Skip to main content

अंदाज करा - इन्फंंट मॉर्टॅलिटी

वरील आलेखात गेल्या काही दशकातली इन्फंट मॉर्टॅलिटीची आकडेवारी दिलेली आहे. (इन्फंट मॉर्टॅलिटीने जन्मापासून एका वर्षाच्या आत मृत्यू पावणाऱ्या मुलांचं प्रमाण दर हजार जन्मांमागे दर्शवलं जातं) यात जगाचे पाच मोठे विभाग सामावलेले आहेत.
चीन (लोकसंख्या १.४ अब्ज), भारत (लोकसंख्या १.३ अब्ज), अमेरिका (लोकसंख्या ०.३५ अब्ज), युरोपिअन युनियन (लोकसंख्या ०.५ अब्ज), सबसहारन आफ्रिका (लोकसंख्या ०.९ अब्ज) मिडइस्ट व नॉर्थ आफ्रिका (लोकसंख्या ०.३५ अब्ज). एकंदरीत सुमारे ५ अब्ज लोकांची यात गणना होते, आणि पुढारलेल्या देशांपासून ते अत्यंत मागासलेल्या देशांपर्यंतचा सर्व स्पेेक्ट्रम निवडला जातो. तेव्हा या गणितापुरतं हे जगाच्या लोकसंख्येचं प्रातिनिधित्व करतात असं गृहित धरू.

तर प्रश्न असा आहे की वरच्या आलेखात दिसणारे ट्रेंड पुढेही चालू राहिले तर सर्व जगाची सरासरी इन्फंट मॉर्टॅलिटी कुठच्या साली १० पर्यंत येईल? फक्त आलेख व वरील लोकसंख्येचा विदा वापरून उत्तर काढायचं आहे. अर्थातच बदलती लोकसंख्येची प्रमाणं, वेगवेगळे जननदर अशा काही गोष्टींकडे सध्या दुर्लक्ष करू. कारण उत्तर अत्यंत अचूक असण्याची गरज नाही. पद्धतही कुठचीही वापरली तरी चालेल. अगदी अंदाजपंचे नजरेने सरासरी साधारण कुठे जाईल ते ठरवू शकता किंवा प्रिंटआउट काढून त्यावर वेटेड मीन वगैरे करून त्याला कर्व्ह फिट करणं वगैरेही करू शकता. कुठची पद्धत वापरली हे थोडक्यात लिहा.

घाटावरचे भट Thu, 05/02/2015 - 17:00

गुर्जी, एवढं स्टॅट्स कळत असतं तर पेप्रात डंडे गुल का झाले असते? आम्ही आपली आधी ग्राफ वर लाईन मारुन नंतर त्यात प्रयोगाची रीडिंग्ज भरणारी माणसं... आम्ही काय या प्रश्नाचं उत्तर शोधू शकणारे?

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 17:14

In reply to by घाटावरचे भट

हे उत्तर काढण्यासाठी स्टॅट्स वापरण्याची गरज नाही. केवळ अंदाजाने यांचा 'मध्य' कुठे असेेल ते बघायचं, आणि तो कसा पुढे सरकतो आहे त्याच्याविषयी गेस्टिमेट करायचं आहे.

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 17:33

In reply to by अनु राव

सर्वांना कामाला लावायचं मुख्य कारण म्हणजे मी जेव्हा एखादा विदा अॅनलाइझ करून लोकांपुढे सादर करतो तेव्हा किती कष्ट करावे लागतात याची झैरात करून स्वतःची लाल करून घेणं. :)

सीरियसली बोलायचं झालं तर हा सोपा प्रॉब्लेम नाही. मला 'उत्तर' माहीत नाही. मी जे करेन तेही काही गृहितकं धरून केलेलं गणितच असेल. आणि त्यातही काही वेगवेगळ्या पद्धतींमुळे थोडी वेगवेगळी उत्तरं येतील. त्यामुळे क्लिष्ट गणित न वापरता इंट्युइटिव्हली लोकांना काय दिसतं, किंवा इतरांनी कोणी अभिनव पद्धत वापरली आहे का हेही पाहाण्यात मला रस आहे.

अर्धवट Thu, 05/02/2015 - 17:04

२०४० ते २०५०,

अर्थात मध्यंतरीच्या काळात सगळीकडे अर्भकमृत्यूदर कमी करणे ही प्राथमिकता न मानणारा समाज अथवा सरकारे आली अथवा टिकून राहिली वा अदरवाईज तर अंदाज बदलू शकतो हे आहेच.

