एक विचित्र मुलगी
ती १८ वर्षाची मी २० वर्षाचा.
मी तसा व्यवस्थित साधा मुलगा होतो. बिडी , दारू कसलं व्यसन नव्हत. मुली म्हणजे वेगळ्याच स्पेसीज वाटायच्या. पहिला प्रेमभंग होऊन तीन चार पावसाळी कविता करून झाल्या होत्या. हळू हळू त्यातून बाहेर येऊन सेक्स बद्दल भयानक आकर्षण वाटायला लागल. ब्लू फिल्म्स वेगैरे बघून बराच नॉलेज वाढल होत. प्रत्यक्षात काही करायचा योग आला नव्हता. सुट्टीमध्ये मी होस्टेलवरून घरी यायचो पण आई आणि बाबा मोस्ट ऑफ द टाईम घरी नसायचे. त्यामुळे घरी मी एकटाच. मला असा वैताग वेगैरे यायचा नाही उलट मी तो एकटेपणा एन्जोय करायचो. कधीतरी वाटायचं कि कोणीतरी बरोबर असाव वेगैरे.मित्र होते पण ते तेवढ्यापुरतेच.
या सगळ्यात मी तिला भेटलो.
आयुष्यात जे काही घडत त्याची थोडीफार संगती लावायचा प्रयत्न आपण करतो पण काही घटना अश्या घडतात कि त्याची काहीच कुठेच संगती लागत नाही. काही आडव्या तिडव्या घटना घडतात आणि वरचेवर उगाच तुम्हाला आठवत राहतात. रस्त्याने चालता चालता गडबडीत माणस एकमेकांना धडकतात तशी ती मला भेटली होती. मी फक्त फोनवर तिचा आवाज एकला होता आणि बरच बोललो होतो. बर्यापैकी अल्लड होती. दुसरा काही इमोशनल गुंता करायचा नाही माझ्यापुरता मी क्लिअर होतो. पहिल्यांदा आम्ही भेटायचं ठरवलं. मी कुणाही नवीन व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर कायम हिरवा ती शर्ट घालून जातो कारण हिरवा रंग गर्दीत लांबून उठून दिसतो. मी तिला सांगितलं होत कि मी हिरवा शर्ट घातला आहे .मी गाडीवर तिची वाट बघत थांबलो होतो आणि लांबून बघितला तर बर्यापैकी स्मार्ट आणि सेक्सी मुलगी कानात पांढर्या कलरचे हेडफोन आणि ब्लक टॉप आणि जीन्स घालून येताना दिसली. मनातल्या मनात आनंद झाला म्हणजे दिसायला एकदम खराब तर नाही आहे. ती माझ्या गाडीच्या जवळ आली आणि मला नाव विचारला. तोपर्यंत आमचा फोन सुरुच होता.मी नाव सांगितलं तिला खात्री पटली आणि ती गाडीवर बसली. सिग्नल लागला होता . गाडीवर बसताना देखील ती बर्यापैकी चिकटून बसली होती. च्यायला म्हंटलं. गाडीवर आम्ही खास काय बोललो नाही. मी तिला माझ्या आवडीच्या कोल्ड्रिंक हाउस मध्ये घेऊन गेलो. आम्ही समोरासमोर बसलो. मी तिला ओब्सर्व करत होतो. दिसायला अवरेज होती पण डोळ्यात खोडकर झाक होती. कानात मोठे इररिंग घातले होते. बोलायला पण स्मार्ट होती . मला म्हणाली या शर्ट मध्ये तुझ्यासारखे दोन बसतील म्हणून.मी पण म्हणालो तू तर फोन वर बोलली होतीस कि तुझे डोळे काळे आहेत पण इथे तर थोडे ब्राऊन दिसत आहेत.
आता करायचं काय हा प्रश्न होता. मी तिला घेऊन तलावाकडे गेलो. तिथे बसलो. आमच्याबाजुलाच दहा मीटर अंतरावर एक जोडप किसिंग करत बसला होत. साला फोनवर एवढी बडबडणारी पोरगी समोर आल्यानंतर शांतच झाली होती. मी असाच काहीतरी गुळ काढायला सुरवात केली, पण ती काही रिस्पांस देइन मग गळ्यात हात घालून जवळ ओढल.पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीबरोबर कस वागाव ते पण भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर कस वागाव हेच कळत नाही. नाव, गाव सोडून मला तिच काही माहिती नाही आणि तिला मी माहिती नाही मग नक्की बोलणार तरी काय ?आणि डायरेक्ट फिजिकल व्हायला गेलो तर त्यासाठी असणारा निर्ल्लजपणा आपल्यात नाही. त्यामुळे आक्वर्ड वाटत होत. शेवटी तिच्या खांद्यावर ठेवलेला हात देखील बाजूला काढून घेतला थोडासा अंतर ठेवून बसलो. मागून काही शाळेतली मुल जात होती त्यांनी कमेंट्स मारल्या. आपणपण शाळेत असताना असाच तलावाच्या झाडीत लपलेली जोडपी बघून शिट्ट्या मारायचो हे आठवलं च्यायला वेळ आपल्यावर पण येऊ शकते. तसं तलावाची झाडी काय जास्ती रोमांटिकजागा नव्हती , कुठून काय येऊन चावेल याचा भरोसा नव्हता त्यात हि बया काहीच बोलेना नुसता पाण्याकडेच बघत बसलेली. भेन्चोद शहरात एक जागा नाही आहे शांतपणे जिथे काही करता येईल. घरी जाण्याच प्रश्नच नव्हता कारण आई घरी होती. मला भूक लागली होती म्हणून तिला घेऊन मी तिसर्या मजल्यावरच्या एका हॉटेलमध्ये गेलो. दोघांसाठी पावभाजी मागवली. ती कोणत्याच बाबतीत काहीच आग्रही नव्हती . सगळ माझ्या कलान घेत होती, मला नक्की प्रकरण आहे ते कळत नव्हत . फोनवर बोलत होतो त्यावरून अंदाज आला होता कि पोरगी कामातून गेलेली आहे हिंदी फिल्म्सचा भयानक प्रभाव पडला आहे तिच्या डोक्यावर वेगैरे, . पावभाजी खाल्ली. ती कमीच खात होती नाहीतर बाकीच्या मुली बकासुरासारख खाऊन मीटर पाडतात. हिचा तसा काय हेतू नव्हता. टिपिकल चांगल्या घरातली मराठी मध्यमवर्गीय मुलगी.
हॉटेल मधून बाहेर येताना ती बोलली “कुठेतरी अंधार असेल अश्या ठिकाणी जाऊ”. भर दिवस अंधार एकाच ठिकाण असतो ते म्हणजे थिअटर .जवळच्या मल्टीप्लेक्स मध्ये घेऊन गेलो . ५०० रुपयाची तिकीट काढली. मला आणि बहुधा तिलाही पिच्चर बघण्यात खास काही इंटरेस्ट नव्हता . तिकीट देणारी बाईपण हरामखोर होती. कोपर्यातली तिकीट पाहिजेत का अस विचारलं मी होय बोललो.
आम्ही आत जाईपर्यंत पिच्चर सुरु झाला होता. अंधार असल्यामुळे मी पुढे गेलो आणि तिच्या हात धरून आमच्या कोपर्यातल्या सीट पर्यंत आलो. एकदाचा बसलो. मी पिच्चर बघत होतो आणि आणि तिच्याकडे बघत होतो. ती एकदम शांत बसली होती . तीन चारदा मी तिच्या कानात सांगितलं कि पिच्चर बोर आहे पिच्चर बोर अहे. तीपण होय म्हंटली पण आमच काय प्रकरण पुढे जाईना .इंटर्वल मध्ये बाहेर गेलो मिरिंडा ची मोठी बाटली घेतली, इंटर्वल नंतर आता एकही सेकंद वेस्ट नाही करायचा अस ठरवलं. बाजूच्या दोन अंकल लोक समजूतदार पणा दाखवत स्वताहून पुढच्या रांगेत बसले. दोन रांग सोडून समोर एक नवरा एक बायको आणि त्यांची तीन-चार वेगवेगळ्या वयोगटाती मुल अस कुटुंब बसल होत , आजूबाजूचे लोक गेले भाडमध्ये . काहीतरी सांगायचं नाटक करत करत तिच्या तोंडासमोर तोंड आणल तिच्या डोळ्यात बघितलं थेटीअर मधल्या अंधारात देखील तिचे डोळे चमकले मी डायरेक्ट तिच्या ओठांवर ओठ ठेवले हिंदी इंग्लिश फिल्म मध्ये दाखवतात तसला काय करंट वेगैरे बसला नाही . मला वाटल आपल काहीतरी चुकतंय मग मी खालचा ओठ चोखणे आणि वरचा ओठ चोखणे अश्या कसरती केल्या. डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तर ती डोळे बंद करून कडू औषध गिळल्यासारख तोंड करत होती .तिच्या ओठांची चव मात्र वेगळी होती, लीपलायनर लावला असावा. ओठांच्या एवढे सगळे केल्यानंतर नक्की किस केल्यावर काय परमानंद मिळतोय हे कळाल नाही.सगळे बघितलेल्या पिच्चरमधले किसिंग सीन, पोर्नचे नोलेज पणाला लावले. तिने माझा ओठ चावला नंतर हात धरून बाजूला केल माझ्या डोळ्यात बघितल तेव्हा तिच्या डोळ्यातले भाव बदलेले होते, एक्सायटेड दिसत होती . दोन, तीन वेळेस असच किस केल. अंगाच तापमान वाढल होत माझ्या आणि तिच्याही. कधीही ताप येईल अस वाटत.शेवटी शांत झालो. व्यवस्थित होऊन गप्प बसलो. मग तिने हात हातात धरला आणि माझ्यावर कलंडून बसली. मला म्हणाली मघाशी पावभाजीबरोबर खालेल्या कांद्याचा वास अजून माझ्या तोंडाला येत आहे. मलापण थोड घाणेरड वाटल दुसर्याच्या तोंडात तोंड घालायचं म्हणजे काय ?आणि ते पण दोन तासापूर्वी हिला आपण आयुष्यात पहिल्यांदा भेटलोय काहीच माहिती नाही आहे हिच्याबद्दल . थोड्यावेळाने माझ्यातला पुरुष परत जागृत झाला . मी तिला बोललो मला तुझे हार्ट बिट्स ऐकायचे आहेत. एका सेकंदात तिने तिच्या हातानी माझा हात तिच्या बूब्स वरती ठेवला तिच्या ब्राच्या पट्ट्यांचा स्पर्श मला जाणवला तो एक मांसल गोळ्यासारखा प्रकार.पहिल्यांदाच एका पोरगीच्या स्तनाला हात लावून अनुभवत होतो . पण टोप अंगावर असल्यामुळे काही सुखद इरोटिक वाटल नाही. मी टोप मधून आत हात घालायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली आता काय इथे कपडे काढायचे आहेत का आपण?
