एक विचित्र मुलगी
ती १८ वर्षाची मी २० वर्षाचा.
मी तसा व्यवस्थित साधा मुलगा होतो. बिडी , दारू कसलं व्यसन नव्हत. मुली म्हणजे वेगळ्याच स्पेसीज वाटायच्या. पहिला प्रेमभंग होऊन तीन चार पावसाळी कविता करून झाल्या होत्या. हळू हळू त्यातून बाहेर येऊन सेक्स बद्दल भयानक आकर्षण वाटायला लागल. ब्लू फिल्म्स वेगैरे बघून बराच नॉलेज वाढल होत. प्रत्यक्षात काही करायचा योग आला नव्हता. सुट्टीमध्ये मी होस्टेलवरून घरी यायचो पण आई आणि बाबा मोस्ट ऑफ द टाईम घरी नसायचे. त्यामुळे घरी मी एकटाच. मला असा वैताग वेगैरे यायचा नाही उलट मी तो एकटेपणा एन्जोय करायचो. कधीतरी वाटायचं कि कोणीतरी बरोबर असाव वेगैरे.मित्र होते पण ते तेवढ्यापुरतेच.
या सगळ्यात मी तिला भेटलो.
आयुष्यात जे काही घडत त्याची थोडीफार संगती लावायचा प्रयत्न आपण करतो पण काही घटना अश्या घडतात कि त्याची काहीच कुठेच संगती लागत नाही. काही आडव्या तिडव्या घटना घडतात आणि वरचेवर उगाच तुम्हाला आठवत राहतात. रस्त्याने चालता चालता गडबडीत माणस एकमेकांना धडकतात तशी ती मला भेटली होती. मी फक्त फोनवर तिचा आवाज एकला होता आणि बरच बोललो होतो. बर्यापैकी अल्लड होती. दुसरा काही इमोशनल गुंता करायचा नाही माझ्यापुरता मी क्लिअर होतो. पहिल्यांदा आम्ही भेटायचं ठरवलं. मी कुणाही नवीन व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर कायम हिरवा ती शर्ट घालून जातो कारण हिरवा रंग गर्दीत लांबून उठून दिसतो. मी तिला सांगितलं होत कि मी हिरवा शर्ट घातला आहे .मी गाडीवर तिची वाट बघत थांबलो होतो आणि लांबून बघितला तर बर्यापैकी स्मार्ट आणि सेक्सी मुलगी कानात पांढर्या कलरचे हेडफोन आणि ब्लक टॉप आणि जीन्स घालून येताना दिसली. मनातल्या मनात आनंद झाला म्हणजे दिसायला एकदम खराब तर नाही आहे. ती माझ्या गाडीच्या जवळ आली आणि मला नाव विचारला. तोपर्यंत आमचा फोन सुरुच होता.मी नाव सांगितलं तिला खात्री पटली आणि ती गाडीवर बसली. सिग्नल लागला होता . गाडीवर बसताना देखील ती बर्यापैकी चिकटून बसली होती. च्यायला म्हंटलं. गाडीवर आम्ही खास काय बोललो नाही. मी तिला माझ्या आवडीच्या कोल्ड्रिंक हाउस मध्ये घेऊन गेलो. आम्ही समोरासमोर बसलो. मी तिला ओब्सर्व करत होतो. दिसायला अवरेज होती पण डोळ्यात खोडकर झाक होती. कानात मोठे इररिंग घातले होते. बोलायला पण स्मार्ट होती . मला म्हणाली या शर्ट मध्ये तुझ्यासारखे दोन बसतील म्हणून.मी पण म्हणालो तू तर फोन वर बोलली होतीस कि तुझे डोळे काळे आहेत पण इथे तर थोडे ब्राऊन दिसत आहेत.
आता करायचं काय हा प्रश्न होता. मी तिला घेऊन तलावाकडे गेलो. तिथे बसलो. आमच्याबाजुलाच दहा मीटर अंतरावर एक जोडप किसिंग करत बसला होत. साला फोनवर एवढी बडबडणारी पोरगी समोर आल्यानंतर शांतच झाली होती. मी असाच काहीतरी गुळ काढायला सुरवात केली, पण ती काही रिस्पांस देइन मग गळ्यात हात घालून जवळ ओढल.पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीबरोबर कस वागाव ते पण भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर कस वागाव हेच कळत नाही. नाव, गाव सोडून मला तिच काही माहिती नाही आणि तिला मी माहिती नाही मग नक्की बोलणार तरी काय ?आणि डायरेक्ट फिजिकल व्हायला गेलो तर त्यासाठी असणारा निर्ल्लजपणा आपल्यात नाही. त्यामुळे आक्वर्ड वाटत होत. शेवटी तिच्या खांद्यावर ठेवलेला हात देखील बाजूला काढून घेतला थोडासा अंतर ठेवून बसलो. मागून काही शाळेतली मुल जात होती त्यांनी कमेंट्स मारल्या. आपणपण शाळेत असताना असाच तलावाच्या झाडीत लपलेली जोडपी बघून शिट्ट्या मारायचो हे आठवलं च्यायला वेळ आपल्यावर पण येऊ शकते. तसं तलावाची झाडी काय जास्ती रोमांटिकजागा नव्हती , कुठून काय येऊन चावेल याचा भरोसा नव्हता त्यात हि बया काहीच बोलेना नुसता पाण्याकडेच बघत बसलेली. भेन्चोद शहरात एक जागा नाही आहे शांतपणे जिथे काही करता येईल. घरी जाण्याच प्रश्नच नव्हता कारण आई घरी होती. मला भूक लागली होती म्हणून तिला घेऊन मी तिसर्या मजल्यावरच्या एका हॉटेलमध्ये गेलो. दोघांसाठी पावभाजी मागवली. ती कोणत्याच बाबतीत काहीच आग्रही नव्हती . सगळ माझ्या कलान घेत होती, मला नक्की प्रकरण आहे ते कळत नव्हत . फोनवर बोलत होतो त्यावरून अंदाज आला होता कि पोरगी कामातून गेलेली आहे हिंदी फिल्म्सचा भयानक प्रभाव पडला आहे तिच्या डोक्यावर वेगैरे, . पावभाजी खाल्ली. ती कमीच खात होती नाहीतर बाकीच्या मुली बकासुरासारख खाऊन मीटर पाडतात. हिचा तसा काय हेतू नव्हता. टिपिकल चांगल्या घरातली मराठी मध्यमवर्गीय मुलगी.
हॉटेल मधून बाहेर येताना ती बोलली “कुठेतरी अंधार असेल अश्या ठिकाणी जाऊ”. भर दिवस अंधार एकाच ठिकाण असतो ते म्हणजे थिअटर .जवळच्या मल्टीप्लेक्स मध्ये घेऊन गेलो . ५०० रुपयाची तिकीट काढली. मला आणि बहुधा तिलाही पिच्चर बघण्यात खास काही इंटरेस्ट नव्हता . तिकीट देणारी बाईपण हरामखोर होती. कोपर्यातली तिकीट पाहिजेत का अस विचारलं मी होय बोललो.
