सध्या काय वाचताय? - भाग ९

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
***************

1Q84 ही हारुकी मुराकामीची लांबलचक कादंबरी वाचली. पात्रांच्या दैनंदिन जीवनातल्या बारीकसारीक चर्यांची झेनवर्णने, धार्मिक पंथांचा उदय, दुसर्‍या महायुद्धापासून अंतरलेला ८०च्या दशकातला युवावर्ग, परंपरेशी फारकत न घेऊ शकलेला आधुनिक समाज यांचे तपशीलवार चित्र मुराकामी या कादंबरीतुन उभे करतो. मुराकामीच्या इतर कादंबर्‍यांप्रमाणेच पाश्चात्य लेखन, जाझ संगीत यांच्यात गुरफटलेली, जीवनाचा शोध घेऊ पाहणारी पात्रे या कादंबरीत आहेत. फसलेली कामप्रसंगांची वर्णने, पुनरोक्तिमूळे प्रसंगी अतिशय रटाळ पण तरीही गुंतवून ठेवणारी ही कादंबरी आवडलीच असे सांगता येत नाही पण पूर्ण वाचाविशी वाटली.

field_vote: 
0
No votes yet

मीही गेल्याच आठवड्यात वाचली. मत साधारण असेच. काबुकी नृत्यासारखी - संथ, फारसं काहीच न 'घडणारं' कथानक, अपेक्षित वर्ण्यविषय तरीही पूर्ण वाचून काढावी अशी.

(मुराकामीची इतर पुस्तकं वाचली नसतील आणि हेच जर प्रथम हाती पडलं तर मात्र कदाचित वाचकाचं मत प्रतिकूल होऊ शकतं, असं वाटतं. त्यापेक्षा 'काफ्का ऑन द शोअर' किंवा कथासंग्रह हे अधिक चांगली सुरुवात ठरतील.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतरचा मुराकामी आधीच्या मुराकामीइतका परिणामकारक नाही असं म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>> नंतरचा मुराकामी आधीच्या मुराकामीइतका परिणामकारक नाही असं म्हणता येईल का?
--- माझ्या मते, असं म्हणता येईल. मुराकामीच्या आधीच्या कादंबर्‍यांतले बहुतेक सर्व अपेक्षित घटक 1Q84 मध्ये मौजूद आहेत, कादंबरी वाचनीयही आहे - पण ते 'इट्ट' मात्र नाही. (Colorless Tsukuru Tazaki and His Years of Pilgrimage ही कादंबरी इंग्लिशमध्ये येऊ घातली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या मुराकामीच्या आगामी कादंबरीतील काही भाग येथे वाचता येईल.

"At the point when you agree to take on death, you gain an extraordinary capacity. A special power, you could call it. Perceiving the colors that people emit is merely one function of that power, but at the root of it all is an ability to expand your consciousness. You’re able to push open what Aldous Huxley calls ‘the doors of perception.’ Your perception becomes pure and unadulterated. Everything around you becomes clear, like the fog lifting. You have an omniscient view of the world and see things you’ve never seen before."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सचिनदेव बर्मन ह्यांवर लिहिलेले २ लेख वाचले -
१. सचिनदांची जादुई गाणी..
२. चॉंद फिर निकला

२रा लेख खूपच सुंदर आहे! एक तर जवळपास सगळीच गाणी माशाल्लाह! आणि लेखिकेने छान वर्णन केलंय काही काही ठिकाणी.
उदा. अपनी तो हर आह एक तूफान है वर लेखिका म्हणते -
"रफीच्या आवाजातली 'अंजान है'वरची ती लोकोत्तर हरकत.. अशा जागांचं नोटेशन वगरे काढण्याचा प्रयत्नही करू नये. उगीच गुलाबाच्या पाकळ्या उपटून पुन्हा मोजून लावण्यासारखं वाटतं." क्या बात है!
ह्या निमित्ताने सचिनदांची बरीच गाणी पुन्हा अइकली.

प्स- नविन काळेंच्या "song of the day" पुस्तकाची आठवण झाली. त्यातही त्यांनी केलेली गाण्यांची विष्लेशणं सुरेखच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुराकामिला सुरवात करा विंड अप बर्ड क्रोनिकल पासून नंतर वाचा नॉर्वेजिअन वूड्स नंतर बाकी काहीपण वाचा काफ्का ओं शोअर वैगेरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

सलमान रश्दीने मार्केसच्या 'मॅजिक रिअ‍ॅलिझम'वर लिहिलेला लेखः

मार्केसमुळे झाकोळून गेलेले इतर लॅटिन अमेरिकन लेखक, मॅजिकल रिअ‍ॅलिझमचा वास्तवात असलेला भक्कम पाया आणि भारतीय उपखंडातील व्यक्तीला मार्केसच्या लेखनात पदोपदी जाणवणार्‍या परिचित खुणा (I knew García Márquez’s colonels and generals, or at least their Indian and Pakistani counterparts; his bishops were my mullahs; his market streets were my bazaars. His world was mine, translated into Spanish.) हे मुद्दे या लेखात येऊन जातात.

उदा. -

The trouble with the term “magic realism,” el realismo mágico, is that when people say or hear it they are really hearing or saying only half of it, “magic,” without paying attention to the other half, “realism.” But if magic realism were just magic, it wouldn’t matter. It would be mere whimsy — writing in which, because anything can happen, nothing has effect. It’s because the magic in magic realism has deep roots in the real, because it grows out of the real and illuminates it in beautiful and unexpected ways, that it works. Consider this famous passage from “One Hundred Years of Solitude”:

“As soon as José Arcadio closed the bedroom door the sound of a pistol shot echoed through the house. A trickle of blood came out under the door, crossed the living room, went out into the street, continued on in a straight line across the uneven terraces, went down steps and climbed over curbs, passed along the Street of the Turks, turned a corner to the right and another to the left, made a right angle at the Buendía house, went in under the closed door, crossed through the parlor, hugging the walls so as not to stain the rugs . . . and came out in the kitchen, where Úrsula was getting ready to crack 36 eggs to make bread.

“ ‘Holy Mother of God!’ Úrsula shouted.”

Something utterly fantastic is happening here. A dead man’s blood acquires a purpose, almost a life of its own, and moves methodically through the streets of Macondo until it comes to rest at his mother’s feet. The blood’s behavior is “impossible,” yet the passage reads as truthful, the journey of the blood like the journey of the news of his death from the room where he shot himself to his mother’s kitchen, and its arrival at the feet of the matriarch Úrsula Iguarán reads as high tragedy: A mother learns that her son is dead. José Arcadio’s lifeblood can and must go on living until it can bring Úrsula the sad news. The real, by the addition of the magical, actually gains in dramatic and emotional force. It becomes more real, not less.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून मजा आली. रश्दीने स्वतःवर मार्केजच्या प्रचंड प्रभावाचा उल्लेख केला नाही (आणि त्या मार्गे स्वत:च्या कादंबर्‍यांचा उल्लेख करणेही टाळले) हे पाहून आश्चर्य वाटले. पण वाचताना प्रथम सलीम सिनाई, आणि जिब्रील फरिश्तांच्या गोष्टींचा अर्थ लागल्यावर जो आनंद झाला होता तो क्षण आठवला. त्यांच्यात ही अशीच अस्सल जादू आहे! रश्दी एकेकाळचा माझा अगदी आवडता लेखक. का नंतर शालिमार-बिलिमार लिहीत बसला कोण जाणे.

अवांतरः रश्दीचं एकादवेळी ठीक आहे, पण मार्केज गेल्यावर सर्रास सगळे त्याला "गाबो" काय म्हणायला लागले! जो तो फेसबुकवर "गुडबाय गाबो" करत होता. जणू काही मार्केज यांचा लंगोटिया यार. मंडेला गेल्यावरच त्याला माझी सगळी मित्र मंडळी माझ्या नकळत त्याला मडिबा म्हणून ओळखत होते हे मला कळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रश्दीचं एकादवेळी ठीक आहे, पण मार्केज गेल्यावर सर्रास सगळे त्याला "गाबो" काय म्हणायला लागले! जो तो फेसबुकवर "गुडबाय गाबो" करत होता. जणू काही मार्केज यांचा लंगोटिया यार. मंडेला गेल्यावरच त्याला माझी सगळी मित्र मंडळी माझ्या नकळत त्याला मडिबा म्हणून ओळखत होते हे मला कळलं.

त्यात काय, पुलंनाही सगळे भाईकाका म्हणूनच ओळखतात की. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नोबेल/भारतरत्न वगैरे पुरस्कार काय किंवा ऑनररी डॉक्टरेट/सिटिझनशिप काय, हा त्या पुरस्कारविजेत्या व्यक्तीचा गौरव नसून, त्या व्यक्तीस तो पुरस्कार (/डिग्री/सिटिझनशिप) देण्यामार्गे त्या व्यक्तीशी आपला संबंध जोडून तीती संस्था (अथवा विद्यापीठ अथवा देश) आपला स्वतःचा गौरव करून घेत असते, असे कधीतरी कोठेतरी ऐकले होते ब्वॉ...

(बाकी, आमच्या टिपिकल मराठी माणसाची धाव बोले तो... असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, उपमा ही उपमेपुरतीच घ्या. मार्क्वेझ साहेब लै मोठे असतील, पण तत्त्वतः दोन्ही उदा. मध्ये काही फरक नाही इतकेच काय ते सांगावयाचे होते.

(टिपिकल मराठी माणसाची धाव ही पुलंपुरतीच आहे खरी, पण अटकेपारचे झेंडे सस्टेन झाले असते तर आज पुलं किंवा अजून कोणी हे तितकेच फेमसही झाले असते. मार्क्वेझ साहेब स्वतः लेखक म्हणून जितका मोठा आहे तितकीच त्याच्या लेखनभाषेची सामाजिको-राजकीय पुण्याईदेखील मोठी आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, उपमा ही उपमेपुरतीच घ्या. मार्क्वेझ साहेब लै मोठे असतील...

तुलना मार्क्वेझ आणि पु.लं.च्यात नाही. (मी मार्क्वेझ वाचलेला नाही. तुलना काय करणार कपाळ?)

टिपिकल मराठी माणसाची धाव ही पुलंपुरतीच आहे खरी, पण...

कहने का मतलब इतनाइच है, की मराठी माणूस ('भाईकाका' वगैरे म्हणून चारचौघांत लगट दाखवून स्वतःला मोठे दाखवायला - स्वतःचीच लाल करून घ्यायला म्हणू या का?) नेहमी फक्त पु.लं.नाच (झालेच तर फार फार तर भीमसेन'अण्णां'ना किंवा अगदीच गंगेत घोडे न्हायले तर 'बाबूजीं'ना) का पकडतो? मराठी माणसांत हे तिघे सोडले तर या कामाकरिता वेठीस धरण्यासारखे कोणी दिग्गज झालेच नाहीत काय? (इंटरन्याशनल रेकग्निशन मरो - इंटरन्याशनल रेकग्निशनची गोष्टच चाललेली नाहीये इथे. मराठी माणसापुरते बोला.)

