एक कट्टा तो बनता है!
एक कट्टा तो बनता है!
कुठल्याही वीकान्ताला, ठाण्यात, पुण्यात, मुंबईत... घरी, दारी, कुठेही.
कोणाकोणाला जमेल, आवडेल, कधी, कुठे... सांगा.
श्श्श्श्शी!
ंमी जुलै महिन्यापासून इथेच पुण्यात आहे. काही दिवसांतच परत चाललेय. तुम्हाला हे **आत्त्ता** सुचतय आणि नेमकी मी गेल्यावरची तारीख ठरवताय :-(
आता पुढच्या कट्ट्याला सगळे कलकत्त्याला या. फॅर ए प्रॉपर "कलकट्टा", हाहाहा! तिथल्या महाराष्ट्र मंडळाचं गेस्ट हाउस बर्यापैकी स्वस्त न् मस्त आहे.
पण रुपाली काय किँवा सुरभी,
पण रुपाली काय किँवा सुरभी, शबरी काय तिन्हीकडे छोटे टेबल आहेत वाटत. आणि वेळेचा आवाजाचा टॉलरंस माहीत नाही...
रुपाली आणि आम्रपालीच्यामधे रुपालीचाच एक मोठा भाग आहे, फर्गसन रोडवर वेळेचा आणि आवाजाचा टॉलरन्स बराच आहे, जास्त झालाच तर सांगणारेही आहेतच.
ICC टेक टॉवरच छतावरच रेस्टॉरंट कसंय?
टेक नव्हे ट्रेड, ते 'शांत' डिनरसाठी उपयुक्त असल्याचे मत आहे.
विष्णू जी की रसोइ
अजून एक ठिकाण सुचलं आहे कट्ट्याला "विष्णू जी की रसोइ". नळ स्टॉपला असल्यानं ऐन शहरी भागात आहे. पोचणं सोपं आहे.
दीड एक वर्षापूर्वी जाणे झाले होते. सुमारे दोन्शे अडीचशे दर्दोइ खर्च होता.(आता निश्चितच वाढला असावा.)
"शाही थाली" असते ना थाट्-बाट, दुर्वांकुर, सुकांता, मयुर व्हेज वगैरे; थोडीफार त्याच धर्तीवर. पण एक मोठा फरक आहे.
"विष्णू जी की रसोइ " हे विस्तीर्ण लॉनवर , हिरवळीवर पसरलं आहे.
तिथं लॉनच्या काही भागात खुर्च्या टेब्लं टाकली आहेत. ज्यांना हवं ते त्यावर बसून आरामात खाउ शकतात.
ज्यांना फिरत चुरडणं आवडतं ते चालत बोलत बुफे स्टाइल खाउ शकतात.
बुफेमध्ये स्टार्टर्स, सूप वगैरे होतेच. शेवटी डेझर्ट म्हणून मोगाचा हलवा वगैरेही होते.
एका कोपर्यात चुलीवरचा स्वयंपाक बनत असतो भाजी-भाकरी पोळी वगैरे. ज्याल हवय त्यानं तो जाउन आणायचा.
शिवाय लॉनच्या मध्येच एक थालिपीठाचा स्टॉलसदृश प्रकार असतो.
उत्तर भारतीय पनीरच्या भाज्या वगैरे त्यांना तितक्याशा जमल्या नव्हत्या. मराठी आयटम्स जमले होते.
पण वातावरण एकूणच गप्पा टप्पा करण्यासाठी छान वाटले.
(थाट बाट ला किंवा अगदि आउथ इंडिजलाही तुम्ही बसलात की आअसपास वेटर घोंघावू लागतील, काय हवे नको ते वआढतील. तुम्हाला बसून रहावे लागेल.
सगळे लक्ष खाण्याकडेच राहील. गप्पा मारण्याच्या हिशेबाने हा निगेटिव्ह पॉइण्ट आहे. )
थोडक्यात, सुकांता-थाट बाट ही बैठी ठिकाणे व चोखी धानीचा शाही थाट असलेलं ग्रामीण राजस्थानी शाही बाज ह्यांच्या बरोबर मधलं हे ठिकाण आहे.
