Skip to main content

एक विचित्र मुलगी

ती १८ वर्षाची मी २० वर्षाचा.
मी तसा व्यवस्थित साधा मुलगा होतो. बिडी , दारू कसलं व्यसन नव्हत. मुली म्हणजे वेगळ्याच स्पेसीज वाटायच्या. पहिला प्रेमभंग होऊन तीन चार पावसाळी कविता करून झाल्या होत्या. हळू हळू त्यातून बाहेर येऊन सेक्स बद्दल भयानक आकर्षण वाटायला लागल. ब्लू फिल्म्स वेगैरे बघून बराच नॉलेज वाढल होत. प्रत्यक्षात काही करायचा योग आला नव्हता. सुट्टीमध्ये मी होस्टेलवरून घरी यायचो पण आई आणि बाबा मोस्ट ऑफ द टाईम घरी नसायचे. त्यामुळे घरी मी एकटाच. मला असा वैताग वेगैरे यायचा नाही उलट मी तो एकटेपणा एन्जोय करायचो. कधीतरी वाटायचं कि कोणीतरी बरोबर असाव वेगैरे.मित्र होते पण ते तेवढ्यापुरतेच.
या सगळ्यात मी तिला भेटलो.
आयुष्यात जे काही घडत त्याची थोडीफार संगती लावायचा प्रयत्न आपण करतो पण काही घटना अश्या घडतात कि त्याची काहीच कुठेच संगती लागत नाही. काही आडव्या तिडव्या घटना घडतात आणि वरचेवर उगाच तुम्हाला आठवत राहतात. रस्त्याने चालता चालता गडबडीत माणस एकमेकांना धडकतात तशी ती मला भेटली होती. मी फक्त फोनवर तिचा आवाज एकला होता आणि बरच बोललो होतो. बर्यापैकी अल्लड होती. दुसरा काही इमोशनल गुंता करायचा नाही माझ्यापुरता मी क्लिअर होतो. पहिल्यांदा आम्ही भेटायचं ठरवलं. मी कुणाही नवीन व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर कायम हिरवा ती शर्ट घालून जातो कारण हिरवा रंग गर्दीत लांबून उठून दिसतो. मी तिला सांगितलं होत कि मी हिरवा शर्ट घातला आहे .मी गाडीवर तिची वाट बघत थांबलो होतो आणि लांबून बघितला तर बर्यापैकी स्मार्ट आणि सेक्सी मुलगी कानात पांढर्या कलरचे हेडफोन आणि ब्लक टॉप आणि जीन्स घालून येताना दिसली. मनातल्या मनात आनंद झाला म्हणजे दिसायला एकदम खराब तर नाही आहे. ती माझ्या गाडीच्या जवळ आली आणि मला नाव विचारला. तोपर्यंत आमचा फोन सुरुच होता.मी नाव सांगितलं तिला खात्री पटली आणि ती गाडीवर बसली. सिग्नल लागला होता . गाडीवर बसताना देखील ती बर्यापैकी चिकटून बसली होती. च्यायला म्हंटलं. गाडीवर आम्ही खास काय बोललो नाही. मी तिला माझ्या आवडीच्या कोल्ड्रिंक हाउस मध्ये घेऊन गेलो. आम्ही समोरासमोर बसलो. मी तिला ओब्सर्व करत होतो. दिसायला अवरेज होती पण डोळ्यात खोडकर झाक होती. कानात मोठे इररिंग घातले होते. बोलायला पण स्मार्ट होती . मला म्हणाली या शर्ट मध्ये तुझ्यासारखे दोन बसतील म्हणून.मी पण म्हणालो तू तर फोन वर बोलली होतीस कि तुझे डोळे काळे आहेत पण इथे तर थोडे ब्राऊन दिसत आहेत.
आता करायचं काय हा प्रश्न होता. मी तिला घेऊन तलावाकडे गेलो. तिथे बसलो. आमच्याबाजुलाच दहा मीटर अंतरावर एक जोडप किसिंग करत बसला होत. साला फोनवर एवढी बडबडणारी पोरगी समोर आल्यानंतर शांतच झाली होती. मी असाच काहीतरी गुळ काढायला सुरवात केली, पण ती काही रिस्पांस देइन मग गळ्यात हात घालून जवळ ओढल.पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीबरोबर कस वागाव ते पण भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर कस वागाव हेच कळत नाही. नाव, गाव सोडून मला तिच काही माहिती नाही आणि तिला मी माहिती नाही मग नक्की बोलणार तरी काय ?आणि डायरेक्ट फिजिकल व्हायला गेलो तर त्यासाठी असणारा निर्ल्लजपणा आपल्यात नाही. त्यामुळे आक्वर्ड वाटत होत. शेवटी तिच्या खांद्यावर ठेवलेला हात देखील बाजूला काढून घेतला थोडासा अंतर ठेवून बसलो. मागून काही शाळेतली मुल जात होती त्यांनी कमेंट्स मारल्या. आपणपण शाळेत असताना असाच तलावाच्या झाडीत लपलेली जोडपी बघून शिट्ट्या मारायचो हे आठवलं च्यायला वेळ आपल्यावर पण येऊ शकते. तसं तलावाची झाडी काय जास्ती रोमांटिकजागा नव्हती , कुठून काय येऊन चावेल याचा भरोसा नव्हता त्यात हि बया काहीच बोलेना नुसता पाण्याकडेच बघत बसलेली. भेन्चोद शहरात एक जागा नाही आहे शांतपणे जिथे काही करता येईल. घरी जाण्याच प्रश्नच नव्हता कारण आई घरी होती. मला भूक लागली होती म्हणून तिला घेऊन मी तिसर्या मजल्यावरच्या एका हॉटेलमध्ये गेलो. दोघांसाठी पावभाजी मागवली. ती कोणत्याच बाबतीत काहीच आग्रही नव्हती . सगळ माझ्या कलान घेत होती, मला नक्की प्रकरण आहे ते कळत नव्हत . फोनवर बोलत होतो त्यावरून अंदाज आला होता कि पोरगी कामातून गेलेली आहे हिंदी फिल्म्सचा भयानक प्रभाव पडला आहे तिच्या डोक्यावर वेगैरे, . पावभाजी खाल्ली. ती कमीच खात होती नाहीतर बाकीच्या मुली बकासुरासारख खाऊन मीटर पाडतात. हिचा तसा काय हेतू नव्हता. टिपिकल चांगल्या घरातली मराठी मध्यमवर्गीय मुलगी.
