खिक् दर्शन

खिक् दर्शन

आतला नागडा
बधिर ;
बाहेरचा भलताच
अधिर..
निर्लज्ज श्रध्दा खिक्
हसून ;
ढुंगणाखाली दाबते
धीर ..
गोट्या मोट्या
सोट्या ;
अगडबं बगडंब
छोट्या..
विठू हरकला ;
बुक्का थरकला.
रुख्माय
देते गाली !
चवथीचं फडकं पिळावं भाड्या...
मुखडा भुलून निजावं भाड्या.,
वाढीव येल...
वाढीव इस्तार ;
बुळ्याचं लग्न
बुळ्याचा इस्तार .
उलट्या देवाची
पुजावी गांड ;
मांडावी चूल
चेचावं आंड ..
गोष्ट सांगतो सापाची
शेटं उपट माझ्या बापाची !
काय मंतू रे ?
का मंतू रे ?
अगं बाय अगं बाय चिल्बाट चिवडी
कस्पाट सोडून भलांगी निवडी...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

या कवितेवर प्रतिसाद देणेही धाडसाचेच म्हणावे लागेल. व प्रतिसाद नेमका काय द्यावा याचाही संभ्रम
कवितेची भाषा वाचकांनी पाहिली तर पचनी पडण्याची सुतराम शक्यता नाही.
त्यातून आशय शोधला तर मात्र विचारशलाका नक्कीच चमकतील.
आशय अतिशय फटकारणारा आहे. तीव्र वेदना जाणवून देणारा आहे.
कवितेने मी मात्र स्तब्ध झालो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै कळ्ळी, पोचली.. कोणी रसग्रहण करेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रसग्रहणाशिवाय काहीही समजणं कठीणच दिसतंय. एकंदर कविता ही मला झेपणारी गोष्ट नव्हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काहीच समजले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कवीतेच्या नावाखाली ओकार्‍या काढल्या आहेत. कविता लिहिणे म्हणजे विकृत शब्दांची माळ ओवणे नव्हे. वाघमारे, लाज वाटत नसेल, तर प्रत्येक शब्दाचा अर्थ सम-झवून सांगा. (डोके) उघडून बसलो आहे. बघू जमतंय का?
तुम्हास तुमच्या कवितेसह फाट्यावर मारण्यात येत आहे.
"चेचावं आंड .." एल ओ एल.
आंड घेऊन येणे, चेचून देईण,
आडकित्ता!
(आमचे येथे 'नट्स' 'क्रॅक' करून मिळतात)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्ता परखड अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! कवितेतला प्रत्येक शब्द आणि अर्थ समजुन सांगतो थोडा धीर धरा ही विनंती ! अजून काय प्रतिक्रिया येतात ते पाहतोय. कवितेला फाट्यावर मारणं इतपत ठिक आहे. कवी स्वतः फाट्यावरच राहतात.खर्या नावाने लिहितात. धाडसाने व्यक्त होतात. त्यामुळे आंड चेचणे वा चेचवले जाणे याला कवी अजिबात डरत नाहीत. ही खात्री बाळगा.तुमच्याकडे यायला तुमचा पत्ता काय ? जरा बुरख्यातनं बाहेर याल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेविषयी माझं किंवा काही इतरांचं (प्रतिसादांवरुन तरी) आडकित्ता यांच्याइतकं आत्यंतिक मत नसलं तरी आडकित्ता यांचा प्रतिसाद निरर्थक किंवा खोडसाळ म्हणून अदृश्य करण्यासारखा अयोग्य वाटत नाही.. उलट मुख्य मुद्दा योग्यच वाटतो.

त्यामुळे तो प्रतिसाद दृश्य स्वरुपात राहिला असता तर काही अयोग्य नव्हतं. माझं एक श्रेणीमत संपलं असल्याने आणि परत हा प्रतिसाद बंद अवस्थेत गेल्याने आता उपप्रतिसादात हे मत व्यक्त करण्याखेरीज मी काहीच करु शकत नाही.