आम्ही आत जाईपर्यंत पिच्चर सुरु झाला होता. अंधार असल्यामुळे मी पुढे गेलो आणि तिच्या हात धरून आमच्या कोपर्यातल्या सीट पर्यंत आलो. एकदाचा बसलो. मी पिच्चर बघत होतो आणि आणि तिच्याकडे बघत होतो. ती एकदम शांत बसली होती . तीन चारदा मी तिच्या कानात सांगितलं कि पिच्चर बोर आहे पिच्चर बोर अहे. तीपण होय म्हंटली पण आमच काय प्रकरण पुढे जाईना .इंटर्वल मध्ये बाहेर गेलो मिरिंडा ची मोठी बाटली घेतली, इंटर्वल नंतर आता एकही सेकंद वेस्ट नाही करायचा अस ठरवलं. बाजूच्या दोन अंकल लोक समजूतदार पणा दाखवत स्वताहून पुढच्या रांगेत बसले. दोन रांग सोडून समोर एक नवरा एक बायको आणि त्यांची तीन-चार वेगवेगळ्या वयोगटाती मुल अस कुटुंब बसल होत , आजूबाजूचे लोक गेले भाडमध्ये . काहीतरी सांगायचं नाटक करत करत तिच्या तोंडासमोर तोंड आणल तिच्या डोळ्यात बघितलं थेटीअर मधल्या अंधारात देखील तिचे डोळे चमकले मी डायरेक्ट तिच्या ओठांवर ओठ ठेवले हिंदी इंग्लिश फिल्म मध्ये दाखवतात तसला काय करंट वेगैरे बसला नाही . मला वाटल आपल काहीतरी चुकतंय मग मी खालचा ओठ चोखणे आणि वरचा ओठ चोखणे अश्या कसरती केल्या. डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तर ती डोळे बंद करून कडू औषध गिळल्यासारख तोंड करत होती .तिच्या ओठांची चव मात्र वेगळी होती, लीपलायनर लावला असावा. ओठांच्या एवढे सगळे केल्यानंतर नक्की किस केल्यावर काय परमानंद मिळतोय हे कळाल नाही.सगळे बघितलेल्या पिच्चरमधले किसिंग सीन, पोर्नचे नोलेज पणाला लावले. तिने माझा ओठ चावला नंतर हात धरून बाजूला केल माझ्या डोळ्यात बघितल तेव्हा तिच्या डोळ्यातले भाव बदलेले होते, एक्सायटेड दिसत होती . दोन, तीन वेळेस असच किस केल. अंगाच तापमान वाढल होत माझ्या आणि तिच्याही. कधीही ताप येईल अस वाटत.शेवटी शांत झालो. व्यवस्थित होऊन गप्प बसलो. मग तिने हात हातात धरला आणि माझ्यावर कलंडून बसली. मला म्हणाली मघाशी पावभाजीबरोबर खालेल्या कांद्याचा वास अजून माझ्या तोंडाला येत आहे. मलापण थोड घाणेरड वाटल दुसर्याच्या तोंडात तोंड घालायचं म्हणजे काय ?आणि ते पण दोन तासापूर्वी हिला आपण आयुष्यात पहिल्यांदा भेटलोय काहीच माहिती नाही आहे हिच्याबद्दल . थोड्यावेळाने माझ्यातला पुरुष परत जागृत झाला . मी तिला बोललो मला तुझे हार्ट बिट्स ऐकायचे आहेत. एका सेकंदात तिने तिच्या हातानी माझा हात तिच्या बूब्स वरती ठेवला तिच्या ब्राच्या पट्ट्यांचा स्पर्श मला जाणवला तो एक मांसल गोळ्यासारखा प्रकार.पहिल्यांदाच एका पोरगीच्या स्तनाला हात लावून अनुभवत होतो . पण टोप अंगावर असल्यामुळे काही सुखद इरोटिक वाटल नाही. मी टोप मधून आत हात घालायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली आता काय इथे कपडे काढायचे आहेत का आपण?
त्यानंतर जास्ती काय केल नाही. एक दोनदा परत किस घेतला पण मला उलट नंतरनंतर नको वाटायला लागल. ती थोडी लहान पण आहे अस वाटत होत. एकदम नैतिक गोंधळ झाला होता ,पण मी फारसा नैतिक माणूस नसल्यामुळे मी काय एवढा विचार करत बसलो नाही . पिच्चर संपला बाहेर आलो. तिला पटकन बस मध्ये बसवून दिल.
घरी आल्यावर मला थोडा ताप आल्यासारखा वाटल.
नंतर आम्ही फोनवर वेगैरे अधून मधून बोलायचो.एकदा घरी कुणीच नव्हत मी तिला बोलावलं. सकाळी सकाळी जाऊन मी लांबच्या मेडिकल दुकानातून कंडोम घेऊन आलो होतो. टीवीवर जाहिराती बघून आय पिल माहिती होती पण आय पिल मिळाली नाही म्हणून मेडिकलवाल्याने अनवान्तेड ७२ सुचवली होती. हि सगळी खरेदी एका मित्राला बरोबर घेउन केली. पहिल्यादाच कंडोमचे एवढे ढीगभर ब्रांड आणि फ्लेवर असतात हे कळाल. मेडिकल वाले लोक पण साले एकदम प्रोफेशनल असतात. ते त्यातल्या कंडोमचे डोटेड आणि काय काय डीटेल्स सांगत बसले. मी पटकन मिळेल दहा बारा बॉक्सेस पैकी ज्याच्यावर एकदम जबरदस्त चित्र होत असाल कंडोम घेऊन आलो. घरात आठ दिवस झाल एकटाच होतो. कुणी बोलायला देखील नव्हत. हॉटेल मधून जेवण देखील पार्सिल घरीच घेऊन आलो. यावेळेस तिने गुलाबी टॉप घातला होता आणि काळी जीन्स. अंगाला परफ्युमचा वास येत होता. आम्ही टीवी बघत बघत जेवलो. नंतर बेडरूम मध्ये गप्पा मारत बसलो मी तिला कीस करायचा प्रयत्न केला पण तिने मला लांब ढकलला अजिबात काहीच करू देईना. शेवटी डोक दुखायला लागल म्हणून ती चक्क झोपली. मी तिच्या बाजूलाच झोपलो. तिला मिठी मारली याबद्दल तिची काही तक्रार नव्हती. थोड्यावेळाने ती जागी झाली आणि वापस जायचं म्हणून बेडरूम मध्ये जाऊन केस वेगैरे व्यवस्थित करू लागली . मी पण तिच्या मागोमाग गेलो . ड्रेसिंग टेबलच्या आरश्यात बघून फोटो काढले . मी तिला तिथेच पडलेल आईच मंगळसूत्र घातलं. मी तिच्या चेहऱ्यावर किस करत होतो पण ओठाच्या आसपास जरी पोचलो तरी लांब ढकलायची. बर्याच झटापटीनंतर ती मिठीत आली . मी ड्रेसिंग टेबल च्या मोठ्या आरश्यासमोर होतो ती माझ्या मांडीवर बसली होती. मी तिला घट्ट धरून ठेवलं तिचे हात माझ्या मानेभोवती होते. थोडे सैल होते. आरश्यामधल्या माझ्याच तिच्या मिठीमाधल्या प्रतीबिम्बाकडे बघत असताना अचानक मला रडायल आल सगळ्या सेक्शुअल फिलिंग्स गेल्या. एकदम आवंढा गिळला. तिला कळू दिल नहि. थोड्यावेळाने आम्ही एकमेकांच्या मिठीतून बाजूला गेलो . इतक्या दिवसाच एकटेपण कुणासोबत तरी वाटत आहे अस वाटल . आपण सहसा कधी जास्ती इमोशनल वैगेरे होत नाही पण आठ दिवस मी हॉटेल मधला वेटर सोडला तर दुसर्या कुणासोबत बोललोही नव्हतो. बराच वेळ न बोलता तसेच पडून राहिलो आरश्यात बघत. शेवटी ती बोलली “तुला जे पाहिजे आहे ते मी देऊ शकत नाही कारण तुझ्यावर माझा अजून विश्वास नाही आपण आता कुठ फ्रेंड्स बनतोय आज तू जे काही वागलास ते काय मला पटल नाही “ मी काहीच बोललो नाही तोंडातून शब्दच फुटत नव्हता . अस असू शकता का कि ज्या व्यक्तीला आपणफारस काही ओळखत नाही एकदम शरीरच्या वासनेनेच बघतो तीच व्यक्ती खूप जवळ आल्यावर अचानक इमोशनल होतो का माणूस? मला तीच शरीर सोडून बाकी काहीच खास आवडलं नव्हत. ना तिचे आणि माझे विचार जुळत होते , ना आमचे इंटरेस्ट सेम होते. मी एकदम स्वार्थी , धूर्त , कावेबाज हेतू ठेवून तिच्यासोबत जमेल तेवढ गोड गोड वागत होतो. माझा हेतू इतका क्लीअर असला तरी मग मला रडायला का याव?तिच्या मिठीमध्ये असताना आईचीच आठवण आली. खूप वर्षापूर्वी लहान असताना आईच्या मिठीमध्ये शांत उबदार झोप लागायची तसाच काहीस वाटल होत. मी उठून सगळ आवरलं आणि तिला तिच्या घरी सोडून आलो . कंडोमच पाकीट वय गेल. नको त्या वेळेस नको त्या ठिकाण आपल्या इमोशन्स वरती येतात. जवळपास ती तयार झाली होती आणि मी रडून मूडच घालवला , किंवा मला मुलीना कन्विन्स करता आल नव्हत जर तिला काही करायचच नव्हत तर मग ती आपल्यला का भेटते कारण भेटल्यावर आम्ही काही खास बोलत पण नाही आमची साधी मैत्री पण नाही. सपोज आमच्यात सेक्स झाला आणि ती बोलली कि लग्न करूया तर ते तर शक्य नव्हत कारण ती मला लग्न करण्याइतकीपण चांगली नाही वाटली .
