Skip to main content

बखर....कोरोनाची (भाग २)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरिता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

Hospital Scene

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच , या धाग्यावर ?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना ?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

(आधीच्या धाग्यावर १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)

बातमीचा प्रकार निवडा

अबापट Fri, 17/04/2020 - 13:36

In reply to by Rajesh188

राजेश भाऊ,
माहिती म्हणून सांगतो. की या व्हायरस बद्दल जगाला 'ज्ञान' यायला अजून एखादे वर्ष तरी लागणार आहे.आत्ता पुढे येत आहे ती फक्त 'माहिती' . माहिती महत्वाची असतेच , पण एका मर्यादित दृष्टीने.
व्हायरस नवीन आहे आणि त्याच्याबद्दल आतापर्यंत माहिती ही फक्त
एका मोसमातील एका जन समूहात काय झाले त्याबद्दल आहे.
(उन्हाळा व इतर जनसमूह यात व्हायरसच्या infectivity आणि virulance चे काय होणार ते भविष्यकाळातच कळेल.शास्त्रज्ञानाही आणि आपल्यालाही.)
काल आलेली माहिती ही उद्या चुकीची ठरू शकणार आहे (विज्ञान याच डोळस पणामुळे पुढे जाते) यात त्रागा करण्यासारखे काहीही नसते.
आत्ता ज्या उपाययोजना केल्या जात त्या म्हणजे ' कमीत कमी चुकीच्या 'अशा आणि मूलतः प्रतिबंधात्मक अशा आहेत.
बाकीच्या ठिकाणचं माहीत नाही, परंतु किमान आपल्या देशात तरी शास्त्रज्ञ मंडळी ज्ञानी, चौकस आणि सजगतेने पॉलिसीज ठरवत आहेत असे वाटते.
या विषयात मुख्य म्हणजे ICMR नावाच्या शिखर संस्थेतील एपीडिमिओलॉजि प्रमुख डॉ.रमण गंगागखेडकर हे आहेत.
त्यांची एक एका तासाची मुलाखत बघा,
बघून मी तरी आश्वस्त झालो.
आपणही कदाचित व्हाल.
हा खेळ या व्हायरस प्रतिबंधात्मक लस तयार होईपर्यंत (म्हणजे किमान 12 ते 18 महिने) किंवा यावर उपयोगी औषध सापडेपर्यंत चालू राहणार.
याला पर्याय नाही.
विज्ञान वादी लोकांवर टीका करण्याचे प्रयोजन कळले नाही.
कृपया समजावून द्यावे.
खुबीने टाळले वगैरे लिहिता याचा अर्थ कळला नाही.
उत्तर माहीत नसेल तर न देणे हा पर्याय काहीतरीच उत्तर फेकण्यापेक्षा चांगला वाटतो.
किंवा विज्ञाना व्यतिरिक्त दुसरे काही उपाय तुम्हाला ज्ञात असतील तर तेही सांगावेत , आमच्या सारख्या सामान्यजनांचाही फायदा होईल
ता क : तेवढी मुलाखत नक्की बघणे.
बाकी लोभ आहेच...

Rajesh188 Fri, 17/04/2020 - 14:13

In reply to by अबापट

विज्ञान वादी लोकांवर माझा राग नाही उलट त्यांचा अभिमानच आहे.
पण कुठे जगाच्या कोपऱ्यात चार व्हायरस बाधित व्यक्तीच्या निरिक्षणातून निघालेले निष्कर्ष लगेच प्रसारित करू नका ही एवढीच इच्या आहे आणि तीच गोष्ट मला खटकत आहे.
आज प्रसारित करत आहेत आणि उद्या ते खोटी ठरत आहे.
हा उतावीळ पण विज्ञान विषयी कोणतेही साहित्य प्रसारित करताना नसावा.असे प्रामाणिक मत आहे.
माझ्या गावात हजार लोक तंबाखू ४०, वर्ष पासून खातात माझे निरीक्षण आहे त्या मधील एका ल पण कॅन्सर झाला नाही ह्याच मी निष्कर्ष काढला तंबाखू पासून कॅन्सर होत नाही तर ते किती चुकीचं आहे.
हे जितके चुकीचे आहे तितकेच मर्यादित अनुभवातून निघालेले निष्कर्ष रोज नव नवीन प्रसारित करणे पण चुकीचं आहे .
समाजाचे अतोनात नुकसान होते ह्या मध्ये.
त्या पेक्षा विज्ञान वादी लोकांनी जे माहीत आहे त्या वर खोलवर विचार करून चर्चा करावी .
प्रतेक बारीकसारीक शंका वर चर्चा करावी आणि ते प्रसारित करावे असे वाटत.
corona virus विषयी खोलवर अभ्यास झालेल्या विषयावर लिहून आले पाहिजे.
संशोधन करणाऱ्या लोकांना माहीत असलेली पण लोकांपर्यंत न पोचलेली किती तरी अचूक शास्त्र शुद्ध माहिती असेल ती लोकांपर्यंत पोहचवा .
उतावीळ arthvat माहिती पोचवू नका.
बस हेच मत आहे

अबापट Fri, 17/04/2020 - 14:15

In reply to by Rajesh188

तुमचा विचार पटला.
परंतु सामान्यजनांना दररोज माहिती हवी असते बहुधा, (त्या अभावी अफवा आणि घबराट )
देशात सर्वोच्च स्थानी असलेल्या माणसांनाही ही माहिती देणे गरजेचे वाटते.
त्यातून हे सगळे होत असावे
तुमच्यासारखा विचार करणारे दुर्मिळ.
अशा विचारांचे जास्त लोक असते तर सोपे झाले असते.
दुर्दैवाने हा विचार दुर्मिळ
म्हणून...
अजून काय सांगावे ?