बाकी कवितेविषयी:

ही कविता बहुधा वेगवेगळी निरुपणं करुनच समजून घ्यावी लागणार असं दिसतंय..

कट्टा नावाच्या एका फार जुन्या अनियतकालिकात खालील कविता आली होती:

आलिया भोगासी
असावे सादर
शनिवारवाड्यासमोर भादर
म्हशी.

फाटकीच माझी
पिवळी चादर
नर्गिसांची मुलगी होती मदर
इंडिया.

वगैरे..

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आडकित्ता यांच्याइतकं आत्यंतिक मत नसलं तरी

तुमची सहनशक्ती सॉलिड आहे गवि. तुमचे चरण च वंदावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते बैलांचा हिंस्त्रपणा की लिंगपिसाटपणा काही तरी कमी व्हावा म्हणून ग्रामीण भागात अशा बैलांचा विधीपूर्वक 'आंड चेचला' जातो. शालेय जीवनात काही शेतकरी मित्रांनी तो हृदयद्रावक प्रसंग सांगितला आहे. मातर् पाहण्याची संधी सुदैवाने मिळाली नाही. बहुदा तसले प्रतीक कवीला अभिप्रेत असावे. (बाहेरख्यालीपणा कमी करुन घरापुरते मर्यादित राहावे वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवदासी प्रथेवरचं भाष्य आहे का हे? तसं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेचा गर्भितार्थ फारसा उमगला नाही; पण उत्तररात्री भरपूर दारू पिऊन सामसूम रस्त्याने जाताना मंद प्रकाश फेकणार्‍या बंद उच्चभ्रू खिडक्यांकडे बघून जोरजोरात म्हणायला चांगली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरणभात संप्रदायाला बेमतलब उगी दचकवायला म्हणून बरी आहे. अर्थ असो वा नसो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जोरदार ख्या ख्या ख्या...:-) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता वाचून माझ्या डोळ्यांसमोर येणाऱ्या प्रतिमा ह्या विठ्ठलाच्या दर्शनाला अधीर झालेले भाविक आणि समोरचे उघड्या दोंदांचे, कळकट धोतरांतून आपल्या किळसवाण्या केसाळ शरीरांचं प्रदर्शन करणारे बडवे यांच्या आहेत. देवाचं दर्शन म्हणजे काय, तर बुक्का लावून बडवा तुमचं डोकं देवासमोर बडवतो. तेव्हा हे असलं दर्शन हा एक प्रकारचा बलात्कारासारखा किळसवाणा आणि वेदनादायक अनुभव असावा असं वाटतं. असल्या देवाच्या मागे लागणं म्हणजे येडझवेपणा. त्यापेक्षा वेगळं काहीतरी करा. पण ह्या शब्दांचे अर्थ कळले नाहीत त्यामुळे वेगळं काहीतरी काय त्याचा अंदाज येत नाही -

चवथीचं फडकं पिळणं
चिल्बाट चिवडणं
भलांगी
'कस्पाट' म्हणजे 'कस्पट' का?
'येल' म्हणजे 'वेल' का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छानच रचना आहे.

यमकं खूप छान वाटली, छंदबद्ध नसली तरी रचनेला एक गेयता आहे.

'घालिन लोटांगण'च्या तालावर म्हणून पाहिली तर अजूनच आवडून गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

'घालिन लोटांगण'च्या तालावर म्हणून पाहिली

म्हणजे ओरिजिनलच्या की त्याच्या प्रसिद्ध विडंबनाच्या तालावर ? कारण ते विडंबन या कवितेशी खूपच मिळते-जुळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिभत्स रसातल्या दोन/तीन कविकल्पना येथे दिसतातः
१.
आतला नागडा बधिर ;
बाहेरचा भलताच अधिर..
निर्लज्ज श्रध्दा खिक् हसून ;
ढुंगणाखाली दाबते धीर ..
गोट्या मोट्या सोट्या ;
अगडबं बगडंब छोट्या..
विठू हरकला बुक्का थरकला.
रुख्माय देते गाली !

