Skip to main content

ही बातमी समजली का? - ६

भाग | | | ४ |

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.

तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

बातमी : पुणे, बंगलोर, हैद्राबाद इत्यादि बॉम्बस्फोटांमागचा कथित मेंदू असणारा इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात दहशतवादी यासिन भटकळ गजाआड

मी Thu, 29/08/2013 - 15:32

सध्याच्या देशी/विदेशी राजकीय/पर-राजकीय बॅकड्रॉपवर यासिनचे सापडणे सुरक्षा यंत्रणेचे यश आहे का?

सहज Fri, 30/08/2013 - 06:04

In reply to by मी

ह्या नालायक सरकारला जाता जाता बिर्यानी बजेट, कैदी सुरक्षा व आरोग्यसेवा घोटाळा करायचा होता म्हणून हा खटाटोप.

अजो१२३ Fri, 30/08/2013 - 16:45

In reply to by मी

http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-04-21/pune/29458730_1_…

पहा, या भटकलचा पदस्पर्श आमच्या उदगीरलाही झाला होता. उदगीर महानगरपालिकेच्या परिसरात माध्यमिक शाळेच्या दिवसांत आमचे कितीतरी वास्तव्य असायचे. Ahmed Siddibappa alias Yasin Bhatkal असा बातमीत त्याचा उल्लेख आहे. हा माणूस किती आणि किती दिवस वावरला आहे तिथे !! मला तरी भोवळ यायचेच बाकी आहे!!!

ऋषिकेश Fri, 30/08/2013 - 17:05

In reply to by मी

केवळ याच नाही तर एकूणातच गृहखाते म्हणा किंवा अंतर्गत सुरक्षा म्हणा गेल्या वर्षभरात सुधारली आहे असे म्हणता यावे का?
सर्वप्रथम गेल्या वर्षभरातील अंतर्गत सुरक्षेशी संबंधित काही घटना बघुया
- कसाबला त्वरीत फाशी दिली गेली.
- 'अफजल गुरू'ला अखेरीस फाशी.
- सध्या गृहमंत्रालयाकडे व राष्टृपतींकडे एकाही दयेच्या अर्जावर निर्णय शिल्लक नाही.
- दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या आरोपींना काही तासात अटक, नवा कायदा मंजूर आणि न्यायप्रकीया अधिक वेगवान.
- पुणे व बेंगळूरू बॉम्बस्फोट प्रकरणाची जलदगतीने उकल.
- मुंबई बलात्कार प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांत अटक.
- कुख्यात अतिरेकी टुंडाला अटक.
- काल यासिन भटकळला जेरबंद केले.

साधारण वर्षभरापूर्वी सद्य सरकारची प्रतिमा लक्षात घेता आता भारतीय अंतर्गत सुरक्षा अधिक परिणामकारक ठरते आहे का? वर्षभरापूर्वी प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावर गेले आणि त्यांच्या जागी पी चिदंबरम यांना नेमले गेल्याने श्री सुशीलकुमार शिंदे यांना बढती मिळून ते गृहमंत्री झाले.

श्री शिंदे यांनी पदग्रहण केल्यानंतर काही निर्णय (विशेषतः फाशीच्या गुन्हेगारांच्या दया अर्जावरचे) त्वरीत लागताना दिसत आहेतासे वाटते. राष्ट्रीय स्तरावरही येणार्‍या विविध माहितीचे कोऑर्डिनेशन व ती विविध राज्यांतील पोलिसांपर्यंत पोचणे अधिक प्रभावी झाले आहे असे म्हणायला वाव आहे.

आता यात श्री शिंदे यांचा वाटा किती आणि श्री चिदंबरम यांनी केलेल्या बदलांचा त्यांना मिळणारा फायदा किती हे कळणे कठिण आहे.

बॅटमॅन Fri, 30/08/2013 - 17:09

In reply to by ऋषिकेश

आणि निवडणूक जवळ आल्याचा संबंधही यात असावा असा तर्क लावला तर....? जस्ट गेसिंग.

त्यात परत घुसखोरी बाय पाक आणि चीन हे मुद्दे राहिलेच.

नितिन थत्ते Fri, 30/08/2013 - 17:24

In reply to by बॅटमॅन

ही घुसखोरी वगैरे रूटीन चालणार्‍या गोष्टी असाव्यात. त्या मीडियाला लीक व्यायचे प्रमाण वाढलेले दिसते.

अशा प्रकारची घुसखोरी होणे (आणि सैनिक मारले जाणे) ही सरकार*पेक्षा लष्कराला लाजिरवाणी असायला हवी. पण सध्याच्या माहौलमध्ये त्याचे खापर थेट सरकारच्या डोक्यावर फुटत आहे. जणुकाही घुसखोरी होताच तेथील जवान थेट संरक्षणमंत्र्यांना/पंतप्रधानांना फोन करून काय करू असे विचारतात आणि मेलात तरी बेहत्तर पण गोळ्या चालवू नका असे उत्तर संरक्षणमंत्र्यांकडून/पंतप्रधानांकडून** मिळते.

*अल्टिमेटली सरकार सगळ्याच गोष्टींना जबाबदार आहे हे खरे पण जबाबदारीचा क्रम स्थानिक कमांडर-त्यांचे वरिष्ठ-लष्करप्रमुख मार्गे संरक्षणमंत्री-पंतप्रधान असा दिसत नाही. [याचे कारण कदाचित वरील क्रमवारीतल्या संरक्षणमंत्र्यांच्या आधीचे लोक होली काऊ आहेत].

**त्यांनी सोनिया गांधींना विचारल्यावर सोनिया गांधींनी दिलेल्या सल्ल्यानुसार असेही म्हणायला हरकत नाही.

बॅटमॅन Fri, 30/08/2013 - 17:40

In reply to by नितिन थत्ते

कदाचित तसेही असू शकेल. अन कमांड चेनबद्दल गैरसमज केल्या जातोच कैकदा.

पण दॅट नॉटविथस्टँडिंग, माझा मुख्य मुद्दा असा होता की वर शिंदेशाही परफॉर्मन्स हा निवडणूक निकट आल्यामुळे दाखवल्याचा संशय येतो. तशा संशयाला कितपत जागा आहे याबद्दल काही मीमांसा वाचायला आवडेल.

नितिन थत्ते Fri, 30/08/2013 - 18:10

In reply to by बॅटमॅन

>>शिंदेशाही परफॉर्मन्स हा निवडणूक निकट आल्यामुळे

निवडणुका २०१४च्या मे महिन्यात असतील असे धरले तर कसाबला फाशी नोव्हेंबर २०१२ म्हणजे दीड वर्ष आधी. अफजल गुरूला फाशी फेब्रु २००९ म्हणजे निवडणुकीपूर्वी सव्वा वर्ष. वगैरे.

कसाबची फाशी नोव्हेंबर २०१२ म्हणजे गुजरात निवडणुकीवर डोळा ठेवून असे म्हणता येईल. पण मग कुठल्या ना कुठल्या निवडणुका सतत चालूच असतात. म्हणजे कसाबला डिसेंबर २००८ मध्येच फाशी दिले असते तरी तुम्ही २००९ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असे म्हणालाच असतात बहुधा.

मी Fri, 30/08/2013 - 19:33

निवडणुका २०१४च्या मे महिन्यात असतील असे धरले तर कसाबला फाशी नोव्हेंबर २०१२ म्हणजे दीड वर्ष आधी. अफजल गुरूला फाशी फेब्रु २००९ म्हणजे निवडणुकीपूर्वी सव्वा वर्ष. वगैरे.

कसाबची फाशी नोव्हेंबर २०१२ म्हणजे गुजरात निवडणुकीवर डोळा ठेवून असे म्हणता येईल. पण मग कुठल्या ना कुठल्या निवडणुका सतत चालूच असतात. म्हणजे कसाबला डिसेंबर २००८ मध्येच फाशी दिले असते तरी तुम्ही २००९ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असे म्हणालाच असतात बहुधा.

म्हणजे निवडणूकीच्या आधी काही महिनेच हा निर्णय घेतल्यास तो 'स्ट्रॅटेजिक' समजला जावा असे आपले म्हणणे आहे काय?

कसाब-संदर्भात नमुन्यादाखल एक स्विंग बघा.

नितिन थत्ते Fri, 30/08/2013 - 20:05

In reply to by मी

कोणताही निर्णय कोणत्याही वेळी घेतला तरी तो कुठल्या ना कुठल्या निवडणुकीच्या वर्ष-दीड वर्ष आधी असणारच........ नाही का?

नितिन थत्ते Fri, 30/08/2013 - 22:35

In reply to by मी

स्ट्रॅटेजिक होता की नव्हता याचा काय संबंध?

कोणताही निर्णय कोणत्याही वेळी घेतला तरी कुठल्या ना कुठल्या निवडणुकीच्या काही काळ आधी असणारच आणि तशी टीका करता येईलच.

एखादी कृती केली नाही तर जनतेने निवडणुकीत जाब विचारला पाहिजे* असे आपण म्हणत असू तर तीच कृती केल्यावर निवडणुकीवर डोळा ठेवून कृती केली असे म्हणणे हा दुटप्पीपणा नाही का?

*निवडणुक हेच जाब विचारण्याचे साधन असेल तर निवडणुकीवर डोळा न ठेवता कृती कशी बरे करायची?

मी Fri, 30/08/2013 - 22:55

In reply to by नितिन थत्ते

निवडणुकीचा मुद्दा मी उपस्थित केला नाही, निर्णय स्ट्रटेजिक असण्यासाठी फक्त निवडणूक हाच मुद्दा असावा असेही काही नाही, तो स्ट्रॅटेजिक आहेच, पण तो तसा का आहे ह्याचेच उत्तर तुम्ही देत आहात असे दिसते, त्यामुळे तुमच्या प्रतिसादाविरुद्ध मला इथे काहीच म्हणायचे नाही.

