Skip to main content

ही बातमी समजली का? - ६१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

===========

दिल्ली बलात्कारावर बीबीसीनं केलेल्या माहितीपटावर बंदी घालण्याचा प्रयत्न भारतीय सरकार करत आहे. दरम्यान, बीबीसीवर हा माहितीपट प्रसारित झाला आहे. आता तो यूट्यूबवरदेखील उपलब्ध आहे. तो काढून टाकण्यासाठी भारत सरकार यूट्यूबवर दबाव आणेल का माहीत नाही. सध्या तरी तो इथे पाहता येतो आहे.

गवि Thu, 05/03/2015 - 12:04

हा माहितीपट रोखण्याचं कारण तांत्रिक स्वरुपाचं देण्यात आलं आहे. म्हणजे आवश्यक त्या परवानग्या न घेणं किंवा कंटेंट अमुकतमुक ऑथॉरिटीजना अमुक वेळेत न दाखवणं अश्या काहीतरी स्वरुपाची. तपशील शोधायला हवा.

तांत्रिक कारण न पटण्यासारखंच आहे. मुख्यतः देशाची (देशातल्या पुरुषांची) इमेज खराब न होऊ देण्याचा प्रकार वाटतो. अर्थातच त्या माणसाची मेंटॅलिटी ही भारतीय पुरुषाची प्रातिनिधिक मेंटॅलिटी आहे असं म्हणणं शक्य नाही. पण तसा अर्थ परदेशातल्या सामान्य नागरिकांकडून, विशेषतः भावी टुरिस्टांकडून घेतला जाऊ शकतो.

बॅटमॅन Thu, 05/03/2015 - 12:51

In reply to by गवि

अर्थकारण असेल तर त्याच्यापुढे बाकीची कारणं गेली गर्दभश्रोणीत. आजच्या युगाला साजेसेच आहे म्हणा हे.

अजो१२३ Thu, 05/03/2015 - 13:23

In reply to by गवि

अर्थातच त्या माणसाची मेंटॅलिटी ही भारतीय पुरुषाची प्रातिनिधिक मेंटॅलिटी आहे असं म्हणणं शक्य नाही.

भारतीयांची मेंटेलिटी आहे असं संसदेत anu आगा म्हणूनही गेल्या.
===================
http://www.business-standard.com/article/news-ians/uproar-in-rajya-sabh…

Speaking after the home minister, Anu Aga (nominated) said the interview in a way reflected the view of many men.

"I concede it is an issue who gave the permission and all that. But the issue is what that man said reflects the view of many men in India. Why are we shying away from that in glorifying India, that we are perfect and not confronting the issues that need to be confronted? Banning the movie (documentry) is not the answer, we need to confront the issue that men in India do not respect women.

रेड बुल Thu, 05/03/2015 - 21:09

In reply to by गवि

https://www.youtube.com/watch?v=9W6WrShqKGE

स्पिचलेस नो कमेंट्स. लिंक शेअर एव्हड्याचसाठी की बिबिसीने युट्युबवर विडीओ टाकताना काटछाट केल्याचे जाणवत आहे. व बर्‍यापैकी सेन्सीबल प्रेसेंटेशन केले आहे. भारतिय पुरुषांची मान खाली जाणार हे नक्कि.

सव्यसाची Thu, 05/03/2015 - 14:19

एक रुपयाच्या नोटा पुन्हा छापण्याचा निर्णय
http://www.loksatta.com/mumbai-news/after-20-years-rbi-to-put-re-1-note-into-circulation-1078103/

सामान्यत: भारतीय चलनी नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची स्वाक्षरी पाहायला मिळते, परंतू या नोटेवर वित्त सचिव राजीव मेहऋषी यांची दोन भाषांमध्ये स्वाक्षरी असेल.

असे का याबद्दल कुणी सांगू शकेल काय?

आदूबाळ Thu, 05/03/2015 - 15:23

In reply to by सव्यसाची

रुपया हे भारताचं चलन म्हणून राष्ट्रपती जारी करतात. त्यांचा चाकर "वित्त सचिव" राष्ट्रपतींच्या वतीने सही करतो.

चलनवाढीमुळे रुपयाची खरेदीक्षमता कमी होऊन जास्त रुपये द्यावे लागतात. म्हणून १०/५०/१००/५००/१००० रुपयांच्या गठ्ठ्याएवढी किंमत असलेली प्रॉमिसरी नोट ("मैं धारक को क्ष रुपये अदा करने का वचन देता हूँ") चाकराचा पडचाकर (रिझर्व बँकेच्या गवर्नर) देतो.

त्यामुळे १०/५०/१००/५००/१००० रुपयांच्या नोटा हे खरं चलन नव्हे. एक रुपया हे खरं चलन. तत्त्वतः शंभर रुपयाची नोट घेऊन आपण रघू राजनला सिग्नलवर अडवू शकतो, आणि त्याने ती नोट घेऊन त्याबदल्यात एक एक रुपयाच्या शंभर नोटा देणं बंधनकारक आहे. (पुढच्या वेळेला सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम आला की ही ऐड्या करून पहा ;) )

सव्यसाची Thu, 05/03/2015 - 15:45

In reply to by आदूबाळ

धन्यवाद. थोडा शोध घेतल्यावर आपले उत्तर अजुन स्पष्ट झाले.
एक छोटासा प्रश्न अजुन पण आहे. मला वाटते, वित्त सचिव हा राष्ट्रपतींचा चाकर आहे असे म्हणता येणार नाही. मग अर्थमंत्री का स्वाक्षरी करत नाहीत? कारण खर्‍या अर्थाने अर्थमंत्री हेच राष्ट्रपतींच्या मंत्रीमंडळातील प्रतिनिधी आहेत. वित्त सचिव नाही.

आदूबाळ Thu, 05/03/2015 - 16:20

In reply to by सव्यसाची

माझा अंदाज असा आहे:

भारताचा प्रमुख राष्ट्रपती असतो. तो (१) लेजिस्लेचर (संसद आणि मंत्रीमंडळ) (२) एक्झिक्यूटिव (सनदी अधिकारी / सरकार) आणि (३) लेजिस्लेचर (न्यायालयं) या तीन स्तंभांच्या मदतीने गाडा हाकतो.

त्यापैकी संसद/मंत्रिमंडळ हे काही राष्ट्रपतींचे नोकर नाहीत, ते लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत. न्यायालय राष्ट्रपतींचे नोकर आहे की नाही याबद्दल माझ्या मनात जरा संदेह आहे, पण त्यांचं कार्य हे कायद्याचा अर्थ लावून इतर दोन स्तंभांवर वचक ठेवणं आहे. सनदी अधिकारी हे खर्‍या अर्थाने राष्ट्रपतींचे कान, नाक, हात, पाय, डोळे आहेत. म्हणून हे कार्य वित्त सचिवाच्या हाती देणंच योग्य.

उपाशी बोका Thu, 05/03/2015 - 21:27

In reply to by आदूबाळ

तत्त्वतः शंभर रुपयाची नोट घेऊन आपण रघू राजनला सिग्नलवर अडवू शकतो, आणि त्याने ती नोट घेऊन त्याबदल्यात एक एक रुपयाच्या शंभर नोटा देणं बंधनकारक आहे.

माझ्या माहितीनुसार, ५/१०/२०/५०/१००/५००/१००० वगैरे रुपयांच्या नोटांवरच लिहिलेले असते "मैं धारक को क्ष रुपये अदा करने का वचन देता हूँ". एक रुपयाच्या नोटेवर असे काही प्रॉमिस नसते. फार वर्षांपूर्वी बेसिक इकॉनॉमिक्स शिकताना, मास्तरने शिकवलेले थोडेसे आठवते. त्यानुसार देशात जितकी तूट आहे, तितक्या १ रुपयाच्या नोटा/नाणी रिझर्व्ह बँक छापते. या नोटांवर पेबॅकचे आश्वासन नसते, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नोटा आणि नाणी रद्द केली तर पूर्ण देशाची तूट भरून येऊ शकते. शिवाय हे पण सांगितले की १ रुपयाच का? १०० रुपये का नाहीत? कारण १ रुपया रद्द केल्याने प्रत्येक व्यक्तीला तितकीशी झळ पोचणार नाही, जितकी १०० च्या नोटा रद्द केल्याने पोचेल.

खरे खोटे माहीत नाही. माझी १ मैत्रीण M.A.(economics) आहे, जमले तर तिला विचारतो.

अजो१२३ Thu, 05/03/2015 - 18:40

http://www.cnet.com/uk/news/nasa-creates-ingredients-of-life-in-harsh-s…
अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. उत्क्रांतीचा सिद्धांत, इतिहास यांतील अनेक गॅप आता मिटण्याची आशा करता येईल. शिवाय पिरिमिडीन हा काही काळाने बझ वर्ड होईल असे वाटते.

गब्बर सिंग Fri, 06/03/2015 - 06:07

The copyright on Mein Kampf is running out in 2016, so what will Germany do?

The copyright on Hitler's infamous Mein Kampf is running out in Germany, and so they've been debating for quite a while now what the hell to do about that. Apparently they've settled on a scholarly edition being made available -- an unannotated/explicated plain-text version apparently remains out of bounds (prohibitable not on copyright but potential-incitement grounds).

----

याबद्दलच आणाखी - इथे

MUNICH — Old copies of the offending tome are kept in a secure “poison cabinet,” a literary danger zone in the dark recesses of the vast Bavarian State Library. A team of experts vets every request to see one, keeping the toxic text away from the prying eyes of the idly curious or those who might seek to exalt it.

“This book is too dangerous for the general public,” library historian Florian Sepp warned as he carefully laid a first edition of “Mein Kampf” — Adolf Hitler’s autobiographical manifesto of hate — on a table in a restricted reading room.

बॅटमॅन Sat, 07/03/2015 - 01:55

In reply to by गब्बर सिंग

=))

जर्मन टूरिस्ट लोकांना भारतात आल्यावर रस्त्याच्या कडेला याच्या कॉप्या बघून लै आश्चर्य वाटतं असं ऐकून आहे बॉ. त्यांना काय माहिती की आमच्याकडं सेकुलर विचारजंत आणि धर्मांध एकत्रच नांदतात.

गब्बर सिंग Sat, 07/03/2015 - 03:29

In reply to by बॅटमॅन

त्यांना काय माहिती की आमच्याकडं सेकुलर विचारजंत आणि धर्मांध एकत्रच नांदतात.

The Paradox of Liberation - That is the new Michael Walzer book, with the subtitle Secular Revolutions and Religious Counterrevolutions. The stated paradox is fairly simple, yet worthy of sustained attention.

