दिवाळीच्या शुभेच्छा!
दिवाळीत आपण सहृदांना शुभेच्छा देतो, भेटकार्डं पाठवतो. स्वतः बनवून भेटकार्ड पाठवण्यात एक वेगळाच आनंदही असतो. दिवाळीचा मुहुर्त आणि 'ऐसीअक्षरे'चे उद्घाटन या निमित्त ऐसीअक्षरेच्या सभासदांना माझ्या शुभेच्छा खालील भेटकार्डासोबत देत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मावळतीचा सुर्य मी निवडला आहे.
मोठ्या आकारात पहायचे असेल तर इथे पहा.
भेडकार्डं कसं वाटलं ते जरूर कळवा...
तांत्रिक माहिती,
निकॉन डी ५१००,
सनसेट मोड, आयएसओ १००.
गिम्प मध्ये संस्करण.
बरोब्बर उलटा
'सकाळी साडेपाचला उठून सूर्योदय बघायचा? अरे तू चौपाटीवर सूर्यास्त बघितला आहेस ना? मग त्याला बरोब्बर उलटा करायचा की झाला सूर्योदय!' भ्रमणमंडळातलं कुठलं तरी पात्र असंच काहीतरी बोलतं... पुलंनी लिहिलंय तेव्हा बरोबरच असणार.
दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मावळतीचा सुर्य मी निवडला आहे.
मी तर याला बरोब्बर उलटा करून नवीन संस्थळाच्या उगवतीचा सूर्य म्हणेन.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
बाकी नायल्या, फोटू छान आलाय.
हे बराबर नाय हां घासकडवी.
हे बराबर नाय हां घासकडवी. आमचा निळ्या चंद्राचे फोटो काढतो. त्याला संध्याकाळ आणि सूर्य मावळणंच जास्त आवडणार ना! तुम्ही सगळ्या गोष्टींना संस्थळाचे संदर्भ लावता हे बराबर नाय.
नायल्या, तू सूर्यास्ताचे फोटो दाखव, मी बघेन. शेवटी हौशी असोत वा व्यावसायिक, तारे बघण्यातला आनंद रात्री कीबोर्ड बडवणार्यांना कसा समजणार?
झक्कास
चित्र सुंदर आहे रे! पण वरचा काळा भाग आणखी थोडा कातरलास तरी चालेल.