ऋषिकेश Thu, 05/02/2015 - 17:07

माझ्या अंदाजाने अजून एखाद्या दशकभरात सरासरी १०च्या जवळ येईल
देश --> अंदाजे डोळ्यांना दिसलेला सरासरी घट होण्याचा दर
अमेरिका ४०%
युरोप ६०%
चीन १७५%
मिडल इस्ट वगैरे ३००%
भारत २६०%
सब सहारन २५०%

तेव्हा सरासरी घट होण्याचा रेट १८०%
तर सस्य सरासरी व्हॅल्यु २५%

१८०% ने आणखी १५% कमी व्हायला साधारण ८ च्याहून थोडी अधिक वर्षे लागतील. तेव्हा ढोबळ मनाने एक दशकभर असे उत्तर काढले आहे.

==

अर्थातच फार खोलवर विचार न करता घाईने उत्तर काढलेय

==

धागा आवडला.

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 17:22

In reply to by ऋषिकेश

भारताची २६०% घट म्हणजे नीट कळलं नाही. गेल्या पन्नासेक वर्षांत भारताचा मॉर्टॅलिटीचा आकडा १६५ वरून साधारण ४१ वर गेला. सोयीसाठी एक चतुर्थांश झाला असं म्हणू. यातून २६०% कसं काय आलं? दशकाला २६% असं म्हणायचं आहे का? कारण ते बरंच जवळ जातं...

ऋषिकेश Thu, 05/02/2015 - 17:25

In reply to by राजेश घासकडवी

५० वर्षात १३० ने घट धरली मी म्हणून १०० वर्षात २६० ने घट असे काहिसे
टक्के टर्म फारच लूजली वापरलीये

अनु राव Thu, 05/02/2015 - 17:13

फक्त अशी ग्राफ वरुन कशी उत्तरे काढुन चालतील?

माझा अंदाज
पुढच्या १० वर्षात, आय्सीस ने बर्‍याच नॉर्थ आफ्रीकेत धुमाकुळ घातला असेल, त्याच्याच जोडीला बोको हराम असेलच.
त्या दोघांना विरोध करण्यासाठी चालू झालेल्या युद्धात त्या भागात आत्ता जी काही थोडी बहुत व्यवस्था आहे तिची पार धुळधाण उडाली असेल. त्यामुळे १० वर्षानंतर सहारा, नॉर्थ आफ्रीका इथला इन्फंट मॉर्टॅलिटी वाढला असेल.
तिच गोष्ट पाकीस्तान आणि बांग्लादेशात ( कदाचित ) होइल, म्हणजे अजुन २५ लोकसंख्येत इन्फंट मॉर्टॅलिटी वाढेल.

अनु राव Thu, 05/02/2015 - 17:24

In reply to by नगरीनिरंजन

असे कसे :O , आपण कसे एकदम मुळापर्यंत जावुन विचार केला पाहीजे ना.

आयटी मधे असाल आणि असे वर वर बघुन तुमच्या टीम मेंबर नी फिक्स दिला तर चालेल का तुम्हाला?

अनु राव Thu, 05/02/2015 - 17:22

In reply to by अनु राव

ज्याने ह्या प्रतिसादास ( माझी मी अभ्यसपूर्ण श्रेणी देउ शकते :-) ) तो/ती ह्यात निरर्थक अशी श्रेणी देण्यासारखे काय आहे हे सांगु शकेल काय?

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 17:27

In reply to by अनु राव

या सगळ्या शक्यता आहेतच. पण तूर्तास तरी आपण 'जगात गेली पन्नास वर्षं जेे चाललंय तेच चालत राहिलं तर १० च्या खाली कधी जाईल?' एवढ्याच प्रश्नाचं उत्तर काढत आहोत. त्यानंतर मग आय्सिस, बोको हराम, युद्धं वगैरेंचा परिणाम किती वाईट होईल, किंवा तशाच उलथापालथी गेल्या पन्नास वर्षांत चालू असताना त्या ठिकाणच्या मॉर्टॅलिटी रेटवर काय परिणाम झाला वगैरे तपासून बघू आणि आपलं उत्तर बदलावं लागेल का ते बघू.

आदूबाळ Thu, 05/02/2015 - 17:13

कधीच नाही.

