मजेशीर नावे
खूप वेळा आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला फार विचित्र नाव असणारे लोक भेटतात.
उदाहरणार्थः मला परवाच एक मुलगी भेटली. तिचा नाव होत 'झेन्डा'. मला फारच मजा वाटली ते ऐकुन.
तुम्हाला भेटली आहेत का अशी काही माणसे? जर भेटली असतील तर पटापट आपले अनुभव सान्गा.
(माझे मराठी मधुन पहिलेच लिखाण आहे. चु भु द्या घ्या )
Taxonomy upgrade extras
मला "प्रणय" हे नाव फार
मला "प्रणय" हे नाव फार विचित्र वाटतं. मित्राच्या भावंडांपैकी एकाचं आहे हे नाव.
मला प्रश्न पडतो, त्याचे आई-वडील त्याच्या बद्दल सांगताना जे बोलत असतील ते ऐकून कसं वाटेल.
"हा आमचा प्रणय, लग्नानंतर अम्हाला तीन वर्षानी प्रणय झाला"
"आमचा प्रणय आम्हाला फार त्रास देतो, रात्रभर झोपू देत नाही"
"आम्हाला प्रणय झाला आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं"
"आता प्रणय आमच्यात रहात नाही"
शेजारचे असंही म्हणत असतील :
"तुमच्या प्रणय ला जरा आवरा, केवढ्या उड्या मारतो - खाली रोज दणा-दणा अवाज"
"तुमचा प्रणय भलताच अगाउ ए हं ;) "
"तुमचा प्रणय फार लाघवी आहे:"
"तुमचा प्रणय फार उदास दिसतोय"
प्रणयच्या आईचं हे साधंच वाक्य पण मुलाच्या नावामुळे गोंधळवणारं : "बाई गं, हे आले पण अजून प्रणय काही आला नाही... अहो जरा बघता का"
प्रणयची बायको/प्रियसी - "मला काही काही नको, प्रणय हवा आहे फक्त प्रणय! "
(अजूनही बरच काही, पण सध्या असो!)
हा हा हा
हा हा हा
_/\_
माझ्या वर्गातल्या एकीचे नाव प्रणया होते.
''आमच्या प्रणयाची तब्येत अलिकडे बरी नाही''
''प्रणयाला शिकवणी लावली आहे''
''तुमच्या प्रणलाला स्कॉलर्शिप मिळाली ना हो? अभिनंदन''
''प्रणयाला गेले चार दिवस रोज उशीर होतोय''
'' प्रणयाला उठता लाथ बसता बुक्की घालायला पाहिजे''
''गधड्या तुला प्रणयाहून इतके कमी मार्क कसे रे? प्रणयासारखं खेळायला तेवढं हवं, प्रणयासारखा अभ्यास नको करायला!''
''आज प्रणयाला उपास आहे''
मजेशीर संवाद
हे संवाद वाचून आणखी मजा वाटली.
ठाण्यात एक 'साई प्रणय' नावाचं रेस्टॉरंट आहे. माणसाऐवजी रेस्टॉरंटाचं नाव म्हणून संवाद लिहीले तर माणसाचा शंकराचार्य बनेल काय?
नाही
सामान्यत: बंगाली 'स,श,ष'च्या जागी 'श'च उच्चारतात, पण तिन्हींच्या जागी 'स'च उच्चारणारे बंगाली पाहिले आहेत. (बिहारी लोकांप्रमाणे). इंट्रोडक्सन, सिलेक्सन म्हणणारे बंगाली पाहिले आहेत. काही जण स्पेलिंगचा घोळ घालून 'श' असले तरी स्पेलिंग s करतात, आणि मग (कदाचित बाकीचे सगळे करतात म्हणून) त्याचा उच्चार स करतात. सुभाशिश असे स्वतःचे नाव उच्चारणारी बंगाली व्यक्ती माहीत आहे (मूळ नाव शुभाशिष असावे बहुधा).
सुबासिश (अवांतर)
मिहिरशी सहमत.
