मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १४

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

नेमका अश्लीलता, नग्नता आणि मादकता यात फरक काय असावा? प्रत्येक व्यक्ती साठी याचा अर्थ वेगळा असू शकतो, ह्या गोष्टी संस्कृती सापेक्ष आहेत ही कारणं सोडून काही मानसशास्त्रीय/ वैज्ञानिक निकष ?
फार दिवसांपुर्वी विंदाची तीर्थाटण नावाची कविता/ देव-डी सिनेमा( माही गिल/पारो ची एंट्री, सिनेमाची सुरुवात) अश्लिल अशी आम्हा मित्र-मैत्रिणींची चर्चा झाली मला दोन्हीमधे काहीच अश्लील वाटलं नाही, पण बर्याच जणांना दोन्ही गोष्टी अश्लिल वाटत होत्या.

तीर्थाटण - विंदा करंदीकर

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

लोकांना हि ऊर्जा कुठून येते ?

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

रोवळी म्हणजे पंचा तत्सम पातळ

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ब्राऊनी पॉइंट्स हा जो इंग्रजी शब्द आहे

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

साली आजची पिढी साली

आम्ही लहानपणी गांडूळाचे तुकडे करून नायलॉनच्या दोर्‍याला जोडलेल्या गळाला लावून विहरीतले मासे पकडायचो (आणि मग पुन्हा सोडून द्यायचो, का ते जाऊंद्या!) आणि ह्या आजच्या पिढीला गुबगुबीत कुशनवर बसून तलावातले मासे ऑटोमॅटिक गळाने पकडता येत नाहीत! छ्या! अजून काय काय दाखवणार आहेस रे विष्णूच्या अवतारा!!

की गळ है?

गळाला लावून विहरीतले मासे पकडायचो (आणि मग पुन्हा सोडून द्यायचो, का ते जाऊंद्या!)

मध्यमवर्गीय व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर हे रूपक फ्रॉयडियन की कायसेसे वाटले (डोळा मारत)

काठावर

काठावर बसून दगड मारणे का हे? (डोळा मारत)

:)

छे! तट-स्थ राहून अधूनमधून खडा टाकून पाहणे (डोळा मारत)

bait

छे! तट-स्थ राहून अधूनमधून खडा टाकून पाहणे
..........Stop being so bait. (डोळा मारत)

अबेटमेंट

नो मॅन इज अ‍ बेट!
(जॉन डन मुझे माफ करे (स्माईल))

_/\_ नमस्कार घ्यावा....

_/\_
नमस्कार घ्यावा....

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुणे ५२ बघताना सतत जाणवत

पुणे ५२ बघताना सतत जाणवत होतं, अरे हा नायक 'आपटे' वाटत नाहीय. त्यानंतर मनोबाच्या इब्राहीम धर्म लेखमालेत थत्तेंचा एक प्रतिसाद वाचला, गोरे घारे चित्पावन मूळ भारतीय नाहीत असे कुठल्यातरी पुस्तकात आहे वगैरे. तर भारतीय न वाटणारे असे अजून कोणकोणते समाज/जाती आहेत? गोरेपणापेक्षा डोळ्यांचा रंग काळा/तपकीरीशिवाय इतर कोणतातरी असणे हे भारतात दुर्मिळ वाटतेय.

Amazing Amy

गोरे घारे चित्पावन मूळ भारतीय

गोरे घारे चित्पावन मूळ भारतीय नाहीत असे कुठल्यातरी पुस्तकात आहे वगैरे.

इरावती कर्वे यांचे पुस्तक आहे अशी माझी ऐकीव माहीती आहे.

अभ्यास करा की मेल्यांनो!

मराठी आंतरजालावर याबाबत कित्ती कित्ती काथ्याकूटला गेला आहे. या आजच्या पिढीला अभ्यास म्हणून करायची सवय नाही. 'चित् पावन' असा शोध करून पहा.

चित्पावन शोधून काय मिळणार?

चित्पावन शोधून काय मिळणार? हिरवे, निळे डोळे असणारे भारतीय समाज कोणते हा विचार करतेय मी. मंजे ऐश, बेबो वगैरे आहेत; पण जर एका जातीत/भागात तसे जास्त लोक दिसत असतील तर ते हवे आहे.

Amazing Amy

अपराध गंड -- guilty feel

रुढार्थाने मांसाहार म्हणतात त्याबद्दल खाणार्‍यांना अपराध गंड -- guilty feel असतो का ?
म्हणजे खाताना काही वाटत नसेलही, पण सदर प्राणी/पक्षी/कीटक्/अवनस्पतीय सजीव जिवंत असतानापासून ते त्याला
शिजवेपर्यंतच्या टप्प्यांमध्ये सामील होण्यास मांसाहार्‍यांना संकोच वाटतो का ?
वाटत असल्यास --
हे इनकन्सिस्टंट नाही का ?

म्हणजे असं की...
मला फळं तोडताना, शेताची कापणी होत असताना काहीही वाटत नाही. मी जमत असेल तर फळे तोडतो आणि खातो.
जे करण्याने अपराध गंड येतो; ते करत नाही.
तुम्हाला कोंबडी, बकरा कापताना पाहणे किंवा स्वतः कापणे अगदिच कसेतरी वाटत असेल तर मग खाताना काहिच कसे वाटत नाही?
हां, कोंबडे कापत असताना काहीही विशेष वाटत नाही; कागद कापावा तितक्या सहजतेने कार्य करता येत असेल तर काहीही म्हणणे नाही.
कोळी लोक जाळे टाकून मासे पकडतात. फडफदित ताजे मासे पाहून त्यांना छान वाटते.
ते तसे मासे कोळी लोक सहजतेने ग्रहणही करतात. ही अशी वागणूक कन्सिस्टंट वाटते.
पण बकरा कापायला कसंतरीच होत असेल तर मग खावे तरी कशाला ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझा अनुभव

आमच्या बाजारातल्या कोंबडीवाल्याकडून ती आणतांना अनेक वेळा माझा दोन तीन वर्षाचा मुलगा माझ्याबरोबर असायचा. त्या कोंबडीचे कापणे, सोलणे, साफ करणे वगैरे माझ्याने पहावले जात नसे म्हणून मी तोंड फिरवून दुसरीकडे पहात असे, पण त्या लहान मुलाची पाटी कोरी होती. त्याला पाप पुण्य वगैरे काही ठाऊक नव्हते, मात्र कुतूहलच जास्त असे. तो सगळ्या क्रिया लक्षपूर्वक पहात असे आणि मला मध्ये मध्ये त्यावर प्रश्नही विचारत असे.

The Omnivore's Dilemma

या मायकल पोलनच्या पुस्तकात साधारण याच प्रश्नावर चर्चा आहे. त्यातून 'पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' छापाची उत्तरं जरी नाही मिळाली, तरी काही नेमके मुद्दे समोर येतात.

हे पुस्तक ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असावे. नसल्यास गूगल बुक्सच्या दुव्यावर 'the ethics of eating animals' या सतराव्या प्रकरणातील काही पानं वाचता येतील. या चर्चेत रस असणार्‍यांसाठी नक्कीच वाचनीय.

अतिअवांतर

अपराध-गंड असेल तर 'असतो'च.

अपराध-हेणती असेल तर मात्र असते (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अशोक नायगावकर

अशोक नायगावकरांची शाकाहारी ही कविता आठवली

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

:-)

(स्माईल) भारी आहे कविता.

...

विनोद म्हणून ठीकच आहे.

माझा मांसाहार चिकनपुरता

माझा मांसाहार चिकनपुरता मर्यादित आहे. मी सुपरमार्केटातल्या गारेगार फ्रीजमधलं चिकन घेतो. "अहिल्यादेवी मटण शॉप"मध्ये जाऊन चिकन आणणं मेरे बस की बात नहीं. तिथले ताज्या मांसाचे वास, एकंदर कुबटपणा, खिळ्याला टांगलेल्या बकर्‍याच्या मांड्या वगैरे गोष्टी भयानक वाटतात.

मासळीबाजारात हिंडायला काही वाटत नाही. उलट मच्छीच्या वटारलेल्या डोळ्यांत डोळे घालून खुन्नस द्यायचा पोरकट खेळ खेळायला मजा येते. पण संधी असूनही गळ घेऊन मासे पकडायला गेलो नाही. जिवंत माशाच्या गळ्यात हूक अडकणार, तो तडफडणार वगैरे कल्पनांनीच कसंसं झालं.

माझ्या मते माझ्या डोक्यात living entity आणि commodity हे स्वतंत्र कप्पे आहेत. कमोडिटी-कप्प्यातल्या गोष्टीला लिव्हिंग एंटिटी कप्प्यात घुसवायचा प्रयत्न सहसा करत नाही.

कॉलेजमध्ये कट्ट्यावर जे तोंडओळख असलेले समांतर ग्रूप बसतात त्यापैकी एक मुलगी व्यसनाधीन होऊन वेश्याव्यवसाय करायला लागली हे कळलं तेव्हा भयंकर अस्वस्थ झालो होतो. पण अ‍ॅम्स्टरडॅमच्या रेड लाईट डिस्ट्रिक्टमध्ये हिंडताना काही अपराधी वाटलं नाही.

