Skip to main content

त्रिपेडी (मानसशास्त्र/ज्योतिष/गूढशास्त्र)

यापूर्वी मी धागे अर्थात काढलेले आहेत. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, धागा काढल्यावर विविध अक्षरक्षः अनेकानेक प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियांना उत्तर देणे मला अतिशय जिकीरीचे/ दमछाक करणारे वाटते. इतके की एनर्जी सॅप होते. मानसिक थकवा जाणवतो.

वास्तवातही, जेव्हा ४ डोक्यांबरोबर सामान्य/अगदी अतिसामान्य चर्चा करतानाही, स्वतःचे सत्य (माय ट्रुथ) मांडता येत नाही. बोलू की नको बोलू या संभ्रमातच वेळ जातो अन त्या कचरण्यात मत अजिबात मांडता येत नाही.

अजून वाईट म्हणजे - जर यदाकदाचित मत मांडले, फार बोलणे घडले तर नंतर पश्चात्ताप होतो. मी जे बोलले ते बरोबर केले की करावयास नको होते? फार जास्त बोलले की फार कमी बोलले या अ‍ॅनॅलिसीसमध्येच खूप गुंतायला होते व परीणीती ९९% स्वतःला दूषण देण्यात होते.

_______________________

आता हाच स्वभाव - अ‍ॅनॅलिसीस पत्रिकेत कसा बसतो ते पाहू. १२ राशी ४ तत्वांत विभागल्या आहेत - मेष, सिंह, धनु = अग्नि राशी, वृषभ, कन्या, मकर = पृथ्वी राशी, मिथुन, तूळ, कुंभ = वायु आणि कर्क, वृश्चिक, मीन या जल राशी.

पैकी माझ्या कुंडलीत जल तत्वाचा अतिरेक आहे. म्हणजे - ५ ग्रह जल राशीत. जल तत्व राशी अतिशय हळव्या, मूडी,सायकिक समजल्या जातात. मला कविता, अध्यात्म, प्रार्थना यांची अतिरीक्त आवड आहे. तीव्र मूडीपणाआबद्दल तर न बोललेलेच चांगले.

कुंडलीत वायू राशींचा संपूर्ण अभाव आहे. वायू तत्व हे वाचिक,बौद्धिक समजले जाते. हे लोक बोलण्यात हुषार असतात, जीभेवर सरस्वती खेळते, सांगोपांग व पटापट विचार करु शकतात.
________________________

जर ज्योतिष खोटे असेल असे धरु तर मग स्वभाव आणि कुंडलीतील तत्वे इतकी चपखल कशी काय जुळतात. मी खूप उशीरा कुंडली पहायला शिकले आणी जेव्हा माझी मला कळायला लागली तेव्हा ती स्वभावविशेषाशी इतकी जुळलेली पाहून मला खूप आश्चर्य वाटले. म्हणजे आधी कंडीशनींग झालेले नव्हते.
_________________________
अर्थात हा धागाप्रपंच यासाठी आहे की - स्वतःची विचारशक्ती, बौद्धीक क्षमता कशी वाढवायची? ती प्रक्रिया तर हळूहळू च असणार पण सुरुवात तर केली पाहीजे.
काही जण अंधश्रद्धा म्हणतील पण याच प्रश्नाचे उत्तर मी जेव्हा गूढशास्त्रात (७ चक्र वगैरे) शोधलं तेव्हा हे सापडले की -"सेल्फ्-एक्स्प्रेशन" चे विशुद्धी चक्र जर "अंडरअ‍ॅक्टीव्हेट्ड" असेल तरीदेखील अशाच समस्या येतात मग त्यावर काही विशिष्ठ रंगाचे आभूषण गळ्याभवती परीधान करणे, मंत्र जपणे वगैरे उपाय आहेत.

मानसोपचारतज्ञाने याच प्रश्नाचे उत्तर वेगळ्या रीतीने दिले. त्याच्या मते डावा (की उजवा) मेंदू ओव्हरअ‍ॅक्टीव्ह आहे अन औषधाने बदल घडू शकतो.

