छापील दिवाळी अंक २०१४

यंदाचे बहुतांश दिवाळी अंक बाजारात आले आहेत. ते ज्यांच्या हाती लागले आहेत, त्यांनी त्याबद्दल लिहिलं तर फार बरं होईल. काय घ्यायचं, काय टाळायचं, काय आवर्जून वाचायचं, ते चटकन कळेल.

मी आणलेले दिवाळी अंक: अक्षर, इत्यादी, युगांतर, पुरुष स्पंदन, शब्द, पद्मगंधा, साधना (युवा विशेषांक) (साधनेचा मुख्य अंक परवापर्यंत तरी बाजारात आला नव्हता.)

साधनेच्या युवा अंकात
- केतकरांचा लेख आहे. फेसबुक आणि ट्विटर आणि स्मार्टफोन्स यांत रमलेल्या तरुणांना उद्देशून त्यांनी जाम चिडचिड केल्ये. Tongue
- मीना कर्णिक यांनी निखिल वागळेबद्दल लिहिलेला एक लेख आहे. 'महानगर'चे दिवस, आयबीएनवरचे वागळे आणि कौटुंबिक वागळे अशी साधारण चौकट.
- 'फॅण्ड्री'कार नागनाथ मंजुळेचा लेख आहे. त्याचं दारूमध्ये बुडलेलं, गरिबीतलं, बेदरकार बालपण. पुस्तकांची आवड आणि त्यांनी दाखवलेली दिशा. मोकाट वाचनाचे आणि निरुद्देश निरर्थक शिक्षणाचे दिवस. तिथून 'फॅण्ड्री'पर्यंत. असा प्रवास त्यात आहे.

बाकी वाचन होईल तसंतसं लिहीन.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

पुरुष स्पंदन असा अंक असतो?? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी चुकून छात्रप्रबोधनचा बालसाहित्याचा दिवाळी अंक उघडला.
"माझे वक्तृत्व" की काय असा प्रवीण दवणे यांचा लेख!
अर्थात तो मुळातून वाचण्यालायक आहे.
त्यांचा एक किस्सा त्यांनी दिलाय :
एके ठिकाणी खेड़ेगावात व्याख्यते म्हणून "ह भ प दवणे बुवा" असे लिहिले होते. कारण त्याशिवाय लोक फिरकत नाहित असे संयोजक म्हणतात. प्रवीणजी लिहितात : "मग काय केले कीर्तन दणकून!" इथे त्यांनी "दवणकून" असा नवा शब्द घातला होता, परंतू मुद्रितशोधनातल्या त्रुटीमुळे तो चुकून दणकून असाच छापला असावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा अंक अजून प्रकाशित होतो काय? (की अच्छे दिनमुळे पुन्हा सुरु झाला?) चांगले लेख असत.
मराठीतूनच स्वाक्षरी करा. स्वाक्षरी तुमचा दूत असते. तो परभाषिक नसावा. वगैरे बौद्धिके या मासिकाने घेतल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्था विवेकानंदी आहे. त्यामुळं हमखास मिळवलेले ग्राहक आहेत. शिवाय त्यांचे प्रमुख शाळांत मार्केटिंग उत्तम आहे. लाखा दिड लाखावर खप निश्चितच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी अंकाचा खप दीड लाख?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार वर्षांपूर्वी साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकाचा खप चार लाखांवर काही हजार होता. तो गेली दोन तीन वर्षे तीन साडेतीन लाखांच्या आसपास आहे.
बहुतांश मराठी अनुदानित शाळा, शिक्षक, काही पालक अशी हमखास ग्राहक मंडळी आहेत. शिवाय सातत्याने केलेले वार्षिक मार्केटिंग आहे. त्यामुळे नोंदणीच आधी जास्त होते. अंक खपतात. साधनातर हे मिरविते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छापील दिवाळी अंकांबद्दलचे काही जुने धागे :

http://www.aisiakshare.com/node/229
http://www.aisiakshare.com/node/1441

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'मौजे'च्या दिवाळी अंकात सचिन कुंडलकरचा मराठी सिनेमाबद्दल एक लेख आहे. ('मौजे'त सिनेमाबद्दल गणेश मतकरी, परेश मोकाशी, चित्रा पालेकर यांनीही लिहिलं आहे. पण ते नंतर.)

मराठी सिनेमाचे प्रेक्षक कोण? त्यांचा आर्थिक-सामाजिक वर्ग कोणता? ते तरुण आहेत की मध्यमवर्गीय आहेत? मराठी लोकांखेरीज मराठी सिनेमा बघणारे लोक कोण? ते अभिमानानं तर नक्की सिनेमा पाहत नाहीत. मग का पाहतात? तरुण लोकांना मराठी सिनेमाची भाषा, मराठी सिनेमातल्या गाण्यांची भाषा आपली वाटते का? (चांदणे, तुझिया, साजणा इत्यादी. =))) ... असे प्रश्न.

मराठी सिनेमा हे अनेक अर्थांनी टीव्हीचं एक्स्टेंशन आहे - हे अत्यंत मार्मिक आणि लक्ष्यवेधी विधान.

बाकी - मराठी सिनेमाचा प्रेक्षक कसा भिकार, डबक्यात राहणारा माणूस आहे हा नेहमीचा कुंडलकराचा स्टँड. माझा त्या मताला बिलकूल आक्षेप नाही. ते सत्य तर आहेच. शिवाय एखाददा धक्का म्हणून असं विधान फेकून मारणं अत्यावश्यक असतं, हे मान्यच. पण सतत याच सुरात बोलत राहून कुंडलकराची कुचेष्टा होईल आणि त्याचं नि आपलं दोघांचंही नुकसान होईल अशी भीती मात्र मला वाटते.

**
म्ह. त. अवांतरः या लेखातल्या 'मराठी सिनेमा आणि त्याचे प्रेक्षक' या संज्ञांच्या जागी 'मराठीतले दिवाळी अंक आणि त्याचे वाचक' अशा संज्ञा घालून पाहण्याचा मोह वारंवार होत राहिला. या दोन्ही संज्ञागटांमध्ये कमालीचं साम्य आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चित्रा पालेकरांनी मराठीत लिहिलय का मौजेत? :O डोक्यावरून समांतर गेलं का वाचल्यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> चित्रा पालेकरांनी मराठीत लिहिलय का मौजेत? डोक्यावरून समांतर गेलं का वाचल्यावर? <<

'समांतर' ही कोटी आहे असं मानून - आपण चित्रा पालेकर आणि संध्या गोखले ह्या दोन आजीमाजी पालेकरसहचारिणींमध्ये अंमळ गफलत करताहात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय, अंमळ गफलतच केली. ही गुन्ह्याची कबुली Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत माझ्याकडे आलेले किंवा येऊ घातलेले अंक -

म.टा.
लोकसत्ता
लोकमत
अनुभव
कालनिर्णय
मुक्त शब्द
खेळ
मौज
अक्षर
ललित
वसा
पद्मगंधा
उत्तम अनुवाद
दीपावली

ह्यापैकी म.टा. आणि कालनिर्णय जवळपास वाचून झाले आहेत.
म.टा.त उल्लेखनीय -
भारतीय राजकारणात बहुसंख्याकवाद - सुहास पळशीकर ('वर्तमानाची स्पंदनं' विभागात)
संशोधकांचे पुणे - श्रीधर लोणी ('प्रदेशाच्या खुणा' विभागात)
भाषांतरांचे कारखाने - डॉ. आनंद पाटील ('किताबखाना' विभागात)
पुस्तकांचं घर - नितीन रिंढे ('किताबखाना' विभागात)

'कालनिर्णय'मध्ये उल्लेखनीय -
पत्त्यांच्या स्वरूपा तुज नमो - विकास गायतोंडे ('मनोरंजन' विभागात)
नवी गाणी नवा बाज - मुकुंद कुळे ('मनोरंजन' विभागात)
धक्कथा - मुकेश माचकर
'ऐसी'वरच्या आदित्य जोशीच्या मुलाखतीसंदर्भात उल्लेखनीय - 'वेगळा' शिरीष कणेकर : भारतीय समलैंगिकांच्या चळवळीचे नेते अशोक राव कवींचं व्यक्तिचित्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अक्षर आणि लोकसत्ता चे दिवाळी अंक घेतले. अक्षर चा दिवाळी अंक वाचायला सुरुवात केली पण फार वाचून झाला नाही. अंकातला पहिलाच लेख "पंतप्रधान विकणे आहे" ह्या शीर्षकाचा, छान आहे (अगदी उत्तम किंवा नवीन अशी माहिती नाही). पण मोदी, मोदी सरकार आणि भाजपा ह्याबद्दल आहे - देशाला मोदी नामक पंतप्रधान विकण्यात कसं यश मिळालं (मोदींना आणि भाजपाला देखील) आणि काय-काय गोष्टी त्यासाठी केल्या ह्याबद्दल चा निळू दामलेंचा लेख वाचनीय आहे.
बाकी अक्षरे मधे "सेल्फी" नामक एक विभाग आहे ह्यावेळी त्यात तरूण मंडळींचे विचार मांडले आहेत, खूप उत्सूकतेने वाचायला सुरुवात केली पण अतिशय टुकार वाटले ते लेख. भाषा अतिशय बाळबोध आणि विषयांना म्हणावा असा गाभा नाही, मुळात निवडलेले विषयच नेहमीचे रटाळ आहेत. हे 'सेल्फी' विभाग सोडून बाकी लेख बरे निदान वाचनीय असावेत अशी अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सेल्फी'बद्दल सहमत. आणि त्यात चक्क पार्थ मीना निखिल या माणसाचा लेख. का म्हणून? 'अक्षर'कडून ही अपेक्षा नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोण आहे हा पार्थ मीना निखिल नामक गृहस्थ? आणि अक्षरवाल्यांनी त्याचा लेख छापणे हे 'अन-अक्षरलि' का आहे?