विसंगती आहे का? नक्कीच. अशी विसंगती असणं चूक आहे का? माहीत नाही ब्वा! दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा उगम इथेच असावा.

-------------
१ for want of a better word

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

कमोडिटी आणि लिव्हिंग एंटिटी.

माझ्या मते माझ्या डोक्यात living entity आणि commodity१ हे स्वतंत्र कप्पे आहेत. कमोडिटी-कप्प्यातल्या गोष्टीला लिव्हिंग एंटिटी कप्प्यात घुसवायचा प्रयत्न सहसा करत नाही.

हे रोचक निरिक्षण आहे आणि मला वाटते की बाजारीकरणाच्या प्रक्रियेचे हे बायप्रॉडक्ट आहे. विशेषतः आपले अन्न ज्यापद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचते त्यातल्या पहिल्या अनेक टप्प्यांशी आपला काहीच संबंध न उरल्याने अशा प्रकारची विसंगती तयार होते. जगाच्या ज्या भागात कोलंबी मिळत नाही तिथे स्वस्त कोलंबी उपलब्ध झाल्याने ग्राहक सुखावतात पण ती तशी उपलब्ध होण्यामागे नक्की कोणाचे शोषण कसे होते यापासून ते अनभिज्ञ असतात.
हे फक्त अन्न्धान्याबद्दल आणि माझ्यापुरते बोलायचे झाले तर निदान त्याबाबत आपली नैतिकता तपासावी असा प्रयत्न करताना आपल्यात आणि आपल्या अन्नाच्या स्त्रोतात फार मोठे अंतर नसणे मला सोईचे वाटते. मांसाहार करायचा आहे तर मग आपण खातो ते प्राणी कोठे कसे वाढतात, कसे मारले जातात कोणत्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतात हे समजणे, त्याबद्दल घृणा न वाटणे, त्याबद्दल नैतिक टोचणी न लागणे हे मला महत्वाचे वाटते. कोंबडी स्वतः मारणे शक्य नाही तर ठीक आहे पण ही कोंबडी कुठे कशी पाळली गेली, कशी मारली गेली अशी साफ केली गेली हे समजल्यावर स्वतःला त्याबद्दल घृणा वाटली तर मग ती खाणे ही विसंगती आहे पण नसेल तर ती प्रकृती आहे. शिवाय हे अन्न शक्य तितक्या मूळ स्वरूपात माझ्यापर्यंत यावे याकडे माझा कल असतो, कोंबडी खायची तर ती साफ करण्याचे, कापण्याचे आणि कोणताही भाग वाया न घालवता वेळेवर संपविण्याची जबाबदारी स्वतःवर घेतल्याने आपण एक 'प्राणी' खातो आणि एक 'विकत आणलेला खाद्यप्रदार्थ' खात नाही याचे भान वाढते. हे नेहमी सर्व बाबतीत शक्य होते असे नाही पण त्याची जाणीव असेल तर त्याप्रमाणे निर्णय घेत हळूहळू विसंगती कमी होत जातील अशी शक्यता वाटते.

एका जीवाने आपलं पोट

एका जीवाने आपलं पोट भरण्यासाठी आपल्यापेक्षा दुर्बल जीवांचा फायदा करून घेणे
उदाहरण १: कोंबडी अथवा कोलंबी हस्ते-परहस्ते मारून खाणे
उदाहरण २: थाई वेठबिगारांची पिळवणूक करून आपल्यापर्यंत पोचलेला पदार्थ खाणे

नैतिकता उदाहरण २ मध्ये येते. उदाहरण १ मध्ये का नाही?

उदाहरण २ मध्ये दुर्बल जीव हा माणूस आहे आणि उदाहरण १ मध्ये कोंबडी आहे हा फरक आहे का? तसं असेल तर हे एकप्रकारचं रेसिझम नव्हे का?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

जाड ठसातील शब्द!

तुमच्या प्रश्नातील

आपलं पोट भरण्यासाठी

हे जाड ठशातील शब्द महत्वाचे आहेत. नैतिकतेत "आपलं पोट भरण्यासाठी" केलेल्या गोष्टी प्रकृती असाव्यात.

दुसरे असे की, उदाहरण १ मध्ये कोंबडीला न मारून खाण्याचा पर्याय शाकाहार असू शकेल पण मग शाकाहारात आपल्यापेक्षा दुर्बल अशा वनस्पतींची हत्या होतच असते त्यामुळे मनुष्य हा मिश्राहारी प्राणी आहे असे गृहित धरले तर हा नैतीक प्रश्न तयार व्हायला नको.

उदाहरण २ मध्ये थाई वेठबिगारांची पिळवणूक न करता उपलब्ध असणारे अनेक मांसाहाराचे पर्याय उपलब्ध असू शकतात जे तुलनेने महाग असतील कारण त्यात कामगारांना पुरेसा मोबदला मिळालेला असेल. असे पर्याय उपलब्ध असताना केवळ आर्थिक लाभासाठी (पोट भरण्यासाठी नव्हे) पिळवणूकीला प्रोत्साहन मिळेल अशा उद्योगांना समर्थन देणे यात नैतिक तडजोड करावी लागेल.

पोट भरण्यासाठी म्हणजे मला

पोट भरण्यासाठी म्हणजे मला survival हा अर्थ अभिप्रेत नव्हता.

अजून अमूर्त करतो:

एका जीवाने आपल्याला +१ करण्यासाठी आपल्यापेक्षा दुर्बल जीवांना -१ करणं हे काही वेळा योग्य आणि काही वेळा अयोग्य असं का?

तुमच्याशी कौबक खेळतोय असं कृ समजू नये. बॅटमॅनचा मुद्दा पटलेला आहे. आणि गब्बरभौंचा "नैतिकता pervasive नसते" हाही.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

उदाहरण २ मध्ये दुर्बल जीव हा

उदाहरण २ मध्ये दुर्बल जीव हा माणूस आहे आणि उदाहरण १ मध्ये कोंबडी आहे हा फरक आहे का? तसं असेल तर हे एकप्रकारचं रेसिझम नव्हे का?

होय, पण नीतीनियम हे आपण ज्यांना बरोबरचे मानतो त्यांच्या सर्कलमध्येच पाळावयाचे असतात हा सर्वमान्य संकेत आहे. जुन्या काळी जात-धर्म-प्रदेश-लिंग इ. चे कुंपण होते, ते आता सर्व मानवांसाठी सैद्धांतिकदृष्ट्या तरी विस्तारलेय. पण तत्त्वतः कुठल्याही चौकटीत काऽही फरक नाही. कोंबड्या ऐसीवर येऊन आपला निषेध करण्याइतपत, किंबहुना कत्तलखाने व पोल्ट्र्यांतून सुटण्याइतपत स्वतंत्र आणि सामर्थ्यवान नाहीत म्हणून त्यांबद्दल काहीही बोलले आणि त्यांना कसेही वागवले तरी चालते इतकेच. शेवटी बळी तो कानपिळी हेच एकमेव सत्य आहे. विदिन अ स्पीशी अ‍ॅज़ वेल अ‍ॅज इंटरस्पीशी.

काही कुंपणे ओके तर काही नॉन-ओके असतात इतकेच काय ते. त्याची कारणेही दरवेळेस अनिवार्य असतीलच असेही नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

निव्वळ औद्योगिकीकरण याला

निव्वळ औद्योगिकीकरण याला कारणीभूत असावे काय? मला वाटते नसावे. जुन्या काळीही कैक लोक कमी पायर्‍यांत नॉनव्हेज खातच होते की. त्यांना वाटत नव्हतं काय काही?मला तर वाटतं की ब्राह्मण समाजातले कैक लोक अलीकडे नॉनव्हेज खाऊ लागलेत त्यांसाठी हे जास्त लागू आहे. ते अगोदर खात नव्हते, सबब आधीपासून घरी बघून ठाऊक नसते आणि कुठे बकरं कापताना इ. पाहिलं की तेवढ्यापुरतं वाईट वाटतं, घृणा इ. येते. नॉनव्हेज खायची परंपरा असली तर असे होत नाही शक्यतोवर-याला अपवादही असतील पण कमीच पाहिलेत तसे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मूळ मुद्दा.

मूळ मुद्दा

आपले अन्न ज्यापद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचते त्यातल्या पहिल्या अनेक टप्प्यांशी आपला काहीच संबंध न उरल्याने अशा प्रकारची विसंगती तयार होते

हा आहे आणि औद्योगिकीकरणामुळे केवळ मांसाहाराबद्दलच नव्हे तर शाकाहाराबद्दलही असेच नैतिक मुद्दे (जसे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम) तयार होतात ज्याविषयी स्त्रोतांच्या जवळ गेल्याने अधिक माहिती आणि आस्था तयार होते.

बरं.

मग माझा मूळ मुद्यालाच आक्षेप आहे.