यात काहीतरी लॉगिस्टिक रिग्रेशनची भांगड असते ना? असाच एक "१०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत माणव ९/८/७/... सेकंदाच्या खाली कधी जाईल?" असा काहीसा प्रश्न आणि त्यावरचं बरंच टेक्निकल विवेचन वाचलं होतं.

बहुदा गुर्जींचा मुद्दा असा असावा, की कर्व्ह फिटिंग हा छप्पन रोगांवरचा रामबाण इलाज नाही, वगैरे...

त्यामुळे उत्तर "उपलब्ध माहितीवरून सांगता येत नाही" किंवा "उपलब्ध गणिती साधनं हे सांगण्यासाठी पुरेशी नाहीत" असंही असू शकतं.

नगरीनिरंजन Thu, 05/02/2015 - 17:21

In reply to by ऋषिकेश

बघा ना!
शिवाय "वरच्या आलेखात दिसणारे ट्रेंड पुढेही चालू राहिले तर" असंही म्हटलंय; पण डोकं चालवायची हौस फार! :-)

आदूबाळ Thu, 05/02/2015 - 17:50

In reply to by नगरीनिरंजन

तोच फ्लॅट होण्याचा थ्रेशोल्ड १० असावा असं म्हणायचंय असं वाटतं.

डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्सप्रमाणे घसरणार्‍या प्रत्येक युनिट इन्फंट मॉर्टॅलिटीमागे जास्त पैसा आणि जास्त वेळ लागेल. पण तो "सपाटीकरणाचा प्रतल" १०च का? ११.७६३९ का नाही, या प्रश्नाचं उत्तर मात्र नाहीये माझ्याकडे.

नगरीनिरंजन Thu, 05/02/2015 - 17:57

In reply to by आदूबाळ

ट्रेंड असाच पुढे चालू राहणार नाही हे इंट्युइटिव्हली बहुतेकांना वाटतेय. मलाही वाटते की ट्रेंड कन्टिन्यु होणार नाही आणि सपाटही होणार नाही (झाला तर अतिशय थोड्या काळासाठी होईल). कारण तुम्ही सांगितलेलेच आहे. घसरणार्‍याच नव्हे तर आहे ती मॉर्टॅलिटी मेंटेन करायलाही अधिकाधिक स्रोत लागतात.
पण हा धाग्याचा उद्देश नाही असे वाटतेय. जेव्हा घासकडवी त्यांचे गणित सांगतील तेव्हा अधिक चर्चा होईलच.

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 18:07

In reply to by आदूबाळ

"सपाटीकरणाचा प्रतल" १०च का?

नाही, काहीतरी गल्लत होते आहे. मला हा दर १० वर स्थिरावेल असं म्हणायचं नाहीये. एक चांगला माइलस्टोन म्हणून तो आकडा वापरतो आहे इतकंच. त्यानंतर त्यावरू तो १ वर जायला किती वर्षं लागतील वगैरे अंदाजही करता येतील.

डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्सचा मुद्दा अचूक आहे. त्यामुळेच अमेरिका आणि युरोपियन युनियनचे कर्व्ह बघितले तर ते पस्तीसवरून दहावर यायला बरीच वर्षं लागली.

बॅटमॅन Thu, 05/02/2015 - 17:14

यात एक महत्त्वाची उणीव आहे ती म्हणजे उदगीरचा ग्राफ दिलेला नाही. त्या गोल्ड स्टँडर्डशिवाय कसलाही अंदाज वर्तवणं म्हणजे निव्वळ कल्पनाशक्तीचे वारू उधळणे आहे.

ऋषिकेश Thu, 05/02/2015 - 17:23

In reply to by वृन्दा

माझ्या मते हे ट्रोलिंग नाही. निखळ विनोद आहे. असो. या धाग्यावर चर्चा भरकटवण्याला माझा हातभार नको. मी गप्प बसतो

अनु राव Thu, 05/02/2015 - 17:32

In reply to by अनु राव

ते भडकाऊच विधान होते त्यामुळे भडकाऊ श्रेणी दिल्याबद्दल तक्रार नाही.

पण जिथे बॅट्या स्वताच म्हणतोय की ते ट्रोलिंग होते तर ..

