Skip to main content

अभिव्यक्ती

2 minutes

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही. संत कबीर सारख्यांनी तर निंदकाचे स्वागतच केले आहे. त्यांनी म्हंटले आहे,

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।

हिंदू -मुसलमान दोन्ही धर्मांत पसरलेल्या अंध विश्वासांवर कबीर ने चौफेर हल्ला चढविला होता, काही उदाहरणे:

पाहन पुजे तो हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड़।
ताते या चाकी भली, पीस खाए संसार।।
कॉंकर पाथर जोरि कै, मस्जिद लई बनाय।
ता चढ़ मुल्‍ला बॉंग दे, बहिरा हुआ खुदाए।।

एवढे असूनही, त्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले. आज तेवढी ही सहनशीलता आपल्यात नाही. आज दुष्ट प्रकृतीचे लोक स्वत:ला 'धर्मगुरू' म्हणवितात आहे. जर सैतानांनी, धर्मगुरुंचे रूप धारण केले तर त्यांना आपल्या विरुद्ध कोणी काही म्हंटलेले कसे आवडेल. दुष्ट प्रकृतीच्या लोकांना निंदा सहन होत नाही. त्यांच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही. प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले. धर्म जात आणि पंथ नावाच्या खाली आज अभिव्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न होतो, आपण त्याचा निषेध केला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी अभिव्यक्ती या विषय वर कविता लिहिली होती. पुन्हा ती कविता, थोडी बदलून


अभिव्यक्ती
कानात बोलली
छाटून टाकली
जीभ तिची.


अभिव्यक्ती
शब्दात वाचली
जाळून टाकली
पुस्तके ती.


अभिव्यक्ती
रेषांत दिसली
छाटून टाकले
हात ते.


नराधम राक्षसाना
वाटते सदा भीती
सत्याची.
अभिव्यक्तीची

Node read time
2 minutes

तिरशिंगराव Sat, 17/01/2015 - 09:51

In reply to by अजो१२३

तिरशिंगराव
*(या नावाचा अर्थ काय असावा बरे)

अवांतर होत असेल, पण मलाही उत्सुकता आहे. भाषाप्रभूंनी अर्थ वा व्युत्पत्ती विषद करावी.

ॲमी Fri, 16/01/2015 - 18:21

In reply to by 'न'वी बाजू

'एक विचित्र मुलगी' विसरलात? :O काय हे!! 'ललित' झालेला पहिला (चूभूद्याघ्या) आणि एकमेव टिब्बल सेंच्युरी धागा.
त्यातपरत लेटेस्ट फ्याडप्रमाणे इथे कोणी मास्तर/रीण पण आले नाहीत छडी घेऊन, "ललित करू नका", "असंबंध बोलू नका" वगैरे.

'न'वी बाजू Fri, 16/01/2015 - 18:41

In reply to by ॲमी

हो, 'एक विचित्र मुलगी' अंमळ विसरलोच होतो. गूगलची मदत घेतल्यावर आठवले. पण हे 'ललित' होणे (रादर, 'ललित करू नका', 'असंबंध बोलू नका' वगैरे मास्तर/रीणगिरी / छडी) ही काय भानगड आहे? (माफ करा, ३००+ प्रतिसादांची छाननी करायचा पेशन्स नाही म्हणून विचारतो.)

ॲमी Sun, 18/01/2015 - 03:37

In reply to by ॲमी

ललित होणे = ललित लेखनावर घमासान चर्चायुद्ध होणे

मास्तर/रीण छडी वगैरे = संपादक किंवा सदस्यांनी "ललित धाग्याचे काथ्याकूट करू नका" असे सांगणे

अस्वल Sat, 17/01/2015 - 08:41

ह्या बातमीवर आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल काय मत आहे?
लोकसत्तामधील बातमी - http://www.loksatta.com/sampadkiya-news/renowned-perumal-murugan-passed…
(तामिळमध्ये लिहिली कादंबरी तेव्हा सगळं ठीक होतं! इंग्रजीत भाषांतर झाल्यावर अचानक भावना दुखावल्या गेल्या. चालायचंच!)

अजो१२३ Sat, 17/01/2015 - 15:49

In reply to by अस्वल

पण येथे त्यास अपवाद करून सांगता येईल, की भावना दुखावण्यास सुरुवात कादंबरीच्या नावातूनच झाली आहे. मधोरुबागन म्हणजे अर्धनारीश्वर. हे शिवशंकराचे एक रूप. पुरुष आणि प्रकृतीचे एकत्व दर्शविणारे. हा अर्धनारीश्वर नमक्कलमधल्या तिरुचेंगोडचे ग्रामदैवत. तेथे दरवर्षी रथयात्रा भरते. पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत त्या यात्रेत एक सुफलनविधी चाले. जी अभागी गृहिणी आपल्या कुटुंबास वंशाचा दिवा देऊ शकत नसे, ती या यात्रेत येई. भेटेल त्या पसंतीच्या पुरुषाशी रत होई आणि कोणत्याही महिलेचा मोक्ष म्हणजे जे मातृत्व ते मिळवून जाई. हा पुरुष म्हणजे परमेश्वराचा अवतार मानला जाई आणि त्याच्यापासून होणाऱ्या वंशाच्या दिव्या-दिवटय़ांना अर्धनारी किंवा सामी पिल्लई (देवदत्त मूल) म्हणत. त्या महिलेचा पती आणि कुटुंब आनंदाने ती देवाची देणगी स्वीकारत असत. अशा प्रथा सर्वच प्राचीन समाजात असत. महाकाव्यांनी अजूनही त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. त्या आपण अर्थातच नाकारायच्या असतात किंवा त्यांच्यामध्ये कृत्रिम गर्भधारणा, मूलपेशी यांसारखे विज्ञान शोधून त्याचे ढोलताशे वाजवायचे असतात.