औद्योगिकीकरण परवापरवा २००-३०० वर्षांपूर्वी झाले. सगळीकडे पसरायला विसावे शतक उजाडले. तोपर्यंत सर्व जग स्रोतांच्या जवळ होते. तसे जवळ होते म्हणून आस्था होती हे म्हणायला काही पुरावा आहे का? बरं, आस्था होती म्हंजे नक्की काय होतं? ओव्हरकंझम्प्शन आत्ताच्या इतके नव्हते कारण तसे ते करता येते हे माहितीच नव्हते. ज्यांना शक्य होते ते त्याही काळात, त्याही टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जमेल तेवढे ओव्हरकंझम्प्शन करतच होते. फक्त ९९% जन्ता ते करत नसल्याने पर्यावरणारवचे परिणाम दिसत नसत इतकेच.

जुन्या काळी तंत्रज्ञान इव्हॉल्व्ह नसले तरी लोक हावरट होतेच, फक्त तंत्रज्ञानाच्या ब्याकवर्डपणामुळे हावरटपणालाही मर्यादा पडायची. तुमच्या प्रतिसादात 'स्रोतांजवळ गेल्याने जागृती & हेन्स लेस कंझम्प्शन' अशी कारणपरंपरा दिसतेय ती पटणेबल नाही. इफ मॅन कॅन कंझ्यूम, ही विल अ‍ॅज मच अ‍ॅज ही कॅन, नो म्याटर व्हॉट गांधी ऑर तत्सम तत्वज्ञाज़ से.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नैतिक मर्यादा.

इथे प्रश्न नैतिकतेचा आहे, माणूस हावरट आहे पण माणसाला नैतिक मर्यादाही आहेत असे म्हणायला जागा आहे. म्हणजे उदाहरणार्थ अ‍ॅमेझॉनच्या खोरयातल्या काही आदिवासी जमाती स्वतःच्या भुकेसाठी मिळेल तो प्राणी मारून खातात, अगदी माकडही खातात पण असे करताना एखादे माकडाचे पिल्लू अनाथ झाले तर अनेकदा त्या माकडाच्या पिल्लाला पाळून त्याचा सांभाळ करतात. नैतिकता अनेकदा स्वतःच्या फायद्यासाठी तयार झालेली असते, म्हणजे लहान मासे गळाला लागले तर ते सोडून द्यावेत कारण त्यांचे प्रजनन झाले नाही तर आपल्याला नंतर मासे मिळणार नाहीत. नैतिकतेमगचा हा कार्यकारणभाव लक्षात येण्यासाठी या स्त्रोतांशी आपण जवळ असणे आणि त्याचे परस्परसंबंध ज्ञात असणे महत्वाचे असते. केवळ तंत्रज्ञानाच्या अभावामुळे हवरटपणाला मर्यादा पडायची याच्याशी असहमत, त्या हावरटपणाला मर्यादा पडायची ती या स्त्रोतांच्या क्षमतांच्या आकलनामुळे आणि त्याच्या आपल्या आयुष्यावर पडणार्या प्रत्यक्ष परिणामांमुळे. एकदा दृष्टीआड सृष्टी झाली की त्याच्या नैतिकतेचे (पुन्हा अनेकदा स्वतःच्याच फायद्यासाठी निर्माण झालेल्या), भान सुटते. मला थाई वेठबिगारांच्या पिळवणूकीबद्दल कळले तर स्वस्त कोलंबी मिळाली तर ती कोठून आणि कशी आली याचे हे समजल्याने मी ती न विकत घेण्याचे ठरविते पण मला ज्ञानच नसेल तर मी तो निर्णय घेऊच शकत नाही, मी सध्या इथे ओव्हरकंझम्प्शनचा मुद्दा आणलेला नाही.

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांला

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांला कळाला तर तुम्ही घेणार नाही हे तुमच्यापुरते ठीक आहे. बहुसंख्य जन्ता असेच करते असे म्हणायला आधार आहे का? असेल तर तुमच्याशी सहमत आहे. नै म्हणजे तुमच्यासारखा विचार करणारे बरेच लोक नेटवर दिसतात, पण त्यांची संख्या किती आणि तेवढ्यापुरती टिपे गाळून पुन्हा ये रे माझ्या मागल्या करणारांची संख्या किती?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

?

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांला कळाला तर तुम्ही घेणार नाही हे तुमच्यापुरते ठीक आहे. बहुसंख्य जन्ता असेच करते असे म्हणायला आधार आहे का?

थाई-कोलंबी-संबंध तुम्हांआम्हाला कळल्यावर तरीसुद्धा तुम्हीआम्ही (पक्षी: बहुसंख्य) ती घेऊ किंवा नाही, हा प्रश्न पूर्णपणे अलाहिदा. पण म्हणून ती माहितीच मुळात उपलब्ध होऊ नये काय?

त्या माहितीचा उपयोग थाई उत्पादनांवर बहिष्कार करण्यासाठी करायचा, की थाई वेठबिगारांना इतर कौशल्ये शिकवून त्यांना रोजगाराच्या इतर संधी मिळवून देण्यासाठी करायचा, की 'हमखास स्वस्त कोळंबीसाठी थाई ब्राण्ड शोधावा' असा (कन्झुमेरिष्ट) अर्थबोध घेण्यासाठी करायचा, की थाई रंजल्यांगांजल्यांची सेवा करून त्यांना ख्रिस्ती बनवून त्यांच्या आत्म्यांचा उद्धार करण्यासाठी करायचा, की ही माहिती छापलेल्या कागदाचा रद्दी म्हणून (अथवा, पर्यायाने, सुरनळी करून) सुयोग्य वापर करण्यासाठी करायचा, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा. पण मुळात, ही माहिती सप्रेस करून काय (किंवा, खरे तर, नेमक्या कोणाचा) फायदा होतो? ग्राहकाला निर्णय घेऊ द्या ना या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा ते!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(पण, अर्थात, ती माहिती सप्रेस व्हावी असा दावा आपण केलेला नाही. आपला मुद्दा, ती माहिती उपलब्ध असूनसुद्धा लोक त्या माहितीस एका ठराविक 'नैतिक' रीतीनेच रिअ‍ॅक्ट करतीलच, असे नाही, असा काहीसा आहे. तो मी मान्य करू शकतो. शेवटी कितीही झाले, तरी माणूस कमीअधिक प्रमाणात स्वतःचे हितसंबंध प्रथम पाहतो.

दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषी राजवटीच्या काळात भारतात दक्षिण आफ्रिकेवर व्यापारबंदी होती. याचा अर्थ, कोपर्‍यावरच्या एखाद्या डाह्याभाई पटेलाने द. आफ्रिकेतल्या भारतीय वंशाच्या जनतेला लागतात, म्हणून कुंकवाच्या टिकल्या द. आफ्रिकेला निर्यात केल्या, तर तो त्याकरिता तुरुंगात जात असे. मात्र, तोच डाह्याभाई पटेल जर सुरतेतला हिर्‍याला पैलू पाडणारा कारागीर असता, तर त्याच्यासाठी भारत सरकार स्वतः (स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनमार्फत) दक्षिण आफ्रिकेतून कच्चा माल आयात करून देत असे. कारण शेवटी पैलू पाडलेल्या हिर्‍यांची निर्यात हा भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारा एक महत्त्वाचा स्रोत होता, आणि त्याकरिता लागणार्‍या कच्च्या मालाकरिता दक्षिण आफ्रिका हा जगातील एक महत्त्वाचा स्रोत होता.)

पण, अर्थात, ती माहिती सप्रेस

पण, अर्थात, ती माहिती सप्रेस व्हावी असा दावा आपण केलेला नाही. आपला मुद्दा, ती माहिती उपलब्ध असूनसुद्धा लोक त्या माहितीस एका ठराविक 'नैतिक' रीतीनेच रिअ‍ॅक्ट करतीलच, असे नाही, असा काहीसा आहे. तो मी मान्य करू शकतो.

धन्यवाद.

बाकी सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मला थाई वेठबिगारांच्या

मला थाई वेठबिगारांच्या पिळवणूकीबद्दल कळले तर स्वस्त कोलंबी मिळाली तर ती कोठून आणि कशी आली याचे हे समजल्याने मी ती न विकत घेण्याचे ठरविते पण मला ज्ञानच नसेल तर मी तो निर्णय घेऊच शकत नाही

हा एक मुद्दा वेगळा धागा काढण्याइतपत बळकट आहे.

प्रश्न - (प्रश्न विचारताना मी अनेक गृहितके करीत आहे) - जे वेठबिगार होते त्यांना उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नसेल व असे इतर कोणतेही कौशल्य नसेल की ज्याच्या जोरावर ते आपला उदरनिर्वाह चालवू शकतील. अशी जर परिस्थिती असेल तर ? तुम्ही त्यांनी प्रोड्युस केलेल्या उत्पादनावर अघोषित बहिष्कार टाकून त्यांच्या समस्यांमधे भर घालत नाही आहात का ?

--

मला नेमके काय म्ह्णायचे आहे - नैतिकता ही पर्व्हेझिव्ह नसते. व नसावी. व्यक्तीगत व लोकल असते. And even after acquiring the knowledge/information individuals will not do the right thing (ethical action). प्लेटो ने सुद्धा हीच मिष्टेक केलेली होती त्याबद्दल थॉमस काहिल ने लिहिलेले आहे.

प्रतिप्रश्न.

