योनीच्या फनीच्या फनी गोष्टी !
जेहत्ते काळाचे ठायी ,लज्जागौरी कृपेने, ८४ लक्ष योनींच्या फेऱ्यातून मानवयोनीत जन्माला आल्याने ,ठाण्यातल्या गडकरी रंगमंचावर आमच्या टवाळ त्रिकुटाला,' योनीच्या फनीच्या फनी गोष्टी' ऐकवण्याची योजना नियतीने केली होती.हा बहुचर्चित प्रयोग फारसा चांगला जमला नाही याची कल्पना मित्रमंडळींनी दिली होती. त्यामुळे उत्तम नसेल तरी वेगळा प्रयोग बघायला आम्ही तयार होतो. सभागृहात दुसऱ्याच रांगेत आमची तिकिटे असल्याने, कान बंद केले असते तरी या गुजगोष्टी कानाआड करता येणार नव्हत्या.सभागृह एकविसोत्तर सर्व वयोगटातल्या लोकांनी ७०/८० % भरले होते. पडदा उघडण्यापूर्वी एका पात्राने नाईलाज झाल्यागत रटाळ निवेदन केले. ज्याला हा प्रयोग पाहणे शक्य नाही त्यांनी उठून जावे आणि इतरांना शांतपणे बघू द्यावा ,असे तिने सुचवल्याने आम्हाला एकदम सुचेनासे झाले.स्टेजला नाक लावून बसल्याने दंगा करण्याचीही चोरी झाली,मागे बसलो असतो तर मनमुराद हसणे तरी शक्य झाले असते. त्यामुळे तोंड दाबून हसण्याची पराकाष्ठा केली आणि सौजन्यपूर्ण , सहिष्णुतेचा आदर्श पाठ दाखवला. मध्यंतर न घेता, अखंड गजरात नुनी,योनी,चूत आणि पुच्ची वगैरे ऐकावे लागल्याने आमचे कान किट्ट झाले. आम्हालासुद्धा प्रयोग पाहून झाल्यावर हा एकमेव अवयव उरणार आहे की काय, असा काळजाचा थरकाप करणारा, भयाण विचार मेंदू कुरतडू लागला.रंगमंचावर सुरु असलेल्या हास्यास्पद आणि बालिश गोष्टी पाहून प्रचंड पण नियंत्रित हसू येऊ लागल्यावर मग मात्र आमचा जीव योनीत उप्स भांड्यात पडला.
द्वयर्थी हिंदी गाण्यांची अंताक्षरी सुरु झाली.खडा है ,बडा है,चढ गया उपर रे वगैरे गाणी आणि झिम्मा पाहून प्रेक्षक चेकाळून शिट्या वाजवू लागले.विविध वयातल्या आणि पंचखंडातल्या योन्या रंगमंचावर फेर धरून आपापल्या कहाण्या सांगू लागल्या. एक होती नुनी तिची झाली योनी आणि लागली लेस्बियन भजनी ! कधी जगभरात योनीवर होणारे अत्याचार सांगितले गेले तर कधी योनीला शिस्नापेक्षा जास्त मज्जा असल्याने मज्जाच मज्जा असते हे सांगून आमच्या ज्ञानात भर पाडली.( हा विनोद एक नंबरी आहे याबद्दल आमचे एकमत झाले.) स्टेजवर एका कोपऱ्यातली योनी, अंधारात मेणबत्ती लावून युद्धातल्या अत्याचाराबद्दल सांगण्याचा गंभीर प्रयत्न करत असताना, दुसऱ्या कोपऱ्यात एक दवणीय योनी म्हणत होती,"माझी योनी झुळझुळ पाणी " आम्ही खुर्चीवरून कोसळून पडलोच! तिला योनीतून झुळझुळ पाणी म्हणायचे होते का ? स्त्रियांना कामसुख मिळावे यासाठी कामसुखदायिनी देवी म्हणून खुद्द लेखिका अवतरली. तिने विविध प्रकारच्या स्त्रिया कामसुखाने कशा हुंकारतात ते मादक वगैरे आवाज काढले.मागच्या रांगांमधल्या डॉल्बीनिष्ठ आतुर प्रेक्षकांना ते कानठळक ऐकू आले नसावे. ते ,"आवाज ..आवाज " असे ओरडू लागले.त्यावर,देवीने ,"काय हुंकार नीट ऐकू येत नाहीयेका ?" अशी अगदी मधाळ, मादक आणि हजरजबाबी विचारपूस केली.थेट स्टेजवरून विचारणा झाल्याने प्रेक्षकांच्या परमसुखाची परमावधीच झाली. हे सादरीकरण पोर्नसुखद वाटल्याने याला प्रेक्षकांचा सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला.( कुणाला सांगू नका हं पण ,असे फेक आवाज काढून स्त्रिया सहज पुरुषाला उल्लू बनवतात असे आम्ही साईनफिल्ड सिरीयल आणि हॅरी मेट सॅली सिनेमात बघितले आहे.) आम्हाला हुंकार प्रकरणाची किळस येऊ लागली होती. स्टेजवर जे काय सुरु होते ते बालिशपणाचा कडेलोट करणारे होते.लिंग आणि योनीची पूजा करणाऱ्या देशात या प्रयोगाने खरच काही साध्य झाले असेल का असा प्रश्न पडला.सादरकर्त्या कलावंताचे धाडस कौतुकास्पद आहे यात काहीच शंका नाही फक्त त्याला अभिनय म्हणता येईल का हा प्रश्न पडला.
प्रयोग संपल्यावर, ओला झालेला कुत्रा फडफड अंग हलवून पाणी झटकतो त्याप्रमाणे फडफड केल्यावर, रस्त्यावर गोणीच्या गोणी भरून योनी सांडल्या हो योनीशप्पथ !
समीक्षेचा विषय निवडा
छे छे! संस्कृतिरक्षक टोळ्या
छे छे! संस्कृतिरक्षक टोळ्या केव्हा धावून येतात, त्याबद्दलचा तुमचा अभ्यास कमी पडतो आहे असं म्हणायला पाहिजे. या नाटकात काहीही विचारप्रवर्तक, मूर्तिभंजक, अस्वस्थकारक घटक नाही. आंबटशौकीन लोकांना आवडेल असा विचारशून्य आणि बंडखोरीचा आव आणणारा मालमसाला भरपूर. त्यावर टोळ्या कुठल्या धावून जायला?
प्रयोग संपल्यावर, ओला झालेला
प्रयोग संपल्यावर, ओला झालेला कुत्रा फडफड अंग हलवून पाणी झटकतो त्याप्रमाणे फडफड केल्यावर, रस्त्यावर गोणीच्या गोणी भरून योनी सांडल्या हो योनीशप्पथ !
सलाम! हे चित्र डोळ्यांसमोर येऊन डोले हसून हसून पानाव्ले.
बहुतेक यातल्याच एका बैंची न्यूजचानलीय मुलाखत पाहिली होती. त्यात त्यांच्या पाच वर्षांच्या मुलावर "चूत चूत चूत" या गाण्याचा काय परिणाम झाला यावर भाष्य होतं.
