Skip to main content

वटसावित्रीच्या निमित्ताने ...

मद्रराज अश्वपतिची रूपवान कन्या सावित्रीने राज्यभ्रष्ट राजा द्युमत्सेनाचा राजकुमार सत्यवानाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. पित्याचा राजमहाल आणि महालातील सर्व सुखांचा त्याग करून सावित्री आपल्या पती आणि सासर्‍यांसोबत वनात राहु लागली. एक पत्नी म्हणून, सून म्हणून येणारी सर्व कर्तव्ये सावित्री अतिशय निष्ठेने पार पाडीत होती. आयुष्य सु़खासमाधानात जात असताना एके दिवशी सत्यवानाला वनात लाकडे तोडत असताना अपमॄत्यु आला आणि त्याचे प्राण घ्यायला आलेल्या यमाला "माझ्या पतीसोबत मी पण येणार.. न्यायचे तर दोघांनाही न्या" असा अवघड पेच घालत सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले .. अशी काहीशी सत्यवान सावित्रीची कथा आपल्याकडे सांगितली जाते. अशीच कथा विकीपानांतही नोंदलेली आहे. अशा पतिव्रता सावित्रीच्या नावाने आज वटसावित्रीचे व्रत स्त्रिया करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचा उपास आणि वडाची पूजा असं काहीसं या व्रताच ढोबळ स्वरूप. मात्र सात जन्म हाच पती लाभो अशी काहीतरी मागणी या निमित्ताने परमेश्वराकडे केली जाते असेही म्हणतात. त्या अनुषंगाने ऐसीकरांसाठी काही प्रश्न विचारतो आहे -

१."पतीचं दीर्घायुष्य की सात जन्म / जन्मोजन्मी हाच पती ..?" पूजेच खरं उद्देश्य काय आहे?

२. प्रवचनकार काशिनाथशास्त्री जोशी लिखीत पूजाविधीत "इह जन्मनि जन्मांतरेच अखंडित- सौभाग्य-पुत्रपौत्रादि अभिव्रुद्धि-धनधान्यदीर्घायुष्यादि-सकल्सिद्धिद्वारा सावित्रीव्रतांगत्वेन प्रतिवर्षविहीतं ब्रह्मसावित्रीप्रीत्यर्थं षोडशोपचारपूजनं अहं करिष्ये" असा संकल्प आहे. तेव्हा "ह्या जन्मात आणि सर्व जन्मात अखंड सौभाग्य रहावं" ही मुख्य प्रार्थना दिसते. तस्मात हाच पती पुन्हा हवा हा अर्थ पूजाविधीत नाही. तेव्हा हे नवीन कलम कधीपासून रूढ झालं ?

३. ह्या जन्मात आणि सर्व जन्मात अखंड सौभाग्याची मागणी ही अध्यात्माच्या शिकवणीच्या विरोधी नाही का ? अध्यात्मात मोक्षप्राप्ती साठी प्रयत्न करणं हा मानवी जीवनाचा सर्वात मोठा उद्देश असल्याच सांगितल जात असताना परमेश्वराकडे पुढील जन्मासाठी काहीही मागणं म्हणजे मोक्षप्राप्तीची वाट सोडल्याचं निदर्शक नाही काय?

४. वटसावित्रीच्या पूजेतील वरील विरोधाभास लक्षात घेता हे व्रत "प्रक्षिप्त" असू शकेल काय ?

आडकित्ता Thu, 12/06/2014 - 12:33

सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले .. अशी काहीशी सत्यवान सावित्रीची कथा

तर बायकोच्या तावडीतून यमही सोडवून नेऊ शकत नाही..

बाकी वेगळा अँगल मारून तीच कढी ठेवलीये उकळायला, मी आलोच पॉपकॉर्न घेऊन.

मेघना भुस्कुटे Thu, 12/06/2014 - 12:39

In reply to by आडकित्ता

तर बायकोच्या तावडीतून यमही सोडवून नेऊ शकत नाही..