बॅटमॅन Mon, 19/01/2015 - 13:33

In reply to by अजो१२३

पण या प्रथेविरुद्ध बोंबा मारणारे तुमचे लाडके धार्मिकच आहेत. कुणी सूडोसेकुलर नाहीत. त्यामुळे तुमचे सूडोब्रह्मास्त्र इथे फेल गेलेले आहे.

रुची Wed, 21/01/2015 - 05:33

In reply to by मेघना भुस्कुटे

मी सलमान रश्दीचं सॅटनिक व्हर्सेस पुर्ण वाचलेलं नाही. रश्दी हा एक सामान्य कुवतीचा लेखक आहे असं समिक्षक म्हणतात ते मला बऱ्याच अंशी पटतं. केवळ पुस्तक गाजवण्यासाठी कुणी जेव्हा मुस्लीमांना पवित्र काही व्यक्तींची नावं त्या पुस्तकातल्या वेश्या-भडव्यांच्या पात्राला देतं, तेव्हा कलावंताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा दुय्यम होऊन जातो.

हे वाचून चांगलीच बुचकळ्यात पडले. "सलमान रश्दीचं सॅटनिक व्हर्सेस पुर्ण वाचलेलं नाही" आणि "रश्दी सामान्य कुवतीचा लेखक आहे असं समिक्षक म्हणतात", "केवळ पुस्तक गाजवण्यासाठी" असे पूर्वग्रह बाळगून मग "स्वातंत्र्याचा मुद्दा दुय्यम होऊन जातो" वगैरे म्हणणं कितपत गांभिर्याने घ्यावं ते समजेना. म्हणजे फतव्याचे नाही पण पुस्तक बंदीचे समर्थन आहे काय? शिवाय समिक्षकांमधे लेखकांच्या मूल्यमापनाबद्दल नेहमी एकमत असते काय? रश्दी उत्तम दर्जाचे लेखक आहेत आणि अलिकडच्या काळात त्यांनी काही ढिसाळ पुस्तके लिहिली आहेत असे मानणारे अनेक समिक्षक आणि इतरेजन असावेत.

अस्सल प्रतिभावंत, चुष म्हणून नव्हे, सवंग प्रसिद्धीसाठी नव्हे, तर कलाकृतीची गरज म्हणून जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही तरी निर्मिती करतो तेव्हा ती सगळ्या विरोधांना पुरुन उरते.

हे कोण ठरविणार? लेखकाच्या / कलाकाराच्या प्रेरणा काय आहेत हे ठरविण्याचा अधिकार कोणाला द्यायचा आणि का?

जगभरातले रसिक अश्या कलाकृतीच्या आणि कलावंताच्या मागे कधीनंकधीतरी ठाम पणे ऊभे राहातात हा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि म्हणूनच भविष्यही आहे.

त्याच मुद्द्यावर सॅटनिक व्हर्सेस विरोधांना पुरून उरली आहे असेही म्हणता येईल की. शिवाय जाणीवपूर्वक प्रक्षोभक असलेल्या कलाकृती सवंगच असतात असे तरी कोठे आहे? प्रक्षोभक, वादग्रस्त कलाकृती, काटेरी विनोद, विद्रोही लिखाण हे काही प्रमाणात कर्कश्य असू शकतं, काही प्रमाणात भावना दुखावणार्या पण म्हणून ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा गौण कसा ठरतो? व्यक्त होणार्यानेच आपल्या प्रेरणा तपासून पहाव्यात आणि त्याला शाब्दिक विरोध करणार्यांचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सुसंस्कृत समाजाने मान्य करावे इतकीच भूमिका समंजस वाटते. बाकी मतमतांतरातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे.

धनंजय Wed, 21/01/2015 - 06:41

In reply to by रुची

मला बऱ्यापैकी आवडली "Satanic Verses".

क्वचित बटबटीत वाटू शकेल, पण सवंग वाटली नाही.

त्या कथानकातील वेश्या पात्रे चांगल्या माणुसकीची आहेत, खल वा नीच नव्हेत. ही बाब असल्या वादांत विशेष वाचू-ऐकू येत नाहीत, खरे. कादंबरी मुसलमान धर्माच्या (लेखकाला त्यातील टिकावेसे सत्त्व वाटते, त्याच्या) विरोधात नाही, असे मला वाटले.

रुची Wed, 21/01/2015 - 07:19

In reply to by धनंजय

मलाही आवडली होती ती कादंबरी. अर्थात ती धार्मिक मुस्लिमांना ती अपमानास्पद किंवा प्रक्षोभक वाटली असल्यास मला समजू शकते. त्याशिवाय सलमान रश्दींची 'हरून अँड सी ऑफ स्टोरीज', 'मिड्नाईट्स चिल्ड्रेन' इतर काही लघुकथा वगैरे विशेष आवडले असल्याने त्यांच्यावर केलेल्या दोषारोपांशी अर्थातच असहमती आहे.