चिंतातुर जंतू Mon, 02/09/2013 - 15:12

सरकारची धोरणं किंवा प्रकल्प ह्यांना विरोध करणाऱ्या NGOच्या विरोधात थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून सरकारनं उभ्या केलेल्या बागुलबुव्याबद्दल 'याहू'त आलेला हा लेख - The Government’s Favourite New Weapon Against Activists

ऋषिकेश Tue, 03/09/2013 - 11:56

मुंबई हायकोर्टाचा रोचक निकाल
तुम्ही १९८७ नंतर भारतात जन्मले असाल व तुमच्याकडे भारटीय पासपोर्ट असेल तरीही तुम्हाला भारतीय सिटिझन समजले जाईलच असे नाही! या नंतर परदेशी नागरीकत्त्व घेतलेल्या (भारतीय मूळाच्या) व्यक्तींच्या मुलांना भारतीय नागरीक होणे तितकेसे सोपे राहणार नाही असे समजावे का?

ऋषिकेश Tue, 03/09/2013 - 17:36

पुणेकरांना आता यंदाच्या पार्टिसिपेटरी बजेटमध्ये आपली मागणी नोंदवता येणार आहे. (बातमी)

प्रत्यक्ष वार्ड ऑफिसात जाऊन आपली मागणी देता येईलच. त्याच सोबत यंदापासून जालावर या पत्यावरून आपली मागणी नोंदवता येणार आहे.

बॅटमॅन Tue, 03/09/2013 - 17:40

In reply to by ऋषिकेश

हे बाकी अत्तिशय जबरी!

याचे थोडे तरी परिणाम होतील, अशी या निमित्ताने आशा व्यक्त करतो. जब्बरदस्त उपक्रम.

अजो१२३ Tue, 03/09/2013 - 17:50

गुगल ट्रान्सलेटरला नाव ठीवायचं काम नाही लेको. स्पॅनिशचा ओ कि ठो कळत नसताना स्पॅनिश कंपनीत स्पॅनिशमधे ७-८ महिने यशस्वीरित्या काम केल्याचा अनुभव आहे मला. :p

गवि Tue, 03/09/2013 - 17:59

बातम्यांवरुन मनात आलेले काही कदाचित अडाण** प्रश्नः

१. सीरियावर अमेरिकेने हल्ला केल्यामुळे जगभरातल्या इतर देशांना कायकाय ड्यामेज आहे? सीरियातल्या सत्ताधीशाने निष्पाप नागरिकांवर विषारी गॅसचा हल्ला करुन त्यांना ठार केलं म्हणून त्यांना हिटलर अथवा सद्दाम ठरवून अमेरिका हा हल्ला करत असल्याचं दिसतं. अशा वेळी या अमेरिकेच्या हल्ल्याने तरी सीरियातल्या सामान्य जनतेचं असं काय कल्याण होणार? आणखी मृत्यूच की.

२. भारतीय इकॉनॉमीमधे इम्पोर्ट कमी करण्याविषयी सर्वत्र बोलणं ऐकू येत असल्याने पुन्हा "स्वदेशी"चे दिवस आले असं समजावं का? केवळ स्वदेशीवर भागवता येणं शक्य आणि योग्य आहे का? ज्यांना विदेशी म्हटलं जातं त्या कंपन्या खरंच विदेशी असतात का? त्यांचे असेट्स आणि गुंतवणूक भारतातच असते ना? मधल्या आणि निम्न लेव्हलच्या कर्मचार्‍यामधे इथलेच लोक्स असतात ना?

नितिन थत्ते Tue, 03/09/2013 - 18:58

In reply to by गवि

--- ज्यांना विदेशी म्हटलं जातं त्या कंपन्या खरंच विदेशी असतात का?

व्यत्यास:- ज्यांना देशी म्हटलं जातं त्या कंपन्या देशीच माल विकतात का? माझ्या माहिती प्रमाणे बर्‍याच देशी कंपन्या चायनाचा माल आपला छाप मारून विकतात.

अजो१२३ Tue, 03/09/2013 - 21:42

In reply to by गवि

भारतीय इकॉनॉमीमधे इम्पोर्ट कमी करण्याविषयी सर्वत्र बोलणं ऐकू येत असल्याने पुन्हा "स्वदेशी"चे दिवस आले असं समजावं का? केवळ स्वदेशीवर भागवता येणं शक्य आणि योग्य आहे का? ज्यांना विदेशी म्हटलं जातं त्या कंपन्या खरंच विदेशी असतात का? त्यांचे असेट्स आणि गुंतवणूक भारतातच असते ना? मधल्या आणि निम्न लेव्हलच्या कर्मचार्‍यामधे इथलेच लोक्स असतात ना?

१. एकूण जागतिक आंतराष्ट्रीय व्यापारात (आयात किंवा* निर्यात) भारताचा हिस्सा १.५% ते २% आहे. म्हणजे एक तरी आहे कि भारताच्या आयात निर्यातीत फार बदल झाले तरी जगाला विशेष फरक नाही.
२. २००१ च्या आसपास भारताचा ट्रेड (आयात्+निर्यात्)/उत्पाद हा १५% ते १८% असा असायचा. आजमितीला हा आकडा ४०% ते ४५% असा आहे. म्हणजे जागतिक बाजारपेठेत काही झाले तर भारताला पूर्वी नगण्य फरक पडे. आता जबर्‍या झटका बसतो. देशाच्या सेवनाच्या २०% परदेशी माल म्हणजे आपण "शुद्ध स्वदेशी" च्या संकल्पनेपासून फार दूर आलो आहोत.
३. केवळ स्वदेशी भागवता येणे शक्य आहे. त्याकरिता खूप हुशार सरकार पाहिजे, लोक पाहिजेत. उदाहरणात कच्चे तेल उर्जेचा एक स्रोत आहे आणि शंभर प्रकारे त्याची आयात घटवली जाऊ शकते.
४. तत्व म्हणून स्वदेशी बनणे योग्य नाही. "कोणत्याही उत्पादनात सप्लाय चेनचे लाभार्थी कमी असतात आणि त्यामानाने उत्पादनाचे लाभार्थी कितीतरी पट असतात." मारून मुटकून प्रत्येक गोष्ट स्वदेशी असावी असा आग्रह धरला तर सामान्य ग्राहकांचे नुकसान होते.
५. विदेशी कंपन्याचे कितीतरी प्रकार आहेत. भारताला निर्यात करणारी, इथे फ्रंचायसी असणारी, इथे जेव्ही असणारी, इथे कारखाना असणारी, इ इ. यात सर्व कंपन्या विशुद्ध परदेशी असतात.
६.आंतराराष्ट्रीय उद्योगात कंपनी ज्या देशात रजिस्टर झाली तिथली मानली जाते. पण तो चष्मा काधून पाहिले तर असेट विकल्याने येणारा पैसा किंवा नियमित मिळणारा डिविडंड शेवटी जिथे जातो, तिथली ती कंपनी.
७. असेट भारतात असतात हा काही वाटतो तेवढा मोठा उपकार नाही. आपण ३० रु (०.५ डॉलर) घेऊन परदेशातून येता तेव्हा ७० रु कर्ज भारतीय बँकानी दिलेले असते.
८. आपण जेव्हा भारतात १०० डॉलर घेऊन येता तेव्हा त्यावर दरवर्षी 'स्वतःच्या देशात त्याच व्यवसायाचा उत्पन्न देण्याचा दर+ भारताचा धोका भत्ता' (Rate of return in investor's country for the same business + country risk premium for India)इतकी अपेक्षा धरूनच येता. आणि ज्या विदेशी कंपन्या प्रचंड प्रमाणात सदियोंसे भारतात आहेत त्याअर्थी त्यांना इतके उत्पन्न मिळत आहे.
९. गुंतवणूकीकडे पाहताना विदेशी कंपनीचा हेतू असतो -Value addition and then sale of asset or dividend. भारत सरकारचा हेतू असतो - maximum turnover of this company.
१०. कंपनीने मूळ ३० रु भारतात आणले. ७० कर्ज घेतले. ११० रुचा प्रतिवर्ष धंदा केला, ५ रु कर्मचार्‍यांना पगार दिला, २५ रु नफा कमावला आणि दरवर्शी २० रु मातृभूमीला पाठवले.
सहसा असे होते. पुढे तुम्ही ठरवा काय स्वदेशी ते.

* एका देशाची आयात दुसर्‍या देशाची निर्यात असते आणि आयात आणि निर्यात साधरणतः समान असतात म्हणून किंवा

ऋषिकेश Wed, 04/09/2013 - 10:43

In reply to by अजो१२३

प्रतिसाद आवडला.
फक्त पहिल्या मुद्द्याच्या सरसकटीकरणाबद्दल असहमती

एकूण जागतिक आंतराष्ट्रीय व्यापारात (आयात किंवा* निर्यात) भारताचा हिस्सा १.५% ते २% आहे. म्हणजे एक तरी आहे कि भारताच्या आयात निर्यातीत फार बदल झाले तरी जगाला विशेष फरक नाही.

कोणत्या वस्तुच्या आयात निर्यातीत बदल होतो त्यावर हे अवलंबून असावे. उद्या भारताने आयटी सेवांची निर्यात थांबवून "आयात" सुरू केली (हे होणे फार कठीण सोडा दूरही नाहि असे अस्मादिकांचे मत) किंवा गहू, कांदे व अन्य शेतीजन्य पदार्थांची निर्यात थांबवली किंवा विदेशी कार्स, कापडे, विमानसेवा यांना बंदी घातली तर जगातील काही भागांत बराच मोठा फरक पडेल.
(उगाच नै अमेरिकेच्या महागाईचे कारण भारताच्या वाढत्या मागणीत दडलेले आहे असे काहिंना वाटते ;) )

अर्थात म्हणून स्वदेशीचा मी पुरस्कर्ता आहे असे अजिबात नाही फक्त घाऊक वाक्ये नकोत इतकेच ;)

बाकी 'मोटा-मोटी' प्रतिसादाशी सहमती आहेच

फारएण्ड Wed, 04/09/2013 - 00:54

In reply to by गवि

सीरियावर "अमेरिकेने" हल्ला करण्याची वेळच यायला नको होती. दुसर्‍या महायुद्धानंतर रासायनिक अस्त्रे वापरण्याविरोधात जवळजवळ सर्वच देश आहेत. युनोही आहे. त्यामुळे युनोने ताबडतोब यात लीडरशीप घेऊन काहीतरी करायला हवे होते. ते महासंथ निघाले.
आता युनोचे परीक्षक सॅम्पल्स घेऊन आले आहेत. तीन आठवड्यांनंतर कळेल. त्यानंतर तरी रशिया व चीन काय भूमिका घेतात ते पाहू.

दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेच्या हल्ल्याचा उद्देश असाद च्या सत्तेला दणके देणे हा आहे. त्यामुळे विमानतळ, लष्करी केन्द्रे हेच मुख्य टार्गेट करणार होते/आहेत. त्यांची म्हणे मुख्य सहा विमानतळे आहेत. तेथून उड्डाणे होणार नाहीत असे केले तर निदान असाद स्वतःच्या लोकांवर बाँब हल्ले करू शकणार नाही, असे वाचले. किती अचूक/उपयुक्त आहे कल्पना नाही.

बॅटमॅन Wed, 04/09/2013 - 01:21

In reply to by गवि

आपले देश सोडून दुसरीकडे अङ्गुलिक्षेप करायचा अमेरिकन कण्डु सर्वप्रसिद्ध आहे.

"कामें घरिं नुरति तेव्हा तैलकण्डुशमनार्थ अन्य घरे जाळावी |
तेही नसतां मग स्वहस्तेंचि टेररें बहु पाळावी ||"

सन्जोप राव Wed, 04/09/2013 - 05:33

In reply to by बॅटमॅन

"कामें घरिं नुरति तेव्हा तैलकण्डुशमनार्थ अन्य घरे जाळावी |
तेही नसतां मग स्वहस्तेंचि टेररें बहु पाळावी ||"

मस्त! मूळ आर्या माहिती असल्याने (मोरोपंत, दादा कोंडके. शांता शेळके इ. इतिहास) अजून मजा आली...

नगरीनिरंजन Wed, 04/09/2013 - 08:43

In reply to by बॅटमॅन

भोपाळच्या दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या लोकांवर काहीही कारवाई न करणारे लोक आता केमिकल वेपन्स वापरले म्हणून दुसर्‍यांवर हल्ला करण्याचा नैतिक ठेका घ्यायला बघत आहेत.
अमेरिका हाच जागतिक शांततेला असणारा सगळ्यात मोठा धोका आहे हे सगळ्याना आतापर्यंत कळून चुकलेले आहे.
मुळात यामागे असणार्‍या मूळ कारणांबद्दल कोणालाच काहीच बोलायचे नाहीय. तेल निर्यातदार देश तेलाची निर्यात व उत्पन्न कमी होऊ लागल्याने एकामागे एक कोसळू लागले आहेत आणि तरीही अमेरिका आपल्या इंडस्ट्रियल मिलिटरी कॉम्प्लेक्सची आणखी वाढ करण्यात मग्न आहे. स्वतःची अवाजवी उपभोगशैली आणि सत्ता राखण्यासाठी हे कोणत्या थराला जाणार आहेत?

http://nsnbc.me/2013/09/01/usa-no-1-threat-to-world-peace-security-and-freedom/

सहज Wed, 04/09/2013 - 07:26

In reply to by गवि

आखाती देशात १९७०च्या दशकात आधी लेबनान , १५ वर्षे यादवी युद्ध, मग इराक गेली १० वर्षे, आत सिरीया प्रकरण जोरात सुरु आहे.

सिरीया प्रकरणी वॉशिंग्टन पोस्ट मधील एक रोचक लेख.

ऋषिकेश Wed, 04/09/2013 - 10:45

In reply to by गवि

सीरियावर अमेरिकेने हल्ला केल्यामुळे जगभरातल्या इतर देशांना कायकाय ड्यामेज आहे?

अर्थातच तेल!
आणि तेल जेव्हा पेटते जगावर विशेषतः विकसनशील देश व अविकसीत देशांवर मोठाच परिणाम होतो.

सीरियातल्या सत्ताधीशाने निष्पाप नागरिकांवर विषारी गॅसचा हल्ला करुन त्यांना ठार केलं म्हणून त्यांना हिटलर अथवा सद्दाम ठरवून अमेरिका हा हल्ला करत असल्याचं दिसतं. अशा वेळी या अमेरिकेच्या हल्ल्याने तरी सीरियातल्या सामान्य जनतेचं असं काय कल्याण होणार?

हल्ला करण्यापेक्षा जागतिक समुदायाने आर्थिक निर्बंध लादणे योग्य ठरावे. मात्र तसे होणार नाही कारण मग भारतासारखे देश पुन्हा इराणकडून तेल घेऊ लागतील जे अमेरिकेला अधिक नावडेल. ते रोखण्यासाठी सिरीयावर हल्ला करण्यासारखा मूर्ख निर्णय अमेरिका घेऊ शकेल असे वाटते.

मन Wed, 04/09/2013 - 13:57

In reply to by ऋषिकेश

अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा ह्यांना २००९ साली "शांततेचा नोबेल" मिळाला होता.
थोडेच दिवस आधी त्यावेळी अफगाणिस्तानातील मोहिम लवकर संपवण्यासाठी आम्हे लवकरच अधिकचे लष्कर पाठवून कारवाई उरकू/संपवू असे काहीतरी विधान माध्यमांत आले होते.
"युद्धाची घोषणा करत ओबामा ह्यांनी स्वीकारला शांततेचा नोबेल" अशी हेडलाइन त्यावेळी सकाळ मध्ये आली होती.
.
आता युद्ध सुरु होइल तेव्हा अजून एक हेडलाइन द्यावी:-
"ओबामा :- अजून एक शांततेचा नोबेल!"

मी Wed, 04/09/2013 - 14:27

In reply to by मन

ओबामाची/अमेरीकेची क्रेडेबिलीटी नसली तरी "हे युद्ध करुन मध्यपुर्वेत शांतताच प्रस्थापित करणार आहोत" हा दावा नोबेलच्या नॉमिनेशनसाठी पुरेसा असावा.

आडकित्ता Sun, 08/09/2013 - 19:42

In reply to by गवि

सगळ्याच प्रश्नांची उत्तरे येणार नाहीत.
पण हा एक भाग आमच्या आवाक्यातला आहे, म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. ->

केवळ स्वदेशीवर भागवता येणं शक्य आणि योग्य आहे का?

केवळ स्वदेशीवर भागवणे जरा कठीण वाटते. कधीतरी अगदीच नाईलाज म्हणूण ठीकाय. पण एकंदर बघता स्वदेशी मालातील भेसळ व मोठ्या प्रमाणावर लिव्हर डॅमेज होण्याची भिती लक्षात घेता, विदेशीचाच पर्याय स्वीकारणे हितावह वाटते.

सुनील Thu, 05/09/2013 - 09:18

अंधश्रद्धा निर्मूलन वटहुकुमांतर्गत झालेली पहिली कारवाई -

"दैवी औषधे" विक्री प्रकरणी नांदेड येथे सायल खान लियाकत खान आणि अमिरुद्दीन अब्दुल लतिफ यांना अटक करण्यात आली.

http://www.mumbaimirror.com/mumbai/crime/Tantriks-held-under-anti-super…

दाभोलकरांची आठवण येते. या गोष्टीसाठी अथक प्रयत्न केले. जीवाची किंमत मोजावी लागली. त्यांच्या आत्म्यास* शांती लाभो.
* ते गप्पा मारताना एक किस्सा आम्हाला सांगायचे. जेव्हा कुणी म्हणतो की मी तर अगदी गर्भगळीत होउन गेलो. त्यावेळी तू तर पुरुष आहेस मग तुला गर्भ कसा असेल? असे आपण म्हणतो का? आपण भावार्थ लक्षात घ्यावा.

याच्या आधी मिरजेतील एका मुलीला पळवून नेताना एका बिहारी मांत्रिकास अटक करण्यात आली होती याच कायद्याअन्वये. दुवा फेबुवर होता, नेटवर बहुतेक नसावा.

राजेश घासकडवी Thu, 05/09/2013 - 18:13

In reply to by बॅटमॅन

फुटकळ बनावट औषधं विकणारे उत्तरप्रदेशातले मुस्लिम, मुलीला पळवून नेणारा बिहारी... एकंदरीत महाराष्ट्रीय हिंदूंचा या कायद्याला पाठिंबा मिळवावा यासाठी सुरूवातीच्या केसेस अशा घेतलेल्या दिसतात. ही स्ट्रॅटेजी प्रभावी ठरेल यात शंका वाटत नाही.

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 23:48

In reply to by राजेश घासकडवी

फुटकळ बनावट औषधे विकणार्‍यांच्या बाबतीत, प्रस्थापित कायद्याच्या काही कलमांबरोबरच नव्या कायद्याखालीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे दिसते.

त्या घटनेच्या संदर्भात, प्रस्थापित कायद्याखाली जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, शिवाय, तो गुन्हा बेलेबल आहे, तर नव्या कायद्याखाली तो बेलेबल नाही, आणि सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे, असे दिसते.

आता, या अशा प्रकारच्या फसवणुकीकरिता सात वर्षांची शिक्षा अतिरेकी आहे, किंवा कसे, किंवा, गुन्हा नॉनबेलेबल ठेवण्यामागची कारणमीमांसा काय, वगैरे यातून उद्भवणारे मुद्दे तूर्तास बाजूस ठेवू. पण किमानपक्षी, या गुन्ह्याविरुद्ध उपस्थित कायद्यात असलेल्या तरतुदी पुरेश्या कडक नव्हत्या, म्हणून असा विशेष कायदा करावा लागला, असा दावा करण्यास जागा राहते. (गुन्ह्याकरिताच्या शिक्षेचे स्वरूप हे गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीस डिसइन्सेंटिव म्हणून असावे, की गुन्ह्यातून समाजाला झालेल्या नुकसानाची परतफेड म्हणून, की 'गुन्हेगार' म्हटले की त्याच्याविरुद्ध समाजाची जी एक अ‍ॅन्टाय-बेणारे-बाई-टैप सूडवृत्ती असते, की दिसला गुन्हेगार की नेमके काय घडले माहीत असो वा नसो, आपला काही संबंध असो वा नसो, घ्या हात धुवून, त्या सूडवृत्तीस कायदेशीर व्हेंट म्हणून, की अन्य काही, वगैरे गोष्टी तूर्तास विसरून जाऊ.)

