Skip to main content

<लवंग>

प्रेरणा

माझाच आवाज
सतत हरवतो
तुझ्या दुकानी
.
.
.
कोसळणारे
लाल धबधबे
चारीठायी
.
.
.
झटणारा मी
तांबुल-इच्छुक
गर्दीमधला
.
.
.
सुपारी कातर
चुना पानभर
किमाम दरवळी
.
.
.
बंद करण्या
लवंग टिचभर
अडकवलेली
.
.
.
लाल भडक
तृप्तीचे वैभव
मन आनंदी.

मेघना भुस्कुटे Tue, 14/10/2014 - 10:13

कोणत्या कवितेचं विडंबन आहे हे? तिचापण दुवा द्या की. दिसली, प्रेरणेची लिंक दिसली. :प

बादवे, मी विडंबन म्हणून नाही वाचलं. कविता म्हणूनच वाचलं. तरी आवडलं. (पण पाठोपाठ टारगटपणे सवंग>>, तवंग>>>, पलंग>>> अशी एक विडंबनमालिकाच डोक्यात उधळली गेली!)

बॅटमॅन Thu, 16/10/2014 - 18:11

In reply to by अनुप ढेरे

त्यातल्या त्यात यमकात जुळणारे 'प्लवंग' म्हणून इडंबण केले तर पलंगाचा अ‍ॅस्पेक्टही अंशतः कव्हर व्हावा बहुधा.

बॅटमॅन Tue, 14/10/2014 - 14:16

कोसळणारे लाल धबधबे अन तृप्तीचे वैभव म्हणजे एक नंबर प्रकार आहे!!!!!

लवंग हायकू मस्त जमले आहेत.

धनंजय Fri, 17/10/2014 - 05:52

In reply to by अनुप ढेरे

प्रेरणा कृतीतील प्रत्येक कडव्याची चौकट
-----------
पाच अक्षरे
मग सात अक्षरे
पाच अक्षरे
------------
अशी आहे. म्हणजे हायकू. तुमच्या कृतीत हे वैशिष्ट्य असते, तर प्रेरणेशी अधिक साधर्म्य साधले असते. असा वृत्ताचा तपशील गाळणे हेतुपुरस्सर आणि कलात्मक निर्णय असला, तरी वाचकाला तो हलगर्जी गबाळेपणा वाटण्याची शक्यता आहे.