अलीकडे काय पाहिलंत - १९

जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***

'रायबेशे' आणि 'ढाली' नावाचे दोन नृत्यप्रकार आज पहिल्यांदाच पाहिले. फारच वेगळे वाटले. ही दोन्ही बंगालमधली लोकनृत्यं आहेत. नृत्य महोत्सवात सादर होत होती म्हणून नृत्यं म्हटलं, पण त्यात नृत्याव्यतिरिक्त गाणी होती, कसरती होत्या, युद्धसदृश प्रसंग होते.
रायबेशे: लाल काठाच्या पांढ-या साड्या ('कहानी' फेम) नेसलेल्या दोन विशाल महिलांनी बंगालच्या भूमीचे गुणगान करणारे एक गाणे गाण्याचा जोरदार प्रयत्न करून प्रेक्षकांवर जरब बसवली. नगारा, ढोल आणि झांजा अशी वाद्यं एकीकडे वाजत होती. त्या अंतर्धान पावल्या, आणि रंगमंचावर अतिशय घट्ट, लांडे धोतर नेसलेले दहाबारा पुरुष अवतरले. रायबेशे हे युद्धनृत्य आहे, त्यामुळे फक्त पुरुष हे नृत्य करतात म्हणे. अनेक समूह-लोकनृत्यांत जसं प्रेक्षकांकडे तोंड करून न नाचता गोल करून नाचतात, तसं गोलाकार नृत्य सुरुवातीला होतं. वाघा बॉर्डरवर सैनिक जसे उंच उंच पाय उचलून मारतात, तशा प्रकारच्या स्टेप्स होत्या. बहुधा युद्धभूमीकडे प्रस्थान करत असावेत. नाचताना हे पुरुष (ढोल बजने लगा या गाण्यात आहे तशी) बोंब मारत होते. गोल नाचून झाल्यावर सगळे नर्तक बोंबाबोंब करत खोखो खेळायला बसल्यासारखे उकिडवे बसले. दोन चार जण गटागटाने पुढे येऊन तालबद्धपणे कसरती सादर करू लागले, त्या अचंबित करणा-या होत्या. उदा. बांबूवर चढून नाचणं, एकाच्या केसाला लोंबकाळून दोन जणांनी गरगर फिरणं, मानवी मनोरे करून नाचणं, हवेतल्या हवेत वेगवेगळ्या प्रकारच्या कोलांट्या मारणं, तीन जणांनी पुढल्याचे पाय हातात धरून चक्र करून रहाटासारखं गोल फिरणं... काय ते लवणं! माणसाचं शरीर एवढं काय काय करू शकतं? एकीकडे रणवाद्यं जोरजोरात वाजतच होती. मी खुर्चीवर मागे रेलून बसले होते, ती पुढे सरसावून येऊन बघत बसले. थक्क करणा-या कसरती होत्या, पण नृत्यकला असं म्हणावं असं वाटलं नाही. मणिपूरचं थांग ता यापेक्षा कितीतरी सरस असतं.
ढाली: यात लाकडाचे भाले आणि बांबूच्या ढाली हातात धरून मुलामुलींनी लढाईसदृश नाच केला.
हे दोन्ही नृत्यप्रकार गुरुसदय दत्त यांनी १९३०च्या सुमाराला 'शोधून' काढले. शोधले म्हणजे ते आधी होतेच, दत्तांनी ते पुनरुज्जीवित करून (शहरी) लोकांपुढे आणले.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

"अ फेअर डील"

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

हे तेंडुलकरांचे वरिजनल नसावे.

हे तेंडुलकरांचे वरिजनल नसावे. कोठल्याशा इंग्रजी नाटकाचे रूपांतर आहेसे वाटते

ह्म्म्म.

संदर्भ, अन्वयार्थ इ.इ. समजला नाही. असो.

हपीसातली वैतागवाडी. जस्ट व्हेंटिंग औट.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

"अशी पाखरे येती" नक्की विजय

"अशी पाखरे येती" नक्की विजय तेंडुलकरांनीच लिहिलंय ना?

त्या काळी असल्या ष्टोरीलायनी लय असाव्यात. बावर्ची, छोटी सी बात वगैरे. काळासाठी थोडी माया सोडली तरी फारच भाबडं आणि वरवरचं नाटक वाटलं.

पाच मिनिटांच्या पेप टॉकने कोणी प्रेमात पडत असेल तर शिव खेराने जनानखाना ठेवला असता. सगळ्यात डोक्यात गेला तो शेवट - सरूचा मुलगाच भेटायला येतो? व्हाट धिस तेंडुलकर??

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ठ्ठो शिव खेरा आता "यू कॅन

ठ्ठो (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

शिव खेरा आता "यू कॅन ठेव अ जनानखाना" अशा नावाचं पुस्तक लिहितोय असे चित डोळ्यांसमोर तरळले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

काहीसा असहमत

पाच मिनिटांच्या पेप टॉकने कोणी प्रेमात पडत असेल तर शिव खेराने जनानखाना ठेवला असता.

या वाक्याची मार्मिकता वगळता उर्वरित प्रतिसादाशी अंमळ असहमत आहे.

बोले तो, तेंडुलकरांचे तेवढे एकच नाटक आम्हांस त्यातल्या त्यात सुसह्य वाटले. अन्यथा, तेंडुलकरांची उर्वरित नाटके वाचून आमचा 'रावसाहेब' होतो. ('असली घाण नाटके लिहिणार्‍या फुल्याफुल्याफुल्याला उलटे टांगून फुल्याफुल्याफुल्या' वगैरे.)

अर्थात, व्यक्तिगत पसंतीचा आदर आहेच.

(बाकी, पाच मिण्टांच्या पेपटॉकवरून प्रेमात पडण्याबद्दल. 'हम दिल दे चुके सनम'मधील ऐश्वर्या रायचे पात्र जेथे गुजरात्यांच्या अत्याग्रहास बळी पडून झेपत नसतानासुद्धा भजी आणि गोटे खा-खा-खाल्ल्याने सराउंड साउंडमध्ये आख्ख्या थेटराच्या कानठळ्या बसण्याइतपत मोठ्याने अतिशयोक्त (परंतु तरीही पाच मिण्टांपेक्षा खूपच कमी) पादल्याबद्दल सलमान खानच्या पात्राच्या प्रेमात पडते, तेथे बिचार्‍या आमच्या सरूनेच काय घोडे मारलेय?)

(अतिअवांतर: तसेही, 'अशी पाखरे येती' हे तेंडुलकरांचे वरिजनल नसावे. कोठल्याशा इंग्रजी नाटकाचे रूपांतर आहेसे वाटते. चूभूद्याघ्या.)

आजची म्हणः टिरीवर हाना पण पाटलीण म्हना

याचा संदर्भ, अन्वयार्थ इ.इ. समजला नाही. असो.

>> पाच मिनिटांच्या पेप टॉकने

>> पाच मिनिटांच्या पेप टॉकने कोणी प्रेमात पडत असेल तर शिव खेराने जनानखाना ठेवला असता <<
एकाच वेळेस विनोदी आणि चिंतनीय वाक्य आहे!!

अंकुर अरोरा मर्डर केस

'अंकुर अरोरा मर्डर केस' बघितला. एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका छोट्या मुलाचा जीव जातो आणि मग डॉक्टर आपली चुक लपविण्यासाठी काय काय करतो, दुसरा शिकाऊ डॉक्टर हा हलगर्जीपणा उजेडात आणण्यासाठी काय प्रयत्न करतो यावर आधारीत सिनेमा. सर्वच कलाकारांची कामे छान झालीयत. शेवट टिपीकल बॉलीवुड स्टाईल आहे पण एकदा नक्कीच बघावा असा आहे. युट्युबवर संपूर्ण सिनेमा बघता येईल.

ए ओ सी डी

अर्थात अ‍ॅडल्ट चिल्ड्रेन ऑफ डिवोर्स पाहिला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणताही हॉलिवूडपट पाहताना जनरली माझ्यातली उसंत सखू जागी होते. (कि माझ्यातला उसंत सखू जागा होतो? व्याकरणात काहीतरी गंडलं असेल तर सुधारणा सुचवा.). विचित्र आकाराचे आणि अतिविचित्र शक्ती असलेले आणि अतिअतिविचित्र उणिव असलेले ओंगळ प्राणी मानवता संपवण्यात जसेजसे अधिकाधिक यशस्वी होऊ लागतात आणि हिरो काळजीने अधिकाधिक गंभीर तोंड करू लागतो आणि अधिकाधिक गंभीर पावले उचलू लागतो तेव्हा मला अधिकाधिक हसू फुटू लागते. इतक्या हायपोथेटिक जागी साला इतका घनगंभीर अभिनय कोणी करूच कसा शकतो असं मला वाटत राहतं. अधिभौतिक असं काही नसलेले सिनेमे अमेरिकेत लोकांना बनवायला येतच नसावेत. असले तरी, एक वन फाइन डे सोडून, मला आत्ता तरी हे लिहिताना आठवत नाहियेत.