पण निदान या ठराविक केसमध्ये नव्या कायद्याच्या आवश्यकतेच्या बाजूने काही प्लॉझिबल आर्ग्युमेंट तरी आहे. (ते रास्त आहे की नाही, हा पूर्णपणे वेगळा प्रश्न.)

पण मग दुसरा प्रश्न असा उभा राहतो, की मुलीला पळवून नेणार्‍यांच्या बाबतीत, प्रस्थापित कायद्यात किडनॅपिंगच्या बाबतीत काही तरतूद तर असावी. ती तरतूद पुरेशी कडक नसावी का, की जेणेकरून नव्या कायद्याची आवश्यकता पडावी? म्हणजे, भारतात लहान मुलास किडनॅप केल्यास प्रस्थापित कायद्याखाली गुन्हेगारास केवळ स्लॅप-ऑन-द-रिस्टनिशी सोडून दिले जाते, किंवा कसे? आणि, नव्या कायद्याच्या रेजाइमखाली, लहान मुलाचे झालेले किडनॅपिंग हे जर मंत्रतंत्राच्या कारणाकरिता नसेल, तर गुन्हेगारास तरीही (प्रस्थापित कायद्याच्या तरतुदींखाली) केवळ स्लॅप-ऑन-द-रिस्टनिशी सोडून दिले जाईल, किंवा कसे?

'न'वी बाजू Thu, 05/09/2013 - 23:32

In reply to by राजेश घासकडवी

ही स्ट्रॅटेजी प्रभावी ठरेल यात शंका वाटत नाही.

आणि म्हणूनच, या 'स्ट्रॅटेजी'स, नव्या कायद्याच्या मोस्ट आर्डण्ट सपोर्टरांकडून / प्रवर्तकांकडून विरोध होण्याची शक्यता शून्यवत्. (निषेध वगैरे राहोच.)

साधनशुचिता वगैरे गेली खड्ड्यात.

राजेश घासकडवी Fri, 06/09/2013 - 02:38

In reply to by 'न'वी बाजू

(निषेध वगैरे राहोच.)

पहिल्या एकदोन केसवरून अंदाज बांधलेला आहे. त्यामुळे तेवढ्या अंदाजाच्या जोरावर निषेध काय करायचा?

खरोखर अशी स्ट्रॅटेजी दिसून आली, जर काहीशे केसेसमध्ये प्रमाणाबाहेर मुस्लिम आणि परप्रांतीय दिसले तर जरूर सांगा, मी निषेध करेन. तो किती तीव्र असेल हे अर्थातच ते प्रमाण किती व्यस्त आहे यावरून ठरेल.

'न'वी बाजू Fri, 06/09/2013 - 11:38

In reply to by राजेश घासकडवी

पहिल्या एकदोन केसेसवरून अंदाज बांधता येतो म्हटल्यावर, तशी काही स्ट्रॅटेजी असल्यास (या caveatसह), ती स्ट्रॅटेजी वांच्छनीय की गर्हणीय, याविषयीही काही धारणा बनणे अशक्य नसावे. (ती धारणा व्यक्त करावी, की करू नये, ही वेगळी बाब. ज्याचेतिचे धोरण.)

(तसेही, अशी काही स्ट्रॅटेजी असल्यास (या अध्याहृत caveatसह), असा विरोध वा निषेध होण्याची शक्यता नाही, असा अंदाजच तर काय तो बांधलेला आहे.)

खरोखर अशी स्ट्रॅटेजी दिसून आली, जर काहीशे केसेसमध्ये प्रमाणाबाहेर मुस्लिम आणि परप्रांतीय दिसले तर जरूर सांगा, मी निषेध करेन. तो किती तीव्र असेल हे अर्थातच ते प्रमाण किती व्यस्त आहे यावरून ठरेल.

Thanks, but I shall not hold my breath on that one. आपण निषेध केलात काय नि नाही केलात काय, त्याने मला व्यक्तिशः काहीही फरक पडत नाही. So, it's simply not worth the wait.

(तसेही, निषेध करण्याकरिता सांगावे लागत असेल, तर अशा निषेधाचा उपयोग तो काय, नि गरज ती काय? म्हणजे, काही विवक्षित समाजांतील मर्तिकांत पैसे देऊन रडण्यासाठी बोलावतात - 'रुदाली' की कायसेसे म्हणतात त्याला, जितके रडणारे जास्त तितके स्टेटस अधिक - तसे थोडेच करायचे आहे इथे?)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/09/2013 - 19:04

In reply to by राजेश घासकडवी

आता भालेराव आडनावाच्या दोन व्यक्तींनाही अटक केल्याची बातमी आली आहे.

अवांतरः आमचे एक जालमित्र प्रत्यक्ष आयुष्यात याच आडनावाने वावरतात. त्यांचा इथे काही संबंध नसावा.

अजो१२३ Thu, 05/09/2013 - 13:12

In reply to by ऋषिकेश

पर्यावरणवाद्यांचे शरीराचे तापमान वाढते आहे का घटते आहे ते अगोदर निश्चित होऊ द्या. मग त्यांचे इतर बोलणे ऐकण्यात अर्थ आहे.

नगरीनिरंजन Thu, 05/09/2013 - 22:33

In reply to by अजो१२३

वा! काय मार्मिक बोललात!
हे शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे भोंदू लोक काहीपण थियरीज काढतात. काय तर म्हणे ग्लोबल डिमिंग!
प्रदूषित हवेतल्या कणांमुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन उष्णता कमी झिरपल्याने ग्रीन हाऊस परिणामाचा वेग मंदावलाय म्हणतात.
म्हणजे एका प्रदूषणाने दुसर्‍या प्रदूषणाचा परिणाम कमी होतोय म्हणे. त्यासाठी पॅन इव्हॅपोरेशन रेट आणि काय काय आकडेवारी फेकतात तोंडावर.
हे कसले शास्त्रज्ञ? हे तर निव्वळ निराशावादी लोक आहेत. शास्त्राने कधी आजवर असले गैरसोयीचे निष्कर्ष काढले होते का कधी?
या सगळ्या लोकांच्या स्वार्थी गदारोळात माणसाचा पर्यावरणावर काहीही परिणाम होत नाही या साध्या वस्तुस्थितीवर आपली अटळ "श्रद्धा" असली म्हणजे झाले. या लोकांची काहीही डाळ शिजणार नाही मग; चांगले तोंडावर पडतील एकेक!
(हलकेच घ्या बरे! आताशा आमची निराशा जाऊन हताशा आली आहे त्यामुळे जाम कंटाळा येतो असल्या गोष्टींचा.)

राजेश घासकडवी Thu, 05/09/2013 - 18:18

In reply to by ऋषिकेश

मला दुसरी बाजूच जास्त महत्त्वाची वाटली. एकंदरीत २०१५ मध्ये जो ठराव पास होईल त्यात नक्की खर्च कोणी करावा याची जबाबदारी प्रगत देशांकडून हटून अप्रगत देशांवर येणार ही शक्यता भीतीदायक आहे. जर मानवी तांत्रिक प्रगती ही तापमानवाढीसाठी कारणीभूत असेल तर जे देश तंत्रज्ञानात पुढे गेलेले आहेत त्यांनी या खर्चाचा बोजा मुख्यत्वे उचलला पाहिजे. मुळातच गेल्या पंधरा वर्षांत जी वाढीच्या दरात घट दिसली आहे त्याने या मानवी जबाबदारीतली हवा घालवली आहे.

नगरीनिरंजन Thu, 05/09/2013 - 22:15

In reply to by राजेश घासकडवी

मला एक गोष्ट कळत नाही की या प्रगत देशांची अर्थव्यवस्था कोसळू नये म्हणून गरीब देशांनी त्यांना अब्जावधीची मदत केली पाहिजे असे एकीकडे म्हटले जाते (पाहा: खादाडांसाठी कुपोषितांचे रक्तदान)
मग आधीच आजारी अर्थव्यवस्था असलेल्या या प्रगत देशांना खर्च करायला लावल्यास त्याचे परिणाम शेवटी अविकसित देशांनाच भोगावे लागणार नाहीत का? शेवटी प्रगत देशांवरच अविकसित देशांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे ना?

गवि Thu, 05/09/2013 - 14:56

आणखी एक अत्यंत रोचक निरीक्षणः

दै. "लोकसत्ता" मधे येणार्‍या छोट्या जाहिराती निरीक्षिल्या असता असं दिसतंय की अनेक जाहिरातींची भाषा आणि शब्दरचना "सेफ" केली जायला लागली आहे.

कालच्या अंकातल्या छो.जा. मधली काही उदाहरणं:

- ज्योतिषमार्गावर "श्रद्धा" असेल तरच या. (डबल अवतरण जाहिरातीतलेच. माझे नव्हे.)

अन्य एका जाहिरातीतः

- काम झाल्यावर स्वखुषीने दक्षिणा द्या.

इ. इ.

बॅटमॅन Fri, 06/09/2013 - 11:59

भारतीय लेखिका सुश्मिता ब्यानर्जी यांची अफगाणिस्तानात तालिबान्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-author-Sushmita-Banerje…?

झाल्या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे. "काबुलीवालार बाङाली बोउ" म्हंजेच "काबुलीवाल्याची बंगाली बायको" या पुस्तकाच्या लेखिका म्हणून त्या सुपरिचित आहेत. (हे पुस्तक आता वाचणे आले.) त्या अलीकडेच अफगाणिस्तानात शिफ्ट झाल्या होत्या. त्यांचे सासर अफगाण आहे.

जेवढे वाचले त्यावरून त्या पुस्तकाबद्दल उत्सुकता प्रचंड वाढली आहे. तालिबान्यांनी एकूणच स्त्रियांवर हल्ले करणे वाढवलेले आहे अलीकडे. :(

अजो१२३ Fri, 06/09/2013 - 12:27

In reply to by बॅटमॅन

तालिबान तसे डोकेफिरुच आहेत. ज्यांना बुद्ध द्वेष आहे, त्यांना इतर धर्मातलं काहीही आवडणं अशक्य. म्हणून त्यांचं वागणं मनावर घेऊ नये.

