Skip to main content

राजकीय

पळीपंचपात्रीचा कंठाळी खडखडाट आणि झोला, बिंदी, मेणबत्तीची किणकिण

Taxonomy upgrade extras

या प्रतिसादाच्या पुढच्या दोन-चार प्रतिसादांना उत्तर -

मला इथे थोडं वेगळं म्हणायचं आहे.

ब्रिटिश राज आणि नुकसानभरपाई

Taxonomy upgrade extras

http://www.bbc.com/news/world-asia-india-33618621?ocid=fbindia

नुकतेच माजी परदेशमंत्री शशी थरूर यांनी ब्रिटन मध्ये आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात ब्रिटन कडून त्यांच्या सत्ताकालात भारतीय जनतेच्या झालेल्या अपरिमित नुकसानीबद्दल ब्रिटन ने भारताची माफी मागून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली . त्याबद्दल संपूर्ण देशात थरूरजी यांचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थरूर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रात दारुबंदी ?

Taxonomy upgrade extras

http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-m...

या बातमीचा आशय खरा मानला , तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे . मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते .याची कारणे खालीलप्रमाणे -

१. जर कायदेशीर दारुबन्दी झाली ,तर बेकायदेशीर दारुधन्द्याला बरकत येईल ,व भ्रष्टाचार वाढीस लागेल .कारण अट्टल बेवडे आणि विरन्गुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच !

'शेड्यूल्ड कास्ट' आणि धर्मांतरित व्यक्तींचे आरक्षण

Taxonomy upgrade extras

सध्या भारतात 'शेड्यूल्ड कास्ट'मध्ये फक्त हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातल्या लोकांचाच समावेश होऊ शकतो. इतर धर्मांतल्या लोकांचाही त्यात समावेश करता यावा अशा याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सरकारनं त्या मागणीला विरोध करायचं ठरवलं आहे. कारणं -

  • जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता हे केवळ हिंदू धर्मातच आहेत.

शंकेखोरी

Taxonomy upgrade extras

व्यवस्थापकः मूळ धाग्यात इथे हा प्रतिसाद होता त्याचे स्वतंत्र धाग्यात रुपांतर करत आहोत. मुळ धाग्यावर अवांतर असला तरी स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकेल असे वाटल्याने हा धागा वेगळा काढत आहोत. आवश्यकता वाटल्यास "मन" या धाग्यात भर घालु शकतात. या विषयाशी संबंधित/समांतर चर्चा इथे करता येईल

============

शंकेखोरी ही नेमकी अशाच दिशेला का जाते ?
अमेरिकेशी सख्य करुन आपण जपान, जर्मनी , दक्षिण कोरिया ह्याम्च्या मार्गाने जाउन टायगर इ़कॉनॉमिज् नाही, पण निदान टायगर कब इ़ऑनॉमिज् झालो असतो असे का वाटत नाही ?

भारतीय राजकारण (भाग ५)

Taxonomy upgrade extras

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो. या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी! कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

"हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता!"

Taxonomy upgrade extras

काल काही कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलो असतानाचा प्रसंग. एक बारा-तेरा वर्षांची मुलगी आईवडिलांसोबत तक्रार नोंदवायला आली होती. समाजातील सध्याच्या दुर्दैवी परिस्थितीस साजेशी अशी छेडछाडीची तक्रार. परिसरातील दोन मवाली तिची रोज क्लासला जाताना छेड काढतात अशी तक्रार तिने नोंदवली आणि पोलिसांनी ताबडतोब त्यांना पकडून आणले. आधी पोलिसांसमोर दोघांनी साळसूदपणाचा आव आणला, पण पोलिसांनी शिव्या घालायला सुरुवात केल्यावर ते दोघे भडकले आणि पोलिसांनाच शिविगाळ आणि जातीवाचक धमक्या द्यायला सुरुवात केली.

राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

Taxonomy upgrade extras

अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या .

महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव

Taxonomy upgrade extras

You are here
स्वगृह » महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
प्रेषक, धर्मराजमुटके, Wed, 12/11/2014 - 18:07

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत ‘आवाजी शक्ती’ दाखवून देत ‘विश्वास’ जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र शिवसेना आणि कॉंग्रेसने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले असून शिवसेनेने मतदान पुन्हा घ्यावे तर काँग्रेसने अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे विविध बातम्या वाचून कळते.
१. आवाजी मतदान काय आहे ?
२. मतविभागणी कशी मोजतात ?

लोकशाहीची थट्टा

Taxonomy upgrade extras

अखेर अमेरीकेच्या रिपब्लिकन पक्षाने सीनेटवर आपले बहुमत प्रस्थापित केले. अमेरीकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात रिपब्लिकन पक्ष आगोदरच बहुमतात होते आता सीनेटही हातातुन गेल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागणार आहे. अध्यक्ष जरी डेमॉक्रॅटिक पक्षाचे असले तरी दोन्ही सभागृहात बहुमत रिपब्लिकन पक्षाचे असल्याने डेमॉक्रॅटिक पक्षाने मांडलेले कुठलेही विधेयक पारीत न होउ देणे, अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी सरकार बंद पाडणे आणि बराक ओबामां यांना व्हिटो पॉवर वापरायला लाउन त्यांची एकुण प्रतिमा मलिन करणे हे रिपब्लिकन पक्षाचे येत्या दिवसातले मनसुबे आता पुर्ण होतील यात शंका नाही.