नुकताच शुभाशिष एक बंगाली सहकारी संस्था सोडून गेला. तो त्याचे इंग्रजी नांव Subhasish असे लिहितो. एकदा दुपारच्या जेवणाला काही अमेरिकी सहकार्यांनी त्याचे नांव कसे उच्चारायचे आणि त्याचा अर्थ काय ते विचारले कारण ते उच्चारताना बिचार्यांची बोबडी वळत होती. त्याने उच्चार नीट करून सांगितला. त्यांना शुभाशिश हे उच्चारणे सोपे जात होते (३ श असल्याने एक श जमला की बाकीचे जमत होते) पण Subhasish या स्पेलिन्गप्रमाणे सु-बा-सि-श (२ स आणि एक श आल्याने ते 'शी सेल्स् सी शेल्स ऑन् सी शोअर' सारखे होत होते) अशी कसरत त्यांना करावी लागत होती. दुर्दैवाने त्याला त्याच्या नांवाचा अर्थ माहीत नव्हता आणि बहुधा त्यामुळेच तो उच्चारी 'शु' आणि 'शि' चे लिखित अनुक्रमे 'सु' आणि 'सि' करे. त्याला मी त्याच्या नांवाचा अर्थ फोड (शुभ + आशिष = ऑस्पिशस् ब्लेसिन्ग्) करून वगैरे सांगितला आणि स्पेलिन्गमुळे गोंधळ उडतो वगैरे सांगितले पण नळी फुंकली सोनारे...
ऐसीवर अजून एक राधिका आहे, पण
ऐसीवर अजून एक राधिका आहे, पण तीही गुणीच आहे बर्का! ;)
बाकी, ऐसीवर स्वागत. पुढिल लेखन अधिक विस्तृत व दर्जेदार असेल अशी आशा व शुभेच्छा!
नाव कोणतेही ठेवा फक्त त्याचा किमान स्वतःला उच्चार करता येईल असे ठेवा इतकीच माफक अपेक्षा असते माझी.
आमच्या एका शेजार्याच्या मुलाचे नाव अथर्व आहे. तो मुलगा, त्याचे आई-बाप नी घरातील इतर प्रजा सगळॅ त्याला 'अतर्व' म्हणतात. शिवाय त्या 'अतर्व'मध्ये कंपासपेटी वा छत्रीसारखा हरवण्याचा गुणधर्म असल्याने दिवसातुन किमान दोनदा तरी त्याची माय अख्ख्या सोसायटीभर "अतर्व... ए.. अतर्व" करत आर्त (नी कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी करता न येणार्या आवाजात) हाका मारत फिरत असते. माझा नक्की राग त्या आवाजावर आहे की अथर्व या नावावर हा किंचित वादाचा मुद्दा सोडून देऊ :P
आमच्या सोसायटित एका कार पुसणार्या लहान मित्राचं नाव मी पद्या समजत होतो, ते प्रद्युम्न निघालं. त्याने आधीही सांगितलं होतं पण जाम थांग लागला नव्हता ;)
एका परिचितांनी नाव ठेवलं राध्ध्या, एखाने भाग्ग्या यांचा अर्थ काय? (उच्चार कळावे म्हणून ग्ग / ध्ध केलंय).
एक तर अशी नावां काय दिव्व्या काय देवनागरीत लिहिताना त्याचं दिव्या होतं मग दिव्या दिव्या दिपत्कार आठवतो :P
आराध्या नाही
आराध्या नाही 'राध्या'च.
एखाद्याला शिवी द्यावी तसं "अगं ए राध्या!" (राध्या बरां का, 'साध्या'सारखं) अशी तिची बहिण तिला हाक मारताना फारच केविलवाणे वाट्टे.
शिवाय तिच्या घरच्या एका कार्याला पत्रिकेवर 'चिमणे निमंत्रक' का कैतरी तत्सम कॉलमात तिचे नाव वाचले आहे तेव्हा नो डाउबट.
पृथा
हे नाव मीही ऐकलंय. मी मधे एका 'पृथुल'च्या लग्नाला जाऊन आले. नाव ऐकुन 'थुलथुल' सारखं वाटलं आणि अर्थही बहुधा तसाच आहे. (संदर्भः युगांत. कुंतीचे नाव पृथा कारण ती जाडी असे आठवते)
एका गुजराती मुलीचे नाव मिल्की (दुधाळ) ऐकल्यावर मी तिला ४-५ वेळा विचारले होते ते तिचे खरेच नाव का म्हणुन. ती माझ्याशी परत कधीच बोलली नाह. एका मुलाचे नाव तिमिर होते.
तसे आम्ही मिरजेतल्या तासगाव
तसा आमचा मिरजेतल्या तासगाव वेस मारुतीजवळच्या स्टार भेळ, ब्राह्मणपुरीतल्या गाडगीळबाईची भेळ, किल्यातल्या परसरामचा गाडा, सांगलीत पटेल चौकातली संभा भेळ अन विश्रामबागेतली क्रांती भेळ, इ. शी परिचय जास्ती घट्ट आहे.