तर थोडक्यात या चित्रपटात सगळं काही भूतलावर शक्य शक्य असंच आहे. म्हणून उपहास करावा वाटला नाही. तुम्हाला पाहण्यापूर्वी रसभंग नको असेल तर खालचा पॅरा नका वाचू.
==========================================================================================
चित्रपट कार्टर नावाच्या पात्राभोवती केंद्रित आहे. हा माणूस अतिशय संतुलित, सभ्य, विचारी (माझ्या दृष्टीने एक्स्ट्रॉ-अमेरिकन) आहे. मला लगेच आवडला. पण त्याचे मायबाप हॅबिच्यूअल डायवोर्सर्स आहेत. त्यांचं एकत्र येणं म्हणजे मोठा राडा आणि प्रचंड नाजूक प्रसंग. हे दोघेही निर्लज्ज, चरित्रहिन, आणि पालक म्हणून अत्यंत क्रूर देखिल म्हणावेत अशा प्रकारचे लोक आहेत. कार्टरच्या नवव्या वाढदिवशी ते सॉलिड राडा करतात आणि वेगळे होतात. त्यानंतर एका, अनप्रोफेशनल, दुष्ट, स्वघोषित समाजाभ्यासिकेला हे लोक कार्टर 'घटस्फोटाचा बालबळी' म्हणून बरीच माहिती देत असतात. ती एका पुस्तकात (टायटल्ड ए सी ओ डी) त्याचे सहानुभूतीस्पद कॅरॅक्टर रंगवते. कार्टर स्वतःस तसे न समजता एक यशस्वी व्यक्ती समजतो नि असतो देखिल. पण त्याच्या भावाचे लग्न ठरते, कार्टर आईबापांना एकत्र आणतो. ठणकावून सांगतो कि तुम्ही काहीही झक मारलीत, मला काही फरक पडत नाही. फक्त भावाच्या लग्नाला या सभ्यपणे वागा. पण इथेच सगळा घोळ होतो. त्याचे सनकी आईबाप "टोटलच" एकत्र येतात आणि विद्यमान स्पावसेसना डिच करतात. मग सगळ्यांना दुर्दशा येते. सगळे हाकलले जातात. कार्टरची सावत्र आई त्याला त्याचे हॉटेल चालवायची जागा रिकामी करायला सांगते. भावाचे लग्न तुटते.
कार्टरची प्रेमिका, लॉरेन, खूप गोड नि समंजस आहे. त्याच्याचप्रमाणे. तिच्या आईबापाचे लग्न फार स्थिर आहे. त्यांच्या लग्नाच्या ४० व्या अ‍ॅनिवर्सरीला कार्टर 'लेट्स मेक इट ऑफिशियल' म्हणून अचानक रिंग देतो. तीही ती त्याला, तो घटस्फोटाचा गरीब बिच्चारा बळी अशी प्रतिमा माहित झाल्याने म्हणा, परत देते.

कार्टर वैतागून मायबापांची सगळी लेगसी (मंजे त्यांच्या बर्‍याच डायवोर्सेसचे कागदपत्रे) जाळू म्हणून त्यांच्या एका विराण जागी जातो. आता सगळंच संपलं असल्याने ती प्रॉपर्ती क्लेम करायला प्रत्येक जण टपकतो. पण तितक्यात अपघाताने कागदांसोबत अख्खी प्रॉपर्टीच जळून जाते. पोलिसांसमोर प्रॉपर्टी माझी नाही म्हणू लागतो आणि कार्टर मात्र ती घेतो. अर्थातच काही काळाने तो पुनश्च उभा राहतो आणि समाजाभ्यासिकेने यशस्वी ए सी ओ डींचा सत्कार समारंभ ठेवलेला असतो तेथे त्याचीही वाहवा होते. लॉरेन शेजारी ऑटोग्राफ घ्यायला (हे निमित्त हे तुम्हाला कळलेच असेल) येते.
===========================================================================================
चित्रपट गंभीर, कि विनोदी कि सेंटीमेंटल हे आधी ठरवून तसे सीन मिळाले नाहीत म्हणणं चूक आहे. कार्टर नेहमी शक्य तितकं संतुलित राहण्याचा प्रयत्न करतो. त्यातून कधी विनोद होतो तर कधी काही.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

पीकू

पीकू या चित्रपटाबद्दल वृत्तपत्रांमध्ये व आंतरजालावर भरभरुन वाचायला मिळते. मुळात या चित्रपटाच्या प्रोमोजमध्ये बद्धकोष्ठतेविषयी असलेले किंचित ओंगळवाणे उल्लेख बघून याचा दिल्ली बिल्ली (किंवा देहली बेली) होणार असे वाटले होते. हे वाटणे चुकीचे ठरले याचा आनंद आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पडुकोण आणि इरफान यांच्यात त्यातल्या त्यात कमकुवत अमिताभच वाटतो यात काय ते आले!

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मी सुद्धा हा चित्रपट पाहिला.

मी सुद्धा हा चित्रपट पाहिला. मला आवडला.

पाहावे मनाचेवरही याचे पॉसिटिव्ह परिक्षण आले आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या सायटीवरचे दिगू टिपणीस

त्या सायटीवरचे दिगू टिपणीस इथले चिंतातूर जंतू आहेत काय ?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Fed Up -Documentary

"Fed Up" नामक एक डॉक्यु. पाहिली. Processed food आणि एकूणच खाद्य-उद्योग ह्यांनी कुठे आणि कशाप्रकारे आपली मारून ठेवलीये ते बर्‍यापैकी सांगितलंय, अर्थात अमेरिकेच्या संदर्भात.
पूर्वी मला वाटायचं की अमेरिकेतले लोक उगाच नौटंकी करतात- त्यांना बाहेर खायची वाईट सवय आहे आणि जर घरी खायला लागले तर आपोआप सगळे प्रॉब्लेम्स सुटतील.
पण ह्यात लोचा असा दिसतोय की-
१. साधे Cereals आणायचे झाले तरी त्यात छुप्या गोष्टी असतात, मग त्यातले चांगले कुठले ते शोधा. किंवा ब्रेड- त्यात अनंत प्रकार. आणि जे कमी किंमतीत आहेत अशा ब्रेडमुळे शरीराला काही मिळण्याचा संभव कमी.
२. लहान मुलांना आकर्षित करायला त्यांच्यासाठी जाहिरातीत खास कार्टून्स वगैरे आणून मार्केटिंग करणं- सहाजिकच पोरांना या गोष्टी हव्याशा वाटत असणार. कदाचित पालकांनी त्यांना नाही म्हटलं तर सकस खाणं शक्य होत असावं, पण आजूबाजूची पोरं काहीबाही खात असतील तर कठीण आहे.
३. Counter Intuitive वाटलं तरी अमेरिकेत "Processed Food हा नियम आणि घरगुती जेवण हा अपवाद आहे"- अशी परिस्थिती असेल, तर मग लहान मुलांनाही processed food खाण्यात काहीच चूक वाटत नाही.
४. बाकी कॉफ्या, सोडा, पिझ्झे, इ. संपूर्ण अनावश्यक तरीही जव़ळपास नेमाने खाल्या/प्याल्या गेलेल्या पदार्थांबद्दल सोडून द्या.

एकूण प्रकार वाटतो तेवढा सऱळ नाही हे कळलं.

कमाल आहे. मारुन ठेवलीये वगैरे

कमाल आहे. मारुन ठेवलीये वगैरे काय? प्रोसेस्ड फूडमुळे काहीही हानी होत नाही. चूक लोकांचीच आहे. प्रोसेस्ड फूडमुळे वेळाची किती बचत होते, वाचलेल्या वेळातून अमेरिकन लोकांची किती अफाट प्रगती झाली आहे ते बघा. वाचलेल्या वेळातून मिळवलेल्या पैशांमुळे उत्पन्नातला अन्नावर खर्च होणारा भाग अगदीच नगण्य झाला आहे. आणि "उत्पन्नातील अन्नावर खर्च होणार्‍या भागाचे प्रमाण" हा प्रगतीचा पूर्वनिर्धारित निर्देशक असल्याने प्रगती झाली हे आकडेवारीनिशी सिद्ध होऊ शकते. पण ज्यांची प्रगती झाली आहे त्यांना तुमची प्रगती झाली आहे हे पटवून देत बसावे लागते यापरते मानवजातीचे दुर्दैव ते काय?

Hope is NOT a plan!

साधारण अशाच थिमवर ब्रॅडेड

साधारण अशाच थिमवर ब्रॅडेड म्हणुन एक मस्त चित्रपट येउन गेला. अगदी चुकवु नये असाच चित्रपट.

actions not reactions..!...!

कुठे पाहिलीस? यु ट्युबवर आहे?

कुठे पाहिलीस? यु ट्युबवर आहे?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेटफ्लिक्सवर आहे

नेटफ्लिक्सवर आहे

'चंद्रलेखा' निर्मित ती

'चंद्रलेखा' निर्मित ती फुलराणी यू ट्यूबवर पाहिलं.
अतिसामान्य (आचार्य अत्र्यांच्या शब्दात 'महाभिकार'!!) वाटलं.
त्यातला हीरो प्रोफेसर अशोकचं काम करणारा नट हाच खुद्द निसटते उच्च्चार करत बोलत होता. अरे फोनेटिक्सचा प्रोफेसर तू, नाटकाचा विषय उच्चारशास्त्र आणि असं फाफलल्यासारखं काय बोलतोस?
नायिका त्यामानाने बरी होती पण खूपच ओव्हरअ‍ॅक्टिंग करत होती. नायिकेचा बाप दगडोबाही इरसाल वाटायच्या ऐवजी मवाली/टपोरी वाटत होता.

मला सतिश दुभाषी आणि भक्ती बर्वेंचं ती फुलराणी पहायचा भाग्ययोग लाभलाय. इतकी दशकं होऊन गेली पण अजून तो प्रयोग स्मरणात आहे! माय फेअर लेडी तर माझ्या संग्रही आहे, इतक्या वेळा पाहिलाय की मला तो जवळजवळ तोंडपाठ आहे.

त्या चंद्रलेखाच्या नाटकात प्रोफेसरचं काम करणार्‍या नटाला ओरडून सांगावंस वाटलं की सतिश दुभाषी तर आता गेले, पण अरे जरा माय फेअर लेडी बघ की दहावेळा! बघ तो रेक्स हॅरिसन कसे उच्चार करतो ते!
नाटक/अभिनय हे एक पण एरवीसुद्धा माणसाने इंग्रजी कसं बोलावं याचा क्लासिक वस्तुपाठ आहे तो!!!
नायतर हे उगीच शिंचं उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जातात **चे!!!!!
(इथे संतप्त स्मायली कल्पावी)

मीही हे स्टेजवर पहाण्याची चूक

मीही हे स्टेजवर पहाण्याची चूक केलेली आहे....महाभिकार आहे याबद्द्ल पूर्ण सहमत. 'फाफलल्यासारखा' हा "अनवट" शब्द "चपखल" बसतोय अविनाश नारकरच्या संवादफेकीचे वर्णन करायला. अमृता सुभाष अत्यंत बालिश वाटते.
भक्ती बर्वे आणि संजय मोने असलेला प्रयोग मी लहानपणी पाहिला होता तो कित्यकपटींनी सरस होता. अर्थात तेव्हा लोक दुभाषीच कसे पर्फेक्ट होते याची चर्चा करताना ऐकले.

अर्थात तेव्हा लोक दुभाषीच कसे

अर्थात तेव्हा लोक दुभाषीच कसे पर्फेक्ट होते याची चर्चा करताना ऐकले.