वृन्दा Thu, 05/02/2015 - 17:34

In reply to by अनु राव

पण ऋ आधी म्हणाले की ट्रोलींग नाही. अन मग बॅट्या यांना उबळ आली खरं बोलण्याची =)) त्यामुळे ऋ तोंडघशी पडले. असो ;)

अनु राव Thu, 05/02/2015 - 17:36

In reply to by वृन्दा

हा अभ्यास मी केला नव्हता. आता पुढच्या वेळेला टायमिंग पण बघणे आले.

एक उपप्रश्न - बॅट्या नी केवळ र्‍ऋ ला तोंडघाशी पाडण्यासाठी नंतर ट्रोलिंगची कबुली दिली की त्याला तसे खरेच वाटते आहे.

बॅटमॅन Thu, 05/02/2015 - 17:37

In reply to by अनु राव

या केसमध्ये ऋ ला तोंडघशी पाडण्यात माझा स्वार्थ नव्हता. सबब उचकावण्याच्या व्याख्येत माझा प्रतिसाद बसतो असे वाटल्याने मी म्हणालो इतकेच.

अतिशहाणा Thu, 05/02/2015 - 17:28

In reply to by बॅटमॅन

थोडा असहमत.

मोठमोठे तज्ञ व आकडेवाऱ्या काही म्हणत असल्या तरी वैयक्तिक पातळीवरील निरीक्षणानुसार एखादी गोष्ट त्या आकडेवाऱ्यांच्या विरोधात जात असेल तर वैयक्तिक निरीक्षणाला थोडेसे प्राधान्य द्यावे अशा मताचा मी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Pattern_recognition_%28psychology%29

वृन्दा Thu, 05/02/2015 - 17:30

२०२४?

२०१० मध्ये सरासरी आहे= २३
२००० मध्ये सरासरी आहे = ३९
१९९० मध्ये होता = ५४
म्हणजे दशकात १५/१६ ने घट आहे बहुधा
म्हणजे २०२४ पर्यंत १० जाईल की

राजन बापट Thu, 05/02/2015 - 17:32

धागा छान.

>>सर्व जगाची सरासरी इन्फंट मॉर्टॅलिटी कुठच्या साली १० पर्यंत येईल ?
माझं उत्तर बहुदा २०३० ते २०३५ पर्यंत.

प्रश्न :
१. माल्थसने जे वर्तवले होते की लोकसंख्या नको तेव्हढी वाढून तोंडे अधिक नि अन्न कमी अशी अराजकसदृष परिस्थिती होईल ती तर विसाव्या शतकात खोटी पडली कारण अन्नोत्पादन एक्स्पोनेन्शिअली वाढले. आता हे बालमृत्यूचं प्रमाण एका आकड्यावर आल्यावर माल्थसची थिअरी पुन्हा डोकं वर काढेल का ?

२. जागतिक लोकसंख्येचा बेल कर्व्ह शिखरबिंदूवर जाण्याबद्दलचे लेटेस्ट अंदाज काय आहेत ? २०५० सालच्या सुमारास का ? याबद्दल जे सिनारिओज् बांधले जातात त्यातला सर्वाधिक मान्यताप्राप्त सिनारिओ काय आहे ?

बॅटमॅन Thu, 05/02/2015 - 17:36

In reply to by राजन बापट

जागतिक लोकसंख्येचा बेल कर्व्ह शिखरबिंदूवर जाण्याबद्दलचे लेटेस्ट अंदाज काय आहेत ? २०५० सालच्या सुमारास का ? याबद्दल जे सिनारिओज् बांधले जातात त्यातला सर्वाधिक मान्यताप्राप्त सिनारिओ काय आहे ?

हाच प्रश्न मलाही आहे. भारत, पाक, बांग्लादेश, चीन हे देश तसेच सौथ ईस्ट एशिया व आफ्रिका यांचा लोकसंख्यावाढीचा रेट कधी स्टॅबिलाईझ होईल?

तसेच युरोपचे पुढे काय होणार? डेमोग्राफिक ट्रांझिशन थेरी ही काईंड ऑफ डूम्सडे छापच वाटते. हे पोस्ट-इंडस्ट्रियल जगात लाँगटर्मसाठी लोकसंख्येतले बदल कसे होतील याचे समाधानकारक उत्तर अजूनतरी मिळालेले नाही.

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 17:52

In reply to by राजन बापट

लोकसंख्यावाढीच्या आणि ती स्थिरावण्याचा अनेक देशांमध्येे अभ्यास झाला आहे. त्यावरून खालील मॉडेल सर्वमान्य आहे.