-या अर्ध्या कवितेत मला लागलेल्या अर्थाप्रमाणे वारकर्‍यांच्या दिंडीतून होणार्‍या वेश्याव्यवसायावर भाष्य करण्याचा कवीचा शब्दबंबाळ प्रयत्न दिसतो.
येथे 'गोट्या, मोट्या, सोट्या अगडबं, बगडबं छोट्या' हे बडबडगीत सदृष शब्द लिंगाचे प्लेसहोल्डर आहेत.

इथे आणखी एक किंवा दीड ओळ असती तर आणखी रसपरिपोष झाला असता. म्हणजे -
रुख्माय देते गाली,
अबकडई कचटतपी
कखग जाते खाली

असे काहीसे.

२.

चवथीचं फडकं पिळावं भाड्या...
मुखडा भुलून निजावं भाड्या.,
वाढीव येल वाढीव इस्तार ;
बुळ्याचं लग्न बुळ्याचा इस्तार .
उलट्या देवाची पुजावी गांड ;
मांडावी चूल चेचावं आंड ..

या भागात एकंदर लग्नसंस्था आणि वंशविस्तार यांच्याबाबत काहीतरी भाष्य आहे. पण मांडणी नीट/स्पष्ट नाही.

पण चवथीचं फडकं म्हणजे काय ते माहित आहे.(सॅनिटरी टॉवेल.) पण त्याचा कवितेत वापर अनिवार्य होता असे वाटत नाही. तेच 'गांड, शेटं' या शब्दांबाबत. पौगंडावस्थेत या शब्दांबाबत कुतुहल असते आणि त्यांचा मोठ्याने उच्चार करायला कुणाकुणाला मजा वाटते. पण एकदा ते वय उलटले की त्यांची जागा प्रौढ सभ्य शब्द/ सांकेतिक शब्द घेतात. प्रस्तुत कवीने तेच पौगंडी बिभत्स शब्द का वापरले त्याबाबत संभ्रम आहे. तो पौगंडावस्थेत आहे असे वाटत नाही.

तथाकथित शहरी पांढरपेशांना चकित करणारे उद्गार म्हणून कवीने हे शब्द वापरल्यागत वाटले. याहीपेक्षा बिभत्स शब्द वापरता येतील (आणि वाचकांना ते नव्याने माहित होत आहेत असे समजण्याचीही गरज नाही.) बिभत्स भाषा हे फक्त दलितांच्या भाषेचे आणि दलित वाङ्मयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे कवीने किंवा इतर कुणीही मानण्याचे कारण नाही. माझ्या बघण्यातल्या काही (कोकणस्थ) म्हातार्‍या याहीपेक्षा शिवराळ आणि तेही लहान मुलांदेखत बोलत असत. आणि खरे सांगायचे तर प्रस्तुत कवीचे हे शब्दही बर्‍यापैकी बामणाळलेले आहेत. 'खरी' शिवराळ भाषा इतकी सोज्ज्वळ नसते हे कवीला माहीत असेलच. खासगीत तशी भाषा कोणीही वापरू शकेल. परंतु हे सार्वजनिक ठिकाण आहे.

३.
गोष्ट सांगतो सापाची
शेटं उपट माझ्या बापाची !
काय मंतू रे ? का मंतू रे ?
अगं बाय अगं बाय चिल्बाट चिवडी
कस्पाट सोडून भलांगी निवडी...

या भागात कवीच्या म्हणण्याचा आतला अर्थ लोक समजावून न घेता (- 'काय मंतू रे? का मंतू रे?') फक्त त्याच्या शब्दांवर जातात आणि टीका करतात याचे वैषम्य कवीला वाटत आहे.
म्हणून (एकनाथ महाराजांप्रमाणे ;)) तो लोकांना भारूडी उपदेश करत आहे की - "अगं बाई, कस्पट सोड आणि आतला दाणा घे."

