचे आहे. उदा. घरातलं प्रेत ओलांडून पेरणीला जाणारा शेतकरी वगैरे दंतकथा.
कंपन्यांमध्ये लोकांना झटपट (म्हणजे वॉर्निंग देऊन सुधारण्याची संधी न देता) काढून टाकता यावं म्हणून एचआरशी भांडणारी माणसं पाहिली आहेत. कॉलेजच्या पोरांना प्रोजेक्टच्या नावाखाली महिना-दोन महिने फुकट राबवून घेणारे आणि वर कामातल्या चुकांबद्दल फैलावर घेणारे व्यावसायिक असतात. स्वतःबद्दल आणि स्वतःच्या प्रियजनांबद्दल कोमल भावना असणे वेगळे आणि जनरल इतर लोकांच्या भावनांची कदर असणे वेगळे.

मुलांना भिक मागायला लावणार्‍या, मुलीला विकणार्‍या गरीबांच्या भावभावनांबद्दल तुमचे काय मत आहे?

त्यांच्याबद्दलही तेच मत आहे. मुळात मुलांना भीक मागायला लावणारे लोक गरीब असतातच असे नाही. गरीब दिसणे हा त्यांच्या धंद्याचा भाग असतो. मुलींना फसवून विकणारे तर अगदी व्यावसायिकच असतात.

"व्यावसायिकता" हे गोंडस विशेषण आहे या वृत्तीला आणि तीच अंगिकारायला धडपडणारे खूप लोक दिसतात आजूबाजूला. वेळ पाळणे, शब्द पाळणे इतपतच ती मर्यादित नाही, पण बोलताना असेच बोलले जाते की हे चांगले गुण म्हणजेच व्यावसायिकता. प्रत्यक्षातले अध्यारुत गुण कोणी उघड बोलत नाही.

सगळेच असेच असतात असे नाही. (तसे मी आधीही म्हटले नव्हतेच).

Hope is NOT a plan!

कॉलेजच्या पोरांना

कॉलेजच्या पोरांना प्रोजेक्टच्या नावाखाली महिना-दोन महिने फुकट राबवून घेणारे आणि वर कामातल्या चुकांबद्दल फैलावर घेणारे व्यावसायिक असतात.

ननि, यातून तुम्हास जे ध्वनित करायचे आहे ते खालीलपैकी काय आहे ?

१) कॉलेजच्या पोरांना प्रोजेक्टच्या नावाखाली महिना-दोन महिने फुकट राबवून घेणे व्यावसायिकतेच्या आचारसंहितेविरुद्ध/चूक आहे.
२) कॉलेजच्या पोरांना प्रोजेक्टच्या नावाखाली महिना-दोन महिने फुकट राबवून घेऊनही त्यांना कामातील चुकांबद्दल फैलावर घेणे हे चूक आहे.
३) कॉलेजच्या पोरांना प्रोजेक्टच्या नावाखाली महिना-दोन महिने राबवून घेणार्‍यांनी काही किमान पेमेंट देणे गरजेचे आहे.
४) यापेक्षा वेगळे काहीतरी

नाईटक्रॉलर पाहिला. एकदा अवश्य

नाईटक्रॉलर पाहिला. एकदा अवश्य पाहण्यासारखा आहे. धनार्जन आणि व्यवसाय हेच केवळ ध्येय असणार्‍या 'कष्टाळू', 'स्मार्ट' आणि 'गो-गेटर' नायकाची कहाणी. व्यवसायाची कल्पना सुचणे आणि मग तो वाढवण्याचा विचार सतत डोक्यात असणे. लोकांशी अगदी स्वच्छपणे व स्पष्टपणे बोलून सौदे करणे. संधीचा अचूक वापर व हाती आलेल्या संसाधनांचा भविष्यात कसा वापर करता येईल याची दूरदृष्टी. व्यवसायापुढे भावभावनांची क्षिती न बाळगणे इत्यादी आजकालचे आदर्श, हवेसे वाटणारे व यशस्वी (म्हणजे श्रीमंत) होण्यासाठी आवश्यक समजले जाणारे गुण असलेला नायक, त्याचा व्यवसाय व त्याच्या व्यवसायाचे परिणाम अतिशय मार्मिकपणे मांडले आहेत.
चित्रपट संपल्यावर प्रत्यक्ष जीवनात आपण अशी किती माणसं पाहतो या जाणिवेने थरकून जातो माणूस.

Hope is NOT a plan!

कविता

ननि , सिनेमा आताच पाहिला. तुमचा प्रतिसाद पटला. सिनेमाबद्दल थोडं वेगळं लिहितो आहे.
तुमचा प्रातिसाद वाचून एक कविता आठवली. ती कविता नि तिचे डिटेल्स खाली देतो.

