Skip to main content

लग्नाआधी सेक्स म्हणजे बलात्कार असेलच असे नाही: मुंबई उच्च न्यायालयाचे भाष्य

लग्नाआधी ठेवलेल्या शरीरसंबंधांना दरवेळी थेट बलात्कार ठरवून विवाहाचं बंधन घालता येणार नाही - मुंबई उच्च न्यायालयाचे भाष्य (हा निकाल नाही. मात्र सुचक व महत्त्वपूर्ण असे पुरवणी भाष्य आहे)

गवि Mon, 29/12/2014 - 17:28

बातमी रोचक आहे. पण त्यातले खालील उल्लेख बुचकळ्यात पाडून गेले.

तक्रारदार तरुणी सुशिक्षित आहे आणि तिने समजून-उमजून राहुलशी शारीरिक संबंध ठेवल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं

भादंविच्या ३७६व्या कलमानुसार, एखाद्या गरीब आडाणी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून कोणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

आँ ?!

शिवाय जस्ट बादवे, अशा प्रकारच्या खटल्यांमधे पुरुष आणि स्त्री या दोघांची नावे पब्लिकली डिक्लेअर करता येतात मीडियाला? बदनामी होईल अशा केसेसमधे विशेषतः स्त्रीचं नाव छापता येत नसावे अशी समजूत होती. इथे कुठे नाव बदलून छापले असल्याचाही उल्लेख दिसला नाही.

नगरीनिरंजन Tue, 30/12/2014 - 05:35

In reply to by गवि

तो बलात्कार नसून परस्परसंमतीचा संभोग होता हे कोर्टात सिद्ध झाल्याने नाव छापले असावे. संभोग केला यात बदनामी ती काय? (लोक आपल्या संभोगाचे पुरावे मोठ्या कौतुकाने कडेवर किंवा प्राममध्ये घेऊन फिरत असतात की. :) )
उलट नाव छापून मटाने चांगला पायंडा पाडला आहे. केस लावताना विचार तरी करतील मुली.
खरं म्हणजे बलात्कारालाही पुरुषाच्या बाजूने गुन्हा आणि स्त्रीच्या बाजूने एक अपघात समजतील तो सुदिन.

अनु राव Wed, 31/12/2014 - 10:56

In reply to by नगरीनिरंजन

शरीर संबंधाच्या बाबतीत भारतीय स्त्री ची विचारसरणी चुकीची आहे आणि त्यामुळे असल्या समस्या येत आहेत.
शरीरसंबंधात स्त्री देणारी आणि आणि पुरुष घेणारा आहे असा भारतीय बाई विचार करते आणि मग आपण काहीतरी देतो आहोत तर मग त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळाले पाहीजे ( लग्न वगैरे ) अशी भुमिका असते.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 11:02

In reply to by अनु राव

शरीर संबंधाच्या बाबतीत भारतीय स्त्री ची विचारसरणी चुकीची आहे आणि त्यामुळे असल्या समस्या येत आहेत.
शरीरसंबंधात स्त्री देणारी आणि आणि पुरुष घेणारा आहे असा भारतीय बाई विचार करते आणि मग आपण काहीतरी देतो आहोत तर मग त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळाले पाहीजे ( लग्न वगैरे ) अशी भुमिका असते.

भारतीय पुरूष कसा (आणि कोणता वेगळा) विचार करतात? याची (उगाचच) उत्सुकता निर्माण झाली आहे. :)

समांतरः
शेवटी स्त्रीची विचारसरणीच नव्हे तर आचार, विचार वगैरे सगळेच चुकीचे असते हे धृपद सर्व जगात संमत आहे. भारतातही ते तसेच समजले जावे यात नवे काहीच नाही

अनु राव Wed, 31/12/2014 - 11:32

In reply to by ऋषिकेश

ज्या केसेस समोर आल्या आहेत त्यात फसवणुकीच्या तक्रारी फक्त स्रियांनी केल्या आहेत, म्हणुन मी स्त्रियांबद्दल लिहीले.
तक्रारी केल्या नसत्या तर बोलण्याचा प्रश्नच आला नसता.

बाई म्हणुन सांगु शकते की पुरुषांची विचार सरणी एका टोका पासुन दुसर्‍या टोका पर्यंत कशी ही असु शकते.
पण बायकांची शक्यतो मी वर लिहीले आहे त्याच मार्गाने जाते.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 11:35

In reply to by अनु राव

ज्या केसेस समोर आल्या आहेत त्यात फसवणुकीच्या तक्रारी फक्त स्रियांनी केल्या आहेत

म्हणजे हा (फक्त) स्त्रियांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे की पुरुषांच्या आचरणाचा (नी नैतिकतेचा)?

अनु राव Wed, 31/12/2014 - 11:51

In reply to by ऋषिकेश

म्हणजे हा (फक्त) स्त्रियांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे की पुरुषांच्या आचरणाचा (नी नैतिकतेचा)?

ज्या केसेस बद्दल मी बोलते आहे ( लग्नाचे आश्वासन देउन रेप ), हा मला स्त्रियांच्या नैतिकतेचा प्रश्न वाटत आहे.
पुढच्या सर्व शक्यता माहीती असुन शरीरसंबंध ठेवणे ही स्त्री ने घेतलेली Calculated Risk आहे. आणि मी वर म्हणले तसे की "मी माझे शरीर देवुन (?) सुद्धा मला परताव्यात काही ( लग्न ) मिळत नाहीये" ह्या भावनेतुन सुड म्हणुन असल्या गोष्टी होत आहे.

'न'वी बाजू Wed, 31/12/2014 - 16:05

In reply to by अनुप ढेरे

समहत आहे.

'समहत' की 'सहमत'?

नाही, अर्थ भयंकरच बदलतो, म्हणून विचारले.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 13:56

In reply to by अनु राव

म्हणजे अश्या केसेसमध्ये लग्न करायचे नसताना तसे आश्वासन देणे यात पुरूषाच्या आचरणात दोष नाही?
तुम्ही दोष फक्त स्त्रियांना (ते ही त्या स्त्रीलाच नाही तर भारतीय स्त्रीयांच्या मानसिकतेला घाऊकपणे) देताय याचे आश्चर्य वाटते.

अनु राव Wed, 31/12/2014 - 14:07

In reply to by ऋषिकेश

म्हणजे अश्या केसेसमध्ये लग्न करायचे नसताना तसे आश्वासन देणे यात पुरूषाच्या आचरणात दोष नाही?

पुरुषाच्या आचरणात दोष आहे, नाही असे नाही. पण त्याला कारणे पण असु शकतात. पण स्त्रीया फसवले गेले असा टाहो फोडत आहे ते चुक आहे.

१. खरेच लग्नाचे आश्वासन दिले होते की नाही ते माहीती नाही. दिले असल्यास त्याच्या T&C माहीती नाहीत.
२. जेंव्हा आश्वासन दिले होते तेंव्हा ते पाळण्याचा उद्देश होता, पण नंतर काही कारणानी विचार बदलला. कदाचीत दुसरी स्त्री आवडली असेल.
३. जाणुन बुजुन पुरुषाने खोटे आश्वासन दिले असेल कारण त्या स्त्री ने लग्नाचे वचन देत असशील तर शरीरसंबंध चालेल असे सांगितले असेल.

ते ही त्या स्त्रीलाच नाही तर भारतीय स्त्रीयांच्या मानसिकतेला घाऊकपणे

तुम्ही माझा मुळे मुद्दा समजुन घ्या. सेक्स च्या बाबतीत स्त्री ही देणारी आणि पुरुष हा घेणारा ही जी स्त्रियांची मनोवृत्ती आहे ( आणि दुर्दैवानी ही भारतीय ( स्पेसिफिकली ) मनोवृत्ती आहे ) त्यातुन हे असे सो कॉल्ड फसवणुकीचे प्रकार होतात.
स्त्री ला जर ती पुरुषाला काहीतरी देते आहे असे वाटत नसेल तर त्याच्या कडुन त्या बदल्यात लग्नाचे वचन वगैरे घेण्याची गरजच वाटणार नाहे.

चिंतातुर जंतू Wed, 31/12/2014 - 14:23

In reply to by अनु राव

>> सेक्स च्या बाबतीत स्त्री ही देणारी आणि पुरुष हा घेणारा ही जी स्त्रियांची मनोवृत्ती आहे ( आणि दुर्दैवानी ही भारतीय ( स्पेसिफिकली ) मनोवृत्ती आहे ) त्यातुन हे असे सो कॉल्ड फसवणुकीचे प्रकार होतात.
स्त्री ला जर ती पुरुषाला काहीतरी देते आहे असे वाटत नसेल तर त्याच्या कडुन त्या बदल्यात लग्नाचे वचन वगैरे घेण्याची गरजच वाटणार नाहे.

मला वाटतं मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय स्त्रियांचं वास्तव आणि सर्वसामान्य आर्थिक स्तरातल्या किंवा सरंजामी व्यवस्थेतल्या स्त्रियांचं वास्तव ह्यात फरक असतो. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीत अजूनही स्त्रीवर लग्नाआधी (आणि नंतरही) पुरुषाकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी दबाव येतो. संभोग ही त्यातली एक आहे. ह्याकडे दुर्लक्ष होतं आहे असं प्रतिसादांवरून वाटतंय.

अनु राव Wed, 31/12/2014 - 15:02

In reply to by चिंतातुर जंतू

मला वाटतं मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय स्त्रियांचं वास्तव आणि सर्वसामान्य आर्थिक स्तरातल्या किंवा सरंजामी व्यवस्थेतल्या स्त्रियांचं वास्तव ह्यात फरक असतो.

हे खरे आहे. माझ्या पुरते सांगायचे तर, मला फक्त मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय स्त्रीयांबद्दल बोलायचे आहे, ज्यांच्याशी मी रीलेट करु शकते. तसेच इथे पण सगळे ह्याच कॅटेगरीतले आहेत.
बाकीच्या सरंजामी व्यवस्थेतल्या स्त्रीयांशी मी रीलेट करु शकते असला पोकळ दावा मी करणार नाही. खरे सांगायचे तर मला त्यांच्याशी रीलेट करण्याची आतुन इच्छा पण नाही. मी उगाच मला सामाजिक भान वगैरे आहे असे दाखवणार नाही.

नितिन थत्ते Wed, 31/12/2014 - 15:22

In reply to by अनु राव

>>खरे सांगायचे तर मला त्यांच्याशी रीलेट करण्याची आतुन इच्छा पण नाही.

अनु राव हा गब्बरसिंग यांचा डु आयडी आहे का?

चिंतातुर जंतू Wed, 31/12/2014 - 15:28

In reply to by अनु राव

>> मला फक्त मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय स्त्रीयांबद्दल बोलायचे आहे, ज्यांच्याशी मी रीलेट करु शकते. तसेच इथे पण सगळे ह्याच कॅटेगरीतले आहेत.

कायदा मात्र सर्व भारतीयांसाठी आहे आणि तुमच्या खालील प्रकारच्या वाक्यांमुळे तुम्हीही सर्व भारतीयांबाबत विधाने करता आहात असा वाचकाचा गैरसमज होऊ शकतो.

>> शरीर संबंधाच्या बाबतीत भारतीय स्त्री ची विचारसरणी चुकीची आहे

अनु राव Wed, 31/12/2014 - 15:32

In reply to by चिंतातुर जंतू

ओके - ह्या पुढे मी चुकुन भारतीय हा शब्द वापरला तर तो फार थोड्या भारतीयांबद्दल आहे असे समजुन घ्या ही विनंती.

शहराजाद Wed, 31/12/2014 - 21:41

In reply to by अनु राव

आपण शब्दाच्या वापरातली त्रुटी सरळपणे स्वीकारलीत हे आवडले.

ह्या पुढे मी चुकुन भारतीय हा शब्द वापरला तर तो फार थोड्या भारतीयांबद्दल आहे असे समजुन घ्या ही विनंती

त्यापेक्षा फार थोड्या भारतीयांबद्दल लिहिताना 'भारतीय' हा शब्द न वापरता 'फार थोडे भारतीय' किंवा ज्या 'भारतीय उपगटाला उद्देशून आहे तो उपगट' याचा आपणच स्पष्ट उल्लेख करणे जास्त योग्य होणार नाही का?

अनुप ढेरे Wed, 31/12/2014 - 15:36

In reply to by चिंतातुर जंतू

मला फक्त मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय स्त्रीयांबद्दल बोलायचे आहे,

अमिष दाखवून केलेल्या संभोगाला बलात्कार ही तक्रार सर्व वर्गातल्या स्त्रीयांकडून येते काय?

चिंतातुर जंतू Wed, 31/12/2014 - 15:54

In reply to by अनुप ढेरे

>> अमिष दाखवून केलेल्या संभोगाला बलात्कार ही तक्रार सर्व वर्गातल्या स्त्रीयांकडून येते काय?

असं मला दिसतं.
उदाहरण १
उदाहरण २
उदाहरण ३
उदाहरण ४
उदाहरण ५

शहराजाद Wed, 31/12/2014 - 21:31

In reply to by अनु राव

मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय स्त्रीयांबद्दल बोलायचे आहे, ज्यांच्याशी मी रीलेट करु शकते. तसेच इथे पण सगळे ह्याच कॅटेगरीतले आहेत.

सगळे? कशावरून?

नगरीनिरंजन Thu, 01/01/2015 - 07:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

=))
धन्यवाद! (फिर्यादी मुलीचा तसा दावा असला आणि धाग्याच्या शीर्षकात बलात्कार हा शब्द असला तरी) बलात्काराचा इथे काही संबंध नाही हे तुम्हाला कळल्याचं पाहून भरून पावलो!
तुमचेही नूतनवर्षाभिनंदन!!

प्रकाश घाटपांडे Mon, 29/12/2014 - 19:04

संमतीने शरीरसंबंध ठेवले व नंतर काही काळाने व काही कारणाने जर स्त्रीला तो संबंध ही चूक वाटली तर ती बलात्कार हा गुन्हा दाखल करते. फसवून ठेवलेले शरीरसंबंध,आमिष दाखवून ठेवलेले शरीरसंबंध, हा बलात्कार ठरवल्यामुळे बलात्कारांच्या केसेसची संख्या एकदम वाढते. प्रत्येक अनैतिक संबंधांची नोंद बलात्कार म्हणुन करावयची झाल्यास ही संख्या अजून खूपच वाढेल. बलात्कार या शब्दाचा अर्थ शारिरिक बळाचा वापर करुन जबरदस्तीने इच्छेविरुद्ध केलेला संभोग असा अर्थ पुर्वी घेतला जायचा. त्यामुळे केस चे गांभीर्य वाढायचे. आता जणु हे नेहमीच झाले आहे म्हणुन बातम्यांकडे दुर्लक्ष करण्याचा कल वाढला आहे असे मला वाटते. कोर्ट निकालाबरोबर सुचक भाष्यही करते त्यामुळे एक दिशा जी मिळते ती कायदयांमधील बदल करायच्या वेळी विचारात घेतली जाते.

ॲमी Wed, 31/12/2014 - 10:30

राहुलने आपला बचाव करताना 'आम्ही परस्परसंमतीनेच संबंध ठेवले होते. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्यानं लग्न करू शकत नाही,' असं न्यायालयात सांगितलं. >> हा बचाव पटतोय का? मंजे प्रेम/सेक्ससाठी धर्म, जात आड येत नाही पण लग्नासाठी येते. हे मला तकलादू कारण वाटत. अशा केसेससाठी चेक बाउंससारखी ब्रिच ऑफ प्रॉमिसची सोय असावी असे सध्यातरी मत आहे. जेवढा काळ नातं होतं त्याकाळात गर्भपात वगैरेमुळे शारिरीक, मानसीक नुकसान झाले असल्यास त्याची मॉनेटरी भरपाई मिळावी.

अनु राव Wed, 31/12/2014 - 10:53

In reply to by ॲमी

ब्रिच ऑफ प्रॉमिसची सोय असावी असे सध्यातरी मत आहे.

@टींकू - हे बरोबर वाटत नाही. लग्न करायचे ठरल्यावर, नंतर तुमच्या होणार्‍या पार्टनर चा खरा स्वभाव समोर आला, किंवा काही वाईट गोष्टी कळल्या किंवा आवडी निवडी जुळत नाहीत असे समजले तर प्रॉमिस तोडायलाच पाहीजे आणि त्या बद्दल काही शिक्षा पण नको.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 11:05

In reply to by अनु राव

लग्न करायचे ठरल्यावर, नंतर तुमच्या होणार्‍या पार्टनर चा खरा स्वभाव समोर आला, किंवा काही वाईट गोष्टी कळल्या किंवा आवडी निवडी जुळत नाहीत असे समजले तर प्रॉमिस तोडायलाच पाहीजे आणि त्या बद्दल काही शिक्षा पण नको.

यात शरीरसंबंध आला पाहिजे काय? आणि त्यातून अपत्यप्राप्ती झाली तरी प्रॉमिस तोडायची मुभा हवी काय?
===
दुसरा मुद्दा असा की समजा लग्न ठरले आहे, स्त्री-पुरूषांनी संभोगही केला आणि गर्भधारणा झाल्यावर एखाद्या स्त्री ला असे संबंध तोडायचे असतील (व पुरूषाला नसतील) तर तिला शिक्षा व्हावी काय?

नगरीनिरंजन Wed, 31/12/2014 - 11:31

In reply to by ऋषिकेश

असुरक्षित संभोग केल्यास रोग वा अपत्यप्राप्ती (प्राप्ती?!) होऊ शकते हे स्त्रीला माहित असते काय? लग्नाचे तोंडी वचन या माहितीला बाजूला ठेवण्यासाठी पुरेसे असते का?
मुख्य म्हणजे काही कारणाने लग्न होत नसेल तर स्त्रीने संभोग व अपत्यसुखाचा अनुभव घेऊच नये काय?

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 11:40

In reply to by नगरीनिरंजन

लग्न करणार नाही हे माहित असूनही संभोग / अपत्यप्राप्ती (सुख शब्द सापेक्ष. प्रत्येक व्यक्तीला अपत्य हे सुखच वाटेल असे मी मानत नाही.) होणे यावर इथे चर्चाच चाललेली नाही.

असुरक्षित संभोग केल्यास रोग वा अपत्यप्राप्ती (प्राप्ती?!) होऊ शकते हे स्त्रीला माहित असते काय? लग्नाचे तोंडी वचन या माहितीला बाजूला ठेवण्यासाठी पुरेसे असते का?

हे पुरूषालाही माहित असतेच तरीही तोही ती रिस्क तितकीच उचलतो हे मान्य आहे ना?

माझा प्रश्न संभोग करावा की करू नये असा नाहीच्चे.प्रश्न कृपया पुन्हा वाचा. त्याची उत्तरे देऊन प्रतिप्रश्न आले तर अधिक आवडतील.

नगरीनिरंजन Wed, 31/12/2014 - 12:04

In reply to by ऋषिकेश

लग्न करणार नाही हे माहित असूनही संभोग / अपत्यप्राप्ती (सुख शब्द सापेक्ष. प्रत्येक व्यक्तीला अपत्य हे सुखच वाटेल असे मी मानत नाही.) होणे यावर इथे चर्चाच चाललेली नाही.

नाही, लग्न करतो असे म्हणून संभोग केला आणि लग्न केले नाही तर स्त्रीवर अन्याय होतो असा काहिसा तुमचा दावा दिसला म्हणून खात्री करून घेतली की लग्न होणार असेल तरच संभोग केला पाहिजे असा काही नियम तर नाही ना?

हे पुरूषालाही माहित असतेच तरीही तोही ती रिस्क तितकीच उचलतो हे मान्य आहे ना?

अर्थातच. पुरुष रिस्क उचलतो कारण त्याला संभोगातच रस असतो. लग्नाची इच्छा ठेवून त्यासाठी संभोग करणार्‍या स्त्रिया ही रिस्क का स्वीकारतात हा प्रश्न आहे.

मुळात रिस्क शून्यवत करण्याची सगळी साधने असताना, नैसर्गिकरित्या स्त्रीला चुकवावी लागणारी किंमत टाळण्याची सोय असतानाही संभोगात आनंद वाटतो म्हणून संभोग न करता लग्नासारख्या आर्थिक बाबीसाठी संभोगास तयार होणार्‍या स्त्रिया बिचार्‍या आणि संभोग करायला मिळावा म्हणून लग्न करण्याची खरी-खोटी तयारी दाखवणारे पुरुष अनीतिमान अशीच विभागणी करून स्त्रियांचं कल्याण होणार असेल तर असो.

गवि Wed, 31/12/2014 - 12:11

In reply to by नगरीनिरंजन

लग्नासारख्या आर्थिक बाबीसाठी संभोगास तयार होणार्‍या स्त्रिया बिचार्‍या आणि संभोग करायला मिळावा म्हणून लग्न करण्याची खरी-खोटी तयारी दाखवणारे पुरुष अनीतिमान

ननि.. बाकीचे मुद्दे अतिशय बिनतोड मांडले आहेत तुम्ही, म्हणूनच या एका बाबतीत थोडा वेगळा अँगलही असतो हे नोंदवतो.

लग्नाचं प्रॉमिस घेऊन मग स्त्री शरीरसंबंधाला तयार होणे याला फक्त आर्थिक परिमाणच आहे असं नव्हे. एकूण रुढ कल्पना आणि परिस्थितीमुळे स्त्रीला पुढे याच पुरुषाशी लग्न होणार असल्यास ते संबंध "परवडतात". तिला पुरुषाइतकं नामानिराळं राहता येत नाही. मानसिक मॉरालिटीच्या कल्पनाही आड येत असतात. त्यामुळे लग्नातले आर्थिक फायदे डोळ्यासमोर ठेवून केवळ त्यासाठी स्त्रिया शारिरीक संबंधांना तयार होतात असं वाटत नाही. पुढचा व्यावहारिक विचारच त्यामागे असतो, पण केवळ आर्थिक नव्हे इतकंच.

आणि लग्न करतो असं म्हणून न करणे हा पुरुषाची नैतिक दुरित वागणूकच आहे, तो धूर्तपणा आहे. स्त्रीने अश्या वेळी संबंधांना नकार देणे हे जास्त चतुर आणि व्यावहारिक आहे, पण.. पण आपण करार, लग्न असे शब्द वापरतो तेव्हा गणितच बदलतं.

अनु राव Wed, 31/12/2014 - 12:16

In reply to by गवि

आणि लग्न करतो असं म्हणून न करणे हा पुरुषाची नैतिक दुरित वागणूकच आहे, तो धूर्तपणा

ह्याच बरोबर शरीरसंबंध झाला की पुरुषावर नैतिकतेचा दबाव येतो ( आणि आणता पण येतो ) आणि त्याच्या कडुन हवे ते मिळवता येते ( जसे लग्न करणे ) ही स्त्री ची अनैतिकता आहे.

तुकारामांच्या "हाची नेम आता" ह्या अभंगात बघा :-)

बळीयाचा अंग संग झाला आता
नाही भय चिंता, तुका म्हणे

नगरीनिरंजन Wed, 31/12/2014 - 12:26

In reply to by गवि

बरोबर आहे. स्त्रिया अजून इतक्या मोकळ्या नाहीत आणि ज्यांना भविष्याबद्दल अँक्झायटी असते त्या मुली काळजी घेतातच. पण म्हणून दोष फक्त पुरुषाचाच आहे असे म्हणणे एककल्लीपणा झाला. हा असला धूर्तपणा दुकानदार, विक्रेते, कंपन्या सर्रास करत असतात. पण त्यांनी तोंडी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार्‍याला आपण अव्यवहारी म्हणतो आणि बायर्स बिवेअरचा नियम लावतो.

स्त्रीने अश्या वेळी संबंधांना नकार देणे हे जास्त चतुर आणि व्यावहारिक आहे

सहमत. आधीच स्पष्ट सांगितलं की लग्न झाल्याशिवाय काहीही नाही तर काहीच प्रश्न नाही येत ना!
पण मजाही करायची आणि शेवटी सगळी सोयपण झाली पाहिजे हा बालिश हट्ट आहे आणि त्यासाठी बलात्काराच्या प्रश्नासारख्या गंभीर विषयाचा आधार घेणे नीचपणा आहे.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 14:10

In reply to by नगरीनिरंजन

हा असला धूर्तपणा दुकानदार, विक्रेते, कंपन्या सर्रास करत असतात. पण त्यांनी तोंडी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणार्‍याला आपण अव्यवहारी म्हणतो आणि बायर्स बिवेअरचा नियम लावतो.

मान्य, जे ग्राहक सजग नसतात त्यांचे "सजगता न दाखवणे" ही चुक असली तरी गुन्हा नाहीये.
दुकानदार वगैरेंचा हा तथाकथित धुर्तपणा सिद्ध झाल्यास शिक्षापात्र गुन्हाच आहे. तोच नियम इथे का नसावा?

अनु राव Wed, 31/12/2014 - 14:24

In reply to by ऋषिकेश

मान्य, जे ग्राहक सजग नसतात त्यांचे "सजगता न दाखवणे" ही चुक असली तरी गुन्हा नाहीये.
दुकानदार वगैरेंचा हा तथाकथित धुर्तपणा सिद्ध झाल्यास शिक्षापात्र गुन्हाच आहे. तोच नियम इथे का नसावा?

हाच प्रॉब्लेम आहे ना ऋषिकेश, स्त्रियांनी सेक्स ला दुकानदार आणि ग्राहक असे रुप दिल्यामुळे ही फसवणुक झाली असे त्यांना वाटते आहे. सेक्स करणे म्हणजे पुरुषाला काहीतरी देणे, उपकार करणे ही भावना स्त्रियांनी काढुन टाकली तर पुरुषा कडुन लग्नाचे आश्वासन वगैरे लागणार नाही.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 14:28

In reply to by अनु राव

=))

सेक्स करणे म्हणजे पुरुषाला काहीतरी देणे, उपकार करणे ही भावना स्त्रियांनी काढुन टाकली

लग्न झाल्यानंतरच्या सेक्समध्ये ही भावना (नी भुमिका) उलट होते का? सेक्स करणे म्हणजे पुरूषाने स्त्रीला अपत्य / बीज देणे वगैरे! =))
नक्की ठरवा काय ते!

अनु राव Wed, 31/12/2014 - 14:38

In reply to by ऋषिकेश

मी अजुन तरी फक्त लग्नाचे आश्वासन मोडले म्हणुन केलेली तक्रार पेपर मधे बघितली नाही.

शरीर संबंध ठेवुन लग्नाचे आश्वासन मोडले की मग राग येतो आणि नैतिकता आठवते.

नगरीनिरंजन Wed, 31/12/2014 - 18:38

In reply to by ऋषिकेश

भारतापेक्षा कडक ग्राहक कायदे असलेल्या देशात अशा केसेस होतात का? तिथे समजा कोणी म्हटलं की आम्ही दोन वर्षे डेटिंग करत होतो आणि त्याने मला लग्नाचे वचन देऊन अनेक वेळा बलात्कार केला तर काय प्रतिक्रिया असेल?

मला वाटतं एखाद्याला गळ टाकून मासा पकडायचाच असेल तर एखाद्यावेळी माशाने हुक चुकवून अमिष गट्टम केले तर माशावर खटला भरु नये, नपेक्षा आई-वडिलांनी बाजारातून आणलेला मासा खावा.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 14:06

In reply to by नगरीनिरंजन

अर्थातच. पुरुष रिस्क उचलतो कारण त्याला संभोगातच रस असतो. लग्नाची इच्छा ठेवून त्यासाठी संभोग करणार्‍या स्त्रिया ही रिस्क का स्वीकारतात हा प्रश्न आहे.

पुरुष रिस्क उचलतो असे तुम्ही म्हणताय व तुम्हाला मान्य आहे, त्या अर्थी त्याच्याकडून काहितरी गुंतवणूक असणार हे तुम्हाला मान्य आहे. मग विवादाचे फारसे कारण मला दिसत नाही.

माझा आक्षेप पुरूष व/वा स्त्रीला लग्नाच्या कराराशिवाय केवळ संभोगातच रस असण्यावर नाहीये. तर परस्परसंमती घेताना हे सत्य लपवण्याला आहे. जर जाणूनबुजून असत्य माहिती देऊन परस्परसंमती मिळवली असेल तर झालेला संभोग हा परस्परसंमतीने आहे म्हणताना डोक्यावर एक "अटि लागू" असा अ‍ॅस्ट्रिक असतो.

आता याला बलात्कार म्हणावे का नाही हा विवाद्य मुद्दा मात्र फसवणूक आहे याबद्दल दुमत नसावे. (माझ्या मते रेप/बलात्कार यापेक्षा मी लैंगिक दुराचार किंवा सेक्स्युअल असॉल्ट/फ्रॉड असे म्हणेन).

नितिन थत्ते Wed, 31/12/2014 - 14:18

In reply to by ऋषिकेश

फसवणूक झाली असे म्हणू शकतात; बलात्कार झाला असे म्हणू शकत नाहीत...... असे असायला हवे.

सहसा फसवणुकीच्या गुन्ह्याला नुकसानभरपाई + दंड अशा शिक्षा दिल्या जातात. बलात्काराबद्दल फाशीची शिक्षा दिली जाते (असे वाटते).

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 14:25

In reply to by नितिन थत्ते

४२० खालील फसवणूक नी ही लैगिक फसवणूक यांत फरक करून काहितरी अमिष/ जाणीवपूर्वक खोटे वचन देऊन ठेवलेल्या लैंगिक संबंधांसाठी वेगळी तरतूद हवी.

माझ्याही मते तो बलात्कार म्हणायला पात्र नसावा हे वर म्हटले आहेच.

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 14:29

In reply to by अनुप ढेरे

जो आरोप करेल त्याने पुरावे सादर करावेत. ज्यावर आरोप केलाय त्याने ते खोडून दाखवायचा प्रयत्न करावा. शेवटी कोर्ट ठरवेल ते अंतीम!

नितिन थत्ते Wed, 31/12/2014 - 14:40

In reply to by ऋषिकेश

आधी आरोप करणार्‍याने पुरावे सादर करायचे असतात तरच आरोपीला बचावासाठी बोलावले जाते.

नगरीनिरंजन Wed, 31/12/2014 - 19:54

In reply to by ऋषिकेश

असहमत. माझा सध्या लग्नाचा विचार नसून सध्या फक्त कॅज्युअल रिलेशनमध्ये मला रस आहे असे म्हटल्यावर धुलाई न होता समोरच्याने त्यावर शांत डोक्याने विचार करण्याची भरपूर शक्यता असूनही एखाद्याने लग्नाच्या खोट्या आणा-भाका घेतल्या तर ती फसवणूक झाली असे मी म्हणेन.
साध्या नोकरीत सुस्थितीतले लोक दोन-तीन वर्षांचा बाँड साईन करुन सरळ तोडून जातात तिथे आयुष्यभराच्या कमिटमेंट शिवाय पर्यायच ठेवला नसेल तर मग काय होणार?

अनु राव Wed, 31/12/2014 - 11:47

In reply to by ऋषिकेश

यात शरीरसंबंध आला पाहिजे काय? आणि त्यातून अपत्यप्राप्ती झाली तरी प्रॉमिस तोडायची मुभा हवी काय?

नक्कीच हवी. आपण कंसेंटींग अ‍ॅडल्ट बद्दल बोलतो आहोत. स्त्रीला जर काही भुमिका घ्यायचीच असेल तर ती शरीरसंबंधाच्या आधीच घ्यावी.
आणि हे प्रॉमिस आहे जे मोडायची कायद्यानेच परवानगी आहे. फ्लॅट खरेदीचे उदाहरण द्यायचे म्हणले तर "Agreement" आहे, सेल डीड नाही. अ‍ॅग्रीमेंट च्या तरतुदी नुसार ते मोडता येतेच.
इथे तर प्रॉमिस खरेच दिले होते की नाही इथ पासुन सुरुवात आहे.

दुसरा मुद्दा असा की समजा लग्न ठरले आहे, स्त्री-पुरूषांनी संभोगही केला आणि गर्भधारणा झाल्यावर एखाद्या स्त्री ला असे संबंध तोडायचे असतील (व पुरूषाला नसतील) तर तिला शिक्षा व्हावी काय?

अजिबात होउ नये. जे काही सो कॉल्ड प्रॉमिस असेल ते तोडायचा दोघांना अधिकार आहे.

गवि Wed, 31/12/2014 - 11:56

In reply to by अनु राव

लग्न हाच इटसेल्फ एक करार आहे आणि तो होण्यापूर्वी झालेली कोणतीही गोष्ट करार म्हणताच येणार नाही. करार हा नेहमीच फॉर्मल आणि बंधनकारक असतो. औपचारिक फॉर्मॅलिटीची गरज वाटणे हेच पूर्ण अविश्वासावर आधारित आहे. त्यामुळे लग्न (करार= अविश्वासाधारित फॉर्मॅलिटी) "पुढे केव्हातरी करु" असा एक तोंडी सौदा आत्ता मानसिक समाधानासाठी करणे आणि त्याच्या बदल्यात तुलनेत कमी अपराधी भावनेने एकमेकांना शरीरसुख देणे (इनफॅक्ट स्वतःचे शरीरसुख पूर्ण करणे) ही गोष्टच मुळात परस्परांवर कोणताही गाढ विश्वास वगैरे दाखवणारी आहे हे पटत नाही. त्यामुळे ती पुढे लग्नरुपात न पूर्ण झाल्यास कोणताही धोका, ब्रीच वगैरे म्हणण्याची आवश्यकता नाही.

१. अँड नथिंग राँग इन इट. अविश्वास हेदेखील एक उत्तम आणि स्वीकारार्ह तत्व आहे.

गब्बर सिंग Thu, 01/01/2015 - 02:35

In reply to by गवि

वा वा वा. गवि, क्या बात है !!!

यापुढे पाऊल टाकणारे लोक (उदा. निवांत पोपट) म्हणतात की न्यायासनाचे अस्तित्व सुद्धा अविश्वासाचे प्रतीक आहे.

( अपॉर्च्युनिझम हा मूलभूत गुण आहे असे ऑलिव्हर विल्यमसन म्हणाला होता व त्यावर आधारित त्याने ट्रान्जॅक्शन कॉस्ट थियरी ची करारा च्या अस्तित्वाचे विवेचन करणारी थियरी मांडली होती. २००९ मधे नोबेल मिळवून राहिला तो .... त्या थियरी बद्दल. तुम्ही अपॉर्च्युनिझम बद्दल लिहिलेले नाही पण बेस तो च आहे.)

नचिकेत Wed, 31/12/2014 - 16:11

In reply to by ॲमी

"अशा केसेससाठी चेक बाउंससारखी ब्रिच ऑफ प्रॉमिसची सोय असावी असे सध्यातरी मत आहे. जेवढा काळ नातं होतं त्याकाळात गर्भपात वगैरेमुळे शारिरीक, मानसीक नुकसान झाले असल्यास त्याची मॉनेटरी भरपाई मिळावी."

"४२० खालील फसवणूक नी ही लैगिक फसवणूक यांत फरक करून काहितरी अमिष/ जाणीवपूर्वक खोटे वचन देऊन ठेवलेल्या लैंगिक संबंधांसाठी वेगळी तरतूद हवी."
.
.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तर मग लग्न केल्यावर संबंधास नकार देणार्‍या स्त्रियांविरुद्धही ४२० खाली फसवणूक/ ब्रिच ऑफ प्रॉमिसची सोय असावी का? झालेल्या शारिरीक, मानसिक नुकसानासाठी मॉनेटरी भरपाई??

का स्त्रियांनी नकार दिल्यास तो त्यांचा अधिकार आणि पुरुषांनी नकार दिला की ती फसवणूक असा पंक्तिप्रपंच करायचा?

ॲमी Wed, 31/12/2014 - 16:16

In reply to by नचिकेत

भारतीय विवाह कायद्यांत 'विवाहांर्तगत बलात्कार' असा काही कंसेप्ट नाहीय. त्यामुळे पती, पत्नी दोघेही शरीरसुखासाठी एकमेकांना फोर्स करू शकतात. सतत नकार मिळत राहील्यास ते कारण सांगून घटस्फोट मिळतो.

ॲमी Fri, 02/01/2015 - 12:24

'लग्नाआधी सेक्स म्हणजे बलात्कार असेलच असे नाही: मुंबई उच्च न्यायालयाचे भाष्य'
या मथळ्यावरून पुर्वी गदारोळ झालेला एक मथळा आठवला
'Pre-marital sex equals marriage, says Madras HC - Hindustan Times'

तर आता माझी शंका ही आहे की:
लेखातील बातमीत ज्या अशील आहेत त्यांच्याकडे गर्भपातच्या वेळची कागदपत्र असावीत. मंजे she had proof of relationship. तर ती कागदपत्रं घेऊन अशील कोर्टात गेली असती तर लग्नाचे सर्टीफीकेट मिळालेच असते ना? मग तो मार्ग का वापरला गेला नाही?

प्रकाश घाटपांडे Fri, 02/01/2015 - 14:24

लैंगिकता ही एक मानसिकता आहे व त्याचा नैतिकतेशी थेट संबध जोडल्यामुळे सगळे घोळ होतात. योनिशुचिता ही भानगड जर अस्तित्वात नसती तर या प्रश्नाकडे आपण कसे पाहिले असते? स्त्रीपुरुष संबंध ही पुरुषाची एकतर्फी गरज या दृष्टीने पहाणे व परस्परांची गरज (प्रपोशनचा भाग जरा बाजूला ठेवू) यात जो फरक पडतो त्यामुळेही या गोष्टीकडे पहाणे बदलते. राहतो प्रश्न कायद्याच्या चौकटीचा. मग बलात्कारा ऐवजी लैंगिक फसवणुक केली असे म्हणण्याची व त्याला विशेष फसवणूकीचा दर्जा देउन पिडित व्यक्तीला (सध्या आरोप करण्याला पिडित म्हणु या) नुकसान भरपाई द्यायची व्यवस्था करता येईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. जर अशी व्यवस्था करता येत नसेल तर लैंगिक फसवणुक चे भांडवल करुन परिस्थिती बलात्कारात रुपांतरीत करावी लागते.
अब्रूच्या भीतीने अनेक स्त्रिया खरे बलात्कार सुद्धा न्यायालयीन कक्षेत आणत नाहीत.अर्थात अन्यही कारणे असतील. एकंदरीत मुद्दा हा कितिही चघळला तरी कमीच आहे.