प्रतिप्रश्न - (वेठबिगारी हा मी स्लेव्हरी साठी पर्यायी शब्द म्हणून वापरला होता.) मी वर लिंक दिलेला लेख तुम्ही वाचला होतात का? जे वेठबिगार (स्लेव्हज टू बी प्रिसाईज) आहेत त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मोबदला न देता, मारहाण आणि अत्याचार करून काम करायला लावले जाते आहे. त्यांना जनावरांप्रमाणे विकले जाते आहे, त्यांनी शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कामे करावी म्हणून त्यांना औषधे दिली जात आहेत. या लोकांना उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नसेल व असे इतर कोणतेही कौशल्य नसेल तर मग स्लेव्हरी कायदेशीर करावी का?
त्यांनी प्रोड्युस केलेल्या उत्पादनावर अघोषित बहिष्कार टाकून मी स्लेव्हरीविरुद्ध आवाज करते आहे. जे गरीब होते ते आज स्लेव्हज आहेत त्यामुळे माझ्या अघोषित बहिष्कारामुळे त्यांच्या समस्यांमध्ये भर पडण्याचा संबंधच नाही पण त्यांच्यावर अत्याचार करून नफा कमावणार्या दलालांच्या समस्यांमधे मात्र नक्की भर पडेल. बाकी प्लेटो वगैरे जाऊ द्या हो, एव्हरीथिंग इज एथिकल इन कार्पोरेटायझेशन (स्माईल). असो.

रुची, ओह येस. तुमचा लेख मी

रुची, ओह येस. तुमचा लेख मी वाचला होता. व स्लेव्हरी च्या बाजूने माझा मुद्दा नव्हताच. व कधीच असणार नाही. स्लेव्हरी वर संशोधन झालेले आहे. स्लेव्हरी ची कारणे, परिणाम, स्वरूप, इतिहास, व्याप्ती वगैरे. नुकतेच निवर्तलेले रॉबर्ट फॉगेल यांनी यावर संशोधन केलेले व लिखाण केलेले आहे. माझा उद्देश वेगळा होता. मी नैतिकतेच्याच तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्याचा दुसरा पैलू चर्चेस पुढे आणू इच्छित होतो. But you want to keep things simple. I am ok with that.

-----

या लोकांना उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नसेल व असे इतर कोणतेही कौशल्य नसेल तर मग स्लेव्हरी कायदेशीर करावी का?

१) नाही. माझे असे मत कधीही नव्हते व कधीही असणार नाही.
२) माझे मत नेमके उलट आहे. कोणासही तिच्या/त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कृती करण्यास भाग पाडणे हे चूक.
३) त्या व्यक्तीच्या भल्यासाठी असले तरी ही चूक. (हे अनेकदा शक्य नसते. अवघड असते.).
४) I like to think that I am a defender of liberty.

------------

(उपरोध मोड ऑन)

माझ्यावर "टोकाचा" व्यक्तीस्वातंत्र्यवादी असल्याचे आरोप झालेले होते. आज तुम्ही माझ्यावर कोणताही आरोप केला नाहीत हे खरे आहे पण "स्लेव्हरी कायदेशीर करावी का? " हा प्रश्न विचारून माझ्यावर टोकाचा व्यक्तीस्वातंत्र्यवादी असा आरोप करणार्‍यांना चोख उत्तर दिलेत. धन्यवाद. (स्माईल)

(उपरोध मोड ऑफ)

माझ्या मते माझ्या डोक्यात

माझ्या मते माझ्या डोक्यात living entity आणि commodity हे स्वतंत्र कप्पे आहेत.

commodity या जागी खाद्यपदार्थ हा शब्द चालेल काय?

या चर्चेमुळे 'पाडस' आठवलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...

पण संधी असूनही गळ घेऊन मासे पकडायला गेलो नाही.

एकदा - एकदाच! - तो प्रयोग करून पाहिलेला आहे. यात हत्या जर कशाची होत असेलच, तर ती अपरिमित कालाची होते, एवढेच (अनुभवाअंती) नम्रपणे नमूद करू इच्छितो. (आणि शिजवून खाण्याकरिताच जर मासे हवे असतील, तर शहाण्या माणसाने ते मासळीबाजारातून/कोळ्याकडून/कोळिणीकडूनच आणावेत, असाही एक अनाहूत सल्ला देऊ इच्छितो. कच्चे खाण्यासाठी हवे असल्यास मात्र एखाद्या बर्‍यापैकी सुशी रेष्टारण्टाची वाट धरण्यास हरकत नसावी.)

जिवंत माशाच्या गळ्यात हूक अडकणार, तो तडफडणार वगैरे कल्पनांनीच कसंसं झालं.

No such fear. (Believe me!)

(प्रतिसादातील इतरही अनेक मुद्दे उपप्रतिसादार्ह आहेत, परंतु तूर्तास त्यांची एवढीच पोच देऊन आवरते घेतो. जमल्यास पुन्हा कधीतरी.)

मार्मिक की विनोदी?

मार्मिक की विनोदी यापैकी कोणती श्रेणी दयावी हा प्रश्न पडला होता, बहुदा खोडसाळ ही तुमच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ श्रेणी द्यायला हवी होती. रम्य तळ्याकाठी फिशिंग लाईनच्या गाठी सोडविण्यात (आणि ती झाडाला अडकली की सोडविण्यात) अपरिमित कालाची हानी करून रिकाम्या हाती परतूनही पुन्हापुन्हा तोच प्रकार करायला जाणार्यांपैकी एक असल्याने प्रतिसाद फारच भिडला. त्यातही 'फ्लाय फिशिंग' नामक प्रकाराच्या वाटेस जायचे असेल तर आधी कोळीणीकडून मासे आणून ठेवावेत आणि मगच असल्या तथाकथित खेळांच्या नादी लागावे असा सल्ला मीही देईन. हवे तर कोळीणीकडून आणलेला मासा आपल्याच गळाला लागला असे भासवून परिचितांकडून शाबासकी मिळवावी...बरेच जण तसेच करतात असे ऐकीवात आहे (स्माईल)

दुरुस्ती

बहुदा खोडसाळ ही तुमच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ श्रेणी द्यायला हवी होती.

करेक्शन. 'भडकाऊ'.

बाकी चालू द्या.

सुशी या खाद्यपदार्थाबाबत

सुशी या खाद्यपदार्थाबाबत "ज्या पदार्थात सु आणि शी दोन्ही आहे तो चांगला लागणं शक्यच नाही" असं बहुदा ऐसीवरच वाचलेलं मत चिंत्य आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

आल्टरनैटिव्ह्य

सु आणि शी यांपैकी दोन्ही कमोडिटीरूपी नामे म्हणून न ट्रीटवता प्रथम चिजेकडे एक विशेषण म्हणूनही पाहिल्यास उपरिनिर्दिष्ट मताचे चिंत्यपण विशेषत्वाने अधोरेखित होईलसे वाटते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

...

खाओ तो जानो!

(असो. आग्रह नाही.)

commodity

commodity : for want of a better word
.....इंग्रजीतच अधिक योग्य शब्द हवा आहे की मराठीत ?
मराठीत 'कमोडिटी'साठी 'बाजारवस्तू' / 'विक्रियोग्य वस्तू' हे शब्द सुचतात.

या प्रतिसादाच्या संदर्भात

या प्रतिसादाच्या संदर्भात (विशेषतः शेवटून दुसरा परिच्छेद जमेस धरता) हे दोन्ही शब्द योग्य नाहीत.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

...

पण बकरा कापायला कसंतरीच होत असेल तर मग खावे तरी कशाला ?

'आमच्या'त एक म्हण आहे: Those who love sausage and respect the law should not see either one being made.

कदाचित, 'सविनय कायदेभंगा'ची प्रेरणा ही कायदे बनण्याची प्रक्रिया पाहण्यातून आली असावी काय?

ज्या कंपनीच्या उत्पादनाने

ज्या कंपनीच्या उत्पादनाने कॅन्सर होतो हे ठाऊक असते त्या कंपनीचे शेअर घ्यायला (पक्षी- त्या 'पापातून' मिळवलेल्या पैशात भागीदार व्हायला) गिल्ट येत नाही तसाच.....कोणीतरी कुठेतरी कोंबडा मारला* तो खायला इकडे कुणाला गिल्ट येत नसावी.