कवितेचं शीर्षक : आपलं सगळं कसं आलबेल असतं

आपलं सगळं कसं आलबेल असतं
मनासारखं सगळं चाललेलं असतं
मार्केट एकदम तेजीत असतं
कुठेच खूनखराबा नसतो

आपल्या चॅनलवर साफसुथर्‍या बातम्या असतात
आपले सगळेच सौदेकब्जेलफडी सेफ अँड शुअर असतात
आपल्या नुसत्या ओळखीवर कामं होत असतात
राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असताना
आपण व्यवस्थित दोन टाईमचं जेवत असतो
पाणीटंचाई असताना बिसलेरीचं पाणी मिळत असतं
खूप दिवसांत आपण आजारी पडलेलो नसतो किंवा
आजारी न पडावं म्हणून खबरदारी घेली असते
तणावाशिवाय खुलाशाशिवाय समर्थनाशिवाय दिवस जात असतात
डोकं तापू नये म्हणून सोडून दिलेलं असतं
फार पूर्वीच आपण वर्तमानपत्रं वाचणं
आर्थिकसंकटंबिंकटं नसतात
कौटुंबिकसमस्याबिमस्या
किल्मिषंबिल्मिषं नसतात
आपल्याला घाम येत नसतो
तंगडतोड नसते आक्रोश नसतो
ऑफिसमध्ये कलीगबॉसक्लायंटशी चांगलं ट्युनिंग जमलेलं असतं
सगळं कसं मस्तमस्त धुंदफुंद असतं
आंघोळीला बाथरूममध्ये गरम पाणी असतं
घामाच्या दुर्गंधीला तडी देणारा सुगंधित डिओड्रंट असतो
चेहर्‍यावर पुटकुळ्यांचं साम्राज्य नसतं
डोळ्यांभवताली काळ्या वर्तुळाचा समुद्र नसतो
इतक्या वर्षांत झालेली नसते आपल्या शरीराची सर्जरी
निघालेलं नसतं साधं नख
मारलेली नसते कुणी मुस्कुटात
बोललेलं नसतं कुणी घालूनपाडून
सुरक्षित असतो आपण आपल्या मेणाच्या घरात
पादताना झालेल्या आवाजाइतकाच आवाज असतो
आपल्या आजवरच्या जगण्यात
चेहर्‍यावर आपल्या थंड प्रकाश असतो
लेप असतो रंग असतो
आपल्या इतिहासात भूतकाळात
मोर्चा नसतो चळवळ नसते
प्रेरणा नसते सामाजिक भान नसतं हल्लाबोल नसतो
आपल्या पुस्तकात समकालीन विचार नसतो संस्कृती नसते
समूहमनाशी नाळ जोडली गेलेली नसते
भाषा नसते वैचारिक भूमिका नसते
आपण कसे अफलातून असतो
आतूनबाहेरूनकपड्यांतूनचेहरेपट्टीतून
असतोआपणबोलबच्चनामिताभबच्चन
आपल्या मुठीतच असतात किंवा ठेवू पाहतो आपण
घटना दिनक्रम वर्तुळं कुटुंबसंस्था भवतालचा समाज
आपल्या मनासारखा कसा तयार करून घेतलेला असतो आपण
पुस्तकी इतिहास
बदलतो परिच्छेदच्या परिच्छेद
बांधतो जिवंतपणीच स्वतःच्या समाध्या चिणतो कोनशिला
भूगोलाचे बदलतो व्यास अक्षांशरेखांश
बदलतो ऋतूंचे परीघ सामाजिक समीकरणं
उतरवतो भल्याभल्यांच्या पगड्या
घालतो भल्याभल्याना टोप्या
होऊ पाहतो आपण सर्वेसर्वा किंगमेकर
मूठभर फायद्यासाठी आपण घालतो स्वत:च्या पायघड्या
पर्यावरण पाहून होतो पायउतार किंवा देतो छलांग
बोलता-बोलता आपण खपवून टाकलेला असतो माल
बोलता-बोलता समोरच्याला लावून झालेला असतो चुना
आपद्ग्रस्तांना पगारातून शेअर देऊन पावलेलो असतो
आपण अंतर्बाह्य समाधानी झालेलो असतो

जगण्यात आपल्या कुठेच कुंथणं नसतं
फट नसते खोली नसते अवकाश नसते वस्तुमान नसते
घनता नसते मिती नसते प्रमाण नसतं पश्चात्ताप नसतो
कंटाळा नसतो लफडी नसतात संघर्ष नसतो छळ नसतो
मुस्कटदाबी नसते हस्तांदोलन नसतं संवाद नसतो
प्रश्न नसतात तळ्यात नसतो मळ्यातही नसतो