________________________

पण एकंदर हेच जाणवले की विज्ञान (मानसशास्त्र) काय किंवा गूढशास्त्र (७ चक्रे) काय किंवा ज्योतिष काय सर्वांचे अनुमान सारखेच आहे की हे असंतुलन आहे. कोणी म्हणेल कुंडलीमधील तत्वांचे तर कोणी म्हणेल मेंदूमधील अ‍ॅक्टीव्हीटीचे.

अन्य कोणाला असा काही अनुभव आहे का?

अजो१२३ Sun, 24/11/2013 - 19:33

सारिकाजी, आपण कशाचाही संबंध कशाशीही लावू शकतो, कशावरून काहीही अर्थ काढू शकतो. पण सहसा हे टाळावं. तुम्हाला ज्योतिष वा मानस शास्त्राचा फायदा झाला असेल तर तो घ्या आणि पुढे चाला. तुम्ही जितका परिचय दिलाय त्यावरून इतर कोणाची त्यांतली आस्था कमी जास्त होणार नाही. जालावर तर नाहीच. आणि टंकून मानसिक थकवा येत असेल तर नाहीच नाही.

............सा… Sun, 24/11/2013 - 20:30

In reply to by अजो१२३

अरुण जोशी, सर्वात प्रथम, प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मला कुतूहल होते की अशी पत्रिका कोणाचही असेल का ज्यात काही विशिष्ठ तत्वाच्या राशींंमध्ये ग्रहच नाहीत. उदा - अग्नीराशीत ग्रह नसतील तर? अग्नी तत्व हे सकारात्मकता, धडाडी, साहस दाखविते मग त्या लोकांना अभावामुळे काय समस्या आल्या,
जालावर च हे विचारु शकत कारण स्वतः ज्योतिषी नसल्यामुळे लोकांना एकदम जन्मस्थळ /वेळ /पत्रिका आदि मागू शकत नाही.
आणि तरी ४-५ पत्रिका मी पाहील्यात व संबंधीत व्यक्तींचे नीरीक्षण केले आहे व हे नीरीक्षण खूप जुळलेले आहे.
जसे "राहू करीयर च्या स्थानात असलेली व्यक्ती करीअर संबंधी ऑबसेसीव्ह असणे मग ते चांगल्या अथवा वाईट कोणत्याही प्रकारे. म्हणजे फार कर्तृत्ववान नसूनही हे करीअर नको ते हवे असा चिवडचोथा करीत बसणारी

असो. तर काही बाबी खूप रोचक वाटतात पैकी एखाद्या तत्वाचा भडीमार अथवा अभाव हे रोचक वाटते.

अजो१२३ Sun, 24/11/2013 - 20:52

In reply to by ............सा…

मानसशास्त्र खूप रिलायेबल आहे. (जितकी गरज आहे तिच्या १% पण नाही, पण इतर ज्ञान शाखांच्या तुलनेने खूपच रिलायेबल आहे). कोणते असंतुलन आहे असे वाटत असेल तर ते 'उपचार करण्याची गरज असलेले' आहे कि नाही हे मानसशास्त्रज्ञांकडून जाणून घ्या आणि उपचार करा.

परंतु ज्योतिष, मानसशास्त्र,गूढशास्त्र यांच्या दुव्यांमधे आपल्याला या धाग्यावर शुद्ध चर्चा करायचा हेतू असेल तर आपण टाकलेली ठीणगी पुरेशी नाही.

प्रकाश घाटपांडे Sun, 24/11/2013 - 21:08

सारीकाजी मला आपली काळजी वाटते. ज्योतिष वा गूढशास्त्रांच्या नादी लागून वेडे झालेले लोक ऐकीवात आहेत. ( हे मी ज्योतिष वर्तुळातच ऐकले) प्रतिभावंत वा शास्त्रज्ञ हे त्या त्या क्षेत्रात वेडेच असतात. आपल्या या वेडेपणात आपण एखाद्या नवीन क्षेत्रात प्रवेश कराल. कदाचित यशस्वी ही व्हाल. न जाणो सारिकामाताजी म्हणून उदयास ही याल. आपल्याला शुभेच्छा!