थोडक्यात, प्रश्न पु.लं.च्या क्षितिजाच्या मर्यादेचा नसून, मराठी माणसाच्या झेपेच्या मर्यादेचा आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------

बोले तो, ती नोबेल कमिटी कशी आइनस्टाइनला पुरस्कार घोषित करून आपलीच लाल करून घेते, अगदी तस्सा. 'आपला हा आइनस्टाइन... आमचा पुरस्कारविजेता, बरे का! काय समजलेत?'

या यादीत कदाचित सुरेश भटांचेही नाव टाकता आले असते, परंतु तो गोट तुलनेने बहुधा बराच लहान असावा.

झाले बहु असणार, पण कम टु थिंक ऑफ इट, आत्ता या क्षणाला मलासुद्धा एकही आठवत नाहीये. कारण शेवटी आम्ही(सुद्धा)... मराठीच! त्याला काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, इथे बाकी सहमत. हे "पुलापलीकडे पुणे नाही अन पुण्यापलीकडे महाराष्ट्र नाही" चेच लॉजिकल एक्स्टेन्शनच असावे बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुदैवाने रश्दींचे अलिकडचे काही (जाणीवपूर्वक) वाचले नाहीय त्यामुळे 'अगदी आवडता लेखक' ह्या वर्गीकरणात ते अजूनही बसतात. मिखाईल बुलगाकाव्हचे 'मास्टर अँड मार्गारिटा' वाचल्यावरही अशीच भारलेली अवस्था आली होती ते आठवले. ते पुस्तक वाचल्यावर मला रश्दींवर त्याचा प्रभाव असावा असे उगीचच वाटून गेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तोतया ट्विटर खाते गेले काही दिवस रश्दी च्या नावाने-शैलीने बरीच मार्मिक टिप्पणी करत होते!
"Jhumpa's new book is about a middle class Bengali family that migrates to a college town near Boston, she tells me. Didn't see that coming.." Smile

"American Historical Association proposes no-alcohol 2015 annual convention in solidarity with Palestine. Zero signatories."

"Incognito, mingling with the commoners, Rahul wonders why so many are complaining about Hugo Boss. He loves the 2014 Spring line."

"All-party political conference just called. Setting aside differences, they want to figure out who exactly Shiv Visvanathan is supporting."

"At the Tagore seminar, Khulbhushan Kharbanda talks about 'apna Rabindar." Amit Chaudhuri looking very annoyed.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुदैवाने रश्दींचे अलिकडचे काही (जाणीवपूर्वक) वाचले नाहीय त्यामुळे 'अगदी आवडता लेखक' ह्या वर्गीकरणात ते अजूनही बसतात.

सुदैवाने रश्दींचे अलीकडचे काही (जाणीवपूर्वक) वाचले नाहीये, त्यामुळे 'अतिशय भिकार लेखक' या वर्गीकरणात ते अजूनही बसतात.

यापूर्वी रश्दींची दोनच पुस्तके वाचलेली आहेत. (खरे तर एक दशमलव शून्य शून्य कितीतरी, पण त्याबद्दल थोडे नंतर.) पैकी, 'शेम' वाचून फक्त 'उर्दूत अत्यंत हसीन आणि बेहेतरीन शिव्या आहेत' एवढाच अर्थबोध झाला. पुढे अमेरिकेत प्रथमच आलेलो होतो आणि नवानवा होतो, तेव्हा एकदा पुस्तकांच्या दुकानात 'सॅटनिक व्हर्सेस' दिसले. त्यावेळी भारतात त्या पुस्तकावरून दंगली होऊन त्यावर बंदी येण्याचा प्रकार अगदी नवीन नसला, तरी ती आठवण अतिशय ताजी होती, त्यामुळे 'बघू या तरी या पुस्तकात आपल्या देशाने बंदी घालण्यासारखे असे होते तरी काय?' या कुतूहलाने दहा डॉलर टाकून ते विकत घेतले.

खिशांत फारसे पैसे नसण्याच्या त्या उमेदीच्या काळातले माझे ते सर्वात वाया गेलेले दहा डॉलर असावेत. पुस्तक जेमतेम अर्ध्या प्रकरणाच्या वर वाचवले नाही. म्हणजे, लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्यासारखे त्या पुस्तकात नेमके काय होते, ते मला आजतागायत कळलेले नाहीये, पण अव्वल दर्जाचे ट्र्याश लिहिण्याकरिता या मनुष्यास उलटा टांगून मिरच्यांची धुरी देण्याची इच्छा कोणास जर झाली असती, तर त्याचे मला फारसे आश्चर्य वाटले नसते.

हा मनुष्य नेमक्या कशाच्या अमलाखाली लिहितो, यावर संशोधन झाल्यास ते रोचक ठरावे.

असो चालायचेच.

-----------------------------------------------------------------------------------

या हिंदी शब्दाचे उचित मराठीकरण काय व्हावे? 'डेसिमल पॉइंट' अशा अर्थी. (उर्दूत 'अशारिया' की असेच काहीतरी; चूभूद्याघ्या.)

'तुझी नातवंडे त्वा भिकार्‍याच्या थडग्यावर मुतोत' वगैरे वगैरे.

कारण पुस्तक तितके पुढपर्यंत वाचलेले नाही. तितके पुढपर्यंत जाण्याकरिता या माणसाला - अँड आय एम्प्लॉय द्याट टर्म एक्स्ट्रीमली लूज़ली - टॉलरेट करण्याचा अतोनात पेशन्स आवश्यक आहे. ('कारण शेवटी आम्ही...', इ.इ. - पु.ल.!)

अमिताभ काय, रेखा काय, 'जिब्रीलसलादीन फरिश्ताचमचा' काय, बकरीच्या लेंड्या काय, नि काय नि काय.

त्या काळात आमच्या 'अभिव्यक्तिस्वातंत्र्या'बद्दलच्या जाणिवा आजच्याइतक्या प्रगल्भ झालेल्या नव्हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक पूर्णांक इतके दशांश, तितके शतांश, जितके सहस्रांश, इ.इ. चालून जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अडचण ही आहे, की 'दशमलवा'नंतर किती जागांपर्यंत जायचे आहे, हे निश्चित नसले, तर ही पद्धत वापरता येत नाही.

'वन पॉइंट समथिंग' (जेथे 'समथिंग' हे 'समथिंग'च आहे, निश्चित नाही) हे मराठीत कसे म्हणाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, खरे आहे. विचार करून पाहतो एखादा शब्द पाडता आला तर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

100 years of solitude वाचताना सुरुवातीलाच काहीसा गोंधळ उडालेला. नक्की हा माणूस म्हणतोय काय, ते कळेना. मग म्हटलं गडी रंगात येऊन सांगतोय, त्याचं म्हणणं ऐकूया तरी!
मग José Arcadio Buendía साहेबांनी आणि त्यांच्या बाईसाहेब Úrsula Iguarán - अगदी गुंगवून टाकलं!
@मॅजिकल रिअ‍ॅलिटी- फारसं समजलं नाही कारण लॅटिन अमेरिकेचा इतिहास वगैरे काहीच माहिती नव्हता. त्यामुळे मॅजिकवाला भाग चांगलाच अपील झाला. रिअ‍ॅलिटीशी सांगड घालता आली नाही, तरी संपूर्ण कादंबरी भलतीच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न्यू यॉर्क टाईम्स'चा वृत्तपत्रापुढील आव्हाने आणि संधी यांचा वेध घेणारा इनोव्हेशन रिपोर्ट गेल्या आठवड्यात 'लीक' झाला. तो मुळातूनच वाचावा असा आहे.

'युजर जनरेटेड कन्टेन्ट'ला अधिक महत्त्व देण्यापासून ('मुक्तपीठ' हे टोकाचं उदाहरण झालं) ते Gawker सारख्या 'डिजिटल पिकपॉकेटर्स'ना मूळ बातमीचे वाचक पळवण्यापासून रोखण्याचे प्रयत्न योजण्यापर्यंत जे उपाय सुचवलेले आहेत; ते काही वर्षांनी भारतीय भाषांतील वृत्तपत्रांसाठीही मननीय ठरावेत.

अवांतर - श्रामोंचा 'खिळे' हा जुना लेख आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ‍ॅमेझॉनने लाडात येऊन एक फुकट किंडल बुक देऊ केलं म्हणून The Adventures of Inspector Lestrade हे M.J. Trow चं फॅनफिक/नॉन कॅनॉनिकल प्रकारातलं पुस्तक निवडलं. कथासूत्र थोडंसं कैच्याकै असलं, तरी एकंदर प्रकार आवडला.

ऐड्या अशी आहे, की लेस्ट्रेडच खरा हुश्शार माणूस असतो. होम्स हा स्वतःला भारी समजणारा कोकेन अ‍ॅडीक्ट असतो, तर कॉनन डॉईल आणि डॉ वॉटसन मित्र असतात. जॅक द रिपरची एक पूर्वकथा देखील आहे. ऑस्कर वाईल्ड, टेनिसन, लेडी कार्डिगन (चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड वाल्या कार्डिगनची बायको) वगैरे गेष्ट अपियरन्स देऊन जातात.

लगेच प्रेरित होऊन लेस्ट्रेड मालिकेतलं पुढचं पुस्तक घेतलं. यावेळी विकत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हिमाल साउदेशियन वाचतो आहे.
ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना "आसाम" संबंधी बरीच माहिती या लेखांत मिळेल:
आसामातील जमिनीचा तुटवडा
आसामचे 'डी'-वोटर्स
---
या व्यतिरिक्त अफगाणीस्तानमधील सद्य रोचक घडामोडींवर विविध दृष्टीकोनातून लिहिलेल्या लेखांचे एक अतिशय उत्तम संकलन "रिक्लेमिंग अफगाणिस्तान" या चालु अंकात समाविष्ट आहे, जे जालावरही उपलब्ध केले आहे. ते इथे वाचता येईल.

पैकी युद्धाचा जनमानसावर किती प्रकारे परिणाम होतो हे सांगणे कठीण असले तरी रशिया अफगाणिस्तानमध्ये असताना/गेल्यावर तेथील रग्ज्स- रजयांवर - युद्धांची चित्रे विनलेली होती, त्यावरील हा लेख अतिशय रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंग

यांतल्या काही ओळी तरी इथे नक्की उद्धृत होतील यात शंका नाही. डावी-दांभिक-पॉलिटिकली करेक्ट हे तिन्ही शब्द एका वाक्यात आल्यावर त्यावर लोकांच्या उड्या नाही पडल्या तर नवल! पण गंमत अलाहिदा - ज्ञानदाचा लेख म्हणून अपेक्षेनं उघडला खरा, पण फारच त्रोटक आणि आशावादी वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवाजवी आशावादी तरी नै वाटला. बह्वंशी तरी पेषिमिष्टच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आशावादी / निराशावादी हे निराळं, पण लेख घाऊक वाटला. सिनारिओ बिल्डिंग, ट्रेंड मॅपिंग वगैरे शब्द पहिल्याच परिच्छेदात वापरल्यावर जरा अपेक्षा उंचावल्या होत्या. पण नेहेमीचं राजकारणी, प्रकाशक, फेसबुक बॅशिंग वगैरे सापडलं.