त्यानंतर जास्ती काय केल नाही. एक दोनदा परत किस घेतला पण मला उलट नंतरनंतर नको वाटायला लागल. ती थोडी लहान पण आहे अस वाटत होत. एकदम नैतिक गोंधळ झाला होता ,पण मी फारसा नैतिक माणूस नसल्यामुळे मी काय एवढा विचार करत बसलो नाही . पिच्चर संपला बाहेर आलो. तिला पटकन बस मध्ये बसवून दिल.
घरी आल्यावर मला थोडा ताप आल्यासारखा वाटल.
नंतर आम्ही फोनवर वेगैरे अधून मधून बोलायचो.एकदा घरी कुणीच नव्हत मी तिला बोलावलं. सकाळी सकाळी जाऊन मी लांबच्या मेडिकल दुकानातून कंडोम घेऊन आलो होतो. टीवीवर जाहिराती बघून आय पिल माहिती होती पण आय पिल मिळाली नाही म्हणून मेडिकलवाल्याने अनवान्तेड ७२ सुचवली होती. हि सगळी खरेदी एका मित्राला बरोबर घेउन केली. पहिल्यादाच कंडोमचे एवढे ढीगभर ब्रांड आणि फ्लेवर असतात हे कळाल. मेडिकल वाले लोक पण साले एकदम प्रोफेशनल असतात. ते त्यातल्या कंडोमचे डोटेड आणि काय काय डीटेल्स सांगत बसले. मी पटकन मिळेल दहा बारा बॉक्सेस पैकी ज्याच्यावर एकदम जबरदस्त चित्र होत असाल कंडोम घेऊन आलो. घरात आठ दिवस झाल एकटाच होतो. कुणी बोलायला देखील नव्हत. हॉटेल मधून जेवण देखील पार्सिल घरीच घेऊन आलो. यावेळेस तिने गुलाबी टॉप घातला होता आणि काळी जीन्स. अंगाला परफ्युमचा वास येत होता. आम्ही टीवी बघत बघत जेवलो. नंतर बेडरूम मध्ये गप्पा मारत बसलो मी तिला कीस करायचा प्रयत्न केला पण तिने मला लांब ढकलला अजिबात काहीच करू देईना. शेवटी डोक दुखायला लागल म्हणून ती चक्क झोपली. मी तिच्या बाजूलाच झोपलो. तिला मिठी मारली याबद्दल तिची काही तक्रार नव्हती. थोड्यावेळाने ती जागी झाली आणि वापस जायचं म्हणून बेडरूम मध्ये जाऊन केस वेगैरे व्यवस्थित करू लागली . मी पण तिच्या मागोमाग गेलो . ड्रेसिंग टेबलच्या आरश्यात बघून फोटो काढले . मी तिला तिथेच पडलेल आईच मंगळसूत्र घातलं. मी तिच्या चेहऱ्यावर किस करत होतो पण ओठाच्या आसपास जरी पोचलो तरी लांब ढकलायची. बर्याच झटापटीनंतर ती मिठीत आली . मी ड्रेसिंग टेबल च्या मोठ्या आरश्यासमोर होतो ती माझ्या मांडीवर बसली होती. मी तिला घट्ट धरून ठेवलं तिचे हात माझ्या मानेभोवती होते. थोडे सैल होते. आरश्यामधल्या माझ्याच तिच्या मिठीमाधल्या प्रतीबिम्बाकडे बघत असताना अचानक मला रडायल आल सगळ्या सेक्शुअल फिलिंग्स गेल्या. एकदम आवंढा गिळला. तिला कळू दिल नहि. थोड्यावेळाने आम्ही एकमेकांच्या मिठीतून बाजूला गेलो . इतक्या दिवसाच एकटेपण कुणासोबत तरी वाटत आहे अस वाटल . आपण सहसा कधी जास्ती इमोशनल वैगेरे होत नाही पण आठ दिवस मी हॉटेल मधला वेटर सोडला तर दुसर्या कुणासोबत बोललोही नव्हतो. बराच वेळ न बोलता तसेच पडून राहिलो आरश्यात बघत. शेवटी ती बोलली “तुला जे पाहिजे आहे ते मी देऊ शकत नाही कारण तुझ्यावर माझा अजून विश्वास नाही आपण आता कुठ फ्रेंड्स बनतोय आज तू जे काही वागलास ते काय मला पटल नाही “ मी काहीच बोललो नाही तोंडातून शब्दच फुटत नव्हता . अस असू शकता का कि ज्या व्यक्तीला आपणफारस काही ओळखत नाही एकदम शरीरच्या वासनेनेच बघतो तीच व्यक्ती खूप जवळ आल्यावर अचानक इमोशनल होतो का माणूस? मला तीच शरीर सोडून बाकी काहीच खास आवडलं नव्हत. ना तिचे आणि माझे विचार जुळत होते , ना आमचे इंटरेस्ट सेम होते. मी एकदम स्वार्थी , धूर्त , कावेबाज हेतू ठेवून तिच्यासोबत जमेल तेवढ गोड गोड वागत होतो. माझा हेतू इतका क्लीअर असला तरी मग मला रडायला का याव?तिच्या मिठीमध्ये असताना आईचीच आठवण आली. खूप वर्षापूर्वी लहान असताना आईच्या मिठीमध्ये शांत उबदार झोप लागायची तसाच काहीस वाटल होत. मी उठून सगळ आवरलं आणि तिला तिच्या घरी सोडून आलो . कंडोमच पाकीट वय गेल. नको त्या वेळेस नको त्या ठिकाण आपल्या इमोशन्स वरती येतात. जवळपास ती तयार झाली होती आणि मी रडून मूडच घालवला , किंवा मला मुलीना कन्विन्स करता आल नव्हत जर तिला काही करायचच नव्हत तर मग ती आपल्यला का भेटते कारण भेटल्यावर आम्ही काही खास बोलत पण नाही आमची साधी मैत्री पण नाही. सपोज आमच्यात सेक्स झाला आणि ती बोलली कि लग्न करूया तर ते तर शक्य नव्हत कारण ती मला लग्न करण्याइतकीपण चांगली नाही वाटली .
त्यानंतर ती मला एकदाच भेटली. आम्ही दोघ पिच्चरला गेलो सेम कोपर्यातल्या सीट्स होत्या. पण मी तिच्यापासून बराच अंतर ठेवून बसलो. ती तिच्या वाढलेल्या नखांनी माझ्या होतावर रांगोळी काढत बसली होती. मी काहीच रेस्पोंड करत नव्हतो. पिच्चर संपला आम्ही एका इराणी हॉटेल मध्ये गेलो. शांतपणे बसलो.ती बोलली मी आहे तशी मला अक्सेप्ट ,कर मी अशीच आहे मला जास्ती बोलायला आवडत नाही, मला बाकीच्या मुलींसारख राहता येत नाही किंवा मी एवढी अफाट सुंदरपण नाही आहे. मी तिला सांगितलं कि “तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत नाहीस कि तुझ्यासोबत लग्न कराव”
आता भेन्चोद “मला अक्सेप्ट कर” यावर मी काय उत्तर द्याव हे मलापण कळत नव्हत. साला मी स्वताच काही झ्याट सेटल नव्हतो. आणि लग्न वेगैरे विचार करण तर हास्यास्पदच होत. मुली लहान वयात बर्याच मच्यूर होतात. लग्न वगैरे करायला लागणार हे सगळ गृहीत धरलेलं असता त्यांनी. आपण कधी एवढा विचार करत नाही. या भेटीत मला तिच्यातला एक फरक जाणवला नेहमी जीन्स, स्कर्ट घालणारी ती आज मस्त पिवळ्या कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती. केस वैगेरे व्यवस्थित बांधून, मी तिच्या फक्त रूपाच्या मोहात पडलो होतो. पण तेही तितक खर नव्हत. नाहीतर त्यादिवशी तिच्या मिठीमध्ये असताना कसला आवेग आला होता याला काही उत्तर नव्हत. मला तिला पुन्हा पुन्हा भेटाव अस वाटत होत पण आतून माहित होत ती आता मला पुन्हा कधी भेटणार नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर कायमसाठी संबध संपवण किती अवघड असत सगळे प्रश्न कसे अनुत्तरीत राहतात.मला एकदम कोरड कोरड वाटत असताना ती मला अचानक भेटली होती. तिच्यायेण्या आधी मी असा कुणाच्या मिठीत जाऊन रडलो वैगेरे नव्हतो. म्हणजे कळायला लागल तेव्हापासून कधी खास रडल्याच आठवतच नाही. रडणे म्हणजे बायकांचं लक्षण अस मनावर ठसवून घेतलं होत. पण तेच एका बाईच्या समोर रडायला येणे म्हणजे अतीच झाल. शरीर आणि मनाच्या मध्ये पण काहीतरी नात असू शकत याची जाणीवदेखील तेव्हाच झाली. फारसा काही रोमान्तिक न वाटता सगळ शरीराच्या थ्रू एक्स्प्रेस झालो होतो. मे बी तिची काही दुखः असतील ती माझ्या एकाटेपणासोबत रेजोनेट होऊन मला आणि तिला एकाच वेळेस रडायला आल असाव.पण मला कधीही शंका वाटली नाही ती त्यादिवशी रडत होती आणि बहुधा तिलादेखील माहित नसाव कि मी त्यादिवशी ब्रेकडाऊन व्हायच्या मार्गावर होतो.आता तिचा चेहरा देखील आठवत नाही पण मोकळ झाल्यासारखं रडायला येण मात्र कायमसाठी बंद झाल.