असो. हा मला लागलेला अर्थ. कवीने ही कविता एका फटक्यात लिहून काढली असावी. आपापल्या मगदुराप्रमाणे लोक कविता करत असतात. प्रस्तुत कविला एवढेच सांगणे की इथला 'टारगेट ऑडियन्स' (स्त्री आणि पुरुषही) थोडा वरच्या पातळीवरचा आहे. त्याला असल्या शब्दांची पुरेपुर ओळख आहे आणि त्या शब्दांतले नाविन्य/आकर्षण त्याला नाही. उलट तिटकारा आहे. ज्या साहित्यात लेखकाच्या/कविच्या अनुभवांचा आणि साहित्यगुणांचा कस लागतो ते साहित्य त्याला महत्त्वाचे आहे. ज्यात हे दोन्ही आहेत त्या साहित्याला इथे आपोआपच मान्यता मिळते.
तेव्हा असे सकस लेखन त्याने करावे आणि सर्व वाचकांना आपल्या लेखणीच्या दर्जाचा प्रत्यय आणून द्यावा.

अगं बाय अगं बाय चिल्बाट चिवडी
कस्पाट नकोच भलांगी निवडी... हे त्याने स्वतःलाच सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कस्पाट नकोच भलांगी निवडी... हे त्याने स्वतःलाच सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिभत्स भाषा हे फक्त दलितांच्या भाषेचे आणि दलित वाङ्मयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे कवीने किंवा इतर कुणीही मानण्याचे कारण नाही.

अगदी!

मात्र,

पौगंडावस्थेत या शब्दांबाबत कुतुहल असते आणि त्यांचा मोठ्याने उच्चार करायला कुणाकुणाला मजा वाटते. पण एकदा ते वय उलटले की त्यांची जागा प्रौढ सभ्य शब्द/ सांकेतिक शब्द घेतात. प्रस्तुत कवीने तेच पौगंडी बिभत्स शब्द का वापरले त्याबाबत संभ्रम आहे. तो पौगंडावस्थेत आहे असे वाटत नाही.

खासगीत तशी भाषा कोणीही वापरू शकेल. परंतु हे सार्वजनिक ठिकाण आहे.

'भडवा', 'रांडा' असले शब्द कसेही करून कोल्ड प्रिंटात आणून दाखवायचेच, या एकमेव महत्त्वाकांक्षेने कोणीतरी 'तांडा'ला 'रांडा', नि 'गडवा'ला 'भडवा' असली यमके जुळवत काहीबाही लिहीत सुटतो, त्याचे कोण कौतुक होते! त्याला असले सल्ले तर कोणी देत नाहीच, उलट त्याची रसग्रहणावर रसग्रहणे पाडली जातात, नि त्यावर असले आक्षेप येण्याअगोदरच प्रीएम्प्टिव मेझर म्हणून "या कवितांमध्ये कवीने काही भडक लैंगिक शब्द, रूपकं वापरली आहेत. त्यांबद्दल चर्चा करताना ते व तसे इतर शब्द टाळणं अशक्य आहे . अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. विठ्ठलाबद्दल, रखुमाईबद्दल काही ओळी आलेल्या आहेत. ही नावं रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये." असली आगाऊ डिस्क्लेमरेही बिनदिक्कत छापली जातात. त्या रसग्रहणांवर कौतुकाचे चार प्रतिसादही येतात, एवढेच नव्हे, तर त्या प्रतिसादांतून एखादी कविता, एखादा संग्रह पूर्ण वाचावासा वाटण्याबद्दलही पोच मिळते. पण इथे मात्र...

त्या रसग्रहणांवर, परीक्षणांवर आक्षेप नाही. त्या प्रतिसादांबद्दलही नाही. शेवटी खपते आहे, म्हटल्यावर कोणी काय खपवावे नि कोणी काय खपवू नये, नि कोणी काय खपवून घ्यावे नि कोणी काय घेऊ नये, हे कोणी नि कसे ठरवावे, आणि खपणार्‍यावर नि खपवून घेणार्‍यावर कोणी नि काय म्हणून आक्षेप घ्यावा, नाही का? पण एक कुतूहल मात्र जरूर चाळवते.

'कोलटकर' म्हणजे जात कोणती असावी बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"त्या रसग्रहणांवर, परीक्षणांवर आक्षेप नाही. त्या प्रतिसादांबद्दलही नाही. शेवटी खपते आहे, म्हटल्यावर कोणी काय खपवावे नि कोणी काय खपवू नये, नि कोणी काय खपवून घ्यावे नि कोणी काय घेऊ नये, हे कोणी ठरवावे आणि खपणार्‍यावर नि खपवून घेणार्‍यावर कोणी काय म्हणून आक्षेप घ्यावा, नाही का? पण एक कुतूहल मात्र जरूर चाळवते."

-अगदी. अगदी. लेखकात/कवीत उत्तम साहित्य निर्मितीचे पोटेन्शियल आहे म्हणूनच मी समजावणीच्या सुरात विनंतीच केलेली आहे. अन्यथा मी माझ्यापुरता त्यावर बहिष्कार घातला असता.

पण

"'कोलटकर' म्हणजे जात कोणती असावी बरे?"

- असा विचार मी तरी करणार नाही. तुम्ही म्हणाल, "मग या प्रस्तुत कवीबद्दलच का तसा आक्षेपार्ह उल्लेख?" तर उत्तर असे की कवी आजवरच्या साहित्य पाहता ते दलित/वादी साहित्य असल्याचा मुद्दाम उल्लेख करत आहे.अन्यथा त्याचे उपनाम जाती-निदर्शक नाही.पण त्याने तसे एक्स्क्लुजीव्ह दाखवल्याने माझ्या प्रतिसादात तो उल्लेख आलेला आहे. आणि सभ्य/असभ्य भाषा ही कुणा एका जातीची मक्तेदारी नाही हेही मी अ‍ॅम्प्ली क्लियर केले आहे. अशी कविता अन्य कुणीही लिहिली असती आणि तीत कारण नसताना (माझ्या दृष्टीने) असभ्य शब्द आले असते (आणि तेही अशा ओपन फोरमवर) - तर त्यालाही मी सभ्य शब्द वापरण्याची विनंती केलीच असती. (अगदी कोण कोलटकर/शिरवाडकर/शिंदे/सारडा/पठाण असते तरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी कविता अन्य कुणीही लिहिली असती आणि तीत कारण नसताना (माझ्या दृष्टीने) असभ्य शब्द आले असते (आणि तेही अशा ओपन फोरमवर) - तर त्यालाही मी सभ्य शब्द वापरण्याची विनंती केलीच असती. (अगदी कोण कोलटकर/शिरवाडकर/शिंदे/सारडा/पठाण असते तरी.)

'कन्सिस्टन्सी इज़ अ व्हर्च्यू ऑफ़ अ‍ॅन अ‍ॅस' असे एमर्सनसाहेब (बहुतेक) म्हणून गेलेलाच आहे... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Emerson has said that consistency is a virtue of an ass. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility. A responsible person must learn to unlearn what he has learned. A responsible person must have the courage to rethink and change his thoughts. Of course there must be good and sufficient reason for unlearning what he has learned and for recasting his thoughts. There can be no finality in rethinking.”
-B. R. Ambedkar quotes (Indian Politician and founder Of the Indian Constitution.)
(-गूगलबाबाकृपेकरून.)

पण ते वेगळ्या संदर्भात. माझी या बाबतीतली कन्सिस्टन्सी (सातत्य)बदलावी असे गूड आणि सफिष्यंट रीझन मला दिसत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानांनाही दंडवत! एव्हढा सगळा अर्थ ज्या अर्थी तुम्ही लावला आहे त्या अर्थी तुम्हाला काही विशेष माहिती आहे जी इतरांना(माझ्यासारख्या, किमान मला तरी) नाही, असे वाटते. उदा. एकनाथांचं कस्पट आणि चिल्बाट, भलांग इ. एकनाथांची ओळ माहित नसूनही समजेल, पण कवीची ओळ मात्र समाजायला नुसता काँटेक्स्ट माहित असून उपयोग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला कळलेला अर्थ -
वेश्येकडे जाणाऱ्या गिऱ्हाइकाचे हाल होतात
कारण सगळा कारभार घाईत उरकावा लागतो
कारण तिच्याकडे गर्दी असते

वेश्येचे पण हाल होतात
कारण तिला वाटेल त्या माणसाला अंगावर घ्यावं लागतं
(एवढं सांगण्यासाठी ते सगळं बंब, गोट्या ढुंगण वैग्रे)

मग यावर उपाय काय?

तर लग्न करा!

म्हणजे तुम्ही बुळे व्हा!
आणि एकाच बाईशी जुगा!
पण बाई निवडताना काळजी घ्या!
भरल्या अंगाची निवडा!
मग ती विटाळशी असताना तुम्ही कोरडे...
पण मग तुमची पुळचट संसारवेल फुलेल...
पण मग तुम्ही कसले पुरुष?
जळो जिणे लाजिरवाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

मानलं राव तुम्हाला! (तुमचा कवीशी टेलीपॅथिक किंवा तत्सम संवाद झालेला नाही असे गृहित धरून!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आयला खल्लास अर्थ! मान गये. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थ समजला. पण एक प्रश्न आहे. चारचौघात विचारावा का नको असा प्रश्न पडलेला आहे. तो सुटला की मूळ प्रश्न विचारेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असं आहे होय!
मला वाटलं त्यात याहूनही गहन अर्थ असेल.
उदा: आतला नागडा बधीर म्हणजे निर्मोही, निरंकार, निर्विकार आत्मा
बाहेरचा भलताच अधीर म्हणजे विषयलोलुप शरीर.
ढुंगणाखाली धीर दाबणारी निर्लज्ज श्रद्धा म्हणजे कर्मकांडांच्या मागे लपलेले भोगाचार वगैरे.
आणि स्वतःच्या भोगपूर्तीसाठी देवादिकांनाही संसारी वगैरे केलेलं.
आणि मग अशा उलट्या देवाची पूजा करून चूल मांडावी कशाला आणि आपल्यासारख्याच विषयलोलूप लोकांना जन्म देऊन बुळ्याचा वंश वाढवावा कशाला?
म्हणून हे सगळी धर्म-देवाची फोलपटं सोडून दे आणि सत्त्व निवड.
असं काहीतरी असेल असं मला वाटू लागलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर अर्थ!

ब्यूटी इज इन द आय ऒफ द बिहोल्डर...
तसेच-
मीनिंग ईज इन द ब्रेन ऑफ द रीडर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तरी अशा काव्यामधला काव्यगुण समजत नाही. एवढ्या शिव्या वाचल्या की मूळ अर्थ लक्षात येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिव्यक्ती व कलात्मकता जोपासणार्‍यांनी ह्या उद्बोधक व सुसांस्कृतीक चर्चेवर(कवितेवर नव्हे) मत व्यक्त करणे गरजेचे आहे, अन्यथा आजच्या मध्यमवर्गीय रसग्रहण करताना कसा थिल्लरपणा करतो आहे हे ह्या धाग्याचे संदर्भ देऊन कायमच नोंदवले जाईल.

सतीशचा कवितेमागचा उद्देश कसा आहे(किंबहुना वाटत आहे) हे जाणवून देताना प्रतिक्रियेमागचा उद्देश कसा होत आहे हे विसरले जात आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कवितेचा अर्थ चुकत-माकत (म्हणजे जास्त चुकतच) लागला पण हा प्रतिसाद मात्र तपशिलाविना अनाकलनीय वाटला. या कवितेच्या रसग्रहणाचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यात कोणी कुठे आणि कसा थिल्लरपणा केलेला आहे हे प्रतिसादकाने विदीत करावे. नावे घेऊन सोदाहरण स्पष्ट करावे. ते असे गुलदस्त्यात ठेऊ नये.

'अभिव्यक्ती व कलात्मकता जोपासणार्‍या' इतरांकडून चर्चेवर मत व्यक्त होण्याआधी या प्रतिसादकाने तरी आपले मत स्पष्टपणे मांडावे म्हणजे त्याच्यावर जरूर तर उहापोह करता येईल. येथे आलेल्या इतर प्रतिक्रियांमागचा उद्देश काय (किंवा कसा होत-) आहे असे उपरोक्त प्रतिसादकाला वाटते? ते त्याने उघड लिहावे. म्हणजे त्या-त्या प्रतिसादकांचा तसा उद्देश आहे की नाही या प्रश्नाचे निराकरण करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हास माझा प्रतिसाद अनाकलनीय वाटल्याने तुम्हास इथले कुठलेच प्रतिसाद आक्षेपार्ह वाटले नाहीत असे समजावे काय? प्रतिसादांच्या एकंदर संख्येच्या जवळपास सरासरी प्रतिसाद अनावश्यक व आक्षेपार्ह वाटले हा तपशिल माझ्या प्रतिसादावरुन लक्षात येतो.

मी मला जे वाटले ते स्पष्ट लिहिले आहेच, त्याचे/त्यावर आपण रसग्रहण/उहापोह करु शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या रसग्रहणात्म प्रतिसादात आपणास काय आक्षेपार्ह वाटले? ते सांगावे. म्हणजे त्याचे स्पष्टीकरण मी देईन. बाकीच्यांचा मक्ता मी घेत नाही. (प्रत्येक जण माझ्यासारखाच प्रश्न विचारू शकतो. ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना - आधीच असल्या कवितेवर वेळ घालवून तुम्ही पहिली चुक केलीत आता सोडुन द्याना. दुर्लक्ष करा अश्या कविता/लेखांकडे. तुमचे जगातले चांगले वाचुन झाले का सगळे? कशाला शेणात दगड टाकताय, अंगावर घाण च उडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या प्रतिसादात अपेक्षित कलत्मकता तुम्ही जोपासत नाहीत हे तुमच्या ह्या अशी कविता अन्य कुणीही लिहिली असती आणि तीत कारण नसताना (माझ्या दृष्टीने) असभ्य शब्द आले असते (आणि तेही अशा ओपन फोरमवर) - तर त्यालाही मी सभ्य शब्द वापरण्याची विनंती केलीच असती. (अगदी कोण कोलटकर/शिरवाडकर/शिंदे/सारडा/पठाण असते तरी.) विधानावरुन वाटते, तसे नसल्यास कलात्मक नग्नता व अश्लिलता ह्यातील फरक सांगण्याची विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाक्य पुन्हा एकदा देतो - "कारण नसताना (माझ्या दृष्टीने) असभ्य शब्द आले असते (आणि तेही अशा ओपन फोरमवर)-तर"
- कलात्मक नग्नता व अश्लिलता यांच्यातला फरक ज्याचा-त्याने ठरवायचा. मला जसा वाटला तसा मी तो ठरवला आहे. तो माझ्या प्रतिसादात दिसतो आहेच. तुम्हाला जसा वाटेल तसा तुम्ही तो ठरवण्याची मुभा तुम्हाला आहेच!
माझा प्रतिसाद देताना इतरांना कोणती कलात्मकता अपेक्षित आहे त्याचा मी फक्त अंदाज करू शकतो. तुम्हाला अपेक्षित कलात्मकता मी ओळखू शकलो नाही.क्षमस्व! कृपया तुम्हीच ती विस्तारपूर्वक मांडावी.