आपण एकट्याएकट्याने चालत असतो
स्वतःच्या गरजा हुंगतच चालत असतो
पुढेमागेवरखाली पाहात पाहातच चालत असतो
स्वतःचे लागेबांधे जपत जपतच चालत असतो

-------------------------------------------------------------------------------------------------
कवितासंग्रह :"ततपप"
कवी : वर्जेश सोलंकी
"अभिधानंतर" प्रकाशन
पहिली आवृत्ती - जुलै २००९

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"गिल्डा"

"नॉटिंग हिल" नावाच्या माझ्या एका आवडत्या सिनेमामधल्या दोन पात्रांमधला संवाद असा आहे :

Anna Scott: Rita Hayworth used to say, "They go to bed with Gilda; they wake up with me."
William: Who's Gilda?
Anna Scott: Her most famous part. Men went to bed with the dream; they didn't like it when they would wake up with the reality. Do you feel that way?
William: You are lovelier this morning than you have ever been.

(यातलं अ‍ॅना स्कॉट हे पात्र म्हणजे हॉलीवूडमधल्या यशस्वी नटीचं पात्र असतं. )


तेव्हापासून गिल्डा आणि हेवर्थ हे कुठेतरी मनात बसलेलं होतंच. त्यानंतर केव्हातरी "श्वाशँक रीडेम्प्शन" नावाचा आणखी एक सिनेमा पाहण्यात आला आणि (अन्य लक्षावधी लोकांप्रमाणे) आवडताही होऊन बसला. त्यातल्या रीटा हेवर्थच्या तुरुंगात लावलेल्या पोस्टरचा संदर्भ, ज्या मूळ कादंबरीवरून सिनेमा काढला तिचं नाव "Rita Hayworth and Shawshank Redemption" हे असणं यामुळे रीटा म्याडमभवतांलचं मनातलं वलय अधिकाधिक गूढ होत गेलं. ( वदतोव्याघात् का काय म्हणतात तो जमतो आम्हाला. वलय असेल तर ते गूढ कसं असेल ? ते काय धुकं आहे काय ? पण असो.)

तर शेवटी ज्या सिनेमाने रीटाम्याडमना रीटाम्याडम बनवलं तो गिल्डा पाहण्यात आला.

सिनेमाच्या कथासूत्राला "आशयसूत्र" वगैरे म्हणण्याइतपत हे "सूत्र" काही फार दमदार नाही. शेवटी ते फिल्मनुआर् का काय ते म्हणतात ते असल्यामुळे, व्यक्तिरेखा ठसठशीत आहेत, डार्क आहेत (म्हणजे "दूष्ट" नव्हेत.) पण नेमका या दोन पात्रांचा संबंध पूर्वी कसा काय आला होता आणि तो सांधा नेमका इथे कसाकाय जुळला अशा वगैरे प्रश्नांच्या फंदात न पडावे असा एकंदर प्रकार. (चला म्हणजे "जिला चित्रपट पहायचा.." अशा प्रकारच्या इनोसंट डिस्क्लेमरवरतीसुद्धा परत उट्टे काढायची संधी संबंधितांना मिळण्याची शक्यता नाही (डोळा मारत) )

काही गोष्टी कळल्या काही आकळल्या. एकंदर आपल्याकडे मधुबाला या नटीच्या सौंदर्यावर इतक्या वर्षांनी लोक उसासे सोडतात तशा स्वरूपाचं हे "हॉलीवूड गोल्डन एरा"मधलं गिल्डा प्रकरण. बाई छान दिसतातच. त्यांच्यावर चित्रित झालेली जी गाणी चित्रपटात येतात ती गाणी सुरू झाल्यावर मात्र "जादू" घडते खरी.
गंमत अशी की यातलं एक गाणं - जे अधिक प्रसिद्ध आहेसं दिसतं ते- सुरू झालं नि एकदम "अरेच्चा. हे तर हूं अभी मैं जवानच की !" असं आपल्यापाशीच पटकन म्हणून गेलो. (स्माईल)

संबंधित लोकांच्या आनंदाकरता (किंवा जिला यामधे रस आहे तिच्याकरता (डोळा मारत) ) या गाण्याची यूट्युब लिंक :

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फिल्म नुआरविषयी माहितीपट

१९९५ साली PBSने "अमेरिकन सिनेमा"नामक १३ भागांचा माहितीपट प्रसारित केला होता. त्यातील 'फिल्म नुआर' हा भागः

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

Stonehearst Asylum केट

Stonehearst Asylum केट बेकिंसेल ड्रिम वुमन आहेच पण एकुणच चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक. चुकवु नये असा. स्टोरी वाचु नका, सांगु नका. चित्रपट चुकवु नका.

actions not reactions..!...!