=))

***

@बाबा बर्वे

त्याच कढीबद्दल:

अहो, हिंदू धर्मात कमी का विसंगती आहेत? अमुक एक आहे म्हटलं, तर लग्गेच त्याच्या विरुद्ध काहीतरी पोतडीतून काढून दाखवता येईल अशी सोय आहे. आता आणि कुठे नव्यानं विसंगती हुडकता आहात? बरं, एकच पती जन्मोजन्मी हवा की वेगवेगळा चालेल, पण पती हवा हा प्रश्न रद्दबातल नाही का एकदा सौभाग्याची मागणीच नॉनाध्यात्मिक ठरवल्यावर? जाऊ द्या झालं. त्या निमित्ते तेच ते वटवटसावित्री-चावटसावित्री-कॉण्ट्रॅक्ट रिन्युअल छापाचे विनोद फिरतील मोबाइलांवर नि फेस्बुकावर. फिरोत.

बाकी बर्‍यावाईटाबद्दल ऐसीवर अशी काय मतमतांतरं असणार, ते स्वयंस्पष्टच नाही का? डायरेक्ट प्रतिसाद नंबर ३०१ पासून पुढे खेळायची काही सोय असेल तर सांगा राव.

सविता Thu, 12/06/2014 - 12:47

गेले काही दिवस व्हॊट्सॆप आनि फ़ेस्बुक वर खालील पकाउ कविता फ़िरतेय...

शेवट काहीतरी असा आहे.. "प्लिज रागाऊही नकोस,अत्यंत नम्रपणे एक प्रश्न विचारतेय वगैरे वगैरे"

पाठवणाया स्टिरिओ-टाइप मैत्रिणींना गदा-गदा हलवावं आणि "नम्रपणा गेला ---- च्या --- मध्ये....","कोणी सांगितलंय नाव बदलायला?","रजिस्टर पद्धतीने लग्न करा आणि फालतू रितींना फाटा द्या की!!" असं आणि अजून काही खूप कुचकट बोलावं असा विचार मनात येऊन गेला पण म्हटलं जाउ देत बापडे...

माझी शक्ती का दवडू?

----------------
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......

देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .

हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .

भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .

माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .

नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .

गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .

मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .

पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .

आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.

वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .

घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.

नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .

इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .

माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....

तुझ्याकडे काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?

----------------

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 16:54

In reply to by सविता

गेले काही दिवस व्हॊट्सॆप आनि फ़ेस्बुक वर खालील पकाउ कविता फ़िरतेय...

गदागदा हलवून 'व्हॉट्सअ‍ॅप नि फेसबुकाने जगाच्या एकमेवाद्वितीय अजबखान्यात दोन नमुन्यांची भर पडली', 'कोणी सांगितलेय व्हॉट्सअ‍ॅप नि फेसबुकावर जायला?' म्हणून विचारावे असा विचार मनाला चाटून गेला, पण म्हटले असो बापडे.

माझी शक्ती आपली प्रतिसादलेखनातच दवडतो.

पण कविता पकाऊ आहे, हे मान्य.

तुझ्याकडे काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?

'दीवार' आठवला.

---

अवांतर (भाषिक) कुतूहल:

पाठवणाया स्टिरिओ-टाइप मैत्रिणींना

अशा शब्दप्रयोगांत 'मैत्रीण' या शब्दाची व्याख्या जरा जास्तच सैल होते का?

---

असो. चालू द्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हे 'आज सकाळी मला जुलाब झाला' हे तमाम ज्ञात जगास१अ व्यक्तिशः कळविण्याकरिता एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे, अशी आमची धारणा आहे. (चूभूद्याघ्या.)

१अ बोले तो, ज्याचे/जिचे फेसबुक खाते, त्यास/तीस ज्ञात असे जग.

गा.ची गां. येथे जगातली कोठलीही वस्तू वा व्यक्ती सापडू शकते. कारण कोणी ना कोणी कधी ना कधी ती तेथे धाडलेली असते.२अ, २ब

२अ फेसबुकातील 'मित्र'यादीबद्दलही२अ१ काही अंशी हेच म्हणता यावे. तेथेही वाट्टेल ती मंडळी सापडतात. कारण खुद्द खातेधारकाने/धारिकेनेच कधी ना कधी ती तेथे धाडलेली असतात. या दृष्टीने तोही एक मिनी-अजबखानाच म्हणता येईल.२अ२

२अ१ टंकनसुविधेकरिता इतःपर हीस 'फेबुमिया' असे संबोधू. (यावरून कोणास 'मिया मुशर्रफ' आठवल्यास आम्ही जबाबदार नाही.)