त्यानंतर ती मला एकदाच भेटली. आम्ही दोघ पिच्चरला गेलो सेम कोपर्यातल्या सीट्स होत्या. पण मी तिच्यापासून बराच अंतर ठेवून बसलो. ती तिच्या वाढलेल्या नखांनी माझ्या होतावर रांगोळी काढत बसली होती. मी काहीच रेस्पोंड करत नव्हतो. पिच्चर संपला आम्ही एका इराणी हॉटेल मध्ये गेलो. शांतपणे बसलो.ती बोलली मी आहे तशी मला अक्सेप्ट ,कर मी अशीच आहे मला जास्ती बोलायला आवडत नाही, मला बाकीच्या मुलींसारख राहता येत नाही किंवा मी एवढी अफाट सुंदरपण नाही आहे. मी तिला सांगितलं कि “तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत नाहीस कि तुझ्यासोबत लग्न कराव”
आता भेन्चोद “मला अक्सेप्ट कर” यावर मी काय उत्तर द्याव हे मलापण कळत नव्हत. साला मी स्वताच काही झ्याट सेटल नव्हतो. आणि लग्न वेगैरे विचार करण तर हास्यास्पदच होत. मुली लहान वयात बर्याच मच्यूर होतात. लग्न वगैरे करायला लागणार हे सगळ गृहीत धरलेलं असता त्यांनी. आपण कधी एवढा विचार करत नाही. या भेटीत मला तिच्यातला एक फरक जाणवला नेहमी जीन्स, स्कर्ट घालणारी ती आज मस्त पिवळ्या कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती. केस वैगेरे व्यवस्थित बांधून, मी तिच्या फक्त रूपाच्या मोहात पडलो होतो. पण तेही तितक खर नव्हत. नाहीतर त्यादिवशी तिच्या मिठीमध्ये असताना कसला आवेग आला होता याला काही उत्तर नव्हत. मला तिला पुन्हा पुन्हा भेटाव अस वाटत होत पण आतून माहित होत ती आता मला पुन्हा कधी भेटणार नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर कायमसाठी संबध संपवण किती अवघड असत सगळे प्रश्न कसे अनुत्तरीत राहतात.मला एकदम कोरड कोरड वाटत असताना ती मला अचानक भेटली होती. तिच्यायेण्या आधी मी असा कुणाच्या मिठीत जाऊन रडलो वैगेरे नव्हतो. म्हणजे कळायला लागल तेव्हापासून कधी खास रडल्याच आठवतच नाही. रडणे म्हणजे बायकांचं लक्षण अस मनावर ठसवून घेतलं होत. पण तेच एका बाईच्या समोर रडायला येणे म्हणजे अतीच झाल. शरीर आणि मनाच्या मध्ये पण काहीतरी नात असू शकत याची जाणीवदेखील तेव्हाच झाली. फारसा काही रोमान्तिक न वाटता सगळ शरीराच्या थ्रू एक्स्प्रेस झालो होतो. मे बी तिची काही दुखः असतील ती माझ्या एकाटेपणासोबत रेजोनेट होऊन मला आणि तिला एकाच वेळेस रडायला आल असाव.पण मला कधीही शंका वाटली नाही ती त्यादिवशी रडत होती आणि बहुधा तिलादेखील माहित नसाव कि मी त्यादिवशी ब्रेकडाऊन व्हायच्या मार्गावर होतो.आता तिचा चेहरा देखील आठवत नाही पण मोकळ झाल्यासारखं रडायला येण मात्र कायमसाठी बंद झाल.
संपादकांनी कुठली मनमानी केली
संपादकांनी कुठली मनमानी केली हे जरा विस्कटून सांगता का?
त्यांनी फक्त सुमार लेख असे म्हटलेय, लेख किंवा प्रतिक्रिया उडवल्या नाहीत, कोणत्याही स्त्री आयडीने तक्रार केली म्हणून, किंवा तसे सांगून लेखकाला तंबी सुद्धा दिलेली नाही
एक सामान्य सदस्य म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया देण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहण्याबद्दल खच्चून निषेढ!
त्या निमित्ताने एकदा
त्या निमित्ताने एकदा संस्थळांचा ब्रीफ इतिहास लिहावा अशी विनंती. तुम्ही किंवा अजून कोणी इंट्रेस्टेड जुन्या लोकांनी.
मराठी संस्थळे हा प्रकार मायबोलीपासून १९९६ ला सुरू झाला. म्हणजे गेली किमान १७ वर्षे हा प्रकार अस्तित्वात आहे. देवनागरी लिपीत लिहिण्याची सोयही तुलनेने उशिराच उपलब्ध झाली असावी. मनोगत-मिपा ही संस्थळे ६-७ वर्षे जुनी झाली आता. ऐसी नवीन नवीन म्हणता म्हणता दोनतीन वर्षे होऊ घातलीत त्यालाही.
त्यामुळे हा सर्व प्रकार चालू असतानाच त्याचा इतिहास लिहिलात तर लोकांनाही ते पाहणे रोचक आणि उद्बोधक ठरेल.
समस्त महिलावर्गाच्या
समस्त महिलावर्गाच्या कुठल्याही भावना दुखवायचा किंवा मुद्दाम इरोटिक काही लिहायचा माझा उद्देश नव्हता. मी जे घडल ते आहे तस लिहील. स्त्री पुरुष संबधाकडे बघण्याचा माझा काही गलिच्छ दृष्टीकोन तेव्हाही नव्हता आणि आजही नाही. पण सुरवातीला सेक्स बद्दल एक्स्प्लोर करताना जे काही जाणवलं ते लिहील. जर काही चुकीच वाटत असेल तर मी लेख काढून टाकतो आणि सुरवातीलाच माफी मागतो. मला तंबी वेगैरे द्यायची गरज नाही. एका सविस्तर प्रतिसादामध्ये यावर लिहीन.
लेखनामुळे तसे काही वाटले असते
लेखनामुळे तसे काही वाटले असते तर एवाना कारवाई झाली असती. शिवाय कोणीही भावना वगैरे दुखावल्याचे कळवलेलेही नाही.
शिवाय संजोपरावांचा प्रतिसाद हा उपरोधात्मक आहे.
(माझ्यासकट)अनेकांना हे लेखन आवडले नाही/विशेष वाटले नाही इतकेच. मात्र त्यामुळे लेखन काढून टाकयची गरज वाटत नाही.
भीकार
सेक्स ही नैसर्गीक भावना आहे. भीन्न लिंगी आकर्षण ही पण स्वाभावीक गोष्ट आहे. या विषया वर लिह्ण्यासाठी पातळी सोडुन च लिहले पाहीजे असा लेखकाचा समज झालेला वाटतोय
२०-२२ च्या वयातील भावना सुंदर ही असू शकतात. त्यांना उगीच गलीच्छ स्वरुप दिले आहे.
लेख अगदीच टाकाऊ वाट्ला. भीकार , टुकार या प्रतीक्रीये शी १०० % सहमत.
थेट
थेट, सरळ लिहायचा प्रयत्न आवडला. लिहायला सुरु केलत हे छान.
जमेल हळूहळू जे वाटतय ते व्यवस्थित लिहायला.
पहिल्याच धाग्यात, सुरुवातीलाच षटकार मारला नाही तरी हरकत नाही.
बाकी, वृत्ती कथानायकासारखी नसल्याने, नैतिकता* वगैरे गुंडाळून ठेवता येत नसल्याने, जोडून पाहू शकलो नाही. तरी काही किस्से ऐकलेले असतात, काहींच्या कहाण्यांची दु:खं कानात गात असतात, त्या धर्तीवरचं काहीतरी वाटलं.
घटनांचं वर्णन वगैरे सगळं बटबटित असेल. पब्लिक त्यामुळं भिकार, फाल्तू,सुमार वगैरे म्हणाली असेल.
पण जे जसं वाटतं ते तसं लिहायला सुरुवात करणं हे आवडलं.
निव्वळ शारीरिक भाग लिहायचा असता, तर तुम्ही घटनेचं वर्णन करुन गप्प बसला असतात, पण त्यावेळी काय काय वाटतय , मधूनच रडू येतय वगैरे थेट मनात चालणआर्या घडामोडी टिपल्यात. त्यामुळे निव्वळ १००% बीभत्स / मचाकस्टाइल वगैरे म्हणवत नाही.
.
.
.
*मी नैतिकतेला मानतो. आता माझी नैतिक मूल्य वेगळी, तुमची वेगळी, आख्ख्या जगातल्या प्रत्येकाची वेगळी वगैरे वगैरे सगळं मान्य केलं, तरी golden rules सारखं एक कॉमन फ्रेमवर्कही असतं. निदान तेवढं तरी नॉर्मल लोकांत कॉमन असावं. तर मी मानतो म्हणजे किती मानतो? तर उद्या कायदा पाळायचा की मूल्य असा प्रश्न आला तर मी मूल्याची निवड करीन. कायद्यानं जे करायचं असेल ते करावं; प्रमाणाबाहेर तडजोड करायला लावू नये.
म्हणून म्हटलं, मला रिलेट करता आलेलं नाही.
किती मानतो ?
.
.
.
दोन सल्ले :-
१.स्वतःची काळजी घ्या.
२.लिहीत रहा.
नैतिकता* वगैरे गुंडाळून ठेवता
नैतिकता* वगैरे गुंडाळून ठेवता येत नसल्याने
सेक्स करायची इच्छा असताना ते मिळवण्याचा वैध प्रयत्न करणेसुद्धा अनैतिक समजणे चूक आहे असे वाटते.
१२-१३व्या वर्षी वयात आल्यावर लग्न होईपर्यंत (म्हणजे कमीतकमी २३-२४चा होईपर्यंत) माणसाने काहीच करू नये अशी अपेक्षा अमानुष वाटते.
मध्यंतरी गौरी कानेटकरांच्या एका लेखात एका घटस्फोटितेला आपण निव्वळ शरीरसंबंध ठेवू असे सुचवणार्या एका घटस्फोटित माणसाच्या "घाणेरड्या" वागण्याबद्दल वाचले. म्हणजे विचारायचेसुद्धा नाही का?
अशा लोकांनी मन मारावे किंवा थेट वेश्यागमनच करावे असे वाटते का?
वेश्या नसलेल्या स्त्रीशी शरीरसंबंधांची किंमत थेट लग्न इतकी जास्त का? स्त्रियांना शरीरसंबंधांची गरज अजिबातच नसते का?
ननिंशी प्रचंड सहमत.१२-१३व्या
ननिंशी प्रचंड सहमत.
१२-१३व्या वर्षी वयात आल्यावर लग्न होईपर्यंत (म्हणजे कमीतकमी २३-२४चा होईपर्यंत) माणसाने काहीच करू नये अशी अपेक्षा अमानुष वाटते.
आणि याचे उत्तर कोणीच देऊ शकलेला नाही भारतीय संदर्भात.
पण मला एक शंका आहे. यामागे कुठला फर्स्टहँड विदा नाही की दुसरे कै नाही. पण ही समस्या मध्यमवर्गाचीच आहे असे वाटते. अन त्यातही शहरी लोकांमध्ये जास्त. गावाकडे सेकंडहँड विदा सांगतो त्याप्रमाणे चान्स मारला जातो-यद्यपि समजा जेवण नसले तरी नाष्ट्यापर्यंत मजल कैक लोकांची असते. शहरात मात्र लोक निर्जळीच करतात असे दिसते.
आणि लग्ने उशिरा करायची, तोपर्यंत कायम मन मारायचे, हे खरंच दुष्टचक्र आहे. हे निसर्गाविरुद्ध असल्याने कधी ना कधी बदलणारच. जुन्या काळी बालविवाह व्हायचा, त्याचे हजार प्रॉब्लेम्स असले तरी वयात आल्याबरोबर लैंगिक उपासमार होत नसे तो एक प्लस पॉइंटच म्हणावा लागेल.
वेश्या नसलेल्या स्त्रीशी शरीरसंबंधांची किंमत थेट लग्न इतकी जास्त का? स्त्रियांना शरीरसंबंधांची गरज अजिबातच नसते का?
अतिशय दांडगा सवाल. पाहू कोण देतो याचे उत्तर. हा सवाल मलाही पडला होता आणि आहे.
शरीरसंबंधांची किंमत थेट
शरीरसंबंधांची किंमत थेट लग्नाइतकी होण्याचं कारण म्हणजे मनुष्यप्राण्याने सेक्सशी जोडलेल्या इतर भावना.
जर आपखुषीने कोणीही, कोणत्याही वयात, कोणाशीही संबंध ठेवले तर चालतील (?!) अशी व्यवस्था असेल तर काय होईल याचा विचार खालीलप्रमाणे करता येईलः
१. वयात येणे ते लग्न होणे या दोन घटनांच्या मधल्या काळात लैंगिक भावना दाबून ठेवण्याची गरज राहणार नाही.
२. पण, मग हे संबंध आपखुषीने ठेवले जातील असं गृहीत धरावं लागेल (बलात्कार आपल्याला नकोय असं मानून)
३. उपरोक्त २ ही अट पूर्ण व्हायची तर मुलींना संभोगासाठी योग्य वाटेल असा मुलगा (जे काय आकर्षकतेचे मुद्दे असतील ते.. उंचीच, किंवा सिक्स पॅक्स असं म्हणत नाही)असणं हे सर्वांनाच जन्मजात रुपगुणांसहित आणि कर्तबगारीच्या दृष्टीने शक्य नाही. तसेच व्युत्क्रमाने सर्वांनाच हवी असलेली मुलगी (पुन्हा एकदा, जे काय आकर्षकतेचे मुद्दे असतील ते, गोरी, बांधेसूद असं म्हणत नाही)बनणं प्रत्येक मुलीला जन्मजात रुपगुणांसहित आणि कर्तबगारीच्या दृष्टीने शक्य नाही.
४. म्हणजेच एका नराला अनेक माद्या मिळणं आणि अदरवाईज .. अशा घटना घडून अनेक नर (आणि कदाचित माद्या) सेक्सपासून वंचित राहणार..आणि काहींना तो भरपूर मिळणार. या सिलेक्टिव्ह डिस्ट्रिब्यूशनमधून संघर्षमय परिस्थिती नेहमीसाठी तयार होणार. मागील दाराने पुन्हा एकदा बलात्कार दाखल होणारच.
५. अन्नाची देवाणघेवाण, सामान्य खेळ, व्यवहार आणि सेक्स यात एकच मुख्य फरक असा आहे की सेक्समधे बॉडी फ्लुइड एक्सचेंज, आणि त्यामुळे एक अधिकची निकटता आहे. यात गर्भवती राहणे आणि (एरवी झाले नसते असे काही) रोग प्रसारित होणे या दोन शक्यता नवीन काळात "रिस्क" या सदराखाली सरकल्या आहेत.
६. म्हणून सेक्स या केवळ फलनासाठी आवश्यक क्रियेला मनुष्यप्राण्याने जवळीक, प्रेम, भावना, वचन, बांधिलकी यांसोबत बांधून त्याचे हेजिंग केले आहे.
७. त्यामुळे या कमिटमेंटी सोयीस्कर पद्धतीत आता राजरोसपणे सर्वांना १३ व्या वर्षी सेक्स मिळणार नाही, पण जास्तीतजास्त लोकांना पुढे वय वाढल्यावर का होईना, पण हमखास सेक्ससुविधा आणि ग्यारंटी उपलब्ध होईल (व्यावसायिक पातळीवर डेली बेसिसवर श.संबंध ठेवावे लागणार नाहीत). त्यामधे स्पर्धा बरीच कमी असेल. म्हणून बरेच थांबून कमिटमेंटसहित लग्न ही किंमत आजरोजीच्या बाजारात ष्टांडर्ड झाली आहे.
अर्थातच ही पद्धत नैसर्गिक सेक्सच्या विपरीत आहे. ती नष्ट व्हायला काहीही हरकत नाही. आपण कोणत्याही भावनेविना / मानसिक जवळिकीविना निव्वळ शरीरधर्म म्हणून सेक्स करण्याचे विसरुन बराच काळ झाला असल्याने आता ते अचानक अडाप्ट करणे कसे जमेल ठाऊक नाही, पण काही देशांमधे आताही तसे होते आहे आणि तसे सर्वत्र झाल्यासही उत्तमच. पण आपल्याला चौदाव्या वर्षी संभोगाला मादी मिळावी आणि पुन्हा पंचविसाव्या वर्षी एक व्हर्जिन पतिव्रता पत्नीही मिळावी हे लाड चालणार नाहीत.
वर दिली आहे ती फक्त एक शक्य कोटीतली कारणमीमांसा..
मला जितके समजले त्यावरून
मला जितके समजले त्यावरून बॅट्या किंवा ननिंना (आणि मलाही) लग्नाशिवाय 'परस्परसंमतीने' काही शारीरीक कृती, (प्रसंगी सेक्सही) करण्यात काय चुकीचे आहे? हे विचारणे आहे असे वाटले. लग्नसंस्थेचे सनातन फायदे वगैरे ठिकच आहे. पण उर्वरीत समाज बदलत असताना लग्नसंस्थेचे नियम जुनेच का ठेवावेत? असे काहीसे!
लग्नाआधी विविध पातळ्यांवर शारीर जवळीक साधली, जर जमली, आवडली तर पुढे जाऊन लग्न केलं अन्यथा दुसरी व्यक्ती शोधली याचा कितपत बाऊ करावा? तशी इच्छा न झाल्यास / परस्परसंमती असणारा पार्टनर न मिळाल्यास थेट लग्न करायचा पर्याय आहेच.
बॅट्या: शहरातही गावासारखीच परिस्थिती आहे. माझ्या शालेय/कॉलेज जीवनातही अनेकजण (मुले व मुली दोघेही) नाश्त्यापर्यंत मजल मारत. गावातील कमी लोकसंख्येमुळे या गोष्टी अधिक समजत असाव्यात / बोलल्या जात असाव्यात. शहरात हे लपून करणे अधिक सोपे असावे इतकेच!
:)
"ठेवावेत" मधील इथे दिसणारा विरोधाभास मान्य आहे.
मात्र हे ठेवणे समाजाकडूनच घडते व समाजाने ते का ठेवावेत? हा प्रश्न याच समाजातील माझ्याहून वेगळे/विरोधी मत असणार्यांना - जे सध्या बहुसंख्य आहेत- त्यांना आहे.
तेव्हा वाक्यरचना चुकलेली नसावी.
अर्थात माझे जुने "लग्नसंस्था ही तयार झालेली संस्था आहे, तिच्यात बदल होत राहतील व तीची गरज वाटेनाशी झाली की ती आपोआप गळून पडेल" या मताशी अजुनही चिकटून आहे.