*शिवाय जीवन नश्वर आहे हे ठाऊकच असल्याने तो कोंबडा नाहीतरी केव्हा ना केव्हा मरणारच होता असा विचार करून गिल्ट येत नसेल.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

खायला

खायला गिल्ट नाहिच हो. तिथे न येण्याचाच अधिक संभव आहे.
खाणर्‍यांना ते कापताना पाहणे किम्वा स्वत: प्रत्यक्ष कापणे नकोसे वाटते काय , अशी शंका आहे.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अध्यात्म , आस्तिक , नास्तिक, धार्मिक, विवेकवादी, विज्ञानवादी

"माणसाच्या बुद्धीलाही अज्ञात अशा काही गोष्टी असतात " अशी घिसीपीटी लाइन सांगत धार्मिक, अध्यात्मिक लोकं तत्वज्ञान सुरु करतात.
ह्या वाक्यातली खुबी अशी की हे वाक्य दिसते तर बरोबर. पण वाक्याचा अंडरटोन भलतच काहीतरी सूचित करतो.
माणसाच्या बुद्धीला अज्ञात आहेत. ह्याचा सरळ अर्थ "त्या गोष्टी अज्ञात आहेत." असा होतो/व्हावा.
पण म्हणणारा प्रत्यक्षात त्याचा अर्थ "मानवी बुद्धीस अज्ञात असले तरी आमच्या बाबा महाराज्/अमुक शास्त्र्/तमुक सिद्धीस मात्र ते ज्ञात आहे!"
अहो ते तसे ज्ञात असेल, तर मग ते अज्ञात आहे असे म्हणता येउ नये!
पण तरीही धार्मिक आणि अध्यात्मिक लोक हेच सांगत राहतात.
वाक्य दिसायला सरळ दिसतं; त्यामागचा गर्भित अर्थ अत्यंत चुकीचा असतो.
विज्ञानास जमत नसलेली एकतरी गोष्ट बाबामहाराज लोकांनी करुन दाखवावी हे जुनच/घिसपीटं च्यालेंज दिलं;
की मग "त्यांची परीक्षा घ्यायची तुझी रे काय लायकी" हे ऐकून घ्यावं लागतं.
किंवा "आम्ही सध्या तसं करणार नाही. पण अमक्या काळात, तमक्य माणसानं केल्याचं ढमक्यानं पाहिलय" असं ते लोक म्हणतात.
मी त्यांना म्हटलं "तुम्ही स्वतः भिंत चालवू शकता का ? किंआ इतर कुणाला भिंत चालवताना पाहिलय का ? नसेल तर ७००
वर्षापूर्वी एक भिंत चालवली गेली असे सांगत बसू नका.".
उत्तर म्हणून पाठीत धपाटा मिळाला.

त्याच त्या गोष्टींबद्दल दरवेळी तेच मतप्रदर्शन करत बसणं सोयीस्कर वाटत नाही.
ह्या तिढ्याचा अंत तसाही नजीकच्या काळात दृष्टीक्षेपात नाही.
मला वाटतय ते एकदाच थोडक्यात लिहून पाहतो.

विज्ञानास किंवा मानवी बुद्धीस अगम्य अशा गोष्टी आज आहेत; म्हणून काय प्रयत्नच सोडून द्यायचे का ?
की त्या गोष्टी काय आहेत त्याचा शोध घ्यायचा ? जग असा शोध घेतच पुढे जात आहे ना ?
समजा न्यूटनच्याच काळी "हे अंतिम आहे" असे म्हणत बसलो असतो तर आजच्या काळातल्या कित्येक गोष्टी मिळाल्या नसत्या.

"आज मिळालेले नाही, पण न जाणो यत्न सुरु ठेवले तर अजूनही काही हाती लागेल" अशा आशेवर नि निश्चित दिशेवर संशोधन चालत असावे.
आस्तिक नास्तिक हे मला कसे वाटतात ते सांगतो.

दाट अनंत असा अंधार आहे, काळोख आहे. अगणित माणसे त्यात कैद आहेत. ठराविक वेळी त्यांच्यावर अन्नवर्षाव होतो, वासाने ते खातात नि झोपी जातात.काही माणसे कुठेतरी काहीतरी हाताला लागेल म्हणून धडपडताहेत, ठेचकाळताहेत तरी शोधताहेत. ह्या अंधाराला अंत असलाच पाहिजे असा त्यांचा कयास, तो शोधणे, म्हणजे संशोधन.
काही माणसे ह्या धडपड्यांना मूर्ख म्हणत स्वस्थ बसली आहेत, "हा अंधार एका दिव्य शक्तीने केला असून ह्यास अंत नाही हे त्याने आमच्या कानात सांगितले" असा त्यांचा दावा.
स्वस्थ बसलेली माणसे = आस्तिक,
धडपडणारे = नास्तिक
आस्तिक खरे बोलताहेत की खोटे हे मोजायची कुठलीही फूटपट्टी उपलब्ध नाही.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माणसाच्या बुद्धीलाही अज्ञात

माणसाच्या बुद्धीलाही अज्ञात अशा काही गोष्टी असतात " अशी घिसीपीटी लाइन सांगत धार्मिक, अध्यात्मिक लोकं तत्वज्ञान सुरु करतात.
ह्या वाक्यातली खुबी अशी की हे वाक्य दिसते तर बरोबर. पण वाक्याचा अंडरटोन भलतच काहीतरी सूचित करतो.
माणसाच्या बुद्धीला अज्ञात आहेत. ह्याचा सरळ अर्थ "त्या गोष्टी अज्ञात आहेत." असा होतो/व्हावा.
पण म्हणणारा प्रत्यक्षात त्याचा अर्थ "मानवी बुद्धीस अज्ञात असले तरी आमच्या बाबा महाराज्/अमुक शास्त्र्/तमुक सिद्धीस मात्र ते ज्ञात आहे!"

जय हो.

स्वामी अग्निवेश यांनी - नास्तिकांना उद्देशून - Swami Agnivesh cautioned Dawkins and team to guard against arrogance that comes from ego, as not everything that exists can be quantified or measured. (http://timesofindia.indiatimes.com/articleshow/11683629.cms? )

त्यामागची भावना अशीच होती असे मला वाटले ... की तुम्हाला ते मेझर्/क्वांटिफाय करता येत नाही पण मला येते.

Who is really arrogant in this case ?

---

खुलासा - गब्बर निरिश्वरवादी/नास्तिक नाही.

प्रात्यक्षिक!

तुम्ही स्वतः भिंत चालवू शकता का ?

होऽऽऽ... आत्ता चालवून दाखवू काय?

नाही म्हणजे, पूर्वी एकदा चालवलेली आहे. आता कितपत आठवेल नि जमेल, माहीत नाही. पण प्रयत्न करून पाहतो.

पूर्वी शाळेत असताना संस्कृताच्या तासाला राम नि माला चालवली होती, आता मराठीतून भिंत चालवायची. आहे काय नि नाही काय?

तर ही घ्या. (जय वाळंबेसर!)

भिंत / भिंती (प्रथमा).
भिंतीस, भिंतीला, भिंतीते / भिंतींस, भिंतींला, भिंतींना, भिंतींते (द्वितीया).
भिंतीने, भिंते, भिंतीशी / भिंतींनी, भिंतींही, भिंतीं, भिंतींशी (तृतीया).
भिंतीस, भिंतीला, भिंतीते / भिंतींस, भिंतींला, भिंतींना, भिंतींते (चतुर्थी).
भिंतीऊन, भिंतीहून / भिंतींऊन, भिंतींहून (पंचमी).
भिंतीचा, भिंतीची, भिंतीचे / भिंतींचे, भिंतींच्या, भिंतींची (षष्ठी).
भिंतीत, भिंती, भिंत्या / भिंतींत, भिंतीं, भिंत्यां (सप्तमी).
(अग) भिंती / (अग) भिंतींनो (संबोधन).

काय, जमले का? की ड्रायविंग लेसन परत घ्यायला हवेत?

--------------------------------------------------------------------------------------------------------

हे रूप व्यवहारात वापरले गेलेले आम्हीं व्यक्तिशः ऐकलेले नाही. कदाचित पुरातनकालीन असावे. केवळ वाळंबेसरांच्या पुण्यस्मृतीचा आदर ठेवून येथे नोंदविलेले आहे.

, ही रूपेदेखील आम्ही व्यक्तिशः ऐकलेली नाहीत; किंबहुना, ती 'भिंती'स लागू होत असण्याबाबत आम्ही साशंक आहोत.२अ मात्र, इतर कोणत्या नामास वा सर्वनामास ती आजही लागू असणे अशक्य नाही. अर्थात, वाळंबेसरांच्या पुण्यस्मृतीचा आदर, इ.इ.

२अ प्रत्यक्ष व्यवहारात भिंतीस चुना, झालेच तर रंगाचा एखाददुसरा हात, याव्यतिरिक्त इतर काहीही लागू होत असल्याचे निदान आम्ही तरी ऐकलेले नाही. परंतु कवींप्रमाणे व्याकरणकारांसदेखील जेथे सूर्याचे तेज पोहोचत नाही अशा ठिकाणीं डोकावण्याचे लायसन असते. असो.

प्रियकर चालवला!

'न' वी बाजू,
हल्लीच केतकी माटेगावकरचे नवे गाणे बघताना तुमच्या या प्रतिसादाची आठवण आली होती.
https://m.youtube.com/watch?v=HCzdV94RBbU

तुम्ही भिंत चालवलीत तशी या गाण्यात पेठेबाईंच्या तोंडून केतकीने प्रियकर चा(ळ)वलाय.
तो ही संस्कृतात.

काश आम्हाला असे छान छान शब्द चालवायला शिकवले असते आठवीत.
आम्हाला आपले देव, माला, भानु शिकवायचे मेले!

वावावा

अजून विभक्त्या येतात. शामा आहात का?
पंचमीचा अनेकवचनी प्रत्यय 'पासून' राहिला.
उन हून / उन हून पासून.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

...