२अ२ याउपर, खुद्द फेबुमिया ही गा.च्या गां.मध्ये सापडत असल्याकारणाने२अ३, 'अजबखान्यातील अजबखाना' असे तिचे वर्णन करता यावे.

२अ३ नुकतीच आम्ही तिला तेथे धाडली. एफवायआय. (आमचे फेसबुक खाते नसल्याकारणाने ही बाब दुर्दैवाने येथे जाहीर करावी लागत आहे.)

२ब या न्यायाने, खुद्द गा.ची गां. ही गा.च्या गां.त सापडावी.२ब१ हे एक अत्यंत रोचक, परंतु मनश्चक्षूंपुढे आणण्यास अत्यंत अवघड, असे चित्र आहे.

२ब१ या खेपेस तो दोष आमचा नाही, अत एव ती जबाबदारी आम्ही घेऊ इच्छीत नाही. क्षमस्व.

अजून काही कुजकट बोलण्यास तूर्तास फाटा देऊ.

बॅटमॅन Thu, 12/06/2014 - 17:03

In reply to by 'न'वी बाजू

या न्यायाने, खुद्द गा.ची गां. ही गा.च्या गां.त सापडावी.२ब१ हे एक अत्यंत रोचक, परंतु मनश्चक्षूंपुढे आणण्यास अत्यंत अवघड, असे चित्र आहे.

अलीकडे असे लूपी थिंग्ज व्हिज्युलाईज़वण्यास इन्सेप्षण नामक पिच्चरचे सहाय्य होतेय लोकांना तेही बरेच आहे.

हो हो कळाले काय ते.

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 20:26

In reply to by बॅटमॅन

(तळटीपेबद्दल १०-४. असो.)

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अलीकडे असे लूपी थिंग्ज व्हिज्युलाईज़वण्यास इन्सेप्षण नामक पिच्चरचे सहाय्य होतेय लोकांना तेही बरेच आहे.

योगायोगाने, 'इन्सेप्शन' हा चित्रपट आम्ही पाहिलेला आहे. तदुपरि, प्रस्तुत संकल्पनेमागील प्रेरणा तेथील नाही, हे या निमित्ताने नमूद करणे येथे इष्ट ठरावे. किंबहुना, ती संकल्पना आमच्याच एका जुन्या (आणि, योगायोगाने, वटसावित्रीच्याच निमित्ताने सुचलेल्या) कल्पनेवरून ('यमाच्या रेड्याच्या पाठीवरील यमाचा रेडा') स्फुरलेली आहे, हेदेखील येथे स्पष्ट करू इच्छितो.

मात्र, आता 'इन्सेप्शन'चा विषय निघालाच आहे, तर 'गा.च्या गां.मधील गा.च्या गां.मधील गा.ची गां' (अ‍ॅण्ड सो ऑन अ‍ॅण्ड सो फोर्थ, अ‍ॅड इन्फिनिटम एट अ‍ॅड नॉशियम) ही संकल्पनादेखील 'न'व्या डिग्रीपर्यंत ('न' > ३) ताणून पाहणे रोचक आणि उद्बोधक नि फलनिष्पत्तिकारक ठरावे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका सन्मित्रांच्या तत्कालीन-टीनेजर-चिरंजीवकृपेने. एकदा या सनिम्त्रांघरी गेलो असता त्यांचे प्रस्तुत चिरंजीव त्यांच्या घरच्या मोठ्या पडद्याच्या चित्रवाणीसंचावर प्रस्तुत चित्रपट पाहत बसले होते, तेव्हा कालहत्यार्थ आम्हीही त्यांचे शेजारी बसून पाहिला होता, आणि तो पाहत असता प्रस्तुत चिरंजीवांनी वेळोवेळी तो धावत्या वर्णनासह सविस्तर समजावून सांगितला होता, एवढे(च) आठवते. अन्यथा आम्ही कोठले चित्रपट पाहायला, आणि त्यातूनसुद्धा पाहिल्यावर तो आम्हांस समजायला!