ही मीमांसा योग्य असली तरी
:)
ही मीमांसा योग्य असली तरी गल्ली अंमळ चुकली. आक्षेप लग्नाला अन लैंगिक एकनिष्ठेला नाही, तर सेक्स करायचे म्हणजे लग्न केलेच पाहिजे याला आहे. आधी लैंगिकदृष्ट्या मुक्त राहून मग एका जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे हा सर्वोत्तम पर्याय. युवरूप-आम्रविकेत ते चालतंय. इथेही काही ठिकाणी आहे ते पण अत्यल्पसंख्य लोकच करताहेत.
लग्नपूर्व सेक्सला इतका विरोध का हे मला कळत नाही. एक तर असा विरोध, त्यात परत लग्ने उशिरा, मग डोकं फिरणार नैतर काय! म्हणून ही व्यवस्था निसर्गविरोधी आहे असे म्हणतोय. लग्न इटसेल्फ इज फाईन. मधला कालखंड गंडतोय त्याबद्दल म्हणतोय. अन घटस्फोटित, विधवा/विधुर, इ. बद्दलही हेच लागू होईल.
आधी लैंगिकदृष्ट्या मुक्त
आधी लैंगिकदृष्ट्या मुक्त राहून मग एका जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे हा सर्वोत्तम पर्याय.
अगदी अगदी.. कुठे काय म्हटलंय की हा पर्याय उत्कृष्ट नाही असं. मी आपल्या इथे जे आहे ते तसं का असावं ते सांगितलं. पाश्चात्यांचे अंधानुकरण वगैरे तुपकट विचार माझ्या मनात कधी येत नाहीत.
लग्नपूर्व सेक्सला इतका विरोध का हे मला कळत नाही.
कोणाचा विरोध आहे? आपलाच आहे. तुमचाच आहे.. सर्वांचाच आहे. YOU ARE NOT IN THE TRAFFIC..YOU ARE THE TRAFFIC!!
एवढं काही सुरुवातीपासून
एवढं काही सुरुवातीपासून अॅनालिसिस करायला नकोय.
लग्नापूर्वीच सेक्स केलाच पाहिजे असे मी म्हणत नाहीय पण किमान प्रयत्न करणार्यांना अनैतिक तरी ठरवू नये.
बाकी नवरात्रासारख्या सणांच्या वेळी वाढणारा आयपिल्सचा वगैरे खप पाहता चोरीछुपे चालतंच फक्त दि ग्रेट भारतीय संस्कृतीसाठी खुलेआम करायचे नाही असेच दिसते.
एक मुख्य गंमत. लग्न हा नुसता
एक मुख्य गंमत.
लग्न हा नुसता शब्द जरी कोणी वापरला - मग तो लग्नसंस्थेचा ठोक उपयुक्ततावाद निगेटिव्ह बाजू म्हणून दाखवण्यासाठी का असेना- तो बाय डिफोल्ट विवाहसंस्थेचे समर्थन, महान भारतीय संस्क्रुतीचे संरक्षण ..असाच घेतला जातो..बरेचजण मुद्दा चक्क विवाहसंस्थेचा अन भारतीय संस्क्रुतीचा दुटप्पीपणा दाखवणारा असेल तरी तो वाचत नाहीत..
इन जनरल निरीक्षण.. हे इथेच असे खास नव्हे.
बॅटमॅन : वेश्या नसलेल्या
बॅटमॅन : वेश्या नसलेल्या स्त्रीशी शरीरसंबंधांची किंमत थेट लग्न इतकी जास्त का? स्त्रियांना शरीरसंबंधांची गरज अजिबातच नसते का?
मला वाटत तुमच्या प्रश्नाचे उत्तर गवि॑च्या खालिल ओळित आहे.
गवि: आपल्याला चौदाव्या वर्षी संभोगाला मादी मिळावी आणि पुन्हा पंचविसाव्या वर्षी एक व्हर्जिन पतिव्रता पत्नीही मिळावी हे लाड चालणार नाहीत.
निर्झरा : एखादा पुरुष सहजपणे आपली ईछ्छा प्रकट करु शकतो. तसे एक स्त्रि करु शकत नाही. स्त्रिया॑नाही गरज असतेच पण उघड पणे त्या एखाद्य पुरुषाला विचारु शकत नाहीत. पुरुष व्हर्जिन आहे की नाही हे ओळखणे कठिण आहे. पण स्त्रि व्हर्जिन आहे की नाही हे एक पुरुष लगेच ओळ्खु शकतो. पुरुषाने कितिही बाहेरचे स्॑बध ठेवले तरी लग्नाच्या वेळी मात्र मुलगी व्हर्जिनच लागते. मग भलेही तो पुरुष मात्र व्हर्जिन नसला तरी चालेल. याच कारणा मुळे एखाद्या पुरुषा बरोबर स्॑बध ठेवताना त्याची कि॑मत थेट लग्नात होते. कारण व्हर्जिन नसलेल्या स्त्रि कडे पुरुषाचा बघण्याचा द्रुष्टिकोण वेगळा असतो. स्त्रिया॑च्या भवितव्याचा विचार करता स्त्रिया॑ना कितिही गरज असली तरी त्या स्वतावर तेवढ निय॑त्रण ठेवु शकतात , जे पुरुष करु शकत नाहीत आणि म्हणुनच स्त्रि ला पुरुषा॑न पेक्षा जास्त सहनशिल म्हणल जात ते याच साठी. आता माझा प्रश्न पुरुषा॑साठी - किती पुरुषा॑ना ही गोष्ट मान्य आहे कि व्हर्जिन नसलेली एक मुलगी अगदी सहज पणे मनात कुठ्लीही आढी न ठेवता ते तिला भावि पत्नि म्हणुन स्विकारायला तयार आहेत? ( बोलणे आणि करणे ह्यात खुप फरक असतो)
राहुल गांधी
किती पुरुषा॑ना ही गोष्ट मान्य आहे कि व्हर्जिन नसलेली एक मुलगी अगदी सहज पणे मनात कुठ्लीही आढी न ठेवता ते तिला भावि पत्नि म्हणुन स्विकारायला तयार आहेत?
व्हॉट इफ आय आस्क यू द सेम क्वेश्चन? व्हर्जिन नसलेला पती किती बायकांना चालेल?
अन
आपल्याला चौदाव्या वर्षी संभोगाला मादी मिळावी आणि पुन्हा पंचविसाव्या वर्षी एक व्हर्जिन पतिव्रता पत्नीही मिळावी हे लाड चालणार नाहीत.
अर्थातच मान्य आहे. यात काहीच चूक नाही. दोन्हीपैकी एकच मिळेल हे ओघाने आलेच.
आणि
पण स्त्रि व्हर्जिन आहे की नाही हे एक पुरुष लगेच ओळ्खु शकतो.
असे आजिबात नाही. अलीकडे 'त्या' निकषाचा फोलपणा मेडिकली जाहीर झाल्यानंतर तर ओळखणे केवळ अशक्य.
व्हर्जिन नसलेला पती किती बायकांना चालेल?
बॅटमॅन तुमचा प्रश्न ही बरोबर आहे.
लग्ना आधी मुलीने असे काही करणे म्हणजे आपल्या रिति आणि पर्॑परे नुसार त्या मुलीला लगेचच अविचारी, कुल्टा ............. असे नाही नाही ते शब्द वापरुन तीलाच दोषी मानले जाते. मग अश्या मुली सोबत लग्न करायला कोणी तयार होत नाही. एखादा मुलगा तयार झाला तरी त्याचे घरचे त्याच्या निर्णयाशी सहमत नसतात. घरच्या॑च्या विरोधात कोणी जात नाही ( अपवाद असतात). मग हा प्रश्न एकतर्फी होतो. मुली मात्र मुला॑ना निर्मळ मनाने स्विकारु शकतात ( तो कसाही असला तरी), तस मुल हे करु शकतात क?
ज्यूलीचे चौघडे http://www.aisiakshare.com/node/1013
ज्यूलीचे चौघडे
म्हणजे विचारायचेसुद्धा नाही
म्हणजे विचारायचेसुद्धा नाही का?
याबद्दल. कंपनीमध्ये सध्या कमिटी अगेन्स्ट सेक्श्युअल हॅरॅसमेंट वगैरे प्रकरणे जोरात आहेत. या मध्ये "सेक्श्युअल हॅरॅसमेंट" च्या खाली काय काय येते वगैरे चर्चा चालू होती. त्यांच्या म्हणण्यानुसार "asking out for date" हे सुद्धा त्यामध्ये धरले जाऊ शकते जर - ज्याला विचारले आहे त्याला त्यामुळे फार अपमानित झाल्यासारखे वाटले तर! मग पुढचा प्रश्न अर्थात हा होता की मग "date" साठी पण विचारायचे नाही का? उत्तर होते, हा प्रश्न विचारण्याआधी तुम्ही थोडेफार तर त्या व्य्क्ती ला ओळखत असाल, त्या वरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो ना की ती व्यक्ती काय उत्तर देईल.