स्त्री
कावळ्याचं दिसणं आपल्याला ठाउक आहे. पण आता "स्त्रीच्या मनातील लैंगिक विषयाबद्दलच्या घडामोडी " हे असलं काय आलं की आपण सरळ पांढरं निशाण दाखवतो बाबा.
शिवाय समोरचा बोलतोय ते खरं असण्याची शक्यता , समोरचा खोटारडा नसण्याची मी अधिक गृहित धरतो.
ह्याशिवाय असं की समोरचा खोटारडा नाही, तरी माहिती चूक आहे, असं होउ शकतं.
पण त्या केसमध्ये मुळात आपल्याला बरोबर काय ते ठाउक पाहिजे.
बोंब तिथेच आहे .
http://www.webmd.com/sex/feat
http://www.webmd.com/sex/features/sex-drive-how-do-men-women-compare घ्या वाचा .हॉर्वड( कि हार्वड.. की ..)विद्यापीठाचे संशोधन.
दुव्यातील लेख आपले विधान सिद्ध करत नाही
वरील दुवा वेब एम डी वरील लेखाकडे जातो, कुठल्या पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रसिद्द्ध झालेल्या संशोधनलेखाकडे नाही. तुम्हाला दुसरा दुवा द्यायचा होता का? वेब एम डी वरही चांगली माहिती असते पण ते प्रत्यक्ष जर्नल नाही.
पण त्या लेखानुसारही
बायकांना मुळात थेट फिजीकल सेक्स या विषयात इंटरेस्ट नसतो
असे सिद्ध झाल्याचे कुठेही दिसून येत नाही.
अहो आझादाण्णा,हे अनेकदा सिद्ध
अहो आझादाण्णा,हे अनेकदा सिद्ध झालेले आहे कि स्त्रीयांना थेट फिझीकल लैंगिकतेचा इंटरेस्ट नसतो, मुळात पुरुषांचा जास्त स्ट्रेट आणि फिजीकल सेक्स ड्राईव असतो व स्त्रीया जास्त रोमँटीक, भावनेला महत्व देणार्या असतात ...
फक्त मासिक पाळीच्यानंतर ठराविक दिवसात त्यांचा ड्राईव्ह जास्त स्ट्रेट होतो ,याचा विदा देईनच.
स्त्रीया लैंगिक संबंधाना पुरुषांइतके महत्व देत नाहीत हे अगदी कॉमन परसेप्शन आहे, त्याअर्थी यात तथ्य असणारच.
(स्त्रीया या पुरुषांपेक्षा जास्त हळव्या असतात याचा पिअर रिव्हु जर्नलमध्ये उल्लेख आहे का?... तरि आपण तसे मानतो कारण आपले दैंनंदिन निरिक्षण.)
अनेकदा सिद्ध?
अनेकदा सिद्ध झालेले आहे कि स्त्रीयांना थेट फिझीकल लैंगिकतेचा इंटरेस्ट नसतो...
बरे, ते अनेकदा सिद्ध कुठेशी आणि कशा प्रकारे झाले आहे ते दाखवा.
फक्त मासिक पाळीच्यानंतर ठराविक दिवसात त्यांचा ड्राईव्ह जास्त स्ट्रेट होतो ,याचा विदा देईनच.
धन्यवाद. वाट बघत आहे.
- आझादअण्णा (मै भी अण्णा)
काही शंका
मला काही समाजशास्त्रीय शंका आणि काही तपशीलाच्या शंका आहेत.
- हा काळ नक्की कोणता?
- हे शहर किती लोकसंख्येचं आहे?
- प्रत्यक्ष भेटीअगोदर फोनवर बोलणं झालं होतं असा उल्लेख आहे. फोन नंबर कुठून मिळाला?
- भेटीमागे पुरुषाचा हेतू स्पष्ट होता असं म्हटलं आहे. पण भेट ठरवताना पुरुष आणि स्त्री यांच्यात 'कशासाठी भेटायचं' ह्यावर काही बोलणं झालं होतं का? म्हणजे शरीरसंबंध हा भेटीमागचा हेतू होता हे स्त्रीला स्पष्ट होतं की आणखी काही?
- पहिल्या भेटीत तोंडाला वास येत असल्याची तक्रार स्त्रीनं केली असतानाही नंतरच्या भेटीत जेवणानंतर किस करण्याचा प्रयत्न झाला. ही नजरचूक होती का? की वास घालवण्यासाठी काही उपाय योजले होते?
- 'तिला कळू दिल नहि.' म्हणजे रडू आलेलं स्त्रीपासून लपवण्यात पुरुष यशस्वी झाला होता का? कारण नंतरच्या वाक्यात 'मला आणि तिला एकाच वेळेस रडायला आल असाव.' असं आहे. ह्याचा अर्थ दोघंही मिठीत असताना रडले का?
-
>> तिच्यायेण्या आधी मी असा कुणाच्या मिठीत जाऊन रडलो वैगेरे नव्हतो.
म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीच्या मिठीत जाण्याचे प्रसंग येऊनही, की न येताच?
-
>> तिलादेखील माहित नसाव कि मी त्यादिवशी ब्रेकडाऊन व्हायच्या मार्गावर होतो.
ब्रेकडाऊन म्हणजे केवळ रडू येणं की नर्व्हस ब्रेकडाऊन वगैरे?
अंदाज
धाग्यावरून माझे अंदाज :-
1.हा काळ नक्की कोणता?
हा काळ मागील दशकभराहून अधिक नसावा. अगदि अलीकडील असण्याची शक्यता अधिक.
2.हे शहर किती लोकसंख्येचं आहे? ह्याचा काहिच अंदाज नाही. पण अगदि खेडेगावही नसावं. मुद्दाम एखाद्याला ओळखण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे घालावे लागताहेत व हॉटेल, रूम वगैरेचा उल्लेख आहे म्हणजे फारही लाहन गाव नसावं. तालुका प्लेस ते मेट्रोसिटी काहीही असण्याची शक्यता अधिक. "बेडरुम" हा शब्द वापरला असल्यानं शहर व मेट्रोसिटी असण्याची शक्यता अधिक.
(तालुका प्लेस व त्यापेक्षा लहान ठिकाणची मंडळी "आतली खोली" वगैरे म्हणतत, किम्वा खोलीचा उल्लेख न करता "आम्ही पलंगावर पहुडलो" वगैरे उल्लेख करताना दिसतात.
अर्थात हे माझ्या मर्यादित अनुभवावरील तर्क आहेत.)
3.प्रत्यक्ष भेटीअगोदर फोनवर बोलणं झालं होतं असा उल्लेख आहे. फोन नंबर कुठून मिळाला?
चॅटिंग्,फेसबुक ह्या शक्यता असू शकतात.
किंवा एखाद्या क्लबचे मेम्बर असल्यानं समान आवडीवरून ओळख सुरु झाली असण्याची शक्यता आहे. (पण ही शक्यता कमी आहे.)
किंवा ह्यासारखा घडलेला किस्सा ठाउक आहे तो म्हणजे स्त्री व पुरुष ह्या दोघांपैकी एकजण एका फोन कंपनीच्या हेल्पडेस्कमध्ये, काम करीत असे.
कधीतरी फोनकंपनीचा ग्राहक म्हणून कॉल लावला असताना सर्व्हिस चांगली मिळाली. त्यापुढेही दोन तीने वेळेस त्याच व्यक्तीशी बोलणं झालं.
दोघेही कामातुर असावेत. भेटले व कार्यभाग केला. नंतरचं ठाउक नाही.
4.भेटीमागे पुरुषाचा हेतू स्पष्ट होता असं म्हटलं आहे. पण भेट ठरवताना पुरुष आणि स्त्री यांच्यात 'कशासाठी भेटायचं' ह्यावर काही बोलणं झालं होतं का? म्हणजे शरीरसंबंध हा भेटीमागचा हेतू होता हे स्त्रीला स्पष्ट होतं की आणखी काही?
"विशिष्ट कार्यक्रम करण्यासाठी भेटू" असं म्हटलं गेलं असल्याची शक्यता कमी.
"सोबत सिनेमाला जाउ" कीम्वा "तुला खरच भेटावसं वाटतय. स्पर्श करावासा वाटतोय" हे इतकच म्हटलं गेलं असावं .
5.पहिल्या भेटीत तोंडाला वास येत असल्याची तक्रार स्त्रीनं केली असतानाही नंतरच्या भेटीत जेवणानंतर किस करण्याचा प्रयत्न झाला. ही नजरचूक होती का? की वास घालवण्यासाठी काही उपाय योजले होते?
कल्पना नाही.पण ह्यांनी विशेष मुखशुद्धीकारक (मुख सुवास कींवा अगदि कंठसुधारकवटीही घेतली नसणार असं वाटतं. काहिच घेतलं नसावं, किंवा फार तर बडिशेप घेतली असावी.)
त्यांनी मुखवास वगैरे काही खाल्लं असतं तर त्याचाही उल्लेख त्यांच्या वास्तवदर्शी लिहिण्याच्या शैलीनुसार लिखाणात आला असता.
6.'तिला कळू दिल नहि.' म्हणजे रडू आलेलं स्त्रीपासून लपवण्यात पुरुष यशस्वी झाला होता का? कारण नंतरच्या वाक्यात 'मला आणि तिला एकाच वेळेस रडायला आल असाव.' असं आहे. ह्याचा अर्थ दोघंही मिठीत असताना रडले का?
काय की बाबा.
7.>> तिच्यायेण्या आधी मी असा कुणाच्या मिठीत जाऊन रडलो वैगेरे नव्हतो.
मिठीत जाउन रडण्याचा अनुभव धागालेखकाला नाही असं दिसतं. किंवा भिन्नलिंगी आकर्षक व्यक्तीच्या मिठीत जाण्याचाच अनुभव नसावा. नुसतेच ते रडले असावेत ह्यापूर्वी हे शक्य आहे.