अजून विभक्त्या येतात. शामा आहात का?

नाय बॉ. पण शाळेच्या दिवसांत डोक्यात ठोकून ठोकून बसवलेली अडगळ (बरीचशी नष्ट झालेली असली, तरी - कालाय तस्मै नमः आणि थ्यांक गॉड!) उरलीसुरली अधूनमधून बाहेर सांडते, त्याला काय करणार?

पंचमीचा अनेकवचनी प्रत्यय 'पासून' राहिला.
उन हून / उन हून पासून.

तत्त्वतः मान्य. पण आमच्या पाठ्यपुस्तकात तो (का कोण जाणे, पण) नव्हता, असे अंधुकसे स्मरते. असो चालायचेच.

असेल बा.

अडगळ आमची पण बरीच जमा आहे.
संबोधन एकवचनी प्रत्यय नाही, अनेकवचनी नो असं पाठ केल्याचं आठवतंय.
रच्याकने: आमच्या गुर्जींचं नाव दगा काळू पाटील असे होते. (स्माईल)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ग्रहण, वेल्डिंग इ.

फोटो काढताना फिल्मवर कॅमेर्‍याच्या भिंगाने समोरच्या वस्तूची खूप छोटी प्रतिमा उमटते, तशीच प्रतिमा जेव्हा आपण सूर्य अथवा वेल्डींगचा जाळ बघतो, तेव्हा डोळ्याच्या रेटिना(अतीशय नाजुक पडदा, ज्यात असंख्य फोटोसेन्सिटिव्ह सेन्सर पेशी असतात.)वर उमटते.

भिंग घेऊन कागद जाळण्याचा उद्योग लहानपणी केला असेलच.

वेल्डींग, अथवा डायरेक्ट सूर्य अशा प्रचंड प्रखर प्रकाशस्त्रोतांमुळे तो कागद जसा जळतो, एक्झॅक्टली तसाच रेटिनाचा सर्वात सेन्सिटिव्ह भाग, ज्याला मॅक्युला म्हणतात, तो "जळतो." (हे वर्णन समजायला/पटायला सोपे असल्याने कॉमनली सांगितले जाते. टेक्निकली बोलायचे तर कागद जळण्यासारखे नसून, शिजल्या सारखे म्हणता येईल. (डोळा मारत) अ‍ॅक्चुअल डॅमेज हे फोटोकेमिकल इंज्यूरी, व सेंट्रल सिरस रेटिनोपथी या सदरात मोडते.)

वेल्डिंगमुळे डोळे सुजतात तो प्रकार म्हणजे वेल्डिंग 'लागणे'. हा फोटो-कन्जन्क्टिवायटिस असतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे डोळ्याच्या पांढर्‍या भागावरील श्लेष्मल त्वचेला झालेली इजा.

ग्रहण काळात, अंधार झाल्यावर बाहुली मोठी होते. व डोळ्यात शिरणारी घातक किरणे/रेडिएशन्स, जास्त प्रमाणात आत जातात. खग्रास ग्रहणात पूर्ण ग्रासानंतर जेव्हा चंद्रबिंब सरकते, त्यानंतरच्या निमिषार्धात, बाहुली लहान होण्याच्या आत, प्रचण्ड मोठ्या प्रमाणात ही किरणे डोळ्याच्या आत रेटिनापर्यंत जाऊ शकतात.

तात्पर्य: वेल्डिंग, ग्रहण, कोवळे / निबर / जून सूर्यबिंब नुसत्या डोळ्यांनी अजिबात पाहू नये. (हा फुकट वैद्यकिय सल्ला दिला असे)

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आभार

उपयुक्त माहिती . आभार.
कोवळ्या सूर्याकडे , खरंतर कोवळ्याहून थोडं जास्तीच उजाडल्यावरही पहायची इथे काही योग प्रकार करणार्‍यांत फ्याशन ऐकली आहे.
चर्चेमध्ये बॅट्याने "त्राटक " म्हटले आहे, बहुतेक तेच करतात सूर्याकडे सकाळी अगदि नऊ वाजतासुद्धा एकटक पाहत बसतात काही मंडळी.
सातेक वाजताचय सूर्याच्या मानाने नऊ वाजताचा सूर्य भलताच बराच उजाडलेला असतो भारतात.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आभार

अनेक आभार.

कोवळे / निबर / जून सूर्यबिंब

पहाटेचे का? तेही पाहू नये?

नागव्या डोळ्यांनी

कोणतेच पाहू नये.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यवाद

ही नविनच (अजब) माहिती आहे, आजपर्यंत अनेकवेळा पाहिले आहे आणि लहान मुलांनाही दाखवले आहे, हे टाळायला हवे. पण डोळ्यांचा विषय निघाला आहे तर एक अजुन फुकटचा सल्ला विचारतो - टिव्ही(कितीही वेळ) पाहिल्याने(योग्य अंतरावरून) डोळे खराब होत नाहीत असे वाचले आहे ते खरे आहे काय?

हा प्रश्न मला अनेकदा पडला

हा प्रश्न मला अनेकदा पडला आहे.

पूर्वी टीव्हीपासून अमूक अंतर वगैरे सोडून बसायला सांगत. नंतर सीआरटी मॉनिटर वाले पीसी आले तेव्हा लोक त्याच्या समोर फुटावर बसून त्याच्याकडे टक लावून पाहू लागले. त्यातसुद्धा सुरुवातीस ठीक आहे की वर्ड्स्टार सारखी सॉफ्टवेअर होती तेव्हा पडदा फारसा प्रकाशमान नसे. पण विंडोज आल्यापासून तर पांढरा ब्राइट पडदा + सीआरटी मॉनिटर + फूटभर अंतर असा मामला असे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

टीव्ही पहाणे इ.

१. डोळे उघडले की ते पहाण्याचे काम करतात. मग समोर भिंत असो की टीव्ही. 'पहाणे' सुरूच असते.
२. टीव्ही (सीआरटी मॉनिटरवाले देखिल) मधून कोणतीही घातक किरणे बाहेर निघत नाहीत. कॅथोड रे ट्यूबमधून इलेक्ट्रॉन्स येतात पण ते स्क्रीनसमोर स्टॅटिक जाणवते, तितके अंतर पुढे आल्यानंतर अक्षरश: खाली पडतात. (Its not ionizing radiation, not even a dangerous radiation beyond a few inches from the screen.)
३. थेटरात स्क्रीनच्या खूप जवळ बसल्यास बायनॉक्युलर व्हिजनला अडचण येते, हा अनुभव आपल्याला आहेच. नजरेच्या एका आवाक्यात दिसणारे चित्र, अन त्याचे अ‍ॅनालिसिस करण्याची मेंदूची क्षमता, फिक्सेशन-रिफिक्सेशन रिफ्लेक्स इ. यांत अडचणी उद्भवतात. त्यामुळे किमान 'कोवळी नजर' असणार्‍या लहान मुलांनी (प्रीस्कूल एज, ६ वर्षांपेक्षा लहान मुले, या वयापर्यंत नजर 'पिकते' परिपक्व होते.) ३-४ फुटापेक्षा (नजरेच्या एका आवाक्यात दिसेल यापेक्षा जास्त मोठे दिसेल असे हलते चित्र दिसेल असे अंतर, नॉर्मल २१ इन्ची सीआरटी टीव्हीसाठी) जास्त जवळून टीव्ही पहाणे चांगले नाही. तरीही, यामुळे लपलेला तिरळेपणा (Latent squint) उघड होण्यापलिकडे फार काही अडचण उद्भवू नये. थोड्या व्यायामाने यात फरक पडावा.

(*डोळ्याचे व्यायाम, जे डॉक्टर्स सांगतात व बायनॉक्युलर व्हिजनसाठी काही व्यायाम देणारी यंत्रे देखिल आहेत, तरीही, हे सगळे व्यायाम दोन डोळे नामक क्यामेरे एकाच वेळी एकत्र एकाच दिशेला फिरतील याच्याशी -म्हणजेच तिरळेपणाशी- संबंधीत आहेत. 'नजरेच्या' व्यायामाबद्दल अधिक पुढे काही.)

शिवाय, टीव्हीचा वापर बेबिसिटींगसाठी करणे हा आपला मूर्खपणा, कालांतराने मुलांच्या हट्टात अन नंतर त्यांना समजू लागल्यावर अनेक मानसिक निरगाठींत बदलतो, हे लक्षात घेता, केबलचे बिल भरणारे आपण आहोत, हे लक्षात ठेवून, 'हा फार टीव्ही पहातो' ही तक्रार किमान माझ्यासारख्या डॉक्टरकडे करू नये (स्माईल) . रागे भरल्या जाईल.
४. टीव्ही मुळे चष्म्याचा नंबर कधीच येत नाही. नंबर आहे हे लक्षात येते इतकेच. पण, वर दिलेल्या कारणास्तव टीव्ही कमी पहाणे उत्तम हेच खरे.
*
५. योग व डोळ्याचे "व्यायाम"

हा एक कठीण प्रकार आहे.

