Skip to main content

ऋणनिर्देश

ऋणनिर्देश

- ऐसीअक्षरे

नमस्कार,

'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाची ही तिसरी खेप. पहिल्या दोन अंकांप्रमाणेच, हाही अंक आमच्या वाचकांच्या हाती सुपुर्द करताना मनात आनंदाची भावना आहे. मागील दोन अंकांनंतर दिवाळी अंकाबद्दलच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, त्यांची जबाबदारी ओळखून आम्ही यंदाही त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. वाचकांना आमच्या प्रयत्नांमागचा प्रामाणिकपणा जाणवेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या तीन वर्षांत अंकाची व्याप्ती जसजशी क्रमाक्रमाने वाढत गेली, तसतशी नव्या लोकांनी या प्रकल्पात सामील होण्याची गरज अधिकाधिक जाणवत गेली. सुदैवाने आम्हांला यंदाच्या वेळी संपादनाकरता राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, चिंतातुर जंतू, ऋषिकेश यांच्याबरोबरच मेघना भुस्कुटे, अमुक, जयदीप चिपलकट्टी यांच्यासारख्या बहुश्रुत, विविध विषयांमध्ये गती असणार्‍या सवंगड्यांची साथ मिळाली. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी संपूर्ण अंकाची तांत्रिक बाजू समर्थपणे पार पाडली. त्यांच्याशिवाय हा अंक योग्य वेळी आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य त्या स्वरूपात प्रकाशित करणं प्रायः अशक्य होतं. अमुक या आमच्या गुणी मित्राकडून आमच्या यंदाच्या अंकाला साजेसं मुखपृष्ठ आणि अन्य रेखाटनं मिळाली याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. व्याकरण आणि प्रमाणलेखन यांबाबत अंक बिनचूक व्हावा म्हणून केलेल्या कामात मेघना भुस्कुटे, अमुक व नंदन यांनी केलेल्या मुद्रितशोधनाचा मोठा हात आहे. त्यांचे याबाबत विशेष आभार.

राजेश घासकडवी यांनी यंदाच्या अंकासाठी 'चळवळ विशेषांक' अशी मध्यवर्ती कल्पना सुचवली. अगदी थोडक्या कालावधीत या विषयासंदर्भात यथोचित लिखाण करणार्‍या लेखकांचे आभार. निरनिराळ्या वयोगटांतल्या, व्यवसायांच्या लोकांच्या लिखाणातून, विचारवंतांच्या मुलाखतींमधून या विषयाचा आढावा घेतला जाताना त्यातून वाचकांचं रंजनही होईल अशी आशा वाटते.

संपूर्ण दिवाळी अंक एकाच वेळी प्रकाशित न करता क्रमाक्रमाने प्रकाशित करत जाण्याच्या आमच्या निर्णयाचं गेल्या वर्षी एकंदरीत चांगलं स्वागत झालं होतं. तीच प्रक्रिया आम्ही यंदाही अनुसरत आहोत. या निर्णयामागची कारणमीमांसा नव्या वाचकांनाही पटेल असं आम्हांला वाटतं.

विशेषांक प्रकार

ॲमी Mon, 13/10/2014 - 06:52

अरे वा! सकाळी सकाळी दिवाळी अंक २०१४ पाहून फार आनंद झाला. प्रतिक्षा होतीच केव्हा येतोय अंक याची.
ऐसी अक्षरेच अभिनंदन!!
आणि अंकासाठी मेहनत घेणार्या सर्वांचे खूप आभार _/\_

वामा१००-वाचनमा… Mon, 13/10/2014 - 18:55

दिवाळी अंकाच्या मेजवानीबद्दल आम्हा पिटातल्या प्रेक्षकांकडूनही आभार बर्का :)
__________
रंगसंगती, चित्रे सगळच सुंदर वाटलं!

जयदीप चिपलकट्टी Mon, 13/10/2014 - 20:27

> सुदैवाने आम्हांला यंदाच्या वेळी संपादनाकरता … जयदीप चिपलकट्टी यांच्यासारख्या … सवंगड्यांची साथ मिळाली.

आई गं…

कान्होजी पार्थसारथी Mon, 13/10/2014 - 22:18

अंक फक्कड वाटतोय. सर्व मानकरी, संपादक, मुद्रितशोधक, मुलाखतकार, तंत्रज्ञा आणि अमुक यांचे मनापासून अभिनंदन.