काल परत सचिन चा बालिकाबधू

काल परत सचिन चा बालिकाबधू पाहीला. इतका गोड सिनेमा परत परत पहावासा वाटणारा.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हायवे (हिंदी) पाहिला.

हायवे (हिंदी) पाहिला. बाल-लैंगिक शोषण या विषयावर आधारित आहे. अलिया भट्टचे नि (कोण तो) हुड्डाचे रोल्स छान आहेत.
=====================
स्त्रीयांना त्यांच्याकडे लैंगिक वासनेनेच काय दृष्टीने देखिल न पाहणारे लोक फार इंप्रेस करतात. कदाचित संयमामुळे किंवा कदाचित वैराग्यामुळे. अजून काही असेल. या चित्रपटात ही दोन पात्रे जितक्यांदा आणि जितकी जवळ येतात पण काही लैंगिक करत नाहीत (त्या संयमाचा अतिरेक दाखवण्यासाठी) हे खटकले.
==============
बाकी चित्रपट प्रेक्षणीय आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

Tales from the Crypt

चा पुनरानंद घेतला.
ह्या गोष्टी म्हटल्या तर हॉरर (भीतीदायक) पण बर्‍याचशा विनोदी आणि कल्पनाशक्ती ताणून रचलेल्या कथा. असलं विचित्र जॉनर आहे [जॉनर ला मराठीत काय म्हणतात?]
तर ह्या सिरीजमधे एक भाग:एक गोष्ट असते. गोष्टींत वैविध्य भरपूर असतं, विक्षिप्त क्यारेक्टर्स असतात, जादू-टोणा-एकांडे वैज्ञानिक जे भयानक शोध लावतात- झाँबी-साध्या माणसांच्या असाधारण कथा- असलं काय काय असतं.
पूर्वी AXN अशा कायशा एका चॅनेलवर हे सगळं बघितलेलं, आता यूट्यूबावर पूर्ण मालिका आहे. गरजूंनी लाभ घ्यावा.

जॉनर = विधा

जॉनर = विधा

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे कोणी Taggart, Lewis,

इथे कोणी Taggart, Lewis, Morse, Gently, Frost, Barnby ह्या लोकांचे फॅन आहेत का?
कीतीतरी वर्षे फार्फार आनंद दिला आहे ह्या लोकांनी. फार सुंदर लेखन, प्लॉट, संवाद आणि कॅरेक्टरायझेशन. अमेरिकन Crime Detection Serials वाल्यांनी शिकायला पाहीजे ह्यांच्या कडुन.

हजर

जॉन थॉ चा इन्स्पेक्टर मोर्स आणि केविन व्हॅटलेचा लेविस अजून लक्षात आहे. अ ट्च ऑफ फ्रॉस्ट मधला डेव्हिड जेसनला द डार्लिंग बड्स ऑफ मे मधला पा रंगवताना पाहून फार आश्चर्य वाटलं होतं.बार्नबीशी ओळख अलीकडेच झाली आणि तो पण आवडू लागलाय. बाकी दोन मालिका पाहिल्या नाहीत, पण डेव्हिड सुशेचा प्वारो हे एक कायमच वेड लागलय.

जुन्या आठवणी जागवल्याबद्दल आभार.

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

हे कोणेत? जरा डिटेलमधे लिहा

हे कोणेत? जरा डिटेलमधे लिहा ना.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

इंग्लंड ( टागार्ट सोडुन )

इंग्लंड ( टागार्ट सोडुन ) मधल्या गुन्ह्यांमागचे आरोपी शोधुन काढणार्‍या डीटेक्टीव्ह पोलिसांची नावे आहे.
मिडसॉमर मर्डर सोडुन बाकीच्या सीरीयल्स ह्या पोलिसांच्या नावानीच आहेत. प्रत्येक सीझन मधे फक्त ४-५ भाग असतात, प्रत्येक भाग हा तेंव्हाच पूर्ण होत असल्या मुळे कुठलाही कधीही बघितला तरी चालतो. हे भाग चांगले दिड तासाचे असतात म्हणजे एक सिनेमाच.
प्रत्येक इंस्पेक्टर आणि त्याच्या असिस्टंट ची व्यक्तीरेखा त्यातल्या शेड्स सकट फार छान तयार केली आहे.
ह्या सर्व सिरीयल्स इंग्लंड च्या वेगवेगळ्या भागात घडतात. त्या त्या भागविशेषांचा , भाषेच्या लहजांचा चांगला वापर केला असतो. टॅगार्ट मधे ग्लास्गो किंवा मोर्स आणि लेविस मधे ऑक्सफोर्ड, ही शहरेच कथेचा भाग बनुन जातात.