पाकिस्तानात ब्लास्फेमी लॉ आहे. जालावर या कायद्याने आजपावेतो काय धुमाकूळ घातला आहे, हा कायदा वरचेवर कसा कडक केला गेला आहे, आणि ज्या पुरोगामी लोकांनी (पंजाबचे राज्यपाल धरून्)याला विरोध केला त्यांना कसे चेचण्यात आले याची कितीतरी माहिती मिळेल.

आता पाणी डोक्यावरून गेले आहे. मुळात हिंदू आणि ख्रिश्चनांविरुद्धच वापरला गेलेला हा कायदा आता चक्क मुसलमानांविरोधात वापरण्यात येत आहे. एका स्त्रीने स्वतःला पैगंबर म्हणवल्याने 'पाकिस्तानी कायद्यानुसार' तिला फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
http://www.dailypioneer.com/todays-newspaper/pak-woman-calls-herself-pr…

भारताच्याच टाईम्सने बातमी कशी पांचट केली आहे ते पहा.
http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-09-03/pakistan/4172505…

त्यामानाने पाकिस्तानच्या डॉनने बातमीच्या सुरुवातीला दिलेले चित्र या वृत्तपत्राची पुरोगामीत्वाला असलेली खरी बांधिलकी दाखवते.
http://dawn.com/news/1040172/woman-held-for-committing-blasphemy

बॅटमॅन Fri, 06/09/2013 - 12:37

In reply to by अजो१२३

त्यातही काही नवीन नाहीच म्हणा. ब्यानर्जींसारख्यांचा बळी गेला की अधिक दु:ख होते इतकेच.

बाकी डेली पायोनियर अन टाईम्स ऑफ इंडिया यांच्या मजकुरात काही विशेष फरक जाणवला नाही. हा ब्लास्फेमी लॉ टिपिकल मध्ययुगीन आहे.

अवांतरः इराणात काही ठिकाणी महंमदाचे चित्र असलेले लॉकेट्स विकली जातात असेही वाचले आहे. इराणी क्लेरिक वर्गातील एक मोठे नाव म्हंजे "अली सिस्तानी". त्याच्या मते आदराने केल्यास महंमदाचे चित्रणही बिगर-इस्लामी नाही.

चिंतातुर जंतू Fri, 06/09/2013 - 12:44

In reply to by बॅटमॅन

>> इराणात काही ठिकाणी महंमदाचे चित्र असलेले लॉकेट्स विकली जातात असेही वाचले आहे. इराणी क्लेरिक वर्गातील एक मोठे नाव म्हंजे "अली सिस्तानी". त्याच्या मते आदराने केल्यास महंमदाचे चित्रणही बिगर-इस्लामी नाही.

पर्शियन लघुचित्रांत प्रेषिताचं मूर्त चित्रण करण्याची परंपरा होती. अशी चित्रं मी पाहिलेली आहेत.

बॅटमॅन Fri, 06/09/2013 - 12:50

In reply to by चिंतातुर जंतू

येस! महंमदाच्या विकीपानात तशी २-३ चित्रे सापडतील. मुघल काळात काढलेले महंमद आपल्या शिष्यांसोबत बसलेला आहे असे एक चित्र मीही एका रिसर्च पेपरात पाहिलेय.

अवांतरः विल ड्यूरँट या इतिहासकाराच्या "स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन" या अप्रतिम मालेच्या (बहुधा तिसरा खंड) "एज ऑफ फेथ" या खंडाच्या मुखपृष्ठावर महंमदाचे कल्पनाचित्र आहे. त्यावरून काश्मीरमध्ये श्रीनगर युनिव्हर्सिटीत कधीकाळी दंगा झाला होता (साधारण १९४० च्या आसपास कधीतरी) असे एका ज्येष्ठ लेखकांकडून ऐकलेले आहे.

अजो१२३ Fri, 06/09/2013 - 12:54

In reply to by बॅटमॅन

बाकी डेली पायोनियर अन टाईम्स ऑफ इंडिया यांच्या मजकुरात काही विशेष फरक जाणवला नाही.

टाइम्स, एका आंतरराष्ट्रीय वाचकाच्या नजरेने, पुन्हा वाचाल तर जाणवेल कि फार फाल्तू बातमी आहे. संध्याकाळी लोक शांत झाले कि पोलिस तिला सोडून देतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/09/2013 - 03:30

कर्नाटकात पाठ्यपुस्तकांमधे वस्तुस्थिती, इतिहासाचा विपर्यास केल्याचं पत्रं काही अभ्यासक, राजकारणी आणि नामवंत लोकांनी लिहीलेलं आहे. 'द हिंदू'मधली बातमी.

Academics, eminent citizens dismayed over biases in textbooks

आबा Tue, 10/09/2013 - 03:46

ही बातमी वाचली.
विदाऊट तिकिट सापडलेला माणूस जास्तीत जास्त मोठी काय थाप मारेल ?
आमदार आहे, ऑफिसर आहे वगैरे...
या पठ्यानं चक्क, त्याला "भारताच्या मालकांनी" फुकट रेल्वेचा पास दिलाय असं सांगितलं, पुढं असंही म्हणाला की त्या मालकांनी (ज्यांचं नाव बल्लूभाई असं आहे :) ) नेहरूंना भारत देश ९९ वर्षाच्या भाडेकरारावर दिलेला आहे.
असे पासेस बाळगणार्‍या पंधरा-वीस लोकांना तो न्यायालयात साक्षीला पण घेउन आला होता. :)

इकडे साठ पासष्ठ वर्ष कल्याणकारी राज्यपद्धतीच्या गप्पाचं झाल्या फक्त, रयतेला प्रवास पण फुकट करू द्यायचं समाजवादाच्या अध्वर्यूंना पण बापजन्मी सुचलं नसतं च्यायला... :)

फारएण्ड Tue, 10/09/2013 - 04:57

In reply to by आबा

जबरी :). यांना राजमुद्रा कोणी दिली हा सस्पेन्सही क्लियर व्हायला हवा. तसेच त्या १०-१५ लोकांचीही गंमत वाटते. कोणीतरी फुकट प्रवास केला आहे, त्या बद्दलच्या केस मधे उपस्थित राहणेच नव्हे, तर कोर्टासमोर अचाट साक्ष देणे या गोष्टीचे काय मोटिव्हेशन असेल कोणास ठाउक :)

तो पासही नकली आहे हे इतक्या लौकर ठरवले हे ही एक आश्चर्यच. यस मिनिस्टर व काही प्रमाणार वेस्ट विंग वगैरे पाहिले की असे प्रश्न निकालात काढायला सुमारे १-२ महिने व सरकारची ५-१० डिपार्टमेंट्स कामाला लागावी लागतात असेच दिसते :)

तिसरे म्हणजे देश जर ९९ वर्षे चालवायला द्यायचा आहे तर काही ट्रस्ट वगैरे करून संस्थेतर्फे तो द्यायला नको का? ते फोटोमधले वीर किमान १८ वर्षांचे होते नेहरूंकडून सह्या घेताना, तर त्यानंतर ९९ वर्षांनी आपण असणार आहोत याची त्यांना खात्री होती का? अर्थात आपण देशाचे मालक असून नेहरूंना देश चालवायला दिला आहे असा कॉन्फिडन्स असलेल्यांना ते विचारणेही चूकच आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/09/2013 - 05:06

In reply to by फारएण्ड

या बातमीखालच्या काही प्रतिक्रियाही थोर आहेतः

sandy - सोमवार, 9 सप्टेंबर 2013 - 11:05 PM IST
तिकीट तपासनीस होण्याची मराठी माणसाची लायकी नाही का? उत्तर प्रदेश किंवा अन्य प्रदेशात मराठी तिकीट तपासनीस आहे का? नालायक कोन्ग्रेसी आणि राष्ट्रवादी राज्यकर्त्यांना याचे काय? आणि त्यांच्या मराठी मतदारांना तरी याचे काय?

Raju bhargude - सोमवार, 9 सप्टेंबर 2013 - 09:43 PM IST
जवाहरलाल नेहरूनि सह्या ठोकून तत्कालीन इंग्रज सरकार शी केलेल्या transfer of power agreement १९४७ नुसार भारत देश ९९ वर्षाच्या करारावर दिलेला आहे का तपासून पाहून नागरीकासमोर सत्य मांडावे.

'फारएण्ड-स्पेशल' पिच्चरांमधेही असले ड्वायलाक नसतील!

ॲमी Tue, 10/09/2013 - 13:02

या बातमीमुळे मी कंफ्युज झालेय :-(
www.timesofindia.com/india/Adultery-is-not-cruelty-Supreme-Court-says/a…
विवाहबाह्य संबंध हा गुन्हा होउ शकत नाही: मान्य
मानसिक छळ कशाला म्हणावे आणि तुम्ही त्या छळाला कसे सामोरे जाल हे व्यक्तीनुसार बदलते: मान्य
पण तरीही काहीतरी चुकतय असं वाटतय.

नितिन थत्ते Tue, 10/09/2013 - 14:00

In reply to by ॲमी

सकाळीच वाचली बातमी. निकालपत्र विशिष्ट केससाठी आहे.

खालची बातमी वाचल्यावर बातमीचे शीर्षक अयोग्य आहे असे वाटले.

असे दिसते की ४९८अ लागू होण्यासाठी "inducing, abetting suicide" गरजेचे आहे असे कोर्टाचे मत दिसते (शिवाय हुंड्यासंबंधी छळ हवा असे कोर्टाला वाटते असेही वाटले). [बाह्य संबंध असणे यासाठी इतर रेमेडीज आहेत; त्याला करणे म्हणता येणार नाही असा निकालाचा सूर आहे].