सुरूवातीच्या काळात जन्मदर आणि मृत्यूदर प्रचंड असतो. माल्थसने त्याच्या आसपास जी परिस्थिती पाहिली ती ही. त्यात रोगराई, दुष्काळासारखं काहीही नैसर्गिक अरिष्ट आलंं की मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर वाढायचे. त्यामुळे वाढणारी लोकसंख्या केव्हाही नष्ट होऊ शकते हे त्यावेळचं सत्य होतं. मात्र मानवी समाज प्रगतीच्या पायऱ्यांवरून पुढे जातो तसतसा मृत्यूदर कमी होत गेला आणि लोकसंख्या वाढते. पुढच्या प्रगतीच्या काळात जननदर वेगाने कमी होतो. आणि शेवटी लोकसंख्या स्थिरावते किंवा घटतेही.

आत्तापर्यंत जगाची लोकसंख्या २०५० च्या आसपास स्थिरावणार यावर एकमत होतं. पण नुकताच एक पेपर पब्लिश झाला त्यात ८०% शक्यता अशी वर्तवली आहेे की २१०० पर्यंत ती १२.३ बिलियन असेल.

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 18:42

In reply to by राजन बापट

क्ष अक्षावरती काळ आहे. त्यातल्या तीन कर्व्ह्जपैकी एकाने जन्मदर दाखवलेला आहे, दुसऱ्याने मृत्युदर दाखवलेला आहे, आणि तिसऱ्याने एकंदर लोकसंख्या दाखवलेली आहे. प्रगती होते तेव्हा मृत्यूदर पटकन कमी होतो त्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढते. त्यानंतर जन्मदरही घटायला लागतो, तेव्हा लोकसंख्या वाढतच राहाते पण कमी वेगाने. जेव्हा जन्मदर घटतच जाऊन मृत्यूदराबरोबर येतो तेव्हा लोकसंख्या स्थिरावते. जर जन्मदर अजूनही घटला तर ती घटते.

१, २, ३, ४ हे या वेगवेगळ्या काळांचे टप्पे आहेत.

वृन्दा Thu, 05/02/2015 - 18:57

In reply to by राजेश घासकडवी

सुंदर!!! = थोडंफार तरी कळलं :)

जननदर शून्यापर्यंत जाऊ शकतो पण मृत्यूदर कधीच शून्य होणार नाही :) हे आलेखावरुन व कॉमन सेन्स ने कळते आहे.

धनंजय Thu, 05/02/2015 - 17:38

तांबड्या तपकिरी रेषा 1960मध्ये ज्या स्तरावर होत्या, साधारण ताया स्तरावर आज जागतिक सरासरी आहे. तिथपासून दहापर्यंत यायला तांबड्या तपकिरी रेषांना साधारण 20 वर्षे लागली. नाॅनलिनिअरपणा वगैरे त्यातच आला. म्हणून जागतिक सरासरीला आजपासून वीस वर्षे. (जन्मदर, प्रादेशिक लोकसंख्या मुदादामून लक्षात घेतली नाही. ती लक्षात घेतलायास अंदाजपंचे आजपासून चाळीस वर्षे लागतील)

वृन्दा Thu, 05/02/2015 - 19:04

In reply to by धनंजय

मला बहुतेक कळलं.
तांबड्या रेषा १९६० मध्ये जिथे आहेत,
तिथे जागतिक सरासरी आज आहे. म्हणजे ५० वर्षांचा फरक.
तांबड्या रेषा १९९० मध्ये १० होतील.
म्हनजे १९९०+५० = २०४० मध्ये जागतिक सरासरी १० होईल

अजो१२३ Thu, 05/02/2015 - 18:07

असाच एक लोकसंख्येचा देखिल अंदाज मागवता येईल. जस्ट ग्राफ पाहून कोणत्या वर्षी किती लोकसंख्या जगात असेल. दॅट विल बी मोर इंटेरेस्टींग.
----------------

तर प्रश्न असा आहे की वरच्या आलेखात दिसणारे ट्रेंड पुढेही चालू राहिले तर सर्व जगाची सरासरी इन्फंट मॉर्टॅलिटी कुठच्या साली १० पर्यंत येईल?