त्याच धर्तीवर - डायरेक्ट्ली "त्या" गोष्टीसाठी विचारण्याआधी थोडाफार अंदाज घ्यायला हवा ना! हॉटेलात लंचला जाऊ इतके ते सोपे नसते आणि नसावेच!
तुम्हाला इच्छा होतेय म्हणून समोरच्याला पण त्यात तितका रस असावा असा अट्टाहास का?
स्त्रियांना शरीरसंबंधांची गरज अजिबातच नसते का?
असते़ की.. नसायला काय झाले.. पण लहान पणापसून झालेल्या मेंटल कंडिशनिंग मुळे अशा इच्छा कमी महत्वाच्या वगैरे मते असतात. त्यातून असली कोणाला ती इच्छा महत्वाची - तरी असलेली गरज आणि फार विचार न करता ती लग्नाशिवाय पूर्ण करायला गेल्यास त्याचे नंतर होणारे एकूणच (शारिरिक, मानसिक, सामाजिक) परिणाम असे तोलून बघितल्यास "its not worth it" असाही निष्कर्ष निघत असण्याची शक्यता आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार
त्यांच्या म्हणण्यानुसार "asking out for date" हे सुद्धा त्यामध्ये धरले जाऊ शकते जर - ज्याला विचारले आहे त्याला त्यामुळे फार अपमानित झाल्यासारखे वाटले तर! मग पुढचा प्रश्न अर्थात हा होता की मग "date" साठी पण विचारायचे नाही का? उत्तर होते, हा प्रश्न विचारण्याआधी तुम्ही थोडेफार तर त्या व्य्क्ती ला ओळखत असाल, त्या वरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो ना की ती व्यक्ती काय उत्तर देईल.
मस्त फालतूपणा आहे. असली थेरं बळावली तर फारुख अब्दुल्ला म्हणाले तशी भावना वाढायला हातभार लागेल.
(भडकाऊ, निरर्थक, विनोदी या तीन श्रेण्या प्लस डायाट्राईब्स यांच्या प्रतीक्षेत.)
आम्ही हावरट असूच.
पण मुद्याबद्दल मत काय आहे? डेटिंगला येते का असे विचारल्यावर ती हरॅसमेंट कशी? एकदादोनदा ठीके पण तिसर्यांदा-चौथ्यांदाही पिच्छा पुरवला तर तंबी मिळणे सयुक्तिक वाटते. पण अज्जीच विचारायचे नाही हा कोणता वायझेड न्याय आहे?
आणि मुख्य म्हणजे, ननिंच्या प्रश्नाला कोणीच उत्तर दिलेले दिसत नाही. वेश्या नसलेल्या स्त्रीशी संग करायची किंमत लग्न हीच असावी असे काहीसे पर्सेप्शन दिसते भारतीय समाजाचे अजूनही. त्याबद्दलचे मत वाचायला आवडेल.
डेटिंगला येते का असे
डेटिंगला येते का असे विचारल्यावर ती हरॅसमेंट कशी?
वर वेगळा प्रतिसाद दिला आहेच.
परिचित व्यक्तीकडे अंदाजाने डेटिंगची मागणी करणे आणि अनोळखी व्यक्तीलाजाऊन थेट डेट मागणे यात फरक आहे हे ही मान्य आहे.
कायदे बनवताना मात्र हरासमेंट ही करण्यापेक्षा मानण्याचा भाग अधिक आहे तेव्हा ज्याने हरासमेंटचा आरोप केला आहे त्याची भावना महत्त्वाची. पहिल्या फटक्यात अश्या व्यक्तीवर थेट कारवाई होत नाही असे दिसते. अनेकदा तंबी देऊनच सोडले जाते. दुसरे असे की एकदा विचारताच तक्रार केली जाईल ही शक्यताही कमी आहे.
जर असते तर अस्मितांची
जर असते तर अस्मितांची वर्गवारी केलीय असेच दिसते.
माझ्यामते डेटिंगला येते का असे विचारल्यावर दुखावणारी भावना आणि धार्मिक भावना दुखावणे हे सारखेच आहे. हे दोन्हीही एक तर सारखेच गांभीर्याने बोलायचे विषय आहेत नैतर दोन्हीही हास्यास्पद आहेत. असे असताना अस्मितांची वर्गवारी करून या भावनेला अग्रक्रम देणे हे चूक आहे.
त्याच धर्तीवर - डायरेक्ट्ली
त्याच धर्तीवर - डायरेक्ट्ली "त्या" गोष्टीसाठी विचारण्याआधी थोडाफार अंदाज घ्यायला हवा ना! हॉटेलात लंचला जाऊ इतके ते सोपे नसते आणि नसावेच!
रोखठोक व्यवहारासाखं असावं असं कोण म्हणतंय? स्त्रियांना कळतंच कोण कसं विचारतं ते आणि पुरुषांनाही कळतंच आपण आवडतोय तिला की नाही.
या विचारण्यावरुन माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला.
पुण्यात एका कंपनीत काम करतानाची गोष्ट आहे. कंपनीत वेगवेगळ्या क्लायंट्सचे प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या फ्लोरवर चालायचे आणि एका क्लायंट प्रोजेक्टच्या लोकांना इतर फ्लोअर्सना अॅक्सेस नव्हता आणि हे मला माहित नव्हतं. एकदा मला दुसर्या क्लायंटप्रोजेक्टवरच्या लोकांना प्रेझेंटेशन द्यायला त्यांच्या फ्लोअरला जायची वेळ आली. मी त्या लोकांपैकी कोणाचाही नंबर न घेता डायरेक्ट त्या फ्लोअरवर गेलो. माझे कार्ड स्वाईप करुनही दार उघडेना तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
पण आता परत जागेवर जाऊन फोन करण्यापेक्षा आतल्या कोणालातरी विनंती करावी म्हणून मी काचेतून आत पाहिलं तर दाराकडे तोंड असलेल्या क्युबिकलमधे नेमकी मुलगी होती. मनात किंचित शंका आली पण तरी लगेच मी हात हालवून तिचे लक्ष वेधून घेतले आणि हसर्या चेहर्याने दाराच्या लॉककडे बोट दाखवून मला आत यायचंय अशा अर्थी खूण केली. तीसेक सेकंद तिने माझ्याकडे पाहिलं आणि चक्क मान फिरवून पूर्णपणे दुर्लक्ष करुन दुसरीकडे बघायला लागली. माझा संतापाने इतका तिळपापड झाला की अजूनही तो प्रसंग आणि ती मुलगी माझ्या चांगलीच लक्षात आहेत.
शेवटी मी दार दणादणा वाजवून पाठमोर्या बसलेल्या एकाचे लक्ष वेधून घेतले आणि त्याने दार उघडले.
मी एक स्मॉल टाऊनवाला असल्याने हे असे स्मॉलटाऊन मुलींचे समज आणि अपमान नवीन नाहीत. पण कंपनीत दार उघडायला सांगताना माझ्या डोक्यात तसले विचार असतील असे का वाटावे? साधं दार उघ्डायला सांगताना ही अशी अवस्था तर ओळख नसताना डेट आणि सेक्सच्या वार्ता करणे कोणालाही शक्य आहे असे वाटत नाही. बाकी त्यादिवसापासून ऑफिसमध्येही भारतीय बायांना स्त्रीदाक्षिण्य दाखवणे मी सोडून दिले आहे.
आपण एखादीसाठी दार उघडून धरावे आणि तिने लोचट मेला टाईप कटाक्ष टाकून जावे हे काही पटत नाही.
आपण एखादीसाठी दार उघडून धरावे
आपण एखादीसाठी दार उघडून धरावे आणि तिने लोचट मेला टाईप कटाक्ष टाकून जावे हे काही पटत नाही.
इतकेच कशाला, बसमध्ये स्त्रीदाक्षिण्याची अपेक्षा करणार्या स्वतः वृद्धदाक्षिण्य क्वचितच दाखवतात. त्याबद्दल काही बोलणे पाप आहे असे प्रबोधन मात्र कैकांचे झालेले असते त्याला इलाज नाही.
वृद्धदाक्षिण्यावरून
वृद्धदाक्षिण्यावरून आठवले, कोथरुडवरून शिवाजीनगरला जाणार्या बशीत एका पुणेरी आज्जींना दाक्षिण्य दाखवून भर गर्दीत उठून बसायला जागा दिली. आज्जी लगेच दशभुजा गणपतीजवळ उतरल्या. मात्र उतरताना त्यांनी 'त्यांची' जागा एका धडधाकट कॉलेजयुवतीला अगदी 'अगं इथं बस' वगैरे हाका मारुन, ती येईपर्यंत दोन्ही हातांनी रस्ता वगैरे अडवून दिली. मनपाचा थांबा येईपर्यंत ती युवती आम्ही कोणीतरी लोचट असून मुद्दाम तिच्या शीटजवळ खेटून उभे आहोत अशी उघड तिरस्काराने पाहत होती...