कासव Sat, 18/04/2020 - 14:03

In reply to by अबापट


व्हायरस नवीन आहे आणि त्याच्याबद्दल आतापर्यंत माहिती ही फक्त
एका मोसमातील एका जन समूहात काय झाले त्याबद्दल आहे.
(उन्हाळा व इतर जनसमूह यात व्हायरसच्या infectivity आणि virulance चे काय होणार ते भविष्यकाळातच कळेल.शास्त्रज्ञानाही आणि आपल्यालाही.)


त्यासाठी भविष्यकाळाची (अर्थात त्या मोसमाची) वाट पाहिलीच पाहिजे? जर हा पूर्वग्रह असेल तर ह्यात बदलाची शक्यता गृहीत का धरायची नाही? हाच प्रश्न लस तयार होणाऱ्या काळाबाबतही (1 ते दीड वर्ष) आणि ‛ज्ञान’ येण्याच्या कालावधीबाबतही विचारावासा वाटतोय.

आत्ता ज्या उपाययोजना केल्या जात त्या म्हणजे ' कमीत कमी चुकीच्या 'अशा आणि मूलतः प्रतिबंधात्मक अशा आहेत.

+1

अबापट Sat, 18/04/2020 - 14:23

In reply to by कासव

सद्यस्थितीत असेच दिसते.
लस तयार होण्याची व त्यासंबंधित सर्व टेस्टस होऊन ती बाजारात येण्याचा कालावधी हा मानला जातो (कारण यात लस तयार झाल्यावर ती उपयुक्त आहे किंवा कसे आणि त्याचे इतर काही घातक परिणाम तर नाहीत ना याच्या सर्व चाचण्या करून मगच ती बाजारात आणली जाते)
याहून कमी कालावधीत झाले तर सर्व जगाला हवेच आहे परंतु तसे होण्याची शक्यता जरा कमी दिसते.

Rajesh188 Fri, 17/04/2020 - 08:24

In reply to by चिंतातुर जंतू

Covid १९ che महानाट्य रंगमंचावर चालू आहे.
रिझल्ट येतीलच वर्षभरात .
तेव्हा कोणता देश उत्तम रित्या ह्या मधून बाहेर पडला आणि कोणता फसला हे स्पष्ट दिसून येईल.
रोगात मृत्यू पडणाऱ्या लोकांची संख्या लवकर च स्पष्ट होईल प्रतेक देशाची.
वर्ष भर थांबा.
ह्या असल्या विचारवंत चे मत सपशेल खोटी ठरतील.
तेव्हा त्यांना भर चोकात चप्पल नी का मारू नये
असा विचार माझ्या मनात नक्कीच येईल.
फोबेस सारखी नियतकालिके आणि त्यांचे भाडोत्री विचारवंत खूप आहेत .
आणि प्रक्तेक वेळी (सरासरी नी) हे नेहमी तोंडावर पडतात.
सामान्य जनता मूर्ख नाही हे विचारवंत जास्त हुशार आहेत.
सारखा सारखा कृत्रिम बुध्दी मत्ता हा शब्द वापरला गेला आहे
मग लस अजुन का develop होवू शकली नाही.
साथ सुरू झाल्यापासून ह्या बाजारू विचारवंताची मत आणि आता असलेली खरी स्थिती ह्याचा अभ्यास कोण्ही तरी करा .
गमतीशीर रिझल्ट बघायला मिळतील

अबापट Fri, 17/04/2020 - 13:45

In reply to by Rajesh188

राजेश भाऊ,
याचेही उत्तर आधीच्या प्रतिसादात कृपया वाचणे.
भाडोत्री विचारवंत कोण हेही कृपया सांगावे.
सध्या दोनच पर्याय आहेत सगळ्यांना.
पूर्ण ज्ञान हाती येईपर्यंत काहीही न सांगणे
किंवा
आत्ता पर्यंत जी 'माहिती' (ज्ञान नव्हे) ते लोकांपर्यंत पोचवणे (विनम्रपणे, हे जाणून की ही फक्त माहिती आहे, आणि ती एका मर्यादित संदर्भातच खरी आहे.जागतिक , सर्वसाधारणपणे खरी असेलच असे नाही)
आणि ही विनम्रता वाचकानेही ठेवणे जरुरी असे वाटते.
अंतिम सत्य अजून माहीत नाहीये या विषाणू बद्दल , कुणालाच.
पुढे येत आहे ती फक्त निरीक्षणात्मक माहिती.

तिरशिंगराव Sat, 18/04/2020 - 21:14

In reply to by चिंतातुर जंतू

ट्रेलर पाहूनच शिसारी आली. कोरोनातून वाचलो तरी असल्या अनेक भावी चित्रपटांपासून वाचणं कठीण आहे.

घाटावरचे भट Fri, 17/04/2020 - 14:44

ऐसीवर चक्क पाककृती पडली. हासुद्धा कोरोनाचाच एक बखरवर्दी परिणाम म्हणायचा का?

'न'वी बाजू Fri, 17/04/2020 - 16:06

In reply to by घाटावरचे भट

(बखरवर्दी शब्द आवडला. सुऱ्हावर्दी (सुरावर्दी?) हे नाव उगाचच आठवून गेले.)