दुभाषींनी तो रोल अत्युत्तम केला होता यात शंकाच नाही. आणि भक्ती बर्वेंनीही त्यांना उत्तम साथ दिली होती!!!

मी त्या नाटकाचा प्रयोग हा मुंबईत (बिर्ला नाट्यमंदीर किंवा साहित्य संघ आता नक्की आठवत नाही) पाहिला होता.
त्यानंतर एक प्रयोग डोंबिवलीला झाला होता. त्याला आमचे एक काका गेले होते ते आठवण सांगत होते.
डोंबिवलीचं भरत नाट्यमंदीर हे ओपन एअर थेटर! दिवस ऑगस्ट महिन्यातले!
नाटक सुरु असतांना पावसाची एक हलकी सर आली. लोक भिजायला लागले...
दुभाषी आणि बर्वेंनी क्षणभर आपले संवाद थांबवून, बेअरिंगमधून बाहेर येऊन, ऑडियन्सवर नजर फिरवली...
कुणीही जागचं उठलं नव्हतं वा छत्री उघडली नव्हती! लोकं खिळल्यासारखी प्रयोगात गुंगून गेली होती.
दुभाषींनी शांतपणे आपलं मागचं वाक्य पुन्हा रिपीट केलं आणि पुढला सगळा प्रयोग यथास्थित पार पडला.....
हॅट्स ऑफ टू हिम!!

आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!
अमृता सुभाषचा प्रयोग पहायलाच का गेलात म्हणतो मी! त्यांनी कसला वास घेतला माहिती नाही पण उलट तुम्हीच ... उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जायचं नी वास येतो म्हणायचं हे काय बरोबर नाय (डोळा मारत) (ह घ्यालच)

मागे एकदा अमृताबैंनी 'सवित्री'चे अभिवाचन केले होते. मन हज्जारदा नको म्हणत असतानाही केवळ 'सावित्री'च्या प्रेमाखातर गेलो. प्रचंड एकसुरी, लेखी, मध्येच अडखळलेलं नी पकड न घेऊ शकलेलं अभिवाचन बघुन थोबाडीत मारल्यासारखा चेहरा करून परतलो! तेव्हा तुमच्या प्रमाणे एकदा उंटाच्या बुडख्याचा मुका घेतल्या नंतर आलेले शहाणपण आहे (जीभ दाखवत)

या बाई लिहित असतील ठिक (असे अनेकांचे मत), पण अभिनय!!!! अरारारारा

===

या नाटकात अविनाश नारकर नुसताच मोठमोठ्याने ओरडतो असे ऐकलेय

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह. घेतो पण...

अमृता सुभाषचा प्रयोग पहायलाच का गेलात म्हणतो मी! त्यांनी कसला वास घेतला माहिती नाही पण उलट तुम्हीच ... उंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जायचं नी वास येतो म्हणायचं हे काय बरोबर नाय

आम्ही काय बाबा तिकीट काढून मुद्दाम बघायला गेलो न्हाय. ती तुम्हां तज्ञांची कामं, फेस्टिव्हलमध्ये मुद्दाम वास वगैरे घ्यायची! (स्माईल)
आम्ही यू ट्यूबवर जे होतं ते पाह्यलं....
ती नायिका कायशिशी अमृता सुभाष का कोण ते पण आम्हाला म्हायती नाय. तिचं आम्ही बाकी काहीच काम पाह्यलेलं नाय!!
नाटकाच्या सुरवातीला त्यात कोण काम करतंय ते पहायची गरज भासली नाय (कारण नाटक बघायचं होतं!) आणि नाटक संपल्यानंतर कोण शिंदळीचं ते बघून काय शिंचा आता उपयोग असं म्हणून पाह्यलं नाय!!!!
आता अदिती म्हणतेय ती कोण अमृता सुभाष तर अमृता सुभाष!!!!
बाकी तिच्याविषयी आमची काय जास्त हरकत नाय, हरकत आहे ते नायकाविषयी, महाभिकार काम केलंय त्याने!!!

-------------------------------------------------
आय हॅव ऑफन वॉक्ड, ऑन धिस स्ट्रीट बिफोर,
बट द पेव्हमेंट ऑलवेज स्टेड बीनीथ माय फीट बिफोर....
ऑल दॅट वन्स अ‍ॅम आय, ट्राय टू वॉच धिस ट्राय,
फाइंड दॅट आय गेट पीस्ड विथ द शो अ‍ॅज इट लिव्ह्ज!!!! (स्माईल)
https://www.youtube.com/watch?v=0udu4KYv1zI

:)

ती तुम्हां तज्ञांची कामं, फेस्टिव्हलमध्ये मुद्दाम वास वगैरे घ्यायची!

हाण्ण! (लोळून हसत)

---

आय हॅव ऑफन वॉक्ड, ऑन धिस स्ट्रीट बिफोर,
बट द पेव्हमेंट ऑलवेज स्टेड बीनीथ माय फीट बिफोर....
ऑल दॅट वन्स अ‍ॅम आय, ट्राय टू वॉच धिस ट्राय,
फाइंड दॅट आय गेट पीस्ड विथ द शो अ‍ॅज इट लिव्ह्ज!!!!

__/\__

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अविनाश नारकरचं अभिनयातलं दैवत

अविनाश नारकरचं अभिनयातलं दैवत देवानंद असावं असं वाटतं.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

हाच अत्याचार मी काही

हाच अत्याचार मी काही वर्षांपूर्वी स्वतःवर केला होता. (तुम्ही ज्या नटाला नावं ठेवत आहात तो अविनाश नारकर, नटी अमृता सुभाष. तिचा अभिनयातला आदर्श बहुदा करीश्मा आणि करीना कपूर भगिनी असाव्यात.)

नाटक प्रचंड कालविसंगत वाटलं. प्रा. जहागिरदार पैज काय लावतो, तर मंजुळेला कोणत्यातरी पार्टीत राजकुमारी म्हणून मिरवून आणेन. आणि मिरवणं म्हणजे काय तर कुठल्याशा पार्टीत जाऊन बालकवींची कविता म्हणणं? या वयाची कोणतेही तरुण-तरुणी आता बालकवींमध्ये अडकलेले असतात काय? मुळात या लोकांना मराठी कविता (संदीप खरेची असल्याशिवाय) माहीत असते काय! हल्ली कोण नवश्रीमंत मराठीला पॉलिश लावू बघतात! किती ओढूनताणून नाटकं करायची हौस ही!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किंग्जमनः धमाल बिनडोक करमणूक

कॉलिन फर्थचा किंग्जमन - द सीक्रेट सर्विस पाहिला. निव्वळ कापाकापी, रक्ताची कारंजी, तुफान हाणामारी, वेगवान कथानक, स्पाय गॅजेट्स, 'माणसे ही पृथ्वीला लागलेली कीड' असे मानणारा मनोरुग्ण खलनायक असे प्रकार आवडत असतील त्यांनी अवश्य पाहा. धमाल पैसा वसूल मनोरंजन. सॅम्युएल जॅक्सनचा खलनायक एकदम जबरी.

+१

पाहिलाय. मस्त मजा आली.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

निव्वळ कापाकापी, रक्ताची

निव्वळ कापाकापी, रक्ताची कारंजी, तुफान हाणामारी, वेगवान कथानक, स्पाय गॅजेट्स

आनि या सोबत
कॉलिन फर्थ!!!

हे काँबिनेशनच उत्सुकता वाढवणारं आहे. बघायलाच हवा! आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Yening Amadi Likla ( म्हणजे

Yening Amadi Likla ( म्हणजे Spring and Dew ) हा मणिपुरी चित्रपट पाहिला. साधाच होता. पण त्यातलं हिरवंगार वातावरण बघताना खुप मस्त वाटलं.

भोपाल- ए प्रेयर फॉर रेन

भोपाल- ए प्रेयर फॉर रेन.
मन विषण्ण करणारा अनुभव.
युनियन कार्बाइड ला किती दोष द्यायचा, सरकारला किती आणि सुरक्षेचे नियम न पाळणार्‍यांना किती ?
मात्र आजही सुरक्षिततेचे नियम पाळणे म्हणजे मोठी शिक्षाच आहे याच आविर्भावात बरेचसे कामगार वावरत असतात हे सत्य आहे. सुरक्षा अधिकार्‍याला शिव्या देणार्‍या लोकांची अजिबात कमतरता नाही. वरुन सुरक्षा साधनांमुळे प्रॉडक्शनचा वेग मंदावतो अशी थियरी मांडणारे सुशिक्षीत आणि अशिक्षीत कामगार नेहमीच भेटतात. मात्र त्यातून काही संकट उद्भवले की कंपनीला, सरकारला शिव्या देण्यात हेच पुढे.

कला, संगीत आणि संस्कृती

मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ : अविस्मरणीय चित्रपट !

सेरेब्रल पाल्सी झालेल्या एका नाजूक,लोभस, कॉलेजतरुणी लैलाच्या भूमिकेतला कल्की कोचलीनचा परकायाप्रवेश विस्मयचकित करणारा आहे.कल्की लैलाच्या भूमिकेत इतकी एकरूप झाली आहे की प्रत्यक्ष आयुष्यात ती एक धडधाकट ,नॉर्मल तरुणी आहे हेच अविश्वसनीय वाटावं. लैलाचं निरागस बालकासम बघणं,बोलणं, मधूनच हरवून जाण आणि तिचं विलोभनीय हास्य मंत्रमुग्ध करतं. सकारात्मक उर्जेने ओतप्रोत लैला अपंगत्वाच भांडवल करत नाही आणि हतबल होऊन रडारडी करतानाही आढळत नाही.आपल्या व्हीलचेअर आणि वॉकरसकट ती निरोगी माणसापेक्षाही सामान्य जीवन जगत असते.संगीत ऐकणं ,बुद्धिबळ खेळणं, फेसबुकवर चॅट करणं आणि पोर्न बघणं सुद्धा! आपल्या लैंगिक जाणिवांच्या शोधासह एक संगीतकार आणि गीतकार म्हणून तिचं विकास होत असतो. प्रेरणादायी आईचं आणि तिचं मित्रत्वाचं नातं आणि पित्याचं , भावाचं सर्वसाधारण माणसाप्रमाणे तिच्याशी नॉर्मल वागणं स्वप्नवत वाटतं.