गा.च्या गां.मधील गा.ची गां.

बाकी काही नाही, तरी किमान या कारणाकरिता तरी वटसावित्रीची रूढी टिकून राहावी, असे आमच्या रूढिप्रिय मनास वाटते.

तुलनेने, इतर काही क्षेत्रांत (उदा., पोलीसकार्यात वगैरे) उद्बोधन नि फलनिष्पत्तीकरिता 'न' = ३ पर्यंत जाणे पुरेसे ठरते, अशी ऐकीव माहिती आहे. (चूभूद्याघ्या.)

मी Thu, 12/06/2014 - 20:45

In reply to by 'न'वी बाजू

१ एका सन्मित्रांच्या तत्कालीन-टीनेजर-चिरंजीवकृपेने. एकदा या सनिम्त्रांघरी गेलो असता त्यांचे प्रस्तुत चिरंजीव त्यांच्या घरच्या मोठ्या पडद्याच्या चित्रवाणीसंचावर प्रस्तुत चित्रपट पाहत बसले होते, तेव्हा कालहत्यार्थ आम्हीही त्यांचे शेजारी बसून पाहिला होता, आणि तो पाहत असता प्रस्तुत चिरंजीवांनी वेळोवेळी तो धावत्या वर्णनासह सविस्तर समजावून सांगितला होता, एवढे(च) आठवते. अन्यथा आम्ही कोठले चित्रपट पाहायला, आणि त्यातूनसुद्धा पाहिल्यावर तो आम्हांस समजायला!

कालहत्याच झाली की अजून काही?

बाकी काही नाही, तरी किमान या कारणाकरिता तरी वटसावित्रीची रूढी टिकून राहावी, असे आमच्या रूढिप्रिय मनास वाटते.

तसेही पुणे ३०सात वडाचे झाड फारसे आढळत नाही, निदान अम्येरिकेत तरी ते तुम्ही लावले असावे काय असा विचार डोकावून गेला.

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 20:55

In reply to by मी

कालहत्याच झाली की अजून काही?

सिंहावलोकनान्ती, मस्तिष्काचे ल्याक्टिक अ‍ॅसिड फर्मेण्टेशनसुद्धा झाल्याचे अंधुकसे स्मरते. (याउपर आणखी काही होणे अपेक्षित होते काय?)

तसेही पुणे ३०सात वडाचे झाड फारसे आढळत नाही, निदान अम्येरिकेत तरी ते तुम्ही लावले असावे काय असा विचार डोकावून गेला.

अवांतर: 'गोल्ड सर्टिफिकेट'ची संकल्पना आपण ऐकलेली आहे काय?

जगात कोठेतरी वटसावित्रीची प्रथा चालू राहणे (आणि, त्याहूनही महत्त्वाचे, त्या निमित्ताने कोणीतरी आम्ही जेथे आहोत अशा कोठेतरी त्याबद्दल लेख प्रसविणे) एवढे आमच्याकरिता पुरेसे आहे.

त्याकरिता वडाचे झाड आमच्या परसात (मराठीत: ब्याकयार्डात) असण्याची आवश्यकता नाही.

मी Thu, 12/06/2014 - 21:05

In reply to by 'न'वी बाजू

सिंहावलोकनान्ती, मस्तिष्काचे ल्याक्टिक अ‍ॅसिड फर्मेण्टेशनसुद्धा झाल्याचे अंधुकसे स्मरते. (याउपर आणखी काही होणे अपेक्षित होते काय?)

त्या आंबवलेल्या अ‍ॅसिडामुळे त्या टिनेजराच्या डोळ्यासमोरचे अंधूक झाले असावे की काय असे वाटले, पण तशातला प्रकार झाले नसल्याचे दिसते.

थोडे मागे जाऊन -

आणि तो पाहत असता प्रस्तुत चिरंजीवांनी वेळोवेळी तो धावत्या वर्णनासह सविस्तर समजावून सांगितला होता, एवढे(च) आठवते.

धावत्या वर्णनासह म्हणजे तळटिपांसहित सांगितले असावे काय?

अवांतर: 'गोल्ड सर्टिफिकेट'ची संकल्पना आपण ऐकलेली आहे काय?