हॉटेल मधून बाहेर येताना ती बोलली “कुठेतरी अंधार असेल अश्या ठिकाणी जाऊ”. भर दिवस अंधार एकाच ठिकाण असतो ते म्हणजे थिअटर .जवळच्या मल्टीप्लेक्स मध्ये घेऊन गेलो . ५०० रुपयाची तिकीट काढली. मला आणि बहुधा तिलाही पिच्चर बघण्यात खास काही इंटरेस्ट नव्हता . तिकीट देणारी बाईपण हरामखोर होती. कोपर्यातली तिकीट पाहिजेत का अस विचारलं मी होय बोललो.
आम्ही आत जाईपर्यंत पिच्चर सुरु झाला होता. अंधार असल्यामुळे मी पुढे गेलो आणि तिच्या हात धरून आमच्या कोपर्यातल्या सीट पर्यंत आलो. एकदाचा बसलो. मी पिच्चर बघत होतो आणि आणि तिच्याकडे बघत होतो. ती एकदम शांत बसली होती . तीन चारदा मी तिच्या कानात सांगितलं कि पिच्चर बोर आहे पिच्चर बोर अहे. तीपण होय म्हंटली पण आमच काय प्रकरण पुढे जाईना .इंटर्वल मध्ये बाहेर गेलो मिरिंडा ची मोठी बाटली घेतली, इंटर्वल नंतर आता एकही सेकंद वेस्ट नाही करायचा अस ठरवलं. बाजूच्या दोन अंकल लोक समजूतदार पणा दाखवत स्वताहून पुढच्या रांगेत बसले. दोन रांग सोडून समोर एक नवरा एक बायको आणि त्यांची तीन-चार वेगवेगळ्या वयोगटाती मुल अस कुटुंब बसल होत , आजूबाजूचे लोक गेले भाडमध्ये . काहीतरी सांगायचं नाटक करत करत तिच्या तोंडासमोर तोंड आणल तिच्या डोळ्यात बघितलं थेटीअर मधल्या अंधारात देखील तिचे डोळे चमकले मी डायरेक्ट तिच्या ओठांवर ओठ ठेवले हिंदी इंग्लिश फिल्म मध्ये दाखवतात तसला काय करंट वेगैरे बसला नाही . मला वाटल आपल काहीतरी चुकतंय मग मी खालचा ओठ चोखणे आणि वरचा ओठ चोखणे अश्या कसरती केल्या. डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तर ती डोळे बंद करून कडू औषध गिळल्यासारख तोंड करत होती .तिच्या ओठांची चव मात्र वेगळी होती, लीपलायनर लावला असावा. ओठांच्या एवढे सगळे केल्यानंतर नक्की किस केल्यावर काय परमानंद मिळतोय हे कळाल नाही.सगळे बघितलेल्या पिच्चरमधले किसिंग सीन, पोर्नचे नोलेज पणाला लावले. तिने माझा ओठ चावला नंतर हात धरून बाजूला केल माझ्या डोळ्यात बघितल तेव्हा तिच्या डोळ्यातले भाव बदलेले होते, एक्सायटेड दिसत होती . दोन, तीन वेळेस असच किस केल. अंगाच तापमान वाढल होत माझ्या आणि तिच्याही. कधीही ताप येईल अस वाटत.शेवटी शांत झालो. व्यवस्थित होऊन गप्प बसलो. मग तिने हात हातात धरला आणि माझ्यावर कलंडून बसली. मला म्हणाली मघाशी पावभाजीबरोबर खालेल्या कांद्याचा वास अजून माझ्या तोंडाला येत आहे. मलापण थोड घाणेरड वाटल दुसर्याच्या तोंडात तोंड घालायचं म्हणजे काय ?आणि ते पण दोन तासापूर्वी हिला आपण आयुष्यात पहिल्यांदा भेटलोय काहीच माहिती नाही आहे हिच्याबद्दल . थोड्यावेळाने माझ्यातला पुरुष परत जागृत झाला . मी तिला बोललो मला तुझे हार्ट बिट्स ऐकायचे आहेत. एका सेकंदात तिने तिच्या हातानी माझा हात तिच्या बूब्स वरती ठेवला तिच्या ब्राच्या पट्ट्यांचा स्पर्श मला जाणवला तो एक मांसल गोळ्यासारखा प्रकार.पहिल्यांदाच एका पोरगीच्या स्तनाला हात लावून अनुभवत होतो . पण टोप अंगावर असल्यामुळे काही सुखद इरोटिक वाटल नाही. मी टोप मधून आत हात घालायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली आता काय इथे कपडे काढायचे आहेत का आपण?
त्यानंतर जास्ती काय केल नाही. एक दोनदा परत किस घेतला पण मला उलट नंतरनंतर नको वाटायला लागल. ती थोडी लहान पण आहे अस वाटत होत. एकदम नैतिक गोंधळ झाला होता ,पण मी फारसा नैतिक माणूस नसल्यामुळे मी काय एवढा विचार करत बसलो नाही . पिच्चर संपला बाहेर आलो. तिला पटकन बस मध्ये बसवून दिल.