............सा… Sun, 24/11/2013 - 21:20

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रघा, होय "एव्हेरीथिंग विदीन लिमीट" हा नियम लागू आहेच. ज्योतीषात वाहवत जाऊ नये हे बरोबरच आहे. पण त्याकडे छंद म्हणून पाहू नये असे थोडीच आहे? राहीला मुद्दा "माता/बाबा" बनण्याचा ते तर तुम्हीही बनू शकाल, कोणीही बनू शकते त्याकरता ज्योतीषात रस असण्याचीच आवश्यकता नाही.

प्रकाश घाटपांडे Sun, 24/11/2013 - 21:27

In reply to by ............सा…

भावना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. मी माझे कॉलजचे एक वर्ष या नादात वाया घालवले होते म्हणुन राहवले नाही.

............सा… Sun, 24/11/2013 - 22:19

In reply to by प्रकाश घाटपांडे

:) मी आपले प्रतिसाद वाचते आणि बोचण्याकरता किंवा खुनशीपणे आपण लिहीणार नाही याची खात्री होती/आहे. तसेच आपण भविष्यविषयक दोन्ही बाजू जाणता हेही मला माहीत आहे.

खरं सांगायचं तर आपल्याशी सहमत असणार्‍या/ समानशीलव्यसनेषु लोकांच्या प्रतिक्रियेतून दिलासा मिळतो तर याउलट असहमत असणार्‍या लोकांच्या प्रतिक्रियांतून नवी दिशा/विचार मिळतात. खुनशी प्रतिक्रियांमधून काहीच हाती लागत नाही फक्त कोणाला टाळायचे ते कळते (आणि त्यातही माझी स्मृती फार ग्रेट नसल्याने ते लोक लक्षातही राहात नाहीत विशेषतः जर घाऊक असतील तर) "ऐसी" आवडते याचे कारण इथेच सांगते - खुनशीपणा इथे दिसला नाही. खूप विचारी व प्रगल्भ सदस्य आहेत जे खूप "सपोर्टीव" आहेत.

चुकून "ऐसी" मी "आइसी" असे लिहीले होते.पण का कोण जाणे खरच हे "आय सी" असेच आहे. "माझे हे मत आहे आता तू तुझे मत बिनघोर मांड" अशी सहीष्णुता येथे आहे.
__________________________

अजून एक - असंतुलनातून संतुलनाकडे असाच प्रवास मी करु इच्छिते. अति अध्यात्म/काव्य/गूढता छाटून तर्क/विवेक/विचारशक्ती कडेच मला प्रवास करायचाय आणि तोच प्रयत्न आहे :)

मन Sun, 24/11/2013 - 22:29

लोकांचे काही भारी भारी अनुभव ऐकलेत. ते कधीच पटले नाहित.
घाटपांड्यांचं "ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी" ही तर मुळातून वाचावी इतकी सुंदर लेखमाला.
सौम्य्,संयत लिखाण. कुठल्याच बाजूचा पूर्वग्रहही नाही.
सूर्य - वारा कथेची त्यांच्या लिखाणाला दिलेली उपमाही चपखल.

प्रकाश घाटपांडे ह्यांच्या लेखांचे हे दुवे:-
बरीचशी माहिती खालील लिंकांवर मिळेलः-
http://mr.upakram.org/node/806
http://mr.upakram.org/node/992
http://mr.upakram.org/node/947
http://mr.upakram.org/node/945
http://mr.upakram.org/node/814
http://mr.upakram.org/node/1065
http://mr.upakram.org/node/843
http://mr.upakram.org/node/955
http://mr.upakram.org/node/991
ह्या सिरिजचा भाग नसलेला अजून एक धागा http://mr.upakram.org/node/465.
.
.
.
एकुणात "ज्योतिषाकडे जाणे ही भारतीय जनतेची मानसिक गरज बनली आहे." हे पटत गेले.
त्यात फार तथ्य नाही ह्याच बाजूकडे नेमका माझा कल झुकला.
.
.
काही दिवसांत "तुम्ही नारळासारखे किंवा फणसासारखे" www.misalpav.com/node/18754‎ ह्या गवि ह्यांच्या लेखात
असलेला सूर बराच पटला, किम्वा मी ज्या लायनीवर विचार करत होतो; त्याच धर्तीवरचा वाटला.
किंवा "पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक पहिला गिर्‍हाईक कसा मिळवावा)" www.misalpav.com/node/13990 ह्या
राजेश घासकडवी ह्यांच्या ज्योतिषामागील श्रद्धेमागचं छापा-काटा लॉजिक अंदाजपंचे सांगूनही अचूक भविष्य्/निकाल सलग सोळा वेळेस येण्याची
शक्यता शांत डोक्यानं विचार केल्यावर लक्षात आली. मौज वाटली.
.
.
.