ॲमी Tue, 10/09/2013 - 15:17

In reply to by नितिन थत्ते

शिर्षक अयोग्यच आहे आणि बातमीवरुन कोर्टाचा निर्णयदेखील योग्य वाटतोय.
पण मला ही बातमी वाचुन जिया खान आठवली. त्या केसमधे प्रॉफेशनल फेल्युअर, पझेसिवनेस स्वभाव, अर्ली सक्सेस वगैरे कारणं देउन तिला मानसिक दुर्बळ ठरवलं. आता या केसमधे एक अबॉर्शन, एका बाळाचा मृत्यु, नवरा सोडुन जाइल अशी भीती वगैरे कारण दिलीयत.
म्हणजे मग मानसिक छळ हा प्रकार कधीच गुन्हा होउ शकणार नाही का?
मेलेल्याला मानसिक रोग होता हे कारण देउन निर्दोष मुक्ती फार सोपी होइल का?
शारीरिक छळ किँवा फायनान्शिअल निग्लेक्ट जर दिसून येत नसेल तर नवराबायकोच्या नात्यात ऑल इज वेल समजायच का?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/09/2013 - 18:51

In reply to by चिंतातुर जंतू

गेल्या अनेक हजार वर्षांत, स्त्रियांनी कमी युद्धखोर, वसाहतवादी इ.इ. पुरुषांची निवड केली; आणि असं करताना जग जास्त जगण्यालायक बनवलं आहे असं म्हणायचं का?

मन Tue, 10/09/2013 - 20:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बातमीचा दुवा इथून उघडत नाहिये.पण अधिक युद्धखोर जमातींचा/पुरुषांचा y क्रोमोझोम अधिक पसरला असे मागच्या दीड दोन हजार वर्षापुरते तरी म्हणतात बुवा.

बॅटमॅन Tue, 10/09/2013 - 23:02

In reply to by मन

खरेच आहे. स्त्रियांना युद्धखोर पुरुषच आवडतात त्याला पुरुष तरी काय करणार :P

बाकी, कुठलेही निष्कर्ष काढण्याअगोदर

But before we can draw concrete conclusions in humans, a number of caveats need to be considered. “First,” Rilling said, “we are assuming that testicle size is driving parenting behaviour. It may instead be that testicles become smaller as a father pays more attention to the child.”

“Second,” Rilling continued, “testicle size may be related to genetic factors or environmental factors that we are not aware of. For example, may be boys whose fathers are absent may grow to have bigger testicles. We don’t know.”

There are other caveats. The study involved volunteers who were all married and currently in a relationship. Those who volunteered for the study may in general be more enthusiastic fathers. Peter Gray, an anthropologist at the University of Nevada, Las Vegas, also pointed out that “This is a culturally limited sample – about 70 fathers from the Atlanta area. Paternal behaviour can be quite variable around the globe

हे यथार्थ आहे. इतके असताना टायटल सनसनाटी देणे हेही नेहमीचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/09/2013 - 22:36

In reply to by अनामिक

अशा अभ्यासांसाठी अभ्यासकांना पैसे का द्यायचे हा (वरचा) प्रश्न (लोडेड असला तरीही) अनुत्तरित नाही.

अशा प्रकारचा अभ्यास मानवी वर्तनाच्या अभ्यासाचा भाग आहे. ठराविक वयाच्या पुरुषांना ठराविक वयाच्या स्त्रियाच का आवडतात, ठराविक स्त्रियाच सुंदर का वाटतात (किंवा नर चिंपांझींना ठराविक ठिकाणी लाल रंग दर्शवणार्‍या मादी चिंपाझीच आकर्षक का वाटतात), लहान मुलं क्यूट वाटण्यामागचा कार्यकारणभाव काय, पुरुषांमधे कोणत्या प्रकारचे गुण स्त्रिया शोधतात अशा प्रकारचा अभ्यास करून आपण स्वतःच्या जमातीविषयी अधिक शिकतो.

या विशिष्ट बातमीमधे या संशोधकाच्या ३०-४० वर्षांच्या संशोधक-आयुष्यापैकी चारेक वर्षांचं संशोधन असेल. (हा माझा अंदाज.) एकूण evolutionary psychology या विषयाचा नगण्य भाग. आणि तेवढ्याश्या शितावरून या रोचक विषयाच्या भाताची परीक्षा होणं अवघड आहे. या विषयासंदर्भातच गेल्या आठवड्यात मी एक लेक्चर ऐकलं, एक तास वेळ असेल तर हे जरूर पहा.

अजो१२३ Wed, 11/09/2013 - 15:18

In reply to by अजो१२३

माझा हा प्रतिसाद थोडा जास्तच संदिग्ध झाला आहे. म्हणून लोकांना तो मोदीवादी, इ वाटू शकतो. तर सांगू इच्छितो की असं काही नाही.

भारत सरकार ते प्रत्येक राज्य सरकार प्रत्येक विद्युतनिर्मात्याकडून कोणकोणत्या दरांनी वीज विकत घेत आहे याची एक लंबीचौडी लिस्ट बनवू या. (विक्रेता - ग्राहक - दर - मात्रा असा टेबल, उदा लँको - आंध्र सरकार - क्ष रु - य मेगावॅट ). अशा टेबलात उत्पादकांची संख्या * ग्राहकांची संख्या मिळून किमान ५००० महत्त्वाच्या यंट्र्या पडतील.

यातले कोणतेही दोन य्ंट्र्या निवडा आणि महागात वीज घेणार्‍याचे किती नुकसान झाले ते लिहा. उदा. http://articles.economictimes.indiatimes.com/2013-04-23/news/38763365_1… मधे आंध्र सरकार ६.५० रु ने वीज विकत घेणार आहे. मग कुणी मोदीवादी उठून ३ रु ला वीज घेऊन तुलनेने मोदीने गुजरातचा फायदा कसा करून दिला आहे ते सांगणार. गुलेल ची पूर्णतः उलटी करून मांडणार! मजा आहे.

चिंतातुर जंतू Thu, 12/09/2013 - 11:19

In reply to by अजो१२३

अदानींवर मोदींची विशेष मर्जी असल्याचे आरोप अनेकदा झालेले आहेत. खुद्द CAGनं केलेला आरोप किंवा हे पाहा.
अरविंद केजरीवालांनी केलेले आरोप
आणि अदानीसुद्धा मोदींचे पित्ते असल्यासारखं वागताना दिसतात.

अजो१२३ Thu, 12/09/2013 - 12:22

In reply to by चिंतातुर जंतू

मला जर इंग्रजी नीट येत असेल तर आपण दिलेल्या बातम्यांत 'अदानीकडून गुजरात सरकारने ८० कोटी पेनाल्टी वसुलली' याशिवाय दुसरा आकडा दिसला नाही.

अजो१२३ Thu, 12/09/2013 - 12:44

In reply to by चिंतातुर जंतू

आपल्या पहिल्या बातमीची एवढी सडेतोड खबर घेतली असताना आपण ज्या सहजतेने 'अभद्र' शब्द वापरला आहे हे पाहता आपल्या ठायी विशुद्ध मोदीद्वेष भरला आहे असे वाटते.

उदा. कलामांची एका अमेरिकन एअर्पोट्वर दोनदा झडती घेतली आणि म्हणून मी जर त्या विमानतळाची पुरस्करणी रद्द केली तर मी कलामांचा पित्ता? माझी आणि त्यांची अभद्र युती?

आपल्याला ऑडिट म्हणजे कळते का? प्राकृतिक वायू आणि पावर क्षेत्रातले किती करार आपण वाचले/बनवले आहेत हे ही महत्त्वाचे आहे? अदानींचे देशाच्या अर्थिक विकासातले योगदान कळते का? म्हणजे दुसर्‍या कोणत्याही राज्यात 'नैसर्गिक वायू' संबंधिक उद्योग गुजरातच्या 'तुलनेत' नसतानाच आहे त्याच्यातली एक चूक पकडून उचलली जीभ आणि लावली टाळाला करण्यात काही अर्थ आहे का? जी एस पी एल चे स्पष्टीकरण आपण वाचले आहे का?

भूमिकेमधे विरोध असावा, द्वेष नसावा. विरोध देखिल माहितीजन्य असावा. आणि सत्य स्वीकारण्याची मानसिकता असावी. एक आरोप खोडला तर दुसरा मग तिसरा असे करत शेवटपर्यंत द्वेषच करायचा असेल तर संवाद हा अर्थहीन होतो.

चिंतातुर जंतू Thu, 12/09/2013 - 13:03

In reply to by चिंतातुर जंतू

'अदानी गट आणि मोदी ह्यांची जवळीक असल्याचे आरोप नेहमीच होत असतात' हेच आणि एवढंच सांगण्यासाठी हे दुवे दिले होते. 'मी' ह्यांनी वर दिलेल्या दुव्यातही हेच म्हटलेलं आहे -

Any reference—good or bad—to Gautam Adani's sprawling business empire is rarely unaccompanied by his alleged proximity to Narendra Modi, the man who could be prime minister in 2014. This Tuesday, for instance, when the Central ministry of environment fined an Adani company Rs 200 crore for environmental violations, most news reports re-stated the alleged proximity.

त्यावरून एवढी चिडचिड झालेली पाहून गंमत वाटली.

अजो१२३ Thu, 12/09/2013 - 18:09

In reply to by चिंतातुर जंतू

अदानी गट आणि मोदी ह्यांची जवळीक असल्याचे आरोप नेहमीच होत असतात' हेच आणि एवढंच

हेच आणि एवढंच असेल तर आम्हाला आनंद आहे. पण 'अभद्र युती' शब्द या अर्थाने अयोग्य वाटतो. अगदी आपल्या शब्दांत सांगायचे झाले तर 'खाज आणि सणसणी' दर्शक आहे, मला तरी वाटला.

वृत्तपत्रांनी/CAG वापरलेला undue favor हा शब्द देखिल योग्य आहे. कारण त्यांचा तो अभ्यासाअंतीचा निष्कर्ष आहे. आणि मी जेव्हा प्रतिसाद देतो, 'अदानीला किती फेवर झाली त्याचा आकडा तरी सांगा' म्हणतो तेव्हा आपण ते सोडून तिसराच मुद्दा मांडता. अर्थात चिडचिड झाली हे मान्य.

चिंतातुर जंतू Thu, 12/09/2013 - 18:29

In reply to by चिंतातुर जंतू

>>पण 'अभद्र युती' शब्द या अर्थाने अयोग्य वाटतो. अगदी आपल्या शब्दांत सांगायचे झाले तर 'खाज आणि सणसणी' दर्शक आहे, मला तरी वाटला.

'अभद्र युती?' हा प्रश्न आणि 'अभद्र युती आहे' हे विधान ह्यांत फरक आहे. 'आपल्या शब्दांत' म्हणजे नक्की कुणाच्या शब्दांत?