यावर कणॅकरांचा लोकप्रभामध्ये
यावर कणॅकरांचा लोकप्रभामध्ये लेख आला होता आणि खरेबाई पेटल्या होत्या त्यावर.
हे नाटक पाहून 'स्त्री म्हणजे फक्त योनी, तिला मेंदू, भाव-भावना, तिची बुद्धी, कौशल्य हे सगळं काही नाही' हेच फक्त सूचित होतं. किस बाई किस किस, दोडका किस च्या चालीवर चूत बाई चूत म्हणण्यातून नक्की काय साध्य होतं हे कळालं नाहे. आपल्याकडे काही शब्द मातृभाषेतून बोलण्यात लोकांना कसंसंच होतं, पण मग इतर भाषांतून ते बोलले जातातच.
मुळात ज्या संकल्पनेचं मूळ भारतात नाही, जिथं साधारणतः लोक एकपत्नी-एकपती असतात, विवाहपूर्व संबंध अगदी नगण्य नसले तरी सर्रास नाहीत तर मग ज्यांची संस्कृती अशी आहे अशा बायकांच्या मुलाखतींवर आधारित कलाकृती इथं आपली वाटणार कशी?
...जिथं साधारणतः लोक
...जिथं साधारणतः लोक एकपत्नी-एकपती असतात, विवाहपूर्व संबंध अगदी नगण्य नसले तरी सर्रास नाहीत तर मग ज्यांची संस्कृती अशी आहे अशा बायकांच्या मुलाखतींवर आधारित कलाकृती इथं आपली वाटणार कशी?
हे पटलेलं नाही.
नाटक भिकार आहे हे तर झालंच. पण भारतात विवाहपूर्व आणि / किंवा विवाहबाह्य संबंध नाहीत / अभावानं आहेत, हे म्हणणं धाडसाचं आहे. ते भारतात आहेतच. त्यामुळे निर्माण होणारे आणि त्याखेरीजही असणारे स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दलचे प्रश्न चिकार आहेत.
नगण्य नाहीतच. पण पाश्चात्य
नगण्य नाहीतच. पण पाश्चात्य मालिकांमध्ये पाहातो तसे खूपच सर्रासही नाहीत. (कदाचित समाजमान्यता नसल्याने इतक्या उघडपणे नसेल, परंतु लग्नापर्यंत कुंवार असलेले लोक चिक्कार सापडतात) त्याला अनुकूल-प्रतिकूल मते असणारे लोकही आहेत. माझा मुद्दा असा आहे की आपली आणि त्या मुलाखतवाल्या बायकांची एकूण लैंगिक संस्कृतीच वेगळी आहे. असे असताना तिला मूळ धरून तिच्यावरती नाटक करून आपल्याला योनीच्या गजरात ऐकायला आणि पाहायला लावणं हा शुद्ध आचरटपणा आहे.
हाईल व्हाजिष्टाईन - अर्थात योनीच्या मनीच्या गुजगोष्टी
जेव्हापासून उसंत सखूबाईंनी ऐसीवर भयाण चित्रपटांवर लेखन सुरू केलं तेव्हाच ठरवलं होतं की हिच्याबरोबर एकतरी चित्रपट, नाटक बघितलंच पाहिजे. वाईट असेल तर आणखी बरं. ही संधी एवढ्या लवकर आणि सहज येईल असं वाटलं नव्हतं. 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी'चं मूळ इंग्लिश नाटक 'व्हजायना मोनोलॉग्ज' वाचल्यामुळे नाटकाचा विषय काय, कितपत अपेक्षा ठेवायच्या याची काहीशी कल्पना होती. सदर प्रयोग नाटक म्हणून आणि संकल्पनेचं सादरीकरण म्हणूनही किती रिकामा आणि प्रसंगी तिडीक जाणारा आहे याबद्दल माझा अंदाज पारच चुकला.
सुरूवातीलाच दोन मुली स्पायरल बाईंडींग केलेल्या एका पुस्तकावरून एकमेकींमध्ये भांडताना दाखवल्या आहेत. त्यांच्या बटबटीत, शाळकरी ("हिनी माजा खोडरबर ढापला", "तिनी माजी पेन्सिल पळवली") गप्पांवरून समजतं की हे पुस्तक 'व्हजायना मोनोलॉग्ज' आहे. कॉपीराईटचं उल्लंघन करून झेरॉक्स मारलेलीच प्रत तिथे प्रॉप म्हणून वापरायची तर झेरॉक्स करतानाच दोन प्रती का काढल्या नाहीत? मूळ पुस्तक झेरॉक्स प्रतीपेक्षा आकाराने छोटं असलं तरी मुखपृष्ठ पुरेसं आकर्षक आहे. आपल्याला ज्या पुस्तकाचं एवढं महत्त्व आहे त्याची प्रत्येकीकडे एकेक प्रतही का असू नये, पुस्तकं स्कॅन करून मिळतात, संपूर्ण नाटकाची इंग्लिश संहिता जालावर उपलब्ध आहे तिथे एका प्रतीवरून दोन मुलींनी खोडरबर-पेन्सिलछाप भांडणं करण्याच्या कृत्रिम प्रसंगापासूनच आम्ही हसायला सुरुवात केली.
एक बाई पुढे घडणाऱ्या नाट्यप्रवेशाबद्दल समीक्षकी आव आणत माहिती देणार आणि मग तो प्रसंग बघायचा अशी नाटकाची साधारण रचना. नाटकाचं स्वरूप पाहता तिथे कोणी कच्चेबच्चे आलेले असणार नव्हते. मग पुढे घडणाऱ्या प्रवेश, प्रसंगांमधूनच काय बोला की; नेपथ्य, संगीत, संवाद, मुद्राभिनय, प्रकाशयोजना, कपडेपट या सगळ्यांतून बरंच काही सांगण्याची संधी असताना पुन्हा निवेदनात नवनीत गाईड देऊन प्रेक्षकांच्या बुद्धीबद्दल शंका घेतल्या होत्या का इतपत प्रश्न पडायला सुरुवात झाली होती.
या सगळ्यात एक वंदना खरे वगळता बाकी सगळ्यांचे शब्दोच्चार, संवाद म्हणण्याची पद्धत हा कृत्रिमपणाचा कडेलोट होता. एका अभिनेत्रीला (अभिलाषा) काही प्रसंगांमध्ये ग्रामीण बोलीत संवाद म्हणायचे होते, ते वगळता बाकी डिक्शनच्या नावे बोंब. या मुलीचा आवाज मुळात चांगला आहे, वापरून घेता आला तर फारच मजा आली असती. एका प्रवेशात, एक मुलगी आपली लहानपणापासूनची डायरी वाचून दाखवते, वय वर्षं पाच, नऊ, बारा, अठरा असं काही. वय वर्षं पाच आणि नऊ असतानाचे उच्चारच फक्त अकृत्रिम वाटले.