पण नेमकं तेवढ्यात कुतूहलानं मी धागाकर्त्या मामींना स्वत्;चे DTP देउन पाहिले.
त्यानीही कुतूहलशमन म्हणून काही निरिक्षणे व अनुमान सांगितले.
त्यातले काही फारच अचूक वाटले. म्हणजे "ज्योतिषी अशा ढोबळ गोष्टी सांगतात" असे मानणार्‍या मला फार आश्चर्य वाटलं.
काहिसा हबकलोच.
गोची अशी की ह्या गोष्टी फारच खाजगी/वैयक्तिक असल्यानं ह्याचे तपशील इथे जाहिर करणं अप्रशस्त वाटतं;
काहिसा संकोच वाटतो.त्यामुळे "असं असं घडलं बुवा" म्हणत मित्रांशी बोलावं तसं हे मुद्दे इथे चर्चेत सर्वांसमोरही ठेवता येत नाहित.
शिवाय इतर ज्या शंका, आक्षेप ज्योतिषाबद्दल आहेत; त्यासही उत्तर मिळत नाही. पण घडलेली गोष्ट विसरताही येत नाही;
छाप्-काटा इतकं सरळ लॉजिक लावून सोडवताही येत नाही. हा योगायोग असलाच तर फारच उच्च कोटीचा,अतिदुर्मिळ असा योगायोग असावा.
ह्याउप्पर माझ्या वैयक्तिक वागण्यात, इतर गोष्टींबद्दलच्या मतांत फारसा फरक पडला नाहिच.
देव्-धर्म, गूढ गोष्टींचे आकर्षण, त्यांचा विश्वास ह्याबद्दल अजूनही कमालीचा उदासिन आहे.( माझ्या उच्चभ्रु मित्रानं माझ्या वागण्याला "अज्ञेयवाद" म्हणतात असे सांगितले. असेलही. अज्ञेयवाद नक्की काय ते ठाउक नाही; पण "त्या" सर्व बाबतीत मी उदासीन आहे. )
मरेन तेव्हा " विद्युतदाहिनीत जाळून काम सोपे सुटसुटित करा. माझे श्राद्ध घालू नका. " हेच सांगून जाणार आहे;
आपण पाहिलेल्या गोष्टीबद्दलचा काहिसा संभ्रम डोक्यात घेउनच जाइन वाटते.
.
.
.
माझ्यासारखीच काहिशी अवस्था चित्रगुप्त ह्या मिपाकर आयडीची दिसली. त्यांनी "ढळ धळ क्षणात होते"
हा देव -धर्माची जबरदस्त टिंगल करणारा धागा काढला.( हा साला दुवा सापडत नाहिये आता.)
"पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो..." अशा नावाचाही एक धागा सनातन्यांची खेचण्यासाठी काढला. पण तरीही:-
काही चमत्कारिक अनुभवांचा उल्लेख त्यांचा लेखन्-प्रतिसादात दिसतो. अगदि विचित्र, आणि अतर्क्य म्हणता
यावेत असे अनुभवांचे त्यांचे संकलन आहे.सर्व ख्रिस्तभक्तांकडे एकेक क्रॉस असतो, तसच माझ्याकडे एक प्रश्नचिन्ह आहे.
तेच प्रामाणिक प्रश्नचिन्ह त्यांच्याकडेही आहे असं मला वाटलं.
.
.

