Skip to main content

गुडमॉर्निंग फ्लॉवर्स

सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अ‍ॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. ऐसी अक्षरे वाल्यांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.

1) शेडींगचा गुलाब

2) गावठी गुलाब

३) पांढरी सदाफुली

४) गडद गुलाबी शेवंती

५) जमीनीवरील ऑर्चिड

६) गाजरा/झिनिया

७)

८) घोसाळ.

९) पांढरा गुलाब

१०) ऑरेंज गुलाब

११)

१२) शेंदरी जास्वंद

१३) इन्शुलीन फ्लॉवर.

१४) अबोली

१५) दवणा

स्पर्धा का इतर?

मेघना भुस्कुटे Thu, 11/12/2014 - 14:36

वा!

धाग्यावर अवांतर आहे. पण गावठी गुलाब बघून आठवलं: गुलकंद कसा करतात? गावठी गुलाबाच्या पाकळ्या खडीसाखरेत मिसळून काचेच्या बरणीत ठेवायच्या नि बरणी उन्हात ठेवायची. ही थिअरी ठाऊक आहे. पण प्रमाणबिमाण असतं का काही? किंवा काय झालं की गुलकंद वापरायला तयार झाला समजायचा, अशी काही खूण?

गवि Thu, 11/12/2014 - 14:51

In reply to by मेघना भुस्कुटे

झालस्तर गुलाबाची अश्याच पद्धतीने वाईन करता येईल का ? यावर रुचीताई आणि अन्यांनी मार्गदर्शन करावे..!! ;)

मोगरा, जाई, जास्वंद अशा फुलांचा गुळांबा करता येईल का?

इ.

रुची Thu, 11/12/2014 - 21:16

In reply to by गवि

झालस्तर गुलाबाची अश्याच पद्धतीने वाईन करता येईल का ?

हो येईल की, हे पहा! ;-) बाकी प्रश्न खवचट असला तरी विचारल्याबद्दल धन्यवाद कारण ही वाईन लई भारी दिसतेय पण ती बनवायला आता आधी गुलाबाच्या फुलांचा जुगाड केला पाहिजे!

मोगरा, जाई, जास्वंद अशा फुलांचा गुळांबा करता येईल का?

नक्कीच करता येईल!

अमुक Thu, 11/12/2014 - 22:47

In reply to by गवि

गवि, फुलांची वाईनच नव्हे तर शॅम्पेनही बनते.
'एल्डरबेरी'च्या फुलांची शॅम्पेन - https://www.youtube.com/watch?v=MxVIVhDDfUA
(रुची, तुमच्या लाडक्या 'ह्यू फर्नली'ला विसरलात ? :))

रुची Thu, 11/12/2014 - 23:06

In reply to by अमुक

आमच्या मागच्या घराच्या परसात एल्डरबेरीचे झाड होते, एकदा ते रानासारखे वाढलेय म्हणून भरपूर छाटून टाकले आणि त्यानंतर लगेचच ह्यूने 'एल्डरबेरी'च्या फुलांची शॅम्पेन बनविल्याचे पाहिले आणि मनोमन हळहळले!

जागूताई, अवांतरासाठी क्षमस्व पण फार जिव्हाळ्याचा विषय निघाला :-)!

नंदन Sat, 13/12/2014 - 12:02

In reply to by गवि

'वेगवेगळी फुले उमलली, करून त्यांची जेलें....' अशी विडंबनाची पहिली ओळ सुचली :).

अवांतर - इथल्या पर्शियन दुकानात गुलाबपाकळ्यांचा जॅम मिळतो. चव साधारण गुलकंदासारखीच, पण कन्सिस्टन्सी जॅमप्रमाणे.

राही Sat, 13/12/2014 - 14:57

In reply to by नंदन

...'आणि वाइनी (खपुनी)/करुनी,(पिउनी) थकले (खपले, निजले, सुटले...)ऐसीवाले...'

अंतराआनंद Thu, 11/12/2014 - 18:19

ही अशी फुलं तुम्हाला रोज दिसतात? भाग्यवान आहात.
बाकी फोटो झकास.
शेवटची केसरं दवण्याची आहेत का मालीची? का दवणा म्हणजेच माली? कारण आमच्या कडे हे सुवासिक झाड होतं. त्याला आम्ही "माली" असं म्हणायचो. सुवासिक झाड म्हणायचं कारण त्याच्या पानांनाही केसरांसारखाच सुगंध यायचा.

राही Fri, 12/12/2014 - 19:25

In reply to by अंतराआनंद

मला वाटते दवणा वेगळा आणि माली वेगळी. दवण्याची पाने चिंचेसारखी पण लहान, गोलसर आणि थोडी जाड असतात. साधारण गुंजेच्या पाल्यासारखी. ( विड्यात घालतात ती.) मालीला 'पाच' असेही म्हणताना ऐकले आहे. ही पाने जासवंदीच्या पानांच्या आकाराची, थोडीशी राखाडी रंगाची आणि स्पर्शाला थोडी खरखरीत असतात. देठावर थोडी लव असते. गंध जास्त तीव्र असतो.

पिवळा डांबिस Sat, 13/12/2014 - 01:46

फुलांचे फोटो सुरेखच आहेत.
पण जागुचा धागा म्हंटल्यावर 'फ्लॉवर्स' म्हणजे कॉलीफ्लॉवर्स चे फोटो असतील असं उगाचच वाटलं!! :)
तेही सुरेख दिसतात म्हणा....

जागू Fri, 19/12/2014 - 12:10

धन्यवाद सगळ्यांना.

मेघना साखरेचा पाक करून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून थोडे शिजवूनही गुलकंद करतात असे ऐकले आहे.

दवण्याला दुसरा शब्द असू शकतो. मला कन्फ्युजन आहे दवणा/मरवा/पाचू यामध्ये.