घरी आल्यावर मला थोडा ताप आल्यासारखा वाटल.
नंतर आम्ही फोनवर वेगैरे अधून मधून बोलायचो.एकदा घरी कुणीच नव्हत मी तिला बोलावलं. सकाळी सकाळी जाऊन मी लांबच्या मेडिकल दुकानातून कंडोम घेऊन आलो होतो. टीवीवर जाहिराती बघून आय पिल माहिती होती पण आय पिल मिळाली नाही म्हणून मेडिकलवाल्याने अनवान्तेड ७२ सुचवली होती. हि सगळी खरेदी एका मित्राला बरोबर घेउन केली. पहिल्यादाच कंडोमचे एवढे ढीगभर ब्रांड आणि फ्लेवर असतात हे कळाल. मेडिकल वाले लोक पण साले एकदम प्रोफेशनल असतात. ते त्यातल्या कंडोमचे डोटेड आणि काय काय डीटेल्स सांगत बसले. मी पटकन मिळेल दहा बारा बॉक्सेस पैकी ज्याच्यावर एकदम जबरदस्त चित्र होत असाल कंडोम घेऊन आलो. घरात आठ दिवस झाल एकटाच होतो. कुणी बोलायला देखील नव्हत. हॉटेल मधून जेवण देखील पार्सिल घरीच घेऊन आलो. यावेळेस तिने गुलाबी टॉप घातला होता आणि काळी जीन्स. अंगाला परफ्युमचा वास येत होता. आम्ही टीवी बघत बघत जेवलो. नंतर बेडरूम मध्ये गप्पा मारत बसलो मी तिला कीस करायचा प्रयत्न केला पण तिने मला लांब ढकलला अजिबात काहीच करू देईना. शेवटी डोक दुखायला लागल म्हणून ती चक्क झोपली. मी तिच्या बाजूलाच झोपलो. तिला मिठी मारली याबद्दल तिची काही तक्रार नव्हती. थोड्यावेळाने ती जागी झाली आणि वापस जायचं म्हणून बेडरूम मध्ये जाऊन केस वेगैरे व्यवस्थित करू लागली . मी पण तिच्या मागोमाग गेलो . ड्रेसिंग टेबलच्या आरश्यात बघून फोटो काढले . मी तिला तिथेच पडलेल आईच मंगळसूत्र घातलं. मी तिच्या चेहऱ्यावर किस करत होतो पण ओठाच्या आसपास जरी पोचलो तरी लांब ढकलायची. बर्याच झटापटीनंतर ती मिठीत आली . मी ड्रेसिंग टेबल च्या मोठ्या आरश्यासमोर होतो ती माझ्या मांडीवर बसली होती. मी तिला घट्ट धरून ठेवलं तिचे हात माझ्या मानेभोवती होते. थोडे सैल होते. आरश्यामधल्या माझ्याच तिच्या मिठीमाधल्या प्रतीबिम्बाकडे बघत असताना अचानक मला रडायल आल सगळ्या सेक्शुअल फिलिंग्स गेल्या. एकदम आवंढा गिळला. तिला कळू दिल नहि. थोड्यावेळाने आम्ही एकमेकांच्या मिठीतून बाजूला गेलो . इतक्या दिवसाच एकटेपण कुणासोबत तरी वाटत आहे अस वाटल . आपण सहसा कधी जास्ती इमोशनल वैगेरे होत नाही पण आठ दिवस मी हॉटेल मधला वेटर सोडला तर दुसर्या कुणासोबत बोललोही नव्हतो. बराच वेळ न बोलता तसेच पडून राहिलो आरश्यात बघत. शेवटी ती बोलली “तुला जे पाहिजे आहे ते मी देऊ शकत नाही कारण तुझ्यावर माझा अजून विश्वास नाही आपण आता कुठ फ्रेंड्स बनतोय आज तू जे काही वागलास ते काय मला पटल नाही “ मी काहीच बोललो नाही तोंडातून शब्दच फुटत नव्हता . अस असू शकता का कि ज्या व्यक्तीला आपणफारस काही ओळखत नाही एकदम शरीरच्या वासनेनेच बघतो तीच व्यक्ती खूप जवळ आल्यावर अचानक इमोशनल होतो का माणूस? मला तीच शरीर सोडून बाकी काहीच खास आवडलं नव्हत. ना तिचे आणि माझे विचार जुळत होते , ना आमचे इंटरेस्ट सेम होते. मी एकदम स्वार्थी , धूर्त , कावेबाज हेतू ठेवून तिच्यासोबत जमेल तेवढ गोड गोड वागत होतो. माझा हेतू इतका क्लीअर असला तरी मग मला रडायला का याव?तिच्या मिठीमध्ये असताना आईचीच आठवण आली. खूप वर्षापूर्वी लहान असताना आईच्या मिठीमध्ये शांत उबदार झोप लागायची तसाच काहीस वाटल होत. मी उठून सगळ आवरलं आणि तिला तिच्या घरी सोडून आलो . कंडोमच पाकीट वय गेल. नको त्या वेळेस नको त्या ठिकाण आपल्या इमोशन्स वरती येतात. जवळपास ती तयार झाली होती आणि मी रडून मूडच घालवला , किंवा मला मुलीना कन्विन्स करता आल नव्हत जर तिला काही करायचच नव्हत तर मग ती आपल्यला का भेटते कारण भेटल्यावर आम्ही काही खास बोलत पण नाही आमची साधी मैत्री पण नाही. सपोज आमच्यात सेक्स झाला आणि ती बोलली कि लग्न करूया तर ते तर शक्य नव्हत कारण ती मला लग्न करण्याइतकीपण चांगली नाही वाटली .
त्यानंतर ती मला एकदाच भेटली. आम्ही दोघ पिच्चरला गेलो सेम कोपर्यातल्या सीट्स होत्या. पण मी तिच्यापासून बराच अंतर ठेवून बसलो. ती तिच्या वाढलेल्या नखांनी माझ्या होतावर रांगोळी काढत बसली होती. मी काहीच रेस्पोंड करत नव्हतो. पिच्चर संपला आम्ही एका इराणी हॉटेल मध्ये गेलो. शांतपणे बसलो.ती बोलली मी आहे तशी मला अक्सेप्ट ,कर मी अशीच आहे मला जास्ती बोलायला आवडत नाही, मला बाकीच्या मुलींसारख राहता येत नाही किंवा मी एवढी अफाट सुंदरपण नाही आहे. मी तिला सांगितलं कि “तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत नाहीस कि तुझ्यासोबत लग्न कराव”
आता भेन्चोद “मला अक्सेप्ट कर” यावर मी काय उत्तर द्याव हे मलापण कळत नव्हत. साला मी स्वताच काही झ्याट सेटल नव्हतो. आणि लग्न वेगैरे विचार करण तर हास्यास्पदच होत. मुली लहान वयात बर्याच मच्यूर होतात. लग्न वगैरे करायला लागणार हे सगळ गृहीत धरलेलं असता त्यांनी. आपण कधी एवढा विचार करत नाही. या भेटीत मला तिच्यातला एक फरक जाणवला नेहमी जीन्स, स्कर्ट घालणारी ती आज मस्त पिवळ्या कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती. केस वैगेरे व्यवस्थित बांधून, मी तिच्या फक्त रूपाच्या मोहात पडलो होतो. पण तेही तितक खर नव्हत. नाहीतर त्यादिवशी तिच्या मिठीमध्ये असताना कसला आवेग आला होता याला काही उत्तर नव्हत. मला तिला पुन्हा पुन्हा भेटाव अस वाटत होत पण आतून माहित होत ती आता मला पुन्हा कधी भेटणार नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर कायमसाठी संबध संपवण किती अवघड असत सगळे प्रश्न कसे अनुत्तरीत राहतात.मला एकदम कोरड कोरड वाटत असताना ती मला अचानक भेटली होती. तिच्यायेण्या आधी मी असा कुणाच्या मिठीत जाऊन रडलो वैगेरे नव्हतो. म्हणजे कळायला लागल तेव्हापासून कधी खास रडल्याच आठवतच नाही. रडणे म्हणजे बायकांचं लक्षण अस मनावर ठसवून घेतलं होत. पण तेच एका बाईच्या समोर रडायला येणे म्हणजे अतीच झाल. शरीर आणि मनाच्या मध्ये पण काहीतरी नात असू शकत याची जाणीवदेखील तेव्हाच झाली. फारसा काही रोमान्तिक न वाटता सगळ शरीराच्या थ्रू एक्स्प्रेस झालो होतो. मे बी तिची काही दुखः असतील ती माझ्या एकाटेपणासोबत रेजोनेट होऊन मला आणि तिला एकाच वेळेस रडायला आल असाव.पण मला कधीही शंका वाटली नाही ती त्यादिवशी रडत होती आणि बहुधा तिलादेखील माहित नसाव कि मी त्यादिवशी ब्रेकडाऊन व्हायच्या मार्गावर होतो.आता तिचा चेहरा देखील आठवत नाही पण मोकळ झाल्यासारखं रडायला येण मात्र कायमसाठी बंद झाल.