सांभाळा हो! असे काही लिहाल तर
सांभाळा हो! असे काही लिहाल तर स्त्रीद्वेषाचा शिक्का बसेल, वर विडंबनं होतील ती वेगळीच!
काये, अशा वागणुकीमागे ट्रॉमा हा असलाच्च्च पाहिजे-ब्लडी पर्व्हर्ट पुरुषांचा. पुरुषांनी मात्र औट ऑफ द वे गेलं पाहिजे आणि स्त्रियांनी ते त्यांचा हक्क असल्यागत घेतलं पाहिजे-का? तर बायॉलॉजी असते म्हणे अशी. नेमके यांना सोयीचे पडेल अशाच ठिकाणी बायॉलॉजी येते हा योगायोग बाकी रोचक आहे खरा. एकूण हा प्रकारच चिडून डावातून ढीस होणार्या पोरापोरींची आठवण करून देतो खरा.
पण त्या मुलीच्या मनात
पण त्या मुलीच्या मनात तुमच्याबद्दल तसेच विचार आले असतील कशावरुन? ती कामात असेल..तिला बॉसकडून बोलणी बसली असतील.. इतर काहीही कारण असु शकेल.. तिच्याजगी पुरुष असता तर तो तसाच वागण्याची किंवा तुमच्या जागी मुलगी असती तर ती आतली मुलगी तशीच वागण्याची शक्यता सारखीच आहे..
मुलीन्च्या आपल्याबद्दलच्या मताबद्दल तुमच्या विश्वासाचे कौतुक वाटते.. चोरच्या मनात चान्दणे का काय म्हणतात तसे..
किमान शेजार्याला दार उघडायला
किमान शेजार्याला दार उघडायला सांगण्याइतकी शक्ती उरली असेलच तिच्या जिभेत काही झाले असले तरी.
पण स्त्रियाच बिच्चार्या असतात आणि स्त्रियांचीच मनःस्थिती खराब होऊ शकत असल्यास आणि मनःस्थिती खराब आहे या कारणाखाली स्त्रियांना कसेही वागण्याची मुभा असल्यास माझे काही म्हणणे नाही. असो.
चष्मा नव्हता आणि आमची नजरानजर
चष्मा नव्हता आणि आमची नजरानजर झाल्याचे मला कळले. नाहीतर मी हातवारे कशाला केले असते? शिवाय समजा दाराची काच चमकल्याने तिला दारात कोणी आहे हे दिसले नसेल असे घटकाभर समजले तर तिने मान फिरवल्यानंतर मी दार वाजवल्यावर तिने आवाजाच्या दिशेने प्रतिक्षिप्त क्रियेने पाहायला हवे होते, पण मी दार वाजवताना तिने पुन्हा वळून पाहिले नाही.
हम्म. मग कदाचीत अस झाल असू
हम्म. मग कदाचीत अस झाल असू शकेल का? ती दारापाशी बसते म्हणुन तिला बर्याचदा दार उघडाव लागायच. आणि मे बी तिने त्याच दिवशी ठरवल असेल की आता कोणालाच दार उघडुन द्यायच नाही, दुसर्या प्रोजेक्टचा डिरेक्टर असला तरी... आणि नेमके तुम्ही तेव्हाच तिथे गेला असाल.
तुम्ही चुकच आहात अस म्हणायच नाहीय पण कधीकधी साध कारण दुर्लक्षीत होत म्हणुन फक्त पर्याय सुचवतेय तुम्हाला :-)
अजून एक
शक्यताच शोधायच्या असतील तर अजून एक शक्यता आहे.
असे काहीही झाले नाही.
ननिंना भास झाला.
किंवा ननि ष्टोरी रचून सांगताहेत.
हेसुद्धा शक्य आहे. त्यांनीच काय ते सांगावं बुवा.
माझं म्हणणं :-
नक्की काय घडलं ह्याच्या अनंत शक्यता असू शकतात.
ते फक्त उदाहरण आहे असं मानून, प्रत्यक्षात समोरच्याला काय statement द्यायचय, काय विधान करायचय ते पहावं.
तर सांगायचं म्हणजे
एकूणात ननिंना म्हणायचं आहे ते असं
"ती मुलगी जशी वागली तशा बर्याच मुली वागतात"
मला म्हणाल तर ते अगदि फार विचित्र वगैरे वाटत नाही.
चार दोन लेख, बातम्या , पिडितांच्या मुलाखती वगैरे पाहिल्या, स्त्रियांमधील एका मोठ्या टक्केवारीला होणारा त्रास पाहिला, तर त्यांचं कैकदा विचित्र वागणं का असू शकतं ह्याचा अंदाज बांधता येतो.
अत्यंत त्रास झालेली पिडिता नंतर पुरुषाबद्दल एकूणातच मनात राग धरत असेल ; व बाहेर काहीतरी वेगळेच वागत असेल (ह्यादरम्यान स्वतःस मिळणारे फायदे मात्र आवर्जून घेत असेल) तरी ती भूमिका समजू शकतो.
ते बरोबरच आहे, असं नाही.
पण ह्या बातम्यातून वगैरे ज्या scale वर हा छळ, त्रास चाललेला दिसतो; तो तसा असेल तर बाईनं पुरुसहवर विश्वास न ठेवणं, अगदि कुठल्याही पुरुशावर राग धरणं व इतर काही वैचित्र्यपूर्ण वागणं हे सगळं समजू शकतो.
अर्थात हे बरोबर आहे का, बरोबर नसेल तर का नाही ; वगैरे स्वतंत्र मोठा विषय आहे. पण बळी पडल्यावर, सातत्याने लहानसहान त्रास क्झाल्यावर कीम्वा एखादाच पण मोठा आघात झाल्यावर मानवी प्रतिक्रिया तशी असणे स्वाभाविक आहे असे वाटते.
त्रास कोणाला होतो आणि विचित्र
त्रास कोणाला होतो आणि विचित्र कोण वागतं याचा काही ताळमेळ आहे की नाही तेही एकदा तपासून पाहावे असे सुचवतो.
सुखवस्तु घरातल्या आणि संरक्षित, मुक्त वातावरणातल्या स्त्रियांना विचित्र वागण्याचे काहीही कारण नाही.
या वर्गातल्या बहुतांश स्त्रिया आधीच पुरुषांच्या बरोबरीला आलेल्या आहेत पण त्यांना बरोबरीने वागवलेले चालत नाही. पेपरमधल्या बलात्काराच्या बातम्या वाचून बरोबरीच्या पुरुषांचे नैसर्गिक वागणेही यांना 'घाण' वाटायला लागते. रस्त्यावरचा मवाली आणि ऑफिसमधला माणूस सारख्याच पातळीचे वाटायला लागतात.
मग काही पुरुषही अतिसंवेदनशीलता वगैरे दाखवून त्यांच्या गुडबुकात जायचा अतोनात प्रयत्न करताना दिसतात.
ज्या गरीब स्त्रियांना अत्याचाराला सामोरे जावे लागते त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूति आहे पण त्यांना त्रास होतो म्हणून उगाच अंगात आल्यासारखे करणार्या उच्चमध्यमवर्गीय बायांना मी सहानुभूति दाखवू शकत नाही.
रिस्क कोण घेणार?
तुमच्या सर्व प्रतिसादांसाठी एकत्रित उत्तर :
मनस्थिती ठीक नसेल तर कोणीही कसेही वागतो.. स्त्री/पुरुष असा भेद यात असतो? हे नवीनच!
"सुखवस्तु घरातल्या आणि संरक्षित, मुक्त वातावरणातल्या स्त्रियांना विचित्र वागण्याचे काहीही कारण नाही."
सुखवस्तु घर, संरक्षित व मुक्त वातावरण आणि विचित्र वागणे याचा काय संबध? पुन्हा हे विधान फक्त स्त्रियांसाठी?
अशा वातावरणात वाढलेल्या सर्व पुरुषांचे वागणे आपल्या मते कसे असते ? :)
"ज्या गरीब स्त्रियांना अत्याचाराला सामोरे जावे लागते त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूति आहे पण त्यांना त्रास होतो म्हणून उगाच अंगात आल्यासारखे करणार्या उच्चमध्यमवर्गीय बायांना मी सहानुभूति दाखवू शकत नाही."
इथे पुन्हा २ गृहीतके: उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांना पुरुषांकडून (कोणत्याही स्तरातल्या) काहीच त्रास होत नाही. आणि ती मुलगी उच्च्मध्यमवर्गीयच होती!
"रिस्क कोण घेणार?"
अगदी बरोबर आणि घेऊही नये.. असाच विचार त्य मुलीने केला असेल तर!
वयात आल्यापासून (किंवा नकळत्या वयातही) चोरटे स्पर्श, छेडाछेड, पाठलाग असे (हे फारच साधे आहेत) आणि अजून बरेच अनुभव सर्वस्तरांतल्या प्रत्येक मुलीला / स्त्रीला सर्व स्तरांतल्या पुरुषांकडून कायम येतात. (फक्त रेपच्या बातम्या वाचून मत बनवण्याची गरज भारतात तरी नाही! तो सुदिन येइल तेव्हा येइल!)
भारतीय मुलींच्या "दोन हात दूर" राहण्याच्या वृत्तीचे हे कारण आहे..
एका मुलीने दार उघडले नाही तर आपण सर्व 'उच्च्मध्यमवर्गीय' स्त्रियांबद्द्ल मत बनवता, तर कायम असे अनुभव आलेल्या मुलींनीही तसाच पवित्रा घेतला तर एव्हढे का बोचते?
एकदा कॉलेज मध्ये कॉफी घेऊन
एकदा कॉलेज मध्ये कॉफी घेऊन चाललो होतो . समोरून एक इराणी मुलगी आली माझ लक्ष नसल्याने मी तिला धडकलो आणि तिच्या शर्टवर कॉफी सांडली. ती इराणी मुलगी माझ्याकडे बघून हसली. तिचा ड्रेस खराब झाला आता काय करायचं हे न कळल्यामुळे मी तिला टिश्यू पेपर ऑफर केला तर तिची भारतीय मैत्रीण आली आणि माझ्याकडे एक खडूस नजर टाकून तिच्या हाताला धरून पुढे गेली.( जस काही कॉफी मी मुद्दामहून नेम धरून सांडली!!)
बर्याच वेळेस मुलांच्या काहीच मनात नसताना मुली उगाच बाऊ करतात.
सरळ विचारलं तर उर्मटपणा ठरतो किंवा manners नाहीत अस समजल जात.
स्त्रीदाक्षिण्य!
स्त्रीदाक्षिण्य दाखवणे बंद केलेत ते चांगलेच आहे. कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीला पुरुषाकडून केवळ ती स्त्री असल्याने वेगळी वागणूक मिळणे आवडणार नाही :-)
असे असतानाही प्रामाणिकपणे सांगायचे तर माझा नवरा माझ्यासाठी कधी दरवाजा उघडून धरत नाही म्हणून मला पूर्वी फार राग यायचा. एकदा त्याचा एक मित्र असे 'स्त्रीदाक्षिण्य' दाखवायला लागला तर मी त्याला फटकारले मग नीट विचार केल्यावर लक्षात आले की त्याने माझी दखल घ्यावी हे एक 'इतरांची कदर करणारी' व्यक्ती म्हणून मला हवेसे वाटते पण केवळ मी स्त्री आहे म्हणून असे वर्तन केले तर ते मला अतिशय अपमानकारक वाटेल. त्यादिवसापासून 'ही इज ऑफ द हूक', त्याऐवजी आता मीच त्याच्यासाठी दरवाजा उघडून धरते.
अगदी बरोबर. स्त्री म्हणून
अगदी बरोबर. स्त्री म्हणून दाक्षिण्य दाखवण्याची काहीएक गरज नाही हे अगदी बरोबर आहे. ऑफिसमध्ये दार उघडून धरणे ही नेहमीची सवयीची गोष्ट झाली आहे आणि बहुतेकवेळा कोण आहे ते न बघता ते केले जाते. जिच्यासाठी असे काही केलंय ती व्यक्ती सहसा हसून वा आभार मानून पुढे जाते.
पण काहींना मात्र तो ओळख वाढवण्यासाठी केलेला लोचटपणा वाटत असावा असा संशय आहे.
"मला तीच शरीर सोडून बाकी
"मला तीच शरीर सोडून बाकी काहीच खास आवडलं नव्हत. ना तिचे आणि माझे विचार जुळत होते , ना आमचे इंटरेस्ट सेम होते. मी एकदम स्वार्थी , धूर्त , कावेबाज हेतू ठेवून तिच्यासोबत जमेल तेवढ गोड गोड वागत होतो." .. हा वैध प्रयत्न झाला?
फक्त शरीरसंबध हवे असतील तर तसे स्पष्ट बोलावे.. मुलीला मान्य नसेल तर विचार सोडून द्यावा. पहिलीच मुलगी तयार होणार नाही कदाचित पण मिळ्णारच नाही असच काही नाही..जरा जास्त मुलींना विचाराव लगेल... आता एव्हढेही (वैध) प्रयत्न नको असतील तर कठिण आहे..
लग्न हि 'जास्त' किंमत वाट्णारर्यांना वेश्यागमन कमीपणाचे का वाटावे? केवळ शरीरसुखाकरिताच संबध ठेवायचे असतील तर ते वेश्येबरोबर ठेवले काय किंवा अजुन कोणाबरोबर ठेवले काय.. काय फरक पडतो?
अनेक बायका मिळणे.. त्याही आपल्याला पहिजे तेव्हा! ही लैंगिक सुखाची कल्पना भोळसट , बालिश आणि आत्मकेंद्रित आहे..
शरीरसंबंधांची गरज पुरुषाना आणि स्त्रियांना सारखीच असली तरी विवाह्पूर्व, विवाह्बाह्य संबंधाची किंमत स्त्रियांना जास्त का मोजावी लागते?
विवाह्पूर्व अनेकांशी संबंध असलेल्या मुलीचा किती पुरुष लग्नासाठी विचार करतील?
असो.. पुरुषांना वेश्यागमनाचा मार्ग तरी आहे , ही जमेची बजु नाही का?
आता समस्त स्त्री जातीचा कळवळा येऊन आपणास व्यवसायची सन्धी दिसू शकेल.. फक्त तिथे परिचित स्त्री आली तर मनाचा एव्हढाच मोकळेपणा ठेवा म्हणजे झाल..
मी एकदम स्वार्थी , धूर्त ,
मी एकदम स्वार्थी , धूर्त , कावेबाज हेतू ठेवून तिच्यासोबत जमेल तेवढ गोड गोड वागत होतो." .. हा वैध प्रयत्न झाला?
कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही तोवर वैध, वैध आणि वैधच.
लग्न हि 'जास्त' किंमत वाट्णारर्यांना वेश्यागमन कमीपणाचे का वाटावे? केवळ शरीरसुखाकरिताच संबध ठेवायचे असतील तर ते वेश्येबरोबर ठेवले काय किंवा अजुन कोणाबरोबर ठेवले काय.. काय फरक पडतो?
कुणाला काय अन कसे वाटावे हे डिक्टेट करण्याला काय बेसिस आहे?
अनेक बायका मिळणे.. त्याही आपल्याला पहिजे तेव्हा! ही लैंगिक सुखाची कल्पना भोळसट , बालिश आणि आत्मकेंद्रित आहे..
स्वतःच्या लैंगिक सुखाची कल्पना आत्मकेंद्रित असणार नैतर काय परकेंद्रित? जगाच्या कल्याणाचा विचार थोडीच चाललाय इथे?
अन कुठली व्याख्या बालिश अन भोळसट हे तुम्ही नक्की कशाच्या आधारे ठरवलेत?
विवाह्पूर्व अनेकांशी संबंध असलेल्या मुलीचा किती पुरुष लग्नासाठी विचार करतील?
पुन्हा तेच. विवाह्पूर्व अनेकांशी संबंध असलेल्या मुलाचा किती स्त्रिया लग्नासाठी विचार करतील?
पुरुषांना वेश्यागमनाचा मार्ग तरी आहे
गिगोलो नामक प्रकार आपणांस माहीत नसावा असे दिसते.
टक्केवारी
पुन्हा तेच. विवाह्पूर्व अनेकांशी संबंध असलेल्या मुलाचा किती स्त्रिया लग्नासाठी विचार करतील?
दहाजणांशी लग्नपूर्व संग केलेल्या मुलाला १००तल्या १० मुली होकार देतील. (९०मुली नकार)
दहाजणांशी लग्नपूर्व संग केलेल्या मुलीला १००तला १ मुलगा होकार देइल. (९९मुलं नकार)
.
.
१ ते १० ; म्हणजे मुली तब्बल दहापट, १०००% अधिक स्वीकार करु शकतात विवाहपूर्व संबंधाचा.
.
.
टक्के, आकडे कुठून आणले ते विचारु नका.
तुम्ही अरुण जोशी काकांना विचारता का कुठून टक्के काढले ते ?
( "आज फारतर १५टक्के लोक सुखी आहेत, पूर्वी ९५ टक्के सुखी होते." अशी विधानं पचवता ना, घ्या आता हेही.)
ब्यॅट्याच्या शेपटावर पाय दिला
ब्यॅट्याच्या शेपटावर पाय दिला वाटतं प्रतिसादकर्तीने!
आणि बाय द वे,
कुणाला काय अन कसे वाटावे हे डिक्टेट करण्याला काय बेसिस आहे?
मग बायकांना डेट किंवा सरळ लग्नाशिवाय सेक्स साठी विचारले तर त्यांना अपमान झाल्यासारखे वाटणे चुकीचे आहे असं म्हणणारे तुम्ही कोण ते?(टिकोजीराव असे वाचावे)
एका नैसर्गिक भावनेबद्दल
एका नैसर्गिक भावनेबद्दल लिहीलेला एक सुमार लेख.