कविता
अनिरुध्द अभ्यंकर
कवी - अनिरुद्ध अभ्यंकर
काळोख
आता मला हवा आहे
फक्त काळोख मिट्ट काळा...
ज्याच्या मिठीत
होतील अदृश्य
हे प्राक्तनाचे
ढळढळीत संकेत...
निदान टाळता तरी
येईल मला
माझीच नजर ...
--------------------------
निकाल
मला अजूनही
समजलं नाही...
प्रश्न सोपा होता
की
अवघड होते उत्तर...
पास की नापास
ते तर
तू
कधीच सांगितलं नाहीस...
क्या बात है! दुसरी अधिक आवडली
क्या बात है! दुसरी अधिक आवडली