यासाठी जगाची सरासरी १० असेल तेव्हा रेंज काय असेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
१. काहीं देश शून्याच्या आसपास आणि काहीं २०च्या
२. सगळेच देश १० च्या आसपास

आपण फक्त केस २ पाहू -
यूएस ची कर्व उलट जात आहे. ती १० च्या वर गेली नै पाहिजे.
यात दोन सब-केसेस आहेत.
१. भारतात चीनच्या दरांच्या बदलांचे रेप्लिकेशन होणे. असे झाले तर चीन प्रमाणे भारतात ३०-३५ वर्षांत दर १० होईल.
२. भारतात २००० पासूनचा ट्रेंड कायम राहिला तर अजून १५ वर्षे.
मंजे २०४५ किंवा २०३० कारण भारत हा या लीगला जॉइन करणारा शेवटचा देश असेल.

सगळ्यात वरची फिक्कट निळी रेषा भारत आणि कुठेही इतर रेषेला न छेदणारी रेषा म्हणजे चीन असे धरले आहे. जस्ट इन केस ऑफ मिसरिडींग कलर्स.
--------------
तसं ग्राफ पाहून सांगा म्हणताना किती रेंजसाठी कसला ट्रेंड लावा हे सांगणे पण गरजेचे असावे.

राजेश घासकडवी Thu, 05/02/2015 - 19:13

In reply to by अजो१२३

२. सगळेच देश १० च्या आसपास

नाही, जगाची सरासरी म्हणजे पहिल्या केसच्या जवळ जातं. काही देश दहाच्या वर, काही दहाच्या जवळपास, काही दहापेक्षा कमी. पण सगळ्या रेषा एक्स्ट्रपोलेट केल्या तर बहुतेक सगळे वीसच्या खाली असतील असा अंदाज आहे.

सगळ्यात वरची फिक्कट निळी रेषा भारत

ते सबसहारन आफ्रिका आहे, पण तरीही त्यामुळे शब्दबदलापलिकडे तुमचा युक्तिवाद बदलत नाही.

Nile Thu, 05/02/2015 - 20:57

भारताचा आजचा रेट धरला तर पस्तीस सालापर्यंत यायला पाहिजे. पण चाळीसच्या खाली आल्यानंतर रेट कमी होतो असे इतर प्लॉट्सवरून दिसते. त्यातही चायनाचा प्लॉट अ‍ॅग्रेसिव्ह आहे, तो भारताला जवळजवळ अशक्य आहे. युरोप अमेरीका मॅच झाला तरी खूप झालं म्हणायचं. म्हणून त्याहून कंझर्व्हेटीव्ह इस्टिमेट म्हणून "चाळीस ते दहा" यायला एकूण ४०-५० वर्षं अजून लागतील असे वाटते. थोडक्यात २०५०-६०.

राजेश घासकडवी Fri, 06/02/2015 - 10:02

आत्तापर्यंतचे अंदाज -
२०३५
२०४० ते २०५०
२०२४
२०३० ते २०३५
२०३५ ते २०५५
२०४०
२०३० ते २०४५
२०५० ते २०६०

या सगळ्यांची सरासरी २०३९ इतकी येते. मला आश्चर्याची गोष्ट अशी वाटली की मी काढलेल्या उत्तरापेक्षा हे किंचित ऑप्टिमिस्टिक आहे. प्रत्यक्ष विदा बघितल्यावर सगळेच ऑप्टिमिस्टिक होतात हे पाहून बरं वाटलं.

वरच्या ग्राफमध्ये या पाच प्रांतांचा लोकसंख्येनुसार वेटेड अॅव्हेरज दाखवलेला आहे. कारण उघड आहे. दर हजारी चाइल्ड मॉर्टॅलिटी काढताना जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे जन्म जास्त होतात, त्यामुळे दरांची सरासरी काढताना चीन, भारत, आणि सबसहारन आफ्रिकेच्या दराकडे तो अधिक झुकेल हे उघड आहे. आता या वेटेड अॅव्हरेजवरून पुढचा कर्व्ह कसा प्रेडिक्ट करायचा? एक सोपी पद्धत म्हणजे आत्तापर्यंत जे झालं ते एकरेषीय होतं असं गृहित धरायचं आणि ती रेषा सरळ पुढे वाढवायची. पण असं करणं बरोबर नाही. कारण ती रेष आणखीनच पुढे वाढवली तर कधीतरी ती शून्याला जाईल, आणि त्यानंतर शून्याच्याही खाली जाईल. हे अशक्य आहे. तेव्हा भाकित करताना, विशेषतः अनेक वर्षांचं भाकित करताना हे करणं उपयोगी नाही.

