ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न
आजकाल ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न अतिशय जटील बनला आहे . सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत. व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।
त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?
प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात किंवा ब्राह्मण समाजात प्रेम कुचेष्टेचा व हेटाळणी चा विषय ठरवला जातो , प्रेम म्हणजे थेरं असे समजले जाते …असे संस्कार होतात ।तेच या मुलांच्या मुळावर येत असावे का?
सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी
सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत. व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।
एकाच घरात वाढणार्या मुलगा आणि मुलगी यांपैकी मुलगेच नेमके संस्कारांच्या ओझ्याने का वाकले आणि मुली मात्र सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करु लागल्या (हे व्युत्क्रमाने संस्कारहीनतेचं लक्षण आहे असं गृहीत धरुन) असं का होत असेल?? तुम्हाला काय वाटतं??
धरा, नाहीतर सोडतो!
आजकाल ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न अतिशय जटील बनला आहे
आजकाल वर आक्षेप.
उपवर वर आक्षेप.
"मुलां"वर आक्षेप.
पण भावनेशी सहमत. घोडम्यांची कशाला मुंज घालतात लेकाचे कोणास ठावूक!
सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत
'सु(?)शिक्षित ब्राह्मण तरूणी' ही नवी जातपात निर्माण झाल्याचे माहित नव्हते, धन्यवाद.
पण भावनेशी सहमत. देशस्ताची पोरगी कोकणास्थाच्या घरात? कोकणास्थी कर्ह्याड्याच्या (अरे कोणीतरी ब्राह्मणाने येऊन हे शुद्धलेखन तपासा रे!) आणि कर्हाड्याची देशस्ताच्या? सारस्वत म्हणजे काय आता ब्राह्मण? अरे काय लावलेय काय? ही काय मोगलाई आहे??
व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।
संस्काराच्या ओझ्यावर आक्षेप.
मुद्दाम 'लग्नाला मुली मिळत नसल्याचे' लिहल्याबद्दल आक्षेप. (म्हणजे काय 'एरवी' मिळतात असे सुचवायचे आहे का काय?)
तरुणांची संख्या वाढत चालली आहे-ला आक्षेप. अहो गेल्या कित्येक दशकांत तीन टक्क्यांच्यावर वर नाय गेली आकडेवारी अजून!
पण भावनेशी सहमत. अहो ओझ्याने तरणी-ताठी (मुलांबद्दल बोलतोय!) वाकायला लागली म्हणूनतर मुंजीत केस कापायचे संस्कार केले जायचे. आजकाल टक्कल वाईट दिसते म्हणून संस्कारांची आहुती (तीच ती, ब्राह्मण यज्ञात घालतात ती!) दिली या लोकांनी!! शिवाय काही हलकट लोक, मुंजीतले ब्रह्मचर्याचे व्रत फारच गांभिर्याने घेतल्याने प्रोढ तरूणांची संख्या वाढते आहे असे आचरट आरोपही करताहेत या कडे लेखकाने लक्ष द्यायला हवे.
त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही .
ठरवले तर-वर आक्षेप.
अपेक्षित स्मार्टनेस वर आक्षेप.
ब्राह्मण मुलात-वर आक्षेप. (आत्ता तर पौढ होते, इतक्यच मुल कसे झाले?)
फक्त आंतरजातीय वर आक्षेप. (आंतरधर्मीयांचे काय झाले?)
पण भावनेशी सहमत. मुळात ब्राह्मण मुली मिळत नाहीत म्हणून असे ठरवले म्हणून ती मुले स्मार्ट नाही असा बाष्कळ वाद घालतात हो लोक. (आणि त्या ब्राह्मण मुलींनी योग्य ती कोण्त्याही धर्म-जातीची पोरं शोधून लग्नं केली हा त्यांचा गाढवपणा खुश्शाल नजरेआड करतात.)
प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात किंवा ब्राह्मण समाजात प्रेम कुचेष्टेचा व हेटाळणी चा विषय ठरवला जातो , प्रेम म्हणजे थेरं असे समजले जाते …असे संस्कार होतात ।तेच या मुलांच्या मुळावर येत असावे का?
झोकणे वर आक्षेप. (ही काय दरी आहे, लागले झोकायला?)
