अॅकलेशिया कार्डिया - सुटका-४
लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली. त्यांनीही, तुमचे डॉक्टर माझेच विद्यार्थी असून ते तुमची व्यवस्थित काळजी घेतील, असा दिलासा दिला. त्या सर्वांच्या मते, स्टेंटस काढण्यासाठी सहा आठवडे थांबणे जरुरी होते.
अखेर सहा आठवड्यानंतर माझी एक डायनॅमिक सी.टी. स्कॅनची टेस्ट घेण्यात आली. त्यांत, माझी अन्ननलिकेची जखम पूर्ण भरुन आल्याचे निदान झाले. ८ मे पासून स्टेंटपंजरी पडलेला मी, २१ जूनच्या दक्षिणायनाची वाट बघावी लागणार की काय, या चिंतेत होतो. पण १९ जूनच्या दिवशी डॉक्टरांनी माझे स्टेंटस काढायचा निर्णय घेतला. जनरल अॅनास्तेशिया देऊन सकाळीच माझे दोन्ही स्टेंटस काढण्यात आले. त्यांतही डॉक्टरांच्या कौशल्याची कसोटी लागली असे नंतर कळले. वरचा, नंतर बसवलेला पूर्ण सिलिकोन आच्छादित स्टेंट विनासायास निघाला. पण जठरांत अर्धवट लोंबणारा स्टेंट, हा पूर्णतः कव्हर्ड नव्हता. त्याच्या दोन्ही तोंडाला धारदार मेटलचे धागे उघडेच होते. इतक्या दिवसांत त्यावर टिश्यू ग्रोथ झाली होती. त्यामुळे तो तसाच वर ओढून घेणे शक्य नव्हते. डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेऊन त्याला तसाच जठरांत ढकलला. तिथे तो पोहू लागला. मग पुन्हा त्याचे एक तोंड धरुन, तो बाहेर काढण्यात आला. या सर्व प्रकारांत, अन्ननलिकेला आतून ओरबाडले जाणे अपरिहार्य होते. पण त्या जखमा ४८ तासांत भरुन येतात. ऑपरेशननंतर दोन तास मला निरिक्षणाखाली ठेवले गेले. त्यानंतर सर्व प्रकारच्या टेस्ट करुन घरी सोडले. पहिले दोन दिवस, औषधे आणि लिक्विड डाएट वरच रहावे लागले. आज पहिल्यांदाच, न्याहारीला भाताची पातळ पेज खाताना बरे वाटले. आता काही दिवस, खिचडी, पातळ डाळभात यावर काढल्यावर मी नियमित अन्न घेऊ शकेन. या सर्व प्रकरणातून आता मी सहीसलामत बाहेर पडलो आहे, असे आता म्हणू शकतो. माझ्या या संकटाच्या काळात, मला प्रत्यक्ष वा फोनवरुन तसेच नेटवरुन तुम्ही सर्वांनी जो धीर दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्व हितचिंतकांचा कृतज्ञ आहे.
जाता जाता, स्टेंटबद्दल थोडी माहिती. पहिला स्टेंट १२ सेंमी लांब व २.५ सेंमी रुंद होता. दुसरा १० सेंमी लांब व २.५ सेंमी रुंद होता.
ह्यातला स्वच्छ स्टेंट पूर्ण आच्छादित आहे तर रक्ताळलेला स्टेंट जठरांत पोहून आला आहे.
माहितीमधल्या टर्म्स
रामदास नि मनुष्यजीवन
तात्विक पातळीवर मी पराकोटीचा अश्रद्ध माणूस आहे. म्हणजे देव, धर्म, परंपरा ते विज्ञान, गणित ते आधुनिक राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र ते आधुनिक मानवतावाद यांच्या मूलाधारांवरच मला प्रचंड शंका आहेत. माणसाच्या बर्याच वर्तनांत त्याच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचा टच येतोच येतो. तेव्हा कुठल्या तरी एका प्रकारच्या विचारसरणीवर श्रद्धा असणारे लोक मला सुखी भासले नि मलाही सश्रद्ध असण्याची गरज वाटली.