(आता ह्या प्रतिसादाच्या शीर्षकात 'फेकू' हा शब्द आहे म्हणून मी मोदीद्वेषी आहे असं कुणाला वाटलं तर मी तरी काय करणार?)

अजो१२३ Thu, 12/09/2013 - 18:48

In reply to by चिंतातुर जंतू

अहो मी नाही म्हटलं कि आपण 'अभद्र युती आहे' असं म्हणाला आहात. 'अभद्र युती आहे का?' असा आपल्याला प्रश्न पडला हेच खाज आणि सणसणी निदर्शक आहे.

सन्जोप राव Fri, 13/09/2013 - 06:14

In reply to by चिंतातुर जंतू

This Tuesday, for instance, when the Central ministry of environment fined an Adani company Rs 200 crore for environmental violations, most news reports re-stated the alleged proximity.
हे भीतीदायक आहे. मोदींचे पर्यावरणविषयक धोरण हेच असेल तर हा माणूस पंतप्रधान होण्यात मोठा धोका आहे. इंदीरा गांधींची पर्यावरणसंरक्षणासंबंधातली ठाम आणि प्रभावी भूमिका आठवली.

मोदी धुतल्या तांदुळाचे आहेत असं वाटण्यासारखं काहीच नाही, रिलायन्सने जे केलं तेच अदानी करत आहे. गुजराथचा तोटा हे एकांगी निरिक्षण आहे. अदानीबद्दल थोडं वाचन.

अजो१२३ Fri, 13/09/2013 - 16:27

In reply to by चिंतातुर जंतू

http://articles.economictimes.indiatimes.com/2013-05-08/news/39116745_1…

या बातमीत याच प्रकल्पांचे विविध सरकारांचे कसे कसे टेक ऑफ आहेत, किती किमतीला आहेत हे लिहिले आहे. आंध्र आणि हरयाणा सरकारांना बसलेला फटका बातमीदाराला दिसू नये हे त्याच्या विश्वासार्ह नसल्याचे द्योतक आहे.

अजो१२३ Wed, 11/09/2013 - 11:17

In reply to by चिंतातुर जंतू

“At each instance, this government has batted for Muslims. In the first FIR, why were parents of the Hindu boys who were killed named as culprits? They were not even present. Our simple demands were unheard,” he says.

मुज्जफरनगरच्या दंगलीचे खरे कारण.

इतकेच नव्हे तर प्रशासन इतके पुळचट निघाले कि ज्या दोन हिंदू मुलांना मुसलमानांनी पब्लिक मधे चेचून मारले तो व्हिडिओ भारतातला नाहीच असे सरकारचे अधिकृत विधान होते. मग तर सारेच हिंदू संतापले. उ प्र करांना 'गोध्रा भारतात नाही' असे सांगीतल्यासारखे वाटले.

चिंतातुर जंतू Wed, 11/09/2013 - 11:49

In reply to by अजो१२३

>> ज्या दोन हिंदू मुलांना मुसलमानांनी पब्लिक मधे चेचून मारले तो व्हिडिओ भारतातला नाहीच असे सरकारचे अधिकृत विधान होते. मग तर सारेच हिंदू संतापले. उ प्र करांना 'गोध्रा भारतात नाही' असे सांगीतल्यासारखे वाटले.

ह्या विधानात फार मोठी गृहितकं आहेत. मी दिलेल्या बातमीतही राज्य सरकारला खोटं पाडलेलं नाही. मग तुमच्याकडे काय पुरावा आहे की हा व्हिडिओ चिथावणीसाठी मुद्दाम पसरवलेला जुना व्हिडिओ नव्हता?

अजो१२३ Wed, 11/09/2013 - 12:24

In reply to by चिंतातुर जंतू

कारण मी दोन्ही व्हिडिओ पाहिले आहेत. दोन्ही व्हिडिओ पूर्णतः वेगळे आहेत. एक नेटवर आणि एक मोबाइलवर लावून मी दोन्ही बाजूबाजूला पाहिले आहेत. (This is redudant but पाकिस्तानातील पंजाबी/उर्दू आणि उ प्र ची मुसलमानी हिन्दी या भिन्न भाषा आहेत, त्यामुळे आंधळा देखिल सबब व्हिडिओ भारतातला कि पाकिस्तानातला हे सांगेल.)

आणि हा जो कोणी बाबा मुलाखत देत आहे त्याने लव जिहाद वर मोठे प्रवचन दिले आहे परंतु मूलतः सुरुवातीचे हे दोन हिंदु तरूण एका मुसलमान स्त्रीची छेड काढत काढत मुस्लिम बहुल एरियात दाखल झाले होते हे सांगीतले नाही.

अर्थात प्रशासनाने केले ते (खोटे बोलणे) दुसर्‍या अर्थाने योग्य होते कारण मीरतमधे, शहाजहानपूर, गाझियाबाद, मुरादाबाद, इ चे वातावरण इतके कुलुषित झाले होते कि लष्कर पाचारण केले नसते तर धग दिल्लीत पोहोचली असती. या जिल्ह्यांतही कर्फ्यू होता.

अजो१२३ Wed, 11/09/2013 - 14:14

In reply to by चिंतातुर जंतू

ठिक आहे, नव्हता. 'Two youths beaten to death by mob' गुगलले तर जे करोडो व्हिडिओ येतात त्यापैकी एक होता. सपेशल माघार.

आडकित्ता Thu, 12/09/2013 - 23:31

In reply to by अजो१२३

मी मोदीसमर्थक नाही म्हणत म्हणत जोशी साहेबांचे वरील सर्व प्रतिसाद आलेले पाहून अंमळ करमणूक झाली.
स्वतः पाहिलेले व्हिडिओ अन तत्सम आर्ग्युमेंटस एंटरटेनिंग.

अजो१२३ Fri, 13/09/2013 - 11:13

In reply to by आडकित्ता

मी मोदीसमर्थक नाही असे मी म्हणालो नाही. 'मला मोदींचे समर्थन करायचे आहे 'म्हणून' मी सर्व काही त्यांच्या बाजूने लिहित आहे असे नाही.' असे म्हणालो आहे. म्हणजे मोदीचे, एक विशिष्ट विषयावर, समर्थन करणारा माणूस नि:पक्षपातीपणे काय बरोबर काय चूक बोलू शकतो तेव्हा त्यांचा विरोध करणारांनी केवळ असा समर्थक आहे म्हणून त्याच्या म्हणण्यातल्या आशयावर आक्षेप घेऊ असे म्हटले आहे.

व्यक्तिशः माझे राजकीय विचार काय आहेत हा मुद्दा गौण आहे. 'मोदींचा अण्णा हजारे (पोपट) होणार' असा मीमराठी.कॉम मांडलेला विचार देखिल बर्‍याच लोकांना रंजक वाटला होता. वैचारिक बांधिलकी असणारांस अशी बांधिलकी नसणारे लोक गंमतदार वाटतात.

मुज्जफुरनगरचे लोक माझ्या हाताखाली काम करतात. ते रोज तिथून ये जा करतात. सर्क्यूलेट झालेल्या व्हिडिओचे कितीतरी व्हर्जन्स आहेत. प्रशासनाने व्हिडिओचा स्रोत शोधण्याचा चंग बांधला आहे. लाख रु बक्षिस जाहीर केले आहे. सबब मी इथे चिंतातुर जंतूंशी जास्त वाद घालू शकत नाही. वास्तविक मी व्हिडिओ पाहिला आहे असे जे लिहिले आहे तेच मला जेलमधे घालण्यासाठी पर्याप्त आहे, पण नशीबाने मी उ प्र मधे नसून दिल्लीत आहे.

स्वाक्षरी-
आमच्या उदगीरमधे भले भले आडकित्ते तासण्याची भारतातली सर्वात मोठी फॅक्टरी आहे.

सुनील Wed, 11/09/2013 - 10:46

दीड दिवसांचा गणपती सहसा घरगुती. गौरीबरोबर जाणारेदेखिल बहुतांश घरगुतीच.

सार्वजनिक सहसा पाच दिवसांचे नाहीतर नाहीतर थेट अनंत चतुर्दशीपर्यंत! अपवाद असलाच तर कल्याणातील सार्वजनिक गणपतींचा, जे एकादशीपर्यंत असतात.

पण तीन दिवसांचा सार्वजनिक गणपती असतो कराची, पाकिस्तानात.

१ कोण तो दीड-शहाणा ज्याने दोन चे दीड केले?
२. पूर्वी असत. सद्यस्थिती ठाऊक नाही.

ऋषिकेश Wed, 11/09/2013 - 14:00

अश्या प्रकारांमुळे विसर्जनामुळे होणारे प्रदुषण कमी झाले तर ही इष्टापत्तीच ठरेल नाही? (अर्थात तसे काही होण्याची -म्हणजे विसर्जनाच्या पद्धतीत घट/बदल शक्यता अगदीच कमी हे मान्य)

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 14:17

In reply to by ऋषिकेश

=)) त्याने काय होणार? महापालिका नवीन तलाव/हौद काहीतरी बांधेल. वट्ट फरक पडणार नाही.

त्याऐवजी प्रबोधनाची क्यांपेन रनवली पाहिजे मग कैतरी होईल. गणपतीच्या मूर्तींचे इकोफ्रेंडलि मटीरिअल असले तर आहे तसे विसर्जन केले तरी चालेल. बहुतेक मागच्या गणेशोत्सवात सांगलीत काही इकोफ्रेंडलि गणपती विकायला होते. बातमी पाहिली पाहिजे.

नितिन थत्ते Wed, 11/09/2013 - 17:25

In reply to by बॅटमॅन

प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा गणपती जास्त इको फ्रेण्डली आहे. (त्याच्यावरच्या रंगांविषयी ठाऊक नाही)

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 18:36

In reply to by नितिन थत्ते

पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे इकोफ्रेंडलि नस्ते ना? आयमीन शाडूच्या मातीपेक्षा?

खुलासा: विनोदी श्रेणी मी तरी नै दिलेली.