खरे प्रेम वर आक्षेप. (खोटे असेल तर ते काय प्रेम आहे?)
गुण लागतात वर आक्षेप. (प्रेम म्हणजे काय अरेंज म्यारेजातली कुंडली जुळवण्याचा प्रकार आहे का गुण शोधायला?)
उपजतच वर आक्षेप. (डीएनए-वर जाऊ नका, सांगून ठेवतो!)
ब्राह्मण समाजात-वर आक्षेप.
संस्कार होतात वर आक्षेप.
मुळावर-वर आक्षेप.
पण भावनेशी सहमत. हे असले संस्कार होणाकरता ब्राह्मणांचे मनुप्रेम कारणीभुत आहे असा हलकट आरोपही काही लोक करतात. शिवाय, अरेंज म्यारेजने (आणि काय दोन-चार तोळे सोन्याच्या देवाण-घेवाणीने) एकत्र आलेल्या आपल्या आई-बाप, काका-काकू वगैरे वगैरे लोकांचे प्रेम पाहून ह्या गोष्टीत काय मजा नाही (किंवा ही थेरं आहेत) असले विचार या मुलांच्या मुळात (हे मुळ वेगळे) निर्माण होतात असलीही काहीतरी बाष्कळ विधानं ही लोक करत असतात.
याविषयी काहीतरी केलं पाहिजे असं मला राहून राहून वाटतं!
.... प्रेमात झोकून देणे
.... प्रेमात झोकून देणे ...... यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात...तेच या मुलांच्या मुळावर येत असावे का?झोकणे वर आक्षेप. (ही काय दरी आहे, लागले झोकायला?)
दरी शब्दावर आक्षेप.
त्यांना जे जमत नाही त्याचमुळे हा सगळा प्राब्लेम आहे, हे धागालेखकानेच सांगितले आहे की.
बाकी भावनेशी सहमत.
थोरांचे बोलः
"आपल्या भाषेतली ऑलमोस्ट सगळी क्रियापदे अनवस्था प्रसंग आणू शकण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत." इति मेघनाताई.
पोरांचे बोलः
'' फक्त क्रियापदेच नाय काय...''
हा समस्या समस्या नाही.
मी गांभीर्याने विचारत आहे.
जात जपणे इतके आवश्यक आहे का? इतर जातीच्या कोणत्याही मुलींस आवडणार नाहीत अशी ब्राह्मण मुले आहेत असे जे आपण म्हणत आहात त्यात अर्थ नाही. कोणीही कोणासही आवडू शकते. उलट ब्राह्मण मुले सहज स्वीकारली जातील म्हणून त्यांना अॅडव्हांटेज आहे. (तेच मुलींना देखिल आहे. बामनाची पोर सुन झाली म्हणून कोण कौतुक असते लोकांना!) आंतरजातीय विवाह होणे देशाकरीता (किंवा हिंदू धर्माकरता)श्रेयस्कर नाही का? जातीत लग्न करून आपण आपला निवडसंच किती छोटा करतो!!
आणि आंतरजातीय मुली जितक्या विवाहतात तितकीच मुलेदेखिल, म्हणून जात जपायची देखिल झाली तरी कोणावर अन्याय होत नाही. आपल्या लेखात कितीतरी विरोधाभास आहेत. कदाचित आपण जिथे आहात त्या वर्तुळात अशी स्थिती असेल पण ही सार्वत्रिक स्थिती नाही.
डिपेंड्स...
सर्व ब्राम्हण उपवर मुलांनी सामुदायीक जात्यांतर अथवा धर्मांतर करावे
"जात्यंतर म्हणजे राष्ट्रांतर" हा सावरकरसदृश (किंवा बंगालीबाबूसदृश१) बाणा पाळायचा, की "जात्यंतर म्हणजे राष्ट्रांतर नव्हे" हा आंबेडकरसदृश बाणा पाळायचा, यावर सर्व अवलंबून आहे.
प्रश्नांकित उपवर मुले ही (बाय डेफिनिशन ऑफ द प्रॉब्लेम) ब्राह्मण असल्याकारणाने सावरकरमार्ग पत्करण्याची शक्यता अधिक वाटते. सबब, सोल्यूशन चालणार नाही.