तेव्हा मला नातेवाईकाने दासबोध वाचण्याचा सल्ला दिला. जे जे वाक्य पटते स्वीकारायचे, जे नाही ते टाकून द्यायचे नि जे कंफ्यूजन आहे त्यावर विचार करायचा म्हणजे तू हळूहळू पक्के तत्त्वज्ञान विकसित करशील, त्याच तूझ्या श्रद्धा, इ इ. पण प्रारंभीच्या एका लेखात मनुष्य जन्म कसा भयंकर आहे याचे वर्णन करून रामदास वाचकाला इतके घाबरवतात कि तो लगेच मोक्षासाठी तयार होतो. गर्भाशयातील यातना, गर्भ बाहेर येताना प्रॉब्लेम झाला तर त्याच्या कश्या खांडोळ्या करतात, मग आजार, उपासमार, दुष्काळ, स्वकीयांपासून दूर जावे लागणे, २-३ बायका मरणे, त्यांना यवनांनी पळवून नेणे, रेप करणे, लेकरांकडून दुष्ट वागणूक, शेवटी सडके म्हातारपण, इ इ. त्यांनी दिलेली विशेषणे आणि भयानकता आणण्यासाठी सिच्यूएशनला अजून भडक बनवणे हा प्रकार मला आत्ता आठवत नाहीत. पण एकूणच वाचक प्रचंड घाबरत असावा. शिवाय 'मागचा काळ' म्हणताना बहुसंख्य ऐसीकर हाच समास रेफरन्स म्हणून वाचत असावेत, त्यांचे मत बनवताना.
'मागचा काळ' म्हणताना ऐसीकर
'मागचा काळ' म्हणताना
ऐसीकर लिबरल सेकुलर लोक दासबोधासारखा भडक अन कम्यूनल ग्रंथ वाचत असतील असं सूचित केलंत? कुठं फेडाल हे पाप?
ते एक असोच. पण इन जण्रल मागचा काळ इ. म्हणताना लोकांचे मत हे 'राजा शिवछत्रपती' इ.इ. सदृश कादंबर्या, तसेच दलितवाङ्मयातील काही उतारे यांवरच आधारित असते.
बाकी मूलाधाराबद्दलच्या शंकांबद्दलही अजून काही येऊदे.
हट्ट
मुदलात पुरोगामी माणूस म्हटला की त्याला यच्चयावत धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक प्रतीकस्थानांबद्दल वा ग्रंथांबद्दल आंधळा द्वेष असला तर पाहिजेच, शिवाय त्याने भावनिकदृष्ट्या अतिसंतुलित (कोरडे-स्थितप्रज्ञ) असलेच पाहिजे हा हट्टही एकांगी विचारसरणी दर्शवतो.
"हा हट्ट नसून असे निरीक्षण आहे " असा प्रतिवाद होउ शकेल काय ? ;)
एक्स्क्यूज़ मी
शिवाय त्याने भावनिकदृष्ट्या अतिसंतुलित (कोरडे-स्थितप्रज्ञ) असलेच पाहिजे
सर्वच ठिकाणी नाही ओ. स्वतःच्या मूल्यांबद्दल भावनिक अन बाकी सर्व गोष्टींबद्दल अतिसंतुलित राहिलं तरी काम भागतं.
मुदलात पुरोगामी माणूस म्हटला की त्याला यच्चयावत धार्मिक, पौराणिक, सांस्कृतिक प्रतीकस्थानांबद्दल वा ग्रंथांबद्दल आंधळा द्वेष असला तर पाहिजेच,
च्च च्च. अहो, युगानुयुगांच्या बुरसट मानसिकतेवर कोरडे ओढण्याला आंधळा द्वेष म्हणताहात तुम्ही! अशाने का माणूस पुरोगामी ठरतो? बाकीचे बूर्झ्वा लोक त्याला आंधळा द्वेष म्हणतात. ते म्हणणारच, शेवटी बूर्झ्वा मनुवादीच ते! पण त्यामुळे कोरडे ओढण्याचे थांबवू नये. काही नाही झाले तरी किमान कंडुअतिशमन तरी अवश्य होते हेही नसे थोडके!
त्यामुळे वरील 'आग्रह' हा एकांगी आजिबात नाही. इतके विचारवंत असणारे कुरुंदकरही देवळात सोवळ्याने पूजा करतात म्हणजे शेवटी जातीवर गेलेच ना! तस्मात जिथे कुरुंदकरांसारखे लोकही चळू शकतात तिथे बाकीच्यांची काय कथा? अतएव कोरडे ओढणे कदापि थांबवू नये. बूर्झ्वा मनुवाद्यांच्या पिरपिरीकडे तर आजिबात लक्ष देऊ नये. अच्छे दिन आल्यामुळे उजवे सध्या माजलेत, पण हेही दिवस जातील आणि सेकुलर-लिबरल झेंडा पुनरेकवार नव्या जोमाने फडकू लागेल ह्यात संशय नाही!
छान! चांगली बातमी. तुमचे आणि
छान! चांगली बातमी. तुमचे आणि या सर्व काळात तुमची प्रत्यक्ष काळजी घेणार्यांचे कौतूक आहे :-)