इथे चालत-बोलत खाता पिता येइल. ज्यांना बसून निवांत गप्पा मारायच्या आहेत, ते निवांत गप्पाही मारु शकतील.
अरुण जोशी आलेच तर त्यांच्याशी प्रत्यक्षात तावातावाने वाद घालायलाही मोकळे पटांगण, लॉन आहे.
बघा.विचार करा.
(निव्वळ खाण्यापुरती वैयक्तिक आवड विचारली तर मी स्वतः साउथ इंडिजच पसंत करीन्.मला भात्-इडल्या ढीगभर खाण्यात काहीही संकोच वाटत नाही.
आलु प्राठे -पनीर आवडतात, तसेच बिशिबिळे राइस व चित्रान्नही मनापासून आवडते.पण सर्वच जण तितके पिव्वर साउथ इंडियन वातावरण पसंत करतील
की नाही ह्याबद्दल शंका आहे. शिवाय तिथे बंद ए सी मध्ये "बसून खाणे" हा प्रकार आहे.
मोकळ्या आभाळातला गोरज मुहूर्तावर लागलेल्या लग्नातल्या बुफेचा इफेक्ट तिथे नाही.
अन्नाची बाजू साउथ इंडिजची सरस आहे; पण इतर बाबतीत विष्णू जी की रसोइ सुयोग्य वाटते. )
.
.
अॅमानोरा मधील "व्हिलेज" हे अजून एक ठिकाण सुचवून टेह्वतो. चारेकशे रुपये दरडोइ खर्च आल्ता आम्हाला.
अर्थात ते फ्यामिला घेउन जाण्यासाठी ठीक आहे. कट्ट्यासाठी नको.(सायंकाळी साडे सात वगैरे नंतर जोरजोरात ढोल बडविणे सुरु होते, माहौल निर्मितीसाठी.
त्यामुळे तिथे गप्पा नाही होउ शकणार. फ्यामिली वाल्यांनी एकदा टृआय करुन पाहण्यास हरकत नसावी.)
हा रसोई पर्यायपण चांगला
हा रसोई पर्यायपण चांगला वाटतोय.
मी विचार केलेला की रुपाली किँवा कर्वेपुतळाच्या शितल मधे १० वाजता भेटायच. ब्रेकफास्ट आयटम ११पर्यँत देतच असतील. मग तिथेच चहा कॉफी घेत गप्पा मारायच्या १पर्यँत. हवा असेल तर लंच घ्यायचा नैतर कल्टी किँवा दुसरीकडे कुठे जाउन गप्पा हाणायच्या ज्याला जसे जमेल तसे...
चालेल की वाडेश्वरपण मी इतकी
चालेल की वाडेश्वरपण :-D मी इतकी वर्ष पुण्यात आहे पण रुपालीत एकदाच गेलेय. आणि वैशालीत २ ३दा. मलापण नै आवडत त्या जागा. पण दुसरा पर्याय कोणी सुचवलाच नै ना :-(. आणि मला वाटल १० म्हणजे पहाटे पहाटेपण वाटु शकेल काही जणांना. म्हणुन मग जास्त प्रवास करावा लागु नये म्हणुन शितल सुचवल.
रूपाली पकाऊ??????
या रेटने उद्या ताजमहाल१ भिकार म्हणाल!
निषेध! निषेध!! त्रिवार निषेध!!!
- (कोणे एके काळी 'रूपाली'वर जगलेला) 'न'वी बाजू.
=======================================================================================================
१ बोले तो, आगरा फेम. गेटवेसमोरचा नव्हे, आणि अटलाण्टिक शिट्टीचा नव्हेच नव्हे.
रुपाली/वाडेश्वर/गुडलक/बालगंधर
रुपाली/वाडेश्वर/गुडलक/बालगंधर्वचा कॅफेटेरिआ/स.प.महाविद्यालयाच्या मागच्या बाजुला/गेलाबाजार तळ्यातला गणपती/पर्वती ह्या जागा छोट्या-मोठ्या कट्ट्याच्या आहेत, अर्थात गिळणे महत्त्वाचे असल्यास त्याहिशोबाने भेटू शकताच त्यासाठी मग ती विष्णूजी कि रसोई नामक अमराठी खानावळ ठीक आहे. ;)
चतु:शृंगी आणि पुणे विद्यापीठ
चतु:शृंगी आणि आरामात गप्पा मारत हिंडण्यासाठी, अधून मधून चाय -कॉफी ढोसण्यासाठी योग्य पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण आवार विसरलात?
तुमेहे सुचविलेली ठिकाणे आणि वाडेश्वर-रुपाली ह्यांनाही माझी हरकत नाहीच.
वाडेश्वर असेल तर मी इथूनच माझ्यापुरती ऑर्डर देउ शकतो. मला तिथले काय आवडते ते मला ठाउक आहे.
होतय काय, की ठिकाणांच्या सुचवण्या येताहेत, व कुठल्यावरही सहमती होउ लागली की हरेक जण अजूनच नवीन ठिकाणे सुचवताहेत.( त्यात मीही आलो.)
मागील काही दिवसात ह्या धाग्यावर लिहिले नव्हते. आता पुन्हा इथून विश्रांती घेत आहे.
तुमचं काय ठरेल ते इथे घोषित करा म्हणजे झालं.
मी काहीच ठरवणार नाहीय. अशा
मी काहीच ठरवणार नाहीय. अशा सुचवण्या करतच राहण्यापेक्षा आपण असं करू: ऋषिकेश, मन आणि अस्मि या तिघांची एक समिती स्थापू आणि त्यांच्यावरच निर्णय सोपवू. :ड
मला वरीलपैकी कुठलेही पर्याय चालणार आहेत. कट्टा मात्र झालाच पाहिजे, इतकाच एक अतिमहत्त्वाचा मुद्दा. बाकी सगळं... ठीकच.
माझी पुण्यातील स्थळांची
माझी पुण्यातील स्थळांची माहिती (रादर अज्ञान) जमेस धरता बॅट्याचेही नाव सुचवेन. किंबहुना माझ्याऐवजी बॅट्या समितीत योग्य आहे:)
१. मनोबाने वर सुचवलेली विष्णू/शंकर का कोणाची तरी रसोई
२. साऊथ इंडीज ला जेवण आणि मग युनिव्हर्सिटीच्या क्यांपसात गप्पा हे दोन पर्याय रोचक वाटत आहेत.
बालगंधर्वचा कॅफेटेरीया: इथे मागे पुस्तकविश्व जोरात असताना तेथील सक्रिय असे ५-७ जण जमलो होतो. श्रामो होतेच, शिवाय मिहिर, वेदश्री होते. मनीषही होता. आणि कोण होते / होते का पटकन आठत नाहीये. पण गप्पा हाच उद्देश असेल तर तासन् तास इथे घालवता येतील. मात्र खाणे थातूरमातूर असल्याने याला निवडता येणार नाही असे वाटते.
धमकी:शेवटी क्काही म्हंजे क्काहीच ठरलं नाही तर माझ्या घरी यावे लागेल! कितीही जणांसाठी कमीतकमी कष्टात पोटभरीची अशी पावभाजी करून चारेन ((फुडप्रोससर हा मानवजातीला केवढा आधार आहे! ;) ). पाव भाजायचे काम (पाव भाजणे आवश्यक आहे असे ठरल्यास) डिव्हाईड करू ;). उच्चासनावर बसायची सोय ८-९ जणांची होईल बाकीच्यांना भार्तीय बैठक. अर्थातच वेळेचे बंधन नाही!
साउथइन्डिज्ज
In reply to ओक्के. by बॅटमॅन
साउथ इन्डि योग्य वाटते. फुरसतीत नन्तर टंकतो.