गुडमॉर्निंग फ्लॉवर्स
सगळ्यांना फुलांद्वारे सुप्रभात करावे ह्या उद्देश्याने सकाळी बाहेर फोटो काढायला जाते तेंव्हा मलाच सगळी फुले गुड मॉर्निंग करतात असे वाटते. फार प्रसन्न वाटते सकाळी ह्या फुलांचे दर्शन घेताना. हे फोटो आत्पजनांना वॉट्स अॅपवर सुप्रभात करण्याच्या उद्देशाने मोबाईलवरून काढलेले आहेत. ऐसी अक्षरे वाल्यांनाही ह्या फुलांद्वारे शुभेच्छा.
स्पर्धा का इतर?
मार्गदर्शनास नेहमीच तयार.
झालस्तर गुलाबाची अश्याच पद्धतीने वाईन करता येईल का ?
हो येईल की, हे पहा! ;-) बाकी प्रश्न खवचट असला तरी विचारल्याबद्दल धन्यवाद कारण ही वाईन लई भारी दिसतेय पण ती बनवायला आता आधी गुलाबाच्या फुलांचा जुगाड केला पाहिजे!
मोगरा, जाई, जास्वंद अशा फुलांचा गुळांबा करता येईल का?
फुलांची शॅम्पेन
गवि, फुलांची वाईनच नव्हे तर शॅम्पेनही बनते.
'एल्डरबेरी'च्या फुलांची शॅम्पेन - https://www.youtube.com/watch?v=MxVIVhDDfUA
(रुची, तुमच्या लाडक्या 'ह्यू फर्नली'ला विसरलात ? :))
अशी कशी विसरेन?
आमच्या मागच्या घराच्या परसात एल्डरबेरीचे झाड होते, एकदा ते रानासारखे वाढलेय म्हणून भरपूर छाटून टाकले आणि त्यानंतर लगेचच ह्यूने 'एल्डरबेरी'च्या फुलांची शॅम्पेन बनविल्याचे पाहिले आणि मनोमन हळहळले!
जागूताई, अवांतरासाठी क्षमस्व पण फार जिव्हाळ्याचा विषय निघाला :-)!
ही अशी फुलं तुम्हाला रोज
ही अशी फुलं तुम्हाला रोज दिसतात? भाग्यवान आहात.
बाकी फोटो झकास.
शेवटची केसरं दवण्याची आहेत का मालीची? का दवणा म्हणजेच माली? कारण आमच्या कडे हे सुवासिक झाड होतं. त्याला आम्ही "माली" असं म्हणायचो. सुवासिक झाड म्हणायचं कारण त्याच्या पानांनाही केसरांसारखाच सुगंध यायचा.
दवणा आणि माली
मला वाटते दवणा वेगळा आणि माली वेगळी. दवण्याची पाने चिंचेसारखी पण लहान, गोलसर आणि थोडी जाड असतात. साधारण गुंजेच्या पाल्यासारखी. ( विड्यात घालतात ती.) मालीला 'पाच' असेही म्हणताना ऐकले आहे. ही पाने जासवंदीच्या पानांच्या आकाराची, थोडीशी राखाडी रंगाची आणि स्पर्शाला थोडी खरखरीत असतात. देठावर थोडी लव असते. गंध जास्त तीव्र असतो.















वा! धाग्यावर अवांतर आहे. पण
वा!
धाग्यावर अवांतर आहे. पण गावठी गुलाब बघून आठवलं: गुलकंद कसा करतात? गावठी गुलाबाच्या पाकळ्या खडीसाखरेत मिसळून काचेच्या बरणीत ठेवायच्या नि बरणी उन्हात ठेवायची. ही थिअरी ठाऊक आहे. पण प्रमाणबिमाण असतं का काही? किंवा काय झालं की गुलकंद वापरायला तयार झाला समजायचा, अशी काही खूण?