'न'वी बाजू Thu, 12/09/2013 - 19:51

In reply to by नितिन थत्ते

आपण प्लास्टरच्या मूर्तीचे (बादलीत) विसर्जन केले आहेत काय कधी?

मी केले आहे. (फार पूर्वी.) रंग तुलनेने लवकर जातो. मूर्ती पाण्यात डिसइंटिग्रेट होत नाही. (शेवटी महिनाभर वाट पाहून कंटाळून स्ट्राँगआर्म ट्याक्टिक्स वापरावी लागली, असे आठवते. त्या जरासंधालाच ना, कोणीतरी फाडला होता (चूभूद्याघ्या.), त्यावरून प्रेरणा घेऊन. हातपाय, मुंडके उपटून तोडावे लागले. तेव्हापासून धातूची मूर्ती बसवून दरवर्षी तीच वापरतो.)

आता अशी मूर्ती जर सर्वांनी आणून तिचे नदीत विसर्जन करायचे म्हटले, तर लोकल मुन्शिपाल्टी हातपाय तोडायला स्क्वाड नेमणार आहे काय? नाहीतर नदी तुंबणार नाही काय?

हे ईकोफ्रेंडली???

नितिन थत्ते Thu, 12/09/2013 - 21:21

In reply to by 'न'वी बाजू

इकोप्रेण्डली म्हणजे नक्की काय?

पीओपीची मूर्ती पाण्याचे प्रदूषण करत नाही या अर्थी इकोफ्रेण्डली.

एखादा दगड पाण्यात पडून राहिला तर त्याने प्रदूषण होते का?

तुम्ही म्हणता तो पीओपीचा प्रॉब्लेम नदीच्या कन्जेशनचा (गर्दीचा) आहे प्रदूषणाचा नाही.

शाडूमातीची मूर्ती विरघळून पाण्यात मिसळते त्याने प्रदूषण होते. पाणी गढूळ होते.
कागदाच्या पुठ्ठ्याच्या मूर्तींवर बॅक्टेरिया वाढतात आणि त्या मूर्तीचे विघटन करतात. त्या विघटनातून कोणकोणते वायू बाहेर पडतात? शिवाय ते पाण्यात बॅक्टेरिया वाढणे म्हणजे प्रदूषण नाही का?

मूर्तीला वापरलेले रंग प्रदूषण करतात हे नक्कीच.

पंचधातूची परमनंट विसर्जन न केली जाणारी मूर्ती इकोफ्रेण्डली आहे हे बरोबर. पण शाडूची/कागदाच्या लगद्याची मूर्ती आणि पीओपीची मूर्ती यात पीओपीची मूर्ती अधिक इकोफ्रेण्डली.

'न'वी बाजू Thu, 12/09/2013 - 21:47

In reply to by नितिन थत्ते

प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे गटारे तुंबतात, हा प्रश्न प्रदूषणाचा नसून, गटारांच्या कंजेशनचा आहे, सबब निदान या खात्यावर तरी प्लॅ.पि. ईकोफ्रेंडली नाहीत असे म्हणता येणार नाही, असा दावा केल्यास त्याची जलधारकता किती?

बायोडीग्रेडेबल मटीरियल हे प्लॅस्टिकपेक्षा अधिक ईकोफ्रेंडली, की कमी? बायोडीग्रेडेशनमध्ये बॅक्टेरियांचा सहभाग नसतो काय?

सरतेशेवटी, केवळ प्रदूषण म्हणजेच पर्यावरणाची हानी काय? जलस्रोतांचे/जलनि:सारणमार्गांचे तुंबणे हाही पर्यावरणाची वाट लागण्याचा भाग नव्हे काय?

(प्रदूषणाचेच म्हणाल, तर कंपोस्ट खत बनवतानासुद्धा बॅक्टीरिया कामी येतात, कशाचेतरी विघटन करतात नि त्यातून कसलेकसले वायूदेखील बाहेर पडतात. याला 'प्रदूषण' म्हणावे काय, नि म्हणून कंपोस्ट खत बिगर-ईकोफ्रेंडली ठरवावे काय?)

(किती टंग-इन-चीक लिहाल राव? खेचता काय गरीबाची?)

'न'वी बाजू Thu, 12/09/2013 - 22:37

In reply to by नितिन थत्ते

एखादा दगड पाण्यात पडून राहिला तर त्याने प्रदूषण होते का?

दगड बर्‍यापैकी मोठा असेल, नि पाण्याला प्रवाह फार नसेल (किंवा मोठ्या दगडामुळे पाणी साचून प्रवाह संथ होत असेल), तर त्यावर शेवाळ साचू शकते.

शिवाय, दगड बर्‍यापैकी मोठा असेल, तर गावकरी त्याचा आणखी कशासाठीही वापर करू शकतात, जेणेकरून पाण्यात आणखीही कायकाय मिसळते, नि कसलेकसले बॅक्टीरिया त्यावर वाढतात नि पाण्यात मिसळतात, कोण जाणे. (आणि ते पाणी आपल्या पिण्याच्या स्रोतात येऊ शकते! यक्क!)

तसेही, पाणी साचले, की त्यात कायकाय वाढू शकते! नि एक दगड सोडा, पण असे अनेक (प्लास्टरचे) असंख्य दगड अडकून पाणी तुंबवू लागले, की मग क्या कहने!

आता याला 'प्रदूषण' म्हणायचे, किंवा कसे, हे आपणच ठरवा ब्वॉ!

सन्जोप राव Fri, 13/09/2013 - 06:20

In reply to by नितिन थत्ते

शिवाय ते पाण्यात बॅक्टेरिया वाढणे म्हणजे प्रदूषण नाही का?
नेहमीच असे असते असे नाही. बॅक्टेरिया ही फार सरधोपट संज्ञा आहे.कोणते बॅक्टेरिया यावर ते प्रदूषण आहे की नाही हे अवलंबून आहे. शून्य बॅक्टेरिया असलेले नैसर्गिक स्त्रोतातले पाणि अत्यंत प्रदूषित असण्याची शक्यता अधिक आहे.

नितिन थत्ते Fri, 13/09/2013 - 11:48

In reply to by सन्जोप राव

एक्झॅक्टली.

पण पीओपी डिग्रेडेबल नाही एवढ्या एकाच कारणाने त्याला एकोफ्रेण्डली नसल्याचे समजले जात आहे.

बायोडीग्रेडेबल असणारी प्रत्येक गोष्ट इकोफ्रेण्डली नसते. डीग्रेड होताना काय होते त्याचा नीट अभ्यास करून मग ठरवायला हवे.
(मोठ्या मूर्त्या करून त्या नदी-समुद्रात विसर्जन करायला माझा विरोधच आहे).
पण आठनऊ इंचापेक्षा लहान असलेल्या १० हजार पीओपीच्या मूर्ती आणि १० हजार शाडूच्या/कागदाच्या मूर्ती यात इकोफ्रेण्डली काय हे नुसत्या डीग्रेडेबल असण्यावर ठरवू नये.

चिंतातुर जंतू Fri, 13/09/2013 - 12:09

In reply to by नितिन थत्ते

>> बायोडीग्रेडेबल असणारी प्रत्येक गोष्ट इकोफ्रेण्डली नसते.

बरोबर, पण बायोडीग्रेडेबल नसणारी एखादी गोष्ट इकोफ्रेंडली कशी असू शकते?

नितिन थत्ते Fri, 13/09/2013 - 22:12

In reply to by चिंतातुर जंतू

एखादी वस्तू आसपासच्या पर्यवरणाशी कसलीच रासायनिक क्रिया करत नसेल तर ती इकोफ्रेण्डली ठरेल ना?

चिंतातुर जंतू Fri, 13/09/2013 - 22:48

In reply to by नितिन थत्ते

>>एखादी वस्तू आसपासच्या पर्यवरणाशी कसलीच रासायनिक क्रिया करत नसेल तर ती इकोफ्रेण्डली ठरेल ना?

मग तर प्लास्टिकसुद्धा इकोफ्रेंडलीच आणि बहुधा थर्मॉकोलही.

सन्जोप राव Sat, 14/09/2013 - 05:24

In reply to by नितिन थत्ते

एखादी वस्तू आसपासच्या पर्यवरणाशी कसलीच रासायनिक क्रिया करत नसेल तर ती इकोफ्रेण्डली ठरेल ना?
अशा वस्तूंना 'बायोइनडिफरन्ट' असे म्हणता येईल, नाही का?

ऋषिकेश Wed, 11/09/2013 - 18:19

In reply to by बॅटमॅन

:) हे तर आहेच
आम्ही (घरी गणपती नसतो पण भावंडे जिथे जमतो तिथे) परमनंट पंचधातुची मूर्ती आणली आहे. पुजेला सुपारी घेतली जाते व तिला उत्तरपूजेनंतर जमिनीत पुरले जाते. सध्या तरी हा सर्वोत्तम पर्याय वाटतो आहे.

'न'वी बाजू Thu, 12/09/2013 - 22:15

स्मायलींवर प्रयोग करून पाहत असताना, 'पूर्वदृश्य'ऐवजी चुकून 'प्रकाशित करा'वर टिचकी पडली. प्रतिसाद प्रसिद्ध करण्याचा मुळात कोणताही हेतू नव्हता. सबब प्रतिसाद रहित करण्यात आला आहे.

(कोणीतरी 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी द्या रे याला!)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/09/2013 - 22:43

In reply to by 'न'वी बाजू

आता नवीन बातम्या-विषयांसाठी नवा धागा सुरू करावा (जे कोणी नवीन बातमी घेऊन येईल त्यांच्यासाठी), ही विनंती.

'न'वी बाजू Thu, 12/09/2013 - 22:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'माहितीपूर्ण' अशी श्रेणी लग्गेच दिली! शिवाय,

(कोणीतरी 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी द्या रे याला!)

यातल्या 'रे'ला आक्षेपही न घेता!

थँक्यू व्हेरी मच! (पहा, हिंदीतली का होईना, पण 'री'सुद्धा आणली की नाही?)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/09/2013 - 00:37

In reply to by 'न'वी बाजू

यातल्या 'रे'ला आक्षेपही न घेता!

सविनय विनंतीभंग करून "अय्या, आम्ही पण आहोत इथे!" असं सुचवण्याचा हा प्रयत्न आहे.