नाटक म्हणून एवढा बटबटीतपणा कमी होता का काय म्हणून पुढे संहितेमध्ये आणखी गंमती. नावावरूनच स्पष्ट आहे की स्त्रियांबद्दल बोलताना योनी हे प्रतीक म्हणून वापरलेलं आहे. त्याबद्दल वेगळा आक्षेप घेता येईल की स्त्रिया किंवा स्त्रियांची लैंगिकता फक्त योनीपुरती मर्यादित नसते. पण मूळ नाटकात याचं प्रयोजन का असू शकेल याची काहीशी कल्पना करता येईल. पहिल्या पिढीतल्या अमेरिकन स्त्रीवाद्यांचं साहित्य वाचून ते थोडं लक्षात येतं. कॅथलिक, (कदाचित ख्रिश्चन धर्माच्या इतरही पंथांमध्ये) योनी या अवयवाला हिणकस, वाईट, वगैरे वगैरे म्हटलेलं आहे. सामान्य ख्रिश्चन स्त्रियांवर याचा बराच पगडा होता, पुरुषांवरही. दोन वर्षांपूर्वी एका अमेरिकन आमदाराने सभागृहात बोलताना व्हजायना हा शब्द वापरला आणि तिला गप्प केलं गेलं. (बातमी) पण माध्यमं आणि सामान्यांनी मोठ्या प्रमाणावर या प्रकारावर टीका केली. तरीही ... नाटकाचं नाव वाचल्यावर हे नाटक मराठीत आणताना रूपांतर केलं आहे का भाषांतर अशा प्रकारचे प्रश्न होतेच.
(अवयव या अर्थाने) योनी या शब्दाबद्दल मराठीत, भारतात फार प्रचंड संकोच नाही; किंवा जेवढा शिस्न या शब्दाबद्दल आहे तितकाच. आपल्याकडे लज्जागौरी आहे, कामाक्षी देवी आहे, शंकराच्या पिंडीभोवती योनीलाही स्थान आहे, जुन्या मंदिरांच्या बाहेर कोरीवकाम करून लैंगिकतेला तिथेही स्थान दिलेलं आहे. उदाहरणार्थ, हजार वर्षं जुन्या, अंबरनाथमधल्या शिवमंदिरातले हे दोन फोटो. एक, दोन.
'मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार' या संग्रहाचे संपादक आणि अभ्यासक अ. द. मराठे म्हणतात, "रिकामचोट, अडाणचोट, फुकटचोट, खुळचोट, भिकारचोट, धंचोट (धनचोट), मेंगचोट (बावळट, बुळा) ... अशा शब्दांचा विग्रह 'अडाणी आहे चोट ज्याचा असा तो' असा बहुव्रीही समाजस समजून केला जातो. पण अडाणीपणा, फुकटेपणा इत्यादी वैशिष्ट्यें जननेंद्रियाची नसून तीं माणसांची आहेत. .... अशा प्रकारे 'चोट' या शब्दाचा माणूस हाच अर्थ अभिप्रेत आहे." थोडक्यात 'बहुजनसंस्कृती'मध्येही योनीसाठी वापरला जाणारा शब्द चोट हा माणूस या अर्थी वापरला जातो, आयमाय काढण्यासाठी नाही, स्त्रियांचा पाणउतारा करण्यासाठी नाही.
अशा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान दुय्यम वगैरे ठीक, पण मुद्दाम योनी या शब्दाबद्दल बोलायचं असेल तर पाश्चात्यांपेक्षा काही निराळं बोलावं लागणार नाही का?
दुसरा दुय्यम मुद्दा आहे. अमेरिकेतल्या पहिल्या पिढीतल्या स्त्रीवाद्यांनी, त्यांच्याही आधी 'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन द बोव्हारने फ्रॉईडवर टीका केली आहे. स्त्रियांना शिस्न नाही म्हणून त्यांचं समाजात स्थान दुय्यम आहे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधले प्रश्न शिस्न नसल्यामुळे येत नाहीत, अशी काहीशी त्याची थिअरी. पुरुषांचा इगो म्हणजे शिस्न या दाव्याची टिंगल म्हणून स्त्री म्हणायच्या जागी योनी म्हणणं आणि त्यावरून विनोद करणं गंमतीशीर आहे. पण जी विचारसरणी कधीच मागे पडलेली आहे, त्यावर टीका करून तिला अधिक महत्त्व द्यावं का? आणि भारतीय समाजात फ्रॉईड कितपत रुजलाय?
योनीबद्दल भारतात बोलायचं असेल तर योनीशुचिता हा एक मोठा भंपकपणा भारतीय समाजात पुरेपूर भिनलेला आहे. मराठी नाटकात त्याबद्दल एक शब्दही असू नये! बरं मराठीत, भारतात रूपांतराची परंपरा आहे. मराठी नाटकांत 'ती फुलराणी' भारतीयीकरण होऊनच आलं आणि लोकप्रिय झालं. अनेक हिंदी चित्रपट 'ढापलेले' न वाटता 'रूपांतरित' केलेले वाटतात. कारण त्यांचं केलेलं पुरेसं भारतीयीकरण.
या भारतीयीकरणाचा अगदीच प्रयत्न केलेला नाही असं नाही. नाटकात 'चूत बाई चूत, चुताडी चूत' असं गाणं आहे. (हा भाग येईस्तोवर इतके हास्यास्पद प्रकार झाले होते की हसून हसून आमचं पोट दुखायला लागलेलं असल्यामुळे आम्ही कोणी या गाण्यावर हसायचा प्रयत्न केला नाही. पण ते निराळं.) जिथे हा प्रयत्न करता येतो तिथे बोस्नियाक स्त्रीचं दुःख कशाला सांगावं? फाळणीच्या वेळेस झालेले अत्याचार, नरोडा-पाटिया, 'निर्भया' ही शुद्ध देशी अत्याचाराची प्रकरणं आम्हाला माहीतच नाहीत का? हे दुःख इथली का तिथली म्हणून बदलतं असा दावा नाही, पण मूळ नाटकात बोस्नियाक स्त्री आहे, ते असंच्या असं निवेदनातून का सांगावं? हे दुःख बोस्निया, यादवी युद्धापुरतं मर्यादित नसून स्त्रियांच्या वस्तुकरणाचं आणि त्याला भर पडलेल्या हिंसक, हिडीसपणाचं जागतिक दुःख आहे.
त्यातल्या त्यात उजवा भाग असा की बोस्नियाक स्त्रीचं दुःख मांडणारी (अभिलाषा) अतिशय चांगल्या पद्धतीने ते मांडत होती. पण सादरीकरणात तो मोनोलॉग सलग येत नाही. एकीकडे एका मध्यमवर्गीय स्त्रीचं (वंदना खरे) एसीतलं, गुलाबी दुःख अतिदवणीय भाषेत येत होतं; हिचा एक परिच्छेद, तिचा एक. "माझी योनी झुळझुळ पाणी" वगैरे बटबटीत वाक्यं ऐकताना एकीकडे 'निर्भया' प्रकारची हिंसा मांडत असाल तर त्याचा काय परिणाम साधणार आहे? (दुसऱ्या रांगेतली तिकिटं काढायची दुर्बुद्धी झाली नसती तर निदान समाधान होईस्तोवर हसता आलं असतं.)