ह्या पेक्षा जास्त मला लिहीता येत नाही. पण शक्य झाले तर जालावरुन ( किंवा टोरंटवरुन ) बघा.

हाऊस ऑफ कार्ड्स-३

तिसर्‍या सिझनवरचा अभिप्राय. या प्रतिसादात महत्त्वाचे स्पॉईलर्स आहेत, वाचकांचा रसभंग होऊ शकतो.

हाऊस ऑफ कार्ड्सचा तिसरा सिझन नुकताच पाहिला. या सिझनने अपेक्षापूर्ती केली नाही. फ्रँक अंडरवूड प्रेसिडेंट झाल्यानंतर खरंतर गुंतागुंत वाढायला हवी होती, राजकारणाला वेगळी धार यायला हवी आहे. पण समहाऊ पटकथालेखकांना जितका प्रभावी व्हीप लिहता आला तेव्हढा प्रेसिडेंट लिहता आला नाही असे वाटते. विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रसंगात अभ्यासाची कमतरता जाणवली. (इथे वेस्ट विंग हे चांगले उदाहरण आहे.) वास्तवात घडलेले काही प्रसंग कथानकात गुंफायचा प्रयत्न केला आहे तोही अर्धवट वाटला. (ड्रोन्स वगैरे. अगदी बिन लादेनचा प्रसंगही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण तो कथानकात नीट गुंफलेला नाही.) फ्रँक आणि क्लेअर या दांपत्याची केमीस्ट्री पहिल्या दोन सिझन्समध्ये अगदी जमून आलेली होती, त्यापासून फारच फारकत यात घेतलेली आहे. (विशेषतः क्लेअरचे व्यक्तिमत्त्वच बदलल्यासारखे जाणवत राहते. पण त्याकरता खास असे काही घडले आहे हे दाखवण्यात शो अपयशी ठरला आहे असे वाटते.) यामध्ये हे दांपत्य सर्वसाधारण दांपत्यांप्रमाणेच वाटते. आधी ग्रेटर गूड कडे पाहून किरकोळ अपयश पचवणारे, ध्येयाकडे जोडीने आगेकूच करणारे दांपत्य पाहता या सिझनमधील हेव्यादाव्यांमध्ये अडकलेले हे दांपत्य दांपत्य पाहता हे या सिझनचे एक मोठे अपयश वाटते.

क्लेअरला 'फर्स्ट लेडीचा' पॅसिव्ह रोल सहन होत नाहीए हे दाखवण्यात फारच ढिसाळपणा झालेला आहे. तिसर्‍या सिझनमधील प्रसंगासाठी हा पॅसिव्हपणाच जबाबदार असताना याकडे जास्त लक्ष द्यायला हवे होते असे वाटत राहते. (इथे, पुन्हा, वेस्ट विंग मधील अॅबी बार्टलेट हे दाहरण द्यावेसे वाटते.)

तिसर्‍या सिझनचा खरा हिरो 'डग स्टॅम्पर' आहे याची जाणिव आपल्याला लवकरच होते, पण तरीही त्याची कथा तशी कमकुवतच राहिली आहे. सिझनच्या शेवटी डगचा एकप्रकारे विजय होतो, त्यामुळे हे उपकथानक तसे इथे संपले आहे. त्याच्या कृतींतील गुंतागुंतही तशी कृत्रिम झालेली आहे. इतर कलाकारांचे रोलही निराशादायक वाटले. मागच्या सिझनमध्ये प्रभाव पाडणारे सेथ ग्रीसन, रेमी डॅन्टन वगैरे तर वाया घालवले आहेत. रशियन प्रेसिडेंटचा रोल तर अगदीच नवख्याने लिहल्या सारखा वाटतो.

सिझन ३ अगदीच पाहू नये असे मी म्हणणार नाही. पण पहिल्या दोन सिझनमध्ये गाठलेल्या पातळीपासून हा सिझन फारच खाली राहतो. मोजक्या प्रसंगात हा सिझन पुर्वीच्या प्रभावीपणाची आठवण करून देतो. पण बहुतेक प्रसंग अगदी प्रेडिक्टेबल झालेले आहेत. सिझनचा शेवट तर अगदीच प्रेडिक्टेबल झालेला आहे. शेवटचा एपिसोड खरं तर जास्त महत्त्वाचा असायला हवा, पण त्यात फारच निराशा झाली.