"पुनलेखनाच्या शिस्तीचा अभाव" वगैरे निरीक्षणं मात्र नेमकी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फास्ट फूड नेशन नावाचे एक पुस्तक वाचायला काही दिवसांपूर्वी सुरुवात केली आहे. मॅकडोनल्ड्स व तत्सम फास्ट फूड दुकानांचा अमेरिकन जीवनातील प्रसार व गेल्या पाच दशकांमध्ये या कंपन्यांनी विस्तारासाठी वापरलेल्या विविध भीतीदायक योजना वाचत आहे. विशेषतः अॅडल्ट मार्केट पुरेसे सॅच्युरेटेड झाल्याने लहान मुलांना लक्ष्य करुन जाहिरातबाजी, शाळांमधील जेवणे-खेळ प्रायोजित करणे, अगदी एक-दोन वर्षांच्या मुलांनाही सोडा पाजण्यापर्यंतच्या 'अभिनव' कल्पना थक्क करणाऱ्या आहेत.

निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व या कंपन्यांचे साटेलोटे वेगवेगळ्या उदाहरणांमधून चांगलेच कळून येते.

साधे उदा. सरकारने अनुदान कमी केल्याने अनेक शाळांना मुलांवरील खर्च कमी करावा लागला. स्कूल ट्याक्स वाढवण्यास नागरिकांनी नकार दिल्याने काही शाळांनी मॅकडोनल्ड्स - कोकाकोला व तत्सम कंपन्यांची अनुदाने स्वीकारण्यास सुरुवात केली. या कंपन्यांना या माध्यमातून मार्केटिंगची नवी संधी तर उपलब्ध झालीच शिवाय चॅरिटी/शैक्षणिक कार्य या लेबलाखाली करामध्ये सूटही मिळाली.

लठ्ठपणामध्ये व त्या अनुषंगाने येणाऱ्या व्याधींमध्ये अमेरिका १ नं. आहेच मात्र भारतही फारसा मागे राहिलेला नाही.

अवांतरः
काही दिवसांपूर्वी 'फूड इनकॉर्पोरेटेड' नावाची एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्या डॉक्युमेंट्रीचा निर्माता Eric Schlosser यानेच हे पुस्तक लिहिले आहे. डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर - डीवीडी प्लेअरवर - पाहिली होती, मात्र साधारण आठवडाभरातच या पुस्तकाचे रेकमेंडेशन किंडलवर आले. हा योगायोग असावा असे समजून सोडून दिले. मात्र नेटफ्लिक्सच्या कुकीजचा अॅक्सेस अॅमेझॉनला असेल तर हा प्रकार प्रचंड भीतीदायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजवर पाहिला नसल्यास -- thank you for smoking हा चित्रपटही पहावा असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साप्ताहिक "लोकप्रभा" मध्ये ऐसी अक्षरे वरील "सध्या काय वाचताय?" या धाग्याची घेतली गेलेली दखल

दुवा : http://issuu.com/lokprabha/docs/13_june_2014_full_issue_for_website

पान क्रमांक ४७

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार सागर!
दोन दुव्यांची दखल घेतलेली दिसतेय. वरील दुवा उघडत नसल्यास या पानाच्या चौकडीत घेतलेली दखल - दिलेले ऐसीवरील चर्चांचे दुवे - वाचता येतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेमक्या दुव्याबद्दल धन्यवाद ऋ.
जालीय चर्चांना मिडिया गंभीरपणे घेते आहे ही महत्त्वाची बाब आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गरीब प्रश्न आहे.

जग एवढं पुढे गेलं, मुद्रणकला/तंत्र देखील. पण अजूनही छापील पुस्तकांमध्ये बोल्ड, आयटॅलिक्स, अंडरलाईन इ गोष्टींचा वापर टाळण्याकडे कल का असतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दृष्यकला आकलनाबद्दल काही. त्यातलेच दोन कार्टून्स -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे आवडते पल्प लेखक, पुस्तक कोणती? चेस, चँडलर, हअॅमेट, म्याक्केन सोडून इतरांबद्दल सांगितल्यास मंडळ आभारी राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मते स्टीग लार्सन किंवा हेन्निंग मँकेल पल्प लेखक आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेन्निंग मँकेल वाचला नाही अजून. वाचते. आभार :-).

स्टीग लार्सनला पल्प लेखक समजावे का असा विचार आधी केला नव्हता. मला तो पल्प लेखक वाटत नाही. पण तुमच्या प्रश्नाने कंफ्यूज झाले की पल्प आणि थ्रिलरमधे फरक काय? फरक आहे हे नक्की, पण पॉईंटाऊट करता येत नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> पण तुमच्या प्रश्नाने कंफ्यूज झाले की पल्प आणि थ्रिलरमधे फरक काय? फरक आहे हे नक्की, पण पॉईंटाऊट करता येत नाहीय. <<

थोडा उलट दिशेनं विचार करून पाहा - म्हणजे शँडलर, हॅमेट किंवा चेसमध्ये पल्पची सगळी लक्षणं असूनही शिवाय आणखी काही आहे - म्हणजे सामाजिक टिप्पणी, गुंतागुंतीच्या ग्रे व्यक्तिरेखा किंवा ग्रे नैतिक तिढे. मग स्टीग लार्सनमध्ये हे तर आहेच आणि शिवाय पल्पसारखा मसालाही. मग तो पल्प का नाही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो हा विचार केलेला मी; पण उत्तर मिळाल नाही :-/. बहुतेक मी पल्पला ग्रेट डिप्रेशनच्या काळाशी रिलेट करतेय किंवा वर्गवादी विचार करतेय म्हणजे स्टीगने व्हाईट कॉलरबद्दल लिहीलय म्हणून तो पल्प नाही किंवा मी पल्पमधे थ्रिलरपेक्षा जास्त ब्लडी आणि अनपेक्षीत अॅक्शन असते हे गृहीत धरलय. सध्यातरी पल्प हा थ्रिलरचा सबसेट वाटतोय.

अजून थोडा विचार केला आणि 'स्टिग आधुनिक काळातला पल्प लेखक आहे' हे पटलं Smile आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्ल स्टॅन्ली गार्डनर
इयन रानकिन
फेलूदा पुस्तके
विश पुरी पुस्तके (तार्किन हॉल)

कारमोरन स्ट्राईक मालिकेतलं रोलिंगबैंचं दुसरं पुस्तक "द सिल्कवर्म" कालच प्रकाशित झालं. फ्लिपकार्टात बर्‍यापैकी स्वस्त आहे/होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे वा कारमॉरन आला का परत. ककूज् कॉलिंग आवडलेल मला. बाकीच्या नावांसाठीपण आभार :-). पण तू रहस्यकथालेखक सांगतोयस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पल्प रहस्यकथा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्‍या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अ‍ॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अ‍ॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे.

आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्‍याच गंमतीजमती आहेत.

-----------------------------------------------------------------

परवाच ऑर्डर केलेले 'द मायसीनिअन वर्ल्ड' घरी आले. वट्ट १९३ पानी पुस्तक, पण प्रचंड खच्चून भरलेले आहे. लिनिअर बी लिपीचा इतका सखोल अ‍ॅनॅलिसिस केलेला आहे की छाती दडपून जाते. डिसायफर करून थांबले नाहीत, तर पूर्ण समाजजीवनाचा यशस्वी धांडोळा घेतलेला आहे. एज्युकेटेड गेस मारण्याच्या कौशल्याची कमाल मर्यादा या पुस्तकात दिसून येते. जॉन चॅडविकच्या प्रज्ञेचे खरेच कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. ग्रामनामांच्या अपूर्ण, अस्पष्ट आणि तुटक यादीवरून अख्ख्या राज्याचा नकाशा बनवणे, अर्धवट नोंदींवरून तत्कालीन लोकसंख्येची एस्टिमेट्स देणे, इ.इ. प्रचंड रोचक प्रकार आहेत. तत्कालीन समाजजीवन, शेती व अन्य उद्योग, लोकसंख्या, शस्त्रास्त्रे, तत्कालीन भूगोल, स्थापत्यशास्त्र, आणि या विकसित संस्कृतीचा अंत इ. सर्व पैलू अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळलेले आहेत. लेखकाच्या प्रज्ञेबरोबरच हेही मान्य केले पाहिजे की प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रचंड पुरावे सापडलेले आहेत. असे इतके नेमके पुरावे भारतात सापडू लागले तर इथल्या संशोधकांना आनंदाने हार्ट अ‍ॅटॅकच येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आइन रँडची पुस्तके वाचून झपाटून जायचे दिवस वाचनवेड्यांच्या आयुष्यात येतात , त्याप्रमाणे माझ्यावरही 'वुई द लिव्हिंग' ची किरा आर्गुनोव्हा , लिओ यांचे जबरदस्त गारुड झाले होते .अजूनही ही माझी अत्यंत आवडती कादंबरी आहे . फ़ाउण्टनहेड , एटलास श्रग्ड आणि अँथेम वाचून अगदी भारावून गेले होते . या प्रखर बुद्धिमान , विश्वविख्यात लेखिकेचा एकेकाळचा बौद्धिक वारस व मानसोपचार तज्ञ नाथानिएल ब्रँडन याने 'माय डेज विथ आइन रँड 'असे पुस्तक लिहिले आहे . आनंद ठाकूर यांनी मराठीत त्याचा अनुवाद 'आइन रँड चे वादळी प्रेमप्रकरण ' असा केला आहे . नवल म्हणजे ४२३ पानांचे हे अनुवादित पुस्तक मेहेतांच्या फॅक्टरीतले नसून कोमल प्रकाशन ,नालासोपारा यांचे आहे . Mine प्रमाणे Ayn चा उच्चार आइन असा आहे अशी ज्ञानात भर पडली . आइनपेक्षा तब्बल २५ वर्षांनी लहान असलेल्या नाथानिएल ब्रँडनचे आइनमुळे झपाटून जाणे , तिच्या ऑब्जेक्टिव्हिझमचा जगभर प्रसार करण्याला वाहून घेणे आणि तिच्याशिवाय दुसरे जगच नसणे हे थक्क करणारे आहे . नंतर त्याचे या गुंतागुंतीच्या बौद्धिक , मानसिक आणि शारीरक संबंधातून भ्रमनिरास होऊन कष्टाने बाहेर येणे आणि आइनशी कायमचे शत्रुत्व ओढवून घेणे मती गुंग करणारे आहे . सम्यक बुद्धीचा वापर करून सेल्फ एस्टीम मिळवत त्याने स्वतःचे निराळे वैचारिक जग निर्माण केले हा त्याचा लखलखीत मानसिक विजय आहे . भानामती झाल्यागत मी दोन दिवसात हे पुस्तक वाचून काढले आणि काल नेटवर त्वरित ,आइनच्या ब्रँडन या देखण्या , बुद्धिमान प्रभावशाली , नायकाचा शोध घेतला . यु ट्यूब वर याचे व्हिडीओ पाहिले आणि गुगलच्या या विस्मयचकित करणाऱ्या वरदानामुळे धन्य झाले . आइनच्या मुलाखती आधी पाहिल्या होत्या पण असे मोहून टाकणारे पुस्तक वाचून त्याच्या नायकाला बोलताना प्रत्यक्ष पाहण्याने आनंद द्विगुणीत झाला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठोकळे वाचायचे पेशन्स, उत्साह संपलाय असे वाटत असतानाच, या प्रतिसादाने पुन्हा तशा इच्छेचे अंकुर फुलताहेत हे ही नसे थोडके!
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बार्बरा ब्रँडनचे (नथानियलची तेंव्हाची पत्नी) 'पॅशन ऑफ अ‍ॅन रँड' वाचल्यास नथानियलचे थोडेसे ऑब्जेक्टिव्ह मूल्यमापन करता येईल, त्या पुस्तकावर सिनेमाही निघाला आहे. एकूणच भारतात (मराठी) अजूनही आईन रँडच नव्हे पण तिच्या डिसायपल्सने लिहिलेल्या पुस्तकांचा खप चांगलाच होतोय असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेटा अँड रिअॅलिटी हे विल्यम केंट यांचे पुस्तक वाचतोय. खरं तर इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकानेच हे एकदा तरी वाचायला हवं. अॅमेझॉनवर उत्कृष्ट परिचय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे.
डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली.
पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट.
पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले.
मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात.
पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अ‍ॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रोचक प्रकार आहे.