8.>> तिलादेखील माहित नसाव कि मी त्यादिवशी ब्रेकडाऊन व्हायच्या मार्गावर होतो.
ब्रेकडाऊन म्हणजे केवळ रडू येणं की नर्व्हस ब्रेकडाऊन वगैरे?
काय की बाबा.
१.
१. २०१०-२०११
२.कोल्हापूर,नाशिक, किंवा पुणे, ठाणे सरळ सांगत नाही. बोरीवली पण असू शकत.
३.फोन नंबर बद्दलचा अंदाज चुकलाय. अगदी 'random' wrong number असू शकतो , किंवा मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मोबाईल मधून त्याने किंवा तिने त्याचा नंबर ढापून स्वताहून call करून गुळ काढला असण्याची शक्यता आहे.
३. मुलीच्या हेतुत साशंकता आहे. आपण भेटू अस तीच उत्तर. किंवा फोनवर बोलताना कुठल्या फ्लेवरचा लीप लायनर लावून येऊ वगैरे....किंवा आज मम्मी मला घालू देत नाही तो लो नेक टोप तो घालून येईल. अश्या प्रकराच बोलणच जास्त.पुरुषाचा हेतू तर सभ्य भाषेत स्पष्ट चा सांगितला होता( दुसर्या भेटीच्या वेळेस)
४.टीवी बघत मुलीनेच जेवण केल. मुलगा बाहेर खाऊन आला होता. मुलीसोबत बाहेर गेलो तर पुन्हा काहीतरी कमीच खाऊन भागवाव लागेल या भितीमुळे.
अवांतर- नंतरच्या भेटीत किस न करण्याच मुलीचं कारण - मुलगा आणि मुलगी दोघेच घरात होते जर किस च्या पलीकडे काहीतरी होण्याचा प्रयत्न झाला असत तर त्याला कोणी रोखू शकणार नव्हत आणि स्वताचा देखील कंट्रोल राहिला नसता. प्रोटेक्शन वेगैरे ठीक आहे पण तरीपण अस काहीतरी झाल असत तर मुलगीने आत्महत्याच केली असती.सिनेमा हाल मध्ये कस लिमिटेड प्रकार होता.
६.मजा म्हणून मंगळसूत्र घातल्यानंतर मुलीच्या डोळ्यात एकदम विवाहउत्सुक भाव आले. म्हणजे सेंटी झाली हे नक्की.
७.मिठीत जाण्याचा अनुभव नाही. आक्वर्ड.(जनरलि मिठीत वेगैरे येऊन सेंटीपणा करणारी मंडळींपासून दूरच)
८.ब्रेकडाऊन- रडणे किंवा रडावस वाटणे.
प्रस्तुत धाग्यातील स्त्री विषयी भयानक सोफ्ट कॉर्नर असलेने हे सगळ लिहील.
८.
सदरचा अनुभव त्या मुलग्याला
सदरचा अनुभव त्या मुलग्याला विसाव्या वर्षी कसा आला १४ च्या वर्षी कसा आला नाही असा काहीतरी मुद्दा प्रतिसादात दिसला. त्याचा सिग्निफिकन्स कळला नाही. अनुभव कोणत्याही* वयात आला असू शकतो ना? [पहिला प्रयत्न कोणत्याही वयात केला असू शकतो].
*एखाद्याने विसाव्या वर्षी सिगरेट ओढताना ठसका लागला असे सांगितल्यास हा अनुभव चौदाव्या वर्षी यायला हवा होता असं म्हटलं गेलं आहे असं वाटतं.
अगदी साधे-थेट वाटेलसे लिहिणे म्हणजे कौशल्य लागते
हा विरोधाभास आहे खरा : वाचकाला अगदी साधे-थेट वाटेल असे लेखन हवे, तर लेखकाला मात्र फार प्रयत्न करावा लागतो. नाहीतर भडाभडा "घेतली बोटे आणि लावली टंकायला" घेतले तर लेखन थेट वाटण्याऐवजी विस्कळित, बटबटीत, भकास वगैरे वाटू शकते. (स्वयंभू प्रतिभेचे थोडे अपवाद असतात म्हणा. पण आपण तसले अपवाद आहोत, असे म्हणायला भलतेच धार्ष्ट्य लागते!)
पौगंडावस्थेतील लैंगिक भावनांची चलबिचल दाहक-तळमळणारी-उत्कट असते. पण ती चलबिचल सांगण्याकरिता पौंगड मुलामुलींकडची रोजवापराची भाषा मात्र रटाळ-मळमळणारी-उथळ असते, पुष्कळदा! युवकांच्या शब्दभांडारातच ते अनुभव प्रभावीपणे श्रोत्या-वाचकापर्यंत पोचवायचे, म्हणजे बरेच कष्ट घ्यावे लागतात.
तरी लिहायला लागलात हे चांगले. सरावाने सारे सर होते. सरावाचे लेखन स्वांतसुखाय करून, आपणच पुन्हा-पुन्हा वाचून, पुन्हा-पुन्हा कच्च्या आवृत्त्या लिहून काढून, मग पक्की आवृत्ती प्रसिद्ध करता येईल.
पुढील लेखनाकरिता शुभेच्छा.
मूळ धागाप्रवर्तकास, विस्कळित
मूळ धागाप्रवर्तकास,
विस्कळित आणि अनेक प्रश्न निर्माण करणारा अस्ला तरी लेख / गोष्ट जे काय असेल्ते आवड्ले.
आर्ट फिल्ममध्ये रिळे उल्टीपाल्टी जोडली की कसे रोचक अनुभव क्रिएट कर्ता येतात्तसे वाट्ले.
खाली प्रतिसादांमध्ये अधिक कौतुक असेल असे वाटले होते परंतु बर्याच जणांना नाही आवडला असे दिस्ते. त्याबद्दल काही म्हणणे नाही. सगळ्यांना सगळे आवडावे असे नाही...
तुम्ही मात्र ल्ह्यायचा प्रयत्न करत राहा. तुम्च्या लेखनात मज्जा आहे.
मतप्रदर्शन
लिखाणातले ढोबळ दोष नजरेआड केले तर मला ह्या लिखाणात एक केविलवाणेपणा जाणवला. मुलगा आणि मुलगी दोघांनाही निव्वळ लैंगिक उर्मी नाहीत, तर कसलातरी एकटेपणा (कळत नकळत) जाणवतो आहे. त्यावर उपाय म्हणून शारीरिक जवळीक शोधली जात आहे. पण तो पलायनवाद आहे, कारण मुळात नात्यात काही कस निर्माण व्हावा ह्यासाठीची पक्वताच अद्याप नाही. त्यामुळे लैंगिक उर्मीचं समाधान झालं न झालं काही फरकच पडत नाही. एकटेपणा खायलाच उठणार आहे. ही जाणीव कळत-नकळत होणं ह्यात केविलवाणेपण आहे. ज्याला कथनाचा उत्कर्षबिंदू म्हणता येईल त्या प्रसंगात (मिठीत रडू फुटणे) ही जाणीव होते. त्यामुळे लैंगिक पूर्तता लाभण्याआधीच उर्मी ओसरली आहे आणि नातंही उसवलं आहे. व्यर्थतेच्या त्या जाणीवेत कारुण्य आहे आणि कथनाची ताकद जी काय असेल ती त्यातच आहे.
वेश्या नसलेल्या स्त्रीशी संग
वेश्या नसलेल्या स्त्रीशी संग करायची किंमत लग्न हीच असावी असे काहीसे पर्सेप्शन दिसते भारतीय समाजाचे अजूनही.
हे वाक्य व या संदर्भातल्या एकंदरितच चर्चेबद्दल वेगळे मत नोंदवायचे आहे. माझे निरिक्षण व अनुभव या पाठीशी आहेत. अनुभव अर्थातच वैद्यकीय क्षेत्रात केलेले काम व समव्यवसायिक मित्रांच्याकडून ऐकलेले किस्से या प्रकारचे आहेत. पियर रिव्ह्यूड लिटरेचर इ. विशेष दाखला मजपाशी नाही.
१. विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांच्या प्रमाणाबद्दल, अस्तित्वाबद्दल व एकंदरितच भारतीय समाजातील स्वैराचाराबद्दल आपल्या (अक्षराईट्स) मनात अनेक गोड गैरसमज आहेत.
२. अगदी गाथासप्तशती काळापासून (प्रवासातून अचानक परतलेल्या पतीस, घरी वास्तव्यास आलेल्या जाराची ओळख, हा माझ्या माहेरचा माणूस अशी करून देणारी स्त्री इ.) आपल्या समाजात हे घडत आले आहे, असे दिसते. आजही, स्त्री व पुरुष यांना लैंगिक उर्मी तितकीच (इक्वली) उत्कट व खुली असते, व ती भागविण्यासाठी लग्न होण्याची वाट अजिब्बात पाहिली जात नाही. विवाहबाह्य संबंध ठेवताना, लग्नच केले पाहिजे अशी अट घातली जात नाही. ;)
२.अ. स्त्रीची व्हर्जिनिटी, आहे की नाही, हे ओळखायचे कसे? याचे ज्ञान अगाध असल्याने, याबद्दल पहिल्या रात्री केलेल्या फसवणूकी, व झालेले गैरसमज हा वेगळाच विषय आहे. (हे कुमारी पत्नी मिळविण्याबद्दल. ज्यांना आपण कुमारिकेशी विवाह केलाय अशी समजूत पटलेली आहे, अशा अनेकांच्या बाबत हे खरे नसते. खूप मोठे नसले, तरी सिग्निफिकंट प्रमाण आहे. निग्लिजिबल नव्हे.)
३. लैंगिक संबंधांबद्द्लची चर्चा फक्त मुलगा-मुलगा/पुरुषांत आपापसातच होते, हा अजून एक गैरसमज. गांव-गल्ल्यांमधलं बायकांचं स्पेशल गॉसिप ऐकायला मिळालं, तर सध्या कुणाचं कुणासोबत काय व कसं सुरु आहे, व त्याबद्दलच्या व इतरही खरपूस गप्पा होतच असतात.
या बाबींचा पुरावाच द्यायचा झाला, तर सगळ्याच वाहिन्यांवर चाललेल्या मालिकांत दाखविलेला विवाहबाह्य संबंधांचा भाग, व तो पाहून चर्चा करणार्या आपल्या कुटुंबांचा त्यातला सह-भाग, पुरावा म्हणून पुरेसा ठरावा. याबद्दलची सगळी चर्चा सोशली अॅक्सेप्टेबल असल्यासारखीच असते, हे प्लीज नोट करावे. :)
**
ता.क.
मूळ लेख अजिबात वाचवला गेला नाही. थोड्या ओळी वाचून मग एकंदर वरवर नजर टाकली.
प्रतिसादात लेखकाने त्याला स्वतःच ओकारी काढल्याची उपमा दिल्याचे वाचून भडभडून आले, व ओकारी चिवडली नाही याबद्दल बरे वाटले.
गाथासप्तशतीच्या उल्लेखासाठी
गाथासप्तशतीच्या उल्लेखासाठी मेरी तरफ से एक स्पेशल लाईक.
तुमच्या सर्व मुद्यांना रुकार आहेच.
पण जालचर्चेत अथवा फेस टु फेस बोलताना अजूनही अॅटिट्यूड तसाच असतो. सीर्यलीत जे पाहून मिटक्या मारल्या जातात ते प्रत्यक्ष आपल्यासोबत होण्याच्या शक्यतेला कोणी एंटरटेन करत नैत. करायचे ते करतात, पण प्रूडिश मुखवटा ठेवतात. मुद्दा त्या मुखवट्याबद्दल आहे.
असे असणारच म्हणा-पण विरोधाभास हायलाईट करावा वाटला, इतकेच.
बाकी स्पेशल गॉसिपबद्दल १०१०० वेळेस सहमत.
फारच प्रामाणिक लेख! पण
फारच प्रामाणिक लेख! पण रसि़कांच्या सुदैवाने केवळ प्रामाणिकपणा हा लेखनाचा निकष अजून तरी नाही! असो..
काही प्रामाणिक विचार मजेशीर वाटले.. मुलगी विचित्र(!), तिकिट देणारी बाई हरामखोर(!!), बाजूचे दोन अंकल समजूतदार(!!!) आणि काम्ज्वराने तप्त असे प्रामाणिक आपण(!!!!)
"तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत नाहीस कि तुझ्यासोबत लग्न कराव".. हे प्रकरण नाही कळ्ल.. "लग्नासाठी मी तयार नाही" असा विचार समजू शकतो. मग लग्नासाठी कशी मुलगी हवी? कोणतेही लफडे न केलेली, दोन खांद्यावर अगदीच पदर नाही तर ओढणी घेऊन आईला वाकून नमस्कार करणारी, नोकरी करणारी, आणि त्याचवेळी कोणत्याही मदतीशिवाय घर सांभाळणारी?
"एकदा हिला भेटली कि हिला घ्यायचीच " . सेक्स म्हणजे पुरुषाने बाईकडून "काहितरी" घ्यायच ही टिपिकल पुरुषी मानसिकता दिसते.. अशा विचाराने कितीही मुली/बाया घेतल्या तरी काही हाती लागणार नाही.. सुमार लेख/कादंबर्यांम्ध्ये भर पडेल इतकेच..
सहमत. मुळात महिला थेट sex
सहमत.
मुळात महिला थेट sex साठी inert असतात हे जे मी लिहले होते त्याच्याशी याचा संबंध येतो. सेक्स हा पुरुषासाठी कोणतेही जबाबदारी घेऊन येत नाही... ना प्रेग्नंसी... ना संगोपण. त्यामुळे सेक्सकडे exclusive pleasure म्हणून बघण्याची मानसिकता उत्क्रांतीत विकसीत झाली .परंतु स्त्रीला प्रचंड जबाबदारी येऊ शकते, त्यामुळे सेक्सकडे possible threat म्हणुन बघण्याची मानसिकता उत्क्रांतीतुन विकसीत झाली...
जेव्हा एखाद्या पुरषाच्या व्यक्तीमत्वाने(गुणस्वभाव, समजुतदारपणा etc) स्त्री प्रभावीत झाली तरच ती अशा संबंधाकडे वळते व ते आनंददायी वाटत असावेत, फक्त पुरुषाचे शरीर बघुन बायका उत्तेजीत होत नाहीत, थेट फीजिकल सेक्स त्यामुळेच त्यांना डीस्गस्टींग वाटतो. there is an evolutionary advantage behind such a strong disgust.
उत्क्रांतीच्या निवडीतून आलेला
उत्क्रांतीच्या निवडीतून आलेला, धोका किमान करण्यातला फायदा याबद्दलचे स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे.
मात्र,
व्यक्तीमत्वाने(गुणस्वभाव, समजुतदारपणा etc) स्त्री प्रभावीत झाली तरच ती अशा संबंधाकडे वळते व ते आनंददायी वाटत असावेत, फक्त पुरुषाचे शरीर बघुन बायका उत्तेजीत होत नाहीत, थेट फीजिकल सेक्स त्यामुळेच त्यांना डीस्गस्टींग वाटतो.
ह्याबद्दल साफ असहमती. (आपण मागील प्रतिसादात विदा देणार होतात, त्याची प्रतीक्षा आहे. )
आपण सरसकटीकरण करत आहात. व्यासंग आणि अनुभव वाढवण्याबद्दल शुभेच्छा.
...
आपली निवड रोचक आहे
(त्या दुव्याबद्दलच बोलत आहात, असे गृहीत धरतो.)
धन्यवाद.
ही आमची ब्ल्याण्डिङ्ग्ज़ची सम्राज्ञी. आमचा हिच्यावर भारी जीव.
किंबहुना, हिच्यावरूनच प्रेरित होऊन आम्ही आमचे हे 'ब्ल्याण्डिङ्ग्ज़सम्राट'पद (स्व)घोषित केले आहे.
(अन्यथा, आमचा हिच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, व तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
मुळात महिला थेट sex साठी
मुळात महिला थेट sex साठी inert असतात हे जे मी लिहले होते त्याच्याशी याचा संबंध येतो. ... परंतु स्त्रीला प्रचंड जबाबदारी येऊ शकते, त्यामुळे सेक्सकडे possible threat म्हणुन बघण्याची मानसिकता उत्क्रांतीतुन विकसीत झाली...
एकंदरीत बरेच गैरसमज आहेत तर.
तुम्ही शाळामास्तर आहात काय? (व्यक्तिगत प्रश्न म्हणून सोडूनही देऊ शकता. पण प्लीज, कायच्याकाय फेका नका हो मारू. सूडोसायन्स पसरवण्यासाठी ऐसीचं व्यासपीठ अयोग्य आहे.)
+१
सूडोसायन्स पसरवण्यासाठी ऐसीचं व्यासपीठ अयोग्य आहे
सहमत.
उत्क्रांतीमधून निवड झालेला गुणधर्म म्हणजे स्त्रिया ' थेट sex साठी inert ' असणे नाही.
मोठ्या काळासाठी शारीरिक गुंतवणूक होते- गर्भधारणा, अवघडलेपणाने येणारी स्वसंरक्षणातील अडचण इ.इ. शरीरसुखासाठी जोडीदाराच्या निवडीत चोखंदळ राहणे हे गुंतवणूक बुडीत जाण्याचा धोका कमी करण्याचा मार्ग आहे.
दुसरे, प्रबळ शारीरीक उर्मी पुढच्या धोक्यांचा (अपत्याची शक्यता आणि सामाजिक अवहेलना ) विचार करून दडपणे याचा अर्थ त्या उर्मीचा अभाव असे नाही.
उलट आता अनेक साधने उपलब्ध असताना त्या उर्मी दडपणारे ढापण निघून नैसर्गिक उर्मी व्यक्त होणे पूर्वीपेक्षा जास्त सुलभ झाले आहे.
स्यूडो नाही हो, खरे सायन्सच
स्यूडो नाही हो, खरे सायन्सच आहे हे. स्रीची लैंगिकतेकडे बघण्याची मानसिकता कशी असते हे दर्शवणारा स्टडी, पिअर रिव्ह्युड व मेनस्ट्रीम. कशाविषयी खेद वाटतो.
www.utexas.edu/news/2013/11/25/human-survival-and-reproduction/
Study Examines Potential Evolutionary Role of “Sexual Regret” in Human Survival and Reproduction
Nov. 25, 2013
AUSTIN, Texas — In the largest, most in-depth study to date on regret surrounding sexual activity, a team of psychology researchers found a stark contrast in remorse between
men and women, potentially shedding light on the evolutionary history of human nature.
Researchers for the peer-reviewed study included University of Texas at Austin evolutionary psychologist David Buss. The study was led by Andrew Galperin, a former social
psychology doctoral student at the University of California-Los Angeles; and Martie Haselton, a UCLA social psychology professor. It is published in the current issue of Archives of
Sexual Behavior.
The findings show how human emotions such as regret can play an important role in survival and reproduction. They suggest that men are more likely to regret not taking action on
a potential liaison, and women are more remorseful for engaging in one-time liaisons.
“Prior sex researchers have focused primarily on the emotion of sexual attraction in sexual decisions,” Buss says. “These studies point to the importance of a neglected mating
emotion —sexual regret — which feels experientially negative but in fact can be highly functional in guiding adaptive sexual decisions.”
Evolutionary pressures probably explain the gender difference in sexual regret, says Haselton, who earned her Ph.D. in psychology at UT Austin.
“For men throughout evolutionary history, every missed opportunity to have sex with a new partner is potentially a missed reproduce opportunity — a costly loss from an
evolutionary perspective.” Haselton says. “But for women, reproduction required much more investment in each offspring, including nine months of pregnancy and potentially two
additional years of breastfeeding. The consequences of casual sex were so much higher for women than for men, and this is likely to have shaped emotional reactions to sexual
liaisons even today.”
In three studies the researchers asked participants about their sexual regrets. In the first study, 200 respondents evaluated hypothetical scenarios in which someone regretted
pursuing or failing to pursue an opportunity to have sex. They were then asked to rate their remorse on a five-point scale. In the second study, 395 participants were given a list
of common sexual regrets and were asked to indicate which ones they have personally experienced. The last study replicated the second one with a larger sample of 24,230
individuals that included gay, lesbian and bisexual respondents.
According to the findings:
The top three most common regrets for women are: losing virginity to the wrong partner (24 percent), cheating on a present or past partner (23 percent) and moving too fast
sexually (20 percent).
For men, the top three regrets are: being too shy to make a move on a prospective sexual partner (27 percent), not being more sexually adventurous when young (23 percent)
and not being more sexually adventurous during their single days (19 percent).
More women (17 percent) than men (10 percent) included “having sex with a physically unattractive partner” as a top regret.
Although rates of actually engaging in casual sex were similar overall among participants (56 percent), women reported more frequent and more intense regrets about it.
Comparing gay men and lesbian women, and bisexual men and bisexual women, a similar pattern held — women tended to regret casual sexual activity more than men did.
Regret comes after the fact, so it's not protective, Haselton notes. But it might help women avoid a potentially costly action again.
“One thing that is fascinating about these emotional reactions in the present is that they might be far removed from the reproductive consequences of the ancestral past,” Haselton
says. “For example, we have reliable methods of contraception. But that doesn't seem to have erased the sex differences in women's and men’s responses, which might have a
deep evolutionary history.”
वाचा - दुहेरी अवतरणे कशी वाचावीत?
या लेखात/बातमीत “Sexual Regret” हा शब्द एकतर दुहेरी अवतरणात वापरला आहे. दुहेरी अवतरणात वापरलेल्या शब्दांचे अर्थ शब्दशः लावत नाहीत. आणि दुसरं, ते संपूर्ण लेखन वाचाल तर असं समजेल की “Sexual Regret” याचा अर्थ या भावनेमुळे, किंवा या "हुशारी"मुळे स्त्रिया समोर दिसलेल्या सगळ्याच पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवू इच्छित नाहीत. किंवा सोप्या मराठीत - स्त्रिया काही पुरुषांबरोबरच लैंगिक संबंध ठेवू इच्छितात.
या दुव्यात दुसऱ्या परिच्छेदाच्या पहिल्याच वाक्यात ज्या David Buss यांचं नाव आहे, त्यांची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. दमडी खर्च न करता पहायचं असेल तर यूट्यूबवर व्हीडीओज आहेत. ते पहा. आणि मग विचार करून बोला.
(पण समजून घ्यायचंच नसेल आणि/किंवा आपले पूर्वग्रहच पुढे ढकलायचे असतील तर अॉस्टीन विद्यापीठात असणारा David Buss किंवा लोकांच्या मनात असणारा आणि शब्दकोशात असणारा देव कोणीही मदत करू शकत नाहीत.)
पुरेशी डिटेलवार माहिती
पुरेशी डिटेलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या आधीच्या प्रतिसादातला 'स्त्रियांना लैंगिक अनुभवाबद्दल डिस्गस्ड वाटते' हा निष्कर्ष मात्र कुठेच दिसला नाही. बाकी मूल जन्माला घालण्याबाबत अधिक शारीरिक/मानसिक गुंतवणुक असल्यामुळे स्त्रिया अधिक चोखंदळ असतात हा मुद्दा सर्वमान्य आहे.
असो ,दैनंदीन निरीक्षण,
असो ,दैनंदीन निरीक्षण, मित्रमैत्रीणी कलिग यांच्याशी होणारा संवाद, आंतरजालावरचे पिअररिव्ह्युड जर्नल्स नजीकच्या काळात या विषयावर आंजावर झडलेल्या चर्चा, चिंतन यातून आलेला हा निष्कर्ष आहे.
जरा आणखि मेटाफोरीकली सांगतो
कपडे खरेदी करताना कुणी दिसेल तो ड्रेस विकत घेत नाही ,रंग डीझाईन आवडले तरीही फिटींग ,क्वॉलिटी ,पैसे यांचा विचार करुन खरेदी केली जाते .विकणार्याला काय, पैसे दिले तर तो काहीही विकायच्या प्रयत्नात असतो .ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये असलेले इमोशल,सोशल डायनॅमिक्स इथे ढोबळ पद्धतीने लागू पडते.प्रत्येक ग्राहक हा विक्रेत्यासाठी सावज असतो (प्रस्तुत लेखात 'आज हीला घ्यायचीच' ही भावना याचेच द्योतक आहे) ,तर प्रत्येक विक्रेता हा ग्राहकासाठी posible threat असतो.
पटलं तर घ्या नायतर सोडून द्या.
दुव्याबद्दल धन्यवाद, पण....
वरील दुवा (तिथे पूर्ण लेख नाही, फक्त अॅबस्ट्रॅक्टच दिसले ) रोचक आणि विश्वासार्ह निश्चितच आहे.
परंतु स्त्रिया थेट शारीरीक संबंधात inert असतात हे त्यात कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे तुमच्या विधानाला, तुमच्या मागील प्रतिसादातील दुव्याप्रमाणे, हाही दुवा आधार देत नाही. वरील दुव्यातला लेख वेगळ्या गोष्टीबद्दल बोलत आहे.
स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या, मुख्यत्वेकरून Casual लैंगिक व्यवहाराबद्दल त्या लेखातली निरीक्षणे आहेत, हे लक्षात घेणे महत्त्वाचे. कामसंबंधात रस नसेल तर स्त्रिया Casual लैंगिक संबंध ठेवेतील कशाला? दुसरे म्हणजे लेखातले स्त्रीपुरुषांचे 'regret' वर्तन अशा Casual लैंगिक संबंधानंतर, ते सुख उपभोगल्यानंतर मागे वळून बघतानाचे आहे. प्रत्यक्ष संबंधाच्या वेळचे नाही. यातही, स्त्रिया लैंगिक संबंधात inert असतात असे कुठेही सिद्ध् होत नाही. उलट, 'कामेच्छेपोटी आपण भलताच धोका स्वीकारला होता', अशा प्रकारचा, उत्क्रांतीच्या निवडीचा तो 'regret' प्रतिसाद आहे.
उदाहरणार्थ, त्या लेखात म्हटले आहे,
Although rates of actually engaging in casual sex were similar overall among participants (56 percent), women reported more frequent and more intense regrets about it.
म्हणजे,
१) casual sex चे प्रमाण स्त्रीपुरुषांत साधारण सारखेच (५६%)दिसले.
याचा अर्थ,
लैंगिक संबंधांची उर्मी आणि उर्मीच्या शमनासाठीचे वर्तन स्त्रियांमध्ये पुरुषांइतकेच दिसले.
२) मागाहून, स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात 'regret' दिसून आला.
म्हणजे,
अ) हा 'regret' दोन्ही लिंगाच्या व्यक्तींत दिसून आला.
ब) तो स्त्रीयामध्ये जास्त दिसून आला.
क) किती कमी- जास्त?
स्त्री८०% पु१०%?
स्त्री१९% पु१२%?
की दुसरे आकडे?
हे आकडे मूळ लेख पूर्ण न दिसल्याने तुलनेसाठी उपलब्ध नाहीत.
आपल्या वरील प्रतिसादात, स्त्री- पु दोन्हीचे समान मुद्द्यावरच्या 'regret' बद्दलचे लेखातले निरीक्षण हे-
More women (17 percent) than men (10 percent) included “having sex with a physically unattractive partner” as a top regret.
म्हणजे, शारीरिकदृष्ट्या अनाकर्षक जोडीदाराशी केलेल्या संबंधाबद्दल-
१) स्त्रीपुरुष दोघांतही regret आढळला. स्त्रियांमधल्या regret चे प्रमाण पुरुषांमधल्यापेक्षा ७% जास्त आढळ्ले.
२) तो १७% स्त्रिया आणि १० % पुरुषांत आढळला. म्हणजे, वरील प्रकारच्या शरीरसंबंधांनंतर, ८३% स्त्रिया आणि ९०% पुरुषांत regret आढळला नाही.
संशोधनलेखात भाषा फार काळजीपूर्वक वापरावी लागते. मान्यताप्राप्त जर्नलमधे तरी. त्यात,
१) नेमके काय सिद्ध करण्याच प्रयत्न आहे,
२) त्याने काय काय सिद्ध होत नाही
३) निष्कर्ष केवळ कुठल्या संदर्भात सिद्ध झाले आहेत
४) सिद्धतेसाठीच्या पद्धतींची विश्वासार्ह्तता
हे प्रमाणित भाषेत माडलेले असते. वाचून अर्थ लावतानाही वरील मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात. संशोधनातली संख्याशास्त्रीय माहिती नक्की काय दाखवते हे बघणे महत्त्वाचे असते.
अन्यथा,
''ह्या लेखात (सरसकट)स्त्रियांना (सरसकट)लैंगिक संबंधाबद्दल (नेहमीच) 'regret' असतो म्हटले आहे''
''आणि यावरून त्या थेट शारीरिक संबंधात inert' असतात असे सिद्ध होते''
अशा प्रकारचे चुकीचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात.
कॉल
स्त्रियांच्या लैंगिक प्रेरणेबद्दल इतरही काही संशोधन झालेले आहे- हा दूवा व हे त्यावरचं एक विधान -
Women are thought to get several evolutionary advantages from being promiscuous. The most obvious is 'fertility insurance'. Birkhead cites the case of a man who went for a vasectomy after his wife gave birth to her third child. However, the surgeon found the man had a congenital defect that meant he couldn't possibly be the father of any of the children.
तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत
तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत नाहीस कि तुझ्यासोबत लग्न कराव
>>>अस होऊ शकत नाही का?फक्त फिजिकल आकर्षण असू शकत नाही का?दोन सज्ञान व्यक्ती त्यांना जे काही करायचं आहे ते परस्पर समंतीने करू शकतात करू शकतात कि दोघांचा शरीरसंबध झाला कि लगेच लग्न कराव असा नियम आहे?
मुलगी कशी हवी? हा लेखाचा विषय नाही आहे. त्यामुळे उगाच चर्चा तिकडे भरकटवू नये.
बाकीच्या सर्व मुद्द्यांना एकाच उत्तर आहे-सर्वसाधारण मुल/पुरुष बोलताना किंवा मनातल्या मनात तरी असच बोलतात तेच इथे लिखित स्वरूपात आहे.
यालाच मानसिकता असे म्हणतात.
यालाच मानसिकता असे म्हणतात. आपल्या नकळत आपल्या सर्वसाधारण वागण्या-बोलण्यातून ती व्यक्त होत असते.
मानसिकता उघड उघड बोलून दाखवणारा पर्व्हर्ट ठरतो आणि न दाखवणारे सर्वच साव ठरतात. मनात काय चालले आहे हे जसेच्या तसे लिहायला प्रचंड डेरिंग लागते. झापडबंद मानसिकता असणारांना त्याचे काय होय!
बाकी चालू द्या.
ओके,
पण मग 'अमुक कुणी असा विचार करूच कसा शकतो' इ. ला उत्तर काय अन का देणार? व्यक्तीस्वातंत्र्य काही आहे की नाही?
आता यावर 'विरोधाचे स्वातंत्र्य आहे की नाही' असे अर्ग्युमेंट येईल. पण विरोध अल्टिमेटली व्यक्तीस्वातंत्र्याच्या मुळावर येत असेल तर विरोधाच्या स्वातंत्र्याला विरोध केला पाहिजे असे वाटते.
अवांतर...
तुझ्या प्रतिसादामुळे आठवले असले, तरी डायरेक्ट तुला उद्देशून नाही.
"जे आहे ते बोल्तो ब्वॉ आपन. आत एक बाहेर एक असं नाही.लोकांच्याही मनात तेच असतं. आम्ही फक्त बोलून वाईट होतो."
असं म्हणणारे अधून मधून भेटत असतात.
"या बाई या... मी आहे हा असा आहे" असे म्हणत सुरुवात करणारा सखाराम बाइंडरही शेवटी संवाद तिथेच आणतो.
"जे करतो ते राजरोस करतो" वगैरे.
पण हे नक्की काय आहे?
गलिच्छ न वागणारे व बोलणारे लोक प्रत्यक्षात तेच करण्याची आकांक्षा बाळगून असतात, नि मन मारत जगतात.
चांगला माणूस म्हणजे स्वतःचे मन मारुन जगणारा अशी मांडणी का केली जाते ?
काही पुरुषांनी मिळून एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती केली आणि वर असच बोललं तर चालेल का ?
"आम्ही करतो ते करतो. इतरांच्याही मनात तेच र्हातं बाबा."
आँ??
अरे दुसर्अयस त्रास देउ न इच्छिणारे कुणीच नसतात का ?
पोलिसाच्या धाकानं चोरी कमी राहते, आटोक्यात राहते हे खरच.
पण पोलिसाच्या अनुपस्थितीतही हरेकजण चोरच आहे असं कसं म्हणू शकता ?
माणसाच्या मूळ विवेकालाच नाकारणं झालं ना हे ?
"आम्ही सगळ्यांइतकेच हरामखोर आहोत" असं सखाराम स्टाइल म्हणताना एक अध्याहृत विधान "सगळेच हरामखोर **घाले आहेत" असं होतं.
.
.
.
हेलो....
हे गृहितक चूक आहे. विवेक नावाची वस्तू जिवंत आहे.
(नसती तर मानवजात शिल्लक राहिली नसती.)
.
.
.
धागाकर्त्यानं जे काय लिहिलय ते थेट सरळ लिहिलय असं ह्या धाग्यावर मीच सर्वप्रथम म्हटलय.
पण त्यात "आम्ही करुन मोकळे होतो, तुम्हालाही तेच करायचं असतं, पण जमत नाही" (संधी अभावी सभ्य!)
असा टोन /सूर असेल तर माझा त्या मांडणीला आक्षेप आहे.
अजिबात नाही
लेखातील पात्राबद्दल काहीही म्हणणे नाही.
पात्राला करावेसे वाटले, त्याने केले.
निवेदकानं इथे जे जसे होते ते तसे मांडले.
इथवर सारं ठीक .
पण "सगळ्यांना हेच करायचे असते" अशी भूमिका असेल तर आक्षेप आहे.
केलेले कृत्य अविवेकी किंवा विवेकी ह्याबद्दल सध्या काहीही कमेंट न देणे उत्तम.
(कारण मामला राजी खुशीचा व बहुदा सज्ञान व्यक्तींमधीलच आहे.)
बोलणे अन करणे यांत महदंतर आहे
बोलणे अन करणे यांत महदंतर आहे इतकेच तूर्तास सांगतो. सर्व लोकांच्या मनात असे असेलच असे नाही. पण त्याचबरोबर कैकांच्या मनात असे विचार असले तरी ते दडपले जातात, ही वस्तुस्थिती आहे. अमुक एक विचार फक्त चार लोकांसमोर मांडल्याने ते मांडणारा विकृत इ. ठरत असेल तर याइतके चूक काहीच नाही.
If a tree falls in a forest
If a tree falls in a forest and no one is around to hear it, does it make a sound?
सर्व फरक मांडण्यानेच पडत असतो बॅट्या.
मनात येतच असतात विचार सर्व प्रकारचे. मनात येण्यावर काही नसतं.
मांडण्याइतका प्रामाणिक वाटला जर विचार, तरच मनुष्य मांडतो ही एक शक्यता.
किंवा मनात आहे पण मांडायचे धाडस नाही म्हणून गप्प..पण कोणीतरी सुरुवात केली की आधार वाटून बोलण्याचे धाडस .. ही दुसरी शक्यता.
मनात आहे पण आपली इमेज जपण्यासाठी न मांडण्याचा मुत्सद्दीपणा किंवा धूर्तपणा (जो शब्द आवडेल तो).. ही तिसरी शक्यता.
आपण स्पष्ट बोलतो अशी इमेज जपण्यासाठी मनात आले रे आले की थेट बाहेर बोलणे हा बहिर्मुखपणा.. ही चौथी शक्यता..
फक्त निवडक लोकांशी फक्त वन टू वन बोलणे.. ही पाचवी शक्यता..
पण पण पण..
सर्व शक्यतांना अर्थ आणि वजन तेव्हाच येतं जेव्हा "मांडलं जातं".. "बोललं जातं".
जे बोललं जातच नाही ते कितीजणांच्या मनात असेल किंवा सर्वांच्याच असेल, किंवा थोड्यांच्या तरी असेल, किंवा शितावरुन भात, किंवा तसली काहीही विधानं करता येत नाहीत.
जी विधानं केली जातात ती व्यक्त होणार्या विचारांवरुनच केली जातात..
जंगलात झाड पडलं आणि ऐकायला तिथे कोणी नसेल तर झाडाचा आवाज होतो का?
मांडण्यानेच वजन येतं म्हणून
मांडण्यानेच वजन येतं म्हणून बोलणे अन करणे यातील महदंतर नजरेआड तर केले जात नाही ना? अमुक एक विचार बोलून दाखवला म्हणून तो विकृत इ. आहे अशी मुक्ताफळे कोणी उधळत असेल तर सगळे मानसोपचारतज्ञ इ.इ. विकृतच म्हणावे लागतील.
आणि इतका फरक पडत असेल तर त्या व्यक्तिस्वातंत्र्य नामक मूल्याचं श्राद्ध केल्यागतच झालं नैका? अन्य वेळेस याचे इतके गोडवे गायले जातात अन आत्ता असे प्रतिपादन केले जाते यातील विरोधाभास रोचक आहे.
बोलणे आणि करणे यात महदांतर
बोलणे आणि करणे यात महदांतर असणं हे सत्यच आहे.
पण त्याहीपेक्षा मनात येणं आणि व्यक्त करणं यातली दरी जास्त रोचक आहे. आपण फक्त व्यक्त झालेल्या विचारांविषयीच ठामपणे सांगू शकतो.
व्यक्त न झालेले विचारांना फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस काही अस्तित्व वा अर्थ नसतो, त्यामुळे मनातलं केवळ बोलणं यामुळे कोणी वाईट ठरु नये हा तुझा मुद्दा मान्य असल्याचंच वर मांडतो आहे.. पण केवळ मांडणं हे वाईट ठरवायला पुरेसं नाही असं तात्विकदृष्ट्या म्हटलं तरी ते जे काही मांडलं त्याच्या विषयवस्तूमुळे ते मांडणारी व्यक्ती वाईट ठरु शकते.
माझा मुद्दा इतकाच की "अनेकांच्या (किंवा काहीजणांच्या) मनात येतं पण ते बोलत नाहीत, आणि आम्ही बोलतो म्हणून आम्ही वाईट ठरतो" यासदृश वरच्या क्वोटमधे सबस्टन्स उरत नाही.
आम्ही बोलतो म्हणून वाईट ठरतो याही विधानात खूप सूक्ष्म रेषा आहे.
मुळात बोललं तरच बरं की वाईट हा प्रश्न येतो. त्यामुळे बोललो म्हणून वाईट याला अर्थ नाही.
जे बोललो ते समोरच्या व्यक्तीला कसं वाटलं त्यावर चांगलं वाईट म्हटलं जाणं ठरणार...
मी तर म्हणतो की जे करु तेच बोलावं.. जिथे बोलणं आणि करणं यात प्रचंड फरक करावासा वाटतो ते बोलूच नये.
जे बोलत नाहीत त्यांच्या
जे बोलत नाहीत त्यांच्या सर्वांच्या मनात तसे विचार असतात असे मी कधीच म्हटलेले नाही. पण कैकांच्या असतात आणि ते बोलायला कुचकुचतात. अन जो बोलेल त्याला शेम शेम करीत शिव्या घालतात हे पाहिले असल्याने तो ढोंगीपणा अधोरेखित करावासा वाटला.
बाकी, अॅज़ फॉर
मी तर म्हणतो की जे करु तेच बोलावं.. जिथे बोलणं आणि करणं यात प्रचंड फरक करावासा वाटतो ते बोलूच नये.