रेवतीने आईची उत्कृष्ट भूमिका केली असून तिला इतर कलाकारांची उत्तम साथ आहे. संगीत कर्णमधुर आणि छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

एका सेरेब्रल पाल्सी तरुणीची करुण कहाणी पाहून हृदय पिळवटून, निव्वळ अश्रुपात करावा लागतो कि काय अशी पूर्वग्रहदूषित धाकधूक वाटत होती.सुदैवाने निखळ विनोद आणि भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत खिळवून ठेवणारा हा चित्रपट कल्की साठी बघावाच असा अविस्मरणीय अनुभव आहे. लैलासोबत " मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ"चा आस्वाद घेऊनच बघावा !

जागतिक प्रगती

https://www.ted.com/talks/hans_rosling_shows_the_best_stats_you_ve_ever_...

'ऐसी'वर घासकडवी यांनी भारताची प्रगती ही सुंदर लेखमाला लिहिली आहे. जगात सर्वच देशांची कशी प्रगती होत आहे हे दाखवणारा वरचा टेड व्हिडिओ फारच सुंदर आहे. किचकट आकडेवारी समजावून सांगण्याची पद्धत केवळ अप्रतिम. सांख्यिकी, विकास, डेटाबेस-तंत्रज्ञान किंवा निव्वळ प्रेझेंटेशन यापैकी कोणत्याही विषयात रस असणाऱ्या सर्वांनी अवश्य पाहा.

हॅन्स रोसलिंग यांची

हॅन्स रोसलिंग यांची प्रेझेण्टेशन्स पाहून नेहमीच खूप बरं वाटतं.

Hope is NOT a plan!

लोकसत्ता लोकरंगमध्ये

लोकसत्ता लोकरंगमध्ये "नव्वदोत्तरी नाटकं" ही अत्यंत रोचक मालिका सुरू आहे. "नव्वदोत्तरी" या शब्दाला भारतीय ललितकलांमध्ये महत्त्वाचं स्थान (अजून मिळालं नसेल तर) मिळावं. खाऊजा आणि त्याची पिल्लावळ सामान्यांच्या आयुष्यावर हलके हलके पण मोठा प्रभाव टाकून गेली, आणि त्याचं दस्तऐवजीकरण नाटकांमधून कसं झालं अशी काहीशी अपेक्षा या मालिकेकडून आहे. (अवांतर: "एकविसाव्या शतकातली नाटकं" - इस. २००० नंतर आलेली - हा प्रकार जास्त परिणामकारकपणे दाखवू शकतील का?)

त्यातला हा लेख वाचून "अधांतर" पाहिलं. गिरणगाव आणि कामगार संपाबद्दल मला उगाचच एक आत्मीयता-कम-उत्सुकता वाटते. (कारण १: माझ्या वडिलांची नोकरी या संपात गेली. अन्यथा मी मुंबईकर झालो असतो. विचारानेच... कारण २: मी स्वतः मुंबईत नोकरी करत असताना याच भागात रहात असे. तेव्हा गिरणी कामगारांची दुसरी / तिसरी पिढी जवळून पाहिली.)

सगळ्यांत जमलेली भूमिका भरत जाधवची. कारकिर्दीच्या कोणत्या टप्प्यावर त्याने हे नाटक केलं माहीत नाही, पण आता भरत जाधव स्टँप झालेला कोणताही छपरीपणा नाटकात नाही. जवळजवळ सगळा वेळ तो रंगमंचावर असतो. संवाद त्यामानाने कमी. फॉर्मल शर्ट अर्धी चड्डी हा त्या भागातला युनिफॉर्मच आहे जवळजवळ.

दुसरी जमलेली भूमिका राजन भिसेची. थेट "लखू रिसबूड"चा उत्तराधिकारी शोभावा. अशी व्यक्तिमत्त्वं आजही जालावर आणि जालाबाहेर सापडतात.

नाटकाची भाषा (बाबा वगळता) कोकणी फोडणी दिलेली मराठी. तेही आवडलं.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

द हंगर गेम्स

हॉलिवूडच्या निर्मात्यांकडे, दिग्दर्शकांकडे नक्की किती रिकामा वेळ आहे याचा कधीच कोणालाच अंदाज येऊ शकणार नाही. त्याचे एक फलित मंजे हंगर गेम्स. पाहिला नसल्यास उत्तमच. आणि न पाहिला तरी चालेल.
==========================================================================================================
आता पुढे पिच्चरचे रसग्रहण आहे, आणि पिच्चर पाहण्याअगोदर रसग्रहण वाचल्याने रसभंग होतो असे वाटत असेल तर हे वाचू नकात.

तर मंडळी, कंच्यातरी देशात सगळेच्या सगळे गोरे लोक अत्यंत द्रारिद्री अवस्थेत राहत असतात. गोर्‍या लोकांचा देश अतिदरिद्री असणे हे मला फार इन्नोवेटीव वाटलं. तिथे एक शिकारीण आपल्या बहीणीसोबत राहत असते. तिथे एक प्रचंड नट्टापट्टा केलेली बया येऊन अतिशय मृदू आणि प्रेमळ आवाजात दोन स्पर्धक निवडते. या स्पर्धेत गुलाम असलेल्या १८ जिल्ल्यांतले १८ पोरे आणि १८ पोरी यांमधून एकच जिवंत राहणार असतो/असते. शिकारीणीचा जिल्ला नंबर १२. तर यावर्षी शिकारीण आणि पीटा असे दोघे रेल्वेने कॅपिटॉल नावाच्या जागी जातात. तिथे मात्र प्रचंड ऐश्वर्य असते. श्या! इतपर्यंत पिच्चर पाहिल्यावर मला कळले कि हे गेम्स टीवीवरचा रियालिटी शो देखिल आहे. तो या गुलाम जिल्ह्यांत देखिल सर्वांना पाहायला मिळतो. आणि या गेम्सचे लॉजिक काय म्हणे? तर ३६ पैकी एक वाचतो आणि श्रीमंत कॅपिटॉलचा नागरीक बनतो आणि ३५ मरताना पाहून आणि १ जगताना पाहून १८ जिल्ल्यातल्या लोकांची "आशा" कायम राहते आणि ते बंड इ इ करत नाहीत. मंडळी, हे लॉजिक, ज्यांनी पिच्चर बनवला त्यांचे आहे, माझा यात काहीही संबंध नाही.
कोणत्याही कलाकृतीत क्रौर्य दाखवताना खलनायकास आपल्या क्रौर्याची जाण असते. अगदी कोलोसियमच्या प्रेक्षकास देखिल असते. इथे त्या संपूर्ण शहरात एकाही माणसाला क्रौयात काहीच अयोग्य वाटत नाही. अगदी एन मासे सारे शहर ३५ मरणार म्हणून उदंड उत्साहाने नाचत असते. क्रौर्य हे १००% शुद्ध मनोरंजन मूल्य म्हणून 'परस्परसंमतीने' कसे प्रोजेक्ट केले आहे ते महान आहे. शिवाय हे क्रूर लोक अतिशय सभ्य आहेत, परस्परांत अज्जिबात भांडत नाहीत. बाकी इंग्लिश चित्रपटांत टेक्नॉलोजी हजारो वर्षे पुढे गेलेली असते. त्यामुळे लहान मुलांना देखिल बोर होत नाही.
शिकारीण अत्यंत सात्विक दाखवलेली आहे एकच जमेची बाजू आहे.
================================================================================================================
एच बी ओ हिट्स वर जाहिराती येत नाहीत म्हणून पेशंन्स कमी असलेला माणूस देखिल सिनेमा शेवटपर्यंत पाहू शकतो.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

कथा इतकीसुद्धा वाईट नाही.

The hunger games , catching fire and mockingjay हि तीनही पुस्तकं वाचली आहेत. पुस्तकांवरून काढलेल्या सिनेमात नेहमीच त्रुटी जाणवतात त्यामुळे सिनेमा पाहिलेला नाही . मला तरी पुस्तकं (कथा) चांगली , मनोरंजक, उत्कंठावर्धक वाटली .

मुळात पुस्तके young adult fiction असल्याने टार्गेट ऑडियन्स हा मुख्यत्त्वे तरुणवर्ग आहे. पण तुम्ही सिनेमा बघून जे लिहिलंय तेवढी निरर्थक कथा नाहीये .

**************************************************************
भविष्यकाळातील एका मोठ्ठ्या संकटानंतर उत्तर अमेरिकेतील काही लोक जिवंत राहण्यात यशस्वी झाले आहेत. ह्या लोकांचा देश म्हणजे Panem. ह्या देशात एकूण १२ जिल्हे आणि एक capitol असते .
पुस्तक / सिनेमा सुरु होण्याच्या ७३ वर्षे आधी सर्व जिल्ह्यांनी capitol विरुद्ध क्रांतीचा (अयशस्वी ) प्रयत्न केलेला असतो. त्याची शिक्षा , आणि पुन्हा तसा प्रयत्न होवू नये म्हणून आणि जिल्ह्या-जिल्ह्यात मैत्रीचे संबंध राहु नयेत म्हणून आणि अर्थातच capitol मधल्या तथाकथित उच्चभ्रू व श्रीमंत प्रजेचे मनोरंजन व्हावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यातून हंगर गेम्स साठी एक मुलगा व एक मुलगी निवडले जात असतात . जिल्ह्यांतील पब्लिकचे मनोबल खच्ची करणे हा मुख्य हेतू . ( तुम्ही म्हणताय ती प्रचंड नट्टापट्टा केलेली बया capitol ची प्रतिनिधी असते आणि अर्थातच तिच्या मनात हंगर गेम्स मध्ये भाग घ्यावा लागणार्यांबद्दल बिलकुल empathy नसते .) स्वत: survive व्हायचं असेल तर इतर २३ जणांना मारण्याशिवाय पर्याय नाही ; प्रतीस्पर्ध्यांसोबत तसेच capitol च्या गेम - मेकर्स नी कृत्रिमरित्या introduce केलेल्या आपत्तींचा सामना करायचा असा साधारण गेम . जिंकणाऱ्याला मिळणारे फायदे : पुढील हंगर गेम्स मधून मुक्तता , चांगले घर आणि दर महिन्याला उत्कृष्ठ अन्नाचा पुरवठा , पुढील वर्षीच्या participants ना मेंटोर करण्याची संधी .

