Skip to main content

लपाछुपी -एक उत्क्रांती

क्रिकेटचा बॉल जेव्हाजेव्हा खिडकीला डोळा मारून जातो, सोसायटीत कुठेतरी लांब एक ज्वालामुखी जागा होतो.

मैदानावर वय ६
धड्म धूम वितळे ज्वाला -पळा पळा नाना आला
दात वाजले कडाम-कुडुम - नाना आले बस दडून

मैदानावर वय १६
लपू नको सायकलीमागे - चालवणारीत गुंतले धागे
आला आला तो बघ तो - हा तर तिच्या आईचा घो.

मैदानावर वय २६
मुतारीच्या मागे जाउ- एक दम मारून येऊ
मार साल्या अजून बाता - कपाळात गेल्यात आता.

मैदानावर वय ३६
हाण भडव्या अजून एक - आमची नुसती फेकमफेक.
कडेसरीला बसून आता - उरल्या आहेत फक्त बाता.

खिडकीमागे वय काकू
न धरी शास्त्र करी मी
करेन विळीचा- युक्तीने वापर

खिडकीमागे वय - शिरीष कणेकर
ब्रॅडमन किंवा CK इतकं - खेळत नाही कोण्णी छान
अतिपुरातन गोष्टींचा - भरलासे व्होल्सेल अभिमान

खिडकीमागे वय - द्वारकानाथ संझगिरी
सामनातुनि लेखननलिका रोजशीच ती इथे गळे
हॉटेलातही मिळत नसतो इतुका 'उपमा' इथे मिळे

कोल्ह्याची आंबट द्राक्षं जिथे बोन्साय वेलींना लटकतात, गल्लोगल्ली तेव्हा तेव्हा नकली सिंह जन्म घेतात.

मन Fri, 11/04/2014 - 09:18

बरय.
बादवे, लपाछपी हा हिंदी शब्द असून मराठीत त्याला लपंडाव म्हणत असावेत.

आदूबाळ Fri, 11/04/2014 - 15:14

मस्त कविता!

क्रिकेटचा बॉल जेव्हाजेव्हा खिडकीला डोळा मारून जातो, सोसायटीत कुठेतरी लांब एक ज्वालामुखी जागा होतो.

मला चाचा चौधरी आणि साबू आठवला एकदम!

बादवे - मैदानावर वय ४६ "फुकट कोचिंग" हाही अवतार पाहिला आहे.