डोळा या अवयवात सेन्सरी अन मोटर असे दोन प्रकार आहेत. मोटर ऑर्गन्सचे व्यायाम द्यावे लागतात, पण सूर्य बघण्याने वा तूप पिण्याने डोळ्यास तेज येते, गरागरा डोळे फिरवल्याने चष्मा जातो इ. भ्रामक समजूती आहेत.

आपल्या शरीरात २ प्रकारचे अवयव आहेत.
१. सेन्सरी : पंचेंद्रिये उर्फ पञ्च ज्ञानेंद्रिये. नाक, कान, डोळा, त्वचा व जीभ.
२. मोटर : हात, पाय, फुफ्फुसे, हृदय, इ. (यांतली काही व्हॉलंटरी अर्थात आपल्या सजग नियंत्रणाखालची, फुफ्फुसासारखी अर्धवट नियंत्रणातली अन हृदयासारखी मेंदूकडून आपोआप चालणारी मोटर, पण तिचं बटण आपल्या सजग नियंत्रणाखाली नसते.)

पैकी, 'व्यायाम' करून सर्व 'मोटर' सिस्टीम्स बूस्ट करता येतात. अगदी हृदयही. सेन्सरी नाही. अन हृदय 'स्ट्राँग' बनले, तरी हवे तेव्हा बंद चालू करता येत नाही. अ‍ॅथलेटिक हृदयाचे ठोके कमी पडतात. अती अ‍ॅथलेटिक असलेत तरी ५० पेक्षा खाली मी पाहिले नाहियेत. हे अजून कमी अन तेही मनोव्यवहारे करण्याचे दावे म्हणजे त्राटक.

मला कान हलवता येतात. खरेच येतात. पण कान हलवायचा व्यायाम करून माझी ऐकण्याची शक्ती वाढेल का? किंवा मी जीभ वेगवेगळ्या कोनांतून हलवायचा व्यायाम सांगू लागलो तर माझी चव घेण्याची क्षमता अधिक तीव्र होईल काय? किंवा रोज निखारा चाटणे व बर्फ चाटणे असा उद्योग मी करून पाहिला तर जिभेच्या चव घेण्याच्या क्षमतेत काय फरक पडेल? दुसरे काही नाही तर ड्यामेजच होइल.

हाच प्रकार त्राटक नामक योगप्रकारात आहे. उदा. अनिमिष नेत्रांनी 'कोवळे' सूर्यबिंब न्याहाळणे. कशाला यार? ताजा कोवळा निखारा चाटून पहाणार का? बर्फ चाटल्यावर जनरल आयडिया येईल. ड्राय आईस देऊ?

मोटर ऑर्गन्सना अती व्यायाम दिल्याने त्यांची क्षमता वाढते हे दिसल्यावर, इन्व्हॉलंटरी मसल्स व सेन्सरी ऑर्गन्सवर केलेले अघोरी प्रयोग = त्राटक.

अन याला डिस्क्लेमर = अती सिद्ध साधूंनाच हे जमते. सगळ्यांनी करू नये. असे दिले जाते, व्हिच इन माय ओपिनियन इज प्योर बीएस.

माझा सल्ला : अती सिद्ध साधू हे फिक्षन अस्ते. रामदेवबाबांचा एक डोळा बंद होत नाही. तो बंद होईल त्यादिवशी त्राटकाबद्दल पुढे बोलू.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आवडला

प्रतिसाद आवडलाच....

पण एक शंका.....
>>२. टीव्ही (सीआरटी मॉनिटरवाले देखिल) मधून कोणतीही घातक किरणे बाहेर निघत नाहीत. कॅथोड रे ट्यूबमधून इलेक्ट्रॉन्स येतात पण ते स्क्रीनसमोर स्टॅटिक जाणवते, तितके अंतर पुढे आल्यानंतर अक्षरश: खाली पडतात. (Its not ionizing radiation, not even a dangerous radiation beyond a few inches from the screen.)

व्हेन फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आर सडनली स्टॉप्ड, एक्स रेज आर एमिटेड असे वाचले असल्याने शंका येते. आणि विकीवर हे मिळाले.

Ionizing radiation

CRTs can emit a small amount of X-ray radiation as a result of the electron beam's bombardment of the shadow mask/aperture grille and phosphors. The amount of radiation escaping the front of the monitor is widely considered unharmful. The Food and Drug Administration regulations in 21 C.F.R. 1020.10 are used to strictly limit, for instance, television receivers to 0.5 milliroentgens per hour (mR/h) (0.13 µC/(kg·h) or 36 pA/kg) at a distance of 5 cm (2 in) from any external surface; since 2007, most CRTs have emissions that fall well below this limit.[47]

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ते विकीवरील उत्तर वाचलेत, तरी

ते विकीवरील उत्तर वाचलेत, तरी शेवटच्या वाक्यात तेच आहे.
एक्सरे मधे एलेक्ट्राँन्सच असलेत, तरी ते फारा वर्षांपूर्वीच्या EGA वा तत्पूर्व मॉनिटर्सशी निगडीत होते.
माझी कॉमेंट आजच्या टिव्हीबद्दल होती.

एफडीएच्या साईटवर हे दिसेल :
How Safe Are TV Sets Today?

X-radiation emissions from properly operated TV sets and computer monitors containing CRTs are well controlled and do not present a public health hazard. The FDA standard, and today’s technology, such as electronic hold-down safety circuits and regulated power supplies, have effectively eliminated the risk of x-radiation from these products. FDA has not found TVs that violate the standard under normal (home) use conditions.

It is important to note also that flat panel TVs incorporating Liquid Crystal Displays (LCD) or Plasma displays are not capable of emitting x-radiation. As such these products and are not subject to the FDA standard and do not pose a public health hazard.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मस्त प्रतिसाद. ५. योग व

मस्त प्रतिसाद.

५. योग व डोळ्याचे "व्यायाम"

योग्यांची मस्त घेतली आहे. आवडले.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

धन्यवाद. रोचक माहिती.

धन्यवाद. रोचक माहिती.

माहितीपूर्ण प्रतिसाद! गरागरा

माहितीपूर्ण प्रतिसाद!

गरागरा डोळे फिरवल्याने चष्मा जातो

हे अनेक लोकांकडून ऐकले आहे. डोळे मिचकावणे खूप, ज्यायोगे डोळा कोरडा पडत नाही, असाही सल्ला एका डोळ्याच्या डागदरनी दिला आहे

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ते मिचकवणे काँप्युटर व्हिजन सिंड्रोमसाठी.

सवडीने लिहीन त्यावर.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सिरियल किलर्स/सायकोपाथ्स

विकीवर सिरियल किलर्स/सायकोपाथ्स यांची यादी चाळली असता त्यातली बहुतांश नावे ही अमेरिका अ युरोप येथील आहेत. भारतातील फार तुरळक आहेत (आता हे नोंदणीच्या अभावाने की खरेच हे प्रकार फारसे नाहीत त्यामुळे, हे माहित नाही - पण माझ्या ऐकण्यात रामन राघव, नोइडा मधले एक हत्याकांड, जोशी- अभ्यंकर हत्याकांड, अंजना गावित इतकेच आहेत).

त्यात सुद्धा जर प्रत्येक सिरियल किलर्स/सायकोपाथ्स ची पार्श्व्भूमी तपासली तर त्यातील बरेचजण हे आई-वडील आर्थिक वा अन्य दॄष्ट्या सबल नसल्याने फॉस्टर होम्स किंवा आजी-आजोबां जवळ वाढलेले होते.

मग माझ्या विचार आला की एक "व्यवस्थित कुटुंब" न मिळणे हे जर अशा प्रकारांना चालना देत असेल का आणि तेच भारतात असे प्रकार कमी असण्याचे कारण असेल का?

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मुळात भारतात काही कुटुंबे

मुळात भारतात काही कुटुंबे एकत्र आहे परदेशातील कुटुंबांपेक्षा ती अधिक वा कमी व्यवस्थित आहेत हे एक मोठे (व धाडसी) गृहितक झाले! (स्माईल)

दुसरे अव्यवस्थित/तुटलेल्या/पालकविरहीत पाल्यांपैकी किती अपत्ये अश्या मार्गाला लागतात असा विदा असेल तर याबाद्दल काही निष्कर्ष काढता यावा. नाहितर मग, "पकडलेले अनेक दहशतवादी मुसलमान असतात तेव्हा मुसलमान असणे हे दहशतवादाचे मुळ आहे" अश्यासारखे घाईने काढलेली चुकीची निष्कर्षात्मक विधाने ऐकु येतात

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकीचं माहिती नाही पण

बाकीचं माहिती नाही पण भारतातल्या गोष्टी विकीवर अंडर/अनरिपोर्टेड असतात हे पाहिले आहे- अन त्यामागे भारतीयांची अनास्था हेच आणि इतकेच कारण आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मेमरी ऑफ द वर्ल्ड

http://www.unesco.org/new/en/communication-and-information/flagship-proj...

स्थानिक घटनांमुळे वारश्याला इजा पोहोचते म्हणून युनेस्को काही ग्रंथ, इ डि़जिटाइज करून जपते असे दिसतेय. या संकेतस्थळावर एक तर फारच कमी भारतीय लिस्टिंग्ज आहेत आणि ऋग्वेद वजा जाता दुसरं काही मी कधी ऐकलं नाही. इतर अनेक गोष्टींच्या मानाने इथल्या बर्‍याच गोष्टींचे महत्त्व कमी असावे. असल्या शिफारशी करणारांचा अभ्यासच प्रश्नार्ह आहे कि सिफारशींमागे राजकारण, इ असावे?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

हम्म... सहमत.

हम्म...

सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सूर्यग्रहणाच्या वेळी, बसचालक

सूर्यग्रहणाच्या वेळी, बसचालक काय करतात. तो विशिष्ट चश्मा वापरतात का?

यू मिन ग्रहणातला सूर्य

यू मिन ग्रहणातला सूर्य डोळ्यावर येत असेल तर? कारण सूर्याकडे बघायच असेल तरच चष्मा लागतो ना? नाहीतर नाही. काही मिनीट सेकंदाचाच प्रश्न असतो. गाडी बाजूला थांबवू शकतात.

Amazing Amy

ग्लेअर सकाळी/दउपारी केव्हातरी

ग्लेअर सकाळी/दउपारी केव्हातरी येतच असणार की. अन माहीत नसेल ग्रहण आहे तेव्हा???? Sad

प्रश्न कळला नाही. मी सकाळी

प्रश्न कळला नाही.

मी सकाळी ठाण्याहून (किंवा कोठूनही) पूर्वेकडे जाऊ लागलो की माझ्या डोळ्यावर सूर्याचे ऊन- ग्लेअर येतेच. त्यावेळी मी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आहे की नाही याने फरक पडत नाही.

पक्षी सूर्याकडे केव्हाही (ग्रहण असताना किंवा नसताना) पहायचे झाल्यास काळा चष्मा घालावाच लागतो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

शंका (अवांतर)

त्यावेळी मी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आहे की नाही याने फरक पडत नाही.

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी घुसली, की जे ग्रहण घडते, त्यास चंद्रग्रहण म्हणायचे, बरोबर? (बोले तो, सावली चंद्रावर.)

मग सूर्य आणि मी यांच्यामध्ये जर चंद्र कडमडला (बोले तो, सावली माझ्यावर), तर मग त्यास सूर्यग्रहण काय म्हणून म्हणायचे? मीग्रहण का नाही?

किती उशीराने शंकलात!

२०१४ च्या थत्तेचाचांच्या प्रतिसादावर किती उशीरा शंकलात!
(डोळा मारत)

'मी' हा कुणाचे ग्रहं हा ठरविणारा असल्याने 'मी' ग्रहण लागत नाही.
ग्रहण 'मी' ला चंद्र /सूर्य यांचा पूर्ण्/तुकडा भाग दिसणं (दिसणं अपेक्षित असण्याच्या वेळी) बंद झालं की होतं.

पृथ्वी जर ग्रहण कोणाचं ठरवायला लागली आणि तुम्ही पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कडमडलात तर 'न' वे ग्रहण लागेलही कदाचित!

होते असे कधीकधी!

२०१४ च्या थत्तेचाचांच्या प्रतिसादावर किती उशीरा शंकलात!

होते असे कधीकधी.

काय झाले, आम्हीदेखील पूर्वी कधीतरी ज्ञानेश्वरांप्रमाणे भिंत चालविली होती, हे आज (उगाचच) आठवले (होते असेही कधीकधी.), त्याच्या शोधात या धाग्यावर पोहोचलो (गरजूंनी प्रस्तुत धागा स्वतः चाळून पाहावा.), तर हा प्रतिसाद दिसला, नि शंकलो झाले.

तुम्ही पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये कडमडलात तर 'न' वे ग्रहण लागेलही कदाचित!

त्याला आमच्यात 'सावली' म्हणतात.

अच्छा, बोले तो आम्ही ज्याला आमची 'सावली' म्हणतो, त्याला पृथ्वी आम्ही'ग्रहण' म्हणते होय? चुकलो. पृथ्वी त्याला बहुधा 'सूर्यग्रहण' म्हणत असावी.

मग असले ग्रहण तर आम्ही रोजच पाडतो की! त्यात काय विशेष?

- (सूर्यग्रहण पाडण्याची आणि त्याचबरोबर भिंतही चालविण्याची ताकद असलेला योगेश्वर-कृष्ण-प्लस-ज्ञानेश्वर-इन-वन कडमड्या सिद्धपुरुष ) 'न'वी बाजू.

----------
आम्ही पुरुष आहोत हे सिद्ध करण्याची आवश्यकता नसावी बहुधा. (बोले तो, ते सामान्यज्ञान असावे.) चूभूद्याघ्या.

उंब्र-ज

"दया! छाया घे निवारुनिया" ह्या गीताचा अर्थ आज उमगल्यासारखा वाटला (डोळा मारत)

अवांतर -
ग्रहण, penumbra इ. वरून आठवलं:
प्रोटो-इंडो-युरोपियन andhoमधून अंध (संस्कृत) आणि umbr-(लॅटिन) आले आहेत; आणि त्यातूनच अंध, अंधार हे आपल्याकडचे शब्द तर penumbra, umbrella, adumbrate (रेखाटन), sombrero (शब्दशः - सावली देणारी हॅट) इ. इंग्लिश/स्पॅनिश शब्द.

लॅटिनोद्भव भाषांत, एक पाऊल पुढे जाऊन लाक्षणिक अर्थाने मनावर पडलेली छाया म्हणूनही umbrage (चिडणे, दुखावले जाणे), somber (sub = under + umbra = छाया) असे शब्द आलेत. अर्थात, आपल्याकडेही मनावर मळभ येणे इत्यादी वाक्प्रचार आहेतच, पण उष्ण कटिबंधाच्या देशात 'देई कृपेची छाया'च अधिक प्रचलित.

शिंपल!

ज्यांच्यावर सावली पडते त्यांना ग्रहण लागतं. येवडं शिंपल बी समजंना तुमाला! दर रात्री तुम्हाला ग्रहण लागतं, दर रात्री तुमच्यावर पृथ्वीची सावली पडते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सावली

दर रात्री तुमच्यावर पृथ्वीची सावली पडते.

दर रात्री बायकोचीही सावली पडते, म्हणजे ते पण ग्रहणच म्हणायचं का ?

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

ग्रहण

दर रात्री बायकोचीही सावली पडते, म्हणजे ते पण ग्रहणच म्हणायचं का ?

रात्री लाईट बंद केल्यावर सावली पडणार नाही. (डोळा मारत)

स्वयमपि!

स्वयमपि लिखति स्वयमपि खोडति!
(डोळा मारत)

आपल्या आपण 'सावली' लिहून आमचा ज्ञानप्रकाश पाडण्याआधी ग्रहण म्हंजेच सावली हे लक्षात येऊन खोडलेत ते एक बरे केलेत.
भिंत चालवलेली तेव्हाच वाचलेली आहे. पण त्याबद्दल काका तुम्हाला 'मास्तर' आहात का असे म्हणाले होते ते ही लक्षात आहे.

बाकी माझ्या मते तुम्ही पुरुष नाहीतच..... महापुरुष आहात!

(उगाच जुनापुराणा 'डायलॉक' मारून टाकला!)

(अवांतर!!!)

(उगाच जुनापुराणा 'डायलॉक' मारून टाकला!)

हिंदीतल्या 'मार डाला'चा उद्गम आज कळला! असो.

(अतिअवांतर: ती शीर्षकातली अधिकची उद्गारचिन्हे ही केवळ 'तुम ने एक मारा, तो हम तीन मारेंगे!'-तत्त्वावर आहेत; अधिक काही नाही.)

मेले

(लोळून हसत) (लोळून हसत) मेले

ग्रहण नसताना सूर्याकडे पहायचे

ग्रहण नसताना सूर्याकडे पहायचे झाल्यास काळा चष्मा कशाला? आजवर कैकदा नङ्ग्या डॉळ्यांनी सूर्याकडे पाहिले आहे अन कै झाले नै- अर्थात त्राटक इ. करण्याइतपत कंटिन्युअस नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आजवर कैकदा नङ्ग्या डॉळ्यांनी

आजवर कैकदा नङ्ग्या डॉळ्यांनी सूर्याकडे पाहिले आहे अन कै झाले नै

किती वेळ पाहिले आहेस?
बराच (>४-५ सेकंद सलग) पाहिले असशील तर मग काळजी घे - चेक करून घे. तसे झाल्यावर कोठलेसे सेल्स मरू लागतात - लगेच मरत/संपत नाहीत
माझ्या आईच्या एका डोळ्यातील ते सेल्स असेच कमी होते गेले आहेत व साधारण ५०शी नंतर त्या डोळ्याने अंधूक आणि आता फक्त पांढरे पुंजके / मोठ्या वस्तुंच्या ढोबळ आकृत्या इतकेच दिसते. त्याचा ताण आता दुसर्‍या निरोगी डोळ्यावरही हळूहळू येऊ लागला आहे.

डॉक्टरांच्या मते हा लहानपणी सूर्याकडे ग्रहणाच्यावेळी वा अदरवाईज पाहिल्याचा परिणाम असु शकतो (नक्की नाही पण असु शकतो)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!