असं दरवेळेस होत नाही. विशेषतः पौगंडावस्थेत तर होतच नाही. मग त्यानं ते तसं लिहूही नये? अन जणू तशी फ्यांटसी असणे अनैसर्गिक वाटावे अशा सुरातल्या ढोंगी टीका ऐकाव्यात? का म्हणून?? हे बोलणारे लोक एक त्या गिल्टपोटी टीका करीत असावेत असा ग्रह मग होणे साहजिक नाही काय?
वरील वाक्याशी तस्मात प्रत्येक केसमध्ये सहमत होईन असं नाही. कैक गोष्टी कराव्या वाटतात, पण होत नाहीत. म्हणून बोलूही नयेत? वरील वाक्याला एक विशिष्ट संदर्भ आहे याची जाणीव ठेवूनच मी सांगतोय, की हे व्यक्तिस्वातंत्र्याला विरोधी ठरतं.
अगदी बरोबरच बोलतोयस रे
अगदी बरोबरच बोलतोयस रे तू..
मुद्दा इतकाच होता की केवळ बोलणे ही क्रिया आणि बोलले गेलेले म्याटर यात जवळजवळ अद्वैत असते.
सदरहू लेखकाचे सदरहू लिखाण माझ्यादृष्टीने अजिबात टीकापात्र नाही. उलट सरळ लिहीले आहे असे आगोदरही लिहिलेच आहे.
पण कोणी हरकत घेत असेल किंवा वाईट ठरवत असेल तर (ते वाईट ठरवणं योग्य /अयोग्य आहे असं नव्हे) पण ते जे काही प्रतिकूल ठरवणारी मतं आहेत ती "केवळ व्यक्त झाल्याने" येत नसून "जे व्यक्त केलेले म्याटर आहे" त्यावरुनच येत आहेत.. पुन्हा एकदा.. मते येणे हे समोरच्या व्यक्तीच्या परसेप्शनवर अवलंबून आहे, केवळ "मी व्यक्त झालो" या सबबीने आपण टीका थांबवू शकत नाही कारण टीका किंवा कौतुक, जे काय मिळायचे ते बेसिकली व्यक्त झाल्यासच मिळते / होते.. आणि ते "जे काय व्यक्त झाले ते समोरच्याला कसे वाटले" यावरच ठरते. व्यक्त न झालेले लोक यात ऑपॉप चांगले ठरत नाहीत किंवा ठरु नयेत. तोंडाला सुगंध येतो किंवा दुर्गंधी मारते ही घटना मुळात श्वासोच्छवास करणार्या दोन जीवांबाबतच होऊ शकते. मी केवळ श्वास सोडला म्हणून कोणी बरेवाईट रिअॅक्ट होत नाहीत तर श्वासातून आलेला वास जो त्या श्वासाचा इंटेग्रल पार्ट असतो तो त्यांना कसा वाटतो यामुळे रिअॅक्ट होतात.
बस्स.. इतकाच मुद्दा होता आणि तो नवीनही नव्हता.
काही मते.
वर शहराजाद यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेशी बरीचशी सहमत आहे.
या धाग्याच्या निमित्ताने स्त्री-पुरुषांच्या लैंगिक निवडी, निवडीचा अधिकार, स्त्रीवादी दृष्टीकोन, स्त्रीशरीराचे वस्तुकरण वगैरे मुद्द्यांवरील चर्चांमध्ये काही प्रतिसादकर्त्यांकडून बराच अभिनिवेश जाणवला आणि त्यामुळे मला एक 'स्वतंत्र स्त्री' म्ह्णून म्ह्णून वाटलेले मुद्दे असे:
१) स्त्रीशरीरच्या वस्तुकरणाच्या मुद्द्याबद्दल बोलताना आपल्याला पुरुषशरीराच्या वस्तुकरणाच्या मुद्द्याबद्दल बोलणे टाळता येणार नाही. केवळ "स्त्रीशरीराचे वस्तुकरण हजारो वर्षे चालले आहे, त्यामानाने पुरुष शरीराचे वस्तुकरण हे अगदीच मर्यादित असल्याने ग्राह्य नाही" असा युक्तिवाद मला पुरेसा वाटत नाही. पुरुषशरीराचे वस्तुकरणही होत असतेच, ते लैंगिक बाबतीतच असते असे नव्हे पण क्रिडाक्षेत्रात, शारीरीक मेहनतीच्या कामांत त्याचे वस्तुकरण होतच असते. लैंगिक व्यवहारातही स्त्रिया जशा अधिकाधिक स्वतंत्र होत जातील आणि झपाट्याने बदलत असलेल्या अर्थव्यवस्थेत जशी त्यांच्याकडे अधिक क्रयशक्ती येईल त्या प्रमाणात, बाजाराच्या 'मागणी तसा पुरवठा' तत्वाप्रमाणे पुरुषशरीराचेही वस्तुकरणही होतच राहील. ते बरोबर आहे किंवा नाही, नैतिक आहे किंवा नाही याचा विचार 'लिंगनिरपेक्ष' व्हायला हवा.
२) स्त्रीशरीरच्या वस्तुकरणाबद्दल बोलताना नेहमी तरूण मुलींच्या स्वसन्मानाबद्दल बोलले जाते (ते ठीकच आहे) पण याची जबाबदारी फक्त पुरुषवर्गाच्या माथ्यावर मारून मोकळे होता येणार नाही. आर्थिक दृष्या स्वतंत्र, सुशिक्षित आणि समान संधी उपलब्ध असलेल्या स्त्रियांनी स्वतःला आणि आपल्या मुलींना हा आत्मसन्मान देण्याची जबाबदारी स्वतःवरही घेतली पाहिजे. माध्यमांतून कामे करणार्या, अधिकाराच्या जागांवर असलेल्या स्त्रियांकडूनही अनेकदा या प्रतिमा बळकट केल्या जातात त्यामुळे स्त्रीशरीराचे वस्तुकरण करणार्या व्यवस्थांकडेही लिंगनिरपेक्षपणे पहायला हवे.
३) नगरीनिरंजन यांनी मांडलेला
"मध्यंतरी गौरी कानेटकरांच्या एका लेखात एका घटस्फोटितेला आपण निव्वळ शरीरसंबंध ठेवू असे सुचवणार्या एका घटस्फोटित माणसाच्या "घाणेरड्या" वागण्याबद्दल वाचले. म्हणजे विचारायचेसुद्धा नाही का?"
हा मुद्दा मला वैध वाटतो. स्त्रीला लैंगिक गरजाच नसतात वगैरे असं काहीतरी यातून अभिप्रेत होतं त्यामुळे स्त्रीनेदेखिल या मानसिकतेतून स्वतःची सोडवणूक करून घ्यायला हवी. "नाही" असे उत्तर असेल तर तसे ठामपणे सांगताना विचारलेल्या पुरुषाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करायची काहीच आवश्यकता नाही. दर्शविले गेलेले 'लैंगिक आकर्षण' आणि 'लैंगिक छळ' यातला फरक समजण्याची कुवत आणि आत्मविश्वास आपल्या मुलींत तयार व्हावा असे मला खरेच वाटते. पुरुषप्रधान समाजाने लादलेली नैतिक मूल्ये चुकीची वाटत असल्यास ती झुगारण्याचे स्वातंत्र्यही माझ्या मुलीत यावे असे मला वाटते. पुरुष जेंव्हा लैंगिक मोकळेपणाविषयी बोलतो त्यावेळा त्याची विचारसरणी ही नेहमी दुट्टपीच असते असा निष्कर्षही मला अन्यायकारक वाटतो.
मला वाटते मराठी साहित्यात स्त्रीपुरुषांच्या लैंगिकतेला या सरळधोपट नैतिकतेतून सोडवायचे काम मेघना पेठेंसारख्या स्त्रीलेखिकेने यशस्वीपणे केले आहे.
४) पुरुषांच्या लैंगिक प्रेरणांबद्दल अथवा निवडींबद्दल त्यांनी स्त्रीशरीराचे वस्तुकरण केले आहे असे म्हणायचे आणि स्त्रीच्या लैंगिक प्रेरणा मात्र निसर्गाच्या नियमांनुसार चालतात असे समजायचे हेही मला दुट्टप्पी वाटते. 'पुरुषांना मोठया वक्षांचे आकर्षण असते' अशासारख्या विधानांनी एक स्त्री म्हणून मी लगेच अपमानित व्हावे असे अजिबात वाटत नाही मात्र त्याबद्दल काही ठोस विदा आहे का, असल्यास त्यामागे काय शास्त्रीय कारणे असू शकतील याबद्दल मला कुतुहल वाटते. अर्थात माझ्याकडे "केवळ" "वक्षांची जोडगोळी" म्हणून पहाणार्या कोणत्याही पुरुषाबद्दल मला किंचितही आदर, आपुलकी अथवा आकर्षण वाटत नाही हे ही तितकेच खरे आहे; पण म्हणून 'वक्षांची जोडगोळी' पाहणे आवडणारा पुरुष स्त्रीकडे व्यक्ती म्हणून पहायला असमर्थ असतो असे म्हणणे मला सरसकटीकरण वाटते. :-)
मला कल्पना आहे की मी वर जी विधाने केली आहेत ती सर्व समाजांत, सध्याच्या काळात आणि स्त्रीच्या तात्कालिक सबलीकरणाच्या अवस्थेत जशीच्या तशी लागू होऊ शकत नाहीत पण तरीही थिसरॉटिकली बोलताना विचार काळाच्या पुढे जाऊनच केला पाहिजे असे वाटते. ऐसी अक्षरेसारख्या प्रगल्भ संस्थळावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणार्या पुरुष सदस्यांना तरी शंकेचा फायदा द्यायला हवा असे वाटते. स्त्रीवादातील काही मुद्द्यांबद्दल प्रतिकूल मते असलेल्या पुरुष सदस्यांकडे नेहमी शंकेने पहाणे मलातरी माझ्या स्त्रीवादी भूमिकेच्या विपरीत वाटते.

विनोदी संशोधन
In reply to थेट मनातून ऐसीवर by ग्रेटथिंकर
विनोदी संशोधन