***************************************************************
अर्थात नेहमीप्रमाणे दिग्दर्शकांनी मूळ कथेची वाट लावलेली दिसतेय आणि सिनेमा पाहिला नाही तरी चालेल ह्या आपल्या मताशी सहमत !

-सिद्धि

या ट्रिलॉजीवर कृ० तपशिलात

या ट्रिलॉजीवर कृ० तपशिलात लिहिणे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

हंगर गेम्स म्हणजे कर्मदरीद्री चित्रपट(स).

यातली हिरवीन फार आवडते. जेनिफर लॉरेन्स खरचं प्लिजंट सरप्राइज आहे, तिच्यामधे अभिनयाचे सॉलीड पोटेन्शीअल आहे. ती नसती तर...

actions not reactions..!...!

बदलापूर

"बदला" हा शब्द मराठीत द्वयर्थी आहे, आणि तो दुसरा अर्थ दाखवण्यात सिनेमा यशस्वी झालाय, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. बदला घेतांना माणूस बदलून जातो, पण ज्याचा बदला घेतला, तो जर बदलला नाही, तर बदल्याला काय अर्थ आहे? असा काहिसा मतितार्थ वाटला.

मारहाण रक्तपात असूनही, त्यातले वास्तव अंगावर येऊनही, कुठेही अतिरंजितता आली नाहिये, हे ही विशेष. मध्यंतरानंतर थोडा संथ होतो, पण कथानक उत्कंठा वाढवणारे असल्यामुळे चालून जातं. कथानकातून सहज उगवणारा शेवट नाही, पण समर्पक वाटला. एकदा बघावा. वरूण धवनने मन लावून काम केलंय खरं. नवाजचे काय विचारता? इथे वासेपुर फॅन्सची कमी नाही.

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

Fracture (2007)

Fracture (2007) काल पुन्हा बघीतला. या आधीही पाहिला होता. रायन गोंज्लींग चा वकील एनर्जेटीक पण एंथोनी हॉफकीन्सचा तगडा अभिनय हा बॅक बोन. अख्खा चित्रपट हॉफकीन्सने अक्षरशः खाल्ला आहे. तडाखेबाज संवाद , लकबी आणी चित्रपटाची वेगळी अन मस्त कथा, निखळ मनोरंजन. एका मोठ्या उद्योगपतीच्या पत्नीचा खुन होतो अन त्यातुन पुढे निर्माण होणारी गुंतागुंत, कोर्टरुम ड्रामा वगैरे वगैरे. हॉफकीन्सचे तुम्ही फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही नक्किच पाहिला असेल नसाल तर चित्रपट बघीतल्यावर कायमचे बनुन जाल.

actions not reactions..!...!

व्योमकेश बक्षी न आवडलेलं अजून

व्योमकेश बक्षी न आवडलेलं अजून कोणी आहे का ? मसाला पिक्चर मधल स्पून फीडिंग एक टोक आणि बक्षी मधला अतिकिचकटपणा दुसर टोक . दिबांकर कधीच वाईट चित्रपट देऊ शकत नाही अस एक मिथ / अंधश्रद्धा सध्या जोरात आहे . पहिल्याच प्रसंगात खलनायक कोण हे कळण्याची शक्यता खूप जास्त आहे .

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

दिबाकर कधीच वाईट चित्रपट देऊ

(स्माईल)

दिबाकर कधीच वाईट चित्रपट देऊ शकत नाही -

ब्योमकेशचंच एक वाक्य फेकतो -
"वो खून कर सकता है की नही ये मुझे पता नही. पर उसने खून नही किया है, ये मुझे पता है."
.
तसंच.. दिवाकर वाईट चित्रपट देऊ शकतो की नाही ते माहीती नाही, पण अजून तरी त्याने वाईट चित्रपट दिलेला नाही हे मात्र निश्चित.

+१

रटाळ चित्रपट. आत्ताच बघीतला. काल थेटरवरुन परत आलो होतो पण आज र्‍हिशीकेश भाउंची प्रतिक्रीया इथे वाचुन सरळ थेट्रात गेलो. रटाळ चित्रपट. घडणार्‍या प्रत्येक प्रसंगात एक आश्वासन मिळत होत की आता काही तरी इंटरेस्टींग घडणार आहे... घडणार आहे... चित्रपट संपल्यावर कळाले एप्रिल फुल.

व्योमकेश बक्षी सिरीअल बघताना नाट्य इतक सुरेख रंगवलेले असायचे की नुसत्या पात्रांच्या संवादातुन प्रत्येक प्रसंग/गुन्हा डोळ्यासमोर जिवंत होत असे. कदाचीत माझे वय लहान असेल म्हणुनही असेल पण काही वेळा तर भितीही वाटायची. जबरदस्त रोमांचक असेच मी व्योमकेश बक्षी सिरीअल बाबत म्हणेन त्याचा कोणताही इसेंन्स चित्रपटात नाही. सेट वगैरे छान. अभिनयही ठीक. म्हणजे तो नैसर्गीक आहे असे भासवायला सर्वांनीच मेथड अ‍ॅक्टींग वगैरे करणार्‍या बुजुर्ग बाप कलाकारांना कॉपी करायचा प्रामाणीक प्रयत्न केलाय. पण व्हेर इज ओरिजनालीटी देर ?

actions not reactions..!...!

गोईंग क्लिअर

गोईंग क्लिअर ही सायंटॉलॉजीवरची एचबीओने बनवलेली डॉक्युमेंटरी पाहिली. सायंटॉलॉजीबद्दल बरेच ऐकून होतो पण डॉक्युमेंटरीमध्ये संपुर्ण पाळंमुळं खोदून दाखवलेली आहेत. एखादी भोंदूगिरी इतकी शक्तिशाली कशी होऊ शकते याबद्दल आश्चर्य वाटतं पण त्याहूनही एरवी सामान्यांइतकीच भोळी (जास्त नाही) असलेली माणसं या खुळेपणाला फसतात हे जास्त अविश्वसनीय आहे! जरूर बघावी अशी शिफारस करेन.

कुठे मिळेल? जालावर आहे की

कुठे मिळेल? जालावर आहे की टोरेंट?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एचबीओ

मी एचबीओवर पाहीली. टोरंटवगैरेवर मिळून जावी.

हैदर..

हैदर पाहिला.
बापरे..भयानक आहे. विशाल भारद्वाज ने वापरलेला करड्या रंगाचा कॅन्व्हास अंगावर येतो. नयनरम्य काश्मिर की वादिया ईतिहास जमा वाटतात.
खरंतर कथानक ऑलमॉस्ट काइंड ऑफ ओळखीचं वाटतं पण धीsssमी गती..तिथल्या लोकांच्या रेहेन सेहेन मधली, सुन्नता, अति हिमवर्षाव तुम्हाला घरबसल्या थरकाप उडवुन जाते.
कदाचीत खुप मसालेदार, भपकेदार,बॉलिवुडी चकाचक दिसली असती तर कदाचित मला जरा हुश्श्य वाटलं असतं असही वाटुन गेलं.
मग त्यावर उतारा म्हणुन '२ स्टेट्स' बघितला, तेव्हा कुठे जरा दिल का दीमाग से झगडा थांबला.

-मयुरा.

हैदर ही पोलिटिकल कमेंटरी

हैदर ही पोलिटिकल कमेंटरी म्हणून प्रचंड बायस्ड आहे. लेखक बशरत पीर हा टिपिकल काश्मिरी सेपरेटिस्ट आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पॉलिटिकल कमेंट

>> हैदर ही पोलिटिकल कमेंटरी म्हणून प्रचंड बायस्ड आहे. लेखक बशरत पीर हा टिपिकल काश्मिरी सेपरेटिस्ट आहे. <<

  • 'ज्यांचे नवरे मिसिंग आहेत त्यांच्या बायकांना अर्ध्या विधवा समजलं जातंच' असं म्हणणारी आणि एकदाची पूर्ण विधवा झाल्यानंतर आपल्या प्रेमात असलेल्या पुरुषाशी आपल्या मर्जीनं निकाह लावणारी काश्मिरी स्त्री ही पॉलिटिकल कमेंट आहे.
  • मुलाला दहशतवादी होण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच्या माथ्यावर पिस्तूल ठेवणारी आणि मरायला तयार असणारी आई ही पॉलिटिकल कमेंट आहे.
  • 'दहशतवाद्यांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या पतीला माझ्यासाठी कधीच वेळ नव्हता' हे मुलापाशी स्पष्ट सांगणारी आई ही पॉलिटिकल कमेंट आहे.
  • आणि अखेर 'मी कशीही वागले तरीही व्हिलन मीच ठरणार' हे म्हणणारी ही धीराची बाई पॉलिटिकल कमेंट आहे.

काही लक्षात येतंय का?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हैदरचा आणि राजकीय परिस्थितीचा

हैदरचा आणि राजकीय परिस्थितीचा काहीच सबंध नाहीये? किंवा काश्मिरमधली परिस्थिती हा त्या चित्रपटातल नगण्य भाग आहे?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

+१

जर असेच असते तर हैदर कुठेही बेतता आला असता. काश्मीर आणि त्यातही घुसखोरी एकदम चरम सीमेवर असतानाचे वर्ष निवडून अपेक्षित दिशाभूल करण्यात लेखक खरेच अतिशय यशस्वी ठरला आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कोणत्याही ललित कलाकृतीत

कोणत्याही ललित कलाकृतीत लेखकाच्या कल्पनेच्या वारूने इथेच वळावे?, इथेक का वळला?, हे असं असतं का? वगैरे प्रश्न बर्‍यापैकी गैरलागू असतात.
लेखक-दिग्दर्शकला जे दाखवायचे आहे - जी बाजु ठळक करायची आहे तीच तो करणार. त्यानी तसेच का केले? वगैरे मुद्द्यांत अर्थ नाही.

जे दाखवलेय त्याची प्रत व दर्जा काय, सत्याशी संबंध आहे का वगैरेवर चर्चा होउ शकतेच - होतेच.

