Skip to main content

दिवाळीच्या शुभेच्छा!

दिवाळीत आपण सहृदांना शुभेच्छा देतो, भेटकार्डं पाठवतो. स्वतः बनवून भेटकार्ड पाठवण्यात एक वेगळाच आनंदही असतो. दिवाळीचा मुहुर्त आणि 'ऐसीअक्षरे'चे उद्घाटन या निमित्त ऐसीअक्षरेच्या सभासदांना माझ्या शुभेच्छा खालील भेटकार्डासोबत देत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मावळतीचा सुर्य मी निवडला आहे.

मोठ्या आकारात पहायचे असेल तर इथे पहा.
भेडकार्डं कसं वाटलं ते जरूर कळवा...

तांत्रिक माहिती,
निकॉन डी ५१००,
सनसेट मोड, आयएसओ १००.
गिम्प मध्ये संस्करण.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 10:41

चित्र सुंदर आहे रे! पण वरचा काळा भाग आणखी थोडा कातरलास तरी चालेल.

राजेश घासकडवी Wed, 26/10/2011 - 10:46

'सकाळी साडेपाचला उठून सूर्योदय बघायचा? अरे तू चौपाटीवर सूर्यास्त बघितला आहेस ना? मग त्याला बरोब्बर उलटा करायचा की झाला सूर्योदय!' भ्रमणमंडळातलं कुठलं तरी पात्र असंच काहीतरी बोलतं... पुलंनी लिहिलंय तेव्हा बरोबरच असणार.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मावळतीचा सुर्य मी निवडला आहे.

मी तर याला बरोब्बर उलटा करून नवीन संस्थळाच्या उगवतीचा सूर्य म्हणेन.

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.

बाकी नायल्या, फोटू छान आलाय.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 19:35

In reply to by राजेश घासकडवी

हे बराबर नाय हां घासकडवी. आमचा निळ्या चंद्राचे फोटो काढतो. त्याला संध्याकाळ आणि सूर्य मावळणंच जास्त आवडणार ना! तुम्ही सगळ्या गोष्टींना संस्थळाचे संदर्भ लावता हे बराबर नाय.

नायल्या, तू सूर्यास्ताचे फोटो दाखव, मी बघेन. शेवटी हौशी असोत वा व्यावसायिक, तारे बघण्यातला आनंद रात्री कीबोर्ड बडवणार्‍यांना कसा समजणार?

नंदन Wed, 26/10/2011 - 19:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटी हौशी असोत वा व्यावसायिक, तारे बघण्यातला आनंद रात्री कीबोर्ड बडवणार्‍यांना कसा समजणार?

सहमत आहे. फ्रॉस्टकाका म्हणतात तसं :) -

So when at times the mob is swayed
To carry praise or blame too far,
We may choose something like a star
To stay our minds on and be staid.

Nile Wed, 26/10/2011 - 20:27

In reply to by नंदन

कर्मामुळे सुर्योदयाच्या वेळीही सद्ध्या जागा असतो मी :-(. पण अजून फोटोत देण्यासारखा सुर्योदय गावला नाहीए! त्यात आम्ही पश्चिमेचे, सुर्यास्तावर आमचा भारी जीव! (गुगल शोध)

श्रावण मोडक Wed, 26/10/2011 - 19:58

दिवाळीच्या शुभेच्छा!
Submitted by Nile on Wed, 26/10/2011 - 10:33

कर्मासाठी वाट्टेल ते... ;)
नायल्या, तुला शुभेच्छा.

Nile Wed, 26/10/2011 - 20:18

In reply to by श्रावण मोडक

ते जसंच्या तसंच आहे. बाकी, संसारी माणसाला बरेच उद्योग असतात हो सुर्यास्तानंतरही!! ;-)

म्हणजे लगेच 'चार-हातवाला' नाही!

गणपा Thu, 27/10/2011 - 12:57

भेटकार्ड आवडल रे नायल्या.

सर्व आंजा मित्र-मैत्रीणी, काका-काकवा, आजोबा-आज्यांना दीपोत्सवाच्या आणि नव वर्षाच्या अनेक शुभेच्छा !!!