Node read time
9 minutes
9 minutes

ग्रेटथिंकर Tue, 11/02/2014 - 09:09

अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट मत दिल्याबद्दल आभार.
ते वक्ष वगैरे जे काही लिहले आहे तशीच मानसिकता स्त्रीयांची पुरुषाविषयी असते ,फक्त ती सेक्स्युअलि मोटीवेट नसते. ''पुरुष कंप्लिट पॅकेज आहे का ,फायनान्शियली सोशली etc.. त्यातल्या त्यात फायनाशियली..हे बघितले जाते .. बघण्याची प्रवृत्ती असते .
पैसेवाल्या पुरुशावर स्त्रीया भाळतात याचे कारण तो टोटल पॅकेज ठरु शकतो, फक्त आकर्षक दिसणार्या परंतु आर्थिकदृष्ट्या मागास पुरुषाला बायका हिंग लावुनही विचारत नाहीत ,पुरुशाचं वस्तुकरण स्त्री करतच असते .फक्त सेक्श्युली नव्हे ,तर इतर सर्व स्तरात. पुरुष स्त्रीवर निर्व्याज प्रेम करु शकतो परंतु बहुतांश स्त्रीया तसे करु शकत नाही याचे कारण सेक्स लग्न लिव्ह इन याकडे त्या प्लेजरऐवजी व्यवहार म्हणून बघतात वा तसे बघावे यासाठीच त्यांची सायकोलॉजी उत्क्रांत झाली आहे.

सुशेगाद Tue, 11/02/2014 - 20:15

In reply to by ग्रेटथिंकर

स्त्री आणि पुरुष दोन्ही एकमेकांच वस्तूकरण करत असतात आणि त्यात काही अयोग्य नाही असा निष्कर्ष या चर्चेमधून निघतो आहे अस वाटत.

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 02:05

In reply to by रुची

सपोज कि तुम्ही एलिअन आहात. तुम्ही पृथ्वीवर नवीन आला आहात. आताच तुम्ही ऐसी वर लॉग इन केले आणि या लेखाच्या प्रतिक्रिया वाचल्या तर तुमचा काय निष्कर्ष निघेल? स्त्री आणि पुरुष एकमेकांच वस्तूकरण करतात असाच ना? जर तस असेल तर ते उघडपणे मान्य करण्यात कमीपणा कसला? उलट हीच जाणीव प्रगल्भतेकडे घेउन जाऊन स्त्रिया जास्ती मोकळेपणाने विचार करू लागतील ,वावरू लागतील . होप सो.

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 02:42

In reply to by 'न'वी बाजू

मी एक एलिअनवादी मनुष्याच्या दृष्टीकोनातून विचार करू पाहतो. तुम्ही दुसर्या ग्रहावर गेला आणि तिहे असे एकाच स्पेसीज चे दोन वेगवेगळे घटक स्त्री आणि पुरुष टाईप असते तर काय विचार केला असता?

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 03:16

In reply to by Nile

एलिअन लोकांना तसा फरक पडायला नाही पाहिजे पण सर्व प्रतिक्रिया वाचल्या तर पडेल.
माणूस हाच सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी आहे पृथ्वीवर असे आपण मानू आणि मनुष्य विषयीच बोलू.

शहराजाद Tue, 11/02/2014 - 21:57

In reply to by ग्रेटथिंकर

फक्त ती सेक्स्युअलि मोटीवेट नसते.

आपले स्र्तियांच्या लैंगितेविषयीचे ज्ञान फार म्हणजे फारच तुटपुंजे दिसते.

फक्त आकर्षक दिसणार्या परंतु आर्थिकदृष्ट्या मागास पुरुषाला बायका हिंग लावुनही विचारत नाहीत

आणि अनुभवही तुटपुंजा दिसतो.

पुरुष स्त्रीवर निर्व्याज प्रेम करु शकतो
परंतु बहुतांश स्त्रीया तसे करु शकत नाही

(हास्याचा प्रचंड स्फोट)

याचे कारण सेक्स लग्न लिव्ह इन याकडे त्या प्लेजरऐवजी व्यवहार म्हणून बघतात वा तसे बघावे यासाठीच त्यांची सायकोलॉजी उत्क्रांत झाली आहे

आपणच वर दिलेल्या संशोधनलेखातील निरीक्षण बघा- शरीर्सुखाची इच्छा आणि लैंगिक वर्तन याबाबतीत स्त्रीपुरिषांची समान टक्केवारी आली.