Why have the leaders and militants of secular liberation not been able to consolidate their achievement and reproduce themselves in successive generations? Over the past several decades, Indian intellectuals and academics have been debating this question in its local version: “Why is it,” one of them asks, “that the Nehruvian vision of a secular India failed to take hold?”

Other cases considered include Israel, Palestine, and Algeria, as well as the Middle East more generally. Walzer doesn’t much try to answer his own question, but this book is very stimulating and worth the short amount of time it takes to read it. I would modify the paradox however: I see various European nations which do consolidate and maintain largely secular nationalist movements. How about Denmark or France? If you find those examples troublesome, try Serbia or for that Vietnam or China. There may be a more general issue of morphing, above and beyond the religious vs. secular issue.

---

मी पुस्तक वाचलेले नाही. पण आजच एका इकॉन च्या ब्लॉग वर याबद्दल लिहून आलेले होते. ब्याट्याच्या कॉमेंट ला धरून ....

आदूबाळ Sat, 07/03/2015 - 11:49

In reply to by गब्बर सिंग

an unannotated/explicated plain-text version apparently remains out of bounds

म्हंजे? प्रकाशित आवृत्तीपेक्षा त्यात वेगळ काय आहे?

चिमणराव Sat, 07/03/2015 - 11:12

१)आमचं नालंदा गेलंच आता इराकमधली अडीच तीन हजार वर्षाँपूर्वींची शिल्प नष्ट होतानाचं पाहाण्याचं भाग्य उरलेल्या इराकच्या नशिबी .याला स्फिंक्स काय उत्तर देणार ?

२)वर्ष २००० संगणकिकरणामुळे कागदपत्रे कमी होणार -ओळखपत्रांच्या नकला पाच पाच लागतात वीज बिल ,आधार ,शिधापत्रक ,पैन कार्ड
३)नोटेवर अमुक रुपये --वगैरे +सत्यमेव जयते +गरीबी दूर करणार हे कायमच छापा.

गवि Mon, 09/03/2015 - 12:26

In reply to by चिंतातुर जंतू

हो. एअरबस ३४० इतके लांब पंख, १६०० - २००० किलोच्या मधलं वजन आणि या सर्वात एकच सीट, तीही पायलटची..
७० किलोमीटर प्रतितासाचा मॅक्झिमम क्रूझिंग स्पीड..बाकी वाढीव वेग मिळालाच तर वातकृपेवर अवलंबून. समोरुन प्रचंड वारा असेल तर जागच्याजागी जॉगिंगचा प्रकार.

सर्विस सीलींग सत्तावीस हजार फुटांहून जास्त, पण केबिन प्रेशराईज्ड नाही, त्यामुळे मनुष्य श्वास घेईल इतपत आल्टिट्यूडच शक्य (१०-१२ हजार फूट). अन्यथा ऑक्सिजन सिलिंडर नाकात लावून घेऊन जायला हवे.

त्यामुळे साध्या प्रवासालाही अनेक दिवस.. पृथ्वीप्रदक्षिणेला तर महिने..

हे सर्व जेट आणि फॉसिल फ्युएलवर चालणार्‍या विमानांशी तुलनाही करु नये इतकं अव्यवहार्य वाटेल, सध्या मेणबत्यांच्या ज्योतीवर बॉयलर चालवण्याचा प्रकार आहे असं वाटेल.

पण ही सुरुवात आहे. त्यामुळे कौतुकास्पदच.

मुख्य ब्रेकथ्रू या सौर ऊर्जेच्या क्षेत्रात हवा आहे तो कमी क्षेत्रफळावर जास्त ऊर्जा कॅप्चर करण्याचा.

नितिन थत्ते Mon, 09/03/2015 - 12:27

In reply to by गवि

सोलर कॉन्सन्ट्रेटर वापरून हे करता येते. पण त्या केसमध्ये सोलर सेलचे तापमान वाढून त्याचे जंक्शन ब्रेकडाउन होते ही अडचण आहे.

या मार्गाने सोलर सेलचा आकार कमी होईल पण ऊर्जा कॅप्चर करायला तेवढे क्षेत्रफळ हवेच ना?

गवि Mon, 09/03/2015 - 13:11

In reply to by नितिन थत्ते

बहुधा ही सौर ऊर्जेची एक "रोडब्लॉक" कमतरता असावी. आवश्यक मोठा एरिया लक्षात घेता एनर्जी यिल्ड इतके कमी असणे हीच मोठी मर्यादा असावी.

प्यासेंजर नाही तरी ड्रोन, हवामान, लो आल्टिट्यूड सर्व्हे अन सर्व्हिलन्स वगैरेसारख्या पर्यायी वापरासाठी हे चांगले ठरेल असे वाटते.

एकदा बनवले की मेंटेनन्सखेरीज प्रत्यक्ष ऑपरेशनल कॉस्ट जवळजवळ नाहीच. २४ तास हवेत राहण्यासारखी रचना.

अनुप ढेरे Mon, 09/03/2015 - 12:27

In reply to by चिंतातुर जंतू

घासकडवी-नगरीनिरंजन पैजेत सौर उर्जेवर चालणार्‍या विमानाचा समावेश होता असं स्मरतय. नगरीनिरंजन हारणार पैज असं दिसतय.

गवि Mon, 09/03/2015 - 13:16

In reply to by अनुप ढेरे

कुठे आहे ही पैज ? पैजेचे उल्लेख वाचल्याचं अंधुक आठवतंय. तपशील आठवत नाही. दुवा मिळेल का पैजेचा ?

नगरीनिरंजन Mon, 09/03/2015 - 16:38

In reply to by अनुप ढेरे

मलाही मी पैज हारणार असंच वाटतंय. कोणत्याही तंत्रज्ञानाचा विकास चढत्या भाजणीने होतो उदा. संगणकाचा प्रोसेसर. आता प्रायोगिक विमान झाले की कमर्शियल यायला फारसा वेळ लागणार नाही. त्यानंतर विजेवर चालणारे खाणकामाचे ट्रक निर्माण झाले की संपलं. सौरप्रतलांसाठी लागणारी रेअर अर्थ मिनरल्स चीन मधून जगात कुठेही वाहून न्यायची सोय होणार. मग काय संपलंच सगळं.
अरे हो, पण पैज फक्त भारताची अर्थव्यवस्था (जीडीपी) सरासरी ६% नी वाढणार की नाही यावर पैज लागली होती नाही का? तेवढी वाढ तर सौरऊर्जेसाठीच्या परकीय गुंतवणुकीतून सहज भरुन निघेल. हारणार पैज मी. पण मी आशा सोडली नाहीय :-) अजून २०२४ पर्यंत वेळ आहे.

अनु राव Mon, 09/03/2015 - 17:08

In reply to by नगरीनिरंजन

ननि - जर तुमची पैज कमर्शीयल सौर विमानांबद्दल असेल तर सौरउर्जे वर २ सीटर कमर्शीयल विमान सुद्धा शक्य नाही.

अतिशहाणा Mon, 09/03/2015 - 22:11

भारतातील बलात्कारांच्या घटनांमुळे चिंतित जर्मनीतील प्राध्यापिकेने भारतीय विद्यार्थ्याला इंटर्नशिप नाकारली.
http://www.huffingtonpost.in/2015/03/09/leipzig-university-apolog_n_682…

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 12:49

In reply to by वृन्दा

बाईंच्या अक्कल आणि प्रामाणिकपणा दोहोंबद्दल शंका घेणे ढोंगीपणाचे आहे. भारतीय पुरुषी मानसिकतेची जी जगत्प्रतिमा आहे त्या अनुषंगानेच त्यांनी निर्णय घेतला आहे.

बॅटमॅन Mon, 09/03/2015 - 23:03

In reply to by अतिशहाणा

त्या डॉक्युमेंटरीचे असेही दुष्परिणाम होऊ शकतात असे वाटत होते तोवर त्याचे प्रत्यंतरही आले. तरी फेबुवर काही वायझेडांनी मुद्दा भरकटवलेला आहे. चालायचंच.

वृन्दा Mon, 09/03/2015 - 23:07

In reply to by बॅटमॅन

बॅट्या मुद्दा कुठे रे भरकटवलाय? एवढच कोणीतरी म्हटलय की - जर ही डॉक्युमेंट्री बनलीच नसती तरी बातमी कळायची राहीली असती काय?
________
पण विचार करता वाटतं खरं की डॉक्युमेन्ट्री न बनणच बरं झालं असतं. हे जरा माकडाच्या हाती कोलीत झालय खरं. त्या प्राध्यापिका बाई इतक्या मंद, बथ्थड वाटताहेत की त्यांना डोक्युमेन्ट्री चा गवगवा नसता झाला तर कदाचित रेपच्या बातमीचा पत्ताही लागला नसता.

बॅटमॅन Mon, 09/03/2015 - 23:10

In reply to by वृन्दा

पण मुद्दा तो नाहीच्चे. मुळात मुद्दा काय आहे ते समजून न घेता बाष्कळ बडबड करणारांना त्याचे काय होय? डोकुमेंट्रीमुळे जसे पर्सेप्शन बदलले तसे निव्वळ त्या रेपच्या बातमीने बदलले असते असे वाटत नाही.

बाकी जर्मन राजदूताकडूनच वंशप्रयोग झाल्यावर त्यांनी माफी मागितलेली दिसतीये.

तदुपरि- तुमचे आयडी तरी किती आहेत ओ? त्या सगळ्या आयडींचा एक वृन्द या अर्थी सध्याचे नाव चपखल आहे.

वृन्दा Mon, 09/03/2015 - 23:15

In reply to by बॅटमॅन

डोकुमेंट्रीमुळे जसे पर्सेप्शन बदलले तसे निव्वळ त्या रेपच्या बातमीने बदलले असते असे वाटत नाही.

हा मुद्दा बाकी चोक्कस छे रे बॅट्या.
या नावाचाही कंटाळा येणारे लवकरच. मस्त नाव आठवतच नाही. जसं "आदळापट्/बकध्यान्/ढालगज" अशांसारखे खासम खास मराठी. बकध्यान संस्कृत असावे म्हणा.

वृन्दा Mon, 09/03/2015 - 23:28

In reply to by बॅटमॅन

अरे वा मस्तच की.

अध्यात्मिक वगैरे आयडी:
विरागिनी , तत्वमसि, ध्यानधारिणी, तुर्यावस्थिनी, कपालभाति, कपालमोक्षिनी, कुंडलिनी इ.इ.
.
सोज्वळ आयडी:
आश्रमहरिणी, ब्रजबाला, लज्जागौरी , नऊवारी, पैठणी इ.
.
चटोर आयडी: बिकिनी, काचोळी, सिल्कस्मिता, वस्त्रविरहिता, चिकणीचमेली, इ.इ.
.
सुवासिक आयडी: पुष्पगंधा, कुसुमगंधा, गुलाबगंधा, केतकीगंधा, मदनगंधा, मत्स्यगंधा, कुक्कुटगंधा, अश्वगंधा, श्वानगंधा, योजनगंधा, फर्लांगगंधा, मीटरगंधा, इ.इ.
.
धडकीभराऊ आयडी:
'फुत्कार सर्पिणी', 'गरळ ओकिनी, 'फाशीवाली मर्दानी', 'हंटरवाली', 'भैताड भवानी', 'हडळ भवानी', 'विक्राळ विध्वंसिनी', रणचंडिका इ.
.
सुप्रसिद्ध आयडीवरून बेतलेले आयडी: विसूबाई खेचर, परीकथेतील राजकुमारी, प्रक्षिप्त_आदिती, कुत्सित_ आदिती, खाष्ट_आदिती, कमाल मुलगी, श्रावण मोदिका, इस्पिक राणी, चौकट छक्की, इ.इ.
.
पाकृ. आयडी: फलुदा कुल्फी, रंगेल-रबडी, जलेबीवाली, रसमलाई इ.इ.
.
संस्कृतप्रचुर आयडी: द्रुमदलशोभिनी, सुमधुरभाषिणी, दुर्गेशनंदिनी, शृंगारहारावली इ.
.
खरेखुरे वाटणारे आयडी: कुंदा कुलकर्णी, चंपा चावरे, अनिता आपटे, बिंदु बिल्लोरे, ज्योतिका जोशी, पुष्पा पाखरे, चंचला चाटे इ.इ.
.
साहित्यिक आयडी: पाषाणपालवी, काजळमाया, मोरूची मावशी इ.इ.

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 11:31

In reply to by अतिशहाणा

सबब विद्यार्थ्याने सबब प्राध्यापिकेवर बलात्कार करायची शक्यता अगदीच शून्य नव्हती असे वैगेरे अजून कोणी म्हटलेले नाही. असे आरामात म्हणता येते.
---------------------------------------------
सबब 'भारतीय मानसिकतेच्या' विद्यार्थ्याने सबब 'उदारमतवादी जर्मन मानसिकतेच्या' प्राध्यापिकेवर बलात्कार करायची शक्यता अगदीच शून्य नव्हती असे वैगेरे अजून कोणी म्हटलेले नाही. असे देखिल आरामात म्हणता येते.
---------------------------------------------------
सबब 'भारतीय राजकारण्यांनी जगापासून येथपावेतो लपवून ठेवलेल्या भारतीय मानसिकतेच्या' विद्यार्थ्याने सबब 'जर्मन राजकारण्यांनी खुलेपणाने जगासमोर आणलेल्या उदारमतवादी, वागायल्या मोकळ्या जर्मन मानसिकतेच्या' प्राध्यापिकेवर बलात्कार करायची शक्यता अगदीच शून्य नव्हती असे वैगेरे अजून कोणी म्हटलेले नाही. असे देखिल आरामात म्हणता येते.
===============================================
डॉक्यूमेंटरीच्या संदर्भात 'भारत सरकारवर आरोप करताना' काही विशिष्ट बाबतीत काही विशिष्ट व्यक्तिंनी नेमके हेच आरोप केले होते.
===================================
बाय द वे, युरोपात आणि अमेरिकेत आरसे कमी आहेत का? हे लोक आपले रेकॉर्ड का नै पाहत?

अनु राव Tue, 10/03/2015 - 11:47

In reply to by अजो१२३

बाय द वे, युरोपात आणि अमेरिकेत आरसे कमी आहेत का? हे लोक आपले रेकॉर्ड का नै पाहत?

ह्या केस मधे ती प्राध्यापिका "देणारी" ह्या भुमिकेत आहे. देणार्‍याला भीक घेणार्‍याने प्रश्न विचारायचे नसतात.

भारतातच करा की इंटर्नशीप का काय ते, जायचा प्रयत्न कशाला करतायत हे लोक जर्मनीला.

बॅटमॅन Tue, 10/03/2015 - 11:56

In reply to by अनु राव

भारतातच करा की इंटर्नशीप का काय ते, जायचा प्रयत्न कशाला करतायत हे लोक जर्मनीला.

बिहारातच रहा की, कशाला येता म्हणावं मुंबैला इ.इ. वाक्ये आठवली.

नितिन थत्ते Tue, 10/03/2015 - 12:01

In reply to by अनु राव

अनु राव या आयडीचं मालक महिला आहे असे गृहीत धरून .......

हा प्रतिसाद 'मला झळ बसत नाही ; मग काही का होईना' असा भासतो.
इतरत्रही 'गुंडाने घर बळकावलंय ना? मग सोडून द्या हक्क' असा सल्ला दिल्याचे स्मरते.

गब्बर सिंग Tue, 10/03/2015 - 12:07

In reply to by नितिन थत्ते

लाईप्झिग हे सरकारी (पब्लिक) विद्यापीठ आहे व जर्मनी मधे प्रजातंत्र आहे व त्यांची अशी कोणतीही पॉलीसी (माझ्या माहीतीत तरी) नाही. त्यामुळे खरंतर प्राध्यापिकेचे वर्तन बेकायदेशीर आहे असे म्हणायला वाव आहे.

पण खाजगी विद्यापीठात असते तर कदाचित मामला वेगळा असता. (खाजगी) व्यक्तीला भेदभाव करण्याचा विकल्प असायला हवा. कोणत्याही कायद्यान्वये तो प्रतिबंधित करायला नको.

अनु राव Tue, 10/03/2015 - 12:16

In reply to by गब्बर सिंग

लाईप्झिग हे सरकारी (पब्लिक) विद्यापीठ आहे व जर्मनी मधे प्रजातंत्र आहे व त्यांची अशी कोणतीही पॉलीसी (माझ्या माहीतीत तरी) नाही. त्यामुळे खरंतर प्राध्यापिकेचे वर्तन बेकायदेशीर आहे असे म्हणायला वाव आहे.

जर्मनी मधे भारतीय विद्द्यार्थाचे डिसक्रीमिनेशन करायला काय हरकत आहे? जर्मन विद्यार्थ्यांच्या बाबत असे करता येणार नाही पण दुसर्‍या देशाच्या विद्यार्थ्याला जर्मनी प्रजातंत्र आहे म्हणुन जर्मन नागरीकासमान वागणुक का मिळावी?

गब्बर सिंग Tue, 10/03/2015 - 12:23

In reply to by अनु राव

जर्मनी मधे भारतीय विद्द्यार्थाचे डिसक्रीमिनेशन करायला काय हरकत आहे? जर्मन विद्यार्थ्यांच्या बाबत असे करता येणार नाही पण दुसर्‍या देशाच्या विद्यार्थ्याला जर्मनी प्रजातंत्र आहे म्हणुन जर्मन नागरीकासमान वागणुक का मिळावी?

तुम्ही माझा ड्युआयडी आहात किंवा माझे विचार मी मांडायच्या आधीच पळवता. :-)

खरंतर फक्त जर्मन नागरिकांनाच भेदभावविरहित वागणूक देण्यास जर्मन सरकार बांधील आहे व असावे. पण नंतर त्या जर्मन नागरीकांनीच जर सांगितले व तसा कायदा करवला तर परकीय नागरिकांना भेदभावविरहित वागणूक देण्यास सरकार बांधील असायला हवे. व म्हणून सरकारी विद्यापीठातील प्राध्यापिकेने हा भेदभाव करणे चूक.

शेअरहोल्डर मॉडेल ला तिलांजली देऊन स्टेकहोल्डर मॉडेल ला आलिंगन दिले की असेच काहीतरी होते.

गब्बर सिंग Tue, 10/03/2015 - 12:49

In reply to by नितिन थत्ते

हे ठीक आहे. व म्हणूनच मी प्रथम असे म्हंटले होते की प्राध्यापिकेचे वर्तन बेकायदेशीर आहे.

पण अशा प्रकारचे भेदभाव विरोधक कायदे/संकेत्/करार हे प्रायव्हेट आस्थापनांवर लादायचा सरकारला अधिकार नसायला हवा - असे माझे म्हणणे आहे.

दुसरे म्हंजे सरकार स्वतः असा भेदभाव करते. उदा. भारत (किंवा जर्मन) सरकार मधे नोकरी साठी नागरिकत्व आवश्यक आहे. इथे (तुम्ही दिलेल्या लिंक मधील) नो डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन नॅशनल ओरिजिन चा क्लॉज बरोब्बर आडवा येतो पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तिथे नॉन जर्मन ओरिजिन च्या लोकांना स्थान काय असते ??

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 18:28

In reply to by गब्बर सिंग

भारत सरकारच्या सरकारी नोकरीच्या अर्जांमधे नागरिकत्व : _________________________________ असे लिहिलेले असते.
--------------
नागरिकत्वः भारतीय*
(फूटनोट * भारतीय नसले तर फॉर्मचा पेपर वाया घालवू नका) असे लिहिलेले नसते. म्हणून कंन्फर्म करून घेतलं.

अनु राव Tue, 10/03/2015 - 12:29

In reply to by नितिन थत्ते

'गुंडाने घर बळकावलंय ना? मग सोडून द्या हक्क'

ह्या सल्ल्यात काय चुक आहे? हातपाय तोडुन घेऊन जन्मभर अपंग होण्या पेक्षा घर सोडुन देणे परवडले.

आणि ह्या सल्ल्याचा आणि जर्मन प्राध्यापिकेबद्दल च्या माझ्या मताचा काय संबंध.
थत्ते काका, तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्ही जिथे जन्माला आलात, ज्या जातीत जन्माला आलात त्याची विषेश गुण तुम्हाला दुसरी लोक चिकटवणारच ( सरसकटीकरण करुन ). तुमच्या समाज/जाती बद्दल जर दुसर्‍यांच्या मनात चांगली मते असतील तर त्याचा तुम्हाला सुरुवातीला फायदा होइलच, पण वाईट असतील तर तोटा होइल तो सहन करायलाच पाहीजे.

आपण आपला फ्लॅट अनोळखी कुटुंबास भाड्याने देताना अश्या पूर्वग्रहांचा वापर करत नाही का? . मी माझा फ्लॅट भाड्यानी देताना xyz, abc, edf...... अश्या अनेक कॅटेगरीतल्या लोकांना देणार नाही हे आधीच ठरवले असते. ते चालते. इथे तर दुसर्‍या देशातली बाई आहे, ती विचार करणारच नाही का?

आणि ही इंटर्नशीप म्हणजे हक्क वगैरे नव्हता, आणि भारतात घडणारी घटना पण नव्हती. त्या मुळे तक्रार मोड मधे जायचे कारणच नाही.

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 12:32

In reply to by अनु राव

मी हे थोड्या वेगळ्या शब्दांत मांडू इच्छितो. "मुकेश सिंगाच्या निमित्ताने भारतीय पुरुषी मानसिकतेचा अभ्यास व्हावा असे ज्यांना वाटते" किंवा "मुकेश सिंग सदृश करोडो भारतीय पुरुषांची मानसिकता राष्ट्रवादी राजकारण्यांनी लपवून ठेवली आहे असे ज्यांना वाटते" किंवा "मुकेश सिंग ची मानसिकता असलेला एक मोठा मतदारसंघ आहे आणि त्याची मानसिकता जगासमोर उघड न करून त्यांची मते आपल्याकडे खेचायची असे विचार करणारे राजकारणी भारतात आहेत असे ज्यांना वाटते" , प्रामाणिकपणे वाटते, त्यांच्यामते प्राध्यापिकेचे काही चुकले नाही.

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 12:25

In reply to by परी

अजिबात नाही. प्रचंड असहमत. तो मुकेश सिंग आणि सदर विद्यार्थी यांच्या मानसिकतेचा कोणताही तौलनिक अभ्यास झालेला नाही.

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 12:36

In reply to by परी

मग वॉशिग्गटन रेप कॅपिटल असताना दिल्ली रेप कॅपिटल म्हणून दिंडोरा पिटला जातोय. नसेल असेही नाही ना.

ऋषिकेश Tue, 10/03/2015 - 08:52

काश्मिरमधील घटनांवरून विरोधकांनी भाजपाला खिंडीत गाठले आहे असे मत मांडणारा लोकसत्तेतील अग्रलेख

एकीकडे सरकारात असूनही महाराष्ट्रात शिवसेना आणि काश्मिरात भाजपा अतिशय बालीश विधाने करत आहेत या विचांराशी सहमती आहे.

अजो१२३ Tue, 10/03/2015 - 11:14

In reply to by ऋषिकेश

हे सरकार चालणार नाहीच, पण भाजपची संपूर्ण इज्जत उतरावून मग जाईल. खाटकाघरी जैनांचं लग्न ठेवल्याचा प्रकार आहे जे&के सरकार.

धर्मराजमुटके Tue, 10/03/2015 - 19:59

In reply to by अजो१२३

मार्मिक श्रेणी दिली आहे. जे फॉर जैन आणि के फॉर खाटीक हा नवीन संदर्भ तुमच्या वाक्प्रचारामुळे अचानक सुचला.

अतिशहाणा Tue, 10/03/2015 - 18:14

In reply to by ऋषिकेश

जर त्या फुटीरतावाद्यावर अद्याप आरोपपत्र दाखल करता आलेले नाही तर त्याला सोडले ते उत्तम. पण माझा प्रश्न दुसरा आहे. हा कैदी सोडल्यानंतर मोदींनी 'राज्यसरकारने केंद्राशी सल्लामसलत केली नव्हती' असे म्हटले आहे. मात्र आजच्या बातम्यांमध्ये या कैद्याला सोडण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच घेतला होता असे आले आहे.

मोदी खोटे बोलत आहेत काय? अशा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांमुळे सभागृहाचा हक्कभंग होत नाही का?

अतिशहाणा Tue, 10/03/2015 - 18:52

नागालँडमधील घटनेनंतर, एकंदर प्रकरणाचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत.
१. सदर बलात्कार झालाच नव्हता म्हणे. पैसे देऊन/दबावाखाली तक्रार दाखल केली होती
२. बलात्काराचा मुख्य अारोपी असणाऱ्या व्यक्तीला सदर बलात्कारात मदत करणाऱ्या नागा वंशाच्या दुसऱ्या आरोपीला त्याच तुरुंगात असूनही जमावाने काहीही केले नाही.
३. बलात्काराचा मुख्य आरोप असणारी व्यक्ती बांग्लादेशी निर्वासित नसून तीन पिढ्यांपासून भारतात असलेली व भारतीय फौजेत नोकरी करणाऱ्यांची वंशज आहे.

असो. सकाळी दुसऱ्या संगणकावर या बातम्या वाचल्याने आता दुवे हाताशी नाहीत. पण यासंदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास कृपया द्यावी.

नगरीनिरंजन Tue, 10/03/2015 - 20:57

In reply to by अजो१२३

:-)

"आप की कहानियाँ" अशा शीर्षकावरुन डोक्यात "आप" ने सुरु होणार्‍या गाण्यांचा "आप की पसंद" असा कार्यक्रम वाजायला लागला.
आप जैसा कोई मेरे
आप की कशीश
आप की आँखो में कुछ
आप हमसें अगर यूॅं ही मिलते रहे
आप यहाँ आये किसलिये
वगैरे सदाबहार नग्मे वाजले.

गब्बर सिंग Tue, 10/03/2015 - 21:19

In reply to by नगरीनिरंजन

आप के पास जो आएगा पिघल जाएगा
आप ने याद दिलाया तो मुझे याद आया
आप से प्यार हुआ जाता है
आप का चेहरा अल्ला ही अल्ला
मै अपने आप से घबरा गया हूं

वृन्दा Tue, 10/03/2015 - 21:28

In reply to by गब्बर सिंग

बहोत खूब! गब्बर तुस्सी छा गये. मी एवढं शोधून मला फक्त
आप की आंखोमे कुछ - सापडलेलं अन तेही ननिंनी दिलय :P

रेड बुल Wed, 11/03/2015 - 20:07

In reply to by प्रथमेश नामजोशी

अजून आठवलं -

आप को देख के ... देह देखह के राज गयी ये जान जान जान्न
शम्मा पेपरवाले क्यों होह्होह्होह्होह्होह्होहो होती है कूर्बान बान बान बान
ओमेरी जाsssssआआन ओमेरी इजाsssन...

गवि Thu, 12/03/2015 - 14:38

In reply to by प्रथमेश नामजोशी

आप हा शब्द जवळजवळ प्रत्येक हिंदी गाण्यात असल्याने तसे अवघड जाऊ नये.

मय से मीना से न साकी से.. न पै SSSm मा ने SSS से..
दिल बहेलता है मेरा, आप के आ जा ने से..

वगैरे..

"दिल" हाही असाच एक सर्वव्यापी शब्द.

लहानपणी आमचा छंद असा होता की दिल = ढुंगण असा सांकेतिक अर्थ घेऊन गाणी म्हणायची आणि खिखिखि करत मित्रांच्यात एकमेकांना टाळ्या देऊन हसायचे.

दिल का भंवर करे पुकार
दिलमें इक लहेर सी उठी है अभी.. कोई ताजा हवा चली है अभी.

नंतर नंतर अनेक खास गाणी आली:

दिल हुम हुम करें..

दिल बोले बूम बूम..

वगैरे..

तेव्हा आता "आप" या शब्दाचा एक अर्थ बनवणे आले. ;)

रेड बुल Thu, 12/03/2015 - 22:43

In reply to by गवि

अगदी अगदी, दिल ला तश्रीफ म्हणून आम्ही बालगोपाळ संवंगडी सुध्दा अशी गाणी म्हणाय्चो... विशेषतः दिल चित्रपट आला होता तेंव्हाची गोष्ट आहे ही.

आप ला बाप हा एक समर्थ पर्याय होऊ शकतो.

सव्यसाची Wed, 11/03/2015 - 10:22

In reply to by ऋषिकेश

जर खाणीतील कोळसा वीजनिर्मितीसाठी वापरला जाणार असेल तर त्यास किंमत अधिक आणि घरगुती इंधनासाठी असेल तर तो मात्र स्वस्त असा हा अजागळ विचार आहे.

रिवर्स ऑक्शन व फॉरवर्ड ऑक्शन मधला फरक पण समजुन घेतला आहे असे दिसत नाही. विजेच्या उत्पादनासाठी रीवर्स ऑक्शन वापरले गेले आहे आणि इतर प्लांट साठी फॉरवर्ड ऑक्शन आहे.

बाकी सरकारने स्वत:च या गोष्टीची नोंद घेतली आहे. लोकसभेमधील चर्चेत पियुष गोयल यांनी भर्तॄहरी मेहताब यांच्या प्रश्नांना उत्तर देताना याच संदर्भात दिले होते का ते आठवत नाही पण जर याच संदर्भात असेल तर सरकारने याची नोंद बरीच आधी घेतली आहे.
http://www.thehindubusinessline.com/companies/minister-to-decide-on-fate-of-three-lowbid-coal-blocks/article6979055.ece

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 10:55

In reply to by सव्यसाची

बहुतांश सहमत.
अग्रलेखाने या बिडिंग मधला फरक लक्षात घेतलेला नाही हे स्पष्ट आहे. घरगुती इंधनासाठी कोळसा स्वस्त मिळावा या उद्देशाने फॉरवर्ड बिडिंग करवले असण्याचीही शक्यता आहे. हा निर्णय सरकारचा हक्क आहे आणि त्याबद्दल काहीच म्हणणे नाही.

खरंतर अग्रलेख जो प्रश्न मांडायला हुकला आहे तो असा की जिंदाल यांना स्वस्तात मिळालेल्या प्लांटपैकी एक पॉवर सेक्टर मधील आहे. तिथे रिवर्स ऑक्शन झाले आहे. तरीही हा दर कमी आहे. ते का? त्यावर सरकारने खरोखरच संशोधन करायला हवे. यात कुठेतरी पाणी मुरत असेल असा समज व्हायला वाव आहे. (त्यात सरकार दोषी असेलच असे नाही, कदाचित प्रशासकीय भ्रष्टाचारही असु शकेल किंवा कदाचित इतरही तांत्रिक कारणे असु शकतील. पण) यामागचे कारण स्पष्ट करत सरकार मस्ट कम क्लीन

अनु राव Wed, 11/03/2015 - 11:01

In reply to by ऋषिकेश

जिंदाल चे समर्थन करायचे नाही तरी त्या खाणींना ( आणि तश्या सारख्या बाकी खाणींना ) भाव कमी मिळायची कारणे खालील

१. जिंदाल सध्या पण ती खाण वापरतो आहे, त्यामुळे त्यांच्या सोईसुविधा आहेत सध्याच. त्यांचा वीज प्लँट पण जवळच आहे.
२. दुसर्‍या कोणाला बीडींग करायचे झाले आणि खाण ताब्यात मिळाली तरी तिथुन त्यांचा वीज प्लँट दुर असल्यामुळे कोळसा तिथे नेणे शक्य नाही. तसेच नव्यानी इंफ्रास्ट्क्चर करावे लागले असते. त्यामुळे अश्या सर्व खाणींमधे स्पर्धा कमी होती.
३. तसेही अपेक्षेपेक्षा दर चांगला मिळाला असे मत आहे.