म्हणून मी एक्स्पोनेन्शियल डीकेचा फॉर्म्युला वापरला. म्हणजे दरवर्षी हा आकडा घटतो, पण ती घट आकड्यामध्ये कमी कमी होत जाते. म्हणजे चक्रवाढीच्या बरोब्बर उलट. (याला चक्रघट म्हणता येेईल) समजा तुमच्याकडे शंभर रुपये आहेत आणि दररोज उरलेल्यातले १० टक्के तुम्ही वापरायचं ठरवलं. तर पहिल्या दिवशी १० रुपये जाऊन ९० उरतील. दुसऱ्या दिवशी त्याचे दहा टक्के म्हणजे ९ जातील आणि ८१ उरतील. आठवड्याभराने सुमारे ५० उरतील. त्यानंतर आठवड्याभराने २५ उरतील. म्हणजे निम्मे होण्याचा कालावधी समान असेल.

याप्रमाणे विचार करता, वरच्या ग्राफमध्ये १९६९ साली दर होता १०६ आणि २०१३ साली दर होता २८. म्हणजे ढोबळमानाने ४४ वर्षांत १/४ ने घटला. किंवा २२ वर्षांत निम्मा झाला. आता या २८ चा १० व्हायला किती वर्षं लागतील? तर २२ वर्षांत २८ चे १४ होतील. १४ चे १० व्हायला अजून सुमारे ११ वर्षं लागतील. म्हणजे ३३ वर्षं. अचूक गणित केलं तर उत्तर दरवर्षी ३% घट तेव्हा ३४ वर्षांनी २८ चे १० होतील असं येेतंं. तेव्हा गेल्या चव्वेचाळीस वर्षांत जे झालं तेच पुढे होत राहिलं तर २०४९ साली हा दर १० असेल.

पण 'हाच ट्रेंड चालू राहिला तर' याप्रकारचा युक्तिवाद थोडा धोकादायक असतो. हाच ट्रेंड म्हणजे नक्की कुठचा? संपूर्ण ४४ वर्षांचा? की गेल्या २० वर्षांचा? की गेल्या दहा वर्षांचा? कारण ट्रेंडही बदलत असतात. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी जग वेगळं होतं, त्यावेळची परिमाणं लागू राहात नाहीत. त्यामुळे काही वेळा गेल्या दहापंधरा वर्षांचा ट्रेंड पाहाणं जास्त योग्य असतं. उदाहरणार्थ, भारताचा जीडीपी ग्रोथ रेट सत्तरीच्या दशकात ३ टक्के होता - सध्या तो ८ च्या आसपास असतो. म्हणून पुढच्या वर्षीचा रेटबद्दल भाकित करताना जुने दर सरासरीत घेणं योग्य ठरणार नाही.

वर गेल्या चार दशकांतले बदलते दर दाखवले आहेत. ८० आणि ९० च्या दशकांत चीन आणि सबसहारन आफ्रिकेत हे दर प्रचंड घटलेले दिसून येतात. ८८ ते ९२ या काळात तर जवळपास काहीच सुधारणा होत नव्हती. त्यानंतर परिस्थिती सुधारण्याचा दर वाढत गेेला आणि आता हा दर ५ टक्क्यांच्या आसपास आहे. भारताचा दर सावकाशपणे पण सातत्याने वाढताना दिसतो. आता हा दर ४ टक्क्याच्या जवळ आहे. गेल्या दहा वर्षांत असणारा ४.७% दर पुढे कायम राहील असं म्हटल्यास उत्तर प्रचंड बदलतं. ४.७ टक्के चक्रघटीने २८ चे १० व्हायला फक्त २१ वर्षं लागतील. म्हणजे उत्तर येतं २०३६.

तेव्हा माझी रेंज आहे २०३६ ते २०४९. पण माझ्या मते २०३६ च्या जवळ उत्तर असेल. म्हणून मी एक आकडा द्यायचा झाला तर २०४० म्हणेन.

नितिन थत्ते Fri, 06/02/2015 - 10:17

गब्बरसिंगचे तत्त्वज्ञान प्रबळ झाले तर यात काय फरक पडेल?