सहमत

सहमत. सीझन ३ फारच नीरस वाटला. साधारण राजकारणी लोक जितपत नालायक असतात तितकाच फ्रँक नालायक वाटतो. डग फ्रँकला चिकटायला का जातो हे मला कळलेच नाही. (फ्रँक करत असलेल्या दुर्लक्षामुळे डगने चिडून जाऊन धडा शिकवण्याचा प्रयत्न करणे असा प्लॉट बरा वाटला असता) वडिलांच्या कबरीवर मूत्रविसर्जन करणे किंवा जीझसच्या मूर्तीवर थुंकणे असे प्रसंग पूर्णपणे अनावश्यक वाटले. फ्रँकचे ब्याकग्राऊंड कळल्यानंतर अशा दृष्यांची परिणामकारकता फारच कमी झाली आहे.

+१

वरच्या दोन प्रतिसादांमधेच माझ्याशी जुळणारं मत येऊन गेल्यामुळे पुनरावृत्ती करण्यात हशील नाही.

परंतु हे असं का घडलं असावं याबद्दल विचार करत होतो. पहिल्या दोन सीझन्समधे FU अंडरडॉग असतो. तो सत्तेपासून दूर आहे पण त्याची सत्तापिपासा ही पहिल्या दोन सीझन्समागची सर्वाधिक मोठी प्रेरणा - ड्रायव्हिंग फोर्स - ठरते. त्यातल्या सत्तेच्या गोपुरांमधे रंगलेली प्यादेमात, त्यामागचा खुनशीपणा, पाताळयंत्रीपणा आणि त्यातून उलगडणारी गुंतागुंतीची मानसिकता हे फार या सीझनमधे आलेलं दिसलं नाही. याची एक (माझ्यामताने ) मोठी निशाणी म्हणजे FU अनेकदा मोक्याच्या प्रसंगी "Fourth Wall" भेदून जे प्रेक्षकांबरोबर हितगुज करायचा त्याचं प्रमाण तिसर्‍या सीझनमधे (मलातरी) खूपच घटल्यासारखं वाटलं. या सीझनमधे फ्रँकच्या सत्ताकारणामधला हिंसकपणा आणि एक व्यक्ती म्हणून त्याचं गहनगूढ चित्रण यापेक्षा, फ्रँक-क्लेअर यांच्या नात्याचं उसवलेपण अधोरेखित करायचं असावं. परंतु असं करताना जी कलाकृती आहे तिच्या गाभ्याशीच कुठेतरी प्रचंड मोठी फारकत घेतली गेली. आणखी एक म्हणजे रशियन प्रेसिडेंटबरोबरचे खेळलेले डावपेच, डग स्टँपरचं उपकथानक , फ्रँक अंडरवूडचं चरित्र लिहिणारा लेखक आणि अमेरिका-वर्क्स हे चारही धागे कमालीचे विसविशीत झालेले आहेत.

अरेरे. एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र खेच असावी आणि अचानक पलिकडून तो दोर तुटला आहे याची जाणीव झाल्यानंतर रस्सीखेचीतली मजाच संपते तसं काहीसं झालेलं आहे. (स्माईल)

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शेवटल्या निरीक्षणाशी संपूर्ण

शेवटल्या निरीक्षणाशी संपूर्ण सहमत.
राजकीय डावपेच हा ३र्‍या भागाचा केवळ Auxillary भाग वाटतो. मूळ गाभा फ्रँक आणि क्लेअरच्या नातेसंबंधांकडे झुकला आहे- जो वैयक्तिकरित्या मला अजिबात खास वाटला नाही. कदाचित फ्रँक प्रेसिडेंट बनल्यावर आता राजकीय डावपेचांत अजून काय दाखवायचं म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घटना अ‍ॅडकवल्या असाव्यात, पण त्याही ढोबळ वाटतात.
लेखकाचं पात्र + ड्ग स्टँपरची दोलायमान अवस्था हे खूप चांगले दुवे होते- पण त्यांनाही अचानक उरकून टाकल्यासारखं वाटलं. विशेषतः शेवटच्या ३ भागांत.
आणखी एक- काही राजकीय गोष्टी इतक्या साध्या करून टाकल्यात की त्या खुपतात. उ.दा. FUने दुसर्‍या टर्मसाठी उभं रहाण्याचा घेतलेला निर्णय. किंवा काँग्रेसवर त्याने केलेली बळजबरी हे जरा जास्तच सोप्पं करून टाकलंय.
एकूण- सीझन ४ मधे काहीतरी "घडेल" अशी अपेक्षा.