=======================================================================================================
१ बंगालीत "जाति"/"जातीय" हे शब्द "राष्ट्र"/"राष्ट्रीय" या अर्थाने(सुद्धा) वापरले जातात. उदा. जातीय संसद भवन, हजरत शाहजलाल आंतरजातिक विमानबंदर वगैरे वगैरे. किंवा, 'जातीयतावाद' म्हणजे 'न्याशनालिझम', 'जातीयता' म्हणजे 'न्याशनालिटी', 'जातीय पार्टी' म्हणजे 'राष्ट्रीय पक्ष', अँड सो ऑन अँड सो फोर्थ.
ब्राह्मण मुलांमध्ये प्रेम
ब्राह्मण मुलांमध्ये प्रेम करण्याचे गुण कमी असतात आणि या असत्य विधानाबद्दल आधी निषेध!!!!!!!!
बाकीचं पोष्टमॉर्टेम लोकांनी केलेलंच आहे पण ब्राह्मण मुलांना कमी स्मार्ट अन कमी प्रेमवर्दी ठरवून आपलीच आपण मारून घेण्याचे याइतके उत्तम उदाहरण क्वचित सापडावे =))
स्मार्ट
तदुपरि, सुरावर्दीनेस = स्मार्टनेस हे समीकरण जातनिरपेक्ष आहे असे निरीक्षण नोंदवतो.
मुलींना* अपेक्षीत* स्मार्टनेस* म्हणजे काय हेच मुळात कोडं असल्याने त्यावर भाष्य करण्याचे धाडस पाहून तुमच्या स्मार्टनेसचे कौतुक वाटते.
सुरावर्दीनेस = स्मार्टनेस
सुरासर्द झाल्यावर समस्त मुलांना स्वतः स्मार्ट असल्याचा साक्षात्कार होऊ लागतो ते हेच ते समप्रमाण काय?
*शब्दांच्यामधले वाचा
धन्यवाद स्मार्टनेसची
धन्यवाद ;)
स्मार्टनेसची व्याख्या काहीपण असो, पण सुरावर्दीपणा हा त्याचा पैलू असल्याचे कैक लोक सांगतात अन सांगणारे सर्व जातींचे लोक असल्याने तसे म्हणालो.
बाकी सुरासर्द हा शब्द काळजाला भिडला१. तो स्मार्टनेस तर एक वेगळीच गोष्ट आहे ;)
१ फक्त लहानसा आक्षेप नोंदवता येईल की ते ब्रँडी की अजून काही पिऊन सर्दी पळते असे म्हंटात इ.इ. शेवटी सांगोवांगीच्याच कथा सर्व, तस्मात आमचे चुकले असणे अगदी शक्य आहे.
बाकी या व्याख्येअंतर्गत आम्ही स्मार्ट नसल्याचे आधीपासून माहिती आहेच =))
(अवांतर)
बाकी मेघना, असुर लोकही संस्कृतपंडित होते-उदा. रावण.
धाग्याचा विषय लक्षात घेता, हे वाक्य 'असुर लोकही ब्राह्मण होते - उदा. रावण' असेही लिहिता यावे, नाही काय? नाही म्हणजे, रावणाची जात 'लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मण' की कायशीशी होती, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.)
(बाकी, रावणास ब्राह्मण असूनसुद्धा असला प्रॉब्लेम कधी आला नाही तो? बोले तो, मंदोदरी होतीच, प्लस वाटले तर सीतेससुद्धा पळवलीनीत. त्या आल्फा मेल की काय म्हणतात तसल्या टेण्डन्सीज़ ब्राह्मण समाजातील असूनही रावणात कुठून आल्या असाव्यात बरे?)
(अतिअवांतर: फाटक्या जीन्समधील रावणाचे चित्र डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय.)