एवढं सगळं असूनही, "ठीक आहे, निदान आपल्याकडून स्त्रियांना लैंगिक उपभोग, योनीबद्दल जी काही किळस वगैरे वाटत असेल ती जावी म्हणून प्रयत्न करत आहेत, तर नको खुस्पटं काढायला" असंही म्हणायची तयारी होती. पण स्त्रियांनाच नावं ठेवायला सुरुवात झाली तिथे उरलीसुरलेली सहानुभूती संपली. संभोगाच्या वेळेस स्त्रिया आवाज करतात, हुंकार काढतात याचा अभिनय (आम्हाला पॉर्नछाप वाटलं तरीही) कोणालातरी मुक्ततेची जाणीव देणारं असेल इथपर्यंत खुला दृष्टिकोन ठेवला होता. पण त्या प्रसंगात काही बायका हावरटच असतात, कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या बायका कशा (पहा, पहा आचरट वाटणारे) शब्द वापरतात अशा प्रकारची judgemental विधानं (म्हणे) स्त्रीवादी नाटकात कशी काय चालतात? त्यातही एकूण प्रसंगच पॉर्न म्हणण्याच्या पातळीलाच गेलेला होता. एकच एक हुंकाराचा टोन म्हणताना चार वेगळे शब्द वापरले म्हणजे वैविध्य दाखवलं गेलं अशी दिग्दर्शिकेची समजूत असावी. आमच्या मागच्या रांगेत तरुण पुरुष बसलेले होते. त्यांना बरीच आंबट मजा येत होती. लैंगिकता फक्त योनी किंवा शिस्नात मर्यादित नसते हे एकंदर त्या प्रसंगाला मिळणाऱ्या प्रतिसादातून समजलंच.
सर्वसाधारण विनोदांची पातळी म्हणजे 'आम्ही अपशब्द वापरला, आता हसा' छापाची आहे. हे नाटक पाहिलं त्याच्या दोन-चार आठवडे आधी 'बर्डमॅन' पाहिला. त्यात बरेच अपशब्द वापरलेले आहेत; अनेक गंभीर प्रसंगांमध्येही. पुण्यातलं पब्लिक अपशब्द आल्यावर गांभीर्य न ओळखून हसत होतं यामुळे आम्ही पकलो होतो. इथे सादरीकरण करणारेच त्या पातळीची 'संवेदनशीलता' दाखवत होते. एकच विनोद आम्हाला आवडला : स्त्रियांच्या योनीभागात पुरुषांच्या शिस्नापेक्षा दुप्पट मज्जातंतू असतात. म्हणजे मज्जाच मज्जा. फ्रॉईडची टिंगल करण्याची संधी वाया गेली.
हा सगळा प्रकार दोन तासांपेक्षाही कमी काळात आटोपला. खुर्चीवरून उठतानाच "प्लीज मला कोणीतरी माझ्या योनीपासून वाचवा रे" अशी एक करुण आणि आर्त हाक मी माझ्या सख्यांना दिली. त्यांनी दुष्टपणे त्यावर छद्मी हास्य केलं. निघताना गडकरी रंगायतनच्या रांगांमधून चालत जावं असा विचार मनात आला. किती ठिकाणी चप्पल चिकट होते ते बघता आलं असतं.
प्रयोगानंतर वंदना खरेंना भेटून जावं असा विचार आधी केला होता. गेल्या वर्षी मीच त्यांची मुलाखत घेऊन ऐसीवर प्रकाशित केली होती. हे नाटक बघितल्यावर मनात ठरवलेला प्रयोग करायची हिंमत माझ्याकडे नव्हती. आम्ही तिघी रस्त्यावर खिदळत बाहेर पडलो. पुढे काही काळ 'मी'च्या जागी 'माझी योनी' असं बोलून तिन्ही गोण्यांनी स्वतःची करमणूक करून घेतली. चारचौघांत 'योनी'ची 'गोणी' झाली. "मै और मेरी गोणी अक्सर ये बातें करतें हैं..." असं दमदार बीज एका गोणीतून(!) निघालं. त्याचा बोळा अजून निघालेला नाही. एका गोणीने या नाटकाचं जर्मन रुपांतर करावं, अशी सूचना केली. दुसरी गोणी त्यावर ताडकन उठली, आपला उजवा हात पुढे केला आणि जोरात सॅल्यूट ठोकल्यासारखी ओरडली, "हाईल व्हाजिष्टाईन".
चोट
थोडक्यात 'बहुजनसंस्कृती'मध्येही योनीसाठी वापरला जाणारा शब्द चोट हा माणूस या अर्थी वापरला जातो,
चोट हा शब्द स्त्रियांच्या अवयवासंदर्भात नसून पुरुषांच्या अवयवासंदर्भातील आहे असे वाटते.
उदा. ऐदी किंवा शोऑफ करणाऱ्या पुरुषांसाठी गावाकडची एक म्हणः *जेवण नाही पोटाला, उटणं लावतोय चोटाला*
+/-
शिश्नाकरिताचे ग्राम्य शब्द जितपत साध्या वापरात आलेले आहेत, तितपत योनीबाबतचे शब्द आलेले नाहीत.
गंमत म्हणजे समांतर बाब अमेरिकन इंग्रजी भाषेतही आहे ("ही/शी इज् सच् अ डिक्/डिक्-हेड्/प्रिक्" अथवा "ही/शी हॅज् द् बॉल्स् टु डू सम्-थिंग्" ही वाक्ये जितक्या साध्या बोलण्यात चालून जातील, त्या मानाने "ही/शी इज् अ कंट्/क्लिट्" हे चालून जाणार नाही.)
माहीत नाही
तसा विचार केलेला नाही, म्हणून सांगता येत नाही.
काही मातृसत्ताक समाजांबाबत माहिती आहे, परंतु स्त्रीकेंद्रित समाजांबाबत फारशी माहिती नाही. (केरळातील मातृसत्ताक जातींमध्ये सत्ताक स्त्रीचा नवरा आणि भाऊ जमीनजुमल्याची देखरेख करतात. मूळ जायदादीवरच राहाणार्या भावांच्या बायकांचा काही फारसा अधिकार नसतो, आणि सत्ताधारी मातेच्या धाकट्या बहिणींचा फारसा अधिकार नसतो. सगळी सांगोपांगी माहिती - माझे अधिक वाचन नाही.)
त्यामुळे स्त्रीकेंद्रित समाजांत शब्दसंपदा उलटी असेल हा प्रश्न तसा सैद्धांतिक-अव्यवहार्य आहे.
त्यातल्या त्यात मोठ्या समाजांत पुरुषकेंद्रित-ते-उभयकेंद्रित इतक्याच क्षेत्रात परिस्थिती दिसते.
---
कदाचित याबाबत अधिक साधनसामग्री घेऊन विचार करायला हवा.
प्राथमिक जननेंद्रियाबाबत इंग्रजी आणि मराठीमधील उदाहरणे आपण सर्वांनी वर बघितलीच आहेत. परंतु स्त्री-स्तनांचा उल्लेख भाषेत पुष्कळ येतो. "ग्रँड टीटॉन" नावाचे डोंगर, मेंदूमधील "मॅमिलरी बॉडी", शरीररचना व अन्य शास्त्रांत "पॅपिला" शब्दाचा वापर, पाईप फिटिंग मध्ये "निपल", वगैरे.