आपले स्त्रीविषयक अनुभवविश्व इतके कमालीचे मर्यादित दिसते की त्याबद्दल
आपली कीव येऊ लागली आहे.
स्त्रीवादी, मुक्त-स्त्री, मानसशास्त्रज्ञ, इत्यादी लोक राहू दे बाजूला. पण चारचौघांसारख्या सामान्य माणसांना असणारी निखळ स्त्रीत्वाची ओळख आपल्याला दिसत नाही.

आपण कुठल्याही प्रतिवादाला उत्तर देत नाही. कारण प्रतिवादातिल मुद्द्यांना उत्तर देणे आपल्याला झेपत नसावे. आपले उत्तर हे प्रतिवादातील माहितीला नसून, आपण आधी म्हटलेलेच केवळ वेगळ्या शब्दात मांडणे असते. त्यामुळे नव्या प्रतिसादांना उत्तर देण्यात काहीच अर्थ नाही.

(धागा खाली जाऊ लागला की ) आपण मधूनच एक नवा प्रतिसाद देता, तेच तेच म्याटर, फक्त शब्द बदलून. म्हणजे मागच्या प्रतिवादांती माहिती/ मुद्द्द्यांकडे तुम्ही अत्यंत सोयीस्करपणे केलेले दुर्लक्ष मागे पडून लोक तुमच्या (त्याच त्या) नव्या प्रतिसादातला अर्थहीनपणा पाहून थक्क होतात. शिवाय खाली जात असलेला धागाही वर येतो.

ग्रेटथिंकर Tue, 11/02/2014 - 22:07

In reply to by शहराजाद

काय आहे ना, कि स्त्रीला पुरुशाच्या बरोबरीत नेऊन ठेवताना 'नीओफेमिनीस्ट' कॉमन सेन्स ,दैंनंदीन अनुभव ,वैज्ञानिक विदा या सगळ्याला फाट्यावर मारत असतात.. त्यात असे निओफेमिनीस्ट जर पुरुष असतील तर बायकांच्या मुद्द्याला समर्थन देताना बेभान होतात , इथेही तेच चालू आहे ,प्रस्तुत अनुभवी लेखक माझ्या मुद्द्याला समर्थन देतोय ....सबब आपला अनुभव तोकडा आहे काय याचे चिंतन करा,
असो.

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 15:15

In reply to by शहराजाद

निखळ स्त्रीत्वाची ओळख काय आहे हे स्पष्ट केलत तर प्रस्तुत विषयावरती आणखीन चांगली आणि मोकळी चर्चा होऊ शकते.

रुची Tue, 11/02/2014 - 22:14

In reply to by ग्रेटथिंकर

माझे मत प्रामाणिकच आहे पण तुम्ही जे काही म्हणता आहात त्याच्याशी त्याचा काडीचाही संबंध नाही. बाकी शहराजाद यांनी दिलेल्या प्रतिसादापलिकडे मला म्हणण्यासारखे काहीच दिसत नाही. शक्य असल्यास स्त्रीची लैंगिकता, भावनिक गरजा, व्यक्ती म्हणून असलेली ओळख आणि त्याबद्दल असलेले तुमचे पूर्वग्रह विज्ञानाच्या कसोट्यांवर पडताळून पहा आणि आपले अनुभव थोडे समृद्ध करून पहा इतकेच प्रामाणिकपणे म्हणेन.

नितिन थत्ते Wed, 12/02/2014 - 11:02

"त्या अमक्या तमक्याने बायकोला घटस्फोट दिला. तिला करिअर करण्यात इंटरेस्ट होता म्हणे. हे काय योग्य कारण आहे का घटस्फोट द्यायला?"
"पण लग्ना आधी तसं स्पष्ट ठरलं असेल तर? आम्हाला हाउस मॅनेजरच हवी आहे असं..."
"तरी काय झालं? केली नोकरी तिने तर काय बिघडलं?"
.
.
.
.
.
"समजा आधी ठरलं असेल की ती नोकरी करणार. लग्नानंतर नवरा जर नोकरी करायची नाही असं म्हणू लागला तर? तिने घटस्फोट घ्यावा का?"
".............."

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 15:11

काही मुद्दे मला ठळकपणे जाणवले ते सांगतो
१. भारतात मुलींवर सेक्स हि एक घाणेरडी गोष्ट आहे असे संस्कार केले जातात(मोस्ट ऑफ द घरांमध्ये तरी)
२. काही सज्ञान मुली जेव्हा त्यांच्या लैंगिक भावना एक्स्प्लोर करायचा प्रयत्न करतात तेसुद्धा अगदी गुप्तपणे लपून अश्या मुलीना वाईट चालीची ठरवलं जात.
३.स्त्रिया स्वताच स्वताच वस्तूकरण करण्यात पुढे असतात उदाहरणार्थ टीवी वरचे सिरिअल्स बघा(बायकाच बघतात सिरिअल्स आवडीने) , जाहिराती बघा-शेविंग ब्लेड च्या जाहिरातीत स्त्री कशाला दाखवतात हो?)
४. एकूणच एक संस्कृती(सिविलैजेशन) म्हणून भारतात काळ कुठलाही असो स्त्रियांचं वस्तूकरण हे केलच जायचं, आता स्त्रिया बाहेर पडून बर्याच गोष्टी पुरुषांच्या बरोबरीने करत आहे त्यामुळे त्यासुद्धा पुरूषांच वस्तूकरण करत आहेत.

मी Wed, 12/02/2014 - 15:30

In reply to by सुशेगाद

१. भारतात मुलींवर सेक्स हि एक घाणेरडी गोष्ट आहे असे संस्कार केले जातात(मोस्ट ऑफ द घरांमध्ये तरी)

असे संस्कार होतात कि केले जातात? नक्की कसे घडते? हि एक घाणेरडी गोष्ट आहे असे स्पष्ट सांगितले जाते का?

२. काही सज्ञान मुली जेव्हा त्यांच्या लैंगिक भावना एक्स्प्लोर करायचा प्रयत्न करतात तेसुद्धा अगदी गुप्तपणे लपून अश्या मुलीना वाईट चालीची ठरवलं जात.