म्हणजे समजा सरकारांनी इन्फण्ट मॉर्टॅलिटी कमी करणे हे आपले उद्दिष्ट नाही असे ठरवले. म्हणजे सरकारी पातळीवर यासाठी खास कार्यक्रम/योजना राबवणे थांबवले गेले. त्या स्थितीत तरीही इन्फण्ट मॉर्टॅलिटी कमी होत राहील का?

गब्बरसिंग यांचे तत्त्वज्ञान टोटो अंमलात आले तर 'फडतूसांचा' आपोआप नायनाट होऊन ज्यांना "जिवंत मूल जन्माला घालणे"* परवडते त्यांनाच मुले होतील कारण तेच शिल्लक असतील. मग इन्फण्ट मॉर्टॅलिटी रेट शून्याच्या जवळपास जाईल का?

प्रश्न आहे तो फडतूसांचा नायनाट व्हायला किती काळ लागेल. आणि अ-फडतूसांच्या पोटी जन्मलेली मुले फडतूस असतील तर त्यांचा नायनाट कधी होईल.

*त्यासाठीच्या प्रीनेटल टेस्ट, मातेच्या प्रकृतीची काळजी घेणे हे परवडू शकणे....

राजेश घासकडवी Fri, 06/02/2015 - 14:47

In reply to by नितिन थत्ते

या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं सोपं नाही. कारण श्रीमंत देशांतच प्रथम इन्फंट मॉर्टॅलिटी कमी होताना दिसते. तसंच एखाद्या गरीब देशातही वरच्या वर्गातल्या लोकांमध्ये मॉर्टॅलिटी रेट कमी असेल. तेव्हा सरकारांनी मॉर्टॅलिटी कमी करणे हे आपले उद्दिष्ट मानलं असूनही फडतूस-अफडतूस विषमता आहेच.

जर टोकाची 'सरकार सुरक्षा व न्याय यापलिकडे काहीही करणार नाही' अशी भूमिका घेतली तर फडतूस मरत जातील व शिल्लक राहिलेल्यांपैकी काही लोक फडतूस बनत राहतील आणि ते मरत राहतील असा माझा अंदाज आहे. त्यामुळे आपण लोकसंख्यावाढीच्या टप्प्यांवर उलटा प्रवास करू बहुतेक. माझ्या मते समाज चालवण्यासाठी काही फडतूस लोक लागतातच. चातुर्वर्ण्यात जसे शूद्र लागायचे तसे.... [तिरकसपणा समजून घ्यावा]

मराठे Tue, 17/02/2015 - 01:59

इथे भारत , चीन आणि श्रीलंकेचा चाईल्ड मोर्टॅलिटी चार्ट दिलेला आहे. आपण 'प्ले' बटण दाबून तो काळाच्या पट्टीवर कसा कमी होत गेला ते पाहू शकतो.

(हँस रोस्लिंग यांचा प्रकल्प)
www.bit.ly/1DilD4a

त्याचा आधार घेऊन असं सांगू शकतो की बालमृत्यूचं प्रमाण १० पर्यंत येण्यासाठी भारताला तरी अजून ४० वर्षं वाट पाहावी लागेल. पूर्ण जगाचं बालमृत्यूचं प्रमाण १० च्या खाली येण्यासाठी मात्र अजून ७० ते ८० वर्षं लागतील असं वाटतं.

राजेश घासकडवी Tue, 17/02/2015 - 14:33

In reply to by मराठे

वा! ग्राफ आवडला. विशेषतः थोड्या काळाचा फरक सोडला तर तीनही देश एकाच कर्व्हवर उतरत आहेत हे तर यातून फारच सुंदर रीतीने स्पष्ट होतं.

या ग्राफमध्ये बालमृत्यूदर (५ वर्षांखालील मुलांचा मृत्यू) आहे, तर मी दाखवलेल्या ग्राफमध्ये इंफंट मॉर्टॅलिटी रेट (१ वर्षांखालील मुलांचा मृत्यू) आहे. पण सर्वसाधारण चित्र त्यामुळे बदलत नाही.

भारतासाठी अजून ४० वर्षं ठीक आहे (बालमृत्यूदरासाठी). पण पूर्ण जगाचं प्रमाण १० च्या खाली जायला ७० ते ८० वर्षं का लागतील ते समजलं नाही. कदाचित तुम्ही 'सर्व देशांचं' म्हणत असाल आणि मी 'जगाची सरासरी' म्हणतो आहे.

ग्राफ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.