मागे एकदा चित्तमपल्लीसोबत पक्षीनिरिक्षणाचा योग मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आला होता. (तेही बोरीवलीच्या नॅशनल पार्कात - आता झाली त्यालाही पंधरा-एक वर्षे). तेव्हाही त्यांनी अशाच काही गोष्टी सांगितल्या होते. आदीवासींना पिल्लु मिळाले की ते कसे वाढवतात वगैरे.

पुस्तक मिळवायला हवे. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दर वर्षी 'साहित्यभूषण परीक्षा' घेण्यात येते. ह्या वर्षीची परीक्षा नुकतीच झालेली असावी. परीक्षेची पद्धत म्हणजे उत्तरं २५ दिवसात घरीच लिहून पाठवायची. त्यामुळे परदेशस्थित लोकांनाही भाग घेता यावा. अभ्यासक्रम आणि त्यासाठी वाचायला लागणारी पुस्तकं हे वाचून परीक्षा रोचक वाटली. निव्वळ माहितीपर लिखाणापेक्षा अधिक सखोल उत्तरं अपेक्षित असावीत आणि मूल्यमापनही अधिक सखोल होत असावं असं त्यावरून वाटलं. इथल्या काहींना कदाचित त्यात रस असेल म्हणून दुवा देतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आसाराम लोमटे, रमेश इंगळे-उत्रादकर ही तुलनेने नवीन नावं पाहून बरं वाटलं. (समीक्षा/नॉन-फिक्शन यासाठींही एखादी अभ्यासपत्रिका हवी होती.) या उपक्रमाला संख्या आणि दर्जा, अशा दोन्ही बाबतींत कितपत प्रतिसाद मिळतो आणि मूल्यमापन कसं होतं, हे जाणून घेणं रोचक ठरावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> समीक्षा/नॉन-फिक्शन यासाठींही एखादी अभ्यासपत्रिका हवी होती. <<

'ललित गद्य'मध्ये नॉन-फिक्शन आहे. समीक्षा - समावेश केला तर त्यामुळे हौशी लोक कदाचित बुजतील अशी भीती वाटत असावी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Capital in the twenty-first century ही थॉमस पिकेटीची वीट वाचण्याचे सल्ले चोहीकडून मिळताहेत. गब्बरभाव, व्हाट डू यू थिंक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्या ७०० पानी पुस्तकाचे रिव्ह्युज जवळपास ५० अर्थशस्त्र्यांनी प्रकाशित केलेले आहेत. न्यु यॉर्क टाईम्स ने त्यास २१ व्या शतकाचे "दास कॅपिटल" असे संबोधले आहे. सगळे रिव्ह्युज वाचले तर पुस्तकात काय लिहिलेय याची उत्तम कल्पना येईल. ७०० पाने - छाती दडपून जाते यार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

७०० पाने - छाती दडपून जाते यार.

दररोज नाष्ट्याला चाळीसपन्नास लिंकामधील विदा खाणार्‍या गब्बरकडून असे वक्तव्य आलेले पाहून एक ऐसीकर म्हणून शरम वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खातात की केवळ फेकतात? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरसिंगाच्या व्यासंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ आहे हे लक्षात ठेवून ते खातात असेच म्हणतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

सध्या "The Corporation That Changed the World: How the East India Company Shaped the Modern Multinational" हे पात्तळ पुस्तक वाचत आहे. तेच्यानंतर बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१. नेहमीचे यशस्वी (मार्केस, मुराकामी):

एखादा नामवंत साहित्यिक दिवंगत झाल्यानंतर किंवा त्याला/तिला एखादा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर अचानक त्याच्या पुस्तकांची मागणी वाढते. स्नॉबिशपणा म्हणा हवं तर, पण एकंदर अशा तात्पुरत्या zeitgeist-y लाटेकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याचं आजवर धोरण होतं. मात्र स्थानिक लायब्ररीत अगदी दर्शनी भागात मार्केसची पुस्तकं मांडलेली पाहून, ते धोरण बासनात गुंडाळलं आणि 'Love in the Time of Cholera' व 'The Autumn of the Patriarch' घेऊन घरी आलो.

साठीकडे झुकलेल्या, नोबेल मिळाल्यानंतर आता यापुढची कारकीर्द उताराचीच की काय अशा शंकांनी किंचित ग्रस्त असणार्‍या मार्केसने आपल्या लेखणीची ताकद 'Love in the Time of Cholera' मध्ये पुन्हा जोखून पाहिली, असं म्हणतात. पण कादंबरीत त्याचा तो बुलंद, 'लार्जर दॅन लाईफ' आवाज जसा जाणवत राहतो; तसाच आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या नैतिक/अनैतिक/ननैतिक प्रेम-आकर्षण-शरीरसंबंध-दैनंदिन रुटीनमधल्या बारक्या-सारक्या बाबी यांचं वर्णन करताना समजूतदार, प्रगल्भ, काहीसा तटस्थही. 1Q84 ही मुराकामीची कादंबरी साधारण याच सुमारास वाचली होती. धागालेखकाने म्हटल्याप्रमाणे त्यातल्या शारीर गोष्टींच्या वर्णनांच्या पुनरुक्तीच्या पार्श्वभूमीवर '...Cholera' मधला हा बहुरंगी स्पेक्ट्रम अधिक उठून दिसतो. 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'ची भव्यता नसली आणि 'मॅजिकल रिअ‍ॅलिझम'ची दिव्यता अगदी तुरळक जागी डोकावत असली; तरी अगदी मार्केसपरंपरेत शोभावी अशी कादंबरी.

The Autumn of the Patriarch वाचणं म्हणजे थकवून टाकणारा मामला आहे. अडीचशे पानांच्या ह्या कादंबरीत जेमतेम साठ-सत्तर वाक्यं असावीत. एक वाक्य जे सुरू होतं, ते सर्वनामं - विरामचिन्हं - संवाद किंवा वक्ताबदल दर्शवणारे संकेत या कशाचीही तमा न बाळगता 'वाहत-येईल-पूर-अनावर' मोडमध्ये तुम्हांला बुडवून टाकतं. दक्षिण अमेरिकेतल्या अनेक हुकुमशहांच्या जीवनाचे आणि त्यांच्या कारकीर्दीचे संदर्भ ह्या अद्भुत, पॅनोरॅमिक वर्णनात जागोजागी येतात आणि प्रसंगी अस्वस्थ करून जातात. तुकड्या-तुकड्याने वाचण्याचे हे पुस्तकच नोहे. इतर व्यवधानं दूर ठेवून, अडखळत - पुन्हा वाक्याच्या सुरूवातीपासून वाचायला लागून - वाचनाची लय सापडतेय तोवर पुन्हा अनपेक्षित जागी थबकायला होऊनही वाचत रहावं असं.

२. युद्धविरोधी - सटायर इत्यादी:

* Slaughterhouse-Five वाचताना 'हे पुस्तक इतके दिवस का वाचलं नाही?' असं वेळोवेळी वाटत राहिलं. १९६९ साली, म्हणजे ऐन व्हिएतनाम युद्धाच्या धामधुमीत - आणि पर्यायाने अमेरिकन समाजात घडून येत असणार्‍या मंथनाच्या काळात हे पुस्तक प्रसिद्ध झालं. दुसर्‍या महायुद्धातल्या, ड्रेस्डेनच्या त्या अनावश्यक बॉम्बिंगपासून सुदैवाने बचावलेल्या वॉनेगटने त्याच पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या पुस्तकाला केवळ 'युद्धविरोधी' हे लेबल लावणं अन्याय्य ठरेल, पण 'Catch 22' meets 'The Hitchhiker's Guide to Galaxy' असं म्हटलं तर ते अधिक योग्य ठरावं. 'कॅच-२२' मधली गंमत एकदा कळली की काही वेळाने ती थोडी रिपिटेटिव्ह होते, पण या पुस्तकाबद्दल तसं होत नाही कारण विसंगती आणि वैय्यर्थासोबतच युद्धविरोधी कादंबर्‍यांच्या मर्यादांची असलेली self-referential जाणीव, टाईम-ट्रॅव्हलची धमाल, येशू ख्रिस्ताचा चलनी नाण्यासारखा उपयोग करणार्‍या कन्झर्व्हेटिव्ह विचारसरणीत 'गरीब लोकांच्या गरिबीला तेच कारणीभूत आहेत' ह्या ठाम मतातला विरोधाभास इ. निरनिराळ्या गोष्टी या पुस्तकात येऊन जातात.

* A Case of Exploding Mangoes हे २००९ साली प्रकाशित झालेलं, जनरल झियांच्या विमान अपघातात (विमान - 'पाक वन') झालेल्या रहस्यमय मृत्यूभवती गुंफलेलं पुस्तक. या अपघातानंतर नेहमीप्रमाणे कॉन्स्पिरसी थिअरीजना आलेला ऊत, भारतीय उपखंडातल्या इंग्लिशची ती विशिष्ट लकब, लष्करातली नोकरशाही आणि तत्कालीन समाज या सार्‍यांवरती irreverent म्हणता येईल असं भाष्य आहे. लष्कर, झिया आणि सरंजमशाही मनोवृत्ती यांची मनसोक्त रेवडी उडवणारा bisexual नायक असणारं हे पुस्तक पाकिस्तानातही लोकप्रिय आहे.

* Our Man in Havana हे ग्रॅहम ग्रीनचं पुस्तक तत्कालीन 'स्पाय थ्रिलर' पुस्तकांपेक्षा बरंच निराळं आहे. बायकोपासून विभक्त झालेला एक वत्सल पिता आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तरतूद म्हणून ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसला कसं बेमालूम (पण फसवणुकीचा वाईट हेतू नसताना) गंडवतो; असं याच ढोबळ कथानक आहे. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाचं क्युबात घडणारं कथानक आणि १९६२ साली क्युबन मिसाईल क्रायसिसच्या दरम्यान घडलेल्या घटना यांच्यातलं काही बाबतीतलं विलक्षण साम्य. (ग्रॅहम ग्रीनचंच १९५५ साली प्रसिद्ध झालेलं 'The Quiet American' मागे चिंजंच्या सुचवणीवरून वाचलं होतं. त्याच्या कथानकाचे पडसादही पुढच्या दशकातल्या व्हिएतनाम युद्धातल्या घडामोडींत दिसून येतात. येथे त्याचा काही भाग वाचता येईल.) दूरदृष्टीचा भाग बाजूला ठेवला तरी ग्रीनची खास ब्रिटिश पॅट्रिशियन शैली हे अजून एक वैशिष्ट्य.