सहमत.

३.स्त्रिया स्वताच स्वताच वस्तूकरण करण्यात पुढे असतात उदाहरणार्थ टीवी वरचे सिरिअल्स बघा(बायकाच बघतात सिरिअल्स आवडीने) , जाहिराती बघा-शेविंग ब्लेड च्या जाहिरातीत स्त्री कशाला दाखवतात हो?)

हे विधान पुरुषांनाही लागू पडेलच. मुद्दा लक्षात आला नाही. आक्षेप कशाला आहे?

४. एकूणच एक संस्कृती(सिविलैजेशन) म्हणून भारतात काळ कुठलाही असो स्त्रियांचं वस्तूकरण हे केलच जायचं, आता स्त्रिया बाहेर पडून बर्याच गोष्टी पुरुषांच्या बरोबरीने करत आहे त्यामुळे त्यासुद्धा पुरूषांच वस्तूकरण करत आहेत.

इथेही मुद्दा लक्षात आला नाही, नक्की आक्षेप कशाला आहे?

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 15:39

In reply to by मी

१. भारतात मुलींवर सेक्स हि एक घाणेरडी गोष्ट आहे असे संस्कार केले जातात(मोस्ट ऑफ द घरांमध्ये तरी)

असे संस्कार केले जातात. आपोआप होत नाहीत. सेक्स हि घाणेरडी गोष्ट आहे स्पष्ट सांगितले जाते किंवा अश्या गोष्टीबद्दल कोणी बोलतच नाही.

३. मुद्दा असा आहे कि स्त्रियांनी स्त्रियांचं वस्तूकरण करणाऱ्या गोष्टींचा निषेध केला पाहिजे किमान वैयक्तिकरीत्या तरी घरात त्या भंकस सिरिअल्स बघू नये , महिला आयोगवाले काय झोपलेले असतात काय? काय वाट्टेल ते दाखवतात टीवीवर महिला पण ते एकदम चवीने बघत असतात. मला कधी कधी त्यांची विचार करायची क्षमताच संपून गेलीये कि काय अस वाटत.

४. ज्या स्त्रिया पुढारलेल्या आहेत त्या पुरूषांच वस्तूकरण करतात.एवढाच मुद्दा आहे.

मी Wed, 12/02/2014 - 16:09

In reply to by सुशेगाद

असे संस्कार केले जातात. आपोआप होत नाहीत. सेक्स हि घाणेरडी गोष्ट आहे स्पष्ट सांगितले जाते किंवा अश्या गोष्टीबद्दल कोणी बोलतच नाही.

स्पष्टपणे सांगितले असेल तर कौतुकास्पद आहे, ते गैर आहे किंवा नाही हे सापेक्ष आणि समाजचौकटीवर अवलंबून असु शकते. कोणी बोलतच नसल्यास ते त्रासदायक असले तरी त्याचा अर्थ 'तुला पाहिजे ते अर्थबोधन तु करुन घे(स्वातंत्र्य), आम्हाला विचारू नको' असे होते.

मुद्दा असा आहे कि स्त्रियांनी स्त्रियांचं वस्तूकरण करणाऱ्या गोष्टींचा निषेध केला पाहिजे किमान वैयक्तिकरीत्या तरी घरात त्या भंकस सिरिअल्स बघू नये , महिला आयोगवाले काय झोपलेले असतात काय? काय वाट्टेल ते दाखवतात टीवीवर महिला पण ते एकदम चवीने बघत असतात. मला कधी कधी त्यांची विचार करायची क्षमताच संपून गेलीये कि काय अस वाटत.

तुम्ही कुठल्या जाहिरातीविरुद्ध तक्रार/जनहितार्थ याचिका दाखल केली आहे काय? चवीने बघतात आणि वैचारीक क्षमतेवर विद्याअभावी टिप्पणी करण्यास मी असमर्थ आहे.

ज्या स्त्रिया पुढारलेल्या आहेत त्या पुरूषांच वस्तूकरण करतात.एवढाच मुद्दा आहे.

आपण अंशतः(!!) भांडवलशाही मान्य देशात रहातो, महिला वस्तुकरण करतात हे मान्य केले तरी मग तुमचं म्हणणं काय आहे? त्यानी तसे करु नये काय?

सुशेगाद Wed, 12/02/2014 - 16:20

In reply to by मी

टीवी वर काय वाट्टेल ते दाखवल तरी मला काही फरक नाही.
माझ्यापुरता मी ते बघन थांबवू शकतो. मी कुठली याचिका आणि काय दाखल केल , नाही केल असले हे वैयक्तिक प्रश्न नाही विचारले तर बर राहील.
भांडवलशाही देशात स्त्री-पुरुष एकमेकांच वस्तूकरण करणारच असतील तर मग स्त्रियांनी किंवा पुरुषांनी आमच वस्तूकरण केल ,वस्तूकरण केल अस म्हणून बोंबाबोंब करूच नये.

मी Wed, 12/02/2014 - 16:34

In reply to by सुशेगाद

तुमची (भावनिक?) प्रतिक्रिया आणि महिला आयोगाच्या कार्याबद्दल तुम्ही शंका घेतल्याने तुम्हाला फरक पडतो असे मत तयार झाले होते, असो. टिव्हिकडे जसे तुम्ही सोयिस्कर दुर्लक्ष करु शकता तसे बोंब मारणार्‍या बायकांकडे दुर्लक्ष का करु शकत नसावेत असा विचार आला, पण तो प्रश्न तुमच्यासाठी नाही.

नगरीनिरंजन Sat, 28/02/2015 - 12:06

In reply to by सुशेगाद

ज्या स्त्रिया पुढारलेल्या आहेत त्या पुरूषांच वस्तूकरण करतात.

नाही हो, ती त्यांची जनुकीय प्रेरणा असते. असे ऐसीवर "सिद्ध" झाले आहे. :-) तुम्ही तुमच्याच लेखाखालची चर्चा वाचत नाही म्हणजे जरा विचीत्रपणाच झाला.

बॅटमॅन Sat, 28/02/2015 - 23:21

In reply to by नगरीनिरंजन

अगदी अगदी. पुरुषांनी केलेले ते वस्तूकरण आणि स्त्रियांची ती जनुकीय प्रेरणा. वैदिक विमानांच्या तोडीचा निष्कर्ष आहे खरा.