पण टेक्सास ओल्या भेळीशी अल्पसा का होईना परिचय आहे. कधीकाळी त्रेतायुगात मातु:श्रींसहवर्तमान प्रतापोद्यानात (हाच तो लोकल उच्चार) गेलो असताना हे नाव बघितल्याचे स्मरते. आजही महापालिकेजवळ शिवनेरी थांबते तेव्हा क्वचित कधी तिकडे लक्ष जाते.
पुण्यातही जं.म. रोडवरनं डावीकडं वळून झ पूल सुरु होतो तिथे एक सांगली भेळ म्हणून गाडा आहे, तिथेही छान भेळ मिळते.
काहीही चुका न करता की बोर्ड
काहीही चुका न करता की बोर्ड वरुन टाईप करणे हे शिवधनुष्य पेलल्यासारखेच आहे.
उपरोक्त रंगीत शब्द श्री.रा.रा. फारेण्डरावांच्या आणि माहितगारमराठी यांच्या अध्यादेशावरुन ब्यान करण्यात आलेले आहेत. ते बदलण्याचे करावे.
बाकी विचित्र नावांचा हा विषय "ऐरणीवर आणल्याबद्दल" धन्यवाद.
:)
ऑफिस मध्ये एकजण सांगत होता,
ऑफिस मध्ये एकजण सांगत होता, त्यांच्या शेजारी एक नॉर्थ इंडियन राहतात. शिवरात्रीच्या वेळी जन्म झाला म्हणून मुलीचे नाव "शिवी" ठेवलेय त्यांनी! :)
बरं ठेवले तर ठेवले, तसले नाव असताना मराठी भाषिक शहरात राहायला आलेत. त्या बिचार्या मुलीचे नंतर शाळेत गेल्यावर काय होईल देव जाणे!
???
शिवानी , शिवांगी असले काहीतरी ठेवले असते तरी चालून गेले असते.
"शिवी"चे लग्न एखाद्या शिवराळ माणसाशी झाले तर अवघड आहे.
लग्नप्रसंगी वधुपिता :-
आमची शिवी तुम्हाला देतोय जावाईबापू. ठेवून घ्या हो.
आणि त्या शिवराळ माणसाबद्दल बोलताना लोक म्हणतील :-
ह्याच्या तोंडात कायम शिवीच.
माझ्या एका भाचीचे नाव सृष्टी.
माझ्या एका भाचीचे नाव सृष्टी. तसे नाव उच्चारायला अंमळ औघड. असे नाव का ठेवले असे इच्यारले असताना तिच्या आज्जीने कारण सांगितले की 'या नावाची वाट लावता येत नाही.' झालं, आम्हाला काय स्वस्थ बसवतंय होय? लागलीच ती असाईनमेंट आमच्या एका कझिनब्रदरास दिल्ही. मग तेणे सत्वरि विडंबिले- 'सृष्टी, खाते उष्टी' येणेप्रकारे.
अवांतर
"उष्टे " वरुन एक उक्ती अआथवली.
हापिसातला एकजण "काय म्हणता कसं चाल्लय" ह्याला उत्तर म्हणून "चाल्लय आपलं काहितरी. काय चालणार अजून"
असं काहीतरी बोलतो. "उदास का रे बाबा" असं विचारल्यावर त्याचं उत्तर :-
"
अपनी भी कोइ जिंदगी है?
करा कष्ट
खा उष्ट
मारा मुष्ट
रहा संतुष्ट
आणि बोला जय महाराष्ट्र
"
एका तिळ्या बहिणींची नावे
एका तिळ्या बहिणींची नावे आहेत- ग्रीष्मा, उष्मा आणि व्योमा.
गुजराथी लोकांमध्ये विचित्र नांवे ठेवण्याची एक लैच फॅशन आहे- टिम्सी, हनी, आकर्षण, नैतिक इत्यादी. हेत्वी, हेतल या नावांचा अर्थ सांगणारे अजून कुणी भेटलं नाहीय. बाकी मनन-चिंतन-जपन-स्तवन हे नेहमीचंच. एका राज्ञी नावाची मुलगी पण ओळखीची होती.
परवाच फेबुवर एक पोस्ट वाचली.
परवाच फेबुवर एक पोस्ट वाचली. कोणीतरी मुलाचे नाव 'निर्वाण' ठेवल होतं.