+१
लंकस्थ ब्राह्मणांचा उत्कर्ष उत्तरेकडील क्षत्रियांना बघवेना म्हणून त्यांनी कपटाने ब्राह्मणांचा काटा काढला. दक्षिणीयांवर जळायची ही उत्तरभारतीयांची खोड जुनीच आहे. क्षत्रिय लोकही ब्राह्मण व्हावे म्हणून आटापिटा करीत असत तेव्हा - उदा. विश्वामित्र, राजा हरित.महाभारतातील क्षत्रियांनाही ब्राह्मणांनी पुत्रलाभ करून दिला, वर आचार्य म्हणून चांगला माजही केला. परशुरामाने तर क्षत्रियसंहारच केला. पुढेही अनेक ब्रह्मक्षत्रियांनी बर्याच काड्या केलेल्या आहेत. काळापहाड नामक गृहस्थ हे कलाचंद रॉय नामक पूर्वाश्रमीचे ब्राह्मणच होते. अठराव्या शतकात तर या लूजर लोकांनी कोकणातून येऊन छत्रपतींचे राज्यच बळकावले. कसे काय झाले काय माहिती.
फाटक्या जीन्समध्ये रावण चांगला दिसू शकला असता. तशी जीन्स घालून काही हातांत पेप्सी व तत्सम-तद्भव शीतपेये, काहींमध्ये केयफशीच्या चिकन बकेटी, काहींमध्ये पिझ्झा तर काहींमध्ये मंदोदरी असे घेऊन निवांत "यो यो रावण सिंग" म्हणू शकला असता खास.
अहो, आपल्या भाषेतली ऑलमोस्ट
अहो, आपल्या भाषेतली ऑलमोस्ट सगळी क्रियापदे अनवस्था प्रसंग आणू शकण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत. माणसानं काळजी तरी कुठे कुठे घ्यायची म्हणते मी? त्याहून आपलं म्हणणं ऐकणारे/वाचणारे लोक सभ्य असतील, अशी आशा करणं सोईचं जातं. हां, कधीकधी ही आशा धुळीला मिळते म्हणा, पण चालायचंच! ;-)
घ्या! पुन्हा तेच. अनवस्था
घ्या! पुन्हा तेच. अनवस्था प्रसंग!!! अनवस्था प्रसंगाबद्दल काही म्हणणे नाही हो. पण घेणे ही त्याही पलिकडची अवस्था आहे. तेव्हा नवी बाजूंनी नवी बाजू मांडण्यापूर्वी जूनी बाजू समजून घ्यावी नि मग कोणते क्रियापद घ्यायचे ते घ्यावे. जाऊ द्या, सभ्यतेच्या मर्यादा आहेत म्हणून गप्प बसतो.
काय हो, हात डोक्यातून निघतात
काय हो, हात डोक्यातून निघतात का दहा दोनी वीस करायला? खांद्याकडे दहा उगवायची जागा असते का? मानेवर दहा डोकी उगवायची जागा असते का? (अरे हां, म्यूटेशन झाले असेल. स्वारी विसरलो कि त्या काळीही उत्क्रांती चालूच होती.)
आणि मंदोदरीला दोन हातानी कवेत घेऊन बाकीच्या हातांचे काय इग्लू बनवायचे का तिच्याभोवती?
हो तेही खरेच म्हणा!
म्हणजे, रावण उत्तर ध्रुवावर जरी गेला आणि तिथे उंटावर जरी बसला आणि तिथून शर्ट काढून त्याने शेळ्या जरी हाकल्या, तरी आपल्याला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काही कारण असू नये. खरे आहे.
बाकी, उत्तर ध्रुवावर उंट आणि शेळ्या यूपीएसने पाठवायच्या, की फेडेक्सने, आणि तिथे शर्ट काढून न्यूमोनियाने मरायचे, की फ्रॉस्टबाइटने, हीदेखील रावणाची खाजगीच बाब आहे.
बाकी, उत्तर ध्रुवावर उंट आणि
बाकी, उत्तर ध्रुवावर उंट आणि शेळ्या यूपीएसने पाठवायच्या, की फेडेक्सने, आणि तिथे शर्ट काढून न्यूमोनियाने मरायचे, की फ्रॉस्टबाइटने, हीदेखील रावणाची खाजगीच बाब आहे.
काय राव तुम्ही!!! पुष्पक विमान विसरलात वाट्टं? रामाने चोरण्याअगोदर ते रावणाने कुबेराकडून चोरले होते.
शिवाय थंडीसाठी काही मंत्रतंत्र तर असणारच त्याच्याकडे. रावणाला काय मोठी गोष्ट नै ती.