* Coroner's Lunch - Colin Cotterill
व्हिएतनाम युद्धात ओढल्या गेलेल्या लाओसमध्ये १९७६ साली कम्युनिस्टांची सत्ता आली आहे. बहुतांश सुशिक्षित वर्गाने नदीपलीकडच्या थायलंडमध्ये आश्रय घेतला आहे. अशा वेळी वयाच्या सत्तरीतल्या, केवळ सोयीपुरत्या कम्युनिस्ट असणार्‍या विधुर, एकट्या डॉक्टरची संपूर्ण देशाच्या Coroner (शवविच्छेदनविभागप्रमुख?) पदी नेमणूक होते. हलाखीचं जगणं, कामाकरता अपुरी साधनं, टिपिकल कम्युनिस्ट 'लाल' फीत आणि अधूनमधून वेगळ्या मितीतून भेटीस येणारे अनाहूत पाहुणे यातून डॉ. सिरी त्याच्याकडे आलेल्या केसेसमधून 'मर्डर मिस्टरी'ची उकल करत जातो. मात्र अनेक वर्षं आग्नेय आशियात राहणार्‍या आणि पेशाने व्यंगचित्रकार(देखील) असणार्‍या लेखकाची नेमकी विसंगती टिपण्याची दृष्टी आणि बारकाव्यांनिशी उभं राहणारं लाओसचं चित्र ह्या बाबी रहस्यउकलीपेक्षाही अधिक रोचक.

३. इतर:

* Home (2012) - Toni Morrison
दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेतर्फे अनेक कृष्णवर्णीय सैनिक लढले. एका बाजूला फॅसिझम, वंशद्वेष याविरूद्ध लढण्याचा दावा करत असताना दुसरीकडे अमेरिकन समाजात मात्र उघड वर्णभेद होता. हा अंतर्विरोध जगासमोर येणं, ही बाब सिव्हिल राईट्स चळवळीला मिळालेल्या पाठिंब्यामागचा एक महत्त्वाचा घटक म्हणता येईल. अर्थात हे घडून यायलाही दीड-दोन दशकांचा काळ जावा लागला. 'होम' ही टोनी मॉरिसनची छोटेखानी कादंबरी नेमक्या याच काळात - म्हणजे पन्नाशीच्या दशकात - कोरियन युद्धावरून परतलेल्या एका कृष्णवर्णीय सैनिकाची कहाणी सांगते. वर्णभेदाच्या अनुभवांच्या जोडीला तोवर निदान न झालेली 'पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर' नायकाला असणे, ही आणखी एक मिती. पण इतका कच्चा माल असूनही पुस्तक थोडी निराशाच पदरी टाकतं. टोनी मॉरिसनच्या त्या खास वाचनीय शैलीत कुठे गुंततो न गुंततो, तोच जेमतेम दीडशे पानांत कादंबरी संपते.

* I Shall Not Be Moved: Poems (1990) - by Maya Angelou
एक स्त्री, एक कृष्णवर्णीय, एक कृष्णवर्णीय स्त्री आणि निव्वळ एक व्यक्ती - अशा भूमिकांतून येणार्‍या निरनिराळ्या अनुभवांचं संकलन या कवितासंग्रहात आहे. मुक्तछंदातल्या कवितांसोबतच काही पारंपरिक यमकबांधणीच्याही आहेत. फार ग्रेट नसला तरी वाचनीय संग्रह. पुस्तकाचं शीर्षक या कवितेतून.

* Double Down (2013) - Mark Halperin, John Heilemann
'युद्धस्य कथा रम्या' असं म्हणतात ते निवडणुकांनाही लागू पडावं. २०१२ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवरच हे पुस्तक रिपब्लिकन प्रायमरीज् - जो रिकेट ह्या उद्योगपतीची फसलेली महागडी, महत्त्वाकांक्षी ओबामाविरोधी मोहीम - रॉमनीचं अनेक मुद्द्यांवरचं फ्लिप-फ्लॉप आणि ४७ टक्क्यांची ती कुप्रसिद्ध कॉमेंट - बिल क्लिंटनचं शार्लट कन्व्हेन्शनमधलं दणदणीत भाषण - पहिल्या डिबेटमधली ओबामाची निरुत्साही कामगिरी - बॉस्टन बंदरात विजयानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्याचे रॉमनीचं मनोरथ इ. परिचित घटना अगदी ओघवत्या शैलीत, अधूनमधून पडद्याआडचे किस्से पेरत मांडल्या आहेत; पण त्याव्यतिरिक्त खास रेकमेंड करावं असं विशेष काही नाही.

* The Omnivore's Dilemma (2006) - Michael Pollan
'सध्या काय वाचताय?'च्या गेल्या भागातला हा प्रतिसाद वाचून हे पुस्तक हाती घेतलं. अमेरिकेतल्या खुल्या अर्थव्यवस्थेला न जुमानता उभे राहिलेले मक्याचे साम्राज्य, त्याच्या घसरत्या किंमती आणि वाढतं उत्पादन, परिणामी सामान्य जनतेच्या खाण्याच्या सवयींवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम इ. बाबी आणि 'ऑर्गॅनिक' ह्या लेबलची मर्यादा या गोष्टी मायकल पोलनचेच निवेदन असणार्‍या Food, Inc. व तत्सम काही डॉक्युमेंटरीजमुळे परिचित होत्या - पण आपल्या चार निरनिराळ्या जेवणातल्या पदार्थांचा स्रोतापर्यंत (किंवा शब्दशः मुळापर्यंत) जाऊन घेतलेला शोध आणि मांसाहारी व्यक्तीला पडू शकणारे काही नैतिक प्रश्न, हे भाग वाचायला हवेत असेच.

* This Is Not a Pipe - Michel Foucault

René Magritte ह्या चित्रकाराचं हे चित्र जेव्हा मी प्रथम पाहिलं, तेव्हा मॉडर्न आर्टवाल्यांचं हे नेहमीसारखं काहीतरी गिमिक आहे अशीच प्रतिक्रिया होती. "उद्या आमच्या बंटीने काढली एखादी विडीसारखी विडी आणि दिलं ठोकून त्याच्याखाली की 'ही-विडी-नाही'; तर लावणार का ते चित्र तुम्ही प्रदर्शनात? देणार का त्याचे कोटी कोटी रुपये?"- छापाचे आक्षेपही तेव्हा सकृद्दर्शनी सयुक्तिक वाटत.

अजूनही जॅक्सन पोलॉक किंवा पॉल क्लीची चित्रं 'समजतात' असं नव्हे; पण माझ्यापुरते मी काही आडाखे बांधले आहेत. एक म्हणजे, या चित्राची किंमत इतकी का? हा प्रश्न दूर ठेवणे. दुसरं म्हणजे समोरचं चित्र हे दर वेळी अंतिम साध्य असेलच असं नाही, पण काही एक विचार/विसंगती/भावना मांडण्याचं साधन (वा उत्प्रेरक) म्हणूनही ह्या माध्यमाचा वापर होऊ शकतो; हे ध्यानी ठेवणं. (अर्थात यानंतरही काहीच न समजण्याची शक्यता बाकी उरतेच. अशा वेळी 'तू न पहचाने तो ये है तेरी नजरों का कसूर' किंवा 'नेति नेति' म्हणून स्वतःची समजूत तरी काढावी किंवा 'हॅ:, ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे'ची पिंक तरी टाकावी!))

तर यातल्या दुसर्‍या ठोकताळ्यासाठी त्या चित्राच्या निर्मितीचा कालखंड, चित्रकलेतले तेव्हाचे प्रवाह आणि त्या चित्राचे इतरांनी लावलेले निरनिराळे अन्वयार्थ या गोष्टींची संदर्भचौकट अतिशय उपयोगी पडते. अर्थात, 'पुस्तक वाचलं - ते आवडलं/ मॅच पाहिली - फेडरर क्लासच/गझल ऐकली - क्या बात है, गुलाम अली!' अशी जी थेट, एफर्टलेस आस्वादाची सवय आपल्याला झालेली असते, त्याच्या हे विपरीतच.

त्यामुळे एखादी नवीन भाषा शिकताना जशी बिचकत्या उत्साहाने सुरूवात करावी तसं या संदर्भात काही वाचायला मिळतंय का म्हणून शोधत असताना फुकोचं हे पुस्तक सापडलं. जेमतेम पन्नास पानांचं. सौंदर्यशास्त्राच्या जार्गन्सखाली वाचकाला गुदमरवून टाकणं नाही की उगाच भारदस्तपणा आणण्यासाठी फाफटपसारा वा पुनरूक्ती नाही. संदर्भासाठी उल्लेख केलेल्या चित्रांच्या प्लेट्स छापलेल्या. Magritte, Klee, Kandinsky यांच्या चित्रांमागचे विचार (उदा. एखादी गोष्ट आणि तिचा निर्देश करणारा शब्द यांच्यातलं द्वैत), ठरवून मोडलेले संकेत आणि या सार्‍यांपलीकडे उरणार्‍या शक्यता इत्यादी गोष्टी अजिबात बोजड वाटणार नाही, अशा शैलीत स्पष्ट केलेल्या. (तरी मूळ फ्रेंचमधल्या कोट्या आणि काही संदर्भ इंग्रजीत तळटीपांशिवाय समजत नाहीत.) या क्षेत्रातले जाणकार अधिक पुस्तकं सुचवू शकतीलच, पण अगदी नवशिक्यांनाही धीर यावा असं हे पुस्तक आहे. तेव्हा ह्या क्षेत्रात रस असेल, तर जरूर वाचा असं सुचवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्लॉटरहाऊस आणि अवर मॅन इन हवानासाठी धन्यवाद!

नंदनशेटच्या आधीच एखादं पुस्तक वाचायचा मान आज या ठिकानी "एक्सप्लोडिंग मँ‍गोज" ने दिला. यासाठी आम्ही मो. हनीफ यांचे या माध्यमातून आभार मानतो. "बघतोस काय रागानं, पुस्तक आधीच वाचलंय वाघानं" हा स्टिकर बनवायला टाकला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बापरे! नुसती नावंच वाचुन माझ्या एका दिवसाच्या वाचनाचा कोटा संपतोय की काय वाटु लागले!

छ्या! या नंदनच्या व्यासंग (किती दिवस हा शब्द वापरायचा होता) पाहिला की आपल्याला वाचता येतं का असा प्रश्न पडतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाब्बौ, व्यासंग म्हणजे शिस्त - चिकाटी - अभ्यास आला. फारशी इतर व्यवधानं नसल्यामुळे, मनाला येईल ते पुस्तक हवं तेव्हा उचलून वाचण्याचा प्रकार त्यात कुठे मोडायचा? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदन साहेब, आमचा दंडवत स्वीकारावा __/\__ अगदी मनापासून आहे हा दंडवत!