यावेळचा सीझन कंटाळवाणा

यावेळचा सीझन कंटाळवाणा वाटतोय. तुम्ही सर्वांनी सांगितली आहेत, तीच कारणं. पकड घेण्यासारखं काही अजून तरी हाती लागलं नाही. वेस्ट विंग सारखे प्रेसिडेंटच्या आयुष्यातले प्रसंग दाखवणं तितक्या परिणामकारकतेने जमलेले नाहीय. यादोघांसमोर जेड आणि अ‍ॅबी बार्टलेट दोघेही खूप जास्त ग्रेसफुल वाटतात.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

५१० व्या वेळी "जिस देश मे

५१० व्या वेळी "जिस देश मे गंगा बहती है" पाहीला.
ती पद्मिनी म्हणजे पार्वती दिसलीये - भिल्लीण नाही पण डाकू वेशातली. अन तिच्या अन राज कपूरच्या प्रेमाचा बहर तर .... यडं केलं, खुळावले.
अर्थात राज कपूर अतिच करतो कधी कधी. "मेरे लल्लेकी मां बनोगी क्या" सारखे अतिरेकी अन चीझी डायलॉग वगळता अन त्याचा साधा-भोलाभाला अतिरेक वगळता हा सिनेमा आवडतो.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

"व्हिपलॅश"

२०१४ साली आलेला अमेरिकन सिनेमा "व्हिपलॅश".

ऑस्कर नामांकने मिळाल्यामुळे याबद्दलचे कुतुहल होतेच. चित्रपटाने निराशा केली नाही असं म्हणणं अपुरं ठरेल. कितीतरी वर्षांमधे इतका खिळवून ठेवेल असा सिनेमा पाहिला नाही असं म्हणणं उचित होईल.

कथासूत्र : प्रारंभ (जिला वाचायचं नाही तिने हा भाग ओलांडून पुढे जावं.)
अँड्र्यू नीमन एकोणीस वर्षांचा जॅझ संगीताचा विद्यार्थी आहे. त्याचं प्रावीण्य ड्रम्स वाजवण्यातलं आहे. अँड्र्यू ज्या शाळेत जातो ती जॅझ संगीतामधली प्रतिष्ठित शाळा असावी. टेरेन्स फ्लेचर हा त्या शाळेत शिकवणारा संगीत शिक्षक. हा साधासुधा शिक्षक नव्हे. शाळेतल्या प्रत्येकाला शेवटी फ्लेचरच्या बँडमधे वाजवण्याची धडपड आहे. तिथे वाजवायला मिळणं सोपं नाही. कठोर अशा प्रकारच्या परीक्षांतून जावं तेव्हा कुठे फ्लेचर गुर्जींच्या खोलीत प्रवेश मिळणार. आणि तिथे वाजवणं म्हणजे तरी कसं ? सुळावरची पोळी. गुंतागुंतीच्या, अनवट स्वरमेळापैकी स्वर इथून तिथे हलला, तालाच्या लाखो मात्रांपैकी एका मात्रेची गल्लत झाली, की वाजवणार्‍याची आयमाय उद्धारली तर जाणारच पण फ्लेचर गुर्जींच्या खोलीतून गच्छंति. थोडक्यात "बँड"मधलं स्थान म्हणजे "एकदा सेंचुरी मारून पुढच्या पंधरा मॅचेस शून्य काढून चालेल" अशा पद्धतीचं नसून "सेंचुरीच्या खाली एक रन आली तर गच्छंति".

अँड्र्यूची बँडमधे वर्णी लागते. त्याला कल्पनाही नसताना अचानकच. त्याच्यातले गुण हेरले गेलेले आहेत.

बँडमधे गेल्यानंतर अँड्र्यूला आत्मसन्मानाला ठोकर पोचणं म्हणजे नेमकं काय याची प्रचिती येते. केवळ कलेशी इमान बाळगणारा शिक्षक आणि कलेची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा पोरगेलेसा परंतु अस्सल कलावंत यांची झुंज. चित्रपटाचा क्लायमॅक्स कथेची, त्यात काम केलेल्या या दोन्ही कलाकारांची आणि संकलनादि गोष्टींची परमावधी साधतो इतपत म्हणतो आणि याहून अधिक कथानक उघड करीत नाही.

कथासूत्र : समाप्त

चित्रपटाच्या छोट्याशा कथेची अत्यंत रेखीव बांधणी, जिवंत व्यक्तिरेखा, त्यांचं आपापल्या भूमिकेत घुसणं, नाट्यमय संघर्ष आणि त्या संघर्षाची शेवटची परमावधी हे घटक तर सिनेमामधे आहेतच. परंतु सिनेमातला जॅझ संगीताचा भाग, त्यातल्या दंतकथास्वरूप बनलेल्या विभूतींबद्दलची संभाषणं या गोष्टींमुळे चित्रपटाला जो पोत आलेला आहे तो फार लोभसवाणा आहे. जॅझ कलांवंताची, त्यांच्या परफॉर्मन्सची चित्रणं जिवंत आहेत.