मन Wed, 12/02/2014 - 20:00

हा प्रतिसाद क्रमांक २९१

अतिशहाणा Thu, 13/02/2014 - 01:43

In reply to by बॅटमॅन

ह्यो घे आजून एक. मात्र एकंदर लेखकाने मुलीला विचित्र म्हणावे याचे आश्चर्य कुणालाही वाटले नाही याचे मला आश्चर्य वाटले.

सुशेगाद Thu, 13/02/2014 - 02:20

पहिल्याच भेटीत अंधारात जाऊ म्हणून कीस करते. दुसर्या भेटीत सगळी तयारी असताना काही करू देत नाही. तिसर्या भेटीत डायरेक्ट लग्नच बोलते.
अश्या मुलीला विचित्र नाही म्हणणार तर काय? दुसर काय विशेषण आहे?चंचल?

Nile Thu, 13/02/2014 - 02:41

जो तिनशेवा प्रतिसाद देईल त्याच्या म्हशीला टोणगा!!

बॅटमॅन Thu, 13/02/2014 - 02:44

In reply to by Nile

आहू! आहू!! आहू!!!

(बॅटगा).

एसमाळी Sat, 15/02/2014 - 15:10

कथानक वाचुन गोंधळात पडलो .लेखकाला काय म्हणायच कळाले नाही . प्रतिसाद वाचुन गोंधळात भर पडली .
यांनाही काय म्हणायच ते कळेना . तस्मात आणखीन काही काळ वाचनमात्रच राहतो .

सुशेगाद Thu, 26/02/2015 - 00:16

Thanks guys I have learned so many things on this thread.

रेड बुल Thu, 26/02/2015 - 15:32

सर्वप्रथम आपण लेख नसुन अनुभव लिहला आहे असे मानुन हे सुमार वगैरे मानण्यात कैसलाच हासिल नाही असे मला वाटते.

प्रत्यक्षात जे घडते ते असेच. ती विचीत्र मुलगी नक्किच फार एकटं फिल करत होती त्यातुनच अंजाचा आधार तिने घेतला. एकटेपण बरेचदा मिनींगलेस लाइफचे टेंप्टेशन निर्माण करु शकतो अशावेळी समाजात मिसळणे अथवा स्वभाव नसताना इतर समवयस्कांसारखे वागायला जाणे अशा गोष्टीघडत असतात. म्हणूनच ती तुम्हाला भेटायला आली भलेही तिचे मन अशा जगण्यात रमत नसेल अथवा तुमच्याशी भेट्न झाल्यावर तिच्या अपेक्षांना तुम्ही उतरले नसाल. पण एकटेपण तुम्हला अशा नकारात्मकतेची योग्य हाताळणी करु देत नाही. बट आय अ‍ॅप्रीशीएट हर फॉर नॉट हॅवींग सेक्स विद यु. तिच्या मनात अशी द्वंद चालु असतान तुमच्यात इम्रान हाशमीचा जरी संचार झाला असता तरी तुम्हाला आनंद निर्माण करता आला नसता.

आपण अनुभव शेअर केल्याबद्दल आनंद वाटला. लिहीत रहा. जसं च्या तस लिहीणं बरेचदा इतरांमधे विचीत्र फिलींग निर्माण करते. पण आपलाअनुभव वाचुन मी सुधा एक अनुभव शेअर करतो ज्याला जे वाटायचे ते त्याने वाटुन घ्यावे. मी स्टेलोन, श्वारझेनेगर, वॅन्डॅम वगैरे बघत मोठा झालो.. तसेच तोकाळ पॉर्न हे हायस्कूल संपल्याशिवाय हातात पडण्याचा न्हवता. त्यामुळे आठवी पासुनच ती भुक चोरुन मॉर्नीग अ‍ॅडल्ट शो बघण्यात भागवली जात होती (मायला एकदा तर एनसीसी ड्रेसवरच गेलो होतो थेट्रात) उदा. लोला, मिस इल्के, हार्ड टारगेट्, टोटलएक्सपोजर, लेडी टर्मीनेटर, बेडरुम आइज, हार्ड हंटेड गर्ल्स. ह्या त्यावेळच्या काही नामोल्लेख करण्याजोग्या कलाकृती. कलाकृती अशासाठी के त्यातली द्रुश्येपॉर्न प्रमाणेचित्रीत सरसकट समागम पध्दतीने चित्रीत केलेली नसुन कलात्मक, ड्राम्याटीक पध्दतीने चित्रीत केलेली असतं. त्यामुळे अनेकदा सुरुवात होरो हिरवीणीला पॅशनेट लगट करताना (स्वतःच्या)कमरेपर्यंत उचलुन किसींग करत करत टेबलावर , स्वयंपाकघरात , बेडरुमधे न्हेउन आदळतो अथवा तसेच उचलुन भिती पर्यंत सरकत जात तिथेच हिरीवीणीच्या पाठीला भितीचा आधार देत व तिच्या पायांची मिठी आपल्या कमरे भोवती घट्ट करुन(हे काम तिने केलेले असते) उभ्या उभ्याने पुढे काम जोशाच चालु ठेवतो असे सिन बरेचदा असत. एकदम फेवरीट पध्दत होती आपल्यासाठी. हा प्रकारच भयानक लस्टफुलरोम्यांटीक अन एनर्जेटीक वाटायचा. नेहमीच.