वाचन ही आवड असते/छंद असतो हे सर्वपरिचित आहेच पण तुमचा वाचनाचा अवाका पाहिला की वाचन ही कला आणि कुवतीचा भाग आहे असेही म्हणावे लागेल (म्हणजे मी माझी स्वतःची तुमच्याशी तुलना केली तर ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनजी, इतकी पुस्तकं तर कोणीही वाचेल. आपला प्रतिसाद पाहता तुमचं इंटरनेट कनेक्शन फार रिलायेबल असणार. शिवाय तुमचा ब्रावजर देखिल फार स्टेबल असणार. मी त्या दोहोंचीच तारीफ करून रजा घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपला प्रतिसाद पाहता तुमचं इंटरनेट कनेक्शन फार रिलायेबल असणार. शिवाय तुमचा ब्रावजर देखिल फार स्टेबल असणार. मी त्या दोहोंचीच तारीफ करून रजा घेतो.

प्रतिसाद फारच लांबला याची कल्पना आहे. तसदीबद्दल दिलगीर आहे. यापुढे दक्षता घेईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापुढे दक्षता घेईन.

नंदन! यापुढे या कारणाने पुस्तकाची माहिती देण्याचे टाळलेस तर याद राख! Blum 3

ज्यांना नसेल वाचायचं ते स्क्रोल करू शकतात (जसे आम्ही इतर ठिकाणी काही लांबलचक प्रतिसादांना करतो Wink )

तुझे प्रतिसाद आम्हाला वाचायचे आहे.. याहून दीर्घ प्रतिसादही चालतील, असली दक्षता वगैरे काही नकोय घ्यायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१०००००००००००००००

साल्या, तू घेच दक्षता. मग बघतो आम्ही. च्यामारी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमची काय वाचले ते सांगायची शैली मला फार आवडते. तिचे योग्य ते कौतुक करायला योग्य ते शब्द सापडेपर्यंत मी फक्त इंटरनेट व ब्रावझरचे कौतुक करू इच्छित होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणराव काय घेऊन आलेत आज? काय रँडम प्रतिसाद देतायत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा प्रश्न 'छोटे मोठे प्रश्न सदरात' विचारायचा होता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. असो, ह्या धाग्यावरच्या या अवांतर वाङ्मयशोभेला इथेच पूर्णविराम देऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेम ऑफ थ्रोन्स हे 'अ साँग ऑफ आईस & फायर' या मालिकेतलं पहिलं पुस्तक वाचून झालं. मालिकेचे आतापर्यंत आलेले सारे सीझन्स पाहिलेयत त्यामुळे पुढे काय घडणार आहे हे आधीच माहिती असूनही पुस्तक कंटाळवाणं होत नाही. तपशील, बारकाव्यांनी पुस्तक इतकं भरलं आहे की मालिका पाहताना जे जाणवतं, त्याच्याहून अधिक काहीतरी आतापर्यंत हरवलं होतं असं वाटतं. सर्व व्यक्तीरेखा, त्यांचे भौगौलिक प्रदेश, कपडेपट, स्वभाव, राजघराणी आणि त्यांचे इतिहास... हे सगळं प्र-चं-ड आहे. कथाविषय - एका काल्पनिक ग्रहावरचं अथवा भूभागावरचं एक साम्राज्य, सात मोठ्या राज्यांनी बनलेलं. तिथल्या राजाचा मूळपुरूषही बाहेरून आला. मग त्यापूर्वीचे तिथले मूळ लोक, संघर्ष, काही ठिकाणी वर्षानुवर्षे चालणार्‍या हिवाळ्याचं प्रतिकूल वातावरण, राजांचे प्रताप, परिणामी त्याचा दुसर्‍या राजाने पाडाव करणं, एकमेकांशी राजकीय संबंध, त्यातून जुळवलेली लग्ने, अनैतिक संतती, आणि काही भुताखेतांच्या धर्तीसारख्या कल्पनातीत गोष्टी!! अधिक तपशीलाखेरीज दुसरं वैशिष्ट्य असं की काही व्यक्तीरेखा सोडता, जे पात्र खलनायकी असतं त्याची चांगली बाजू समोर येऊन ते पात्र हिरो होऊन बसतं.
'अ साँग ऑफ आईस & फायर' हा एकूण सहा पुस्तकांचा संच आहे. व त्यानंतर पुढे 'A Clash of Kings' , 'A Storm of Swords', 'A Feast for Crows', 'A Dance with Dragons' अशी राहिलेली पुस्तकं आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

पीटर डिकिन्सन ची "Hindsight" रहस्य कादंबरी वाचतेय. एका मित्राने सहज वाचायला दिली; मी लेखकाचे नाव या आधी ऐकले नव्हते. मस्त आहे, नेहमीच्या ब्रिटिश रहस्यकथांसारखी शैली हलकी-फुलकी असली तरी एक निराळेच गांभीर्य आहे. कादंबरीचा नायक-निवेदक देखील लेखक आहे. नवीन कादंबरी लिहीताना त्याला काही कारणांमुळे विश्वयुद्धाच्या वेळेस बोर्डिंग शाळेत असताना घडलेल्या काही घटनांचे (ज्यात एक मृत्यू (खून? की अपघात?) शामिल आहे) स्मरण होत जाते. त्या आठवणी ललित लेखनाद्वारे त्याला अधिक चांगल्या उलगडताहेत हे जाणवल्यावर कादंबरी निराळेच वळण घेते. इतिहास, स्मरण, ललित-लेखन, आत्मकथन, या सर्व लेखनप्रकारांवर अलगद विचार करत करत कादंबरी वाचकाला मूळ रहस्याकडे घेऊन जाते. अर्ध्यावर पुस्तक वाचून झाले तरी अजून डेड बॉडीचा पत्ता नाही, पण तरी मला ही रहस्यकथा आणि डिकिन्सन ची एकूण शैली खूपच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बसमध्ये "धिस गेम कॉलड लाइफ" नावाचं ६०-पानी पुस्तक वाचून संपवलं. निरनिराळ्या खेळांतील "जातीवंत" खेळाडू व कोच (प्रशिक्षक) यांचे खेळाविषयक व तदनुषंगिक आयुष्याविषयक विचार यात मांडले आहेत. अंध कोच, हाताला हुक बसविलेला कार रेसर, अचानक अपंगत्वाचा शाप मिळालेले अन्य क्रीडापटू, लहानपणी अबोल्/शामळू व लाजरा बॉक्सर व अन्य खेळाडूंचे अमूल्य विचार वाचावयास मिळतात.
असीम जिद्द, झपाटलेपण, स्वाभिमान, जिगर, धडाडी, इंटेग्रिटी अशा अनेकानेक पैलूचा आढावा प्रत्येक प्रकरणात येत जातो. अतिशय वेधक पुस्तक आहे.
एक कोच म्हणतो - मैदानावर प्रवेश करणारे २ संघ नेहमीच तुल्यबळ असतात - क्षमतेत अन कौशल्यातही. पण तो संघ जिंकतो ज्याच्यामध्ये स्वाभिमानाचे स्फुल्लिंग असते.
एक गोल्फ-पटू मोठ्या नामांकित स्पर्धेत खेळत असताना जिंकली पण शेवटच्या क्षणी तिच्या लक्षात आले की ती तिच्या नेहमीच्या चेंडूने खेळली नाही तर चुकून दुसराच चेंडू वापरला. ताबडतोब तिने ट्रॉफी (पदक) नाकारली. सांगीतली नसती तर ती गोष्ट कुणाला कळलीही नसती पण तिचे म्हणणे एकच - खेळात काय किंवा आयुष्यात काय कोणी पाहतय म्हणून वागण्याऐवजी नेहमीच नियमाने वागा.
इतकी ओतप्रोत इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा, एक ठीणगी प्रत्येक खेळाडूच्या स्वभावात जाणवते. पुस्तक वाचून भारल्यासारखे झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकच्या सायकोलॉजिकल प्रयोगाचे तपशीलवार विश्लेषण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी संपादिलेले आणि मूळ वेंकटमाधव याने लिहिलेले 'महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका' नामक मराठीचे १८२६ साली लिहिलेले व्याकरण फायनली आनलैन सापडल्या गेले आहे होऽऽऽऽ!!!!

http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/3361/1/015maha...

याचे वैशिष्ट्य काय?

-व्याक्रण मराठीचे, पण लिहिलेय संस्कृत भाषेत आणि तेही पक्क्या पाणिनीय पद्धतीने- सूत्रबद्ध.
-व्याक्रण मराठीचे, पण लिहिले गेले तमिळनाडूत.

-----------------------------------------------------------------

अर्जुनवाडकरांना जाऊन आता एक वर्ष होत आले. हे नक्की होते तरी कोण????

राम जगतापांनी त्यांच्याबद्दल लिहिलेला लेख.

त्यांनी शुद्धलेखनाबद्दल लिहिलेले लेख तसेच अन्य बरीच माहिती असलेले संस्थळ.

त्यांची जबराट प्रज्ञा पहावयाची तर त्यांची पुस्तके पहा असे सुचवेन. 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद' हे त्यांचे पुस्तक मराठी व्याकरणातील सर्व छोटेमोठे इश्श्यूज़ अप्रतिमरीत्या कव्हर करते. ते अन्यत्र कुठेही मिळण्याची शक्यता नाही, त्यांच्या घरीच मिळाले तर मिळेल. इच्छुकांनी त्यांच्या घरीच चौकशी करावी असे सुचवतो. वर दिलेल्या दुसर्‍या दुव्यावर त्यांचा पत्ता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्कॉर्पिओ विथ पिन्क (की मॅजेन्टा) टिआरा (की शूज की सँडल्स) का काहीतरी कथा कोणी वाचली आहे का? एका मेक्सिकन निर्वासित बाईची अत्यंत टचिंग इंग्रजी कथा आहे. मला सापडत नाहीये. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गाये चला जा' आणि 'यादों की बारात'सारख्या निर्विवाद उत्तम पुस्तकांचे अपवाद वगळता कणेकर तसे बदनाम लेखक आहेत. त्यांच्या लिखाणात तोचतोचपणा जाणवतो. जुन्याला कवटाळून बसण्याची वृत्ती स्पष्ट दिसते. एक प्रकारचा बनचुकेपणा असतो. सगळं मान्य. तरीही कणेकरांचं नाव दिसल्यावर 'काय आहे बघू तरी...' हा मोह मला आवरत नाही. विशेषतः त्यांच्या आत्मपर लिखाणातला सच्चा सूर मला अजूनही आवडतो.

म्हणूनच 'मी, माझं, मला' हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक वाचलं गेलं. त्यात मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती आहे. प्रस्तावनेत त्यांनी तसं स्पष्ट मान्यही केलं आहे. पण एकुणात पुस्तक रंजक आहे. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाबद्दल लिहिताना ते विशेष हळवे होतात. आणि तरीही त्या लिखाणाला तोचतोचपणा येत नाही. रूढ कुटुंबांपेक्षा आणि त्यातल्या प्रेमाच्या ठरीव वळशांपेक्षा वेगळंच कौटुंबिक आयुष्य कणेकर जगले. त्यातून आलेला कडवटपणा, एकटेपणा, प्रेमाची भूक, विषण्णता त्यांना आयुष्यभर सतावत राहिली, हे हा भाग वाचताना जाणवतं.

कणेकरांच्या बनचुक्या प्रतिमेला फसून, त्यांनी त्यांच्या सख्ख्या मावशीवर (मृणालमावशी) उर्फ सावत्र आईवर लिहिलेला लेख वाचला नसता, तर मोठंच नुकसान झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सगळं मान्य. तरीही कणेकरांचं नाव दिसल्यावर 'काय आहे बघू तरी...' हा मोह मला आवरत नाही. विशेषतः त्यांच्या आत्मपर लिखाणातला सच्चा सूर मला अजूनही आवडतो.