Old Monk
तेव्हा समस्त ब्राह्मण पुरुषांनो प्रथम सुरावर्दी व्हा.(डोळा मारत)
सल्ल्याशी सहमत आहे. बाकी असा प्रौढ अविवाहित Old Monk च्या बाटलीकडे "शिंच्यांना सगळी नावं सोडून हेच नाव द्यायचं सुचलं होतं!" अशा हतबुद्ध नजरेने पाहत बारमध्ये बसला आहे; असं एक चित्र डोळ्यासमोर तरळून गेलं. कारुण्यातून निर्माण होणारा विनोद म्हणतात, तो हाच असावा बहुतेक ;)
!
"आपलीच आपण मारून घेण्याचे याइतके उत्तम उदाहरण क्वचित सापडावे"
तसं नाहीये ते वेनभौ...
तुम्ही रडल्यासारखं करा आम्ही मारल्यासारखं करतो असा प्रकार आहे...
खाली आलेल्या "ग्रेट", संतुलीत (इत्यादी) प्रतीक्रियेवरून कळतंय..
शिवाय, तक्रारकर्त्यानेही तक्रारकरत्याचा गेटअप तारांबळ करीत करीत सांभाळलाय (एकाच धाग्यात "सु" पुढे प्रश्नचिन्ह आणि लगेच पोरांचा श्यामळूपणा काढलाय पहा)
असो
ऐसीच्या एन.एस.ए. ला पक्के सांगता येईलच... :)
पण, तूर्तास तूम्ही फॉक्सला विचारून पहा :)
प्रेमवर्दी
प्रेमवर्दीवरुन आमची आवडती एलेन आणि स्पंजवर्दी आठवले.

विश्वाचे स्मार्ट...
सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत.
कंसातले प्रश्नचिन्ह मला अंमळ हळवे करून गेले. डोळे पाणावले आणि दृष्टी अंधुकावली.
व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।
उत्तमच की. असेच आजचे हे विनापाश, संस्कारी तरूण उद्या राष्ट्रउभारणीच्या महन्मंगल, विशाल वटवृक्षाच्या शाखा बनतील!
[सायंकाळी एके मेळी, 'द्विज'गण अवघे वृक्षी!!]. राष्ट्राच्या कल्याणा, सं.ओ.वा.ब्रा.तरुणांच्या विभूती!!!
त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?
हम्म, समस्या आहे खरी. प्रदोष(!) शाखेत स्मार्त सूत्रांबरोबर आता स्मार्ट सूत्रेही शिकवायची घटका जवळ येऊन ठेपलेली दिसते :)
ब्रह्मकुलोत्तपन्न मुली
ब्रह्मकुलोत्तपन्न मुली आंतरजातीय विवाह करतात याचे कारण त्यांना इतर जातीतल्या मुलांचा रफनेस ,बेदरकारवृत्ती ,अल्फा मेल टेंडन्सी,आवडते.
ढापण लावून इंटीग्रेशन आणि डेरीवेटीव्हची गणित सोडवण्याने, पुचाट वॅगनार,पॅशन घेऊन मायलेज काढत बसण्याने ,न फाटलेली जीन्स घालण्याने, सतत हगवण लागल्यासारखा चेहरा करुन फिरल्याने पोरी पटत नसतात याची उपवर तरुणांनी नोंद घ्यावी...
जळजळ जळजळ ती किती असावी मागे
=))
जळजळ जळजळ ती किती असावी =))
मागे ऐसीवरच कुणीतरी म्हटले होते तसे, इंटररेशिअल कथांमध्ये गोरी स्त्री काळ्या पुरुषांतील उपरोल्लेखित गुणांवर इतकी आकृष्ट होते की त्यावर स्वतःला झोकून देते अशा प्रकारची वर्णने असतात. त्याचप्रमाणे ग्रेटथिंकर यांच्या फ्यांटसीतील कथांमध्येही अशीच वर्णने असावीत. स्वतःच्या दैन्यावस्थेवर मात करायचा हा फ्यांटसी मार्ग बाकी असतो रोचक-आणि तितकाच केविलवाणा.