सव्यसाची Wed, 11/03/2015 - 11:08

In reply to by ऋषिकेश

त्यावर सरकारने खरोखरच संशोधन करायला हवे. यात कुठेतरी पाणी मुरत असेल असा समज व्हायला वाव आहे. (त्यात सरकार दोषी असेलच असे नाही, कदाचित प्रशासकीय भ्रष्टाचारही असु शकेल किंवा कदाचित इतरही तांत्रिक कारणे असु शकतील. पण) यामागचे कारण स्पष्ट करत सरकार मस्ट कम क्लीन

वरती एक लिंक दिली होती त्यामध्ये सरकारने नोंद घेतली आहे असे दिसते. शिवाय कायद्यामधील तरतुदीचाही आधार सरकार घेइल असे दिसते.
http://www.financialexpress.com/article/economy/coal-blocks-won-cleanly-could-be-back-on-the-block/52308/

अनु राव Wed, 11/03/2015 - 10:44

In reply to by ऋषिकेश

काय ऋ - तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती. ऑक्शन चे प्रकार वाचुन तरी घ्यायचे ना आधी.

त्या खाणीतील कोळसा फक्त वीज निर्मीती साठी वापरले जाणार आहे. वीजेचे दर आधीच नक्की झाले आहेत ( पूर्वीच्या कोळश्याच्या दरा वर ). त्यामुळे त्या खाणीतल्या कोळश्याला जास्त किंमत कोणी देणार नाही. गि.कु. नी वेगळा मुद्दा मांडला आहे की सरकार कसे नक्की करणार की ह्या खाणीतला कोळसा फक्त वीज निर्मीतीला च वापरला जाइल.

तसे ही हे फक्त जिंदाल साठी नाहीये, बाकी वीज कंपन्यांनी पण कोळसा खाणी तश्याच घेतल्या आहेत.

ता.क. गि.कु. हे सर्व बाबतीत कॉन्स्पीरसी थीयरी आणतात आणि अमेरिका, इस्त्राईल आणि अंबानी हे त्यांची नेहमीची गिर्हाइके आहेत ( अंबानी कदाचित त्यांच्या मालकांचा आदेश असेल म्हणुन ). त्यांच्या साठी फक्त अरब देश हे सद्गुंणांचे पुतळे आहेत. ते कुठल्या तरी फंडींग वर अरबदेशात अभ्यास वगैरे करायला गेले होते म्हणे. ते त्यांच्या लॉयल्टीचे कारण असावे.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 12:15

In reply to by चिंतातुर जंतू

सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी बीफ विक्री व सेवनावरील बंदीला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्या आवडीचे मांस खाण्याचा अधिकार घटनेनं आहे. महाराष्ट्र सरकारनं त्यावर बंदी आणून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा संकोच केला आहे,' असा दावा तिरोडकर यांनी केला असून बीफची विक्री व सेवनाला गुन्हेगारी कृती ठरविण्याची तरतूद कायद्यातून काढून टाकावी, अशी मागणी केली आहे.

या याचिकेचे काय होते त्याबद्दल कुतूहल आहे.

सदर कायदा कोर्टाने अवैध ठरवावा असे मनापासून वाटते.

परी Wed, 11/03/2015 - 12:59

In reply to by ऋषिकेश

कोणत्याही व्यक्तीला आपल्या आवडीचे मांस खाण्याचा अधिकार घटनेनं आहे. महाराष्ट्र सरकारनं त्यावर बंदी आणून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा संकोच केला आहे,'

कोणत्या मूलभूत हक्कांची गोष्ट करतायत ते? त्यांना एवढ तरी समजायला हव कि हिंदू धर्मात गाईला आपण देवता मानतो तिची पूजा करतो तेंव्हा गोपूजा करणारी मानस गोमांस भक्षण करतील का ? जिथे ते गोमांस भक्षणच करत नाहीत तिथे त्यांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्नच निर्माण होत नाही

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 13:03

In reply to by परी

मी हिंदू आहे. पण मी गायीला देवता मानत नाही. मी गोमांस भक्षण करते. माझ्या मूलभूत हक्कांचं काय?

चिंतातुर जंतू Wed, 11/03/2015 - 13:08

In reply to by परी

>> कोणत्या मूलभूत हक्कांची गोष्ट करतायत ते? त्यांना एवढ तरी समजायला हव कि हिंदू धर्मात गाईला आपण देवता मानतो तिची पूजा करतो तेंव्हा गोपूजा करणारी मानस गोमांस भक्षण करतील का ? जिथे ते गोमांस भक्षणच करत नाहीत तिथे त्यांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्नच निर्माण होत नाही

महाराष्ट्रात फक्त हिंदूधर्मीयच राहात नाहीत. शिवाय, हिंदूधर्मीय कुटुंबात जन्मूनही (हवं तर) बीफ खाण्याचं स्वातंत्र्य का असू नये? (मी खाल्लेलं आहे आणि मला आवडतं.) त्यामुळे 'कोणत्या'ऐवजी 'कुणाचे' मूलभूत हक्क असा प्रश्न विचारलात, तर अधिक योग्य उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 12:46

In reply to by चिंतातुर जंतू

http://zeenews.india.com/news/uttar-pradesh/muslim-chamber-welcomes-cow…
गाईच्या हत्येच्या बंदीच्या कायद्याचे समर्थन करण्यात मुस्लिम एकटे पडलेले दिसत आहेत.

चिंतातुर जंतू Wed, 11/03/2015 - 12:57

In reply to by अजो१२३

>> गाईच्या हत्येच्या बंदीच्या कायद्याचे समर्थन करण्यात मुस्लिम एकटे पडलेले दिसत आहेत.

आधी करावे गूगल.

Gordon D'souza, president of the Bombay Catholic Sabha, points out that beef is an important part of the non-vegetarian diet of the poor. "Religion is personal and the government should not impose their dictates," he says.

जाता जाता : मी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी चालवलेल्या कॉलेजात शिकलो आहे. कॉलेज कँटीनमध्ये रोज बीफ मिळत असे.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:11

In reply to by चिंतातुर जंतू

जाता जाता : मी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी चालवलेल्या कॉलेजात शिकलो आहे.

प्रतिसाद - काहीच नाही.
------------------
जाता जाता: हे सांगायची, आपले एकूण विचार पाहता, अजिबात गरज नसावी.

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 13:14

In reply to by अजो१२३

मी ख्रिस्ती मिशनरी लोकांनी चालवलेल्या कॉलेजात शिकले नाही.

जाता येता: माझे नि जंतूंचे विचार एवढे कसे बाई सारखे?!

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:20

In reply to by मेघना भुस्कुटे

काहींत काही अभिमान पेरावे लागतात, काहींत ते स्वयंभू असतात. काहींत काही न्यूनगंड पेरावे लागतात, काहींत ते स्वयंभू असतात.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 14:21

In reply to by चिंतातुर जंतू

अवांतर टाळायच्या तुमच्या विनंतीला मी मान द्यायला हवा. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो. का कोण जाणे 'स्रोत काय आहे' आणि 'विचारांचा पॅटर्न काय आहे' यांच्यात एक लिंक आढळते. पुण्यात टेल्कोत मिशनरी स्कूलवाले कलिग भेटण्यापूर्बी 'आपल्या देशाच्या संस्कृतीची चिकित्सा करणारे/तिला खालच्या दर्जाचे म्हणून पाहणारे' इ इ लोक मला ठाउक नव्हते. त्यावेळी जर आजकालचे खानदानी राष्ट्रवादी फॉर्वार्ड मेसेजेस, वॉट्सअ‍ॅप, फेसबूक पोस्ट्स असत्या तर आमचा (म्हणजे माझा) उर प्रत्येक वेळी कोण अभिमानाने भरून आला असता. (आजही असा ऑडियन्स आहेच, म्हणूनच ते मेसेजेस आहेत.)
But then I saw clear patterns of philosophies, depending upon whether one is poor or reach, urban or rural, educated or non-educated, etc etc etc. कोणती विचारसरणी पाहिली कि मला अशा बर्‍याच स्रोतांचा वास येतो.
--------------------------
मी जेव्हा असं थेट वैयक्तिक वाटणारं विधान लिहितो, तेव्हा ते केवळ संवाद समोरच्याशी चालू आहे म्हणून. बहुधा, मला त्या क्लासबद्दल निरीक्षण मांडायचं असतं. व्यक्तिगत सन्मान गृहित धरलेलाच असतो.

चिंतातुर जंतू Wed, 11/03/2015 - 14:36

In reply to by अजो१२३

>> 'स्रोत काय आहे' आणि 'विचारांचा पॅटर्न काय आहे' यांच्यात एक लिंक आढळते.

>> But then I saw clear patterns of philosophies, depending upon whether one is poor or reach, urban or rural, educated or non-educated, etc etc etc. कोणती विचारसरणी पाहिली कि मला अशा बर्‍याच स्रोतांचा वास येतो.

आत्मचरित्र सांगण्याची ही जागा नव्हे, परंतु पॅटर्न्स आणि लिंक्स धुंडाळण्यात तुम्हाला थोडी मदत व्हावी ह्यासाठी काही वेचक तपशील - चविष्ट बीफ खाण्यासाठी मला ख्रिस्ती मिशनरी कॉलेजात जाण्याची गरज नव्हती. सर्वसामान्य, गरीब घरांतून आलेले माझे मुस्लिम मित्र त्यासाठी पुरेसे होते. मी कॉलेजात जाण्याआधीपासून ते माझे मित्र होते. मी त्यांच्या घरी जाऊन स्वेच्छेनं बीफवर पुख्खा झोडत असे. त्यांनी माझ्यावर कधीही ते खाण्याची बळजबरी किंवा साधा आग्रहही केला नाही. हां, आता लहानपणीपासून अनेकधर्मीय आणि मध्यमवर्गीय परिघाबाहेरच्या लोकांशी घनिष्ट मैत्रीचे संबंध असणं असा एक स्रोत तुम्हाला हवा झाल्यास तो ह्यात सापडू शकेल.

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 14:39

In reply to by अजो१२३

संभाषण माझ्याशी नाहीय. पण मला विसंगती दिसते आहे, म्हणून मधे लिहितेय.

मी हिंदू-सवर्ण घरात जन्माला आलेली व्यक्ती आहे. माझं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं आहे. उच्चशिक्षणासाठीही मी क्रिस्ती मिशनरी कॉलेजात गेलेले नाही.

माझ्या ’असल्या’ विचारांचा स्रोत कुठे आहे?

गवि Wed, 11/03/2015 - 13:34

In reply to by मेघना भुस्कुटे

जाता येता: माझे नि जंतूंचे विचार एवढे कसे बाई सारखे?!

एकूण वाक्याच्या शब्दवापरक्रमावर पुनर्विचाराची विनंती करुन पाहतो. ;)

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 14:05

In reply to by गवि

गविंकडे खव नाही, म्हणून इथे लिहिते आहे. पूर्णत: अवांतर.