सरतेशेवटी, हा चित्रपट उच्च दर्जाच्या मनोरंजनापलिकडचं काहीतरी देऊन जातो. कलेची साधना, त्याकरता लागणारे अपरिमित कष्ट हे सर्व तर आपल्याला माहिती असतंच. परंतु उत्तुंग कलेचा जो "हाय ऑक्टेन" प्रदेश आहे तिथे हा सिनेमा आपल्याला घेऊन जातो. कुठल्याही गोष्टीमधे सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता अपार कष्ट करावे लागतात हे तर सर्वमान्य सत्य आहेच; परंतु विशेष करून कलेच्या बाबत ही किंमत कलावंताच्या भावभावना, त्याचे नातेसंबंध याच्या स्वरूपात कशी मोजावी लागते आणि कला कुठल्याही प्रकारची नैतिकता कशी जाणत नाही याचं अत्यंत उत्कंठावर्धक चित्रण इथे येतं. Art is a Beast इतकंच नव्हे तर तुमच्या रक्ताची, सर्वस्वाची किंमत मागणारा आणि त्याखेरीज इतर कशाचीही पर्वा न करणारा हा Beast आहे याचं प्रत्यंतर इथे येतं.

अँड्र्यूचं काम करणारा माईल्स टेलर आणि फ्लेचरचं काम करणारा जे के सिमन्स यांना, या चित्रपटाच्या कर्त्यांना (आणि हो, विशेषकरून त्याच्या संकलकाला !) सलाम.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

परीक्षण अतिशय आवडले.

परीक्षण अतिशय आवडले.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

सुंदर परीक्षण. पहाण्याच्या

सुंदर परीक्षण. पहाण्याच्या यादीत आहेच (सर्वच ऑस्कर नामांकित चित्रपट पहायचे आहेत). चित्रपटाचं असं छान डिटेलवारी परीक्षण असलं की पहायला अजून हुरूप येतो त्यासाठी धन्यवाद!
बर्डमॅन्, बुडापेस्ट, दी इमिटेशन गेम, बॉयहूड, थिअरी ऑफ एवरीथींग/स्टिल अलीस ह्यांचेही परीक्षणं आली तर मजा येईल.
ओह ऋषिकेश चा वरचा प्रतिसाद वाचला, पहावे मनाचे वर वाचीन बाकी ऑस्कर नामांकनात असलेल्या चित्रपटांचे परीक्षण. धन्यवाद ऋ.

धन्यवाद

>>> सुंदर परीक्षण. <<< थँक्स.

या चित्रपटातली मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे "अँड्र्यू हा एक उत्तम ड्रमर असतो" आणि "फ्लेचर हा एक उत्तम जॅझ शिक्षक असतो" हे प्रस्थापित होण्याकरता मला "समजा" असं म्हणावं लागलं नाही. नाहीतर आपल्याकडचे हिरो एकदम "माहिर" असतात प्रत्येक गोष्टीत. तिकडे मेजर सस्पेंशन ऑफ डिसबेलीफची गरज पडते आणि फारच ताणेस्तोवर डिसबेलीफचे रबर ताणावे लागते. इथे तसं नाही. नटांना अभिप्रेत असलेली स्किलसेट्स त्यांच्याकडे होती किंवा त्यांनी ती कमावलेली आहेत. आता अर्थातच काम करणारा नट म्हणजे काही जॅझ संगीतातला सर्वोच्च ड्रमरइतका मोठ्या ताकदीचा नाही; आणि तसं वाटण्यामधे ध्वनी आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींच्या संकलनाची किमया आहे. परंतु आपल्याकडे निबर, पंचेचाळीशीपलिकडचे हिरो कॉलेजकुमार दाखवतात किंवा मिल्खासिंगचं चित्रण करताना प्रचंड मस्क्युलरच काय दाखवतात त्याच्यापेक्षा शेकडो योजने पुढची गोष्ट इथे दिसते.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"व्हिपलॅश" : आणखी एक परीक्षण

जॅबरवॉकी इज अ‍ॅट इट अगेन.

http://jaiarjun.blogspot.com/2015/03/shared-madness-thoughts-on-whiplash...

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

व्हिपलॅशचे संगीत आणि त्यातला अस्सलपणा : प्रतिवाद

...आणि "व्हिपलॅश"मधल्या नाट्याबरोबरच त्यातल्या अस्सलपणाचे गोडवे गात असतानाच हा लेख पहायला मिळाला (स्माईल)
http://www.newyorker.com/culture/richard-brody/whiplash-getting-jazz-rig...

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.