खेडकरांचे पुस्तक
इतर जातीतल्या मुलांचा रफनेस ,बेदरकारवृत्ती ,अल्फा मेल टेंडन्सी,आवडते.>>> खेडेकरांच्या जगद्विख्यात अभ्यासपूर्ण ग्रंथाचा दाखला आहे का हा? नाहीतर एकाच जातीचे लोक कसे असतात किंवा नसतात याबद्दल इतके ठाम विधान म्हणजे प्रचंड समाजशास्त्रीय अभ्यास असला पाहिजे त्याकरिता :)
कारण ब्राह्मण मुली फिरताना डॅशिंग पोरांबरोबर फिरतात पण लग्न करताना बरोबर हजबंड-मटेरियल (रीडः ब्राह्मण) पकडतात असाही एक प्रचंड ठाम समाजशास्त्रीय अभ्यास ऐकलेला आहे. नक्की कोणता खरा?
एकूण माझ्या ओळखीत जे ब्राह्मण-ब्राह्मण, ब्राह्मण मुलगा-अब्राह्मण मुलगी वा उलटे असे प्रेमविवाह झाले आहेत त्या सर्वांनी फारच मोठ्या तडजोडी केलेल्या दिसतात.
जोक्स अपार्टः मुलांना "स्थळे" सहज मिळत नाहीत हे अॅनेक्डोटल पुराव्यावरून खरे असावे. पण त्याची कारणे इतकी अफाट नसावीत. कदाचित गेली २-३ वर्षे लग्नाच्या वयात असलेल्या मुलींच्या संख्या कमी झाली असेल (जन्मदरातील व्हेरिएशन). कदाचित ब्राह्मण समाजात आयटी, मल्टिनॅशनल, बीपीओ मधे नोकर्या करणार्यांचे प्रमाण जास्त असू शकेल व त्यामुळे या नोकर्यांत नसलेल्या मुलांना तुलनेने अवघड जात असेल. कदाचित सासर कसे असावे याबद्दल मुलींना असलेला चॉइस (घरात माणसे किती, स्वतःचे घर आहे का ई. हे प्रश्न विचारणे आजकाल खूप कॉमन आहे. मला त्यात काही चूक वाटत नाही), नावडते स्थळ नाकारण्याचा नकाराधिकार हे ही असू शकेल. हे सगळे केवळ अंदाज. यातील कोणतेही ठाम विधान नाही :)
जाउ द्या हो. ते घरकाम
जाउ द्या हो. ते घरकाम करणार्या पुरुषांवर विनोद नसतात का . उदा. ’माझी बायको मला फार घाबरते . तिने पाणी गरम करून दिल्याशिवाय मी भांडी घासतच नाही मुळी. ’ वगैरे. त्यासारखा हा अतिशयोक्ती असलेला विनोद आहे. तो समजण्याचा ’स्मार्टनेस ’ आपल्याकडे नाही एवढंच.
बाकी
जात जपणे इतके आवश्यक आहे का? इतर जातीच्या कोणत्याही मुलींस आवडणार नाहीत अशी ब्राह्मण मुले आहेत असे जे आपण म्हणत आहात त्यात अर्थ नाही. कोणीही कोणासही आवडू शकते. उलट ब्राह्मण मुले सहज स्वीकारली जातील म्हणून त्यांना अॅडव्हांटेज आहे. (तेच मुलींना देखिल आहे. बामनाची पोर सुन झाली म्हणून कोण कौतुक असते लोकांना!) आंतरजातीय विवाह होणे देशाकरीता (किंवा हिंदू धर्माकरता)श्रेयस्कर नाही का? जातीत लग्न करून आपण आपला निवडसंच किती छोटा करतो!!
हा प्रामाणिक प्रतिसाद आवडला.
फरक नाही
मी उपवधू मुलगे असे कुठेच वाचले नाही. लग्नाच्या वयाची मुले किंवा मुली हे दोघेही उपवरच असतात.
मोल्सवर्थमधील अर्थ
उपवर (p. 100) [ upavara ] a Of marriageable age or a little beyond it, and yet unmarried--a boy or girl, and esp. a girl.
http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%89%E0%A4…
कदाचित
Its a long shot guess पण कदाचित केवळ मुलींसाठीच हा उल्लेख असण्याचे कारण मासिकधर्माची सुरुवात व त्या अनुषंगाने (लग्नाच्या) वयात येणे (i.e.उपवर) वगैरे घटना मुलींच्या बाबत ठळकपणाने लक्षात येते. त्यामानाने मुलांच्या आयुष्यात वयात येण्याची घटना (i.e.उपवर) इतक्या ठळक मानली जात नसावी.