सोत्रिंचा धागा ( पॅटर्न्स आणि ज्योतिष : एक शक्यता ? http://www.aisiakshare.com/node/1067)
.
.
असो.
बाकी,ज्योतिष वगैरे विषयावर हल्ली दोन्ही बाजूंनी सर्वसाधारणपणे तेच तेच मुद्दे येताना दिसताहेत.
रंगमंचावर नवीन अभिनेत्यांनी जुनीच गाजलेली पात्रे वठवत रहावीत आणि जुन्यांनी संन्यास घ्यावा तसे काहीसे.
अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात, संवादही तेच ते बोलतात, तरीही न रहावून एक प्रतिसाद दिलाय.
.

ऋषिकेश Mon, 25/11/2013 - 10:07

अनुभव/चमत्कार वगैरे जोपर्यंत वैयक्तीक आहेत तोपर्यंत माझे काहीच म्हणणे नसते. पण तेच सत्य आहे किंवा मला अनुभव आला म्हणून तुम्ही हे मानलेच पाहिजे किंवा स्वतः अनुभव घेऊन बघा की मग वगैरे हट्ट सुरू झाले की विरोधाशिवाय पर्याय राहत नाही. (या धाग्यात असे झालेय असे म्हणणे नाही, जस्ट अ लाऊड थिंकिंग)

बाकी, माझी पत्रिका काढलेली असावी, मी ती अजून बघितलेली नाही. त्यामुळे माझ्या जन्मवेळची ग्रहस्थिती आणि त्याचा माझ्या आजतागायत विविध घडलेल्या/ न घडलेल्या/ घडू न शकलेल्या प्रसंगातून घडत गेलेला माझा स्वभाव (जो पुढेही असाच बदलत रहाणार आहे) याचा ताळामेळ सध्यातरी लावावासा वाटत नाही - अजून तरी वाटला नाही - पुढचे कोणी सांगावे?

ॲमी Tue, 26/11/2013 - 19:59

कॉलेजची शेवटची परिक्षा झाल्यावर मैत्रीणीकडुन मिळालेलं लिँडा गुडमनस् सन साइन वाचलेल. लै मजा आलेली :-D मग प्रत्येक नविन भेटलेल्या माणसाला जन्मदिवस विचारुन, सन साइन, गुणअवगुणवर चर्चा चालायची. अजुनही चालते. बर्याचदा it just helps breaking ice and bonding :-) पण मी ते जास्त सिरीअसली घेत नाही. एक मैत्रीण ज्योतिषांना भेटायला जायची. मला सोबत चल म्हणाली की मीपण जायचे. फुकट असेल तर पत्रिका दाखवायचे. 'माझे काही प्रश्न नाहीत तुम्हीच सांगा काय दिसतय' म्हणायचे. व्यक्तिमत्वाबाबत काही बरोबर, काही चुक असायच. पण भविष्य म्हणुन जे काही ऐकल ते आतापर्यँत चूकच आलय... एक मैत्रीण नाडीवाल्याकडे गेलेली. त्यांनी सांगितल वडीलांचे हेल्थ प्रॉब्लेम येतील. आणि ते २ २.५ वर्षाँनी आले. तर ती म्हणतेय 'त्यांनी सांगितलेल'. मी म्हणल 'अगं २ वर्ष ही कसली डोँबलाची प्रिसीजन'...

............सा… Tue, 26/11/2013 - 20:04

In reply to by ॲमी

अस्मि भविष्य चूक आलय कसं म्हणतेस? भविष्य तुला कुठे कळलय? अर्थात संदर्भ आपले मगासचे बोलणे . तू म्हणतेस हे करायचे नाही ते करायचे नाही पण तू नक्की करणार नाहीस याची खात्री काय :) ५ वर्षांनी आपण आमूलाग्र वेगळे असतो.

'न'वी बाजू Tue, 26/11/2013 - 23:09

In reply to by ॲमी

कॉलेजची शेवटची परिक्षा झाल्यावर मैत्रीणीकडुन मिळालेलं लिँडा गुडमनस् सन साइन वाचलेल. लै मजा आलेली (दात काढत) मग प्रत्येक नविन भेटलेल्या माणसाला जन्मदिवस विचारुन, सन साइन, गुणअवगुणवर चर्चा चालायची. अजुनही चालते. बर्याचदा it just helps breaking ice and bonding (स्माईल) पण मी ते जास्त सिरीअसली घेत नाही.

Linda Goodman is all Taurus.

बाकी चालू द्या.