का म्हणे पुनर्विचार? ’असं कसं बाई झालं?’ असा प्रश्न स्वत:शी विचारला, तर काय चुकलंय त्यात?

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 14:24

In reply to by बॅटमॅन

म्हणून! म्हणून शब्दयोगी अव्ययं मराठीत शब्दाला जोडून लिहायची पद्धत आहे, याचा पुनरुच्चार करत असते मी. आता ते पक्कं ठाऊक असतं, तर झालास्ता का असा गोंधळ?!

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 14:25

In reply to by मेघना भुस्कुटे

माझ्यामते "असं कसं झालं बाई?" असं तुम्ही मला (म्हणजे पुरुषाला) देखिल उद्देशून* म्हणू शकता. कसे ते माहित नाही पण यात काही चूक वाटत नाही.
---------------
कसं झालं ते मी सांगावं (पुरुषाने) ही उघड अपेक्षा या विधानात असेल तरीही वाक्य बरोबर.

गब्बर सिंग Wed, 11/03/2015 - 14:31

In reply to by चिंतातुर जंतू

"Religion is personal and the government should not impose their dictates," he says.

अगदी बरोबर.

साधा मुद्दा आहे - सरकारच्या कोणत्याही निर्णयामधे क्रायटेरिया म्हणून व्यक्तीचा धर्म असता कामा नये. No benefits be given to a person for belonging to (or not belonging to) a particular religion or any religion at all. No costs be imposed onto a person for belonging to (or not belonging to) a particular religion or any religion at all. Govt should always and without exception ignore the religion of a person.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 12:44

सदर कायदा कोर्टाने अवैध ठरवावा असे मनापासून वाटते.

मला देखिल असेच वाटते. ती वाघा-सिंहांची, काळवीटांची अभयारण्ये देखिल कॅन्सल करावीत. त्यांना मारायला बंदी केल्याने लोकांच्या 'कोणतेही मांस खाण्याच्या घटनात्मक अधिकारावर' आक्रमण होते. नैतरी काळवीटांना वाघ खातातच. मांसाहारी लोकांनीच असे काय पाप केले आहे?
'अपघातात मेलेल्या' किंवा 'अदरवाईज मेलेल्या' मनुष्यांचे मांस देखिल खाऊ द्यावे. उगाच भावनिकता कुरवाळू नये. युटिलिटीचे तत्त्व सगळीकडे लावावे.

गवि Wed, 11/03/2015 - 12:53

In reply to by अजो१२३

जे प्राणी मांस, अंडी, दूध, लोकर अशा उत्पादनांसाठी पाळीव / पोल्ट्री तत्वावर पैदा केले, वाढवले अन वापरले जातात त्यांना शेतीप्रमाणेच समजण्यात येऊन त्यातून येणारी उत्पादने ही सर्वांना वापरण्याचा हक्क असतो आणि असावा.

तुम्ही दिलेली उदाहरणं ही निसर्गतः जन्मदर ठरलेला अथवा घटता असणार्‍या आणि कृत्रिमरित्या पुनरुत्पादित न करता नैसर्गिक परिस्थितीत जन्माला आलेल्या प्राण्यांना संपवून त्यांचे कातडे, दात, अवयव, मांस मिळवण्याविषयी आहे.

हरणं, ससे, तितर.. अगदी वाघ, सिंह, हत्ती वगैरेसुद्धा जर खाद्य म्हणून पोल्ट्री अथवा राखीव कुरणात पाळले (प्रजनन, वाढ, भक्षण हे पूर्ण चक्र आपणच सांभाळून) तर ते सर्व खायला अथवा कातडीसाठी वापरायला कोणतीही बंदी नसावी.

तेव्हा उदाहरण काहीसे अयोग्य आहे.

गायी गोठ्यात पैदा होतात, त्यांना वळू दाखवण्यापासून ते खाऊपिऊ घालण्यापासून सर्वकाही ती पाळणारा स्वतः करतो किंवा त्याची जबाबदारी घेतो. अशा स्थितीत त्या गायींचा वंश टिकत नाही असे म्हणून सिलेक्टिव्हली अभय का?

जंगलातले गायीचे वंश कधीचेच संपले आहेत.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 13:21

In reply to by अजो१२३

गाईंचा वंश सांभाळाण्यासाठी त्यांना अभयारण्याची व्यवस्था करावी अशी वेळ आलेली नसावी हे एक.
दुसरे, सध्याही अभयारण्याबाहेर असलेल्या वर उल्लेखलेल्या सर्व प्राण्यांना मारायला बंदी नाही. त्या अरण्यांमध्ये गायी गेल्या तर तेथील गायींना मारू नये हे योग्य वाटते.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:32

In reply to by ऋषिकेश

वाघा-सिंहावाला प्रतिसाद पूर्ण उपरोध आहे.
---------------------------------------------------------
मी असं म्हटलं - थ्रू अभयारण्य ऑर व्हाटेवर - वाघाला संरक्षण आणि गाईला नाही असं का? करोडो हिंदुंच्या गाईबद्दलच्या पावित्र्याबद्दलच्या भावनांना स्थान नसेल तर ते वाघ -सिंह कोण? त्यांच्या वंशाबद्दल भावना असणारांना का मनावर घ्यायचं? वाघांबिना माणसाचं काय बिघडतं? सर्कशीला आणि झूला लागतात?

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:09

माझा मुद्दा प्रचंड सिमित आहे. "कोणतेही मांस खाण्याचा" व " घटनात्मक अधिकार". घटनेने प्रत्येक प्रजातीला वंश टिकवून ठेवण्याचा अधिकार दिलेला नाही. आणि दिला असेल तर असल्या उलट्या सुलट्या अधिकारांना काही अर्थ नाही.
-------------------------------

अशा स्थितीत त्या गायींचा वंश टिकत नाही असे म्हणून सिलेक्टिव्हली अभय का?

वंश टिकणे हा मुद्दा नाही. ती शुद्ध सबब आहे. गाय मारणे, इ इ बहुसंख्य हिंदू अत्यंत निषिद्ध मानतात. यावरून ते दंगली पण करू शकतात. पण सेक्यूलर राज्यात असे थेट म्हणून कसे चालेल? प्रश्न वंशाचाच असता तर गायींचं जबरदस्त फार्मिंग करा आणि म्हशी मारण्यावर बंदी असाही कायदा तितकाच सयुक्तिक आहे.
---------------------------
(या बाबतीत) लोकभावनांचा आदर करायचा नाही असं तुम्ही (कायदा नको म्हणणारांनी) ठरवलं, तर शुद्ध घटनेचा आधार घेऊन काहीही मागणी करता येते. योग्य तिथे वंश टिकवायची इतकी हौसच आहे तर धोक्यात आलेले एकूण प्राणी आणि वनस्पती यांची यादी बनवून भारताचे प्रचंड क्षेत्रफळ अभयारण्य आणि अभयशेत म्हणून घोषित करता येईल.

गवि Wed, 11/03/2015 - 13:11

In reply to by अजो१२३

असं सगळं मान्य आहे तर मग वरती:

ती वाघा-सिंहांची, काळवीटांची अभयारण्ये देखिल कॅन्सल करावीत. त्यांना मारायला बंदी केल्याने लोकांच्या 'कोणतेही मांस खाण्याच्या घटनात्मक अधिकारावर' आक्रमण होते. नैतरी काळवीटांना वाघ खातातच. मांसाहारी लोकांनीच असे काय पाप केले आहे?
'अपघातात मेलेल्या' किंवा 'अदरवाईज मेलेल्या' मनुष्यांचे मांस देखिल खाऊ द्यावे.

असं का म्हटलंत ? ते निश्चित उपरोधिक वाटतंय. आणि इन दॅट केस गोंधळ होतोय.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:25

In reply to by गवि

It is very simple. Cows are holy for the Hindus. Now, changing the nature of state, i.e. from secular to religious, is very long and hard route. Instead use an absurd pretext of animal conservation and be practical.
--------------------
जेव्हा हा जाईल, जर जाईल, तर सगळे हिंदू संघटन बोंबा मारतील. हा मुद्दा 'चवीच्या अन्नाचे खाण्याचे अधिकार' इ इ आहे म्हणणे तद्दन मूर्खपणा आहे. हा शुद्ध धार्मिक मुद्दा आहे. तुम्हाला बहुतांश हिंदूंच्या भावनांचा आदर करायचा आहे कि नाही हा आहे.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 13:30

In reply to by अजो१२३

मुळात बहुतांश हिंदूना गाय-बैल-म्हैस-रेडा मारायला काही हरकत आहे हेच मला पटत नाही.

कित्येक हिंदू शेतकरी आपल्याकडील गाई कसायाला विकतात (प्रसंगी त्याचा व्यापार करतात) तर कित्येक हिंदू त्यांच्याच कमावलेल्या कातड्यांचे जोड्यांपासून पर्सपर्यंत अनेक प्रकारे अंगावर मिरवतात. हे कातडं काय फक्त नैसर्गिक मृत्यूपावलेल्या जनावरांपासून येतं असा समज बहुसंख्य हिंदूचा असेल काय?

==

शिवाय म्हैस, रेडा, बैल तर बहुसंख्य हिंदूंना पवित्र नाहीत ना? मग त्यांना मारायला बंदी का?

नितिन थत्ते Wed, 11/03/2015 - 13:36

In reply to by ऋषिकेश

>>हे कातडं काय फक्त नैसर्गिक मृत्यूपावलेल्या जनावरांपासून येतं असा समज बहुसंख्य हिंदूचा असेल काय?

समज असू शकतो.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 13:36

In reply to by ऋषिकेश

मुळात बहुतांश हिंदूना गाय-बैल-म्हैस-रेडा मारायला काही हरकत आहे हेच मला पटत नाही.

बरोबर आहे. कोंबडा झाकून ठेवल्यामुळे सूर्य उगवायचा थांबतोच.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:45

In reply to by ऋषिकेश

शिवाय म्हैस, रेडा, बैल तर बहुसंख्य हिंदूंना पवित्र नाहीत ना? मग त्यांना मारायला बंदी का?

म्हैस, रेडा वर बंदी नाही.
------------------------

मुळात बहुतांश हिंदूना गाय-बैल-म्हैस-रेडा मारायला काही हरकत आहे हेच मला पटत नाही.

तुम्ही वेगळे. बहुतांश हिंदू वेगळे.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 13:47

In reply to by अजो१२३

तुम्ही वेगळे. बहुतांश हिंदू वेगळे.