छे आम्हाला फक्त किसान विकास पत्र माहिती आहे, पण ते एक असोच.

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 21:10

In reply to by मी

धावत्या वर्णनासह म्हणजे तळटिपांसहित सांगितले असावे काय?

हो तसेच समजा. बोले तो, तोंडी तळटीपांची संकल्पना मनश्चक्षूंसमोर आणता येत असेल, तर तसेच काहीतरी. नव्हे तेच.

असो.

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 17:39

In reply to by धर्मराजमुटके

प्रतिसाद नको

हे एक वेळ समजू शकतो. पण...

तळटीपा आवर !

हे का म्हणे? तोही जगातील एक मिनी-अजबखानाच नाही काय?

बॅटमॅन Thu, 12/06/2014 - 17:58

In reply to by 'न'वी बाजू

न'व्या तळटीपा हे ऐसीवरील एक आश्चर्य आहे. त्यांवर बंधने आज्याबात नकोत!!!!

कितवे, ते विचारू नये.१अ

१अअपमान केला१ब जाईल, आम्ही मोजायला बसलो नाही, इ.इ. पैकी एखादे विचारमौक्तिक निवडावे. चूज़ युवर ओन पायज़न.

१बकिंवा 'केल्या'- व्हेन ऑन संस्थळ डू अ‍ॅज़ संस्थळियन्स डू.

संदर्भः पायज़न बोले तो सेंटकु बोलते. भाऽर मिल्ता.- सलीम फेकू.
लेकिन ह्यांपे पायज़न बोले तो ब्लॅक पर्ल३अ.- आम्ही.

विचारमौक्तिकाचा रङ्ग(मराठीत 'कलर') हा परमात्म्याच्या काळ्या रङ्गास अनुसरून घेतला आहे.

३अ नो 'पायरसी' इंटेंडेड ;)

कारण शेवटी आम्हीं भटेंच- पु.ल.

नवीबाजूस्मरण जय तळटीप!!!!

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 19:04

In reply to by बॅटमॅन

प्रथेस अनुसरून, इन ड्यू अप्रीशिएशन, 'भडकाऊ' ही परमोच्च श्रेणी दिलेली आहे.

बॅटमॅन Thu, 12/06/2014 - 19:14

In reply to by 'न'वी बाजू

आपले उपकार या जल्मी तरी फिटणे केवळ अशक्य!

धर्मराजमुटके Thu, 12/06/2014 - 17:55

In reply to by 'न'वी बाजू

आहे ना सायेब. आता एक काम करा. तळटीपा वर टाकत चला आणि प्रतिसाद खाली. म्हणजे प्रतिसाद व्यवस्थित समजेल. हवे तर तळटीपांना वरटीप असे कायसे नावही सुचवा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/06/2014 - 17:49

१."पतीचं दीर्घायुष्य की सात जन्म / जन्मोजन्मी हाच पती ..?" पूजेच खरं उद्देश्य काय आहे?

पथ्ये पाळत कुपथ्यांचा चोरटा विचार करणं.

२. ...तस्मात हाच पती पुन्हा हवा हा अर्थ पूजाविधीत नाही. तेव्हा हे नवीन कलम कधीपासून रूढ झालं ?

शेवटी सगळे सारखेच, या मार्क्सवादानंतर. या जुन्या अर्थाची मागणी 'अॅनिमल फार्म' नंतर झाली. ("All animals are equal, but some animals are more equal than others")

३. ... परमेश्वराकडे पुढील जन्मासाठी काहीही मागणं म्हणजे मोक्षप्राप्तीची वाट सोडल्याचं निदर्शक नाही काय?

बहुमतापुढे काही चालतं का? मोदी झालेच ना पंतप्रधान! डाव्या उदारमतवादी आणि कट्टर उजव्या लोकांना कोणी विचारतं का?

४. वटसावित्रीच्या पूजेतील वरील विरोधाभास लक्षात घेता हे व्रत "प्रक्षिप्त" असू शकेल काय ?

कोऱ्या कागदावर सगळंच प्रक्षिप्त. त्यापेक्षा आमचा विक्षिप्तपणा ओरीगिनल आहे, तो पहा.

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 20:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोऱ्या कागदावर सगळंच प्रक्षिप्त.