तर किस्सा असा झाला प्रथमच ती आली होती, रुमवरचे सर्व प्राणी आता काही काळ नाहीत याचे टाइमिंग साधले होते, तिच्या सलवार अन पंजाबी ड्रेसमधे ती खुपच छान दिसत होती, पण प्रथमच जवळीक करत असल्याने व प्रचंड नर्वसनेस आल्याने पहिल्या चुंबनात फारच गोधळलो अन दाताने किसींग करायचा प्रयत्न करत होतो. खरचं काय करत होतो माझं मलाच समजत न्हवते. अर्थातच आपण म्हणता तसे लस्टफुल पॅशेनट काही फिलींग येइना.. मग मला सर्वात एक्साइट करणारा प्रकार अन तिला इंप्रेस करायचा शेवटचा पर्याय म्हणून मनोमन आपला फेवरीट सिन करायचे ठरवले. या कालावधीत ती बजावत होती की जास्त एक्सैईट न होता हळुवारपणे केले तर चुंबनात रंग येउ लागतो पण तो प्रणयसंस्कारच माझ्या बघण्यात कधी आलेलाच नसल्याने मी अतिशय जोषात जायचा प्रयत्न करत होतो. अन रामबाण उपाय म्हणून मी तिला जोषमधे अचानक सर्व शक्तीनीशी कमरेपर्यंत उचलले अन क्षणात भितींकडे सराकायचा मानस पुर्ण करायला सुरुवात करायच्या आत ट्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा दबकाच आवाज कानात घुमला... माझ्या आवेगाचे आणी तिच्या वजनाचे आणी पसरलेल्या पायांचे ओझे सहन न झाल्याने तिची सलवार पुढे पासुन मागे पर्यंत फाटली गेली. सुर्वात बहुतेक मधुन झाली असावी असे एवीडन्स सांगतो. बोंबला कसला रोमान्स अन असले काय मायला चित्रपटांमुळे बराच मिसगाइड झालो होतो. कोणी रुमवर उगवायच्या तिच्या साठी आता आख्खा ड्रेस विकत घेणे आले. ती जामच वैतागली. चिडली. तडक रुमबाहेर पडलो कुलुप ठोकले अन डेक्कनवर आलो, रस्त्यावर स्वस्तात एक ड्रेस विकत घेतला. मी स्त्रीवस्त्रही पहिल्यांदाच विकत घेत होतो म्हणून कमालीचा लाजेने चुर.... कोणी बघीतले काघेतो विचारले सग्ळीच पंचाइत... तसेच तडक रुमवर आलो तिला सलवारमधे गुंडाळली अन घरी पाठवण केली... आता मात्र तो प्रसंग आठवला की आपल्या वेडपटपणाचे फार कौतुक वाटुन अतिशय हासु येते.

गवि Thu, 26/02/2015 - 15:41

In reply to by रेड बुल

खतरनाक...

सुरुवात होरो हिरवीणीला पॅशनेट लगट करताना (स्वतःच्या)कमरेपर्यंत उचलुन किसींग करत करत टेबलावर , स्वयंपाकघरात , बेडरुमधे न्हेउन आदळतो अथवा तसेच उचलुन भिती पर्यंत सरकत जात तिथेच हिरीवीणीच्या पाठीला भितीचा आधार देत व तिच्या पायांची मिठी आपल्या कमरे भोवती घट्ट करुन(हे काम तिने केलेले असते) उभ्या उभ्याने पुढे काम जोशाच चालु ठेवतो असे सिन बरेचदा असत.

हे वाचताना अनेक चित्रपटदृश्ये डोळ्यासमोर येऊन गदगदून हसू यायला लागलं.. कसंबसं आवरुन आजुबाजूला नजर टाकत "मी वेड्यासारखा हसत नसून तो ठसका होता" असं इतर पब्लिकला दाखवत सर्व ठीकठाक आहे असं मानून पुढे वाचलं. पण हे राम पुढचा परिच्छेद ऊर्फ वस्त्रविच्छेद ऊर्फ वार्डरोब मालफंक्शन ऊर्फ म्याटिनी सिनेमांचे प्रात्यक्षिक वाचून मात्र वाईट्ट अन न लपवण्यासारखा हास्यस्फोट घडून आला.

मन Sun, 01/03/2015 - 15:36

In reply to by रेड बुल

पेप्रात एक तज्ञ डॉक्टर सदर चालवतात. सल्ले देतात.
त्याम्ना आलेल्या पत्राम्तील काही अनुभव, प्रश्नोत्तरे :-
http://www.mensxp.com/special-features/today/11918-humour-the-best-of-d…

वृन्दा Fri, 27/02/2015 - 00:25

कथा आज वाचली व आवडली. सुशेगद तुमचे लेखन आवडते विशेषतः "मेडिटेशन" ही कविता.
या कथेतही एक प्रांजळ वास्तव आहे अन पुरषांचा स्वभाव्/वृत्ती व स्त्रियांचीही छान अधोरेखित झालेली आहे.

अस असू शकता का कि ज्या व्यक्तीला आपणफारस काही ओळखत नाही एकदम शरीरच्या वासनेनेच बघतो तीच व्यक्ती खूप जवळ आल्यावर अचानक इमोशनल होतो का माणूस?

__/\__

कान्चिल Sat, 28/02/2015 - 05:56

लिखाण वाचून वाटल, 'एक विचित्र मुलगा' हे जास्त समर्‍र्‍पक शीर्षक ठरले असते.
आहो, लिखाणात मुलचां तऱ्हेवाइकंपणाचं जास्त दिसतो आहे!

अंतराआनंद Sat, 28/02/2015 - 08:25

जुनं लिखाण धागा वर काढल्यानं आता वाचलं.
मला या लिखाणात प्रमाणिकपणा जाणवला. सुरुवातीच्या काही प्रतिक्रिया वाचल्या. सुमार वैगेरे म्हणण्याईतकी भाषा उघडीवाघडी आहे असं मला तरी वाटलं नाही ( अर्थात जसा अनुभव तशी भाषा ती दवणीय वापरून अनुभवाचं भजं करायचं का? ) . एखाद्या नव्वदोत्तरी ( शब्द बरोबर आहे का माहीत नाही) कथा-लेखकाचं ( राजन खान? ) नाव खाली असतं तर कदाचित वाचक एवढ्या पटकन काही म्हणाले नसते.
नैतिकतेबद्द्ल बोलायचं तर ललित अंगाने लिहीलेला अनुभव वाचताना ती बाजूला ठेवता येत नसेल तर फक्त कायद्याची पुस्तकंच वाचावीत. ( बाजूला म्हणजे शेपरेट :) )

बॅटमॅन Sat, 28/02/2015 - 10:46

In reply to by अंतराआनंद

नैतिकतेबद्द्ल बोलायचं तर ललित अंगाने लिहीलेला अनुभव वाचताना ती बाजूला ठेवता येत नसेल तर फक्त कायद्याची पुस्तकंच वाचावीत.

क्या बात बोली है, जैसे बंदूक की गोली है.