==

हैदरबद्दल: तत्कालीन सत्याची पार्श्वभूमी वापरत - अशा परिस्थितीत घडलेल्या मानवी मनाच्या वागणूकीचे उत्तम चित्रण या चित्रपटात आहे असे मला वाटते. अनेक कंगोरे या चित्रपटात ताकदीने टिपले आहेत. हा चित्रपट ललित आहे डॉक्युमेंटरी नव्हे, तेव्हा त्या कथेत जे घडते - ते त्या कथेत घडते. त्यावरून त्या भागाबद्दल, त्या समाजाबद्दल किंवा सामाजिक वा राजकीय परिस्थितीबद्दल सार्वकालीन, सर्वंकष समज/गैरसमज जर कोणी करून घेत असेल तर ती त्या व्यक्तीची इमॅच्युरीटी झाली. त्यासाठी लेखकाला का दोष द्यावा?

उद्या शिवाजी महाराजांचे चित्रपट बघुन भारतात अजून सगळे घोड्यावरच फिरतात नी तलवारींनी लढतात, असा एखाद्याने समज करून घेतला तर दोष लेखक-दिग्दर्शकाचा का प्रेक्षकाचा?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एखाद्या पिच्चरमध्ये काय

एखाद्या पिच्चरमध्ये काय दाखवावे याचे स्वातंत्र्य जसे दिग्दर्शकादि लोकांना आहे, तसेच काय खटकले हे सांगण्याचे स्वातंत्र्यही प्रेक्षकादि लोकांना आहे. असे असताना एकाच स्वातंत्र्याची बाजू घेणं हे रोचक वाटलं. आश्चर्य नाही कारण सवय झालीये त्याची.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

प्रेक्षकांना काय खटकले

प्रेक्षकांना काय खटकले सांगायला अडवलेले नाही. ते स्वातंत्र्य त्यांना आहेच.
मात्र यात जर/जेव्हा मला एक बाजु पटते आहे तेव्हा मी एकाच बाजुने बोललो हा आक्षेप कसा असु शकतो?
प्रेक्षकांचे या प्रकारचे खटकणे ललित कलाकृतीत कसे योग्य नाही हे माझे मत मांडायचे स्वातंत्र्य आहेच ना? आणि जी बाजु योग्य वाटते त्याच बाजुने बोलायचेही स्वातंत्र्य आहे.

बाकी प्रतिसादातील मुद्द्यांचे खंडन आलेच नाहीये!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मात्र यात जर/जेव्हा मला एक

मात्र यात जर/जेव्हा मला एक बाजु पटते आहे तेव्हा मी एकाच बाजुने बोललो हा आक्षेप कसा असु शकतो?

चित्रपटाच्या कुठल्या अंगाबद्दल बोललं म्हणजे कूल पॉइंट्स मिळतात याचा अभ्यास नसल्यामुळे असे होत असेल कदाचित.

बाकी प्रतिसादातील मुद्द्यांचे खंडन आलेच नाहीये!

त्यालायक मुद्देच नाहीत तर कशाला करू उगीच? माझा एक व्ह्यूपॉइंट काय मांडला तर अवघी मांदियाळी धावून आली ते पहायला मजा आली. बहुत धन्यवाद सर्वांना. यू गाईज़ नेव्हर फेल टु अमेझ मी.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

वा! वा! वा!

>> त्यालायक मुद्देच नाहीत तर कशाला करू उगीच? माझा एक व्ह्यूपॉइंट काय मांडला तर अवघी मांदियाळी धावून आली ते पहायला मजा आली. बहुत धन्यवाद सर्वांना. यू गाईज़ नेव्हर फेल टु अमेझ मी. <<

  • मी एक पुडी सोडून देणार.
  • लोक वाद घालायला धावणार.
  • माझ्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ किंवा इतरांच्या मुद्द्यांच्या विरोधात काही सघन मांडणी मी अजिबात नाही करणार.
  • फक्त मजा बघत बसणार.
  • आणि 'मला निरर्थक / भडकाऊ / अवांतर बगैरे श्रेणी देणारे लोक दुष्ट, वाईट्ट वगैरे आहेत असं बोंबलत सुटणार.

ट्रोल्स, यू नेव्हर फेल टू बोअर मी.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बोअर होऊनही प्रतिसाद कसा काय लिहिलात म्हणे?

१. आपले ते मत, बाकीच्यांची ती पुडी.
२. आपली ती सघन मांडणी, बाकीच्यांचे ते ट्रोलिंग.
३. आपण केले तर ते भाष्य, इतरांनी केली की ते 'मजा पाहत बसणे'.
४. वैचारिक सर्टिफिकिटे वाटपाचे एकमेव अधिकृत केंद्र आपलेच आहे असा गैरसमज बाळगणार्‍यांची बाकी मजा आहे.

ट्रोल्स, यू नेव्हर फेल टू बोअर मी.

तुमच्या एकूणच वैचारिक अवस्थेबद्दल काळजी वाटते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तुमच्या एकूणच वैचारिक

(लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

तुमच्या एकूणच वैचारिक अवस्थेबद्दल काळजी वाटते.

ऐसीवर कोणालाही कोणाचीही काळजी वाटली कि मला प्रचंड काळजी वाटायला चालू होते. हा काळजी प्रकार फार अवघड करून टाकलाय ऐसीकरांनी.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

वेल, बशर पीरच्या पुस्तकावर

वेल, बशर पीरच्या पुस्तकावर आधारित असल्याने राजकीय रंग, तेही अँटी एस्टॅब्लिशमेंट येणं सहज आहे.
चित्रपट मात्र जाम आवडला होता.

चित्रपट मात्र जाम आवडला होता.

चित्रपट मात्र जाम आवडला होता.

हेच बोलतो.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अगदी असेच. विशेषतः त्यातल्या

अगदी असेच.

विशेषतः त्यातल्या काश्मीरचे दर्शन तर केवळ अहाहा होते. सहासात महिन्यांमागे तिथे प्रत्यक्ष गेल्यामुळे अजूनच लैच भावले. त्या बर्फाच्या चादरी आणि ते स्त्रीसौंदर्य म्हणजे गर फ़िरदौस....आहाहाहा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

+१

सहमत. दोन तीन वेळा हैदर पाहिल्यानंतरही ही हैदर ही त्या नायकाची कथा आहे, बाकीची परिस्थिती बॅकग्राऊंड आहे असेच मला वाटले.

हैदर हॅम्लेटवर बेतल्याचे ऐकले

हैदर हॅम्लेटवर बेतल्याचे ऐकले होते (ओम्कारा ऑथेल्लोवर बेतला होता तसेच).

चित्रपट पाहिलेला नाही.

Hope is NOT a plan!

आकलन-अर्थनिर्णयन.

सर्वसामान्य भारतीयाचे मत स्क्यू करण्यात हा पिच्चर अतिशय यशस्वी ठरलाय यात संशय नाही.

आर्मीने काश्मिरात अत्याचार केलेत का? हो. नक्कीच केलेत.

त्या अत्याचारांविरुद्ध कुणी बोलू नये का? अवश्य बोलावं.

हैदरमध्ये काय आहे? १९९५ सालचे दृश्य, जेव्हा घुसखोरी एकदम जोरात होती. त्यामुळे पीक ट्रॅफिकवरून अ‍ॅव्हरेजबद्दल सजेस्टिव्ह इम्प्लिकेशन निर्माण करण्यात हा पिच्चर नक्कीच यशस्वी ठरला आहे.

अर्थात, यात लोकांची दिशाभूल करण्याचे (हेतुतः ऑर अदरवाईज़) अभिव्यक्तिस्वातंत्र्य अगोदरच जमेला धरले असल्याने अडचण नाहीच. हैदरच्या लेखकाचे याबद्दल अभिनंदन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अभिनंदन

>> हैदरच्या लेखकाचे याबद्दल अभिनंदन. <<

हैदरच्या लेखकाला पुरून उरलेल्या आणि माझ्या वरच्या प्रतिसादाला भक्कम बळ देणाऱ्या तुमचेही अभिनंदन. असो. लेखनसीमा.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दुर्लक्ष

दुर्लक्ष एकदा करायचेच ठरवले की झापडे किती शक्तिशाली ठरतात हे सोदाहरण दाखवल्याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ब्योमकेश बक्षी!

बघितला. आपण तर फिदा एकदम.
जास्त काही बोलत नाही - पण नक्की बघावा असा चित्रपट आहे.
पार्श्वसंगीत एकदम तोडफोड आहे. रूढार्थाने गाणं म्हणावं असं काही चित्रपटात नसलं तरी वेळोवेळी अस्तित्व जाणवून देतात. एकदम झकास. तेवढ्यासाठीच परत बघीन म्हंटो.
(छोटे स्पॉयलरस
शेवटच्या मारामारीतलं गाणं अजून डोक्यात आहे.Byomkesh in Love.

सुरूवातीचा तासभर तसा फारशी पकड घेत नाही-पण काहीतरी होणारे असं वाटावं इतपत वातावरण निर्मिती. दुसर्‍या भागात वेग वाढत जातो आणि मग शेवटी परत समेवर आल्यासारखा चित्रपट थांबतो.
विलन सायेबांचं थोडं भडक काम वाटलं, पण क्यारेक्टर सॉलिड आहे.

लॉजमधल्या भिंतीवर ब्योमकेशने रंगवलेले क्लूज आणि त्यातून बघणारा कालीचा उग्र चेहेरा हे खास होतं.

)

एकूण ब्योमकेशची सुरूवात उत्तम झाली आहे. आणि दिबाकरचा ५/५ रेकॉर्डही कायम आहे. जियो दिबाकरसाहेब! वेगवेगळ्या धाटणीचे ४ सणसणीत चित्रपट देणं ये कुछ खायचं काम नोहे.

तुमच्या मताशी साधर्म्य

तुमच्या मताशी साधर्म्य राखणारा हा रीव्ह्यू

मलाही ब्योमकेश आवडला

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुशांत सिंगला जमलाय का हो

सुशांत सिंगला जमलाय का हो सत्यान्वेषी?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ह्म्म....