परंतु योनीमुख हे समाजात नेहमीच कपड्यांनी झाकलेले असते, त्या मानाने स्तनाचा आकार तरी कपड्यांमधून पुष्कळच स्पष्ट दिसतो.
---
वरील विचार सगळे सैलसर आहेत. पण "अपेक्षा काय असावी त्याबाबत संदिग्ध" इतकाच सारांश सांगायचा आहे.
(अतिअवांतर)
कश्मीरी भाषेत 'चोट' हा शब्द (उच्चार तस्साच, अगदी मराठीतल्यासारखा) 'ब्रेड' अशा अर्थी वापरला जातो.
*जेवण नाही पोटाला, उटणं लावतोय चोटाला*
अय्या! पावाला उटणेसुद्धा लावून खातात?
पावाला लोणी लावून खातात, इतपत ठाऊक होते. खाल्लेलाही आहे. पण हे म्हणजे...
(कदाचित अमूल बटरचे शॉर्टेज असावे. म्हणूनच 'जेवण नाही पोटाला...'. म्हणीचा उद्गाता 'खाईन तर अमूलबटराशी'-संस्कृतीतला दिसतोय.)
*जेवण नाही पोटाला, उटणं
*जेवण नाही पोटाला, उटणं लावतोय चोटाला*
ह्या म्हणीत चोट हा शब्द घाव, जखम ह्या अर्थाने वापरला असावा असे वाटते.
चोट (p. 290) [ cōṭa ] f ( H ) A wound; a cut: also a contusion or bruise, or a rude abrasion: also a blow with the fist. 2 fig. A loss (in trade &c.); a blow or stroke of misfortune. v लाग. 3 A lucky hit; a fortunate stroke. v साध, लाग, लाव. Ex. व्यवहा- रांत एखादे वेळेस चोट साधती तेव्हां चार पैसे मिळतात.
स्रोतः मोल्सवर्थ शब्दकोश
बाकी, तुमच्या मूळ मुद्द्याशी सहमत. मेणचोट, मेंगचोट, घोडचोट्या वगैरे शब्दांचे अर्थ पाहता (वरील दुव्यावर पहा) चोट ह्या शब्दाचा अर्थ योनी नसून शिस्नच असावा हे पटते.
का ब्वॉ?
कोणाचातरी 'घाम' समुद्रात पडला, तो कोठल्याशा मगरीने की माशिणीने की अशाच कोठल्यातरी जलचरणीने गिळला, आणि त्याने ती प्रेग्नण्ट होऊन तिला अमूकतमूक झाला/झाली, असल्या छापाच्या कथा तर तुमच्या-आमच्या-दुनियाभरच्या पुराणांत डझनाच्या भावाने आढळतात की! पुराणे जर चालतात, तर हे का चालू नये?
चपलांना संरक्षक कवच लावले, म्हणजे झाले!
परीक्षण आवडले (उसंत
परीक्षण आवडले (उसंत सखुंचेही).
काही वर्षांपूर्वी 'द वजायना मोनोलॉग्ज' वाचले होते, व ह्या नाटकाच्या प्रयोगाला (शिवाजी मंदीर की यशवंत, कुठेतरी) जाण्याचा बेत आखला होता. ऐन वेळी काहीतरी काम निघाल्यामुळे जाता आले नाही, व नंतर नाटक पाहायचे राहिले ते राहूनच गेले. तुम्हा दोघींची परीक्षणे वाचून वेळ व पैसे दोन्ही वाचल्याचा आनंद झाला.
१+१
दोन्ही परीक्षणे वाचल्यावर नाटकाचा पूर्ण उलगडा झाला. मग मेघना म्हणाली ते पटलं. संस्कृतीरक्षकांच्या टोळ्या हे नाटक बंद कशाला पाडतील ? उलट बघायला गर्दी करतील. आधी निवेदन करायचं आणि मग प्रेक्षकांनी तो प्रवेश पहायचा, ही अतिहास्यास्पद गोष्ट आहे. स्त्रियांचे खरे प्रश्न न मांडता, नुसत्या शिव्या देऊन पहाण्याचा आनंद होणे, ही विकृतीच आहे. त्यांचे प्रयोग चालत आहेत ते बहुधा आंबटशौकिन प्रेक्षकवर्गामुळेच!
आधीही या नाटकाची परीक्षणे वाचली होती. पण हा सखू+ अदिती हा डबलबार सर्वात ताकदवान पंच आहे.
होय. एखाद्या गे व्यक्तीने "छे
होय. एखाद्या गे व्यक्तीने "छे हे काय गे परेड कशाला काढायची? स्ट्रेट परेड असे काही असते का?" असे उत्स्फूर्ततेने म्हटले तर मला ते नक्कीच आवडेल. गे असणे आणि स्ट्रेट असणे एकसारखेच नॉर्मल समजले जाताना बघून का आवडू नये?
===
समांतरः मेघनाने वर्णन केलेल्या गे परेड मध्ये बहुदा "आय अॅम गे... इटस ओके इट्स ओके" वगैरे नंतर "आय अॅम स्ट्रेट... इटस ओके इट्स ओके" अशा घोषणाही होत्या बहुधा.
ढेरेशास्त्री, भारतात 'योनी'
ढेरेशास्त्री, भारतात 'योनी' हा शब्द पुरेसा रुळलेला आहे. पाश्चात्त्यांच्यात जसं मानतात, तसं योनी असणं / लिंग नसणं हे भारतात कमी प्रतीचं मानलं जात नाही. योनी हीच देवीस्वरूप मानण्याची परंपरा आहे. वयात आलेल्या स्त्रीला मखरात बसवून तिची पूजा करण्याची प्रथा आहे, ती तिच्या सुफळ होऊ घातलेल्या योनीमुळेच. इथले प्रश्न निराळे आहेत. योनिशुचिता हा त्यातला मुख्य. लैंगिक शिक्षण (गुप्तांगाची स्वच्छता, गुप्तरोगांच्या प्रसाराबद्दलची माहिती, संततिनियमनाचं शिक्षण, सुरक्षित संभोगाबद्दलची माहिती, पाळीच्या काळात येणार्या अडचणी, बलात्कारानं किंवा परपुरुषाशी केलेल्या संभोगानं स्त्री विटाळत नाही हे पटवणं इ.) आवश्यक.
'योनी-योनी' किंवा 'चूत-चूत' असं नि:संकोच ओरडल्यामुळे ते प्रश्न मिटतील का? संभोगहुंकार काढल्यामुळे मिटतील? 'माझी योनी झुळझुळ पाणी' अशा कविता केल्यामुळे मिटतील? म्हणून अशा आचरट आरडाओरड्याला विरोध. कारण त्यातून निव्वळ सनसनाटीपलीकडे काहीच साध्य होत नाही.
उलट - गे प्राइड परेड. गे हा शब्द हल्ली हल्ली रुळतो आहे. अजूनही लेस्बियन्स आउट असण्याचं प्रमाण प्रचंड कमी आहे. निराळ्या लैंगिकतेला व्यंग मानणारे लोक आहेत. मग त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, समान हक्कांचा प्रश्न, सामाजिक स्वीकृती... हे तर पुढेच.