अगदी अगदी. पुराणमतवादी बहुतांश फडतूस कुणीकडे आणि पाश्चिमात्य मूल्यांवर श्रद्धा (ओह सो डौन्मार्केट) आपलं विश्वास असणारे कुणीकडे.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:59

In reply to by बॅटमॅन

नै हो, म्हणजे ऋषिकेशला महाराष्ट्राच्या (अगदी २०१५ पूर्वी) कोणत्या गावात धाडा, एका रँडम हिंदू शेतकर्‍याला, " मला तू गाय विक. मला तिचं मांस पार्टीत मित्रांना उद्या खाऊ घालायचं आहे. किती पैसे?' असं म्हण आणि सुरक्षित परत ये म्हणावं.
====================
भारतीय दंगे चालू होण्यासाठी मुसलमानाची पोरगी हिंदूने छेडणे किंवा उलटे हा लैच आधिनिक ट्रेंड आहे. जुने सगळे दंगे गोमातेच्या वधापासून किंवा डूकराच्या वधापासून सुरु होत.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 14:03

In reply to by अजो१२३

नै हो, म्हणजे ऋषिकेशला महाराष्ट्राच्या (अगदी २०१५ पूर्वी) कोणत्या गावात धाडा, एका रँडम हिंदू शेतकर्‍याला, " मला तू गाय विक. मला तिचं मांस पार्टीत मित्रांना उद्या खाऊ घालायचं आहे. किती पैसे?' असं म्हण आणि सुरक्षित परत ये म्हणावं.

हा प्रकार १६ मे नंतर घडला असता तर जातीयवादी-हिंदुत्ववादी-धर्मांध शक्तींची चिंताजनक वाढ या सदराखाली पेपरात आला असता. नपेक्षा एक रँडम इन्सिडेंट किंवा जातीयतेचे धोके या सदराखाली आला असता.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 13:57

In reply to by अजो१२३

आम्ही वेगळे आहोत की नाही हे वैयक्तिक झालं त्या टिपणीची गरज नव्हती. असो. मुद्द्यांवरून इथे प्रवास सुरू झाल्याने मी थांबतोय.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 14:06

In reply to by ऋषिकेश

तुम्ही म्हणजे वैयक्तिक तुम्ही नव्हे. शहरात, मुक्त वातावरणात, पाश्चिमात्य विचार आजूबाजूला असताना (प्रभावाखाली नाही म्हटले) वाढलेले लोक.
-----------------
खेडे ते देशाची राजधानी अशा माझ्या जीवनप्रवासात मी मित्राला पहिल्यांदा बीफ (गायीचे) खाताना पाहायला २००७ उजडले. ते ही परदेशात. कंपलसरी शाकाहारवाले बालपण सोडून या मित्राने एकदाही शाकाहारी अन्न खाल्ले नव्हते तो इतकी एक्स्ट्रीम केस होता.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 14:36

In reply to by अजो१२३

मुळात ते वैयक्तिक होतं. तुम्ही वेगळे म्हटले की मुद्द्यांना उत्तरे द्यायला नकोत. (दुसर्‍या एका उपप्रतिसादाततर थेट माझेच नाव घेतले आहे. अजून किती वैयक्तिक व्हायचे बाकी आहे?)
==
माझ्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ मी पुढिल मुद्दा मांडला होता:

कित्येक हिंदू शेतकरी आपल्याकडील गाई कसायाला विकतात (प्रसंगी त्याचा व्यापार करतात) तर कित्येक हिंदू त्यांच्याच कमावलेल्या कातड्यांचे जोड्यांपासून पर्सपर्यंत अनेक प्रकारे अंगावर मिरवतात

त्याच्या खंडनार्थ ऋषिकेश गाय विकत घ्यायला गेलात तर काय होईल? यावर चर्चा वळवणे मला तरी वैयक्तिक वाटते.
बाकी वरील मुद्द्यांचे खंडन नाहीच.

गवि Wed, 11/03/2015 - 13:47

In reply to by अजो१२३

हा शुद्ध धार्मिक मुद्दा आहे. तुम्हाला बहुतांश हिंदूंच्या भावनांचा आदर करायचा आहे कि नाही हा आहे.

पण, खुद्द सरकारही हा मुद्दा अशा रितीने न मांडता गोवंशाची वाढ आणि सुरक्षितता अशा मार्गाने मांडते आहे असं दिसतं. हिंदूंच्या भावनेपोटी असं कुठेच अधिकृत म्हटलेलं दिसलं नाही.

त्याला जर स्पष्टपणे हिंदूंच्या भावनांसाठी असं म्हटलं तर फारच मोठा पॅरेडॉक्स होईल. सेक्युलर किंवा तत्सम काहीही म्हणवणार्‍या प्रदेशाला एका ठराविक धर्मापोटी (व्हेदर मेजॉरिटी ऑर नॉट) सरसकट बंदी कशावरच घालता येत नाही. मग ते बिरुद सोडावे लागेल.

त्यामुळे वंशवृद्धी (सिमिलर टू वन्य प्राणी) असा अँगल घेतला आहे असे वाटते. विरोधकही "चवीचा अथवा खाण्याचा मूलभूत हक्क" असा अँगल घेताहेत. प्रत्येकजण आपल्या बाजूचा अंतिम आउटपुटच पाहतो आहे फक्त. मुळात तळाशी असलेलं तत्व = एका गटाच्या भावनांवर आधारित कायदे पूर्ण समाजासाठी कसे करता येतील? या अँगलने कोणीच विरोध करताना दिसत नाही. त्यासाठी जैनांना वर्ज्य असणार्‍या कांदा लसणीवर बंदीचे थिअरी उदाहरण दिले तर ते मात्र ताणलेले इमॅजिनेशन ठरते. कांदालसणीबाबत तसं होणारही नाही कदाचित, पण शेवटी कायद्यामागे सर्वसमावेशक तत्व हवंच हा मुद्दा राहतोच ना? दॅट इज लार्जर पॉईंट. बीफची चव, त्याचा विरह, गायींचे वंशसातत्य हे सर्व मुद्दे निरर्थक नसले तरी सेकंडरी ठरतात.

मेघना भुस्कुटे Wed, 11/03/2015 - 13:58

In reply to by गवि

कायद्यामागे सर्वसमावेशक तत्व हवंच हा मुद्दा राहतोच ना? दॅट इज लार्जर पॉईंट.

एक्झॅक्टली.

अनु राव Wed, 11/03/2015 - 14:09

In reply to by गवि

मुळात तळाशी असलेलं तत्व = एका गटाच्या भावनांवर आधारित कायदे पूर्ण समाजासाठी कसे करता येतील? या अँगलने कोणीच विरोध करताना दिसत नाही.

ह्याचे कारण सरकारनी पळवाट काढणारे कारण पुढे केले आहे. सरकार म्हणतच नाहीये की एका गटाच्या ( हिंदु ) भावना जपण्यासाठी आम्ही हा कायदा करतो आहोत. मग ह्याच मुद्द्यावर विरोध तरी कसा करणार?

एक प्रश्न - गोहत्या बंदी म्हणे बर्‍याच राज्यात आहे, मग तिथे कशी चालतीय?

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 13:55

पण शेवटी कायद्यामागे सर्वसमावेशक तत्व हवंच हा मुद्दा राहतोच ना?

नै राहत. प्रत्येक सर्वसमावेशक तत्त्वाचा कायदे बनवण्यासाठी वापर करताना २-३ अपवाद करावे लागले तर ओके असते हे देखिल एक सर्वसमावेशक तत्त्व आहे. शेवटी सगळे सगळं समजून घेतात.

गवि Wed, 11/03/2015 - 14:02

In reply to by अजो१२३

२-३ अपवाद

नेमके किती अपवाद, हा मुद्दा आपल्याकडे (माझ्याकडे तरी) विदा नसल्याने वादग्रस्तच राहणार बहुधा.

कायद्याचा बेस धार्मिक असू नये हा मुद्दा आहे. उदा. दारुबंदी आली तर ती सर्वच जनतेच्या आरोग्याला अपाय टाळणे असे कारण दाखवून यावी आणि त्या स्थितीत ती जस्टिफाय होईल. पण अमुक धर्माला मद्य वर्ज्य आहे या कारणाने एकूण समाजात कोणीच पिऊ नये या बेसिसवर हाच कायदा अयोग्य वाटेल. मग त्याज्य मानणारा धर्म मेजॉरिटीत आहे की मायनॉरिटीत हा मुद्दा पूर्ण गैरलागू आहे.

दोनतीन अपवाद असं म्हणताना तुम्ही हिंदू सोडून इतर धर्म आणि बर्‍याच जातीप्रजाती, ज्या गोमांसभक्षण करतात त्या सर्वांना अपवादांमधे बसवलं आहे का?

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 14:04

In reply to by गवि

कायद्याचा बेस धार्मिक असू नये हा मुद्दा आहे.

आपल्या परमपवित्र इ.इ. ब्रिटिशप्रणीत सिव्हिल लॉचा बेस हिंदू धार्मिक कायदाच आहे.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 15:14

In reply to by गवि

या लेखात बघा काय म्हणे:

मी असंही वाचलंय की इंद्राचा विकपॉइंट बैलांचे मांस होते तर अग्निदेवाच गाय व बैल दोन्हीचे!
महाभारत काळात तर हिंदू ब्राह्मणही बीफ खात होते म्हणे.
याज्ञ्यवल्कल्य आणि तैत्तरीय सुत्रातही गाईचे मांस खाण्याबद्दल उल्लेख आहेत म्हणतात.
हिंदूंच्या मनुस्मृतीतही बीफ खाण्यावर बंदी नाही म्हणे!
चार्वाक संहितेत तर गाईचे मांस अनेक आजारांवर औषध म्हटले गेलेय.

खरंतर बुद्ध धर्माच्या उदयानंतर या गोष्टी कमी झाल्याचेही सांगितले जाते.

आता हिंदू धर्मावर आधारित कायदा करायचा तर - तरीही हा कायदा हटवावा लागणार की काय?

===

अरेच्या! आमची इच्छा हिंदू धर्माचा आदर करतच नाही तर हिंदू धर्माच्या थोर संस्कृतीला अनुसरूनच आहे म्हणायची!

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 15:16

In reply to by ऋषिकेश

काळानुरूप लोकरूढी बदलत असतात. सध्याच्या काळात बहुसंख्य हिंदू हे अँटी-बीफ आहेत हे कबूल करवत नाही म्हणून जुनी उदाहरणे दिली की संपले, बरोबर?

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 15:19

In reply to by बॅटमॅन

सध्याच्या काळात बहुसंख्य हिंदू हे अँटी-बीफ आहेत हे कबूल करवत नाही

मी कधी म्हटले की ते स्वतःपुरते अँटी-बीफ नाहित म्हणून (ते स्वत: खाणार नाहीत हे मान्यच आहे).
मी म्हणतोय बहुसंख्यांचा गायी मारायला विरोध नाही!