बघून ठरवा (दात काढत)
पण - त्याचा जो काही लिमिटेड अभिनय आहे, त्यामानाने नक्कीच चांगलं काम केलंय त्याने असं वाटलं. उ.दा याआधी शुध देसी रोमान्समधे तो डोक्यात जाऊन घंटा वाजवत होता.
शिवाय हा पहिला भाग असल्याने ब्योमकेश तसा अपरिपक्व आणि स्खलनशील आहे. (बाँडपटातल्या कॅसिनो रोयाल(?)च्या डॅनिअल क्रेगच्या चुकट बाँडशी थोडं साधर्म्य वाटलं.)
अशा भूमिकेत चांगला फिट बसलाय तो.

नोव्हेंबर मॅन

पीअर्स ब्रॉस्नन चा स्पाय थ्रिलर पाहिला - नोव्हेंबर मॅन. मस्त आहे, फार नावीन्य नाही, पण खिळवून ठेवतो. पी.ब्रॉ. थोडा म्हातारा दिसतो, पण चार्म आहे अजूनही.
(उसगावकर नेट्फ्लिक्स वर बघू शकतील)

चार्म आहेच. ही इज द बेस्ट

चार्म आहेच. ही इज द बेस्ट बाँड. चित्रपट मात्र १ टाइम वॉचच.

actions not reactions..!...!

Fast And Furious 7

Fast And Furious 7 बघितला. कथेचा पत्ता नाही. इवन आल्या कॅन इजिलि स्पॉट द लूफोल्स. स्टंट तर कळतच नाहीत इतकं टुकार एडीटींग. पण प्रचंड खर्चीक. स्टारकास्ट मात्र तगडी पॉल वॉकर, विन डिजेल, मिशेल रॉड्रिग्युएझ, जेसन स्टेथम, ड्वेन जॉन्सन, अँड लेटेस्ट सेन्सेशनल क्युटी नथालि अ‍ॅम्मेन्युएल( तीच ती खलीसीची भाषांतरकार ललना गेम्स ऑफ थ्रोन), मस्तच, चित्रपट यांसाठीच बघावा., तरीही अधुनमधुन आपण दाक्षिण्यात्य चित्रपट तर बघत नाहीना याचे भान येण्यासाठी चिमटे जरुर काढा (स्माईल) फास्ट एंड फ्युरीअस टोकिओ ड्रिफ्ट नंतर तसेही ही फ्रांचाइसी अपेक्षेला पुरेशी उतरली नाही. पण स्टारकास्ट आनी इतर कोणीही रेसिंग जॉनरवर असे चित्रपट बनवले नसल्याने लोकांचा याला पाठींबा मिळत गेला इतकचं.

रिप पॉल वॉकर. आय मीस यु. आय एन्विड यु. वी स्पेंट नाइट्स प्लेयिंग मोस्ट वॉटेड इन योर मॅनेरिजम. वी ड्राइव वेहीकल बीइंग यु. Sad

actions not reactions..!...!

+१

कालच पाहिला. आकाशातून पॅरॅशूट वापरून ल्यांडिंग करणाऱ्या गाड्या, एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत हवेतून जाणाऱ्या गाड्या, इमारतीच्या गच्चीवरुन आकाशातल्या हेलिकॉप्टरला धडक देणाऱ्या गाड्या वगैरे अचाट ष्टण्ट्स आहेत. गंमत म्हणजे हीरो आणि व्हिलन एकमेकांना शोधण्यासाठी एका सर्चइंजिनसारख्या कंप्युटर उपकरणाच्या मागे लागतात. आणि या शोधाशोधीच्या प्रसंगांत त्यांची एकमेकांशी अनेकदा भेट होते, मारामाऱ्या करतात. आणि शेवटी कंप्युटर उपकरण मिळाल्यावर पुन्हा एकदा हीरो कुठे सापडेल/व्हिलन कुठे सापडेल याचाच शोध घेतात. (डोळा मारत) 'अरे मूर्खांनो आता दहा मिनिटांपूर्वीच तुम्ही भेटलात आणि मारामारी केली!' असे ओरडावेसे वाटले.

एकंदरीत टाईमपास म्हणून बरा आहे.

:)

बादवे स्टारकास्टमधे सध्याचे मार्शल आर्ट (मुए थाइ) सेंन्सेशन "टॉनी जा" सुधा होता. हाइट आहे राव त्याचा रोल कधी एउन गेला तेसुधा कळले नाही. तसचं पॉल वॉकर गेला तेंव्हा त्याचा ८०% रोल कंप्लीट झाला होता म्हणतात पण चित्रपट पाहिल्यावर वाटते २०% झाला असावा. त्याला, ड्वेन जॉन्सनला रोलच नाहीये. काहीतरी नक्किच फसलय.

actions not reactions..!...!

इंडीड्वॅलिड्पॉईंट्मेड्बट्व्हा

इंडीड्वॅलिड्पॉईंट्मेड्बट्व्हायिनिंग्लिश?

पाश्चात्य देशांत टाकून

पाश्चात्य देशांत टाकून दिलेल्या कपड्यांचं काय होतं? एक छोटा माहितीपट - Unravel

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पीबीएस- डाउनटन अ‍ॅबी

ईंग्डल मधल्या एका कल्पित क्राउली परिवार आणि त्यांची राजेशाही रहाणी, त्यांच्या कडे कामासाठी असलेल्या नोकरांची फौज, त्यांचं(नोकरांच) एक आगळं वेगळ्ं भावविश्व.त्यांच्यातले हेवेदावे, राजकारण, चढती-उतरती भा़जणी या सर्वांच एकदम सुरेख, अतिशय मेहेनतीने केलेलं चित्रण म्हणुन डाउन्टन अ‍ॅबी पाहावस वाटतं(निदान अधुन मधुन).
आत संपत आलीय ती सिरीज, पण गेल्या ४ वर्षात अतिशय लोकप्रिय झालेल्या काही कार्यक्रमांपैकी ही एक असं वर्णन अतिशयोक्ती होउ नये. मध्ये मध्ये बोर होतं पण तरी सुरुवातील बराच काळ चिकाटीने बघु शकले होते.

अजुन कोणी फॉलो करत का?

-मयुरा.

यप!

आता गोग्गोड शेवट करून आटपणारेत एकंदरीत असं दिसतंय. पण तरीपण no complaints! अप्रतिम प्रकाशयोजना आणि पार्श्वभूमी असते त्यात. आता सिरीज संपली की ब्लू-रे प्रिंट घेउन प्रोजेक्ट करून बघायचा मानस आहे.

"Are you being served?" आणि "Yes minister" या पाहिल्या आहेस का?

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

ओह... तरीच.

दीपिकाबाईंचा व्हीडीओ बघितल्यावर थोडा डाउट आलेलाच.. आता खात्री पटली. कारण पुढे जाउन बाई स्वःत तश्या म्ह. व्हीडीओ मध्ये ज्या भावना दाखवल्या आहेत तश्या वागतीलच ह्याची काहीच ग्यारंटी नाही.

-मयुरा.

राष्ट्रीय महामुर्ख संमेलन !

राष्ट्रीय महामुर्ख संमेलन !
नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात १ एप्रिल निमित्त,' राष्ट्रीय महामुर्ख संमेलन' आयोजित केलं होतं.१००,२०० आणि ३०० रुपये असे तिकिटाचे दर होते. आम्ही फक्त १०० रुपयात मुर्ख होण्याचं ठरवलं.परंतु ३०० रुप्यांचीच तिकिटे शिल्लक असल्याने आम्ही आपोआप महामुर्ख झालो.नागपुरातले आम अन खास पब्लिक अत्यंत उत्साहाने महामुर्ख संमेलनात सहभागी झाले. अशाप्रकारच्या संमेलनांचे वृत्तांत वाचले असल्याने हा नक्की काय प्रकार असतो ते बघण्याची अनेक वर्षांपासून उत्सुकता होती.विशेष आकर्षणच्या यादीत गर्दभ वंदना ,लुटेरोंकी बारात ,मुर्ख दरबार आणि हास्यकवी संमेलनाचा समावेश होता.आमंत्रित कवींना विविध सोंगात सजवून त्यांची बारात ब्यांडबाजासह स्टेजवर आली. अशोक चक्रधर (रावण) , नागपूरचे कवी डॉ.मधुप पांडे (एन. डी. तिवारी) ,अरुण जैमिनी (यमराज) डॉ.सर्वेश अस्थाना(दुर्योधन),प्रताप फौजदार(गब्बरसिंग) , ममता शर्मा ( कनुस्का शर्मा) आणि डॉ.विष्णु सक्सेना (आसाराम) अशा वेषातील कविवर्यांचं स्वागतही खास झालं. रावणाच्या गळ्यात सायकलचे टायर घातले. एन.डी.तिवारीला त्याचे बाळरूपी बाहुली दिली.दुर्योधनाला चिरहरण करायला आजकाल संधी नसते म्हणून साडी दिली. कनुस्का शर्माला विराट वर्ल्ड कप दिला. यमराजाच्या गळ्यात मुंडक्यांची माळ घातली. गब्बर सिंगला बंदुक आणि आसारामला सुंदर स्त्रीचा पुतळा दिला.

यानंतर स्टेजवर गर्दभराजांच आगमन झालं. स्टेज डेअरिंग नसल्याने ते यायला तयार होईना. ४ लोकांनी ओढत, ढकलत कसेबसे आणले. मग त्यांची पूजा आरती झाली. आपल्याला बघायला मुर्खांनी एकच गर्दी केल्याचे दिसल्यावर गाढव स्टेजवरून जायला तयार होईना. मूर्खांच्या दरबारात रावण यानेकी अशोक चक्रधर यांचे धम्माल भाषण झाले.कविवर्यांनी आपापली सोंगे उतरवली आणि तुफान हास्यकवी संमेलन झाले.सगळ्याच कवींचे सादरीकरण अभिनय, हजरजबाबीपणा आणि मौजमजेने ओतप्रोत होते. स्वतःसकट स्टेजवरच्या सहकाऱ्यांची आणि प्रेक्षकांचीही यथेच्छ खिल्ली उडवत संध्याकाळी सात ते साडेदहापर्यंत या वल्लींनी प्रेक्षकांवर गारुड केलं.

काही कविंनी बरेचसे विनोद स्वतःचेच असल्यागत आपल्या शैलीत सादर केले, त्याची काही आवश्यकता नव्हती असे वाटले. तसेच त्यांच्या सतत दाद म्हणून टाळ्या मागून घेण्याचाही नंतर कंटाळा आला. उत्तम प्रतिसादामुळे काहीजण वाहावत गेले, तसे बहुदा सगळीकडेच होत असते ,तर ते असो.एकंदरीत महामुर्ख संमेलन आवडले.

