<लवंग>
अनुप ढेरे
माझाच आवाज
सतत हरवतो
तुझ्या दुकानी
.
.
.
कोसळणारे
लाल धबधबे
चारीठायी
.
.
.
झटणारा मी
तांबुल-इच्छुक
गर्दीमधला
.
.
.
सुपारी कातर
चुना पानभर
किमाम दरवळी
.
.
.
बंद करण्या
लवंग टिचभर
अडकवलेली
.
.
.
लाल भडक
तृप्तीचे वैभव
मन आनंदी.
प्रेरणा कृतीतील वृत्त
प्रेरणा कृतीतील प्रत्येक कडव्याची चौकट
-----------
पाच अक्षरे
मग सात अक्षरे
पाच अक्षरे
------------
अशी आहे. म्हणजे हायकू. तुमच्या कृतीत हे वैशिष्ट्य असते, तर प्रेरणेशी अधिक साधर्म्य साधले असते. असा वृत्ताचा तपशील गाळणे हेतुपुरस्सर आणि कलात्मक निर्णय असला, तरी वाचकाला तो हलगर्जी गबाळेपणा वाटण्याची शक्यता आहे.
अह्हाहा! कवितेहूनी विडंबन
अह्हाहा!
कवितेहूनी विडंबन उत्कट! असे काहिसे !
निव्वळ विडंबनापेक्षा वेगळे अस्तित्त्व असणारी कविता!