गे प्राइड परेडमुळे या प्रश्नांना वाचा फुटते की नाही? आदित्यसारखा - तुमच्याआमच्यासारख्या दिसणारा आणि असणारा - तरुण, कोणतेही आक्रमक / बीभत्स वाटणारे हावभाव न करता, परेडमध्ये चालतो आणि काहीएक विधान करतो, यानं काही जणांचे तरी गैरसमज दूर होतात की नाही? काही जणांना तरी बोलण्याचं धैर्य मिळतं की नाही? म्हणून 'गे प्राइड परेड' आवश्यक.
भारतात 'योनी' हा शब्द पुरेसा
भारतात 'योनी' हा शब्द पुरेसा रुळलेला आहे.
माझ्या निरिक्षणात नाही, अनेक शब्द अजूनही हळू आवजात उच्चारले जातात. किंवा काहितरी युफिमिझम वापरलं जातं.
योनी हीच देवीस्वरूप मानण्याची परंपरा आहे.
परंपरा अगदी कामसूत्र/खजुराहोची देखील आहे. म्हणून आज शरीरसंबंधांबद्दल निकोप दृष्टीकोण आहे अस थोडीच म्हणता येइल.
'योनी-योनी' किंवा 'चूत-चूत' असं नि:संकोच ओरडल्यामुळे ते प्रश्न मिटतील का? संभोगहुंकार काढल्यामुळे मिटतील? 'माझी योनी झुळझुळ पाणी' अशा कविता केल्यामुळे मिटतील? म्हणून अशा आचरट आरडाओरड्याला विरोध. कारण त्यातून निव्वळ सनसनाटीपलीकडे काहीच साध्य होत नाही
.
हे माहिती नाही. सांगता येत नाही. पण याचा तोटा काही नाही. झालाच तर फायदा होइल. थोडातरी संकोच दूर होण्यात. may be the first of many steps. हे नाटक आल्यावर इतर टॅबू गोष्टींवर असं काहीतरी येइल. जे या नाटकाच्या पायावर असेल.
मी हे नाटक बघणार नाही बट आय सी देअर पॉईंट...
मतभेदांचं मरू दे. तुमचं खरं
मतभेदांचं मरू दे. तुमचं खरं झालं तर बरंच होईल.
नाटक मात्र तद्दन भिकार आहे. त्यातले संभोगहु़ंकार हे निव्वळ पॉर्नीकरण आहे. या नाटकामुळे स्त्रीवादाबद्दल उलटे गैरसमज होण्याची शक्यता मला वाटते. (अर्थात म्हणून काही ते बंदीबिंदी घालण्याच्या लायकीचं नाही. खेरीज अगदी रीतसर पॉर्नवरही बंदी घालता कामा नये, हे माझं मत कायम आहेच. पण) हे नाटक स्त्रीवादाचं जे रूप सादर करतं आहे, त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही, हे स्पष्ट नोंदणं आवश्यक वाटलं.
कणेकरांशी सहमतीशी भीती वाटली.
"योनी, योनी, योनी" असं ओरडल्यामुळे खरंच संकोच कमी होतो का हे मला माहीत नाही. मुळात संकोच नाही, ही अडचण आहे. (नंतर ठाण्यातल्या एका रम्य तळ्याकाठी आम्ही तिघी असताना "व्हाजिष्टाईन, व्हाजिष्टाईन, व्हाजिष्टाईन", असं ओरडून घेतलं.)
"चिकट वाक्य" काढावंसं वाटत नाही. एकही अश्लील शब्द न वापरता कमरेखालचे विनोद करता येतात हे एक. आणि तो प्रयोग त्याच पातळीला जाणारा वाटला हे प्रामाणिक मत हे दुसरं.
कणेकरांनी जे काही लिहिलेलं होतं त्याला कितपत भाव द्यायचा अशी चर्चा आम्हीही केली. कणेकरांच्या मताशी आपलं मत जुळतंय का काय, अशी भीतीही वाटली होती. म्हणून ते "परीक्षण" पुन्हा एकदा वाचलं. प्रयोग अर्ध्यात सोडून जायचा आणि त्याबद्दल लिहायचं, वर लिहिताना व्यक्तिगत टीका + उन्मुक्त, संस्कृतीरक्षक स्त्रीद्वेष* असल्यामुळे त्यांना भाव देऊ नये असं माझं मत. त्याशिवाय त्यात किती ते लेखन 'मुक्तपीठी' प्रकार आहे. उदाहरणार्थ -
- अमेरिकेबद्दल हे एक मुक्ताफळ - आईच्या पर्समधील संततिनिरोधक गोळ्या अविवाहित मुलीने घेतल्या तर आई चिडून म्हणते, ‘‘तुला तुझ्या गोळ्या आणायला काय होतं?’’ अशा समाजात महिला ‘व्हजायना’ शब्दाला बिचकतात? (सिरीयसली! कणेकरांना अमेरिकेबद्दलतरी काय माहिती आहे ते समजलं.)
- महागाचं तिकीट लावून अनोळखी प्रौढ व्यक्तीसमोर रंगमंचावरून आम्ही गरळ ओकत नाही व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दबलेल्या लैंगिक भावनांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण्याच्या क्रांतिकारी विचारांनी आम्ही प्रेरित होऊन उठलोय असा भंपक दावा आमच्या ध्यानीमनी नाही. (नाटकामुळे किळस वाटेल, शिसारी येईल हे ठीकच, पण गरळ ओकलंय. कणेकरांनी निश्चितच नाटक पाहिलेलं नाही.)
*कणेकरांच्या लेखातली ही वाक्यं उद्धृत केल्याशिवाय राहवत नाहीये - योनीपावित्र्याविषयीच्या आपल्या कल्पना आजही पूर्वीइतक्याच कडक व कर्मठ आहेत. कारण ती आपली संस्कृती आहे.
परमेश्वराने लज्जा, संकोच, मार्दव, आर्जव व समजूतदारपणा (women know less but understand more!) या दागिन्यांनी मढवून स्त्रीला जगाच्या उद्धारासाठी अवनीवर पाठवले. (इथे लोळून खपल्यामुळे लेखाचा पुढचा भाग पुन्हा कधीतरी वाचल्या जाईल.)
संकोच नाही तर तळ्याकाठी तिघीच
संकोच नाही तर तळ्याकाठी तिघीच असताना का ओरडून घेतलं ते कळलं नाही. ज्यांना संकोच नसतो असे अनेक स्त्रीपुरुष बिनधास्त चारचौघात बोलताना चोट/लवडा/भोक/दाणा इत्यादी शब्द सहज वापरतात.
मला स्वत:ला काही शब्दांबाबत संकोच वाटतो तर काहींबाबत नाही. एखाद्या स्त्रीशी गप्पा मारताना मी तिच्या किंवा कोणाच्याही योनीबद्दल जनरल (म्हणजे योनीच्या आजारांबद्दल नसलेल्या) गप्पा मनात तरंग न उठता, कान गरम न होता आणि विजारीत हालचाल न होता मारु शकेन का याबद्दल मला फारशी खात्री नाही.
सहजपणे कोणाशीही म्हणजे स्त्री की पुरुष न बघता त्यावर गप्पा मारल्या जातील तितका मोकळेपणा कधी आपल्या समाजात येईल का? माहित नाही.