* उत्तर भारतात अनेक ठिकाणी

* उत्तर भारतात अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी असं संमेलन होतं. त्याला सभ्य भाषेत महामूर्ख संमेलन म्हणतात खरं, पण त्याचं अस्सल नाव महालंड संमेलन. तुम्ही वर्णन केलेत ते सगळे प्रकार (गर्दभ वंदना, लुटेरोंकी बारात, मूर्ख दरबार आणि हास्यकवी संमेलन) त्यात असतात. एक एप्रिल आणि शिमगा एकरूप झाल्याचं वाचून मजा वाटली!
* दिल्लीच्या जेएन्यूत याच धर्तीवर 'चाट सम्मेलन' दरवर्षी होतं. चाटणे म्हणजे पकवणे, पीळ मारणे. जो जास्त पकवेल तो विजेता 'चाट', त्याला चपला, दगट-विटा, टायर अशी बक्षिसं मिळतात. काही चाटांना इतर चाट स्टेजवरून उचलून फेकून देतात. गाढवावरून एखाद्या चाटाची वरात निघते. (संमेलनात भाग न घेतेलेल्या पण एरवी) चाटणा-या विद्यार्थ्यांची नावं लिहिलेले कागद सगळीकडे चिकटवून त्यांची बदनामी करण्यात येते. इ.इ.इ... या सगळ्या आठवणी जाग्या होऊन मला उत्साहाच्या उकळ्या फुटत आहेत. ते हि नो दिवसो...
* गाढवाची किंवा गाढवावरून वरात, प्रेतयात्रा काढणे (तोंडाला गुलाल माखणे हा त्याचाच भाग!) असं करून 'शिमगा' साजरी करायची ही पद्धत भारतात ब-याच ठिकाणी होती. पुढे इंग्रजी काळात मिशन-यांच्या आणि समाज'सुधारकां'च्या वगैरे प्रचारामुळे शिमगा तुलनेने सोवळा झाला. हा हन्त हन्त!

महालंड संमेलनाचा फोटो ऐसीवर बहुदा चिं. जंतू यांनी शेअर केलेला .

महालंड संमेलनाचा फोटो ऐसीवर बहुदा चिंतातूर जंतू यांनी शेअर केलेला आठवतो आहे.होळीवाले कार्यक्रम अश्लीलतेने ओतप्रोत असतात.स्त्रिया तिथे जाण्याची कल्पनाही करू शकत नाही. हा कार्यक्रम सहकुटुंब एन्जॉय करण्यासारखा होता.
चाट संमेलनची माहिती मनोरंजक आहे.

होळीवाले कार्यक्रम अश्लीलतेने

होळीवाले कार्यक्रम अश्लीलतेने ओतप्रोत असतात.स्त्रिया तिथे जाण्याची कल्पनाही करू शकत नाही हो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी पण असंच ऐकलंय.

हाहाहा मस्त वर्णन केलयत

हाहाहा मस्त वर्णन केलयत तुम्ही. नेहेमीची विनोदी शैली.

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

दिपीकाचा 'माय चॉईस'

सध्या बर्‍याच बातमीपत्रांमधे दिपीका पादुकोनचा (की पडुकोने ??) 'माय चॉईस' हा लघुपट चर्चेत आहे. युट्युबवर जाऊन पाहिला पण नीट काही कळाले नाही. आता माय चॉईस म्हटले की त्याला काही तर्क लावणे, कारणे देणे म्हणजे निरर्थकच होईल. असल्या गुढ गोष्टींवर येथील जाणकार मंडळी माझी शाळा घेऊ शकतील काय ?

वादग्रस्त

सेलेब्रिटिज ना आपला नवीन चित्रपट लागायच्या एक आठवडा आधी वादग्रस्त मते प्रकट करण्याची हुक्की का येते यावर एक संशोधन व्हावे (स्माईल)

गँग्ज ऑफ वासेपूर

"गँग्ज ऑफ वासेपूर"चा विषय निघाला आहे तर तो आवडण्याची माझी कारणं सांगेन म्हणतो.

- मोठा कालपट उलगडण्याचा प्रकल्प. भारतात असे प्रयत्न याआधी किती नि कसे झाले ते माहिती नाही. जे झाले ते इतके परिणामकारक नसतील असा अंदाज आहे. "त्रिकाल" सारखी नावं डोळ्यासमोर येतात परंतु त्यात अनेक पिढ्यांना एकत्र आणण्यामागे अ‍ॅबसर्ड विनोदनिर्मिती असं काहीसं होतं. "वाडा चिरेबंदी"ची सुद्धा आठवण येते. पण हिंदी/भारतीय चित्रसृष्टीच्या संदर्भातलं काही आठवत नाही.
- Gritty , धगधगीत वास्तव चितारणं. हिंसा बॉलीवूडला नवी नाही पण ती बर्‍यापैकी glamorized असते. इथे हिंसेची - आणि निव्वळ हिंसेकरताची - sleek चित्रणं मला वाटली/दिसली नाहीत.
- काही नेहमीचे यशस्वी घटक. पटकथा-संवाद. अविस्मरणीय व्यक्तीरेखा आणि बाजपेई, सिद्दीकी, धुलिया, कुरेशी, मिश्र, चढ्ढा प्रभृतींनी त्याना दिलेला न्याय.
- सिनेमातला विनोद आणि त्यातली गीते, त्यांचं संगीत यावर "वासेपूर"ची सिग्नेचर आहे. सिद्दीकीच्या व्यक्तीरेखेचं सुरवातीचं शेखचिल्लीवजा चित्रण, तोंडात ब्लेड धरून चोरीमारी करणार्‍या लहान पोराचं हिंसक पण तितकंच अ‍ॅबसर्ड विनोदी चित्रण या गोष्टी जनमानसात कायमस्वरूपी राहिल्या. "आय अ‍ॅम द हंटर" , "तेरी कहके लूंगा" , "ओ वुमनिया" याचे शब्द नि त्याचं संगीत याइतकं नवं/वेगळं आणि मुख्य म्हणजे एकंदर वातावरणाला साजेसं गीत-संगीत. या विभागांना वासेपूर टच आहे.
- पियुष मिश्र यांचं निवेदन, निवेदक आणि कथेच्या दोन्ही भागामधलं त्याचं साक्षीत्व, त्याचं डेडपॅन शैलीतलं वर्णन.
- काही अत्यंत लोकप्रिय झालेल्या कॅचफ्रेजेस् : "कह के लूंगा" , "बेटा तुमसे ना हो पायेगा" (किंबहुना तिग्मांशु धुलियाच्या तोंडचे अनेकानेक संवाद)
- बदलत्या काळातल्या मेनस्ट्रीम गोष्टींचा केलेला वापर. उदा "कसम पैदा करने वाले की" सारख्या गोष्टींचा किंवा ऑर्केस्ट्रामधली गाणी यांचा तरुण लोकांच्या मनोवृत्तीवर अचूक प्रकाश टाकण्याकरता केलेला वापर. ट्रकवर कर्णे लावून मिथुन चक्रवर्तीचं गाणं लावून त्याच्या शैलीत नाचून सूड घेण्याचा इरादा जाहीर करणं हे प्रकार अत्यंत अचूक नि परिणामकारक जमलेत. तिग्मांशु धुलियाच्या तोंडी "जब तक ये सिनेमा है इस देश के लोग चुतिया बनते रहेंगे" हा असलेला संवाद थेट पटवणारा प्रकार सिनेमातच असणं.

ज्यांना आवडला नाही त्यांना कदाचित लांबलचक, नवं काही न देणारा, playing to the gallery वाटला असावा असा अंदाज वर्तवू शकतो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बारीक असहमती -गाणी ऐकायला

बारीक असहमती -गाणी ऐकायला जब्राट आहेत- वादच नाही. (टॅटॅटूटू सुद्धा.) पण चित्रिकरणात खूपच कमी भाव दिलाय गाण्यांना. आणि चित्रपटात बरीचशी गाणी प्रोमोजपलीकडे स्वतःची ओळख पटवू शकली नाहीत.
उ.दा हंटर. गाण्याबद्दल वादच नाही, पण चित्रपटात त्याला अनुल्लेखाने मारल्यासारखं वाटलं. (कदाचित गाणं ऐकून ऐकून माझ्या अपेक्षा वाढल्या असतील!)
दुसरं म्हणजे आत्यंतिक हिंसा हा पैलू मला स्वतःला झेपला नाही. इतकी जास्त हिंसा पात्रांच्या रोजच्या वागण्यात्,बोलण्यात. विचारसुद्धा कुणाला कुठं फोडायचं ह्यावरचेच. बोले तो ओवरडोस झाला.

पण वासेपुरातल्या आवडलेल्या गोष्टी-
१. मनोज वाजपेयीचा बाप, तरूणपणीचा पियुश मिश्रा ह्या पात्रांसाठी त्यांच्याच चेहेर्‍यामोहोर्‍याचे कलाकार घेणं. भारी वाटलं.
२. गाणी.गाणी.गाणी. त्यातही टैटल साँग.
३. एकसे एक कॅरेक्टर्स, रँडम सीन्स - त्यातला बाजारातला पाठलाग सगऴ्यात भारी.

बाँबे वेल्वेट्चा ट्रेलर

बघितला.
अगदीच सामान्य आणि लांबलचक वाटला- म्हणजे चित्रपटाबद्दल काहीच उत्कंठा वाटू नये, इतका बोरींग.
अनुराग कश्यपचा ड्रीम प्रोजेक्ट वगैरे म्हणून संभावना होत असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर इतका सामान्य का असावा? कल्पना नाही.
पण- वासेपूर पाहिल्यावर चित्रपटापे़क्षा ट्रेलरच जास्त आवडला होता; तेव्हा वेल्वेटची वाट बघणे आले.

टीप - इथे गँग्स ऑफ वासेपुरचे फ्यान आहेत का कोणी?का आवडला वासेपुर? मला निव्वळ कंटाळवाणा वाटला तो. दुसर्‍या भागात तर कोण कोणाला कापतंय्/मारतंय्/झोडतंय त्याची गणती ठेवणं कठीण जात होतं.