सहमत आहे. कदाचित एके काळी त्यांचं लिखाण - विशेषतः वृत्तपत्रातली सदरं - मोठ्या उत्सुकतेने वाचण्याचा विथड्रॉल सिम्प्टम असेल :). मला वाटतं, ९२-९३ च्या सुमारास लोकसत्तेच्या रविवार पुरवणीच्या दुसर्‍या पानावर 'चहाटळकी' म्हणून चार कॉलमी सदर कणेकरांचं, तर शेजारी (बहुधा) वपुंचं सदर येत असे. 'चहाटळकी'तला शेवटचा लेख अनपेक्षितपणे आत्मपर, गंभीर होता. त्यात त्यांनी सांगितलेले डॉक्टर वडिलांच्या सरळ, परोपकारी स्वभावाचे किस्से; एक मुलगा म्हणून त्यांना ओळखू शकलो नाही ही रुखरुख; आईवेगळा मुलगा म्हणून शाळेत इतर मुलांच्या आयांकडून मिळणारी सहानुभूती इ. आठवणी त्यात होत्या. हा लेख इतका अनपेक्षित होता की त्या पुढच्या रविवारी वपुंनीही आपल्या लेखात त्याचा उल्लेख केला होता. मात्र पुढे तेच तेच किस्से रिसायकल करत लेख पाडण्याचा अवचटीपणा आणि डोकावू लागलेली सिनिक वृत्ती यांचं प्रमाण वाढत गेलं, असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कणेकर कधीच आवडले नाहीत. Sad एक वेळ संझगिरींना सहन करता येईल पण कणेकरांचा कुठलाच लेख आवडल्याचे आठवत नाही. फिल्लमबाजी वगैरे वाचून/ऐकून तर निव्वळ नॉशिया आला होता. राजेश खन्ना(?)-लघवी-सेन्सॉर संदर्भातील विनोदाला लोक खदाखदा कसे काय हसू शकतात.

(अरुणजोशींची क्षमा मागून) कणेकरांचे लेख शहरातील लोकांना जास्त अपील होतात व गावाकडच्यांना होत नाहीत असे काही आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

http://home.swipnet.se/ratnashri/buddhism.htm

गौतम बुद्धांचे जीवन व शिकवण ...... अतिशय आवडते आहे. सध्या वाचते आहे. सिंक व्हायला वेळ लागेल पण वर्थ इट. अतिशय उत्तम ओळखपर साईट वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिबेका मेडचा 'सेन्स ऑफ एन्डिंग(अंताचे भान)' हा डिमेन्शिआ/अल्झायमर्सच्या पेशंटला दिल्या जाणार्‍या एका वेगळ्या उपचारांवरचा प्रदिर्घ लेख वाचण्यासारखा आहे, डिमेन्शिआ सारख्या मेंदुवर आणि त्यामुळे दैनंदिन जगण्यावर परिणाम करणार्‍या आजाराला औषध नाही, आणि पेशंटच्या हतबल/कन्फ्युज्ड/विस्मरणाने भरलेल्या वागण्यावर आसपासच्या लोकांचे वागणे अवघड असते, पण कॉग्निशनशिवायही जगात इतर गोष्टी(प्रेम, स्पर्ष, जवळीक) आहेत ज्यांच्यामुळे आयुष्य सुकर होऊ शकते हे भान देणारा एक लेख.

एक महत्त्वाचे वाक्य -

our society does tend to prize cognition and executive function at the expense of other essential human qualities: sensuality, pleasure, intimacy. For people who can no longer think clearly, a life of small sensory pleasures is a considerable achievement.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"The best buddhist writings 2006- Melvin Mcleod" अन "The best buddhist writings 2011- Melvin Mcleod" ही २ पुस्तके काही दिवसांपूर्वी ग्रंथालयातून आणली आहेत. पैकी २००६ वालं वाचून अर्धे झाले आहे. या पुस्तकातील बरेच लेख आवडले आहेत व काही कंटाळवाणे वाटले आहेत.
याच पुस्तकात, "Absolute and Relative Love - by John Welwood" हा लेखही आहे जो "http://www.johnwelwood.com/articles/Absolute_and_Relative_Love.pdf" येथे वाचता येऊ शकेल.
बौद्ध धर्मामध्ये "निर्विवाद प्रेम" व "सापेक्ष प्रेम" या २ संकल्पना मध्यंतरी वाचल्या होत्या व त्याविषयी वाचायची इच्छा निर्माण झाली होती. व लगेचच हा लेख सापडला. या २ संकल्पनांची व्याख्या व त्यांच्यातील फरक John Welwood यांनी उत्तम रीत्या मांडला आहे.
निर्विवाद प्रेम हे सूर्यप्रकाशासारखे असेते. व्यक्तीच्या विकल्पां/पर्यायांवर अवलंबून नसते. सूर्य जसा अवकाशात तळपतो तसे ते फक्त असते. अन त्याचा अनुभव घेण्याकरता लागणारी मानसिक घडी निर्माण झाली की अनुभूती येऊ शकते.
याउलट सर्व प्रकारची नाती ही "सापेक्ष प्रेम" या संकल्पनेभोवती फिरतात. आतापर्यंतचे व्यक्तीचे अनुभव, त्या अनुभवांती झालेले मनावरचे वार अन जखमा, विश्वास-अविश्वास,भीतीचा पगडा, स्वतःच्या प्रेमपात्रतेबद्दल अन्य लोकांच्या प्रेमपात्रतेबद्दल संशय या सर्व कल्लोळांतून २ व्यक्तींना परस्परविषयक जे विपर्यस्त प्रेम जाणवते ते म्हणजे हे सापेक्ष प्रेम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह मो मराठेंचे "बालकाण्ड" वाचले. शैली ओघवती आहे.

मला विशेष करून चित्पावनी बोली रोचक वाटली. माझ्या एक-दोन कोकणस्थ मैत्रिणींच्या "केलंन,आलंन" वगैर क्रियापदांचे मूळ सापडल्यासारखे वाटले.

विक्षिप्त आणि शीघ्रकोपी बापामुळे बालपणी झालेली फरफट चांगली मांडली आहे. हे पुस्तक वाचून देवदेव आणि कर्मकांडे यावरच भर देऊन त्यापायी बायकापोरांची फरफट बापये पुर्वीच्या काळी कसे करायचे हे (अजून एकदा) जाणवले आणि सर्व निरर्थक कर्मकांन्डांबद्दल (अजून एक्दा) डोक्यात तिडिक गेली.

त्याचाच पुढील भाग सुद्धा वाचण्याचा मानस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हे पुस्तक वाचून देवदेव आणि कर्मकांडे यावरच भर देऊन त्यापायी बायकापोरांची फरफट बापये पुर्वीच्या काळी कसे करायचे हे (अजून एकदा) जाणवले आणि सर्व निरर्थक कर्मकांन्डांबद्दल (अजून एक्दा) डोक्यात तिडिक गेली

१. मागच्या काळी ही फरफट ब्राह्मणांच्या घरी होत असे.
२. आता ही लहान मुलांची सर्वच घरांत शिक्षणाच्या नावाने, मुलाला मेरिटोरियस बनवायच्या नावाने, त्याच्या डोक्यात प्रचंड क्लिष्ट, बिनकामाचे, आधुनिक ज्ञान जबरदस्तीने कोंबून होते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जेथे भाषांतर मारक ठरले असते तेथे ईंग्रजी वाक्य तशीच ठेवली आहेत.

रेडिओ आणि टेलिव्हिजन या माध्यमांमधून लॅरी किंग हे प्रसिद्ध झालेले आहेत. या मुलाखतकाराने नामवंत, गुणवंत, सौंदर्यसंपन्न, श्रीमंत, बुद्धीमान अशा ३०० कलाकारांना, खेळाडूंना, बिझनेसमधील व्यक्तींना १ प्रश्न केला तो हा की - "त्यांच्या पश्चात, लोकांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आठवावं असं या लोकांना वाटतं? " या प्रश्नाला या ३०० लोकांनी जी उत्तरे दिली त्यातून " रिमेंबर मी व्हेन आय ऍम गॉन" हे पुस्तक जन्मास आलं. यातील उतारे अनेकविध प्रकारची आहेत- काही निखळ विनोदी तर काही अंतर्मुख करणारी तर काही त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेचा आदर वाढवणारी आहेत.पुस्तकात एकूण व्यक्तीमत्वांचे व्यवसायानुसार ९ भाग आहेत - चित्रपट तारे/तारका, खेळाडू, लेखक, व्यंगचित्रकार, विनोदसम्राट, बिझनेसमधील लोक, पत्रकार, संगीतकार आणि स्टेजवरील कलाकार.
१ नक्की की अनेकांना या प्रश्नाने आयुष्याकडे गंभीरतेने पाहण्यास भाग पाडले आहे.
आता सुरुवात करू यात की त्या त्या व्यक्तीला तिच्या थडग्यावर काय लिहीलेले आवडेल अशा काही उदाहरणांची -

भाग १ चित्रपट तारे तारका-

(१) जोआन बार्न्स - शेवटी एकदाची पार्कींगची जागा मिळाली बाई!
(२) शेली बर्मन -वर्षानुवर्षे मी हे पटविण्याचा व्यर्थ प्रयत्न केला की मी देखील तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. आशा करते आतातरी तुम्हाला ते पटेल.
(३) फ्लोरेन्स हेंडरसन- जीवनाचा प्रारंभ श्रद्धा, आशा आणि प्रेम या मूल्यांनी झाला. जीवनाच्या अंतीम काळी श्रद्धा, आशा, प्रेम ही मूल्ये होती. मधल्या काळात मी संशयाच्या भोवर्‍यात गटांगळ्या खात होते.
(४) शर्ली नाईट - या जन्मी मला ही गोष्ट कळली की हिंसा हे कोणत्याही समस्येचे समर्थक उत्तर होऊ शकत नाही हे मला कळले याबद्दल मी उपकृत आहे परंतु या गोष्टीचे वाईट वाटते की बऱ्याच लोकांना ही गोष्ट कळण्यासाठी १ जन्मदेखील पुरत नाही.
(५) जॅनेट लेह - ईश्वरी तत्त्व आपल्या वागणूकीमधून प्रकट करण्याकरता आयुष्य ही एक संधी तुम्हाला दिलेली असते. मी ते दर वेळेस प्रकट करू शकलोच असे मी म्हणू शकत नाही पण ईश्वर जाणतो की मी प्रयत्न केला.
(६) जॉर्ज चॅकीरीस - क्षण कितीही काळा असो, प्रेम आणि आशा यांना सदैव संधी असते.
(७) स्टेसी कीच -
Here Lies Stacy Keach
A georgia peach
Lived At the beach
Now out of Reach

भाग २ खेळाडू -

(८) बॉब कुसी - जेव्हा कोणाचम लक्ष नव्हतं तेव्हा त्याने त्याचे सर्वोत्तम देणे देऊ केले
(९) डोमिनो डिमॅजीओ - A guy who thrived on challenges large and small.
(१०) बॉबी नाईट-
When my time on earth is done
and i have breathed my last
I want they bury me upside down
So my critics can kiss my ass.
(११) जेरी कूसमॅन - पहीला आणि शेवटचा गडी बाद करणं सोपं होतं. मधल्या सर्वांनी माझे केस करडे केले.
(१२) टॉमी लासोर्डा - Dodger stadium was his address but every ballpark was his home.

भाग ३ लेखक-

(१३) जॅक कॅनफील्ड - त्याची प्रत्येक कथा ही दुखऱ्या जगावर केलेली मलमपट्टी होती.
(१४) फॅनी फ्लॅग - म्हणजे? पुस्तकांचा दौरा संपला म्हणायचा की काय?
(१५) क्लाईव्ह कसलर -
It was a great party while it lasted
I trust it will continue elsewhere
(१६) अँड्र्यू ग्रीले -
May it be said
When I am dead
His sins were Scarlet
His books were read
(१७) इव्हान हंटर - तो एखाद्या देवदूतासारखा लिहीत असे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ऑन फायरींग अ सेल्समन" या कवितेतील मध्यवर्ती पत्र एक वयस्क असा विक्रेता आहे, ज्याच्या जोम आणि उत्साहाला वयापरत्वे ओहोटी लागली आहे.
रोज सकाळी तो लवकर उठतो, ट्रेन पकडायला धावतो, हसतमुख चेहेर्‍याने क्लायंटच्या गाठीभेटी घेतो. क्लायंटला त्याचे प्रॉडक्ट विकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ऊर फुटेस्तोवर धावतो पण अनेकदा तर नव्याने एम बी ए झालेला पोरसवदा सहकारीत्याचा क्लायंट त्याच्या डोळ्यादेखत पळवतो.
त्याचे दिवस असे व्यस्त, व्यग्र आहेत तर त्याच्या संध्याकाळी अतिशय करड्या, निराशाजनक आहेत. तो येईयेइपर्यंत मुले झोपून गेलेली असतात, बयकोचे मूळातले कडू तोंड अधिकच वाकडे झालेले असते. एकंदर आयुष्याच्या संध्याकाळी सगळं खूप अवघड होऊन बसलं आहे.
त्यातच भर म्हणून त्याची नोकरी जाते. त्याला काढून टाकले जाते. कारण? त्याचे वय!!! तो वयस्क आहे, त्याचे प्रॉडक्ट खपत नाही. अणि आपल्या कामामधे जीवाचा आटापीटा करणार्‍या अशा या विक्रेत्याचा जणू आपण खून करतोय, त्याला नोकरीवरून काढून टाकून त्याचं आयुष्य जगायची कारणंच आपण उध्वस्त करतोय हेही कोणाच्या खिजगणतीत येत नाही.
अशी विक्रेत्याची व्यथा मांडणारी जेम्स ऑट्री यांची ही चित्रमय करूण कविता आहे.
___________

ही कविता वाचून २ दिवस तरी मी अस्वस्थ होते. कोणीतरी मला पूर्वी म्हणालं होतं - आपल्याला आहोत तिथे राहण्याकरता देखील सतत धावावं लागतं कारण जग धावतं आहे.

नोकरीत अनुभव आणि तरुण रक्त हा संघर्ष नवा नाही. आणि तो अपरिहार्य आहे. वरील कविता किती जणांना अपील होईल माहीत नाही. मला खूप आवडली..... पेक्षा चटका बसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विक्रेत्याचा जणू आपण खून करतोय, त्याला नोकरीवरून काढून टाकून त्याचं आयुष्य जगायची कारणंच आपण उध्वस्त करतोय हेही कोणाच्या खिजगणतीत येत नाही.
अशी विक्रेत्याची व्यथा मांडणारी जेम्स ऑट्री यांची ही चित्रमय करूण कविता आहे.
___________

ही कविता वाचून २ दिवस तरी मी अस्वस्थ होते. कोणीतरी मला पूर्वी म्हणालं होतं - आपल्याला आहोत तिथे राहण्याकरता देखील सतत धावावं लागतं कारण जग धावतं आहे.

नोकरीत अनुभव आणि तरुण रक्त हा संघर्ष नवा नाही. आणि तो अपरिहार्य आहे. वरील कविता किती जणांना अपील होईल माहीत नाही. मला खूप आवडली..... पेक्षा चटका बसला.

विक्रेता असो वा अजून इतर वरच्या खूर्चीत बसलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या हितार्थ कठोर निर्णय प्रसंगी भाग असते; निर्णय न घेणे तुम्ही तुमच्या खुर्चीला जस्टीस देऊ शकत नाही आणि इतर स्टेकहोल्डर्सवर अन्याय ठरतो. त्याचीच दुसरी मानवी बाजू जेम्स ऑट्री उलगडून दाखवतात. अनुभव आहे, काम करण्याची क्षमता आहे पण अनुभवी व्यक्तीला डिमांड नाही म्हणून काम नाही हे निव्वळ डिमांड सप्लाय वर आधारीत गणितावर विसंबून राहण, आर्थिक आणि सामाजिक जीवनात अनुभवाला डिमांड नाही, हि आर्थीकक्षेत्रातील कठीण परिस्थितीच निदर्शक असत; यात अनुभवी व्यक्ती आणि त्यांच्या अनुभवा पासून खरेतर समाजही वंचीत होत असतो. अर्थात हे सर्वच प्रोफेशनना सारख लागू होतं.

विक्रेता आणि इतरांमधला मुख्य फरक इतर प्रोफेशन मधली मंडळी जेवढ्या मोकळेपणाने त्यांचा पराजयही इतरांशी शेअर करू शकतात त्या मोकळेपणाने शेअर करता येतो तेवढ्या मोकळेपणाने विक्रेत्यांना तो इतरांशी शेअर करता येत नाही. खरेतर बाहेरच्या जगाला सातत्याने ग्लॅमरच दर्शन देणारा प्रत्येक विक्रेता कधीन कधी जेम्स ऑट्रीच्या कवितेत दिल्या प्रमाणे जळणार असतोच, जेम्स ऑट्रीच्या कवितेच वैशिष्ट्य हे की त्यांनी ते शेअर केलय, विक्रिची जबाबदारी असलेला सेल्समन असो वा संचालक सहजपणे आपले पराभव जाहीर करू शकत नाहीत. पराभव होत असलातरी बाकी जगाला मुद्रा विजयीच दाखवावी लागते. तुम्ही ज्या संवेदनशीलतेने प्रतिक्रीया दिलीत एक विक्रेताही दुसर्‍या विक्रेत्याला सहसा देणार-घेणार नाही. जुने लोक जाऊन नवे लोक येण पिढी बदलण सातत्याने सर्वत्रच चालू असत. मला तुमच्या प्रतिक्रीयेनी व्यंकटेश मांडगूळकरांची माकडांच्या दोन पिढ्यातल्या चालू रहाणार्‍या संघर्षा बद्दल एक कादंबरी (नाव आठवत नाहीए) आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, माहितगारमराठी.

विक्रेता असो वा अजून इतर वरच्या खूर्चीत बसलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या हितार्थ कठोर निर्णय प्रसंगी भाग असते; निर्णय न घेणे तुम्ही तुमच्या खुर्चीला जस्टीस देऊ शकत नाही आणि इतर स्टेकहोल्डर्सवर अन्याय ठरतो. त्याचीच दुसरी मानवी बाजू जेम्स ऑट्री उलगडून दाखवतात.

__/\__ सुंदर मांडलत आपण हे वास्तव, वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेऊन अन भावनिक टाळून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान प्रतिसाद. एक पुरवणीची चिंधीच जोडायची तर आज त्या अधिक वयाच्यावर अशी वेळ ज्या तरुणामुळे आली आहे, तो तरुण जेव्हा वय वाढून या टप्प्यावर उभा असेल तेव्हा त्याला आपले तरूणपण आठवायच्या ऐवजी (आपणही अशीच कोणावर वेळ आणली होती) नव्या तरूणाचीच चीड/हतबलता वगैरे वाटायचाच संभव अधिक!

हे चक्रनिक्रमेण चालुच रहाणार. कालाय तस्मै नमः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्याला आहोत तिथे राहण्याकरता देखील सतत धावावं लागतं कारण जग धावतं आहे.

Not exactly. This world is/was not really ever-changing. Some vested interests have give a spin to it. A mediocre mind cannot trace the origin of spin while itself running.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माजी पंप्र मनमोहन सिंग यांची सुपुत्री श्रीमती उपिंदर सिंग यांनी लिहिलेले 'अ हिस्टरी ऑफ अ‍ॅन्शिअंट & अर्ली मीडिएव्हल इंडिया' विकत घेतले आणि वाचायला सुरुवात केली. अप्रतिम पुस्तक आहे. अंडरग्रॅज्वेट लोकांसाठीच्या सिलॅबसचे पुस्तक म्हणून आहे, पण मॅच्युअर पुस्तकात असावेत तेवढे खच्चून भरलेले डीटेल्स आहेत. खंडीभर नकाशे, तितकीच रोचक अवतरणे आणि तर्‍हेतर्‍हेची चित्रे! मेजवानीच. काही उदा.

-कंगनहळ्ळी इथे सापडलेले अशोकाचे नावासहित शिल्प.
-हस्तिनापूरच्या उत्खननावेळचा फोटो.
-फाहिआनने प्रज्ञादेव नामक भिख्खूला लिहिलेल्या पत्राचा सारांश.
-वेगवेगळ्या काळातील खापरांचे व भांड्यांचे फोटो- पीजीडब्ल्यू, एनबीपीडब्ल्यू, इ. संज्ञांचे नेमके अर्थ विवेचिणारे.
-कौटिलीय अर्थशास्त्रानुसार राजाचा राजवाडा कसा असावा त्याचा आराखडा.
-प्राचीन भारतातील मुख्य व्यापारी मार्ग.
-तमिळनाडूमधील प्राचीन सिंचनपद्धती.
-मेगास्थेनिसबद्दल अ‍ॅर्रियन, प्लिनी, प्लूटार्क, इ. ची मते.

हे झाले निव्वळ विद्रट डीटेल्स. पण सैद्धांतिक मांडणीही उत्तम आहे- विशेषतः मार्क्सिझम, हिंदू न्याशन्यालिझम, इ. चौकटींच्या पलीकडे जाऊन इतिहास मांडण्याची गरज, पुरातत्त्वीय पुरावे आणि ग्रांथिक पुरावे यांमधील कोरिलेशन हे विवेचन अतिशय युनिक आहे. भारतीय संदर्भात हे सर्व एकत्र वाचायला मिळणे म्हणजे पर्वणीच, आणि इतक्या जबर्‍या लेव्हलचे अन्य कुठलेही पुस्तक आजमितीस उपलब्ध नाही. २००९ साली प्रथम प्रकाशित झालेले असून त्यांत २००० आणि त्यानंतरच्याही अनेक घडामोडींचा परामर्श घेतलेला आहे.

प्राचीन भारताचा (अश्मयुग ते इ.स. १२ वे शतक) इतिहास एकाच पुस्तकातून वाचायचा असेल, आपला दृष्टिकोन बायस्ड होऊ नये आणि शक्य तितके समग्र ज्ञान व्हावे अशी इच्छा असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परिचय आवडला.
पुस्तक वाचावेसे वाटते आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फ्लिपकार्टवर अवघ्या ५४१/- मध्ये उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन