तुझं माझं जमेना
हे काय लिहिलं आहे; नक्की ठाउक नाही.
एकदम डोक्यात गुणगुणावसं वाटलं ते सरळ टंकलं आहे.
एखादं तंतू वाद्य किंवा स्वरवाद्य येत असतं तर चाल लावण्याचा प्रयत्न केला असता.
मला तुझी आठवण येते
साधा डेस्क छान आहे
त्यावरती पाणी आहे
तुझी नजर पाण्यात दिसते
तू मला आवडतेस
आपण दोघे दंगाखोर भांडखोर
वेडे आपण ; वेडे सारे शहाणे
चेंडू गेला दूर
आणायला गेलिस तू
वाट तुझी पाहतोय मी
चेंडू आलाय परत
पण हाक मारून थकलोय मी
तुझ्या हाका आल्या
तू आली नाहिस
ग्राउंडची बाउंडरी हलली नाही
पिच सोडून अस्सा मी येणार नै
हाक नको मारुस समोर ये तूही
प्रतिकविता
मला तुझी आठवण येते
माझा फोन नंबर तुझ्याकडे आहे, फोन कर. भेटायलाही येऊ शकतोस.
साधा डेस्क छान आहे
त्यापेक्षाही साधे डेस्क बाजारात आहेत. पाहिजेत तर कळव.
त्यावरती पाणी आहे
हो, तूच सांडलंयस, ते पटकन पुसलं पाहिजे बाबा
तुझी नजर पाण्यात दिसते
अर्थातच, असं डेस्कवर पाणी , वैगेरे सांडलेले असताना मला अवघडल्यासारखं होतं
तू मला आवडतेस
मनोबा, वाक्यात लिंगाचा वापर चूक होतोय
आपण दोघे दंगाखोर भांडखोर
ठिक. समस्त ऐसीकरांना माहित आहे. पण जाहिरपणे असे बोलू नये.
वेडे आपण ; वेडे सारे शहाणे
हे ही ठिक. फायनली स्वतःला शहाणेच म्हणायचे असते.
चेंडू गेला दूर
फेकलासच जोरात ना
आणायला गेलिस तू
आता पून्हा मला बाईसारखे संबोधलेस तर मी काही करणार नाही
वाट तुझी पाहतोय मी
तू नॉर्मल होशील तेव्हा परत येईन म्हणतो
चेंडू आलाय परत
मीच फेकला
पण हाक मारून थकलोय मी
हाक मारून कुठे चेंडू परत येतो का? शेवटी तुझा घसा बसू नये म्हणून मी चेंडू टाकला तुझ्याकडे
तुझ्या हाका आल्या
त्या मी भाजीवाल्याला मारत होतो.
तू आली नाहिस
हे शेवट्चं आता बरं. अरे मन नपुसकलिंगी असतं तरी आम्ही तुला मनोबा म्हणतो.
ग्राउंडची बाउंडरी हलली नाही
भूकंपाची प्रतीक्षा आहे का?
पिच सोडून अस्सा मी येणार नै
सफरचंद सोडून ये.
हाक नको मारुस समोर ये तूही
या वेळेस लिंग जमलंय. भाजीवालाही आलाय माझ्या हाका ऐकून. आणि तुझ्याकडे समोर येण्यासाठी मोर शोधतोय.
नियमांना कोलून जातो
नियमांना कोलून जातो मी
आकाशावर भाळून जातो मी
हे प्रिये टिवीचा रिमोट दे इकडे
नाहीतर डिशच उखडून टाकतो मी
पित्रोदांनी आणले विष
एकता ने हादरवली छोटी स्क्रीन
गोजिरवाण्या घराचा दहा वर्ष खाल्लास हलवा
आता तरी पवित्र रिश्ता अपवित्र होउ दे
हे सखे
एम वरती रघुचा तो जोश
मल्ल्याच्या कॄपेने येती दोन गुड टाईम्सचे
सोमण मराठी मर्द मावळा
हाच तो परीक्षक शोभे
लाव व्ही वरती गुमराह
वागळेला एकमताने फेड आऊट करू
अरणबच्या तोडांत घालूनी बोळा
सखे त्याला स्टिव आयर्विनच्या मगरीस देउ
पुनहा कधी येइल पामेला
धकधक करोनी
रंग उधळाया कलर्स वर
आतातरी निर्मलबाबांना शरण जातो
सखे तुला सांगत होतो
डिश लगा डाला तो लाईफ झिंगालाला
पण पूर्वीच्या सातच्या बातम्याच़या अँकरच उलाला
श्रवुनि सकल गाथा, भिन्नशा
साधु!! साधु!!!
श्रवुनि सकल गाथा, भिन्नशा च्यानलांची |
बहुत मनि गमे हो, भावना रीलिफाची |
प्रहरभरुनि सर्वे, क्रंदती रेकताती |
नच कुणि करि ते पैं, सर्वही भांडताती ||१||
काढी कुणी शार्कचा पूर्ण काटा |
अन्यत्र दीसे बिकिनीझपाटा |
पाल्टिक्स वा पिच्चरही असो तो |
केकाटतोसा बहु लोक जो तो ||२||
डोस्के ठिकाणिं नसतां, कंडुअतिशमनार्थ च्यानले पाहावी |
तेहीं नसतां मग, बहु ती संस्थळेचि हुडकावी ||३||
प्रश्नचिन्हाच्या माळा
प्रश्नचिन्हाच्या माळा लावोनी
दाखवे नवी बाजू
देइ दणका प्रतिक्रियेचा
ट्रोल लागले माजू
पुण्य जाहले कमी
असे का रे राजू
वाटे श्रेण्यांची खैरात
संपादक लागले कुजू
वैतागता विद्वान ऐसीवरचे
खरडावयास नको लाजू
काहूनी उचके खोपडी
खा तू सुशेगादचे ज्ञानकाजू
पुसती का परत आलो
नाहीतर कुठे मी खाजू?
(No subject)
:-S