आडकित्ता Mon, 13/10/2014 - 22:26

आला पण अंक? अभिनंदन.
थीम सुंदर आहे. वाचून पुढे लिहीनच.

रच्याकने 'तिसरी खेप' हा शब्दप्रयोग आवडला. बाळंत/गर्भारपणाचा उल्लेख खेप असा केला जातो. एकंदर दिवाळी अंक तयारकरण्यातल्या इन्सेप्शन कन्सेप्शनपासून प्रसववेदनांसह डिलिवरीपर्यंतचा हिशोब केला, तर खेपच म्हणायला हवी.

मुग्धा कर्णिक Fri, 17/10/2014 - 14:17

छान थीम आणि छान अंक. पहिला जेवणाचा लेख मस्त असला तरीही चळवळ थीमशी कसा काय संबंध बुवा?
चळवळ करणारांना सोडणारांना आयुष्यातला काही काळ घास गिळत नाहीत म्हणून की काय. :)
अभिनंदन!

मुग्धा कर्णिक Fri, 17/10/2014 - 14:17

छान थीम आणि छान अंक. पहिला जेवणाचा लेख मस्त असला तरीही चळवळ थीमशी कसा काय संबंध बुवा?
चळवळ करणारांना सोडणारांना आयुष्यातला काही काळ घास गिळत नाहीत म्हणून की काय. :)
अभिनंदन!

मेघना भुस्कुटे Fri, 17/10/2014 - 14:19

In reply to by मुग्धा कर्णिक

तुम्ही ट्रॅकर पाहिला असणार. तिथे ज्या लेखाला सगळ्यांत ताजी प्रतिक्रिया मिळाली आहे तो लेख वर दिसतो. ही अनुक्रमणिका बघा. इथे योग्य वर्गीकरण सापडेल.

आदूबाळ Wed, 22/10/2014 - 00:40

ऐसी अक्षरे दिवाळी अंकाबद्दल आयबीएन लोकमत वाहिनीवर कोणाचीतरी मुलाखत झाली असं एका मित्राने वत्स एप्प वर कळवलं.

१. अभिनंदन!
२. कोणाची मुलाखत झाली?
३. पहायला मिळेल का?

धनंजय Fri, 24/10/2014 - 17:06

In reply to by मिहिर

विनोद होता ना?
जालशोध केल्यास यूट्यूब व्हिडियो सापडला होता. ऐसी अक्षरे म्हणून कोणतेसे छापील मासिक आहे, त्याचा दशकपूर्ती सोहळा, राज ठाकरे यांचे भाषण होते (८ नोव्हेंबर २०१३) त्याबाबत एबीपी माझा वाहिनीवरची वार्ता :
https://www.youtube.com/watch?v=_ITz02CaLNg

आदूबाळ Fri, 24/10/2014 - 17:47

In reply to by धनंजय

नाय दादा. आयबीएन लोकमत वाहिनी. २१ ऑक्टोबर २०१४ ला रात्री १०-११च्या दरम्यान कधीतरी ही मुलाखत प्रसारित करण्यात आली.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/10/2014 - 19:21

In reply to by आदूबाळ

मेघना भुस्कुटे होत्या.

कबूल केली होती त्या तेरा मिनीटांऐवजी जेमतेम सहा मिनीटं मिळाल्यामुळे श्रेणीवर बोळवण होत असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 26/10/2014 - 08:14

In reply to by नंदन

आपल्याकडे नोस्टॅल्जिक पुरणपोळ्यांची पाककृती मागितली जाईल, या (खूप खूप) भीतीपोटी मेघना बहुदा याबद्दल (खूप खूप) जाहीररित्या बोलत नसावी.

अतिशहाणा Thu, 23/10/2014 - 20:48

हळूहळू वाचतोय. फारच भरगच्च मालमसाला आहे. अंक अत्यंत दर्जेदार वाटतोय. संबंधितांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/10/2014 - 03:45

अंकाची पीडीएफ फाईलही तयार आहे. हा दुवा.

अंकाच्या मुखपृष्ठावरही हा दुवा आहे.

धर्मराजमुटके Fri, 24/10/2014 - 18:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पीडीएफ आवृत्ती वेळेत उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद. काल बराच वेळ ती आवृत्ती उतरवून घेण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. शेवटी रात्री झाली डाऊनलोड एकदाची.
आता कसे संपूर्ण पैठणी उलगडून पाहिल्याचा फील येतोय. ते वेगवेगळे धागे पाहिल्यावर दुकानदाराने पूर्ण घडी न मोडता आधी पदरच दाखव, नंतर काठच दाखव असला प्रकार वाटत होता. तो प्रकार आपल्याला कुछ जम्या नाही बॉ.