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 15:23

In reply to by ऋषिकेश

मी म्हणतोय बहुसंख्यांचा गायी मारायला विरोध नाही!

भाकड गायी कसायाला विकणारे शेतकरी हे नाईलाज म्हणूनच तसे करत असतात. ते काही मोठ्या आनंदाने गायी विकतात असे वाटते का? आणि ते आनंदाने विकतात असे मानले तरी बाकीच्यांचे काय?

गाय मारण्यात इंट्रिन्सिक काय बरेवाईट आहे हा मुद्दा जाईना कुणीकडे. पर्सेप्शनचे विचाराल तर बीफ ऐवजी नुस्ती गाय मारायलाही बहुसंख्य लोक तयार होतील अशी परिस्थिती नाहीये. जितक्यांशी बोललोय तितक्यांनी नाखुषी वा विरोधच दर्शवलेला आहे. अन हे सर्व एकाच जातीचे आहेत असेही नाही.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 15:29

In reply to by बॅटमॅन

गाय मारायला म्हणजे स्वहस्ते मारायला म्हणायचे नाहीये.

पर्सेप्शनचे विचाराल तर बीफ ऐवजी नुस्ती गाय मारायलाही बहुसंख्य लोक तयार होतील अशी परिस्थिती नाहीये. जितक्यांशी बोललोय तितक्यांनी नाखुषी वा विरोधच दर्शवलेला आहे. अन हे सर्व एकाच जातीचे आहेत असेही नाही.

माझ्या परिचयातले -जे इन जनरल "प्राणीहत्या"विरोधी वा "भूतदया"वादी आहे ते वगळता - कोणत्याही 'धार्मिक' कारणाने 'बीफ' तयार करून ज्यांना खायचे आहे त्यांना विकायला व खाऊ द्यायलाही विरोध करत नाहीयेत. जोवर आम्हाला जबरदस्ती खायला लावत नाहीत तोवर त्यांची इतरांना बीफ मिळावे म्हणून कोणी गाय मारली तर अजिबातच हरकत नाहीये.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 15:35

In reply to by ऋषिकेश

गाय मारायला म्हणजे स्वहस्ते मारायला म्हणायचे नाहीये.

मी अशा अर्थाने बोलल्याचे माझ्या कुठल्या प्रतिसादातून दिसते?

माझ्या परिचयातले -जे इन जनरल "प्राणीहत्या"विरोधी वा "भूतदया"वादी आहे ते वगळता - कोणत्याही 'धार्मिक' कारणाने 'बीफ' तयार करून ज्यांना खायचे आहे त्यांना विकायला व खाऊ द्यायलाही विरोध करत नाहीयेत. जोवर आम्हाला जबरदस्ती खायला लावत नाहीत तोवर त्यांची इतरांना बीफ मिळावे म्हणून कोणी गाय मारली तर अजिबातच हरकत नाहीये.

समाजात सर्व प्रकारचे लोक असतात. पण अशी धारणा असलेले लोक आणि याविरुद्ध धारणा असलेले लोक याबद्दल माझं आणि बाकी अनेकांचं पर्सेप्शन नेमकं तुमच्या उलट आहे हे लक्षवेधी वाटलं.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 16:15

In reply to by बॅटमॅन

पण अशी धारणा असलेले लोक आणि याविरुद्ध धारणा असलेले लोक याबद्दल माझं आणि बाकी अनेकांचं पर्सेप्शन नेमकं तुमच्या उलट आहे हे लक्षवेधी वाटलं.

सहमत आहे.
माझ्या भोवतीचे बहुतांश हिंदू सहिष्णु असल्याचा हा परिपाक असावा.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 16:47

In reply to by ऋषिकेश

माझ्या भोवतीचे बहुतांश हिंदू सहिष्णु असल्याचा हा परिपाक असावा.

गायीला मारू नये ही एकमेव धारणा असहिष्णू होण्यास पुरेशी आहे हा नवीन शोध लागला.

बॅटबॉल व रूलही आपलेच, मग सचिनही आपणच व मॅकग्राही आपणच. अगदी बरोबर आहे.

नितिन थत्ते Wed, 11/03/2015 - 16:52

In reply to by बॅटमॅन

तसं नाही. माझ्या आसपासचे बर्‍यापैकी हिंदुत्ववादी* असलेले लोक गायींच्याबाबत इतके कै हळवे नैत,

*पक्षी- 'त्यांना' ठेचायला पायजे. वगैरे नियमितपणे बोलणारे.

------
गोवधबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी हेलमेटच्या कायद्यासारखी होणार असेल तर तसा कायदा करायला काही हरकत नाही.
निदान काही लोक शांत होतील. ज्यांना बीफ हवं आहे त्यांना ते मिळत राहील.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 16:55

In reply to by नितिन थत्ते

विरोधाच्याही डिग्र्या असतात हो.

१. गाय कापणार? वा वा वा वा, मलाही बोलवा बरं का.
२. गाय कापणार? हम्म्म्म ओक्के.
३. गाय कापणार? कशाला ते?
४. गाय कापणार? दुसरी कामं नाहीत का धर्म बुडवता ते?
५. गाय कापणार? तुमच्या तर *****
६. गाय कापणार? तुलाच कापतो थांब.

इतका मोठा स्पेक्ट्रम आहे. यात विरोध असणे म्हणजे क्र. ६ असेच मानले की काम सोपे होते.

ऋषिकेश Wed, 11/03/2015 - 16:54

In reply to by बॅटमॅन

गायीला मारू नये ही एकमेव धारणा असहिष्णू होण्यास पुरेशी आहे हा नवीन शोध लागला.

नजर बाकी शोधक (की विपर्यस्त?) तुमची! ;)
गायीला मारू नये म्हणणे हे असहिष्णु होण्यास पुरेसे आहे असा गॉगलधारी विपर्यास्त अर्थ काढण्यापेक्षा "जो जे वांच्छिल तो ते खावो" असा त्यांचा दृष्टिकोन मला त्यांच्या सहिष्णु वागणुकीचाच एक भाग वाटतो. (मी म्हणतोय त्यातील बहुसंख्य आस्तिक, काही बाबतीत पुराणमताभिमानी, हिंदू आहेत (वेगवेगळ्या जातीतले). तरीही त्यांना इतरांनी गोमांस खाण्यावर काहीच आपत्ती नाही.)

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 16:59

In reply to by ऋषिकेश

नजर बाकी शोधक (की विपर्यस्त?) तुमची!

एरवी वैयक्तिकतेच्या नावाने गळे काढणार्‍यांकडून ही टिप्पणी रोचक/उद्बोधक/गंमतीशीर वाटली.

गायीला मारू नये म्हणणे हे असहिष्णु होण्यास पुरेसे आहे असा गॉगलधारी विपर्यास्त अर्थ काढण्यापेक्षा "जो जे वांच्छिल तो ते खावो" असा त्यांचा दृष्टिकोन मला त्यांच्या सहिष्णु वागणुकीचाच एक भाग वाटतो. (मी म्हणतोय त्यातील बहुसंख्य आस्तिक, काही बाबतीत पुराणमताभिमानी, हिंदू आहेत (वेगवेगळ्या जातीतले). तरीही त्यांना इतरांनी गोमांस खाण्यावर काहीच आपत्ती नाही.)

१. आसपासचे हिंदू सहिष्णू आहेत म्हणून ते गोमांसाबद्दल ओके आहेत.

आणि

२. गोमांसाबद्दल ओके नाहीत म्हणून आसपासचे हिंदू असहिष्णू आहेत.

ही दोन्ही वाक्ये एकमेकांची काँट्रापॉझिटिव्ह आहेत. सबब हा अर्थ विपर्यस्त कसा ते सांगण्याची कृपा करावी. यातले पहिले वाक्य तुमचेच आहे.

अनुप ढेरे Wed, 11/03/2015 - 15:30

In reply to by बॅटमॅन

जितक्यांशी बोललोय तितक्यांनी नाखुषी वा विरोधच दर्शवलेला आहे. अन हे सर्व एकाच जातीचे आहेत असेही नाही.

हेच बोल्तो. बहुसंख्यांचं गोहत्येला समर्थन आहे किंवा विरोध नाही हे विधान ऋषिकेश यांनी काय आधारावर केलं ते समजलं नाही.

अजो१२३ Wed, 11/03/2015 - 14:48

In reply to by गवि

कायद्याचा बेस धार्मिक असू नये हा मुद्दा आहे.

सदर मुद्दा गैर आहे. कायद्याचा आधार काहीही असू शकतो. धर्मानेच असं काय घोडं मारलं आहे? आपला देश सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. "धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार" घटनात्मक आहे. घटनेला धर्म लोकजीवनातून खड्यासारखा बाहेर काढायचा नाही.

बॅटमॅन Wed, 11/03/2015 - 14:52

In reply to by अजो१२३

पश्चिमेतली सेकुलारिझमची व्याख्या: सर्व धर्म सारखेच वायझेड आहेत.
भारतीय व्याख्या: सर्व धर्म सारखेच सन्माननीय आहेत.

विचारजंतांना असे वाटते की भारतीय व्याख्या बदलून पश्चिमेकडील व्याख्या अवलंबावी.

गवि Wed, 11/03/2015 - 15:09

In reply to by बॅटमॅन

पश्चिमेतला कोणता देश सर्व धर्म सारखेच वायझेड आहेत असं म्हणतो अथवा दाखवतो ?

सर्व धर्म सारखेच सन्माननीय असणे याचा अर्थ प्रत्येकाच्या समजुती अन भावनांनुसार होलसेल पूर्ण लोकसंख्येसाठी कायदे करणे असा होतो का?

याला पूज्य म्हणून अमुकहत्येवर बंदी - सर्वांवरच
त्याला त्याज्य म्हणून अमुकपालनावर बंदी - सर्वांवरच
अमुकला एकपत्नीव्रताची प्रथा असल्याने द्विभार्याप्रतिबंध - सर्वांवरच
अमुकला अनेक पत्नी करता येत असल्याने द्विभार्या चालेल - सर्वांनाच
अमुकनुसार सुंता आवश्यक - सर्वांनाच
गर्भपात धर्मबाह्य- सर्वांनाच

असे करणे हा अप्रोच म्हणजे सर्वांना सन्माननीय मानण्याची समता का ?

यातली प्रत्येक गोष्ट होणार नाही हे खरंच, पण "भारतीय व्याख्या: सर्व धर्म सारखेच सन्माननीय आहेत" याचाच अर्थ पश्चिमेकडे सर्वांचंच सर्व सोडा असा अप्रोच अन आपल्याकडे सर्वांचंच सर्वमान्य करा असा..
असं म्हणायचं असेल तर त्याचा अर्थ शोधणं आलं.