Skip to main content

रहस्य

तो.
चालला होता एका रस्त्यावर.
मनात होते विचारांचे काहूर!
बे त्रिक सहा आणि सर्कशीतील सिंह!
शुद्धलेखनातील चुका आणि शिऱ्यातल्या मनुका!
मनात होते विचार, पिशवीत होत्या वस्तू आणि ……
साबुदाणे

ती.
घरातच होती दिवसभर.
पिंजारलेले केस आणि फेंदारलेले नाक.
भिजलेल्या भाज्यांची प्रेतं तरंगत होती ताटात!
चेहेर्यावरचे अगतिक भाव, समजत नव्हते अजिबात
उपासाला करावं काय? नुसताच रावणभात?
तिरीमिरीत कपात उघडून, वस्तू घेतली एक तिने.
नीट पहा म्हणजे कळेल, ते होते -
साबुदाणे.

ते.
मश्गुल होते आपल्याच आनंदात.
रडणाऱ्या कावळ्यांच्या प्रेतावर नाचून
निर्लज्ज बोक्याच्या शेपटीवर टिच्चून
खेळणार होते शेवटी आज पत्ते!
चकना, दारू आणि अजून काहीतरी पाहिजे यार!
शेवटी घरात सापडले ते एवढेच -
साबुदाणे.

पोलिसांना बोलवा!
खून झालाय चक्क!
कोण आहे रे तिकडे ? लवकर लवकर.
पोलिस आले शेवटी, पण हताश झाले ते सुद्धा !
कारण, तिथे प्रेत पडले होते…
आणि - साबुदाणेसुद्धा !!!

सुशेगाद Thu, 10/04/2014 - 15:58

अस्वल अस्वल अस्वल अस्वल अस्वल..........
भालू भालू भालू भालू भालू भालू
बीर बीर बीर बीर बीर
पांडा पांडा पांडा पांडा
जिराफ जिराफ
साळींदर साळींदर
गोगलगाय

सुशेगाद Thu, 10/04/2014 - 17:21

दोन लोकांनी फाईव स्टार दिलेत. एक अस्वल स्वत असू शकतात.(कारण माझ्या लेखन आणि कवितांना मीच फैव स्टार देतो) दुसरा कोण आहे त्याने हात वर करा.

अस्वल Thu, 11/09/2014 - 22:51

In reply to by वामा१००-वाचनमा…

तेच रहस्य आहे अपर्णा म्याडम.
खून झालाय- पण कोणाचा? साबुदाणे तर सगळ्यांकडेच होते. मग नक्की मेलंय कोण?

अस्वल Sat, 13/09/2014 - 03:33

टायम्पास म्हणून लिहिली होती राव.
म्हंजे असं आहे- की सगळ्यांकडेच (तो, ती आणि ते) साबुदाणे होते. खून झालेल्या प्रेताजवळही साबुदाणे होते. त्यामुळे खून कोणाचा झालाय? त्याचा, तिचा की त्यांपैकी एकाचा- हे कधीच कळणार नाही.
हेच ते रहस्य.
आणि हो, श्रेणीबरोबरच्या साबुदाण्यांबद्दल नगरीनिरंजन ह्यांना धन्यवाद!