पण ठरवून एखाद्या ग्रुपमध्ये या पद्धतीने मोकळेपणा आणता येईल असे वाटते.
ज्या लोकांना माझ्या बोलण्यात
ज्या लोकांना माझ्या बोलण्यात रस नाही त्यांच्यासमोर मी कशाला बोलायला जावं? त्यांना न ऐकण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. योनी या शब्दाबद्दल मला संकोच नाही, इतरांना असू शकतो. प्रत्येक वेळेस, आजूबाजूच्या प्रत्येक माणसाचा संकोच दूर करावा अशी इच्छा मला असेलच असं नाही. त्या विशिष्ट वेळी मला माझ्या मैत्रिणींबरोबरच भंकस करण्याची इच्छा असेल, चारचौघांशी बोलायचं नसेलही. संकोच नाही, म्हणजे जिथेतिथे तेच-ते आणि तेच-ते बोलत बसावं असं नसून, जिथे बोलण्याची आवश्यकता वाटते तिथे बोलताना आडपडदा बाळगला जात नाही.
संकोच नाही आणि ऑबसेशन आहे या दोन्हींमध्ये केसभर फरक आहे.
मलाही तेच म्हणायचं आहे. ते
मलाही तेच म्हणायचं आहे. ते योनी योनी म्हणताना ज्यांना त्रास, संकोच, इ इ होतो त्यांनादेखिल श्रवण टाळण्यासाठी कितीतरी सोयी, उपाय आहेत. या फोरमवर मी त्रास वाचवण्यासाठी कष्ट करावेत अशी अपेक्षा आहे मात्र त्यांच्या जीवनातल्या अन्य फोरम्समधे अशाच माझ्यासारख्या त्रयस्थ उपस्थितांनी काहीही कष्ट करू नयेत, कान झाकू नयेत असे आहे. हे माझ्यासाठी तरी दुटप्पीपणाचे वाटते. मी पापण्या वैगेरे बंद कराव्यात आणि त्यांनी मात्र कान बंद करू नयेत? हा सरळसरळ दंभ आहे.
===============================================
मलाही तेच म्हणायचं आहे. ते
मलाही तेच म्हणायचं आहे. ते योनी योनी म्हणताना ज्यांना त्रास, संकोच, इ इ होतो त्यांनादेखिल श्रवण टाळण्यासाठी कितीतरी सोयी, उपाय आहेत. या फोरमवर मी त्रास वाचवण्यासाठी कष्ट करावेत अशी अपेक्षा आहे मात्र त्यांच्या जीवनातल्या अन्य फोरम्समधे अशाच माझ्यासारख्या त्रयस्थ उपस्थितांनी काहीही कष्ट करू नयेत, कान झाकू नयेत असे आहे. हे माझ्यासाठी तरी दुटप्पीपणाचे वाटते. मी पापण्या वैगेरे बंद कराव्यात आणि त्यांनी मात्र कान बंद करू नयेत? हा सरळसरळ दंभ आहे.
अहो अजो. ही जट अथवा लड उलगडून जरा सुलभ अनुवाद करुन पुन्हा मांडण्याची तुम्हाला विनंती करतो.
To put it in very simple
To put it in very simple words, if it is correct to make these utterances, the pretext of public inconvenience for the choice of location is not tenable. Note that she is choosing public convenience between public convenience and propriety. If that being so, I can cite the reason of my inconvenience to stop her from saying anything about anything in any forum.
"लेखकाचे नाव" या
"लेखकाचे नाव" या क्रायटेरियावर पापण्या बंद करण्याविषयी चाललंय हो.
वर एक्सप्लेन करून झालंय. पण अन्य लोकांना आपल्यामुळे गैरसोय होईल म्हणून तळ्याकाठी (म्हणजे दूर) जाऊन आवाज करणे अशी कृती करण्यात आली आहे. अदितीने तोंड उघडताच (जसे तिचे नाव दिसताच मी पापण्या मिटाव्या अशी अपेक्षा आहे.)लोकांनी कान बंद करावे असे म्हणाल काय?
बघा, कसं जमतंय तसं करा.
१. साधारणतः स्त्रीवादी विषय असेल तर माझं नाव बघून न वाचता, स्क्रोल करून पुढे जाण्याची सवय करून घेऊ शकता. (खरं सांगते, मला अशी सवय साधारण पाच दिवसांत लागली.) मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक.
२. आम्ही ज्या तळ्याकाठी बसून भंकस करत होतो ती अवकाशाच्या तीन आणि काळाची एक अशा चार मितींमधली, महानगरपालिकेची (=पब्लिक) जागा आहे. 'ऐसी अक्षरे' ही जागा सायबरस्पेसमधली आहे. या दोन ठिकाणचे वावर-वापराचे नियम मितींनुसार (आणि काही प्रमाणात जबाबदारी घेणाऱ्यांच्या कुवतीनुसार) निराळे आहेत. तेव्हा तुमच्या या ठराविक इच्छेचा आदर करणं किंवा न करणं तुमच्याच हातात आहे. बघा, कसं जमतंय तसं करा.
बाकी पापण्या असणं-नसणं हा मुद्दा पुन्हा एकदा सांगायची गरज नसावी.
ज्या लोकांना माझ्या बोलण्यात
ज्या लोकांना माझ्या बोलण्यात रस नाही त्यांच्यासमोर मी कशाला बोलायला जावं? त्यांना न ऐकण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. योनी या शब्दाबद्दल मला संकोच नाही, इतरांना असू शकतो. प्रत्येक वेळेस, आजूबाजूच्या प्रत्येक माणसाचा संकोच दूर करावा अशी इच्छा मला असेलच असं नाही. त्या विशिष्ट वेळी मला माझ्या मैत्रिणींबरोबरच भंकस करण्याची इच्छा असेल, चारचौघांशी बोलायचं नसेलही. संकोच नाही, म्हणजे जिथेतिथे तेच-ते आणि तेच-ते बोलत बसावं असं नसून, जिथे बोलण्याची आवश्यकता वाटते तिथे बोलताना आडपडदा बाळगला जात नाही.
ननिचा प्रश्न वाचून "अरे वा, अगदी आपल्या मनातलाच प्रश्न विचारलान" असा विचार आला होता. पण उपरोक्त उत्तर आवडले आणि पटले. बरोबर आहे त्यामागचा विचार.
संकोच नाही आणि ऑबसेशन आहे या दोन्हींमध्ये केसभर फरक आहे.
इथे असहमत. केसभर नव्हे, प्रचंड मोठा फरक आहे.
इथे असहमत. केसभर नव्हे,
इथे असहमत. केसभर नव्हे, प्रचंड मोठा फरक आहे.
गवि, मला कधीमधी सायबाच्या देशाची आणि बोलण्याच्या पद्धतीची किंचित आठवण येते.
व्हॅजिष्टाईन वा अन्य काही तत्सम ओरडायची वेळ नाटक पाहताना वा संपल्यावर लगेच होती असे मात्र अजूनही वाटते.
नाही ना, आम्हाला तेवढी समयसूचक विनोदबुद्धी नाही. म्हणूनतर सवडीने उत्तर देता येतं अशा आंजावर नाव काढू बघतोय.