आमच्या लहानपणी प्रक्षिप्ताकरिता शक्य तोवर छापील कागद वापरण्याची प्रथा होती. मराठी वर्तमानपत्रांचा (तेव्हाही, आणि आताही) तुटवडा नसताना कोर्‍या कागदांचा हा अपव्यय केवळ अक्षम्य वाटतो.

राजेश घासकडवी Thu, 12/06/2014 - 22:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोऱ्या कागदावर सगळंच प्रक्षिप्त.

यावरून 'मेरे सैंया किया है कैसा काम तूने, कोरे कागज पे लिख दिया नाम तूने' या अर्थगर्भ काव्यपंक्ती आठवल्या. आणि मग 'प्रक्षिप्त करण्याची पथ्ये' असा लेख लिहिण्याचा मानस झाला.

............सा… Thu, 12/06/2014 - 19:46

ज्ञानेश्वरीतच वाचलेले स्मरते - ३ प्रकारच्या उपासना असतात. सात्विक्/राजसिक्/तामसिक.
पैकी नवर्‍याचे आयुष्य सात्विकाकडे कल असलेली राजसिक उपासना म्हणावी का?

'न'वी बाजू Thu, 12/06/2014 - 20:28

In reply to by ............सा…

पैकी नवर्‍याचे आयुष्य सात्विकाकडे कल असलेली राजसिक उपासना म्हणावी का?

उपासाला चालते ते सात्त्विक की राजसी की तामसी?

विवेक पटाईत Thu, 12/06/2014 - 20:52

संध्याकाळी घरी आल्या वर कळले आज वट सावित्री आहे (सकाळी ७ ला घर सोडावे लागते, ऑफिस ९ चे असले तरी २०-२५ मिनिटे अगोदर पोहचावे लागते). घरी आल्या बरोबर स्वैपाकघरातून साजूक तुपाचा वास आला. सौ ने लाडिक पणे विचारले.आज संध्याकाळी बटाट्याची उपवासाची भाजी असेल,चालेल का? (पतंजलीचे शुद्ध गायीचे तूप, जीरा, हिरवी मिरची आणि बारीक कापलेले बटाटे, त्यावर लाल भडक तिखट आणि कुटलेले मूंगफली दाणे मस्त जहाल स्वाद, आत्ताच खाली अजूनही जीभ सीसी करते आहे,) शिवाय केसरी आंब्यांचा आम रस ही आहे. (आंबट आणि गोड मस्त स्वाद असतो, मला अल्फान्सो पेक्षा जास्त आवडतो, दोन वाट्या आमरस गटकला). तिखट भाजी आणि आंबट गोड आमरस, आमच्या संसाराची कल्पना आलीच असेल. किती प्रेम आहे आमच्यात. आपल्याला आणखीन काय पाहिजे... असे उपास निश्चित नवर्यांच्या फायद्याचे. आता हा नवरा याच जन्मी पुरे असा वर मागितला तरी चालेल ;) :p

............सा… Thu, 12/06/2014 - 21:01

In reply to by विवेक पटाईत

हाहाहा ..... मी नवर्‍याला मधेमधे म्हणत असते मला तुझ्याआधी वरती जावसं वाटतं पण माझ्यानंतर तुझे हाल नको म्हणून तूच जा आधी ..... खिक!!!;)

गब्बर सिंग Fri, 13/06/2014 - 03:27

ती कविता पकाऊ अजिबात नाहीये बरंका.

इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .

"उदर माझे" हा भाग एकदम सॉल्लिड आहे.

If you decompose the reproductive process into 2 parts - a) fertilization, b) incubation then

अ-१) During the fertilization process the father and mother are equal stake holders.
ब-१) During the incubation process the mother supplies a monopoly asset.

व म्हणून बाळाच्या जीवनावर मातेचा अधिकार प्रचंड जास्त असायला हवा.

------------------------------------------------------------

गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .

मंगळसूत्र हे गुलामगिरी नसली तरी गुलामगिरीचे किमान प्रतिक तरी आहे असे विधान केले होते मी ... माझी मामी एकदम घुश्श्यात आली होती. कारणमीमांसा दिली तरी परिणाम झाला नाही.