बाकी आता तुणतुणे वाजविणे थांबवितो. दिवाळी अंक अप्रतिम झालाय. माझ्याकडे गेल्या दोन तीन वर्षांचे वेगवेगळे दिवाळी अंक (पीडीएफ आवृत्ती) आहेत. कधी आठवण झाली की चाळून बघता येतात.

त्या "मोगरा फुलला" वाल्या बाईंचाही एक अंक आला होता. नंतर त्या जालीय विश्वातून नाहिशाच झाल्या बहुतेक. असो.

संपादक मंडळ, लेखकूंना हार्दिक धन्यवाद !

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/10/2014 - 19:19

In reply to by धर्मराजमुटके

स्ट्रीपटीझला जास्त लोकप्रियता मिळते, मग करावं लागतं.

असो. पीडीएफचं काम लवकर पूर्ण करण्यामागे तुमच्या प्रतिक्रयेचाही हातभार होता.

अतिशहाणा Tue, 28/10/2014 - 00:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पीडीएफ मध्ये अक्षरे नीट दिसत नाहीत. (फक्त मलाच अडचण येत आहे काय?)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/10/2014 - 06:15

In reply to by अतिशहाणा

फायरफॉक्समध्ये (किंवा ब्राऊजरमध्ये) थेट फाईल उघडली तर फाँट विचित्र दिसत आहे. त्यासाठी फाईल डाऊनलोड केलीत किंवा इश्श्यूवर चढवलेली ही प्रत बघितली तर अडचण येणार नाही.

राही Mon, 27/10/2014 - 23:21

अंक सुरेख निघाला आहे. इतका की कित्येक छापील दिवाळीअंकसुद्धा ऐसी-दिवाळीपुढे फिके पडले आहेत. मुखपृष्ठापासून ते अगदी प्रतिसादांपर्यंत सारेच वाचनीय आहे. 'चळवळ' ही थीम निवडणूक-निकालांच्या पार्श्वभूमीवर अभिनव वाटली.
थीम निवडणार्‍यांचे, दिग्गजांच्या मुलाखती आणि लेख मिळवणार्‍यांचे, संपादकमंडळाचे, मांडणीकारांचे, तांत्रिक सल्लागारांचे सर्वसर्वांचे श्रम सार्थकी लागले आहेत.
या वर्षी इतका उच्च दर्जा गाठल्यानंतर पुढल्या वर्षी याहीपेक्षा अधिक सरस कामगिरीची अवघड अपेक्षा निर्माण झालीय. या अपेक्षापूर्तीच्या कठिण जबाबदारीसाठी आगाऊ शुभेच्छा.

रुची Tue, 28/10/2014 - 00:29

In reply to by राही

अंक खरेच खूप चांगला झाला आहे. इथले संपादक मंडळ घरचेच असल्याने आवर्जून सांगायला हवे असे आधी वाटले नव्हते पण घरकी मुर्गी दालबराबर होऊ नये म्हणून हा प्रतिसाद.

प्रकाश घाटपांडे Thu, 06/11/2014 - 11:50

In reply to by रुची

>>घरकी मुर्गी दालबराबर होऊ नये म्हणून हा प्रतिसाद.
अगदी अगदी मनातल बोललात. संपादक मंडळाने कष्टपुर्वक केलेल्या कामाला दाद देण्यात कसली कंजूषी करायची!

अतिशहाणा Tue, 28/10/2014 - 00:54

In reply to by राही

खरंय! अंक फारच दर्जेदार आहे. सजावट आणि विशेषतः विषयांमध्ये फटाके, आकाशकंदील, माती, पणती, नाती, फुलबाजे, वगैरे बटबटीतपणा टाळल्याने हा अंक फार वेगळ्या पातळीवरचा वाटतो. अक्षर, अबकडइ वगैरे अंकांची आठवण झाली.

चिंतातुर जंतू Thu, 06/11/2014 - 11:22

ऑनलाइन दिवाळी अंकांविषयीच्या 'नागपूर लोकसत्ता'मधल्या एका लेखात 'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाचा उल्लेख आणि मेघना भुस्कुटे ह्यांची प्रतिक्रिया आहे.