शिवाय दुसरी बाजू
शिवाय 'उपवर'मधील 'वर' हा 'नवऱ्या'शी संबंधित1 नसून 'वरणे' (लग्ना)शी संबंधित (उपवर = वरण्याची जबाबदारी स्वीकारण्यास योग्य तो/ती ) आहे हे लक्षात घेतले तर उपवधू हा शब्द निरर्थक2 आहे हे लक्षात यावे.
1. संबंध नवऱ्या/नवरीशीच असला आणि वर हा शब्द वरणे मधून आला असलातरी 'उपवर'ची उत्पत्ती दाखवण्यासाठी हा संबंध नाही असे तात्पुरते मानावे लागत आहे.
2. अधिक विचार केला असता उपवधू हा शब्द तितकासा निरर्थक वाटत नाही हे खरेच आहे.
हा खर्च तुमच्याकरतांच!
तुम्ही आता झालात की आता पुणेकर...
आणि प्रौढ ही आणि ब्राह्मणही*, तेव्हा हा धागा तुमच्याकरतांच! (इथे इच्छुकांनी, तुझे आहे तुजपाशी मधील 'अतिविशाल महिला मंडळाचे' "तुमच्याकरतांच" आठवावे!)
*सदर माहिती धाग्यातूनच. आम्ही (कोणाही करता) प्रौढ ब्राह्मण मुले 'पाहत' नाही आहोत.
आत्ता
आत्ता लक्षांत आलं. आमच्यावेळीही कॉलेजच्या दारात डोळ्यांवर गॉगल, केसांचा कोंबडा, कमरेला जाड पट्टा,अशा वेषात उभं राहिलं तरी सुशिक्षणकांक्षिणी मुलींना आमचा बावळटपणा आणि संस्कारांचे ओझे जाणवत असावे. म्हणूनच कोणी ढुंकूनही बघितलं नाही.
लग्न झालं हेच नशीब समजायचं!
भिकार्चोट
भिकरचोट मते आहेत तुमची ..
असली बुळी मते मांडताना आणि जनरलायझेशन करताना , बौद्ध - मांग काळी असतात ... मुस्लिम दाढीवाले आणि वास मारणारे असतात आणि मराठा अशिक्षित आणि माजोरडे , हिंस्त्र असतात .. असेही लिहायचे ना !
गोरी गोमटी पोरा दिसली की त्यांना स्मार्ट नही म्हणायचा
अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?
>> कारण आया बहीणी असतात आणि त्यंची किंमत ठेवणे कळते .. त्या ग्रेट थि़ंकर म्हणाला तशी रफ पोरा बाहेर पोरी फिरवतात आणि स्वतःच्या बहीणी कुठे फिरत असतात तिकडे लक्षच नसते !!
>>प्रेम , मैत्री करणे व निभावणे , प्रेमात झोकून देणे किंबहुना खरे प्रेम करणे यासाठी जे आवश्यक गुण लागतात , ते अशा मुलामध्ये उपजतच कमी असतात
असला वाय्झेड शोध कुठून लावलात ?
तुमच्या सर्कल मधली पोर असतील तशी ! पण सर्वान एकाच तागड्यात तोलू नका .. आणि तुमचा लग्न होत नसेल तर खुशाल आंतर जातीय , आंतर धर्मीय किंवा आंतर लैंगिक जे जमल तसा करा .. फुकट कोणत्याही जातीला बदनाम करु नका
मागे फेसबुकावर (असं काहीसं)
मागे फेसबुकावर (असं काहीसं) वाचलं होतं:
मैत्रिणी एकमेकींना आपला भाऊ दाखवतात आणि काही जुळवण्याचा प्रयत्न करतात. मित्राने आपल्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघू नये म्हणून मुलगे प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.
त्या पोस्टचा मतितार्थ मुली कसा संस्कृतिभंजक असतात आणि पोरं कशी सभ्य, असा होता. पण आपण आपापल्या कुवतीनुसार लावून टाकू.

(No subject)
=)) =)) =))