उसंत सखू-विक्षिप्त अदिती विरुद्ध वंदना खरे.
मी हे नाटक अथवा 'व्हजायना मोनोलॉग्ज' हे पुस्तक वाचलेले नाही.
उसंत सखू-विक्षिप्त अदिती ह्यांचे वरचे लिखाण वाचून असा समज होतो की हे नाटक म्हणजे काहीतरी सनसनाटी करण्याचा आणि बोलण्याचा हास्यास्पद प्रयोग असावा. ह्या दोघींच्याहि समतोलपणावर माझा विश्वास आहे.
त्यानंतर वन्दना खरे ह्यांचा लोकप्रभामधील लेख येथे मिळाला तोहि वाचला. तो वाचून असे वाटले की नाटक बहुसंख्य प्रेक्षकांना पटलेले आणि महत्त्वाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे आहे असे दिसते.
ह्या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये सांगड कशी घालायची?
संस्कृतीरक्षक
>>अशा नाटकाचा प्रयोग जर विनाविघ्न, चालू शकत असेल तर, आपल्या देशांतल्या स्वयंघोषित संस्कृतीसंरक्षक टोळ्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. त्यांची मानसिक उत्क्रांती झाली म्हणून!
वर याचे जे स्पष्टीकरण आलेले आहे त्याचा नेम मला चुकल्यासारखा वाटला.
नाटकामधे सीता, सावित्री, सरस्वती, लक्ष्मी किंवा जिजाबाई भोसले , रमाबाई पेशवे किंवा सावित्रीबाई यांचा उल्लेख शरीराच्या त्या विशिष्ट अवयवाच्या संदर्भात आला असता, या ऐतिहासिक किंवा पौराणिक स्त्रियांचे उल्लेख या अनुषंगाने आले असते तर हिंदुत्ववादी/ब्रिगेडी संघटनांचा विरोध आणि प्रसंगी त्यांनी केलेल्या हिंसात्मक कृती यांना या कलाकृतीला सामोरे जावे लागले असते. सेक्स आणि व्हॉयलन्स यांना सरसकट विरोध असता तर बहुतांश बॉलीवूडची दुकाने बंद झाली असती. या नाटकात अस्वस्थकारक काही नाही हे खरं नाही. कणेकरांनी "अस्वस्थता वाटली म्हणून नाटक सोडून आलो" अशा अर्थाचं लिहिलेलं आहे. ते प्रातिनिधिक आहे. नाटकात विचारप्रवर्तक काही आहे किंवा नाही हे सब्जेक्टिव्ह झाले. तसे ते नाहीच असे घटकाभर धरून चाललो तरी मूलतत्ववादी लोक इथे न वळण्याचं हे कारण नव्हेच. लाक्षणिक अर्थाने मूर्तीभंजनही अनेक संदर्भात विविध गोष्टींचं होत असतं. ऐतिहासिक व्यक्तींचं मूल्यमापन होतं. मुद्दा ऐतिहासिक/पौराणिक अतएव राजकीयदृष्ट्या संवेदनशील मूर्तींच्या (पर्सीव्हड) विटंबनेचा आहे. जे इथे होताना जाणवत नाही. त्यामुळे इथे मूलतत्ववादी शक्ती फिरकल्या नाहीत.
फार पटत नाही.
बायकांनाच मखरात बसवण्याची संस्कृती जिथे आहे तिथे संस्कृतीरक्षकांची भीती वाटणं ग्राह्य आहे. कणेकरांनी संस्कृतीरक्षकी भूमिका मांडलेली आहेच.
स्त्रियांनी लैंगिकतेबद्दल उघड बोलावं, लैंगिक सुखाचा भोग घ्यावा या गोष्टी आजही भारतात पचत नाहीतच. (मूळ संकल्पनेबद्दल कौतुक आहे ते यासाठीच.) मेनस्ट्रीम सिनेमातही हिरवीण अनाघ्रातच दाखवतात, 'क्या केहना'सारखे चित्रपट अपवादच असतात.
एकेकाळी 'द व्हजायना मोनोलाॅग्ज'बद्दल वाचून मी पण प्रभावित झाले होते. 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी'च्या सादरीकरणावर सगळ्यात मोठा आक्षेप बाळबोध असण्याचा आहे; एकतर ते नाहीतर पाॅर्नीकरण.
पुरुष तर लैंगिकतेविषयी
पुरुष तर लैंगिकतेविषयी कोणाशीच बोलत नाहीत.
ऑ!?
तुम्हाला पुरुष तर वैयक्तिक लैंगिक अनुभवांविषयी कोणाशीच बोलत नाहीत असे म्हणायचेय ना?
बाकी इतर स्त्रियांबद्दल सर्वप्रकारच्या (इन्क्लुडिंग लैंगिक) कमेंट पास होताना, भांडताना यथेच्छ लैंगिक अवयवांपासून क्रियांचा उद्धार करताना, खेळीमेळीत अनेक (इतरांच्या) लैंगिक तपशीलांवर (सवयी, किती बायका, कुठेकुठे तोंड मारतो इत्यादी) अश्या प्रकारच्या चर्चा करताना बहुतेक प्रत्येक वयोगटाच्या पुरूषांना ऐकलंय
बाकी इतर स्त्रियांबद्दल
बाकी इतर स्त्रियांबद्दल सर्वप्रकारच्या (इन्क्लुडिंग लैंगिक) कमेंट पास होताना, भांडताना यथेच्छ लैंगिक अवयवांपासून क्रियांचा उद्धार करताना, खेळीमेळीत अनेक (इतरांच्या) लैंगिक तपशीलांवर (सवयी, किती बायका, कुठेकुठे तोंड मारतो इत्यादी) अश्या प्रकारच्या चर्चा करताना बहुतेक प्रत्येक वयोगटाच्या पुरूषांना ऐकलंय
पण हे, या विषयाखाली जी चर्चा चालू आहे, त्यात "लैंगिकतेवर बोलणे" म्हणून जे अपेक्षित आहे ते नाही.
उखाणा
कणेकरांच्या लेखातली ही कल्पना उचलण्यासारखी वाटली:
मग मराठमोळ्या स्त्रिया ‘योनी’ शब्द उखाण्यात घेतील …. अशी यांची [म्हणजे वंदना खऱ्यांची - ज.चि.] अपेक्षा आहे की काय? आज हे शक्य नसेल तरी ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’च्या देशव्यापी दर्शनानंतर ते सहज शक्य होईल अशी त्यांची धारणा असावी.
कणेकरांच्या इच्छेप्रमाणे असा उखाणा रचण्याचा यथाशक्ति प्रयत्न मी केला आहे. 'ऐअ'च्या वाचकांना यापेक्षा बरी रचना सुचली तर वाचायला आवडेल.
मसाला दुधात टाकली भांग, आणि दिलं खपवून हायमेन फोनी
अभिनंदन
अशा नाटकाचा प्रयोग जर विनाविघ्न, चालू शकत असेल तर, आपल्या देशांतल्या स्वयंघोषित संस्कृतीसंरक्षक टोळ्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. त्यांची मानसिक उत्क्रांती झाली म्हणून!