ऋणनिर्देश
ऋणनिर्देश
नमस्कार,
'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाची ही तिसरी खेप. पहिल्या दोन अंकांप्रमाणेच, हाही अंक आमच्या वाचकांच्या हाती सुपुर्द करताना मनात आनंदाची भावना आहे. मागील दोन अंकांनंतर दिवाळी अंकाबद्दलच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, त्यांची जबाबदारी ओळखून आम्ही यंदाही त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. वाचकांना आमच्या प्रयत्नांमागचा प्रामाणिकपणा जाणवेल अशी अपेक्षा आहे.
गेल्या तीन वर्षांत अंकाची व्याप्ती जसजशी क्रमाक्रमाने वाढत गेली, तसतशी नव्या लोकांनी या प्रकल्पात सामील होण्याची गरज अधिकाधिक जाणवत गेली. सुदैवाने आम्हांला यंदाच्या वेळी संपादनाकरता राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, चिंतातुर जंतू, ऋषिकेश यांच्याबरोबरच मेघना भुस्कुटे, अमुक, जयदीप चिपलकट्टी यांच्यासारख्या बहुश्रुत, विविध विषयांमध्ये गती असणार्या सवंगड्यांची साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी संपूर्ण अंकाची तांत्रिक बाजू समर्थपणे पार पाडली. त्यांच्याशिवाय हा अंक योग्य वेळी आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य त्या स्वरूपात प्रकाशित करणं प्रायः अशक्य होतं. अमुक या आमच्या गुणी मित्राकडून आमच्या यंदाच्या अंकाला साजेसं मुखपृष्ठ आणि अन्य रेखाटनं मिळाली याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. व्याकरण आणि प्रमाणलेखन यांबाबत अंक बिनचूक व्हावा म्हणून केलेल्या कामात मेघना भुस्कुटे, अमुक व नंदन यांनी केलेल्या मुद्रितशोधनाचा मोठा हात आहे. त्यांचे याबाबत विशेष आभार.
राजेश घासकडवी यांनी यंदाच्या अंकासाठी 'चळवळ विशेषांक' अशी मध्यवर्ती कल्पना सुचवली. अगदी थोडक्या कालावधीत या विषयासंदर्भात यथोचित लिखाण करणार्या लेखकांचे आभार. निरनिराळ्या वयोगटांतल्या, व्यवसायांच्या लोकांच्या लिखाणातून, विचारवंतांच्या मुलाखतींमधून या विषयाचा आढावा घेतला जाताना त्यातून वाचकांचं रंजनही होईल अशी आशा वाटते.
संपूर्ण दिवाळी अंक एकाच वेळी प्रकाशित न करता क्रमाक्रमाने प्रकाशित करत जाण्याच्या आमच्या निर्णयाचं गेल्या वर्षी एकंदरीत चांगलं स्वागत झालं होतं. तीच प्रक्रिया आम्ही यंदाही अनुसरत आहोत. या निर्णयामागची कारणमीमांसा नव्या वाचकांनाही पटेल असं आम्हांला वाटतं.
विशेषांक प्रकार
विनोद होता ना?
विनोद होता ना?
जालशोध केल्यास यूट्यूब व्हिडियो सापडला होता. ऐसी अक्षरे म्हणून कोणतेसे छापील मासिक आहे, त्याचा दशकपूर्ती सोहळा, राज ठाकरे यांचे भाषण होते (८ नोव्हेंबर २०१३) त्याबाबत एबीपी माझा वाहिनीवरची वार्ता :
https://www.youtube.com/watch?v=_ITz02CaLNg
पीडीएफ
पीडीएफ आवृत्ती वेळेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. काल बराच वेळ ती आवृत्ती उतरवून घेण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. शेवटी रात्री झाली डाऊनलोड एकदाची.
आता कसे संपूर्ण पैठणी उलगडून पाहिल्याचा फील येतोय. ते वेगवेगळे धागे पाहिल्यावर दुकानदाराने पूर्ण घडी न मोडता आधी पदरच दाखव, नंतर काठच दाखव असला प्रकार वाटत होता. तो प्रकार आपल्याला कुछ जम्या नाही बॉ.
बाकी आता तुणतुणे वाजविणे थांबवितो. दिवाळी अंक अप्रतिम झालाय. माझ्याकडे गेल्या दोन तीन वर्षांचे वेगवेगळे दिवाळी अंक (पीडीएफ आवृत्ती) आहेत. कधी आठवण झाली की चाळून बघता येतात.
त्या "मोगरा फुलला" वाल्या बाईंचाही एक अंक आला होता. नंतर त्या जालीय विश्वातून नाहिशाच झाल्या बहुतेक. असो.
संपादक मंडळ, लेखकूंना हार्दिक धन्यवाद !
'ऐसी..' दिवाळी अंकाची 'लोकसत्ता'ने घेतलेली दखल
'ऐसी..' दिवाळी अंकाला 'लोकसत्ता'ने सर्वोत्तम ऑनलाईन दिवाळी अंक म्हटले आहे.
अतिशय सुरेख
अंक सुरेख निघाला आहे. इतका की कित्येक छापील दिवाळीअंकसुद्धा ऐसी-दिवाळीपुढे फिके पडले आहेत. मुखपृष्ठापासून ते अगदी प्रतिसादांपर्यंत सारेच वाचनीय आहे. 'चळवळ' ही थीम निवडणूक-निकालांच्या पार्श्वभूमीवर अभिनव वाटली.
थीम निवडणार्यांचे, दिग्गजांच्या मुलाखती आणि लेख मिळवणार्यांचे, संपादकमंडळाचे, मांडणीकारांचे, तांत्रिक सल्लागारांचे सर्वसर्वांचे श्रम सार्थकी लागले आहेत.
या वर्षी इतका उच्च दर्जा गाठल्यानंतर पुढल्या वर्षी याहीपेक्षा अधिक सरस कामगिरीची अवघड अपेक्षा निर्माण झालीय. या अपेक्षापूर्तीच्या कठिण जबाबदारीसाठी आगाऊ शुभेच्छा.
ऑनलाइन दिवाळी अंकांविषयी
ऑनलाइन दिवाळी अंकांविषयीच्या 'नागपूर लोकसत्ता'मधल्या एका लेखात 'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाचा उल्लेख आणि मेघना भुस्कुटे ह्यांची प्रतिक्रिया आहे.
अरे वा! सकाळी सकाळी दिवाळी
अरे वा! सकाळी सकाळी दिवाळी अंक २०१४ पाहून फार आनंद झाला. प्रतिक्षा होतीच केव्हा येतोय अंक याची.
ऐसी अक्षरेच अभिनंदन!!
आणि अंकासाठी मेहनत घेणार्या सर्वांचे खूप आभार _/\_