मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.

महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.

कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा.

मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्‍या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.

मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?

घाईत लिहील्यामुळे आधी लेखनात खालचे पण महत्त्वाचे मुद्दे सुटले होते:

इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)
विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.

विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृती अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्यांची मतं महत्त्वाची वाटतात.

पुरोगामी मूल्ये जपणार्‍या लोकांनी सुरू केलेल्या, चालवलेल्या आणि अशा लोकांचा पाठींबा लाभलेल्या लोकांच्या संस्थळावर वावरणारे वेगवेगळे लोक या दृष्टीने काय विचार करतात हे मला वाचायला आवडेल. निदान इथे काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

खरेच कुतूहल आहे. "अलेक्सा डॉट कॉम"ला वापरकर्त्यांचा स्त्री/पुरुषभेद कसा कळला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी विदाखनन (डेटा मायनिंग) करून हे निष्कर्ष काढले गेलेत, हे नक्की. पण अ‍ॅलेक्स डॉट कॉम ने काय कृतीक्रम (अल्गोरिदम) वापरून हे खनन केले आहे, हे ते नक्कीच उघड करणार नाहीत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चक्रपाणि

मलाही असंच वाटतं.
गूगलल्यावर चटकनहे मिळालं. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर अधूनमधून डोकावले असता असा सरळसरळ बायस दिसून येतो. मायबोलीवर स्त्रियांची संख्या बर्‍यापैकी जास्त आहे असं वाटतं; त्या संस्थळाबाबत स्टॅटीस्टीक्स थोडं मजेशीर वाटलं. हे gut feeling, विदा जमा केलेला नाही. तसाच प्रकार प्रतिसादक, लेखकांची नावं पहाताही दिसून येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगवेगळ्या संस्थळांवरील रहदारीचे विश्लेषण करण्याकरिता त्या रहदारीचा लिंगनिहाय विदा नेमका कसा मिळतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनतरी मराठी प्रांतात नोकरी करणार्‍या स्त्रीयांचे प्रमाण हे पुरूषांइतके झालेले नाही. त्यामुळे (ऑफीसातून) मराठी संस्थळ वापरणारे पुरूषच जास्त असावेत. (हा एक आपला अंदाज हं)
महिला दिनाच्या शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अनेक वेबसाईट्स स्टॅटीस्टीकल मॉडेल्स वापरुन तुम्ही स्त्री आहात का पुरुष हे शोधतात. (गुगल प्रोफाईलवर मी माझे 'लिंग' दिले नव्हते. पण आता गुगल स्वतःच मला पुरुष असे दाखवतो) अलेक्साने अर्थातच मराठी संस्थळावरून तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे ओळखलेले नाही. तुमच्या इतर इंटरनेट वापरावरून (इतर सर्च क्लायंट्सकडून?) ही माहीती मिळलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझ्या या आयडीची गणना नेमकी कशी आणि कशाच्या आधारावर व्हावी?

(बादवे, या सदस्यत्वाशी निगडित ईमेलपत्त्यावर लिंगाची नोंद 'इतर' अशी केलेली आहे.)

(त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा: अशा प्रकारे मआंजावरील 'स्त्री'सदस्यांची संख्या वाढवता येईलही. पण त्याला काही अर्थ आहे काय?)

- (प्रयोगशील आणि प्रायोगिक) बाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

('न'वी बाजू या सदस्याचा प्रासंगिक, प्रायोगिक, तात्कालिक आणि तात्पुरता दुसरा आयडी.)

तुम्ही कोणत्या वेबसाईट्सवर जाता, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला रस आहे इ. गोष्टींवरून तुमचं स्टॅटीस्टीकल मॉडेलने प्रोफाईल बनवलं जातं. इमेल आयडी ने फारसा फरक पडू नये.

'न'वी बाजू आणि 'बाई' हे दोन आयडी एकच संगणक वापरून संस्थळावर वावरले. (ब्राउझरही आणि इतर गोष्टी?, "संचारही" तसाच) तर हे दोन आयडी असल्यने फरक पडणार नाही. ते 'एकच' आहेत असे गणले जाऊ शकते.

मात्र संगणक बदलल्यावर 'बाई' हा आयडी जो संगणक वापरतो त्याच्या इंटरनेट वापरानूसार त्याचे प्रोफाईल बनेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'न'वी बाजू आणि 'बाई' हे दोन आयडी एकच संगणक वापरून संस्थळावर वावरले. (ब्राउझरही आणि इतर गोष्टी?, "संचारही" तसाच) तर हे दोन आयडी असल्यने फरक पडणार नाही.

काय सांगता? अशी पोलखोल अंतस्थ माणसंच करू लागली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तीनतेरा (तीन चौदा नव्हे) होतील हो... उद्या तुम्ही असंही म्हणाल की, ''न'वी बाजू' या आयडीचा आयपी अमेरिकेतील एकाच विवक्षीत शहरात आहे, तर 'पंगा' या आयडीचा आयपी अनेकदा पुण्यात (आणखी कुठं असणार म्हणा! ;)) आणि काही वेळा अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात दिसतो. असं नका करू राव... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि काही वेळा अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात दिसतो. असं नका करू राव...

हे अटलांतार्जालीय (संधी सोडवा) वास्तव आहे, असं म्हणायचंय का तुम्हांला श्रामो? Smile
[* हीच ती श्रामोंची प्रसिद्ध स्मायली. कॉलिंग, पिडांकाका ;).]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसतंच अटल नाही, 'अट्टल'देखील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा हा अवतार असाच चालू ठेवा, बघूया तुम्हाला परकायाप्रवेश किती जमतोय तो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी इंटरनेट सायटींवर स्त्रियांचे प्रमाण कमी का? आहेत तेवढ्या पुरेशा आहेत की;-) 'सौ सुनार की एक लुहार की' हे तुम्ही ऐकले नाही काय?
यावरुन आठवले. मराठी संकेतस्थळांवर काही वर्षांपूर्वी काही विवक्षित स्त्री आयडीजना टारगेट करुन, त्यांचा छळ करुन त्यांना 'पळवून' लावण्यात पुरुषार्थ मानण्याची एक विकृत फॅशन होती. काही आयडीज त्यात कामी आले. (त्यातले काही नंतर पुरुषांचे आयडीज होते असे कळाले आणि लोचा झाला!) काही बाणेदार महिला आयडीजनी झाशीच्या राणीप्रमाणे युद्ध करुन रणांगण सोडले ते परत न येण्यासाठीच.
गरीब बिचारे पुरुष ! ते यातल्या कश्श्यात म्हणजे कश्श्यात नसतात. मीठ नसलेली दोडक्याची किंवा दुधी भोपळ्याची भाजी खातात, शेवटच्या टप्प्यात रंगात आलेली म्याच बघताना बायको अचानक 'एका प्रेमाची दुसरी गोष्ट' लावते तेंव्हा त्या उगीचच कानफटीत मारावी असे वाटणार्‍या राधा नावाच्या पात्रात रस घेतात, आठवड्यातून सात रात्री बायकोचे डोके दुखत असेल तर रोज तिला अ‍ॅस्पिरिनची गोळी आणि पाण्याचा ग्लास आणून देतात (ती गोळी बायको घेत नाही, ही गोष्ट निराळी!) आपला रक्तदाब वाढवून घेतात, पण नेटकेपणाने संसार करत राहतात. तात्पर्य काय, की 'होता है, चलता है, दुनिया है' म्हणून पुरुष मुर्दाडपणे मराठी सायटींवर पडून राहतात. स्त्रियांचे तसे नसावे.
बाकी आयडींवरुन जाऊ नका. उद्या कुणीतरी रमाबाई कुरसुंदीकर या खरोखर साठी सत्तरीच्या महिला आहेत असे म्हणायचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?

याचे उत्तर 'पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत' असे आहे हे खेदाने म्हणावे लागते.

तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे?

कारणे माहित नाहीत.. परंतु प्रिन्ट आणि इतर मिडिया मध्ये देखिल हे प्रमाण विषम आहे असे माझे निरिक्षण आहे ( विदा नाही). मराठी इंटरनेट साइट्स वर ही विषमता अधिक प्रमाणात आहे का ह्याची कल्पना नाही.

वर तुम्ही दिलेल्या संस्थळांच्या संस्थापकांमध्ये स्त्रिया आहेत काय? नसल्यास, ऐसी अक्षरे ह्या बाबतीत एक milestone ठरावा.
जागतिक महिला दिनाच्या तुम्हालाही शुभेच्छा... जगात सर्वच क्षेत्रात स्त्रियांची उत्तरोत्तर प्रगती / उन्न्ती होवो ही मनोकामना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलेल्या संस्थळांच्या संस्थापकांमध्ये स्त्रिया आहेत काय? नसल्यास, ऐसी अक्षरे ह्या बाबतीत एक milestone ठरावा.

खोटं का बोलू, थोड्या गुदगुल्या झाल्याच! Smile

पण इतर संस्थळं चालवण्यात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे. मिसळपाववर माझ्या माहितीत दोन स्त्रिया संपादक आहेत (गुणोत्तर विषम आहे) आणि वरच्या टियरमधे सगळेच पुरूष आहेत; ऐसीअक्षरेवरही हे प्रमाण विषम आहेच. प्रतिसादांना श्रेणी देणार्‍या आयडींची मोजदाद केलेली नाही, पण तिथे हे प्रमाण थोडं बरं दिसतं असं वाटतं. मायबोलीवर अनेक स्त्री आयडी विविध उपक्रम राबवतात हे दिसतं; प्रमाण माहित नाही. तिथेही काही प्रमाणात पोलादी पडदा असावा. उपक्रमावर पोलादी पडद्याआड काय चालतं हे सामान्यतः समजत नाही, पण तिथेही एक स्त्री संपादक असण्याची शक्यता आहे. मीमराठीबद्दल विचारलं पाहिजे, माझं अज्ञान. Sad मनोगताबद्दलही मला कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"मूळ लेखनात सुटलेले महत्त्वाचे मुद्दे" विशेष आवडले. यथावकाश त्यांना प्रतिसाद द्यायचे म्हणतो. तूर्तास त्या मुद्द्यांबद्दल अभिनंदन.

वर उल्लेखलेल्या भागातल्या मुद्द्यांचा उत्तम परामर्ष या ब्लॉग वर घेण्यात आलेला दिसतो आहे : http://dnyanadadeshpande.blogspot.com/2012/03/blog-post_08.html?spref=fb

माझे काही सुचलेले विचार :
ज्या वर्गामधे एकंदर आर्थिक स्थैर्य असेल तेथे इंटरनेट च्या वापराबद्दल लिंगसापेक्ष समानता असण्याचं गृहितक मला सकृद्दर्शनी बरोबर वाटतं. मात्र स्वतःच्या हक्कांची जाणीव, आर्थिक प्रगती आणि स्थैर्याच्या बाबत "स्मार्ट" असलेल्या या वर्गामधे, आपल्या हितसंबंधांपलिकडे पहायची प्रवृत्ती कमी होत असल्याची खंत वर उल्लेख केलेल्या ज्ञानदा देशपांडे यांच्या लेखात जी व्यक्त झालेली आहे ती मला बरोबर वाटते. एकंदर प्रबोधन, सामाजिक समस्यांबद्दलच्या विचारांची घुसळण, विशेषकरून स्त्रियांच्या हक्कांच्या प्रश्नांबद्दलची जागरूकता याबद्दल खाओ-पिओ-ऐश करो वर्गातल्या उदासीन किंवा प्रसंगी छद्मी प्रवृत्तींचं एक्स्टेंशन म्हणजे त्या वर्गातल्या स्त्रियांची या प्रक्रियेतली गैरहजेरी.

अर्थात हे सरसकट खरं नाही. महाराष्ट्रातल्या अनेक शहरी, निमशहरी आणि गावाकडच्या पॉकेट्स मधे कुठे ना कुठे स्त्रियांचं सक्षमीकरण किंवा त्यांच्या प्रश्नांबद्दल जागरूकता दाखवणारा स्त्रीवर्ग आपल्याला भेटतो. यामधे अनेक मध्यमवर्गीय घरातल्या स्त्रिया आहेतच. महाराष्ट्र हे जे कार्यकर्त्यांचं मोहोळ असं म्हण्टलं गेलेलं आहे त्यात स्त्रियांचा सहभाग निश्चितच मोठा आहे. मात्र जिथे मराठी लोक एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधताना दिसतात तिथे याचं प्रतिनिधित्व आजवर पुरेसं झालेलं नाही असा प्रत्यय येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मायबोलीवर आलेला आणि मला अतिशय आवडलेला एक प्रतिसाद आणि त्यावर माझी प्रतिक्रिया इथे डकवते आहे:
मृदुला म्हणतातः

मराठी इंटरनेट साइटची मनोवृत्ती अमूक असे म्हणता येणार नाही. त्यावर लिहिणार्‍या लोकांविषयी काही संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढता येऊ शकेल.

माझ्या अनुभवात असे आले आहे की तात्रिक, राजकीय, क्रीडाविषयक अश्या (पूर्वी पुरुषप्रधान) चर्चांत हल्ली स्त्रियांचा जवळपास सारखाच सहभाग दिसून येतो. पण स्वयंपाक, सुशोभन, संगोपन, प्रसाधन अश्या (स्त्रीप्रधान) चर्चांत पुरुषांचे प्रमाण कमी दिसते.

माझं उत्तरः

मृदुलाच्या प्रतिसादामधे मला जी शंका होती तीच पुन्हा खरी आहे का काय असं वाटतंय. पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे. आपल्या घराबाहेरही जग आहे त्याची जाणीव स्त्रियांना झाली आहे, होते आहे; ही गोष्ट मला पॉझिटीव्ह वाटते. पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.

या चर्चेत विचार करत असलेल्या सर्वच संस्थळांवर ही चर्चा सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रतिसाद चोप्य-पस्ते करण्याचा मोह आवरत नाही; त्यातून तेच तेच पुन्हा टाईप करण्याचे कष्टही वाचवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

महिला ऑफीसमध्ये फक्त ऑफीसचं काम करतात (हा हा हा!! Wink )
किंवा
ऑफीसचं काम (करायचे) नसल्यास शिळोप्याच्या गप्पा मारतात पण (पुन्हा काम करावं लागेल म्हणून) कंप्युटरकडे वळत नाहीत
किंवा
महिलांना एकुणच 'अव्यक्त' रहाणे आवडते (? हे माझ्या एका मित्राचे ठाम मत आहे. 'पुरुषांनी महिलांना समजून घ्यायचे असते - त्या काहीच सांगणार नाहीत' या प्रकारावर तो (दोन पेग झाल्यावरत तर जास्तच खुमासदार) बोलतो ते रेकॉर्ड करून इथे लिहिलं पाहिजे Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

महिलांना एकुणच 'अव्यक्त' रहाणे आवडते (? हे माझ्या एका मित्राचे ठाम मत आहे. 'पुरुषांनी महिलांना समजून घ्यायचे असते - त्या काहीच सांगणार नाहीत' या प्रकारावर तो (दोन पेग झाल्यावरत तर जास्तच खुमासदार) बोलतो ते रेकॉर्ड करून इथे लिहिलं पाहिजे (डोळा मारत) )

तरीही मेले सगळ्या बायकांना बडबड्या म्हणून बदनाम करतात!
(घ्या! मलाही जमलं सरसकटीकरण!!) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

*वैधानिक इशारा:- वाचकाने प्रतिसाद गांभीर्याने घेउन वैताग करुन घेतल्यास आम्ही जिम्मेदार नाही. त्रागा करुन घेउ नये.*

पहिले विधान
महिलांना एकुणच 'अव्यक्त' रहाणे आवडते
व दुसरे विधान

तरीही मेले सगळ्या बायकांना बडबड्या म्हणून बदनाम करतात!

एकमेकांविरुद्ध (भासत असले तरिही विरुद्ध ) नाहित.

महिला खूप काही बोलूनही अव्यक्त राहू शकतात.
Women talk a lot, they say nothing!!

हे आमचं सरसकटीकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळात स्त्री - पुरुष समानता म्हणजे काय?
ही समानता सांख्यिकीच्या आधारे ठरलेली असावी का?

लेखात आलेला आणि प्रामुख्याने जाणवणारा मुद्दा हा 'समान संखे'वर आधारित आहे असे मला वाटले. जे मला पटत नाही. सांख्यिकीच्या आधारे जर शिक्षण, नोकरी, उच्चपदे आणि इतर तुलना करायची क्षेत्रे ह्यामध्ये जर "स्त्री = पुरुष" असे सिद्ध झाले तर स्त्री - पुरुष समानता आली असे म्हणता येईल का? हा मुद्दा वैचारिक नसून सामाजिक असावा असे मला वाटले. ह्याचे मूळ आपल्या सामाजिक जडणघडणीवर आधारित आहे.

१. आता लेखात म्हटल्याप्रमाणे समानता नाहीयेय तर त्याचे काय फायदे व तोटे ?
२. जर समानता (?) झालीच तर त्याचे काय फायदे व तोटे ?
३. जर सांख्यिकीच्या आधारे "स्त्री > पुरुष" असे झाले तर त्याचे काय फायदे व तोटे ?

आता इंटरनेटचा मुद्दा:
हा मुद्दा समानता आणि स्त्रीमुक्ती ह्यापासून सर्वस्वी भिन्न आहे.
इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला मुळात इंटरनेटचा अ‍ॅक्सेस हवा. जसा टीव्ही सरसकट सगळ्या घरांमध्ये पोहोचला आहे तसे इंटरनेट अजूनही घराघरात पोहोचले नाही. तसे जेव्हा होईल तेव्हा महिलांची संख्या लक्षणियरित्या वाढेल असे खात्रीने सांगता येईल. बघा म्हणजे, टीव्हीवरच्या रटाळ, टुकार अशा मालिकांचा TRP हा महिलाच ठरवतात कारण त्यांना मिळालेला वेळ त्या असल्या मालिकांमध्येच सत्कारणी लावतात. पण ते टीव्हीचा सहज असलेला अ‍ॅक्सेस ह्यामुळे. हा मुद्दा लेखात ध्यानात घेतलेला नाही. फक्त काही नोकरपेशा आणि उच्चमध्यमवर्गिय महिलांना अभिप्रेत धरून चर्चा सुरू आहे.

तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे?

ह्यावर दुसर्‍या एका संस्थळावर आलेला खालील प्रतिसादातले मतही लक्षात घेण्याजोगे आहे.

ईंटरनेट वापरणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. कदाचित बहुतांश स्त्रियांना यात रस नसेल किंवा बर्‍याचशा फक्त वाचनमात्र राहण्याला पसंती देत असाव्यात. करत असलेल्या नोकरीचे स्वरुपही कारणीभूत असु शकते. हे पुरुषांना देखील लागू होते.

- (इंटरनेटवर अभिव्यक्त न होणारी बायको असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त काही नोकरपेशा आणि उच्चमध्यमवर्गिय महिलांना अभिप्रेत धरून चर्चा सुरू आहे.

होय. याच गटाला एलिट म्हणून मी त्यांच्याबद्दलच चर्चा करते आहे. आणि या गटांत स्त्री-पुरूषांचं प्रमाण फार वेगवेगळं नसावं असा माझा समज आहे. आयटीत नोकरी करणारे लोकं संस्थळांवर बर्‍यापैकी प्रमाणात आहेत. आयटीत ही संख्या-समानता दिसते का? संस्थळांपेक्षा बरीच जास्त संख्यासमानता तिथे असावी असा माझा तर्क आहे.
संस्थळांवर येणारे बरेच लोकं मुंबई-पुण्यातले आहेत असं वाटतं. तिथे अनेक घरांमधे इंटरनेट उपलब्ध नाही हे काही पटत नाही.
परदेशात रहाणारे अनेक लोक संस्थळांवर दिसतात. त्यांच्या बाबतीत इंटरनेटच्या उपलब्धतेचा प्रश्न नसावा. आणि या लोकांमधेही स्त्री-पुरूष प्रमाण साधारणतः समान असावं. या लोकांना मी एलिट म्हणते आहे.

(इंटरनेटवर अभिव्यक्त न होणारी बायको असलेला)

चर्चा एक-दोन लोकांबद्दल नसून एका कंप्लीट सांपलबद्दल आहे. कुणा दोन-चार व्यक्तींनी अमराठी लोकांशी लग्न केलेलं असणं, दोन-चार लोकांचे स्पाऊज इंग्लिश माध्यमात शिकलेले असणे हा प्रश्न इथे गौण आहे. जोडीने संस्थळांवर असणारे लोकं १०% ही नसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरे तर चर्चा हवी होती की मराठी इंटरनेट साईट्सवर हुशार चतुरस्त्र स्त्रियांचे [तसेच पुरुषांचे] प्रमाण कमी का?

आज जर विचार केला की कोणत्या आयडीचे लेखन/मते ही बरेचदा पटणारी किंबहुना नाकारता येणार नाही असा प्रतिवाद / माहीतीपूर्ण / नवी बाजू सांगणारी असतात तर मोजकेच पण दोन्ही हात कदाचित पायाचीही बोटे लागतील इतकेच पुरुष आयडी /लोक मोजता येतील. पण स्त्रीया/स्त्री आयडी म्हणले तर ... हॅ हॅ हॅ [जस्ट फॉर द रेकॉर्ड, आहेत बर काही स्त्रीया आहेत ज्या हुशार, अनुभवी आहेत व अनेक विषयांवर सेन्सीबल बोलू शकतात. पण प्रमाण?? एका हाताची बोटे देखील भरपूर अर्थात यासाठी माझा विदा हा दोन चार स्थळांचाच आहे] हा आरोप नाही कि हिणवणे नाही. हे माझे मत आहे. खरे तर ह्या निमित्ताने ज्याने त्याने स्वताला विचारुन पहावे की खरेच आपल्या व्याख्येत बसतील असे हुशार / प्रगल्भ किती आयडी(लिंगविरहीत) संस्थळावर आहेत? प्रमाण अतिशय कमी असेल एकूण सदस्य संख्येंच्या तुलनेत:-( [जर खूप असतील तर च्यायला आजवर आपण काय जगलो/शिकलो असा विचार येउन डिप्रेशन नाही आले म्हणजे मिळवले. Wink ]

पुरुषप्रधान/स्त्रीप्रधान चर्चा ...पण बहुतांशी (किंवा सगळ्याच??) चर्चा व चर्चाविषय हे दोन्ही माझ्यामते लिंग विरहीत असतात. अजुनही हे पुरषांचे चर्चा विषय (ज्यात आम्ही आता हिरीरीने भाग घेतो असे महीला म्हणतात) व महीलांचे चर्चाविषय (ज्यात पुरुष अजुनही सहभागी होत नाही असे महीला म्हणातात) अश्या चष्म्याने आजच्या जालसक्रिय उच्चभ्रू स्त्रीया चर्चांकडे बघणार असतील तर त्यांच्या पुरोगामीपणाची व्याख्या मला समजली नाही आहे. आणि हो, महीलांच्या विषयातील चर्चांमधे जालपुरुषआयडी उदंड बागडतात असे माझे निरिक्षण आहे. बादवे मिपा/ऐसी/उपक्रम/मीम या ठिकाणी सो कॉल्ड महीलांचे विषय यावर "माहीतीपूर्ण चर्चा" किती आल्या, त्यातल्या किती चर्चा स्त्रियांनी सुरु केल्या व त्यातल्या किती चर्चात पुरषांचा सहभाग दिसला नाही याचा विदा कुठे मिळेल? काही निवडक महीला सदस्यांचे लेखन तपासले पाहीजे. आजही आसपास नोकरी करणार्‍या बायकांना पैसे गुंतवणूक विचारले तर जुजबी माहीती असते पण शेवटी हे सगळे ना बाबा/नवरा/सासरे बघतात असेच उत्तर येते. नवरा उद्या गेला तर स्वता खंबीरपणे सगळे कसे सावराल अथवा महत्त्वाच्या पुढच्या बाबी काय याबाबत किती स्त्रियांना अगदी नोकरदार अथवा गृहीणी माहीती असेल हे तुम्हीच पडताळून पहा. बर हे पुरुषप्रधान विषय म्हणले तर मसंवर अपत्य संगोपन, गर्भारपणातील काळजी, अनुभव, त्यातुन आलेले शहाणपण्/ज्ञान याचे किती लेख आले आहेत? किती महीला नॅचरल जन्म देतात, किती सी सेक्शन व किती घरी? 'बर्थ प्लॅन' म्हणजे काय हे किती इलिटिस्ट महीलांना माहीत आहे? किती इलिटिस्ट महीला प्राईस लिस्ट बाळगतात व त्यांना लागावी का हाही प्रश्न होईलच म्हणा Wink संगोपन म्हणले तर - किती महीला रात्रभर जागून मुलाला चांगल्या शाळेत अ‍ॅडमिशन घेण्याकरता लाईन लावतील पण दहावी पर्यंत तरी मुलाचे शिक्षण माझी जबाबदारी, कोणतीही शाळा असो, काही क्लासेस नको, मी घेते घरी अभ्यास म्हणतात? याचे उत्तर जालावर मिळणे कठीण. मुद्दा इथे महीला वि पुरुष नसुन एकंदर किती स्त्री-पुरुष आयडी खरेच जीवन त्यांना कळले हो असे जालावर दिसतात?

असो कदाचित खरोखर चतुरस्त्र विमेन नो ईट बेटर. मसं इज फॉर लु़जर्स व हुशार्/चतुरस्त्र स्त्रिया तिकडे रियल लाईफ मधे सुखी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आउटसाईड द ऑफ स्टंप असल्यामुळे हा चेंडू तांत्रिकतेच्या नावाखाली सोडून देत आहे. खरंतर इथे षटकार, निदान चौकाराची पुरेपूर शक्यता आहे.

मी शुद्ध आकड्यांचा विचार करते आहे. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी फुले दंपती, महर्षी कर्व्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केली तेव्हा कुठे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुली बोर्डात यायला लागल्या, मुलांपेक्षा अधिक संख्येने मुली पास होऊ लागल्या. आज आकडे कमी का आहेत याचा विचार केला तर आपल्या पुढच्या पिढीला क्वालिटीचा विचार करता येईल.

त्यातून हा विषय चांगला आहे, तुम्ही वेगळा धागाच का सुरू करत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<शंभर-दीडशे वर्षांपूर्वी फुले दंपती, महर्षी कर्व्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात केली तेव्हा कुठे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुली बोर्डात यायला लागल्या, मुलांपेक्षा अधिक संख्येने मुली पास होऊ लागल्या.>>

या विधानातील पूर्वार्ध सरधोपट आहे. स्त्री शिक्षणाची सुरवात कर्वे आणि फुले यांच्याही खूप आधी म्हणजे १८२० च्या दशकातच झाली होती. स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्यांत फुले व कर्वे यांचा क्रमांक नंतरचा आहे. कृपया या काळात बंगाल व मुंबई इलाख्यात कुणी व कसे प्रयत्न केले होते, याचा मागोवा घ्यावा.

अन्य एका स्थळावरील प्रतिक्रियेत आपण 'सती, केशवपन, आलवण अशा प्रथा एलिट किंवा ब्राह्मण समाजाकडून इतरांत झिरपल्या' अशा आशयाचे काही म्हटलात (भरभर प्रतिक्रिया वाचल्याने माझी चूक होत असेल तर सांगावे. ते तुमचे विधान नसल्यास निरीक्षण तुमच्यासाठी नाही.)

उच्चवर्णिय समाज आणि बहुजन समाज यांच्या चालीरीती पूर्वीही स्वतंत्र होत्या. राजघराणी/तालेवार जमीनदार किंवा ब्राह्मणांच्या घरात विधवा सती जात असेल, आलवण नेसून अन केशवपन करुन माजघरात अंधारात कोंडली जात असेल, पण शेतात राबणार्‍या कुणबी समाजाला तसले काही परवडणारे नव्हते. ज्या अन्य जातींमध्ये पुरुष व स्त्रिया घरचा व्यवसाय खांद्याला खांदा लाऊन करत असत तिथेही असे मनुष्यबळ प्रथांच्या नावाखाली रिकामे बसवून ठेवणे टाळलेले आहे. म्हणजेच उच्चवर्णियांच्या तुलनेत अन्य समाज जास्त व्यवहारी व संवेदनशील होता, हे तत्कालीन समाजजीवन बघता लक्षात येते. त्यामुळे या प्रथा उच्चवर्णियांकडून अन्य समाजांत झिरपल्या नाहीत. उलट पुढे समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे ब्राह्मण समाजातून त्यांचे उच्चाटनही झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री शिक्षणाची सुरवात कर्वे आणि फुले यांच्याही खूप आधी म्हणजे १८२० च्या दशकातच झाली होती.

म्हणजे त्यानंतर कधीतरी स्वातंत्र्यानंतर मुली शालेय शिक्षणात पुढे जायला लागल्या!

सती, केशवपन, आलवण अशा प्रथा एलिट किंवा ब्राह्मण समाजाकडून इतरांत झिरपल्या' अशा आशयाचे काही म्हटलात ...

होय. या बाबतीत माझा अभ्यास कमीच आहे. त्यामुळे त्यातली चूक सुधारण्याबद्दल धन्यवाद.
दुसर्‍या बाजूने इंग्लिश शिक्षण आधी उच्चवर्णीयांनी मिळवले. आणि त्यांना नोकर्‍या मिळत आहेत हे पाहून पुढे कनिष्ठ जातीयांनी सुरू केले, असे काहीसे 'लोकमान्य ते महात्मा'मधे वाचले आहे. हे आठवणीतून. योग्य आहे का?
आताची उदाहरणं, फिल्म तार्‍यांची फॅशन लगेच बाजारात दिसणे, ऋजुता दिवेकरची पुस्तकं हातोहात खपणे असं देता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चर्चा एक-दोन लोकांबद्दल नसून एका कंप्लीट सांपलबद्दल आहे.

हे विधान

होय. याच गटाला एलिट म्हणून मी त्यांच्याबद्दलच चर्चा करते आहे

ह्या विधानाशी किंवा विधानातल्या विचाराशी परस्पर विरोधी आहे Smile

- (गोंधळलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंप्लिट सांपलची विकीवरची व्याख्या पहा:
A complete sample is a set of objects from a parent population that includes ALL such objects that satisfy a set of well-defined selection criteria.

मी माझं सांपल ठरवताना संकेतस्थळांवर लिहीणारे लोक यांचं सांपल बनवलं. त्यात स्त्री-पुरूष प्रमाणात कितपत फरक दिसेल याचा विचार केला. प्रमाणात फरक असण्याचं वरकरणी कारण मला दिसत नाही. एखाद्या माणसाची पत्नी (किंवा बहिण) आणि एखाद्या स्त्रीचा नवरा (किंवा भाऊ) आंजावर येत नाही यामुळे फार फरक पडत नाही. माझे पुरूष नातेवाईक संकेतस्थळांवर नसतात याचा अर्थ संकेतस्थळावरच्या स्त्री आयडींचे पुरूष नातेवाईक आंजावर येत नाहीत असा निष्कर्ष काढता येत नाही. लग्न झालेल्या लोकांमधलेही नवरा बायको जोड्या किती दिसतात? फारशा नाहीत. ज्या विवाहीत स्त्रिया अ‍ॅक्टीव्ह आहेत त्यांच्यापैकीही बहुतेकींचे नवरे आंजावर नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वोक्के!

मग सहजरावांची सहमत!

खरे तर चर्चा हवी होती की मराठी इंटरनेट साईट्सवर हुशार चतुरस्त्र स्त्रियांचे [तसेच पुरुषांचे] प्रमाण कमी का?

- (सॅम्पल) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी संस्थळावरच्या स्त्रिया नळावरच्या बायकांसारखे कचाकचा भांडतात असे कुणीसे मराठी संस्थळावरच म्हंटले होते. त्यांच्या तोंडावर फेकायला हा विदा उत्तम ठरावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- पंडित गागाभट्ट.


"I don't owe the world an explanation."

या एका चांगल्या अशा विषयाचा मुख्य हेतू [जरी शीर्षकावरून] एका विशिष्ट कारणासाठीच घेण्याचा लेखिकेचा उद्देश जरी असला तरी तो मांडताना अदिती यानी सुरुवातीलाच समानतेचा मुद्दा आणला आहे तो स्वागतार्ह आहे. त्या लिहितात "तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही." ~ इथे अनेकवचनी संबोधनाचे प्रयोजन कशासाठी आहे हे जरी उमगत नसले तरी वाक्यातील भावनेशी सहमत व्हायला पुरुष गटाला कसलीही अडचण नाही, कारण ती या क्षणीदेखील वस्तुस्थिती आहे. भारतासारख्या आजही या संदर्भातील पुराणकाळातील वांग्याला चिकटून बसलेल्या मनोवृत्तीचा मागोवा घेण्याची गरज नाही इतकी ती खोलवर रुजलेली आहे. मुलीने 'पीएच.डी.' जरी मिळविली तरी नेमकी तिच्या बुद्धिमत्तेची झेप कुठपर्यंत पोहोचली आहे याबद्दल तिच्या आईवडिलांना खरे तर अभिमान आणि आनंद वाटला पाहिजे, पण भोवताली मी असेही पालक पाहिले आहेत की अगदी अभिनंदनाच्या दिवशीच 'हिने पीएच.डी. मिळविली, आता हिच्या लग्नाचे काय ?" असा प्रसाद प्रॉड्क्शन धर्तीच्या चित्रपटातील टिपिकल कौटुंबिक रडीचा संवाद त्यांच्या मनी रुजू लागतो. म्हणजे जिथे पालकांनाच आपल्या मुलीच्या 'अती शिकलेल्या' टॅगची भीती चिंता वाटते तिथे अन्यांची काय कथा !

ज्या देशाच्या शिक्षणपद्धतीवर आपली शैक्षणिक वाटचाल अधोरेखीत आहे त्या खुद्द इंग्लंडमध्येही स्त्री-पुरुष समानतेविषयी काही वेगळी स्थिती नव्हती. इंग्लंडमध्ये मेरी वुल्स्टन क्रॅफ्टसारखी स्त्रीस्वातंत्र्यवादिनी आणि जॉन स्टुअर्ट मिल सारख्या सामाजिक असमानतेविरुद्ध लिहिणार्‍यांनी वेळोवेळी स्त्री-जीवनविषयक प्रश्नावर सडेतोड विचार प्रकट केले म्हणून तिथल्या स्त्री वर्गात 'समानता हक्का'विषयी काहीतरी जागृती निर्माण झाली होती. निसर्गानेच चूल व मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र ठरविले आहे, त्याना पुरुषापेक्षा बुद्धी व कल्पनाशक्ती कमी आहे, त्यामुळे अज्ञान आणि गुलामगिरीची साखळी ही जन्मजातच त्यांच्या गळ्यात आहे, इत्यादी तथाकथित सिद्धांतांची क्रॅफ्ट आणि मिल यानी रेवडी उडविली होती. तसे इथे भारतात झाल्याचा दाखला नाही.

त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील स्त्री-पुरुष विषमतेतील प्रमाण [जे अदितीने 'इंटरनेट सहभाग' संदर्भात चार्टद्वारे दाखविले आहेच] असेच राहण्याचे कारण मुख्यत: पुरुष वर्चस्वाचे आणि ते स्त्रीयांनीही मानले असल्याचे लक्षण आहे.

माझा जालीय दुनियेशी गेल्या वर्षभरातील परिचय आहे आणि त्या आधारे 'सहभागातील जाणविण्याइतपतचा फरक' मी वेळोवेळी नोंदविला आहे. फक्त 'मायबोली' वर (मला) असे आढळले की अन्य संस्थळांच्या तुलनेत इथे स्त्रियांच्या सहभागाचे प्रमाण लक्षणीय आहे. इतकेच नव्हे तर तेथील स्त्री सदस्या हिरीरीने विविध विषयात भाग घेतात - धाग्यांच्या तसेच प्रतिसादाच्या रुपातही - मला वाटते 'मायबोली' च्या स्थापनेलाही बरीच वर्षे झाली असल्याने सुरुवातीच्या काळापासून जे स्त्री सदस्य आहेत त्यांच्यात आता जो आपलेपणाचा कौटुंबिक भाव निर्माण झाला आहे त्याची परिणिती इथल्या सातत्याच्या सहभागात झाली आहे, जी स्वागतार्ह मानली पाहिजे. 'गटग' सारखे उपक्रम राबविणे, त्याद्वारे आणखीन् नवनवीन महिला सदस्यांची ओळख करून घेणे, धागा प्रतिसादव्यतिरिक्तही फोन आणि ई-मेल द्वारे कायम संपर्कात राहणे, मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीविषयी, आरोग्याविषयी व्य.नि. वि.पू. तून सातत्याने चौकशी करणे आदी भावनिक नात्यामुळेही त्यांचा तिथला (मायबोलीवरील) सहभाग कायमचा राहिल्याचे दिसते.

'उपक्रम' आणि 'मीमराठी' वर मात्र स्त्री सदस्यांचे प्रमाण ज्याला 'तुलनात्मक दृष्ट्या कमी' म्हटले जाईल असे आहे. त्याला कारण म्हणजे 'उपक्रम हॅज एस्टॅब्लिश्ड इटसेल्फ अ‍ॅज टू अ‍ॅकेडेमिक टु रीस्पॉन्ड ऑन डेली बेसिस', जिथे पुरुष सदस्यच अनियमितपणे येतात जातात तिथे ज्या काही स्त्री सदस्या आहेत त्यांची काय कथा ! अर्थात उपक्रमचे जे रुपडे आहे ते तिथल्या व्यवस्थापनाचाच निर्णयाचा भाग असल्याने त्याबद्दल अन्यांना तक्रार करायला जागा नाही, अधिकारही पोचत नाही. मात्र 'मीमराठी' हे तसे केन्द्रीभूत नसल्याने तिथे नवनवीन सुचनांना/कल्पनांना व्यवस्थापकांकडून चांगल्या प्रकारे अ‍ॅकॉमोडेट करून घेतले जात असल्याने तेथील उलाढाल अव्याहतपणे चालू असते [जरी मायबोलीच्या तुलनेने तिथेही स्त्री सदस्य संख्या कमी दिसत असली तरी]. विषयांचीही विविधता असल्याचे आढळत असल्याने येथून पुढील काळात मीमराठीवरही स्त्री सदस्यांची संख्या चढत्या भाजणीची दिसेल याची मला वैयक्तिक खात्री वाटते.

"ऐसी अक्षरे" बाबत अदिती म्हणते त्याप्रमाणे ते संस्थळ अजून बाल्यावस्थेत असल्याने "ऐसी...."ची या संदर्भातील "मिळकत" आजच पुढे आणावी असे वाटत नाही. संस्थळाच्या स्थापनेला किमान एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतरच या प्रकारच्या अभ्यासाला जागा द्यावी. तरीही आज या क्षणी तिथे जितके पुरुष सदस्य आहेत त्यांच्या तुलनेने स्त्रीयांचा जितका आकडा असणे अपेक्षित आहे, तो पुरेसा आहे असे ढोबळमानाने म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

राहताराहिला स्त्री सदस्यांचा संस्थळावरील प्रत्यक्ष सहभागाचा प्रश्न. इथेही 'मायबोली' वरील स्त्री सदस्या अन्य संस्थळांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसेल. उपक्रमवर 'प्रियाली', मीमराठीवर 'आतिवास, नीलपक्षी', ऐसी अक्षरेवर अर्थातच 'अदिती आणि रोचना' अशी हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या स्त्रीयांची नावे 'धाग्यां'च्या रुपात दिसतात. "केवळ प्रतिसादात स्वारस्य" अशा घटकापुरतीच या तीन संस्थळावरील काही स्त्री सदस्यांची उपस्थिती कार्यरत असल्याचे जाणवते. पण मायबोलीच्या तुलनेत तो आकडा थिटा आहे हे मान्य व्हावे. [यामध्ये मी 'कविता' या घटकाचा 'धाग्या' च्या व्याख्येत चर्चेसाठी समावेश केलेला नाही.]

असो. आजच्या अति वेगवान आणि वैज्ञानिक युगात स्त्रीजीवनविषयक समस्यांबाबत लोकमत निर्माण करणे वा ते जागृत करण्यास मराठीतील संस्थळे मोलाची कामगिरी करू शकतील असे वाटत असल्याने स्त्री सदस्यांचा (ज्या सर्वार्थाने सुशिक्षित आहेत) सहभाग केवळ पाककृती, वधूशृंगार, बालसंगोपन, भटकंती इतक्या विषयापुरताच मर्यादित न राहता समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्‍या विषयातही त्यांचा सहभाग होत राहिल्यास त्यामुळे अन्य स्त्रीयांनाही वेगवेगळ्या संस्थळांच्या सदस्यत्वाची तहान लागेल.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण चर्चा अजून वाचलेली नाही (इतकं कोण वाचणार!), पण चर्चा करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

१. वरच्या चित्रात दाखवलेल्या हिरव्या आणि लाल रंगाचा संबंध काय?
हिरवा रंग जितका जास्त तितकी ती 'जमात' ग्लोबल इंटरनेट अ‍ॅव्हरेजच्या तुलनेने ओव्हर रिप्रेझेंटेड आहे.
लाल रंग जितका जास्त तितकी ती 'जमात' ग्लोबल इंटरनेट अ‍ॅव्हरेजच्या तुलनेने अडर रिप्रेझेंटेड आहे.

२. जवळजवळ सर्वच मराठी संस्थळांवर वय १८-२४ आणि ४५ च्या पुढे हा वयोगट अंडर रिप्रेझेंटेड आहे.
ग्लोबर अ‍ॅव्हरेजमध्ये जगभरात १८-२४ वयाच्या लोकांचा प्रचंड वाटा आहे. थोडक्यात बहुसंख्य पॉप्युलर वेवसाईट्सवरती १८-२४ वयोगट हा ओव्हर रिप्रेझेंटेड आहे. उदाहरणार्थ पहा, imgur.com , redddit.com इ. facebook.com आणि गुगलवरती हा वयोगट अ‍ॅव्हरेजच्या किंचित वर असला तरी यांचा युजर बेस इतका मोठा आहे, की ह्या वेबसाईट्स अ‍ॅव्हरेज ठरवण्यात मोठा वाटा उचलतात.

यामुळे होतं काय? तर मराठी संस्थळाच्या सँपलची संपूर्ण इंटरनेटच्या सँपलशी तुलना ही अ‍ॅपल-टू-अ‍ॅपल होत नाही.

उरलेले मुद्दे सवडीने....

(का घाईत आहे ते मात्र विचारू नये!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अदिति, एक चांगला विषय पुढे आणला आहेत तुम्ही.
(धागा 'मीम'वर आधी वाचला, तोच इथे आहे, त्यामुळे तिथलेच उत्तर कॉपी केले आहे.)
१. मी मराठी संस्थळांवर मागच्या फक्त तीन महिन्यांपासून वावरत आहे. तुम्ही उल्लेख केलेली बहुतेक संस्थळे मी पाहुणी म्हणून पण पाहिली नाहीत. 'मीम' हे मी जिथे आले ते पहिले संस्थळ. दुसरे 'ऐसी' केवळ मागच्या पंधरा दिवसांत त्यामुळे मर्यादित अनुभवावर काही लिहावे का नाही याबाबत साशंक आहे. पण आता मर्यादा आधीच सांगून टाकल्यामुळॅ पुढे जरा लिहिते.
२. चित्रविचित्र आय. डी, मुळे खरच किती पुरुष आणि किती स्त्रिया इथे वावरतात याचा अंदाज बांधण अवघड आहे. स्त्रीचे नाव घेऊन पुरुष वावरत असेल किंवा पुरुषाचे नाव घेऊन स्त्री वावरत असेल. उदाहरणार्थ माझे 'आतिवास' हे लिहिण्याचे नाव पुरुषवाचक गणले गेले असल्याची शक्यता जास्त आहे.
३. जालावर तात्काल प्रतिसाद नोंदवता येत असल्यामुळे फार जास्त लिहिले जाते - आणि त्या प्रवाहाला तोंड द्यायला पुष्कळ वेळ लागतो. म्हणजे कधी संपतच नाही काही. टेनिसचा चेंडू जसा इकडेतिकडे फटकावत ठेवावा लागतो, तसं सारख बघत रहाव लागत काय चाललय ते. नाहीतर धागाकर्तीला इंटरेस्ट नाही असा आक्षेप येतो. त्याचा ताण येतो आणि मग नुसते वाचक म्हणून राहण्याचा आणि तेही अदृष्य राहण्याचा मार्ग पत्करण्याकडे कल होतो. आपण लिहिलेल्या शब्दांचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात हे समजून घ्यायच असेल तर माणसाने काही काळ संकेतस्थळावर अवश्य घालवला पाहिजे.
४.त्या नादात वाचन, इतर छंद मागे पडतात. हे लक्षात आलं, की संस्थळावरचा वावर कमी होतो.
५. घरात आलं की स्त्रियांना घरच्या कामाची व्यवधानं असतात, त्यामुळे त्यांचा वेळ कमी असतो का?
६. सुरक्षितता हा एक मुद्दा आहे. बिनचेह-याच्या आणि खोट्या नावाच्या माणसांशी सतत संवाद साधण्यात एक प्रकारचा धोका असतो. त्यापेक्षा 'ख-याखु-या माणसांसोबत वेळ घालवणं परवडलं' असं माझ्या काही मैत्रिणी म्हणतात आणि त्यात तथ्यही आहे.
७. कधीकधी संस्थळावरच लेखन हे वर्तमानपत्रांसारखच असत - मग वर्तमानपत्रच वाचलेले काय वाईट? तिथ निदान लेखकाच नाव घेऊन इतरांशी चर्चा तरी करता येते. संस्थळावरच्या लेखकांची नाव काही वेळा चारचौघांत उच्चारताही येत नाहीत Smile

अशी बरीच कारण आहेत माझ्या मते आणि मी ज्यांच्याशी चर्चा करते त्या स्त्रियांचा मते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा वाचतेय आवडीने. आम्हा स्त्रियांची संख्या का कमी ठावूक नाही. पण एस.टी.त पुरुष प्रवासी जास्त असतात. जत्रा, ट्रेन, हॉटेल,कचेर्‍या ईथेही पुरुषांचाच भरणा जास्त मग आंतरजालावर काहीतरी विशेष घडावे अशी अपेक्षा कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायबराबादच्या जवळच्या खेडेवजा उपनगराच्या रस्त्यांवर स्त्रियांचं प्रमाण प्रचंड कमी दिसतं (पुण्यातून तिथे गेल्यावर डोळ्याला हे चटकन जाणवलं, खुपलं.) याचं कारण या उच्चभ्रू समाजातल्या स्त्रियाही पुरूषप्रधान संस्कृतीच्या बळी आहेत. याच उच्चभ्रू स्त्रिया इंटरनेटावर येतात. आणि त्यांचं अनुकरण सायबराबादच्या जवळच्या खेडेवजा उपनगरातल्या स्त्रिया करतात. तुम्ही गंगा उलटी वहाण्याच्या गोष्टी करत आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वयोगट १६ ते २५ : विद्यार्थी दशेतला काळ.
मुली मुलांपेक्षा जास्त अभासु असतात (हे त्यांच्या उत्तीर्ण होण्याचा प्रमाणावरुन लक्षात येईलच.) मुलांना टिंगल टावाळी करण्यात जास्त रर असतो. कदाचीत म्हणुनच या वयोगटातल्या मुलांच आंजावरील प्रमाण मुलींपेक्षा जास्त असेल.

वयोगट २५ ते ३० : नोकरी/धंद्याच्या उमेदीतली वर्षे
काळ बदलत असला तरी अजुनही नोकरी करणार्‍या पुरषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. पर्यायाने मुलींच्या प्रमाणात मुलांचा आंतरजालाशी जास्त संबंध येतो.

वयोगट ३० ते ४४ : गृहस्थाश्रम फेज १
नवीन लग्न झालेली युगुले, पहिलट करणी, लेकुरवाळ्यांचा हा गट. आपला समाज पितृसत्ताक असला तरी त्याची जडण घडण करणारी ती माताच. त्यामुळे लहान बाळाच्या संगोपना पासुन ते त्या बाळाच्या सुरवातीच्या शालेय काळा पर्यंत स्त्री गुरफटलेली असते.

वयोगट ४५ ते पुढे : गृहस्थाश्रम फेज २
मुलं मोठी झाली, हातशी थोडा वेळही आहे पण इडियट बॉक्सच्या आहारी गेलेला हा वर्ग. संगणक अजुनही घराघरात पोहोचलेला नाही. त्यात त्या सासु सुनांच्या कगाळ्यांचा आणि कट कारस्थानांचा मारा असलेल्या मालिकांत पुरषांना जास्त रस नसतो. तेव्हा आपले काका लोक जालावरच्या संसारात रमतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

अलेक्सावर म्हटलेले आहे, की स्त्री-पुरुष यांचे "जनरल इन्टर्नेट यूझर्स" हे प्रमाण मानून मग त्या मानाने स्त्री-उपभोक्ते प्रमाणापेक्षा कमी की अधिक, हे सांगितलेले आहे. पण हे प्रमाण भारताकरिता (किंवा मराठी आंतरजाल वापरकर्त्यांकरिता) किती आहे, हेसुद्धा प्रमाण आपण वापरू शकतो. (जर भारत-विशेष संस्थळांमध्ये सर्वांतच स्त्रियांचा सहभाग कमी असेल, तर चर्चा मराठी संकेतस्थळांकरिता खास असणार नाही. भारतातील वापरकर्त्यांकरिता सामायिक असेल. भारतातील वापरकर्ते जागतिक वापरकर्त्यांत १०%पेक्षा कमी आहेत (विकिपेडियाच्या मते ७.५%). त्यामुळे जगाभरातल्या "जनरल इन्टर्नेट यूझर्स"चे प्रमाण हे भरतातील प्रमाणापेक्षा बरेच वेगळे असू शकते.

आता पुढील काही मराठी संकेतस्थळे बघूया :
महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषेतील प्रवेशद्वार (आलेक्सा दुवा)
ई-सकाळ वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)
लोकसत्ता वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)

आता भारतातील काही स्थळे बघूया :
भारत सरकारचे प्रवेशद्वार (आलेक्सा दुवा)
टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)
द हिंदू वर्तमानपत्र (आलेक्सा दुवा)

या सर्वच ठिकाणी पुरुष उपभोक्ते "जनरल इन्टर्नेट ऑडियन्स"पेक्षा अधिक आहेत, आणि स्त्री-उपभोक्ते "जनरल इन्टर्नेट ऑडियन्स"पेक्षा कमी आहेत.

अशा परिस्थितीत "मराठी संस्थळे भारतातील सामान्य स्थितीशी समसमान आहेत, मराठी संस्थळ असणे हे या बाबतीत वैशिष्ट्य नाही" असे उत्तर देता येते.

अर्थात एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" पुरुष वापरकर्ते अधिक का? स्त्री-वापरकर्ते कमी का? असा प्रश्न कोणी विचारू शकेल. परंतु ही बाब चर्चाविषयाच्या बाहेरची आहे, असे मला वाटते, कारण चर्चाविषयाचा मोठा भाग मराठी स्थळांच्या तपशीलवार आढाव्याचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्वच ठिकाणी पुरुष उपभोक्ते "जनरल इन्टर्नेट ऑडियन्स"पेक्षा अधिक आहेत, आणि स्त्री-उपभोक्ते "जनरल इन्टर्नेट ऑडियन्स"पेक्षा कमी आहेत.

हे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद. आत्ता नेटवर्क अत्यंत मंदगतीने चाललेलं असल्यामुळे दुवे तपासायला वेळ मिळाला नाही, पण तुमच्या निष्कर्षावर विश्वास ठेवतो. या लेखात दिलेला विदा वेगळ्या दृष्टिकोनातून खरोखरच अभ्यासून बघणारे तुम्ही पहिलेच.

"मराठी संस्थळे भारतातील सामान्य स्थितीशी समसमान आहेत, मराठी संस्थळ असणे हे या बाबतीत वैशिष्ट्य नाही" असे उत्तर देता येते.

हेही पटतं.

अर्थात एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" पुरुष वापरकर्ते अधिक का? स्त्री-वापरकर्ते कमी का? असा प्रश्न कोणी विचारू शकेल. परंतु ही बाब चर्चाविषयाच्या बाहेरची आहे, असे मला वाटते, कारण चर्चाविषयाचा मोठा भाग मराठी स्थळांच्या तपशीलवार आढाव्याचा आहे.

हे मात्र पटलं नाही. चर्चाप्रस्तावात भारतातल्या स्त्री-पुरुष समानतेचा आढावा घेतलेला आहे. इंटरनेट वापर हा अलिकडच्या पिढीचा आरसा म्हणून घेतलेला आहे. त्यातल्या त्यात मराठी संस्थळांचं उदाहरण महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे या लेखात जो एका मर्यादित सॅंपलचा अभ्यास आहे, त्याची तुम्ही व्यापक उदाहरणं देऊन स्त्रियांचं एकंदरीतच इंटरनेटवर अस्तित्व कमी आहे असं म्हटलेलं आहे. थोडक्यात, जो विषय चर्चेला होता त्याची सॅंपल साइझ तुम्ही वाढवलीत. पण मूळ प्रश्न - इंटरनेट वावराच्या कमतरतेमागे भारतातील स्त्री-पुरुष समानतेशी निगडित काही कारणं आहेत का? - शिल्लक रहातोच. विद्याचं वैविध्य वाढलं इतकंच.

आता शीर्षकाबाबत कोणी तक्रार करू शकेल - पण मर्यादित सॅंपलचा (मराठी संस्थळं), मर्यादित विदा (अलेक्साचे आलेख) दिल्यानंतर मर्यादितच प्रश्न विचारणं रास्त ठरतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जागतिक (देशनिहाय) विश्लेषणाकरिता एक दुवा (पीडीएफ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगभरातील स्त्री-पुरुष प्रमाण बघायचं असेल तर देशांच्या गुगलचा डेटा पाहिल्यास मदत होईल असे मला वाटते.

उदाहरणार्थ गुगल इंडियाचा दुवा: http://www.alexa.com/siteinfo/google.co.in
गुगल युके : http://www.alexa.com/siteinfo/google.co.uk
गुगल ब्राझीलः http://www.alexa.com/siteinfo/google.com.br
गुगल स्पेनः http://www.alexa.com/siteinfo/google.es
गुगल फ्रांसः http://www.alexa.com/siteinfo/google.fr
गुगल टर्की: http://www.alexa.com/siteinfo/google.com.tr
गुगल अर्जेंटिना: http://www.alexa.com/siteinfo/google.com.ar
गुगल ऑस्ट्रेलिया: http://www.alexa.com/siteinfo/google.com.au ***
गुगल रशिया: http://www.alexa.com/siteinfo/googlerussiablog.blogspot.com

अशा प्रकारे गुगलचा डेटा जमवून जगभरात काय परिस्थिती आहे हे पाहता येईल.
वरच्या देशांशी तुलना केली तर ऑस्ट्रेलिया सोडता सर्वच देशांमध्ये स्त्रीया कमी-अधिक अंडर रिप्रेझेंटेड आहेत. गुगल.कॉम मात्र जवळजवळ 'प्रमाण' दाखवतं. यावरून भारताचं स्त्री-पुरुष प्रमाण इतर(बहुसंख्य) देशांच्या तुलनेत फारसं वेगळं नसावं असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

गूगल.सीएन (चीन)
http://www.alexa.com/siteinfo/google.cn#
गूगल.कॉम (यू.एस)
http://www.alexa.com/siteinfo/google.com#

या दोन देशांत स्त्री:पुरुष प्रमाण "सरासरी" आहे. मी वर दिलेल्या विकीदुव्यावरून दिसते, की जगातील बहुतेक (लार्ज मेजॉरिटी, फक्त प्लुरॅलिटी नव्हे) जालवापरकर्ते या दोन देशांतले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे दोन देशच सरासरी 'ठरवत' आहेत.

(थोडंसं अवांतर. गुगल चीन पेक्षा बायडू.कॉम जास्त 'रिलेव्हंट' आहे. बायडूचा चीन रँक १ आहे तर गुगल चीनचा २७. (गुगल इतर सर्व(च?) देशात १ रॅंक आहे.) http://www.alexa.com/siteinfo/baidu.com

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

विषयाला धरून वाट्णार नाही कदाचित पण.. आंजावरचे जास्तीचे पुरुष हे -
"फेसबुकावर हजार मित्रं...गल्लित विचारत नाही कुत्रं!"(नाव घेतात त्या स्टाईलनी म्हणायचं)- या प्रकारातले असतील तर स्त्रीया कमी आहेत याचा आनंदच होईल !

मराठी आंजावर स्त्रीया कमी आहेत ही माहिती नवीनच आहे...कारणं उमगली नाहीयेत अजून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रकारातले असतील तर स्त्रीया कमी आहेत याचा आनंदच होईल !

होय ... फेसबुकावरचे अनेक प्रकार पहाता अशीच वेळ येते.
फेसबुक आणि मराठी साईट्स यांच्या प्रवृत्तींमधे मुळात फरक असावा असं वाटतं. फेसबुकावर लाईकचं बटण दाबून मोकळं होता येतं, संस्थळांवर नुस्ते '+१' करून प्रतिष्ठा मिळवता येते असं मला वाटत नाही. त्यामुळे एकूणच फेसबुकावर जमावाने दिसणारे लोकं संस्थळांवर मात्र दिसत नाहीत.

इतर संस्थळांवर वेगळ्या प्रकारेही चर्चा झाली; त्याचं सारही इथे लिहीते. फक्त थोडा वेळ लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धनंजय, अलेक्सा पार गंडलेलं आहे हे मानलं तरीही मिपा, मीम, उपक्रम आणि ऐसी अक्षरे या चार संस्थळांवर हजर सदस्यांची यादी दिसते. नावं पाहून, (जुन्या लोकांची बर्‍यापैकी माहितीही असतेच) स्त्रियांचा अभाव दिसून येत नाही का?

आतिवास, अशोक पाटील आणि गणपा यांच्या प्रतिक्रियाही रोचक आहेत.

इंटरनेटवर फेसलेस वावरता येण्यामुळे, संस्थळांवर व्यक्त होण्यात लोकशाहीमुळे फारशी बंधनं स्त्रिया स्वतःवर लादून घेत नसतील असं वाटत होतं, पण अशोक पाटील आणि आतिवास यांच्या विधानांतून असं वाटत नाही. कदाचित मराठी आंजा हे माध्यम अजून पुरेसं जुनं झालेलं नसावं किंवा एकूणच संस्थळ-साक्षरता कमी असावी (उदा: आपली खरी माहिती अगदी लगेच जाहीर करू नये, मैत्री किड्यांचा उपद्रव वाटत असेल तर नावही संदिग्ध घ्यावं इ) अशीही एक शंका येते.

आपण लिहिलेल्या शब्दांचे किती वेगवेगळे अर्थ निघू शकतात हे समजून घ्यायच असेल तर माणसाने काही काळ संकेतस्थळावर अवश्य घालवला पाहिजे.

होय, मी दमले आज चर्चा करून!
मायबोलीवर अधिक प्रमाणात स्त्रिया दिसतात हे अशोक पाटील यांचं निरीक्षण मलाही दिसतं. स्त्रियांसाठी तिथे काही उपक्रम चालवले जातात असं ऐकून आहे. तिथे साहित्याबद्दल तिथलं लिखाण (प्रतिसाद?) चांगलं वाटतं.

एकूण या चर्चेवरून मी स्वतः बरंच काही शिकते आहे हे निश्चित. काय शिकले याचं उत्तर इतक्यात देता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@ अदिती

"तिथे साहित्याबद्दल तिथलं लिखाण (प्रतिसाद?) चांगलं वाटतं." ~ तुमच्या या निरीक्षणाशी मी सहमत आहे. मायबोलीवरील "मी वाचलेले पुस्तक" हा धागा आणि त्यावरील स्त्री सदस्यांचा सहभाग पाहिल्यानंतर ही बाब प्रकर्षाने लक्षात येते (तुलनेसाठी म्हणतोय मी). १९३७ साली प्रथम प्रकाशित झालेल्या सादिक हिदायतच्या 'The Blind Owl' विषयीचा उल्लेख तिथे एक स्त्री सदस्य करते त्याचवेळी त्यांच्या वाचनातील चौफरता/सखोलता लक्षात येते. जुलै २००८ मध्ये सुरू झालेल्या तेथील त्या धाग्यावर आतापर्यंत १९०० विस्तृत अशा प्रतिक्रिया असून त्यातील स्त्री सहभागाचे प्रमाण (दोन्ही बाजूनी - १. पोच प्रतिसाद, २. प्रत्यक्ष काय वाचले वा काय वाचा या संदर्भात) पुरुष सदस्यांपेक्षाही जास्त दिसले. ही एक आवर्जून नोंद करण्यासारखी बाब आहे असे मला वाटते.

इथे 'ऐसी अक्षरे' वरील रोचनाताईंच्या "सध्या काय वाचताय ?" या धाग्याची "मी वाचलेले पुस्तक" या धाग्याशी तुलना करण्याचा मोह मला पडतोय. या क्षणापर्यंत रोचना प्रस्तुत वाचन धाग्यावर ११० सविस्तर असे प्रतिसाद आले आहेत. त्याचा आढावा घेतल्यानंतर मला असे आढळले की :

१. रोचना यानी तिथे ११ प्रतिसाद दिले आहेत. पण त्या स्वत:चा धागाकर्तीच्या भूमिकेत असल्याने त्यांचा तेथील तितका सहभाग असणे क्रमप्राप्त मानावे.
२. ३१४ अदिती : ७
३. रुची : ३
४. मेघना : २
५. अदिती : २
६. मणिकर्णिका : १
७. आतिवास : १
८. राधिका : १
९. सारिका : १
(चू.भू.दे.घे.) = एखादी स्त्री सदस्य टोपणनावाने इथे वावरत असेल तर तो विदा माझ्याकडे नसल्याने व्यवस्थापक या प्रतिसादाच्या आकड्यात त्याप्रमाणे दुरुस्ती करू शकतात.

= एकूण २९ [ से ३०, म्हणजेच "वाचन" या विषयावर ८० प्रतिसाद पुरुष सदस्यांचे आहेत]

~ शैक्षणिक दर्जा, नोकरीतील दर्जा, कौटुंबिक दर्जा, सामाजिक दर्जा आदींचा विचार केल्यास या गटातील 'स्त्री' वर्गाला अन्य कलांप्रमाणे वाचनाचीही आवड असल्याचे गृहित धरले तर त्यांच्या या विषयातील सहभाग केवळ धागा 'वाचनमात्र' न ठेवता प्रत्यक्ष सहभाग होणे अपेक्षित आहे. दुसरे असे की मग 'ऐसी अक्षरे' वर फक्त याच ९ स्त्रिया आहेत का ? त्यातही रोचना, अदिती (३१४) आणि सारिका (अजून काही असतीलही) यांचा वावर अन्य धाग्यांवर सातत्याने दिसतो. अदिती या तर संस्थळ संस्थापक सदस्या असल्याने त्यांचे इथे सातत्याने असणे तो एक पॉलिसीचा भाग मानला तरी त्या ज्या ज्या विषयात भाग घेतात तिथे तिथे त्यांचे "सबमिशन थरो' असल्याचे जाणवते.

विविध उपक्रम राबविणे आणि त्यात स्त्री सदस्यांचा सहभाग कशारितीने वाढता होईल हे परवाच्या 'मराठी दिना' निमित्ताने मायबोलीने दाखवून दिले आहे. अदिती यानी प्रस्तुत केलेल्या या "सांख्यिकी" शास्त्राच्या निमित्ताने हा "स्त्री सहभाग वृद्धी" चा प्रयोग 'ऐसी अक्षरे' वरही प्रभावीरितीने कसा राबविता येईल यावर मंथन झाले तरच या धाग्याच्या इष्ट परिणाम.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम धाग्यात दिलेला विदा मनावर घेतल्याबद्दल धन्यवाद. तसंच तुम्ही तो स्वतंत्रपणे तपासून बघण्यासाठी एवढे कष्ट घेतले हे तर फारच कौतुकास्पद आहे. एकास एक तुलना करण्याची पद्धतही आवडली. जितके अधिक लोक समस्यांविषयी वा एकंदरीतच विधानांविषयी आकडेवारीत बोलतील तितकं जगाचं भलं होईल असं माझं मत आहे.

मायबोलीवरच्या त्या लेखातला स्त्रियांचा सहभाग तपासून बघितला. गेल्या एक-दोन महिन्यांतली तीनेक पानं. त्यात खरोखरच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्त्री आयडींचा सहभाग अधिक दिसतो. तिथे अर्थातच सर्व आयडींवरून स्त्री की पुरुष ओळखणं शक्य नाही, पण जे उघड उघड दिसतात त्यांपैकी सुमारे ५०% स्त्री आयडींचे प्रतिसाद दिसतात.

मात्र तिथेही एक कंपार्टमेंटलायझेशन दिसतं. उदाहरणार्थ अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे बेकायदा बांधकाम तोडा:... या लेखाला ९४ प्रतिसाद आहेत, पण फक्त एकच उघड स्त्री आयडीकडून आहे. याउलट वैज्ञानिक दृष्टिकोन कसा वाढवावा या सर्वसाधारणपणे पुरुषी समजल्या जाणाऱ्या विषयावर ऐसीवर ४८ पैकी १५ प्रतिसाद स्त्री आयडींकडून आहेत. कदाचित ऐसीवरची आयडीसंख्याच कमी असल्याने जवळपास प्रत्येक लेखावर ऍक्टिव्ह स्त्री आयडी लिहितात, असंही असू शकेल. पण एवढ्यात तरी मायबोली व ऐसी अक्षरेची डेमोग्राफिक तुलना करणं कठीण आहे असंच मी म्हणेन. इथे नोंदल्या गेलेल्या सभासदांची संख्या काही हजारांवर गेली की मग काही तुलना करणं योग्य ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही नाही, राजेशजी - माझ्या मनात दोन संस्थळांची 'डेमोग्रामिक' तुलना करण्याचा किंचितही विचार नाही, नव्हताच मुळी. फक्त "शैक्षणिक गुणवत्ता" आणि 'वाचन संस्कृती' या दोन्हीची सांगड [सहभागाच्या दृष्टीने] घालण्याचा मी एक सहज प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केवळ त्याच मर्यादेत राखला आहे. मायबोलीच्या स्थापनेपासूनचा कालावधी आणि ऐसी अक्षरेची वाटचाल यात निश्चितच महदंतर आहे आणि ते असल्याने दोन्हीची सदस्य संख्येच्या पटलावरून तुलना अप्रस्तुत आहे हे कुणालाही मान्य व्हावे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सर्वच आयडीवरून स्त्री की पुरुष ओळखणं शक्य नाही (आणि तो विषयही वेगळाच आहे) तरीही तेथील (मा.बो.) ज्या स्त्री सदस्यांची 'वाचन' संदर्भात माझ्याशी व्य.नि.वरून जी काही थोडीबहुत देवाणघेवाण झाली त्यातील भाषेच्या धाटणीवरून 'स्त्री की पुरुष' या शंकेला जागा नाही.... वयाच्या अनुभवाच्या आधारे तितपत मी ओळखू शकतो. असो.

कंपार्टमेन्टलायझेशनच्या संदर्भात स्वानुभवावरून मी इतकेच म्हणू शकेन की स्त्रीच काय पण कित्येक पुरुष सदस्यही असे आहेत की ते 'दंग्यात' सामील होऊ इच्छित नाहीत. 'अफझलखान कबर' तर नवाच धागा आहे, पण मागील आठवड्यातील 'सावरकर आणि सेल्युलर जेल' यावर तब्बल ४००+ प्रतिसाद आले आहेत आणि 'सावरकर' हा विषय ऐतिहासिक महत्वाचा असूनही तितक्या लक्षणीय संख्येने माबोवर असलेल्या स्त्री सदस्यांपैकी एकीनेही तिथे प्रतिसाद दिलेला नाही. दुसरीकडे त्याच धाग्याच्या आगेमागे एका पाठोपाठ एक असे "इतिहास" याच विषयावरील दोन धागे तिथे प्रकाशित झाले आणि त्या धाग्यांनीही प्रतिसादांचे द्विशतक गाठले. या दोन धाग्यावर मात्र सुमारे ७५ स्त्री सदस्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतल्याचे चित्र उमटले आहे.

याला कारण ?
अर्थात सदस्यांची प्रतिसादातील भाषा. या भाषेमुळेच 'स्त्री' सदस्य "आपण तिथे भाग घ्यावा की न घ्यावा ?" अशा दुहेरी पेचात असते आणि मध्यममार्ग म्हणून त्या धाग्याच्या रस्त्यावर आपली लेखणी टेकवीत नाही. थोडक्यात एखादा धागा विषय कशारितीने फुलवित न्यावा याची (अप्रत्यक्षरित्या) जबाबदारी मग पुरुष सदस्यावरच येते. त्यामुळे कंपार्टमेन्टलायझेशन होण्याच्या मागील 'सायकॉलॉजी' तपासल्यास स्त्री सहभागाविषयीचे गणित सुटेल.

तथापि 'रीडिंग कल्चर' हा सर्वस्वी वैयक्तिक आवडीचा भाग असतो. "मला अमुक एका लेखकाचे तमुक एक पुस्तक आवडले वा ना आवडले" इतपत जरी सहभाग असला तरी तो धागा खुलतो; त्या संदर्भात चांगली माहितीही मिळत जाते. आंतरजालीय घडामोडीमध्ये सहभाग असलेली व्यक्ती (मग ती स्त्री असो वा पुरुष) 'वाचनप्रेमी' असते असा माझा का कोण जाणे समज झालेला असल्याने माझा तशा तुलनेकडे ओढा गेला. बाकी अन्य कोणत्याही स्टेटसकडे संपादक मंडळाने ध्यान द्यावे असे मी सुचवीत नाही; तसा जर समज माझ्या पहिल्या प्रतिसादामुळे झाला असल्यास मग ती माझी चूक आहे हे कबूल करतो.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझेही (काहीसे लांबलचक व म्हणूनच स्वतंत्र लेखात मांडलेले) मत

http://www.aisiakshare.com/node/612

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चर्चा कशी आणि कुठे चालली आहे ते वाचत होतो.

अलेक्साकडचा विदा माझ्या सर्वसाधारण निरीक्षणांशी जुळतो. मराठी आंतरजालावर स्त्रियांचं प्रमाण कमी आहे यात वादच नाही. यावर थोडक्यात अनेकांनी म्हटलेलं आहे, 'त्यात विशेष काय, सगळीकडेच ते कमी आहे, म्हणून मराठी आंतरजालावर कमी आहे.' धनंजयनेदेखील विदा देऊन दाखवलं आहे की की भारतातल्या स्त्रियांच्या बाबतीत, एकंदरीतच आंतरजालावर वावर कमी आहे, त्यात मराठी आंतरजाल काही वेगळं नाही.

इथे बहुतेकांना उत्तर सापडल्यासारखं वाटतं. पण खरा तर प्रश्न इथे सुरू होतो. धनंजयच्या तिथल्याच पुढच्या प्रतिसादात तो म्हणतो की

"मराठी संकेतस्थळ" यापासून बदलून मी विचारलेला प्रश्न एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" इंटरनेटचे स्त्री-वापरकर्ते कमी का? हा स्त्रियांच्या रोजीरोटी आणि सबलीकरणाशी संबंधित होतो. मला तरी हा व्यापक प्रश्न मुळीच भंपक वाटत नाही.

मला हाच कळीचा मुद्दा वाटतो. आंतरजालावर कमी दिसणारा स्त्रियांचा वावर हा प्रश्न नसून तो एका व्यापक प्रश्नाचा दृश्य परिणाम आहे. स्त्रियांचं सबलीकरण अजूनही झालेलं नाही हा मुद्दा रहातोच.

अनेकांनी मांडलेली कारणं हेच अधोरेखित करतात.
- घरी एकच कॉंप्युटर असतो - तो नवऱ्यालाच मिळतो. (असमानता, पुरुषांना प्रथमस्थान)
- बायकांना संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळतो. (चूल आणि मूल हेच जीवन)
- बऱ्याच घरी कॉंप्युटर नसतो, पण पुरुषांना मात्र नोकरीच्या ठिकाणी कॉंप्युटर वापरता येतो. (असमानता, नोकऱ्या पुरुषांनाच अधिक असतात)
- स्त्रिया वाद घालायला कचरतात (दबलेपणाची भावना)
- स्त्रियांना जालीय वावराची भीती वाटते (असुरक्षितता)
- स्त्रियांना तंत्रज्ञानाची भीती वाटते (लहानपणापासून धोका पत्करण्याचं, नवीन वस्तु हाताळण्याचं स्वातंत्र्य वा शिक्षण न दिल्यामुळे ही भीती येत असावी)

म्हणजे समाजात एकंदरीतच स्त्रियांमध्ये - अगदी वरच्या वर्गातल्या स्त्रियांतही (अदिती ज्यांना एलिट म्हणते) - हे वेगवेगळ्या पातळीवर दडपलेपण आहे. या चर्चेतून हा मुद्दा पुढे येतो हे या चर्चेचं यश आहे. यात विशेष काय, हे इतर ठिकाणी दिसतंच वगैरे म्हणणं म्हणजे आहे ती परिस्थिती वाईट आहे हे नाकारणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वजागी चालू असलेली चर्चा वाचली. मुद्दे व गुद्दे दोन्ही स्थितीप्रज्ञ (?) अवस्थेत गळी उतरवले तरी एक कळीचा मुद्दा बाजूला राहीला.

"ऐसी अक्षरे, स्त्रियांचे प्रमाण वाढावे म्हणून काय प्रयत्न करणार आहे?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

अतिशय योग्य प्रश्न. माझ्याकडे आत्ता उत्तर आहे असं मला अजिबात वाटत नाही. पण याबद्दल सर्वच संकेतस्थळ चालक, मालक आणि नियमित सदस्यांनी विचार करावा असं निश्चित वाटतं. मला स्वतःला या विषयाबद्दल अतीव जास्त कळकळ आहे याचा अर्थ उत्तर आहे किंवा सुचेलच असं नाही.

(इतर ठिकाणी चर्चेत फार वेळ गेल्यामुळे होमपिचवर सर्वात उशीरा उत्तर देत आहे; क्षमस्व.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक चर्चा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.