(अज्ञानी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पार्थ मीना निखिल

इतने सारे नाम? बाकी लोग कहां है?

अवांतर - निखिल वागळेंचे चिरंजीव की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय, वागळेंचे चिरंजीव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नै पण लिहितो तरी बरा की बापागत नुस्ती काव काव काव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बादवे, या 'सेल्फी'मधला बालाजी सुतार या माणसाचा लेख आवडला. एका तालुक्याच्या गावातल्या पत्रकाराला आपल्या गावातल्या 'तरुणाई'बद्दल लिहायचं आहे आणि म्हणून तो गावातल्या तरुण पोरांशी ऑफ द रेकॉर्ड बोलतोय. गावातल्या शिक्षणसंस्था, शेती, लग्न, सेक्स, राजकारण... असल्या विषयांवर गावातले तरुण जे काही बोलतात, त्याचं डॉक्युमेंटेशन - असा हा फॉरमॅट आहे. अतिशय बेरकी, बोलका, खवचट्ट लेख आहे. त्या आख्ख्या 'सेल्फी' विभागात एवढाच एक लेख वाचनीय वाटला.

बाकी पा.मी.नि.बद्दल काय बोलावं? तरुण मुलं(ही) विचार करतात, तरुण मुलं(ही) वाचतात, तरुण मुलं(ही) चर्चा करतात... याचे एकावर एक वळसे होते. अगदीच प्रेडिक्टेबल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पार्थ मीना निखिल असे लांबलचक नाव घेण्याऐवजी पार्थ मीखिल असे म्हणायचे ना! मीखिल हे नाव वागळ्यांच्या मी-मीपणालाही शोभून दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत मेघना @ बालाजी सुतार. तो वाचायचा राहून गेला होता सेल्फी विभागातला आणि मलाही जाणवलं की तो एक वाचनीय आहे. पा.मी.नि. चा लेख फार टुकार वाटला नाही, त्याने जो मुद्दा मांडला की आज जे पन्नाशीत आहेत आणि आजच्या तरुणांना जे 'काय आजचे तरूण ...' टाईप बोलतात ते स्वतः तरूण असतांना त्यांना ही ह्याला सामोरा जावं लागलं असेल. तरूण चौकस नसतात असं म्हणताना किती तरी आजच्या वयस्क लोकांना त्यांच्या तरूणपणात काय नेमक्या घटना घडल्या ह्याचा सविस्तर तपशील नसतो, त्यामूळे तरूण आहे म्हणजे सगळं आलंच पाहीजे - सगळ्याची जाण असलीच पाहीजे वगैरे अपेक्षा मोठ्यांनी करणं तितकसं बरोबर नाही. मुळात फार पाल्हाळ न लावता लेख थोडक्यात उरकल्यामुळे अगदीच टुकार वाटला नाही (वासरात लंगडी गाय) पण हो फार काही ग्रेट वगैरे नक्कीच नाहीये लेख.
विनायक गायकवाडच्या लेखाकडून अपेक्षा होती पण साफ निराशा झाली. त्याचा यंगिस्तान कार्यक्रम आवडायचा - छान सादरीकरण करायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवी हेमंत दिवटे संपादित "अभिदानंतर" २०१४ दिवाळी अंक प्रसिद्ध होतोय/झालाय.
पर्व तिसरे आणि अंक पहिला असे लिहलय त्यावर.
लाकूडतोड्याची कथा लिहिणारे संजीव खांडेकर यांचे अभ्यासू आणि संदर्भसंपृक्त, तसेच इथले काही हंगामी सदस्य यांचे लेख कविता आहेत असे कळते. काही नविन नावे देखील आहेत. कोणी वाचला, विकत घेतला आहे का?
अंकाशी संबधित कुणी आहे का? याविषयी अधिक वाचायला आवडेल. अभिदानंतरचे आजीमाजी अंक जालावर उपलब्ध होतील/आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0