मला वाटते माझे स्पष्टीकरण पुरेसे असावे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रसग्रहणासाठी हे स्पष्टिकरण पुरेसे आहे, ते तसेच विहंपचे दिल्ली आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनाबद्दल असावे किंवा तुमचे नागासाधूंबद्दल असावे किंवा माझे इथल्या प्रतिसादांबद्दल असल्यास ते गैर ठरावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही मुद्दे:

१.कविता आवडली. कवितेत बरीच गुंतागुंत आहे - भक्ती/समाज आणि निवेदक यांची सरमिसळ आहे.

२.कवीने कुठले शब्द निवडावेत हा त्याचा निर्णय असावा. शिवाय हे शब्द कवीने इन्वेंट केलेले नाहीत - दे एक्जिस्ट ऑलरेडी !

३.मला फक्त कवितेतला ( मी व्यापक अर्थाने बोलतो आहे) - तिरकसपणा, टर उडवणारा स्वर काहिसा खटकतो. हा प्रकार साठोत्तरी कविता आणि गेल्या काही दशकात लिहील्या गेलेल्या महानगरी कवितामधून फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता वाचून काटा आला अंगावर. अंधारात एखाद्या केसाळ श्वापदावर पाय पडावा तसले काहीतरी भयानक. यामागे खूप गहिरं काहीतरी अनुभवविश्व असावं असं वाटतं पण ज्यांना ते विश्व माहित नसेल त्यांना ही कविता कळण्याची सुतराम शक्यता नाही. त्या बाबतीत ही कविता यशस्वी कविता म्हणता येणार नाही. हा कवी बरा होईल अशी आशा करावी का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं काहीसं वाटतं हे खरंय, पण तो प्याटर्नचा आपणच केलेला आरोप नसेल कशावरून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पॅटर्नचा आरोप असेलही. पण जे अनुभवविश्व एखाद्या कादंबरीचा आवाका असण्याइतके मोठे आहे ते कवितेत गुदमरून प्रकट होतेय असं जाणवलं. मुळात माध्यमच चुकलंय असं माझं मत आहे. अर्थात कविता हि अत्यंत वैयक्तिक बाब असते आणि ती कविपुरतीच मर्यादित असते हे मान्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हारुन शेख ह्यांच्या सारख्या मान्यवर साहित्यीकांचा सल्ला लेखक महाशयांनी जरुर लक्षात घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

साहित्यिक ? एक दोन प्रतिसादांच्या पुण्याईने कोणी साहित्यिक कसे होईल बरे ? हे म्हणजे नवसाला पावणार्या म्हसोबास ब्रह्मपद देण्यासारखे आहे. बाकी लेखक मजकुरांना सल्ला वैगेरे काही देत नसून 'माझे वैयक्तिक आकलन' इतकेच त्या प्रतिसादाचे स्वरूप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या विनयशील स्वभावाचा आदर वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हम्म..अंमळ असहमत पण या प्रतिसादाशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणा एका चित्रकाराचे चित्र 'मॉडर्न आर्ट' म्हणून ५०,०००/- का काय हजाराला विकले गेले होते. त्या चित्रावरती अशाच काही प्रतिक्रिया वाचल्याचे स्मरते.

अंदरकी बात म्हणे अशी होती की त्या चित्रकाराच्या कुत्र्याचा धक्का लागून एका कागदावरती बरेच रंग सांडले, तेच ते चित्र होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

अगदी..

शिवाय तो कोणी चित्रकार मधेमधे ओला ब्रश पुसण्यासाठी एक कॅनव्हासचा तुकडा वापरत असे, तोही अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणून काही लाखात विकला गेला असं ऐकलं... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर अंदरकी बात म्हणून सांगितले कि तो कागद त्या चित्रकाराच्या मुलाची शी पुसायला म्हणुन वापरलेला असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे काय? या चर्चेत हा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट (पुसलेला) कागद?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने