Skip to main content

भारतीय सण आणि त्यामागील कुटील उद्देश

गविजी,
मी आपले प्रतिसाद गेल्या तीन वर्षापासून वाचत आहे. त्यातले न पटलेले वाक्य मला अजून सापडले नाही. आपण म्हणता ते पटावे असा माझा जेनेटीक मेक-अप असावा. :bigsmile:

या राखीच्याच मुद्द्यावरून मनात आलेले प्रश्न मी इथे लिहित आहे. कप्तानजी आणि अदितीजी हे दोन्ही रॅशनल व्यक्ती आहेत. त्यांचे म्हणणे समजून घेण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे.

१. घरच्या आणि इतर लोकांसमोर मी फार जास्त युद्ध करू शकत नाही म्हणून मी डोळसपणे काही छोट्या छोट्या अंधश्रद्धा गंमत म्हणून चालू देतो. तशी माझ्या घरात मातृसत्ताक पद्धत आहे (बायको मणिपूरी आहे) म्हणून चालू देतो म्हणणेही चूक आहे. वास्तविक त्या माझ्यावर लादल्या जातात. पण असो. तर राखी बांधणे म्हणजे अंधश्रद्धा का हे मला अजून माहित नाही. पण ज्या त्वेषाने 'गंडे, दोरे' असा शब्द अंधश्रद्धा निर्मूलक वापरतात त्यामुळे मामला ५०-५० आहे. कप्तानजी म्हणाले कि मला विवेकविचाराची मर्यादा आहे म्हणून मला राखी अंधश्रद्धा नाही हे कळले नाही. ठीक. मान्य.

२. अदितीजी म्हणतात ही स्त्री द्वेष प्रकट करणारी परंपरा आहे. कोणी म्हणेल कि यात स्त्रीला उगाच कमी शक्तीचे लेखले आहे. अर्थात मला हे अभिप्रेत नव्हते. ज्या कृतीने द्वेषभाव प्रकट होतो अशी कोणतीही गोष्ट बुद्ध्या करणे अयोग्य नव्हे का? जी गोष्ट मला अंधश्रद्धा आहे कि नाही ती माहित नाही ती करून द्वेषात्मक कृती करणे मला चूक वाटते.

म्हणून मला एक रेफरंन्स हवा. मी स्वतः १००% अंधश्रद्धा न मानणारा मानत असताना कप्तानजीनी माझे % खूप खाली आणले आहे, त्याचे दु:ख होते.
इथे राखी, कप्तानजी आणि अदितीजी रुपके आहेत. माझे वर्तन सामान्य्/आदर्श आहे असे मला वाटत असताना ते १००% अंध, अनैतिक किंवा गुन्हेगारी स्वरुपाचे कसे आहे हे माझ्या गळी उतरावणारे बरेच मित्र आहेत म्हणून हे मांडण्याचा प्रपंच इथे केला आहे.

काळाच्या ओघाबद्दल बोलत असाल तर कायद्याची मानके ही डायनामिक असतात. बाकी आपल्या सगळ्या मतांशी सहमत.

(या धाग्यातल्या चर्चेतून प्रतिसाद वेगळा काढला आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/08/2013 - 20:46

ही स्त्री द्वेष प्रकट करणारी परंपरा आहे. कोणी म्हणेल कि यात स्त्रीला उगाच कमी शक्तीचे लेखले आहे. अर्थात मला हे अभिप्रेत नव्हते.

आजूबाजूला बर्‍याच गोष्टी अशा असतात ज्यातून स्त्रीद्वेष, परधर्मद्वेष, जातीद्वेष इ. दिसतात. हेतू हा असाच असतो असं नाही; बहुदा नसतोच. अशा प्रथा, पद्धती रूढ होण्यामागचा विचार संबंधित घटकांना कमी, नीच किंवा हीन लेखण्याचा असतो. सज्ञान, शिक्षित लोकांनी हे समजून का घेऊ नये? भावाने बहिणीचं रक्षण का करावं? बहिणीही शिकतात, कमावत्या असतात, भावाची मदत करण्याची पत असेलच असंही नाही, अडचणी भावावरही येऊ शकतात; तरीही बहिणच पीडीत आणि भाऊ त्राता असा अर्थ असणारी, बहिणींना, स्त्रियांना जन्माधिष्ठीत कमीपणा देणारी प्रथा का सुरू ठेवावी?

बाकी "ड्वाले पानावल्या"बद्दल आक्षेप असा नाहीच. पीड परायी समजून घेणार्‍या व्यक्तीच्या मृत्युसंदर्भातल्या चर्चेत अशा प्रकारची असंवेदनशील प्रतिक्रिया येते याचं कालांतराने आश्चर्यही वाटेनासं होतं.

अजो१२३ Wed, 21/08/2013 - 21:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणी कोणाला कोणत्या आधारावर कमी लेखत असेल तर असे कमी लेखणे दुष्ट तर असतेच शिवाय क्रोधजन्य असते. संपूर्ण सहमत.

असे कमी लेखताना कधी कधी मीच माझ्याकडून पकडला जातो. पण असा दुष्ट भाव मनात असू नये आणि आपल्या वागण्याने कोणाला असा राग येऊ नये याची काळजी घ्यायची माझी प्रामाणिक इच्छा असते.

बॅटमॅन Wed, 21/08/2013 - 23:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

साप साप म्हणून भुईला किती धोपटायचे याचे उत्तम उदाहरण आहे हा प्रतिसाद. मी तर म्हणतो भाऊबीजच का, बहीणबीजही सुरू करा, काय त्यात एवढं. जिकडेतिकडे द्वेष पाहू गेलो की तो नसेल तिथेही दिसतोच.

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 03:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी तथाकथित सिंबॉलिक द्वेष शोधण्याच्या आणि स्वतःइतके व्हिट्रिऑलिक न बोलणार्‍यांनाही झोडणार्‍या मानसिकतेचा मागोवा घेऊया.

रोचना Thu, 22/08/2013 - 14:20

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन,
अदितीच्या मुद्द्याची तुम्ही उगीच गंमत म्हणून टर उडवताय का?

का खरोखरच या प्रथां-सणांचा, आपल्या समाजात स्त्री-पुरुष संबंधांना विशिष्ट, विषम आकारात बसवण्याशी अजिबात संबंध नाही असे स्पष्ट म्हणायचे आहे?

का "त्यात काय एवढं" म्हणून सुचवलेल्या बहिणबीजे इतकीच राखी आणि भाऊबीजही निरर्थकच आहे असे म्हणायचे आहे (तसे असल्यास सहमत - आणि सिंबॉलिक आणि विट्रियॉलिक बरोबरच पेट्रिआर्कल ही शब्द चर्चेत लागू होईल)

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 14:46

In reply to by रोचना

गंमत म्हणून टर उडवतोय का? - आजिबात नाही.

या सणांचा समाजरचनेशी आजिबात संबंध नाही असे म्हणायचे आहे का?- नाही. पण आजच्या घटकेला त्याचे स्वरूप आधीपेक्षा बदलले आहे. मोर लाईक अ सिस्टर्स डे असे झालेले आहे. मूळ संकल्पना काही का असेना, समाजाची सध्याची प्रॅक्टिस पाहिली तर "मूळ" हेतूने कितीजण त्या सणात भाग घेतात? हे सगळे आजिबात लक्षात न घेता नुस्ती संकल्पना किती म्हणून धोपटायची? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे, टु व्हॉट एंड?

अशा कितीतरी प्रथा दिसतील आजूबाजूला. विचारापेक्षा आचार पाहून केलेली टीका कधीपण जास्त सयुक्तिक असते-कारण आचारापेक्षा विचारात लोक जास्त एककल्ली आणि सोवळे असतात बर्‍याचदा. नपेक्षा तशा टीकेला अंत नाही. (त्यात अर्थ नसतो असे आजिबात म्हणायचे नाही-पण प्रस्तुत संदर्भात केलेली टीका अनाठायी आहे.) मुख्य आक्षेप इतकाच, की ही टीका या विशिष्ट ठिकाणी वास्तव असली तरी निरर्थक आहे.

का "त्यात काय एवढं" म्हणून सुचवलेल्या बहिणबीजे इतकीच राखी आणि भाऊबीजही निरर्थकच आहे असे म्हणायचे आहे (तसे असल्यास सहमत - आणि सिंबॉलिक आणि विट्रियॉलिक बरोबरच पेट्रिआर्कल ही शब्द चर्चेत लागू होईल)

पार्टलि हो आणि पार्टलि नाही. का नाही ते वर आलेच आहे.

रोचना Thu, 22/08/2013 - 16:09

In reply to by बॅटमॅन

या विशिष्ट ठिकाणी म्हणजे जनरल अंधश्रद्धेवरच्या चर्चेच्या धागेत, की दाभोलकरांच्या कार्याच्या संदर्भात?
"पार्टली हो-नाही" कळले नाही.
"या सणांचा समाजरचनेशी आजिबात संबंध नाही असे म्हणायचे आहे का?- नाही." पण नेमका समाजाशी या सणांचा काय संबंध आहे, हे ही स्पष्ट झाले नाही. पण असो.

"मूळ हेतू" ने कोणीच सण-प्रथा-विधि मानत नाही, पण एक परंपरा, मोठ्यांने मन न दुखवणे, कुटुंबाची शांती इत्यादींसाठी काय काय सुरूच असते, राबवले जाते, आणि कितीही निरर्थक म्हणून आपण स्वत:चे समाधान करून घेतले (द्वेष जसा नको तिथे अनेकांना दिसतो तसा समोर स्पष्ट असलेल्याकडे ही दुर्लक्ष करता येते) तरी काही प्रथा आवर्जून चालू राहतातच हे मात्र रोचक आहे.

(दिल्लीच्या बसमधल्या मुलीने बलात्कार करणार्‍यांना "भाऊ, दादा" म्हणून संबोधले असते तर तिच्यावर हा अनर्थ घडला नसता, असे गेल्या डिसेंबर मध्ये आसारामबापूंनी विधान काढले होते - त्यांना ही रक्षाबंधन म्हणजे सिस्टर्स डे वाटतो की काय कोण जाणे. अलिकडे "आयडिया" मोबाइल ची एक जाहिरात दिसतेय - दिल्लीच्या पोलीसवाल्याला एक मुलगी राखी बांधते, आणि तो लगेच तिला त्याचा फोन नंबर देतो, कधीही काही मदत हवी असल्यास फोन कर असं म्हणतो. यातील गर्भित अर्थ काय बरं असावा? ही झाली जाहिरात, पण दिल्ली पोलीस चीफने ही "स्त्रिया नवरे-भावांशिवाय एकट्या संध्याकाळी बाहेर पडल्या तर नंतर त्यांनी बलात्काराविरुद्ध तक्रार करू नये" असे विधान केले. अ‍ॅन्ड सो ऑन अँड ऑन अँड ऑन....)

परवाचीच गोष्ट. माझ्या एका भाचीने तिच्या भावाला राखी बांधायला नकार दिला. तुमच्याच विश्लेषणाचा आधार तिने दिला - एकेकाळी या प्रथेला कदाचित एक अर्थ होता, आता त्यात काही तथ्य नाही. मी त्याहून मोठी आहे, तो काही माझी रक्षा वगैरे करणार नाही, वर मला ओवाळणे बिवाळणे हे काही पटत नाही, असं ती म्हणाली. मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर-ब्रदर्स डे वगैरेंच्या ही ती विरुद्ध आहे, उगीच कुठल्या कंपनीला पैसे पुरवण्याकरिता ठराविक दिवसाला वडिलांना शर्ट आणि आईला साडी विकत घेण्यास तिचा विरोध आहे. म्हणून तिने राखी आणली नाही, आणि त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत. नातेवाईकांनी तिला बरेच सुनावले - अगं, पण ओवाळण्याला विरोध कसला? दोराच आहे तो! आणि लहान असला म्हणून काय झालं? भाऊच आहे ना? ब्लाह, ब्लाह, ब्लाह, ब्लाह. कोणी म्हणाले नाही, जाऊ दे मेलं, सगळे तसेच एकत्र होऊन चहा घेऊ या.

अशी अनेक, अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच मला ही "टु वॉट एंड"? हा प्रश्न पडतो. आणि हे या धाग्याशी अवांतर नाही - रोजच्या विधि-अर्चा, मग ते कोणाच्या अंधश्रद्धेच्या सदरात पडो किंवा निव्वळ धर्माच्या, पेट्रिआर्कल आणि जातीयच का असतात? सर्व स्त्री-पुरुषांनी, विधवांनी, वरच्या-खालच्या जातीच्या लोकांनी एकसारख्या करण्यासारख्या का नसतात? खरंच सगळं एवढं हार्मलेस आणि कमर्शियल-ट्रडिशनल असलं, तर त्या विरुद्ध बोललं तर लोक एकदम डिफेन्सिव्ह का होतात? कन्यादान ही मला राखी सारखीच निरर्थक प्रथा वाटते आजच्या जगात. मग लग्नात त्याच्या विरुद्ध बोललं, तर इतका गोंधळ का होतो? सप्तपदी, इ. बरोबर लग्नविधीतून ते काढूनच टाकले तर लोकांना चालेल का? आफ्टर ऑल, मॅरेज इस मोस्टली अ पार्टी नाव अ डेज! बाईने लग्नानंतर नाव बदलणे वगैरे सुद्धा - तसे बघितले तर तुमच्या आशावादाप्रमाणे आता स्त्रिया नोकर्‍या करतात, समर्थ आहेत, मंगळसूत्र वगैरे गाडगीळ-रांका लोकांनीच चालवलेला धंदा मात्र राहिल्या सारखा आहे. नाही? पण मला गेल्याच आठवड्यात नवर्‍याचे नाव न लावल्यामुळे, मंगळसूत्र न घातल्यामुळे पुण्यातल्या एका बँकेत सगळ्यांसमोर मॅनेजर कडून "आपल्या परंपरे" बद्दल एक लांबलचक लेक्चर का बरे ऐकावे लागते? स्त्री-भ्रूण हत्या होतेच कशाला? राखीच्या धाग्यांशी बाकी अनेक सामाजिक धाग्यांशी नाते आहेच असे मग मान्य करावे लागते.

आचार-विचारात तुम्ही केलेला फरक हा मला तरी पटली नाही - मूळ मुद्द्यावर झाकण टाकण्यासारखे आहे, पण असो. पुढच्या काही दिवसांत घागा चेक करता येणार नाहीये, त्यामुळे मी इथेच थांबते.

ऋषिकेश Thu, 22/08/2013 - 16:30

In reply to by रोचना

भावनेशी सहमती आहे.

फक्त एक वेगळा आयाम असा:

सप्तपदी, इ. बरोबर लग्नविधीतून ते काढूनच टाकले तर लोकांना चालेल का?

हे तुम्ही लग्न कोणत्या कायद्या अंतर्गक करताय त्यावर अवलंबून आहे. 'हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट'खाली लग्न करत असाल तर सप्तपदी कायद्याने अनिवार्य आहे असे वाटते.

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 16:32

In reply to by रोचना

या विशिष्ट ठिकाणी म्हणजे जनरल अंधश्रद्धेवरच्या चर्चेच्या धागेत, की दाभोलकरांच्या कार्याच्या संदर्भात?

म्हणजे या धाग्यात, इथेच. जण्रल दाभोलकरांच्या कार्याशी संबंधित नाही.

पार्टलि नाही अशासाठी की ते सर्व काही अज्जीच निरर्थक आहे असे मला वाटत नाही. असो.

बाकी तुम्ही सांगितलेले अनुभव खत्री आहेतच-पण म्हणून त्यामुळे ज्यांना यातले चांगले हुडकावेसे वाटते त्यांना तो स्कोप अज्जीच न ठेवणे हे मला पटत नाही. असेल बरंचसं सुकं, पण म्हणून उरलेल्या थोड्या ओल्याला धग लागते हे सांगितलं तर त्याला आक्षेप असू नये.

आचार-विचारात तुम्ही केलेला फरक हा मला तरी पटली नाही - मूळ मुद्द्यावर झाकण टाकण्यासारखे आहे, पण असो. पुढच्या काही दिवसांत घागा चेक करता येणार नाहीये, त्यामुळे मी इथेच थांबते.

नका टाकू झाकण, माझाही त्याला विरोधच आहे. पण सरसकट लिंक ज्याच्याशी लावू पाहता त्याच्याशी दरवेळेस लागत असेलच असे नाही असे मला वाटते. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 17:55

In reply to by बॅटमॅन

असेल बरंचसं सुकं, पण म्हणून उरलेल्या थोड्या ओल्याला धग लागते हे सांगितलं तर त्याला आक्षेप असू नये.

आणि मग, ओलं कोणतं, सुकं कोणतं हे नक्की कोणी ठरवायचं? दाभोलकर आणि त्यांच्यासारखे, विद्या बाळ आणि त्यांच्यासारखे (म्हणजे विवेकवादी, समानतावादी लोक) का सनातन प्रभातने का आणखी कोणी डुढ्ढाचार्य, जे लैंगिक गुन्हे घडतात तर बायका काळजी का घेत नाहीत, असं म्हणत फिरतात?

सरसकटीकरण कोणी केलंय, कधी केलंय, त्याचा इथे संबंध काय? रक्षाबंधनाच्या रूढीमुळे स्त्रियांना कमी लेखलं जातं याचं एवढं स्पष्टीकरण देऊनही वर पुन्हा सरसकटीकरणाचा आरोप पाहून आता खरंच 'ड्वाले पानावले'.

याचा दाभोलकरांच्या जादूटोणा विरोधी कार्याशी थेट संबंध नसेलही, पण अंनिसचं संस्थळ पाहिलं त्यावर हे ही सापडलं, महिला विभाग

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 19:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ता रक्षाबंधन साजरे करणारे सर्व लोक मनातून असमानता मानतात असे म्हणायचे असेल तर म्हणा. स्त्रियांवरचे अत्याचार आणि या विधीची लिंक नेहमीप्रमाणे लावलेली पाहून रोचक वाटलं. अर्थातच, वेगळं काय अपेक्षिणार म्हणा. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 19:54

In reply to by बॅटमॅन

आत्ता रक्षाबंधन साजरे करणारे सर्व लोक मनातून असमानता मानतात असे म्हणायचे असेल तर म्हणा

कोण, कधी, केव्हा म्हणाले?

असो.

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 20:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वरील सर्व रामायणाचा हाच एक सरळ निष्कर्ष आहे. तो सरळ मांडल्यावर आश्चर्य वाटू शकते याचे आश्चर्य वाटले.

असो, बाकी चालू द्या.

मी Thu, 22/08/2013 - 21:05

In reply to by बॅटमॅन

समन्वयवाद की हिप्पोक्रेसी कि फक्त सोय अशी समस्या आहे, पैकी हिप्पोक्रेसी नाही हे समजण्यासाठी समन्वयवादामागाचा विचार जाणणे गरजेचे वाटते. तसे काही सांगता येईल काय? सोयीत सोयिस्कर हिप्पोक्रेसी आहे आणि नाहिही, तुम्हाला काय वाटतं?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/08/2013 - 02:43

In reply to by बॅटमॅन

आजूबाजूला बर्‍याच गोष्टी अशा असतात ज्यातून स्त्रीद्वेष, परधर्मद्वेष, जातीद्वेष इ. दिसतात. हेतू हा असाच असतो असं नाही; बहुदा नसतोच. अशा प्रथा, पद्धती रूढ होण्यामागचा विचार संबंधित घटकांना कमी, नीच किंवा हीन लेखण्याचा असतो.

हे माझंच कालचं वाक्य.

आपल्या आया वेगळ्या, मातृभाषाही बहुदा वेगवेगळ्याच आहेत.

बॅटमॅन Fri, 23/08/2013 - 03:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या आया वेगळ्या, मातृभाषाही बहुदा वेगवेगळ्याच आहेत.

उपरोध असेल तर अंमळ हुकलेला आहे.

तदुपरि अधोरेखित वाक्य लिहिले असले तरी रक्षाबंधनात काही चांगले कुणी पाहू शकते हे समजून घेण्याची तयारी नसेल तर प्रश्नच मिटला. काये, मूळ विचार कसाही असला तरी प्रत्येक गोष्टीची सद्यःस्थिती काय आहे हे पाहून तदनुरूप वर्तावे अशी माझी माझ्या अल्पमत्यनुसार समजूत आहे. सद्यःस्थितीचा मुद्दा एकतर अज्जीच दुर्लक्षून, नपेक्षा अन्य गोष्टींचा अस्थानी संबंध लावून कालबाह्य आणि कुणाच्या खिजगणतीतही नसलेल्या मूळ विचाराला झोडण्याने नक्की काय साधतं हे अजून मला समजत नाही.

रोचना Thu, 22/08/2013 - 18:41

In reply to by बॅटमॅन

पार्टलि नाही अशासाठी की ते सर्व काही अज्जीच निरर्थक आहे असे मला वाटत नाही. असो.

बाकी तुम्ही सांगितलेले अनुभव खत्री आहेतच-पण म्हणून त्यामुळे ज्यांना यातले चांगले हुडकावेसे वाटते त्यांना तो स्कोप अज्जीच न ठेवणे हे मला पटत नाही. असेल बरंचसं सुकं, पण म्हणून उरलेल्या थोड्या ओल्याला धग लागते हे सांगितलं तर त्याला आक्षेप असू नये.

तेच नेमकं काय त्यात चांगला अर्थ तुम्हाला दिसतो हे स्पष्टीकरण हवे होते. तात्त्विक लेव्हल वर "सगळंच सुकं नसतं, असेलही काही ओलं त्यात" याशी माझे दुमत नाहीच. पण या जनरल "अज्जीच न ठेवणे, थोड्या ओल्याला, अज्जीच निरर्थक नाही" या वेग पातळीवरून तुम्ही थोडे याच सणाच्या संदर्भात स्पेसिफिकली एवढे का डिफेन्सिव्ह झालात हे जाणून घ्यायचे होते. मी दिलेल्या उदाहरणांबद्दल तुम्हाला "हो, पण बाकी चांगले काहीच नाही का" एवढेच सुचले हे पाहून आश्चर्य वाटला. त्यावरून मी लावलेल्या लिंका तुम्हाला दिसत नाहीत किंवा पटत नाहीत हे उघड आहे, पण ते सरसकटीकरण नव्हे. सरसकटीकरणाचा अर्थ आणि वापर एकूणच आपण निराळ्या अर्थाने करतो आहोत असे दिसते, त्यामुळे ते जाऊ दे.

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 20:02

In reply to by रोचना

तेच नेमकं काय त्यात चांगला अर्थ तुम्हाला दिसतो हे स्पष्टीकरण हवे होते.

भावाने बहिणीची काळजी घेणे हा चांगला पार्ट त्यात मला दिसतो-ती पुरुषी कनोटेशन्स सोडल्यास. भावानेच बहिणीची काळजी घ्यावी इ.इ. मला अभिप्रेत आणि मंजूर नाही.

पण या जनरल "अज्जीच न ठेवणे, थोड्या ओल्याला, अज्जीच निरर्थक नाही" या वेग पातळीवरून तुम्ही थोडे याच सणाच्या संदर्भात स्पेसिफिकली एवढे का डिफेन्सिव्ह झालात हे जाणून घ्यायचे होते.

कारण हार्मलेस विधी आहे म्हणून. हुंड्यासारखी प्रथा, किंवा अजून काही असतं तर विरोध नक्कीच जस्टिफायेबल होता. प्रत्येक धार्मिक विधीचे विच्छेदनच करायचे झाले, तर

-विचार- त्यातही मूळ विचार आणि सध्याचा विचार.
-आचार

अशा पातळ्या सांगता याव्यात. रक्षाबंधनाच्या केसमध्ये पाहिले तर हार्मफुल नक्की काय आहे? आचार नै तर विचार. तोही मूळ विचार. सध्याचा नव्हे. त्यामुळे इतके साधे सरळ प्रकरण असताना आणि इतर अन्यायकारक विधीही असताना याला झोडण्याचे समर्थन करताना लोक का डिफेन्सिव्ह होताहेत हे मला समजत नाही.

मी दिलेल्या उदाहरणांबद्दल तुम्हाला "हो, पण बाकी चांगले काहीच नाही का" एवढेच सुचले हे पाहून आश्चर्य वाटला. त्यावरून मी लावलेल्या लिंका तुम्हाला दिसत नाहीत किंवा पटत नाहीत हे उघड आहे, पण ते सरसकटीकरण नव्हे.

तुम्ही दिलेल्या उदाहरणांत, रक्षाबंधनाबद्दलही गहजब असा किती झाला? आणि अन्याय किती झाला? आडनाव लावणे किंवा मंगळसूत्र इ. बद्दल तुम्ही सांगितलेल्या अनुभवांशी सहमत आहे. पण ह्या केसमध्ये इतके काय झाले होते की झोडावे? त्यामुळे मला या संदर्भात वरील काही प्रतिक्रिया अनावश्यकरीत्या व्हिट्रिऑलिक वाटतात.

तस्मात ते एक असोच.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 18:01

In reply to by मी

त्या निमित्ताने एकत्र भेटणं, नारळीभात आणि इतर जे काही खास पदार्थ बनत असतील त्याला माझा अजिबात विरोध नाही.

मी आणि माझ्या भावाने, परस्परसामंजस्याने, राख्या बांधणं कॉलेजात जाता-जाताच बंद करून टाकलं. त्याने मला १७-१८ वर्ष राखी बांधली नाही (मी तेवढी वर्ष बांधली) म्हणून त्याला गरज असते तेव्हा मी मदत करत नाही असं अजिबात नाही. उद्या कोणी एके-४७ घेऊन समोर आला, आणि निदान त्याचा जीव वाचवणं शक्य असेल तर त्याने ढु. ला पाय लावून पळत सुटावं ... असं आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. (तसंच भाऊबीजेचं. बाबांकडून घेऊन तू मला देऊ नकोस. आपण दोघे कमावायला लागू तेव्हा पाहू, असं म्हणून आम्ही दोघांनी हे पण बंद केलं.)

मी Thu, 22/08/2013 - 19:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>त्या निमित्ताने एकत्र भेटणं, नारळीभात आणि इतर जे काही खास पदार्थ बनत असतील त्याला माझा अजिबात विरोध नाही.

हे आणि त्याला तात्त्विक विरोध करणं एकसाथ जाऊ शकत नाही, सणामागचं तत्त्व एकत्र येण्याचं मुद्दल पुरवतं ते झोल आहे असं समाजमन झालं तर एकत्र येणं बंद होईल, मग वेगळी निमित्त तयार करावी लागतील जर ते एकत्र भेट, खाणं-पिणं त्याच लाईनीवर हवं असेल तर. हे सगळं कोणाला हवं आहे तर त्या समाजाला हाकणार्‍या व्यवस्थेला, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत असं आपलं माझं मत आहे.

वेगळा धागा करा ब्वा.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 19:37

In reply to by मी

असं वाटत नाही.

आहे तेच 'मुहूर्त' तसेच ठेवले तर उलट एकेकाळी आपल्या समाजात अशी असमानता होती, स्त्रियांना कमी लेखलं जात होतं (किंवा संदर्भानुसार जातीव्यवस्थेतून काही लोकांना कमी लेखलं जात होतं), अशा प्रकारे आपला कटू इतिहासही लक्षात राहिल. हे लक्षात राहिलं तर तीच चूक पुन्हा होण्याची शक्यताही कमी होईल. (शब्दांचे उगम लक्षात रहाण्याच्या दृष्टीने इंग्लिश आणि फ्रेंचमधली स्पेलिंग्ज जशी विचित्र आहेत तसं.)

त्याच्याच जोडीला आता वाढदिवस साजरे करणं, मदर्स डे, फादर्स डे अशा पाश्चात्य आणि निरागस प्रथा आपल्याकडेही येत आहेत. येऊ देत, उत्तमच आहे. त्या निमित्ताने लोकं एकमेकांना भेटतील, आनंद व्यक्त होईल, सण साजरे होतील, खाद्यसंस्कृतीही वाढेल. एकंदर सामाजिक समाधान वाढत असेल तर ते काहीही स्वागतार्ह आहे.

(सध्या काही लोक चतुर्थी वगैरेंना उपास करतात. दुकानांमधून उकडीचे मोदक चतुर्थी किंवा मंगळवारीच मिळतात. बुधवारी अमावस्या असेल तर दुकानात उकडीचे मोदक मिळणं कठीण. माझ्यासारखे नास्तिक लोक तिथ्यांकडे एवढ्याच कारणासाठी लक्ष ठेवून असतात. वर्षाचे ३६५ दिवस मोदक दुकानात मिळत असते तर उत्तम, पण नसतील तरी ठीक आहे. बाजाराचा रेटा पुरेसा असेल तर हे बदलेलच. नाही बदललं तरीही कोणी चतुर्थीला फक्त उपास केल्यामुळे फसवणूक, छळ होत नाही, तर या गोष्टी नजरेआड करता येतात.)

सन्जोप राव Fri, 23/08/2013 - 07:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याच्याच जोडीला आता वाढदिवस साजरे करणं, मदर्स डे, फादर्स डे अशा पाश्चात्य आणि निरागस प्रथा आपल्याकडेही येत आहेत. येऊ देत, उत्तमच आहे. त्या निमित्ताने लोकं एकमेकांना भेटतील, आनंद व्यक्त होईल, सण साजरे होतील, खाद्यसंस्कृतीही वाढेल.
'आपल्याकडे' चा अर्थ भारतात असा घेतो. 'व्हॅलेन्टाईन डे' चे काय माकड झाले आहे ते आपण बघितलेच आहे. त्या जोडीला भारताशी (भारतिय संस्कृतीशी वगैरे नाही!) काहीही नाळसंबंध नसलेले मदर्स/ फादर्स डे भारतात येऊ द्या असे म्हणणे हास्यास्पद आहे. खाद्यसंस्कृती वाढेल म्हणजे आता भारतियांनी थँक्सगिव्हिंगला भाजण्यासाठी टर्क्या शोधत बसायचे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/08/2013 - 10:08

In reply to by सन्जोप राव

टर्क्या काही फार स्वादिष्ट नसतात म्हणे! पण खायच्यात त्यांना खाऊ देत. त्यांच्यासाठी टर्कीची शेती सुरू होईल, त्यात काय वाईट आहे? मुळात टर्की खाण्यात काय वाईट आहे?

मदर/फादरशी नाळसंबंध नसणे ... सॉरी, रहावलं नाही. काय प्रॉब्लेम काय आहे? आपापल्या आई-वडलांसाठी एखादा दिवस वेगळा काढला तर काय वाईट आहे? भावा-बहिणींच्या प्रेमाचं प्रतीक चालत होतं तर आई-वडील, आजी-आजोबा यांच्याप्रती प्रेमाचं प्रतीक का असू नये? तसं तर आपली संगणक, इंटरनेटशीही नाळ जोडलेली नव्हती. पण आपण सगळे शिकलोच की, वापरायला, वावरायला आणि बागडायला!

'व्हॅलेन्टाईन डे' चं नक्की काय माकड झाले आहे? मी कॉलेजात वगैरे असताना शिवसेना धमक्या द्यायची. पोरं-पोरी खुश्शाल ग्रीटींग, फुलांची देवाणघेवाण करायचे. मागे त्या श्रीराम सेनेविरोधात पिंक चड्डी अभियान केला होता तसा शिवसेनेच्या विरोधात १४ फेब्रुवारीला चुंबन-आंदोलन वगैरे करता येईल. शिवाय मागच्या वर्षी ऐसी अक्षरेच्या खरडवह्यांमधे आम्ही साजरा केला बुवा व्हॅलेन्टाईन डे. कोणीही प्रेमाच्या देवघेवीचा अव्हेर केला नाही.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 22:07

In reply to by बॅटमॅन

एखाद्या गोष्टीकडे प्रेम म्हणून पाहायचे कि द्वेष ही बाब १००% subjective आहे. मला कोणतीही एक गोष्ट सांगा जिच्याकडे प्रेमानेच पाहावे. तिच्याकडे द्वेषाने पाहायची हजार कारणे मी देऊ शकतो.

सन्जोप राव Fri, 23/08/2013 - 07:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आजूबाजूला बर्‍याच गोष्टी अशा असतात ज्यातून स्त्रीद्वेष, परधर्मद्वेष, जातीद्वेष इ. दिसतात. हेतू हा असाच असतो असं नाही; बहुदा नसतोच. अशा प्रथा, पद्धती रूढ होण्यामागचा विचार संबंधित घटकांना कमी, नीच किंवा हीन लेखण्याचा असतो. सज्ञान, शिक्षित लोकांनी हे समजून का घेऊ नये? भावाने बहिणीचं रक्षण का करावं? बहिणीही शिकतात, कमावत्या असतात, भावाची मदत करण्याची पत असेलच असंही नाही, अडचणी भावावरही येऊ शकतात; तरीही बहिणच पीडीत आणि भाऊ त्राता असा अर्थ असणारी, बहिणींना, स्त्रियांना जन्माधिष्ठीत कमीपणा देणारी प्रथा का सुरू ठेवावी?
हे सगळे अति-सुलभीकरण केलेले वाटले. आसपासच्या (भारतातल्या!) 'बर्‍याच' गोष्टींमधून स्त्रीद्वेष दिसतो हे फारच सरसकट विधान झाले. भावाने बहिणीचे रक्षण करणे याचा अर्थ बहीण ही पीडीत हेही वाक्य तसेच. आणि रक्षण करणारा भाऊ हा त्राता हेही विधान तसेच.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 20:00

धागा वेगळा केला आहे तसा त्याचा लेखक बदलता येतो का? कारण रक्षाबंधन हे केवळ उदाहरण होते.

अतिरेकी ज्ञानी (टोकाचे सश्रद्ध हा शब्द तांत्रिक रित्या चूकीचा आहे कारण त्यांच्याइतकं ज्ञान मला पामराला का नाही म्हणून ते आमच्या पाठी लागलेले असतात, आमचा पाणउतारा करून उल्लेख करत असतात ) लोक त्यांच्यापेक्षा कमी ज्ञान असणारांना (देव मानावा कि नाही, धर्म मानावा कि नाही हे माहित नसणारांना, आणि माहित नसले तरी उगाच काही तरी करून प्रसंग तारून नेणारांना, बळेच प्रत्येक रितींचा चांगला अर्थ काढणारांना, माझ्यासारख्यांना) फार आडते तिडवे झोडतात. म्हणून विनंती केली होती कि आम्हाला अक्कलच नसेल तर आपण जी डोळस यादी देत आहात ती आम्ही पाळू. आमची ठोकंपट्टी करणे बंद करा.

पण कविताताईंनी त्यांच्या धाग्यात ती निगेटीव लिस्ट दिली आहे आणि या विनंतीला पुढे अर्थ उरत नाही.

हा धागा पुढे चालू राहिला तर मतभिन्नता, गंमतजंमत यासाठी चालू राहिल. मी या विषयाचा मालक नाही, सूत्रधार नाही. मी निर्धास्त आहे राखी बांधल्याने कोणी मला सजा देऊ शकत नाही, न्यायालय 'अंधश्रद्ध' असा शिक्का माझ्यावर मारू शकत नाही. हा माझा आणि माझ्या बहिणीचा प्रेमाचा विषय आहे, त्यात कुणाला कोणती दुष्ट मानसिकता दिसू नये अशी अपेक्षा आहे. राखी बांधण्यातून माझी कोणती वैचारिक पातळी सिद्ध होते यावर कोणतेही मत बनवण्याचा आपला अधिकार आहे, अर्थात तो सर आँखों पर. मला विचाराचीच आणि बुद्धीचीच मर्यादा असल्याने मला याच पातळीवर जगावे लागेल. अतिरेकी ज्ञानी लोकांना विनंती आहे कि त्यांनी आपल्या बंदुका त्या कविताताईंनी दिलेल्या लिस्टमधल्या बांडगुळांवर अगोदर वळवाव्यात.

चिंतातुर जंतू Thu, 22/08/2013 - 19:38

>>त्या निमित्ताने एकत्र भेटणं, नारळीभात आणि इतर जे काही खास पदार्थ बनत असतील त्याला माझा अजिबात विरोध नाही.

हे आणि त्याला तात्त्विक विरोध करणं एकसाथ जाऊ शकत नाही, सणामागचं तत्त्व एकत्र येण्याचं मुद्दल पुरवतं ते झोल आहे असं समाजमन झालं तर एकत्र येणं बंद होईल

मला वाटतं की अशा वादांत एक मूलभूत मुद्दा बाजूला पडतो आणि तो म्हणजे भारतीय समाजमनाला फार कठोरकर्कश होता येत नाही, किंवा ते टाळावंसं वाटतं. त्यापेक्षा चारचौघांच्या सोयीनं किंवा सौहार्दानं वागून लोक आनंदात राहतात. हे निव्वळ राखी पौर्णिमेपुरतं मर्यादित नाही, तर दिवाळी, होळी वगैरे इतर सणांनादेखील लागू पडतं. काही उदाहरणं -
'आपसूक सुट्टी मिळते आहे आणि सगळेच आपापल्या गावी जाताहेत, तर आपणदेखील थोडा वेळ कुटुंबासह घालवू, खाऊ-पिऊ, मजा करू'. असं मानणारे आणि तसं करणारे पुष्कळ नास्तिक मी पाहिले आहेत.
दिवाळीला सगळं हॉस्टेल रिकामं झालं म्हणून एकट्या राहिलेल्या दूरगावच्या मुस्लिम मित्राला आपल्या सश्रद्ध घरी जेवायला घेऊन गेलेला सदाशिव पेठी मुलगा मी पाहिला आहे.
'संकष्टीला हलवाई चांगले उकडीचे मोदक तयार ठेवतो म्हणून मी ते विकत घेऊन खातो'.
'बॉस दिवाळीत/राखीला सुट्टी द्यायला काचकूच करत नाही, पण उगीच मध्येच कधी तरी मागितली, तर काचकूच करतो'.
वगैरे.
असं म्हणण्यात मुद्दा श्रद्धा किंवा नास्तिकता बुडण्याचा नाही, तर व्यावहारिक सोयीचा किंवा साध्या सौहार्दाचा असतो. तुम्हाला अभिप्रेत तर्ककठोर वागणारे जे असतील ते असतील. मला तरी हे वागणं आणि दाभोलकरांच्यासारखी विवेकवादी भूमिका ह्यांत विरोधाभास आढळत नाही.

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 19:45

In reply to by चिंतातुर जंतू

मला वाटतं की अशा वादांत एक मूलभूत मुद्दा बाजूला पडतो आणि तो म्हणजे भारतीय समाजमनाला फार कठोरकर्कश होता येत नाही, किंवा ते टाळावंसं वाटतं. त्यापेक्षा चारचौघांच्या सोयीनं किंवा सौहार्दानं वागून लोक आनंदात राहतात. हे निव्वळ राखी पौर्णिमेपुरतं मर्यादित नाही, तर दिवाळी, होळी वगैरे इतर सणांनादेखील लागू पडतं.

मार्मिक अन नेमके!!!! इतकं कळालं तरी लै झालं. पण विवेकवादाच्या अहमहमिकेत हे बाजूला पडल्याशिवाय गत्यंतर नाही. जो जितक्या जोरात ओरडेल तितका त्याचा विवेक कणखर.

मी Thu, 22/08/2013 - 20:53

मला वाटतं की अशा वादांत एक मूलभूत मुद्दा बाजूला पडतो आणि तो म्हणजे भारतीय समाजमनाला फार कठोरकर्कश होता येत नाही, किंवा ते टाळावंसं वाटतं. त्यापेक्षा चारचौघांच्या सोयीनं किंवा सौहार्दानं वागून लोक आनंदात राहतात. हे निव्वळ राखी पौर्णिमेपुरतं मर्यादित नाही, तर दिवाळी, होळी वगैरे इतर सणांनादेखील लागू पडतं.

मान्य, फक्त ह्याच समन्वयवादाला हिप्पोक्रेसी ऐसेही संबोधले जाते. दाभोलकरांना अपेक्षित विवेक ह्या पायरीवरून जात असावा पण हे त्याचे ध्येय नसावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 22:30

In reply to by मी

अपेक्षित परिणाम महत्त्वाचा का मार्ग असा प्रश्न पडू शकतो.
अपेक्षित परिणाम = जादूटोणा, श्रद्धेच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवणे, लोकांनी श्रद्धांसंदर्भात विचार करायला सुरूवात करणे, इ.

रधों जे करू पहात होते, संततीनियमनच नव्हे तर स्त्रियांनाही लैंगिक वर्तनाचं स्वातंत्र्य, ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. ते समाजाशी फटकूनच वागत, दाभोलकरांचं व्यक्तिमत्त्व पहाता निश्चितच असं म्हणावं लागेल. लोकांना न पटणारी गोष्ट त्यांना पटवण्यासाठी, निदान त्यावर विचार सुरू करण्यासाठी नक्की कोणता मार्ग, पद्धत जास्त उपयुक्त असेल?

राजन बापट Thu, 22/08/2013 - 21:25

मतामतांच्या गर्दीत काही मुद्दे सुटेसुटे करून मांडले तर उपयुक्त ठरेल म्हणून ..

रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळीपाडवा या सणांमागे धर्मकर्माच्या मागे आढळणारी - प्रस्तुत संदर्भात हिंदू धर्मातली - स्त्री-पुरुषांमधे मानलेली असमानता कारणीभूत आहे का ?
- आहे. हे दिवस "साजरे" करतानाच्या ज्या परंपरा निर्माण झाल्या त्यामागे ही असमानता निश्चितच होती.

हे सर्व सण "साजरे" होत असताना त्या असमानतेला मनात धरूनच ते "साजरे" केले जात असावेत काय ?
- याचं शंभर टक्के नेमकं उत्तर देणं कठीण आहे. निरनिराळ्या संदर्भांत ते निरनिराळं येऊ शकेल. जिथे स्त्रियांना शिक्षण/नोकर्‍या/उद्योग/उपजीविका/अभिव्यक्ती यांबाबत क्रमाक्रमाने समान संधी उपलब्ध होत गेल्या तिथे क्रमाक्रमाने या उत्सवांमागची लिंगसापेक्ष असमानतेची जाणीव विरळ होत गेली असं म्हणता येईल. ज्या सामाजिक स्तरांमधे/प्रदेशांमधे हे पुरेसं झालेलं नाही तिथे या पारंपरिक असमानतेला निश्चितच assert केलं जात असणार.

- उपरोल्लेखित उत्सवांना "साजरं" करणं याचा निषेध करावा काय ?
- धर्माकर्माचा जिथे प्रभाव आहे तिथे धर्माची गढी उंच धरण्याकरता हे उत्सव - त्यांच्या परंपरागत असमानतेला गृहित धरून - "साजरे" केले जातातच. परंतु वर चिंतातुर जंतूंनी म्हण्टल्याप्रमाणे, जिथे धर्मिक कडवेपणाचा प्रभाव क्रमाक्रमाने कमी होत गेलेला आहे तिथेदेखील, भारतीय (किंवा बहुदा जगातल्या कुठल्याही) माणसाची उत्सवप्रियता कार्यरत आहे.गोडाधोडाचं खायला किंवा नवे कपडे ल्यायला किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण करायला निमित्त म्हणून हे दिवस "साजरे" होताना दिसतात. त्यामुळे निषेध नोंदवताना "आग रामेश्वरी नि बंब सोमेश्वरी" अशी परिस्थिती होण्याची शक्यता मला दिसते. किंबहुना, प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात ती झालेलीच आहे असं मला वाटतं.

बॅटमॅन Thu, 22/08/2013 - 21:52

In reply to by राजन बापट

त्यामुळे निषेध नोंदवताना "आग रामेश्वरी नि बंब सोमेश्वरी" अशी परिस्थिती होण्याची शक्यता मला दिसते. किंबहुना, प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात ती झालेलीच आहे असं मला वाटतं.

मार्मिक अन नेमके!!!

राजन बापट Thu, 22/08/2013 - 22:00

In reply to by बॅटमॅन

मात्र याचबरोबर अशा स्वरूपाच्या निषेधाची गणना "व्हिट्रिऑलिक" सारख्या शेलक्या विशेषणांनी करणंही चुकीचं आहे या माझ्या मताची आवर्जून नोंदणी इथे करतो.

बॅटमॅन Fri, 23/08/2013 - 01:37

In reply to by राजन बापट

तुमच्याशी सहमत नाही, कारण व्हिट्रिऑल ते व्हिट्रिऑलच (असे आमचे मत)- पण तुमच्या मताचा आदर आहे-व्हिट्रिऑलिक नसल्याने ;)

रोचना Sat, 24/08/2013 - 19:52

In reply to by राजन बापट

या शब्दाच्या वापरामुळेच मी थोडी गोंधळले, कारण राखी/भाऊबीज सणांमागे स्त्री-पुरुष असमानतेचा विचार आहे असं म्हणणं मला काही विट्रिऑलिक वाटत नाही.
Definition of VITRIOL
1: a) a sulfate of any of various metals (as copper, iron, or zinc); especially : a glassy hydrate of such a sulfate; b) oil of vitriol
2: something felt to resemble vitriol especially in caustic quality; especially : virulence of feeling or of speech

Controversial, maybe. २०१३ साली, राखीबद्दलच्या अशा विश्लेषणाबाबत मला धक्कादायक, काँट्रोवर्शलही काही जाणवत नाही, पण कोणाला ते वाटतही असेल. Bothersome, perhaps (आणि तुम्हाला असे विधान राजकीय, आयडिऑलॉजिकल दृष्टीकोनावर आधारित आहे हे मान्य ). But Vitriolic, certainly not. इथे उगाच कोणालाही कठोर शब्दात, विट्रिऑलिक मध्ये अभिप्रेत आहे तसा, डिवचण्याचा किंवा भडकाऊ विधान करण्याचा उद्देश्य नाही, आणि विधानही नाही.
पण कदाचित सरसकटीकरणासारखाच विट्रिऑलिकचा देखील अर्थ इथे निराळा लावला जात असावा. असो.

राजन बापट Sat, 24/08/2013 - 20:22

In reply to by रोचना

व्हिट्रिऑल म्हणजे रे काय भाऊ?

अरे, ते एक प्रकारचे पेय आहे.

पेय म्हणजे काय रे भाऊ?

अरे जे आपण पितो त्यास पेय असे म्हणतात.

जे आपण खातो त्यास काय रे म्हणतात भाऊ?

छे बुवा, तू तर फारच प्रश्न विचारतोस. अरे, व्हिट्रिऑल हे एक प्रकारचे विषारी पेय आहे.

हं, हं, म्हणजे दूध का रे भाऊ?

अरे नव्हे, दूध नव्हे. अरे, व्हिट्रिऑल व दूध याच्यामधे जमीन-अस्मानाचा... जमीन-अस्मानाचा फरक असतो. व्हिट्रिऑल हे एक प्रकारचे विषारी पेय आहे.

विषारी ? विषारी म्हणजे काय रे भाऊ?

अरे, जे प्यायले असताना ... बरं का, जे प्यायले असताना मनुष्य तडफड तडफड तडफड तडफड करीत रहातो, त्यास विषारी असे म्हणतात.

हं, म्हणजे आपली अदिती का रे भाऊ?

अरे नव्हे. अरे व्हिट्रिऑल हे एक प्रकारचे विषारी पेय आहे, जे प्यायले असताना मनुष्य दिवसभर गलिश्श गलिश्शं शिव्या देतो व गडाबडा लोळत लाथा मारत सुटतो त्यास विषारी असे म्हणतात

म्हणजे आपले ऐसीअक्षरसंपादक का रे भाऊ?

अरे नव्हे, आता काय बरे करावे, मी तर बुचकळ्यातच पडलो आहे. व्हिट्रिऑल हे एक प्रकारचे विषारी पेय आहे जे प्यायले असताना माणसास आपण सकाळी काय बोललो आहोत ते दुपारी आठवत नसते व ज्याच्या बोलण्यात कसल्याही प्रकारचा ताळतंत्र नसतो त्यास विषारी असे म्हणतात.

म्हणजे आपले मुक्तसुनीत का रे भाऊ?

अरे नव्हे, आता काय बरे करावे? मी तर तुझ्यापुढे हातच टेकले बुवा

अरे व्हिट्रिऑल हे एक प्रकारचे विषारी पेय आहे. ते कधीकधी लाल लाल लाल लाल रंगाचे असते. मात्र भगव्या किंवा हिरव्या रंगाचे कध्धी असत नै.

मग "पुरोगामित्व"असे सरळ का नाही रे सांगत भाऊ?

तुला रे काय ठाऊक?

अरे आपल्या घासकडवींच्या कपाटामधे एक पुरोगामित्वाचे बैबल लप्वीलेले आहे व ते मला अधूनमधून वाचून यायला पाठवितात. तुला पहावयाचे आहे काय?

होय.

तर मग चल माझ्या बरोबर.

अरे इकडून नव्हे, तिकडून.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 22:06

In reply to by राजन बापट

माध्यमांमधे होणारं चित्रण आणि त्याबद्दल असणारा कोडगेपणा म्हणा किंवा अनभिज्ञता, उत्सवांमागची लिंगसापेक्ष असमानतेची जाणीव खरंच विरळ होत गेली/चालली आहे का? असेल तर कोणत्या समाजात? रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळीपाडवा या सणांची गणती एकत्रच करताना रोचनाच्या वरच्या प्रतिसादातल्या या तपशीलाकडे दुर्लक्ष होतंय का?

दिल्लीच्या बसमधल्या मुलीने बलात्कार करणार्‍यांना "भाऊ, दादा" म्हणून संबोधले असते तर तिच्यावर हा अनर्थ घडला नसता, असे गेल्या डिसेंबर मध्ये आसारामबापूंनी विधान काढले होते - त्यांना ही रक्षाबंधन म्हणजे सिस्टर्स डे वाटतो की काय कोण जाणे. अलिकडे "आयडिया" मोबाइल ची एक जाहिरात दिसतेय - दिल्लीच्या पोलीसवाल्याला एक मुलगी राखी बांधते, आणि तो लगेच तिला त्याचा फोन नंबर देतो, कधीही काही मदत हवी असल्यास फोन कर असं म्हणतो. यातील गर्भित अर्थ काय बरं असावा? ही झाली जाहिरात, पण दिल्ली पोलीस चीफने ही "स्त्रिया नवरे-भावांशिवाय एकट्या संध्याकाळी बाहेर पडल्या तर नंतर त्यांनी बलात्काराविरुद्ध तक्रार करू नये" असे विधान केले. अ‍ॅन्ड सो ऑन अँड ऑन अँड ऑन....

राजन बापट Fri, 23/08/2013 - 02:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>माध्यमांमधे होणारं चित्रण आणि त्याबद्दल असणारा कोडगेपणा म्हणा किंवा अनभिज्ञता, उत्सवांमागची लिंगसापेक्ष असमानतेची जाणीव खरंच विरळ होत गेली/चालली आहे का? असेल तर कोणत्या समाजात?

हे बर्‍यापैकी ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. त्यामुळे मग शेवटी (नेहमीप्रमाणे) आपल्याला ठोस माहितीवर यावे लागेल. आता ही ठोस माहिती काय असू शकते ते प्रस्तुत संदर्भांत मला ठाऊक नाही.

>>> रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळीपाडवा या सणांची गणती एकत्रच करताना रोचनाच्या वरच्या प्रतिसादातल्या या तपशीलाकडे दुर्लक्ष होतंय का?

प्रस्तुत संदर्भातल्या आर्ग्युमेंटकरता रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळीपाडवा हे तीनही सण स्त्रीपुरुषांच्या भूमिकांच्याबाबत/असमानतेच्याबाबत एकत्र विचार करण्यासारखे आहेत असे मला वाटले. तसे ते का नाहीत ते ऐकायला आवडेल. ते एकत्र विचार करण्यासारखे का नाहीत हे सांगताना, रोचना यांचा उधृत केलेला प्रतिसाद इथे कसा लागू होतो तेही ऐकायला आवडेल.

रोचना Sat, 24/08/2013 - 20:56

In reply to by राजन बापट

हे बर्‍यापैकी ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. त्यामुळे मग शेवटी (नेहमीप्रमाणे) आपल्याला ठोस माहितीवर यावे लागेल. आता ही ठोस माहिती काय असू शकते ते प्रस्तुत संदर्भांत मला ठाऊक नाही.

या धाग्यात भाग घेण्यामागचा, माझ्या मुद्द्यांचा, प्रस्तुत संदर्भ सांगते.

गेल्या सहा-आठ महिन्यात, दिल्लीत घडलेल्या १६ डिसेंबरच्या बलात्कारानंतर स्त्री रक्षण, सार्वजनिक स्पेसेस मध्ये स्त्रियांचे वावरणे, त्यांचे अधिकार, त्यांच्या जबाबदार्या, पुरुषांचे वागणे, त्यांच्या जबाबदार्‍या या सगळ्यावर प्रचंड प्रमाणात प्रत्येक माध्यमांतून चर्चा झाली आहे. कलकत्त्यात (जेथे मी राहते) गेल्या दोन-तीन वर्षांत बलात्काराच्या घटना खूपच वाढल्याचे समोर आले आहे - गेल्या दोन महिन्यांतच खूप भयानक काही केसेस घडल्या आहेत - बलात्काराच्याच नाही तर मध्यमवर्गीय परिसरांमध्ये देखील महिलांना सामोरे जावे लागणारे प्रश्न इ - त्यावरूनही खूप चर्चा घडली आहे, घडतेय. हा एक ज्वलंत विषय आहे. इथे राहून, रोज पेपरात, मेट्रोत, घरी, ऑफिसात, राजकीय - माध्यमिक मंचांवर, सर्वत्र हे कानावर पडत आहे.

यात "स्त्रियांचे रक्षण" या विषयावर त्यांचे काही विशिष्ट नात्यांतून होणार्या रक्षणाला प्राधान्य दिले जात आहे असा माझा अनुभव आहे - भावांनी, वडिलांनी, नवर्‍यांनी, मुलांनी त्यांच्या "आया-बहिणींचे, बायको-मुलींचे" रक्षण करावे याला प्राधान्य दिले जात आहे. स्त्री ही कोणी का असेना, - अविवाहित, आई, विधवा, कन्या, मुलगी, समलिंगी मानव, एक व्यक्ती, वेश्या, घरमालक, लेखक, दुकानदार, वॉटेवर - रक्षणास पात्र मात्र काही विशिष्ट नात्यात असलेल्या, आणि त्यांना मुख्य मानणार्‍या स्त्रियाच आहेत असे आवर्जून सुचविले जात आहे. स्वत:च्या रक्षणाची इच्छा बाळगणार्‍या स्त्रियांनी राजकीय, सुरक्षा व्यवस्थेकडे एक व्यक्ती, नागरिक म्हणून न पाहता, सभ्य नात्यांमध्ये राहून पेट्रिआर्कल कुटुंबव्यवस्थेतूनच पुरुषांकडून रक्षण घ्यावे, हे ठासवले जात आहे. रक्षा-बंधन, भाऊबीज, या रूपकातूनच या चर्चा घडत आहेत. मी वर दोन-तीन उदाहरणे दिली. अजूनही आहेत - सौरव गांगुलीच्या "दादागिरि" गेम शो च्या जाहीरातीत दोन टगे मुलींना त्रास देत असतात. त्या त्वरित राख्या बांधतात, आणि ते लगेचच सुधारतात, सोशली अप्रूव्ड दादा बनतात. पोलीसांना ही असेच सुधारण्याकरिता आमच्या "दिदि" सी.एम यांनी भर पब्लिक मध्ये पोलिसांना राखी बांधली - कारण स्त्रियांकडून छेडखानीचे, बलात्काराचे एफ.आय.आर लिहून घेण्याचे त्यांच्यात प्रमाण वाढावे म्हणून. दोन वर्षांपूर्वी बलात्कार झालेली स्त्री रात्री बियर पिऊन एकटी घरी चालली होती, म्हणजे ती वेश्याच असणार, हिच्यावर कसला बलात्कार, गिर्हाइकाशी फक्त भांडण, असे याच "दिदि" म्हटल्या होत्या. पोलिसांबरोबर रक्षा बंधन साजरा करण्याची एक नवीन लाटच आलेली दिसते. डिसेंबर नंतरच्या मोर्च्यांमध्ये, अलिकडे कलकत्त्यातही बरीच प्रदर्शनं झाली, त्यात अनेक विविध सामाजिक गटांनी, स्त्री-पुरुष सर्वांनीच, या पितृसत्ताक रक्षण दृष्टीकोनाचा निषेध नोंदवला. त्यात असल्या सणा-संबंधांच्या रूपकाच्या वापराचा निषेधही होता, मी माझ्या मुद्द्यांना त्याचाच भाग समजते.

आय कुड गो ऑन बट यॉर गुगलिंग इस अ‍ॅस गुड अ‍ॅस माइन. पण सांगण्याचा मुद्दा हा, की "मूळ कल्पने" पासून या सणांचा अर्थ वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर बदलले असले, त्यात ठळक असमानता ठासवली जात नसली तरी सामाजिक-राजकीय डिस्कोर्स च्या पातळीवर मला या सणांचे सिंबॉलिक महत्त्व घटले आहे हे पटत नाही. उलट त्यांना, खासकरून रक्षाबंधनाला आजच्या वातावरणात नव्याने, धारदार महत्त्व दिले जात आहे. स्त्रियांच्या रक्षणाची चर्चा त्यांच्या चौकटीतून होते आहे, आणि त्यात एका विशिष्ट स्त्रीच्या इमेजला - अबला बहिणीला - आदर्श म्हणून उचलून धरले जात आहे. यातूनच चांगल्या मुली बहिणीच, आणि ज्या या नात्यांना महत्त्व देत नाहीत त्या चांगल्या नसतातच, त्यांनी स्वत:वर छेडखानी, बलात्कार ओढवून घेतलेले असतात, असा तर्क लागत जातो. दिस इस सो ऑबवियस दॅट आय विल स्टॉप.

लग्नसंस्थेसारखेच सगळे सण, संबंध बदलतात, त्यांतील मूळ विचारांना, असमानतेला बदलण्याला वाव आहे, बदल झाले आहेतही. त्यामुळे भाऊबीज-राखीला ही नव्याने समान स्वरूप मिळत असेल, मुलांसकट मुलींनाही अबला म्हणूनच नाही तर समान हक्काचे भावंड म्हणून कुटुंबात, समाजात सेलेब्रेट केले, तर काहीच वाईट नाही. अशा सणांना प्रचंड सामाजिक, इमोशनल महत्त्व आहे हे मी मानते. नारळीभात खाण्याच्या निमित्ताला माझा अजिबात विरोध नाही. या निमित्तांना पूर्ण त्यागण्यापेक्षा बदलणे, अपडेट करणे गरजेचे आहे हे ही मान्य. समलिंगी जोडपी उगाच का लग्नासाठी झगडतात?

पण वर दिलेल्या कारणांमुळे, अशा सणांमागील मूळ कल्पनेचा निषेध, आणि विश्लेषण करणे, त्यांविरुद्ध बोलणे हे देखील मी महत्त्वाचे समजते. "अहो, ते सगळे जुने झाले, आता नुसते पार्टीचे निमित्त!" हा मला एकीकडे भाबडेपणा तर दुसरीकडे विलफुल ब्लाइंडनेस वाटते. या सणांचे धागे याच सणांपुरते सीमित नसून कन्यादानापासून ते स्त्रीभ्रूण हत्येशी निगडीत आहेत. याचा अर्थ हे सर्व समान पातळीच्या प्रथा असा अर्थातच होत नाही. पण स्त्री-पुरुष विषम संबंधांना राबवण्याचे निराळे पैलू मात्र आहेतच. हे म्हणण्यात विट्रिऑलिक, फॅशनेबल, "झोडपणे", असे काही मला वाटत नाही.

ही विधाने भलेही न पटोत, पण त्यांच्या मागचे प्रस्तुत संदर्भ थोडे स्पष्ट झाले आहेत अशी आशा आहे.

मेघना भुस्कुटे Sat, 24/08/2013 - 21:27

In reply to by रोचना

मार्मिक श्रेणी देऊन समाधान झाले नाही, म्हणून मुद्दामहून सहमतीदर्शक प्रतिसाद देतेय. आपण समजतो किंवा आपल्याला समजायला आवडते तितक्या गोष्टी वॉटरटाइट कम्पार्टमेण्ट्समध्ये नसतात. म्हणूनच प्रतीकांचा निषेध करणेही महत्त्वाचे.

राजन बापट Sat, 24/08/2013 - 22:29

In reply to by रोचना

प्रतिसाद माहितीपूर्ण आणि प्रस्तुत संदर्भावर प्रकाश टाकणारा आहे. त्याला मार्मिक श्रेणी दिली आहे.

या प्रदीर्घ प्रस्तावातल्या काहीशा अस्ताव्यस्तपणामधून काही सुटे मुद्दे हाताशी लागतात का हे मला उपयोगी वाटते.

मुद्दा : १. अलिकडे बलात्काराच्या घटना (बातम्यांद्वारे) समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. या बातम्यांमधे महानगरांचा उल्लेख अधिक येताना दिसतो.

- या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत की अधिक प्रमाणात त्या पुढे येत आहेत/बातम्यांमधे येत आहेत/प्रकाशात येत आहेत याबद्दल मला काहीसा संभ्रम आहे. हे निश्चित सांगण्याकरता लागणारी ठोस माहिती माझ्याकडे नाही. (जे मी मागे मांडलेले आहे. ) महानगरांमधल्या बातम्या अधिक येण्यामागेही, महानगरातल्या जनतेच्या हक्कांची जाणीव आणि हक्क व्यक्त करण्याची माध्यमांची उपलब्धता हे अधिक कारण असावे काय ? अशी मला शंका येते. गावाकडेही या घटना घडत असतील पण (उदाहरणार्थ) शेतमजूरांच्या स्त्रियांवरील अत्याचारांची नोंद नियमित प्रमाणात माध्यमे घेत नाहीत - पर्यायाने आपल्यापर्यंत पोचत नाहीत अशी मला एक शक्यता वाटते.

२. बलात्कारांच्या/लैंगिक हिंसाचारांच्या बातम्या अधिकाधिक यायला लागल्यापासून विविध स्तरांमधे आणि विविध स्तरांमधे चर्चा होत आहेत. या चर्चांतून हा विषय ज्वलंत/चिंतेचा/संतापाचा विषय बनलेला आहे हे दिसते. हेच जाहिरातींपासून अन्य चित्रणामधेही प्रतिबिंबित होते.

- हे निश्चितच मान्य करावे असे निरीक्षण आहे.

३. ही सार्वजनिक चर्चा "बलात्काराचे लक्ष्य बनलेल्या स्त्रियांच्या रक्षण" अशा दिशेने (सर्वसाधारणपणे) वळल्याचे जाणवते. या चर्चांमधून किंवा त्यातल्या निष्कर्षांतून " स्वत:च्या रक्षणाची इच्छा बाळगणार्‍या स्त्रियांनी राजकीय, सुरक्षा व्यवस्थेकडे एक व्यक्ती, नागरिक म्हणून न पाहता, सभ्य नात्यांमध्ये राहून पेट्रिआर्कल कुटुंबव्यवस्थेतूनच पुरुषांकडून रक्षण घ्यावे, हे ठासवले जात आहे."

- स्त्रियांनी परंपरागत चौकटीत बसावे, त्यात त्यांचे हित आहे. त्यांचे "संरक्षण"सुद्धा आहे - हा संदेश माझ्यामते आजचा नाही. तो नव्याने सिनेमा/नाटक/साहित्य/जाहिरातींवाटे दिला जातो आहे असे मला वाटत नाही. स्त्रीपुरुष समानतेचा संदेश देणारी सरकारी माध्यमे बर्‍यापैकी पेडेस्ट्रियन शैलीत तो संदेश देत होती/देत असावीत.
पॉप्युलर मिडीया आणि कल्चरमधलं स्त्रियांचं चित्रणही बर्‍यापैकी असमानतेचा संदेश देणारं होतं. याउलट, गेल्या दहा वर्षांमधे सिनेमा/नाटक/साहित्य/जाहिरातींवाटे स्त्रियांचं चित्रण करणार्‍या पद्धतीमधे जो सर्वसाधारण बदल झाला आहे तो स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. (इथे मी पोलिस दादाने /गांगुली दादाने संरक्षण द्यावे अशा गोष्टींना धरत नाही हे अर्थातच नमूद करतो)

मुद्दा ४. लग्नसंस्था, कुटुंबसंस्था, अन्य सामाजिक संदर्भ यातील स्त्रीपुरुषांचे संबंध बदलल्यासारखे दिसते. हे संबंध "अपडेट होणे" गरजेचे आहे.

- अर्थातच मान्य. मुद्दा असा की, ही "अप्डेट" होण्याची प्रक्रिया चालू झाली आहे का ? माझ्या मते होय. ती पुरेशा वेगाने घडते आहे का ? माझ्यामते नाही.

मुद्दा : ५. मात्र या नात्यांमागच्या पारंपरिक असमानतेचा निषेध करणे आवश्यक नि निकडीचे आहे. याची "व्हिट्रिऑलिक" अशी संभावना करणं अयोग्य.
याबद्दल दुमत नाही. ते वर मी नोंदवलेलं आहे.

असो. वर केलेल्या "छाननी"चा उद्देश चर्चेमधे स्पष्टपणा आणण्याचा प्रयत्न असा आहे हे (पुन्हा एकदा) नोंदतो.

बॅटमॅन Sun, 25/08/2013 - 15:20

In reply to by रोचना

आत्तापर्यंत या चर्चेत नुसते एकांगी प्रतिसाद जास्त चालले होते. त्या तुलनेत हा प्रतिसाद उत्तम ब्यालन्स्ड वाटला. तदुपरि मूळ कल्पनेविरुद्ध बोलणे जास्त चांगले की कसे याबद्दल असहमती नोंदवतो. खाली अदितीच्या एका प्रतिसादात प्रतीकांच्या निषेधावर बरेच काही आलेले आहे. जे साधू पाहताय ते याने कितपत साधणारे अशी शंका येते. असो.
त्यामुळे बाकी सोडून प्रतीकांना झोडपणे हा उद्योग तौलनिकरीत्या अनुत्पादक वाटतो.

याजागी मराठी शब्द वापरले तर उगीच अजून आरोप होतील, तेव्हा ते नकोच. औट ऑफ फ्याशन पडण्याचे तोटे या निमित्ताने विशेषकरून जाणवले.

अजून एकः तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीवर थोडेतरी प्रिस्क्रिप्टिव्ह काही बोलाल अशी अपेक्षा होती. तस्मात अंमळ भ्रमनिरास झाला. (ही अपेक्षा वेडगळ असेल तर असो. आयमाय स्वारी.)

ऋषिकेश Mon, 26/08/2013 - 09:34

In reply to by रोचना

मध्यमवर्गीय किंवा शहरीपेक्षा 'पॉलिटिकली महत्त्वाचे तरिही अनडिसायडेड' अशा वर्गातील प्रकरणांना जास्त प्रसिद्धी मिळते आहे असे म्हणता यावे.
बाकी, प्रतिसाद आवडला.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 22:01

जगात आई जितक्या वाईट प्रकारे मुलांना कमी लेखते तितके दुसरे कोणी लेखत नसावे. शेवटी ती त्याच्याकडून (म्हणीनुसार लिंग वापरले आहे, दुसरे वापरले तरी चालेल) 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' मनवून (मानणे चे रुप) घेते.

राजेश घासकडवी Thu, 22/08/2013 - 22:15

सणांमागच्या भावना, उद्देश हे मला काहीवेळा शिव्यांच्या अर्थांसारखे वाटतात. पहिल्या वेळेला एखादी शिवी दिली जाते तेव्हा आपल्या मनात तिचा अर्थ ताजा, धारदार असतो. नंतर हळूहळू वापराने तो बोथट होतो. आणि कालांतराने तिला शिवीपण रहात नाही. आता 'च्यायला' सारखा शब्द, एके काळी सुसंस्कृत घरात चालला नसता, आता चालतो.

सण साजरे करताना त्यामागे अनेक उद्देश असतात. भावांनी बहिणींना आधार देण्याची, रक्षण करण्याची गरज एके काळी होती. त्यामुळे त्या जबाबदारीची आठवण म्हणून भाऊबीज, रक्षाबंधन वगैरे सण आले. आता परिस्थितीबरोबर तो उद्देश मागे पडत चाललेला आहे. 'च्यायला' हा शब्द जसा निव्वळ वजनापुरता शिल्लक राहिला आहे त्याप्रमाणे बहिणीला आधार देण्यातलं ओझं कमी झालेलं आहे. तो एक प्रकारचा 'सिस्टर्स डे' झाला आहे. हे नातं एकांगी न रहाता अधिक समतोलपूर्ण झालेलं आहे याची जाणीव बऱ्याच भावा-बहिणींना आहे.

मग अशा सणाला विरोध करण्याचं कारण काय? यात विरोध नक्की कशाला हे समजून घ्यायला हवं. रोचना यांनी ते चांगलं मांडलं आहे. 'मी काही राखी बांधणार नाही, कारण मला त्याची गरज वाटत नाही' असं म्हणणाऱ्या मुलीला विरोध होतो. 'अगं साधा दोराच आहे की, बांधलं तर काय बिघडतं?' असं म्हणणारे 'तो नाही बांधला तर काय बिघडतं?' याचं उत्तर देऊ शकत नाहीत. एखाद्या प्रथेला आता अर्थ राहिलेला नसला तरीही, ती करत आलो म्हणून करायची या मानसिकतेला विरोध आहे. ज्याला करायची असेल त्याने खुशाल करावी, मला करायची नसेल तर मला ती न करण्याचं स्वातंत्र्य हवं. तसं म्हटलं तर कोणीच डोक्याला पिस्तूल लावून 'बांध ती राखी' असं म्हणत नाही. पण तरीही मला निरर्थक वाटणारी आणि जिचा ती प्रथा जपण्यापलिकडे काहीही उपयोग नाही अशी गोष्ट करण्याची अपेक्षा समाज माझ्याकडून ठेवतो. आणि ती न केल्याबद्दल माझ्याकडे जजमेंटल होऊन बघतो. या बाबतीत समाजाने थोडं शिथिल आणि कमी जजमेंटल व्हावं असं मला वाटतं.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 22:19

उत्सवांमागची लिंगसापेक्ष असमानतेची

या संकल्पनेचे राखी बांधून 'पहा मी कसा तुझ्यापेक्षा सबल आहे आणि मी रक्षण करणार , तू दुर्बल" हे एक उदाहरण आहे. इतर कोणेती उदाहरणे आहेत? कोणते सण (असल्यास), इ यांच्या मधे असा कुटील अर्थ नाही त्यांची यादी बनवता येईल का. उगाच माणसाचे उत्सवप्रिय असणे एका दुष्ट पद्धतीचे पोषण नको.

राजेशजी म्हणतात कि सण इ म्हणजे नात्याला शिवी असा प्रकार पण अभिप्रेत होता. हे पहिल्यांदा टाळायला हवे. यांची वेगळी यादी हवी.

राजेश घासकडवी Fri, 23/08/2013 - 21:40

In reply to by अजो१२३

राजेशजी म्हणतात कि सण इ म्हणजे नात्याला शिवी असा प्रकार पण अभिप्रेत होता.

अहो माझा प्रतिसाद नीट वाचा हो. मी नात्याला शिवी वगैरे बिलकुल म्हटलेलं नाही.
'शिवीचा अर्थ काही काळाने बोथट होतो' तद्वतच 'सण साजरे करण्यामागचे उद्देश काही काळाने विसरले जातात'. ही साधी उपमा आहे. त्याऐवजी
'टोकदार, विशिष्ट आकार असलेला दगड जसा गुळगुळीत होऊन त्याचा निव्वळ गोटा शिल्लक रहातो' तद्वतच 'सण साजरे करण्यामागचे उद्देश काही काळाने विसरले जातात' असंही म्हणता आलं असतं. आता त्यावरून मी 'नात्याला दगड किंवा गोटा म्हणतो' असा कोणी निष्कर्ष काढणं योग्य नाही.

(च्यायला या मराठी भाषेमध्ये फारच त्रुटी आहेत ब्वॉ!)

अजो१२३ Fri, 23/08/2013 - 22:56

In reply to by राजेश घासकडवी

स्वारी, स्वारी.

पण लिहिले आहे त्याचे दोन्ही अर्थ निघतात असं वाटतं. मी वाईट अर्थ काढला. चोराच्या मनात चांदणे. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/08/2013 - 06:15

वर्षातल्या एका दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे आणि राखी बांधणे हा तद्दन मूर्खपणा आहे ...

मूर्खपणा आणि/किंवा अंधश्रद्धा आहे का नाही याबद्दल नो कमेंट्स! पण ही सिंबॉलिक गोष्ट स्त्रीद्वेष्टी जरूर आहे.

ऋषिकेश Fri, 23/08/2013 - 09:22

माझ्या लेखी सज्ञान भावाने सज्ञान बहिणीची, पालकांनी सज्ञान मुलीची, नवर्‍याने बायकोची, मुलाने आईची काळजी घेण्यास प्रत्यवाय आहे की नाही (कित्ती दिवसांनी हा शब्द वापरला :P) हे ती "काळजी घेणे" म्हणजे काय? यावर ठरते.

जर ही मंडळी आपल्या आई-बहिण-बायको ला तथाकथित काळजीपोटी 'हे करू नकोस, इथे जाऊन नकोस, हे कपडे घालु नकोस, असे-तसे वागू नकोस' वगैरे बंधने म्हणा, नियम म्हना, सल्ले म्हणा वगैरे देऊन त्या सज्ञान स्त्रियांना स्वतःचे संरक्षण करण्याइतकी अक्कल नाही अश्या मानसिकतेचे प्रदर्शन करणार असतील तर ती "काळजी करणे" ही सोयीस्कर पळवाट आहे किंवा आपल्याच वर्चस्ववादाला स्वतःपासूनच झाकण्यासाठी स्वतःच स्वतःच्या मनाची घातलेली समजूत तरी!

मग "राखी" ही 'अश्या प्रकारची' काळजी घेण्यासाठी बांधलेली असेल तर ती स्त्रीद्वेष्टेपणाचे प्रतीक ठरते असे कोणाला वाटले तर ते अग्राह्य ठरू नये!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 23/08/2013 - 09:40

In reply to by ऋषिकेश

हे तर आहेच.

आणि पुन्हा गंमत अशी की एका बाजूने "लैंगिक अत्याचार टाळण्यासाठी काळजी घ्या" असं म्हणायचं. आणि दुसर्‍या बाजूने काय म्हणे तर, बहिणीचं रक्षण करावं म्हणून भावाला तिने राखी बांधायची! रक्षण करायचं तर रक्षण करा किंवा स्वतः काळजी घ्यायची अपेक्षा आहे तर त्यांचं त्यांना काय ते बघून घेऊ द्या. घोडा बोलो नही तो चतुर बोलो.

मेघना भुस्कुटे Sat, 24/08/2013 - 11:16

या प्रतिसादासंदर्भात बैल गेला नि झोपा केला (या झोपा शब्दाचं मूळ / मूळ अर्थ काये सांगा बॉ कुणी) ही म्हण लागू होणारेय खरी. पण इलाज नाही. असो.
***

प्रत्यक्ष अन्यायाला केलेला विरोध आणि गतकालीन स्मृतींची प्रतीकं असणार्‍या परंपरांचा केलेला निषेध या दोन निरनिराळ्या आणि तितक्याच आवश्यक गोष्टी आहेत.

विद्या बाळांची आठवण या संदर्भात आली. स्त्रियांवरच्या प्रत्यक्ष अन्यायाला त्या जितक्या प्रखरपणे विरोध करतात, तितक्याच सजगपणे 'इतकंही होईना! बांगड्या भराव्या मग!' किंवा 'समाज नामर्द झालाय' यांसारख्या भाषिक भेदभावाचाही निषेध नोंदतात. धर्मावरती त्यांचा विश्वास नसतानाही शिंगणापूरच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी अंनिसला दिलेला पाठिंबाही याचंच उदाहरण. प्रत्यक्ष अन्याय नसेलही. पण प्रतीकात्मक अन्याय आहे नि त्यालाही ठामपणे विरोध करणं तितकंच महत्त्वाचं.

दुसरं उदाहरण 'इराण जागा होतोय' या पुस्तकाच्या लेखिका नोबेलविजेत्या शिरीन इबादी यांचं. त्यांचं लग्न झाल्यानंतर इराण खोमेनीच्या राजवटीखाली आला. तोवर स्त्रियांवर इतकी बंधनं नव्हती. त्या इस्लामी क्रांती(!)नंतर मात्र पुरुषांना लग्नाच्या बायकोला कसेही वागवण्याचे, शिक्षा करण्याचे, टाकण्याचे मुक्ताधिकार मिळाले. वास्तविक शिरीन यांचा प्रेमविवाह होता. त्यांचा नवरा विवेकी आणि आधुनिक विचारांचा होता. तो या अधिकारांचा वापर करण्याची शक्यता जवळजवळ शून्य होती. पण त्या फतव्यानंतर शिरीन कमालीच्या अस्वस्थ झाल्या. त्यांच्या नवर्‍यानं वकीलाकडे जाऊन आपण हे सगळे अधिकार सोडून देत असल्याचं आणि आपल्या पत्नीच्या व आपल्या कायदेशीर हक्कांमध्ये समानता असल्याचं जाहीर करणारी कागदपत्रं करून आणली, तेव्हा त्यांना शांत वाटलं. इथेही अन्याय केवळ प्रतीकात्मकच होता नि तरीही त्याचा निषेध करणं ही कळीची गरज.

जे लोक या प्रतीकात्मक अन्यायाच्या विरुद्ध टोकाला असतात (उदा. 'म्हाराची बाईल, किती दिवस झाकाल? आज ना उद्या येईलच ना उघड्यावर हगायला!' या वाक्प्रचाराची धग न जाणवणारे सवर्ण. किंवा कन्यादान या प्रथेत काय बरं इतकं झोंबण्यासारखं आहे, असा निरागस प्रश्न पडणारे पुरुष. किंवा... असो.), त्यांना हा निषेध निरर्थक वाटतो. कारण त्यांचं 'जळत' नसतं! बरेचदा 'आधी जाऊन ते अमकं थांबवा नि मग असले प्रतीकात्मक निषेध नोंदवायला या म्हणावं' असे शहाजोग (याचंही एक मूळ सांगा बॉ) सल्लेही दिले जातात.

अशा सल्ल्यांना सर्वाधिक परिणामकारक शिवी असलेल्या अनुल्लेखानं मारावं नि त्यांना असले सल्ले द्यावेसे वाटताहेत हा आपल्या निषेधाचा एक चांगला परिणाम समजावा, हे मी हळूहळू शिकते आहे. त्या शिक्षणाला स्मरून, स्त्रीला अबला ठरवणार्‍या राखीपौर्णिमा या सणाचा माझ्याकडूनही निषेध. :)

नितिन थत्ते Sat, 24/08/2013 - 11:21

In reply to by मेघना भुस्कुटे

हे पहावे

इंग्रजीत क्लोजिंग द डोअर आफ्टर द हॉर्स हॅज बोल्टेड अशी म्हण आहे ती त्याच अर्थाची आहे.

अजो१२३ Sat, 24/08/2013 - 15:03

In reply to by मेघना भुस्कुटे

अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीने माझं जळतं. अति शहाणी तिची म्हैस रिकामी अशी एक म्हण नाही.

बाजारात तुरी भट भटणीला मारी याने तर माझं अजूनच जळतं. प्राप्त नसलेल्या गोष्टीसाठी माझ्या जातीचे नर फार सेंटीमेंटल असतात हा एक आरोप. ते आपल्या बायकांना मारतात हा दुसरा आरोप.

रोचना Sun, 25/08/2013 - 00:26

In reply to by मेघना भुस्कुटे

हा प्रतिसाद नंतर वाचला!
+१. वाक्प्रचाराचा मुद्दा विशेष पटला. घरातल्या एका लहान मुलाला फसवून-रमवून-रागवून कसेबसे रोज दोन ग्लास दूध पाजले जाते. ते झाल्यावर माझी एक मावशी रोज म्हणते "हुच्ची अत्तीमनीग होदरं आतू!" (वेडी कशीबशी सासरी पोचली की झालं!) त्यात नेमकं काय मला खटकतं ते तिला मी काही केल्या समजावू शकले नाही! वर "बोडकी"चा ही वाक्प्रचारात उल्लेख आलाच आहे.

नितिन थत्ते Sat, 24/08/2013 - 11:15

आमच्या लहानपणी राखी पौर्णिमेपेक्षा* नारळी पौर्णिमा हाच मुख्य सण होता ठाण्याला.

*बहीण नसल्यामुळे मला तसे वाटत असण्याची शक्यता आहे. पण राखी पौर्णिमेपेक्षा नारळी पौर्णिमाच लक्षात आहे.

नितिन थत्ते Sat, 24/08/2013 - 11:17

नवर्‍याला सातजन्म* त्याच बायकोला सहन करायची सक्ती करणार्‍या वटपौर्णिमेचा निषेध.

दर जन्मात पुढच्या सात जन्मांची तरतूद करून घेण्याबद्दल आणखी निषेध.

अजो१२३ Sat, 24/08/2013 - 15:38

या धाग्यात रक्षाबंधनाचा बराच निषेध झालाय. त्यामागचा सुर तो सण स्त्रीयांना कमी लेखतो, अबला ठरवतो असा आहे. त्यासाठी दिलेला युक्तिवादही मान्य करावा इतका व्यवस्थित आहे, डोळे उघडणारा आहे.

उत्तर भारतातली राखी दक्षिण भारतातल्या राखी पेक्षा जूनी आहे. उत्तर भारतात, राखी बांधून बहीण भावाचे रक्षण करते, ती राखीच भावाचे रक्षण करते असा संकेत आहे. महाराष्ट्रातल्या लातूरच्या मला हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेच्या बहिणीने जेव्हा 'आता माझ्या राखीने तू सुरक्षित राहशील' असे सांगीतले तेव्हा मी तो प्रकार फार गंभीरपणे (एका अपमानीताने घ्यावा तसा) घेतला नाही. मी तुझे कि तू माझे रक्षण करणार या वादात ती जिंकली कारण तिथे बसलेल्या सर्वांनी मला, आमच्याकडच्या राखीचा अर्थ सांगताना, वायझडात काढले.

त्या विशिष्ट बहिणीचा मी निषेध करणार नाही कारण ती म्हणाली कि शेवटी माझा सदुद्देशच आहे, तू मूर्खासारखा इगो मधे आणू नको. पण हा धागा वाचल्यानंतर संपूर्ण उत्तर भारतीय बहीणींनी आपल्या भावांना कितीतरी हजार वर्षे कसे 'अबल' ठरवले आहे याची जाणिव होते. पण साधारणतः कोणत्याही पुरोगामी मानवाने, मानवीने दक्षिण भारतीय पुरुष आणि उत्तर भारतीय स्त्रीयांची पारंपारिक मानसिक विकृती ओळखून असावे आणि तिचा निषेध नोंदवावा असे प्राथमिक अंदाजावरुन वाटते.

काळा मठ्ठ बैल … Sat, 24/08/2013 - 15:17

या प्रतिसादासंदर्भात बैल गेला नि झोपा केला ही म्हण लागू होणारेय खरी

अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीने माझं जळतं.

माणसाच्या भानगडीत बैलाचे येता जाता धिंदवडे काढता!
हा अन्याय सहन केला जाणार नाही.
बायकांसकट तमाम माणसांचा त्रीवार निषेध.

अति शहाणी तिची म्हैस रिकामी अशी एक म्हण नाही.

आमच्या त्या गायी. तुमच्या त्या म्हशी.
तरीपण तुमचा निषेध!

इंग्रजीत क्लोजिंग द डोअर आफ्टर द हॉर्स हॅज बोल्टेड अशी म्हण आहे ती त्याच अर्थाची आहे.

इथ बरेच घोडे आहेत.
तरीपण घोड्यांना नावं ठेवताय.
तुमचापण निषेध.

कळावे,
तुमचा पोलिटिकली करेक्ट बैल.

अजो१२३ Sun, 25/08/2013 - 20:47

In reply to by काळा मठ्ठ बैल …

काळा मठ्ठ बैलजी,
मी आपल्या आयडीला आदरार्थी कसे संबोधता येईल याचा बराच विचार करत असतो. एरवी मी प्रत्येकाच्या आयडीसमोर 'जी' लावून त्या व्यक्तिबद्दल सामाजिक संवादातील सन्मान प्रगट करायचा प्रयत्न करतो. काळाजी, मठ्ठजी आणि बैलजी पैकी मला काळाजी हा सर्वोचित वाटला म्हणून मागे मी तो एका धाग्यावर आपल्याला संबोधताना वापरला. परंतु अधिक विचारानंतर माझ्या असे लक्षात आले कि मी हा जो 'कसे बरे आदरार्थी संबोधावे' हा विचार करतो तसे करणेच मुळी फार अनादरसुचक आहे. आतापर्यंत इतका विचार मी केला त्याबद्दल क्षमस्व.

सबब प्रतिसादात म्हणींचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सबब शुद्धी वैज्ञानिक शुद्धी असून तिचे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातल्या शुद्धीचे काही देणे घेणे लागत नाही हे अगोदर नोंदवतो.

१.बाजारात तुरी भट भट भटणीला मारी यात ब्राह्मणांची निंदा आहे. इतकी वर्षे त्यांची निंदा झाली आहे तर आता इथे दुसरी जात घालावी असे प्रथम वाटले.
पण त्या दुसर्‍या जातीच्या संस्कृतीरक्षकांकडून मार खाण्याची शक्यता निर्माण झाली. मार देणार नाही अशी जात सुचेना आणि सुचली तर त्यात भटणी सारखा प्रकार मिळेना. उदा. मराठा, मराठणी.

ब्राह्मण वजा जाता समाजाचा कोणता घटक आहे का ज्याची एखाद्या विषयावर भांडणं वेळेआधी चालू होतात असा विचार केला. तर लक्षात आले कि तत्वज्ञ लोक असे असतात. ते प्रत्येक विषयावर वेळेआधी समाजात गदारोळ उडवून देतात. त्याने ती म्हण अशी बनली - बाजात तुरी आणि तत्त्वज्ञ तत्त्वज्ञेला मारी. मग लक्षात आले कि यात पुरुषी वर्चस्ववाद आहे. मग ती पून्हा बदलली - बाजारात तूरी आणि तत्त्वज्ञा तत्त्वज्ञास मारी. पण तरी यातून विषमता जाईना.
बाजारात तूरी आणि तत्त्वज्ञ/तत्त्वज्ञा तत्त्वज्ञेस/तत्त्वज्ञास मारी. तरीही यातल्या प्राधान्याला कुणाचा आक्षेप निघणारच. पण असो, आपण एक तळटीप ठोकू कि प्राधान्यास महत्त्व नाही. पण आता प्रश्न आला मारण्याचा. म्हण अशी लिहिल्याने हिंसेस चालना दिल्यासारखे होईल. मतभिन्नता असते तिथे सरळ मारामारी नसते असे अहिंसावादी म्हणणार. मग ते बाजारात तूरी आणि तत्त्वज्ञ/तत्त्वज्ञा तत्त्वज्ञेस/तत्त्वज्ञास प्रवादाने प्रताडित करी. चुकलं...चुकलं...बाजारात तूरी आणि तत्त्वज्ञ/तत्त्वज्ञा तत्त्वज्ञेशी/तत्त्वज्ञाशी प्रवाद करी. आता 'अति शहाणा' मधे बैलाबद्दल एकही अपशब्द नाही, तरीही आम्हाला गोवले असा शब्द आपल्याकडून आला. तसा बाजाराला गोवले म्हणून भांडवलवादी काव काव करणार. मग तुरी कुठे ठेवायच्या? थोड्या मागे शेतात नेऊन ठेवल्या तर शेतकरी गोंगाट करणार. मला कोणती जागाच सापडत नाहीय, म्हणून मी त्यांना सरकारी गोदामात ठेवतो. सरकार भित्रे आहे, त्याला काहीही केलेले चालते. सरकारी गोदामात तूरी आणि तत्त्वज्ञ/तत्त्वज्ञा तत्त्वज्ञेशी/तत्त्वज्ञाशी प्रवाद करी. तुरीचेही पाठीराखे हजारो. मग तिथे असे काय असते ज्याची कोणीच (तत्त्वज्ञ, तत्त्वज्ञा सोडून) पर्वा करत नाही? उंदीर? हमाल? दुसरी धान्ये? सडणारे धान्य्...छ्या! काहीच सापडेना! हां एक आयडीया आहे....

ती म्हण आपण अशी लिहू ज्याने ती पूर्ण पुरोगामी दिसेल--

सरकारी (फक्त भारताच्या) गोदामात पाणी (पर्यावरण संरक्षकांच्या खुलाशासाठी -धान्य सडवणारे पाणी, त्या पाण्याचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे अशा अर्थाने) आणि (पुढील १,२ किंवा ३,४ शब्दांच्या क्रमास महत्त्व नाही) तत्त्वज्ञ/तत्त्वज्ञा तत्त्वज्ञेशी/तत्त्वज्ञाशी (तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेने नवरा बायकोचे नाते नाही) प्रवाद करी (व्याकरणकारांची आणि अजाणता दुखावलेल्यांची माफी मागून पाचाउत्तराची म्हण पन्नासाउत्तरी कथित, सफल संपूर्ण का ते माहित नाही).

२. अति शहाणा ...
आपल्या जालीय अस्तिवाची मला इतकी दहशत आहे कि मी या म्हणीच्या संदर्भात बैलाचे जितके संदर्भ येतील तितके करण्याचे माझे धाडस होत नाही. मला इंदिरा गांधी, अरुण वैद्य इ इ ची आठवण होऊन घाम फुटतो. सबब ते कॅन्सल.

'न'वी बाजू Sun, 25/08/2013 - 20:56

In reply to by अजो१२३

प्रतिसादमालेची एकंदर 'थीम' पाहता, बैलांशी काही करोन संबंध असावा, असे अगोदर वाटले होते, आणि म्हणोन उलगडा झाला नव्हता. आता समजले.

स्पष्टीकरणाबाबत मनःपूर्वक आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 25/08/2013 - 08:12

ज्यांचं जळतं आणि ज्यांचं जळत नाही तरी कळतं त्यांना उद्देशून वेगळं काही म्हणण्याची आवश्यकता नाहीच.

प्रतीकांचा निषेध माझ्यासाठी दुसर्‍याही एका कारणासाठी आवश्यक ठरतो. स्त्री कोणत्याही प्रकारे दुय्यम मनुष्य नाही हे मला समजतं, पण माझ्याशी थेट संपर्क असणार्‍या आणि माझ्या वयाच्या, स्त्रियांनाही पूर्णपणे समजलेलं, पटलेलं आहे असं मला दिसत नाही. रूढी कशा चुकलेल्या असतील, म्हणजे आपणच दुय्यम असणार अशा प्रकारचे विचारही कानावर येतात. वरवर स्त्रियांना समानतेने वागवतात असं म्हणणारे तरीही प्रत्यक्ष वर्तनात स्त्रीद्वेष्टेपणा ठासून भरलेले लोकही मला माझ्याच आजूबाजूला, शिकलेल्या, मराठी, मध्यमवर्गीय, थोडक्यात माझ्याच समाजात दिसतात; मिडीया, सिनेमा, राज ठाकरेंसारखे संवेदनाहीन राजकारणी लोक तर सोडूनच देऊ या! "तुझं तर बरं चाललंय ना मग याकडे दुर्लक्ष कर" असं सांगणारे इमेल्सही माझ्या इनबॉक्समधे आहेत, पण दुर्लक्ष करणं मला शक्य नाही. घराबाहेर, अनेक ठिकाणी मलाही स्त्रीद्वेष्ट्यांना तोंड द्यावं लागतं; तसंच स्वतःला कमी प्रतीचे मनुष्य समजणार्‍या स्त्रियांबद्दलही आपलेपणा वाटतो. असा आपलेपणा वाटत नसता तरीही अशा प्रतीकांचा निषेध जरूर करावासा वाटतो. कारण,

First they came for the communists,
and I didn't speak out because I wasn't a communist.

Then they came for the socialists,
and I didn't speak out because I wasn't a socialist.

Then they came for the trade unionists,
and I didn't speak out because I wasn't a trade unionist.

Then they came for me,
and there was no one left to speak for me.

-- Martin Niemöller

अरविंद कोल्हटकर Sun, 25/08/2013 - 08:54

ह्या विषयावर आत्तापर्यंत वर इतके लिहिले गेले आहे की त्याहून वेगळे काही लिहावे असे मजपाशी काही नाही. इतकेच म्हणतो की बहुसंख्य भारतीय समाज अजूनहि मनुप्रणीत 'पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने| पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति||' आणि 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' ह्या पुरुषप्रधान विचारांपासून फार दूर गेलेला नाही आणि म्हणून त्याला राखी, भाऊबीज, दिवाळी पाडवा ह्या प्रथांमध्ये काही कालबाह्य आहे असे दिसत नाही.

रोचना, अदिति ह्यांच्या विचारांना माझा पूर्ण पाठिंबा आहे इतकेच नमूद करतो.

नितिन थत्ते Sun, 25/08/2013 - 09:53

वरील मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादातील एका परिच्छेदाविषयी.

>>- या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत की अधिक प्रमाणात त्या पुढे येत आहेत/बातम्यांमधे येत आहेत/प्रकाशात येत आहेत याबद्दल मला काहीसा संभ्रम आहे. हे निश्चित सांगण्याकरता लागणारी ठोस माहिती माझ्याकडे नाही. (जे मी मागे मांडलेले आहे. ) महानगरांमधल्या बातम्या अधिक येण्यामागेही, महानगरातल्या जनतेच्या हक्कांची जाणीव आणि हक्क व्यक्त करण्याची माध्यमांची उपलब्धता हे अधिक कारण असावे काय ? अशी मला शंका येते. गावाकडेही या घटना घडत असतील पण (उदाहरणार्थ) शेतमजूरांच्या स्त्रियांवरील अत्याचारांची नोंद नियमित प्रमाणात माध्यमे घेत नाहीत - पर्यायाने आपल्यापर्यंत पोचत नाहीत अशी मला एक शक्यता वाटते.

१. यात नुसते घटना प्रकाशात येणे इतकेच नाही. पुढे येणे आणि त्या घटनांचा प्रचंड गाजावाजा होणे हे त्या घटनेची बळी कोणत्या क्लासमधील आहे यावर अवलंबून असल्याचे दिसते. त्या अर्थी शेतमजूर स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या येत नाहीत हे मुक्तसुनीत यांनी म्हटलेच आहे. निर्भया आणि आत्ताची घटना यातील बळी पारंपरिक आणि नवीन सोशल माध्यमांमधून व्होकल असलेल्या मध्यमवर्गातील होते म्हणून त्यांच्या केसेसना इतकी प्रसिद्धी मिळाली हे खरे आहे असे वाटते.

२. आणखी एक शक्यता अशी आहे.... मध्यमवर्गातील स्त्रियांनी अर्थार्जनासाठी बाहेर पडणे हे बर्‍यापैकी जुने असले तरी काही वर्षांपर्यंततरी मध्यमवर्गीय महिलांचे अर्थार्जन मुख्यत्वे बँका, एलआयसी, शाळा, सरकारी कार्यालयातील किंवा कुठल्यातरी बर्‍याशा कंपनीत ऑफीसमध्ये कारकुनी* स्वरूपाचे असे. नव्या काळात ही क्षेत्रे विस्तारली आहेत आणि आजवर काम न केलेल्या क्षेत्रांत आणि प्रत्यक्ष फील्डवर्क असलेल्या व्यवसायांत मध्यमवर्गीय महिलांनी पाऊल टाकले आहे. यामुळे या महिलांना कदाचित प्रथमच या परिस्थितींचा सामना करावा लागत असेल. त्यामुळे मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत अत्याचारांचे प्रमाण वाढले असल्याचा भास होऊ शकेल.

*आधीच्या काळातही या चाकोरीबाहेरच्या नोकर्‍यांमध्ये मध्यमवर्गीय महिला अल्प प्रमाणात होत्याच. त्या काळात त्यांनासुद्धा काही परिस्थितींना सामोरे जावे लागत असू शकेल.

अजो१२३ Sun, 25/08/2013 - 21:29

खालील चार वेगवेगळ्या परंपरा आहेत

१. आईने बाळाला दूध न पाजवणे (नच पाजवणे, नेस्लेचे पाजवणे, दुसरे दूध पाजवणे, इ )
२. आईने बाळाला सहा महिने दूध पाजवणे
३. आईने बाळाला तीन वर्षे दूध पाजवणे
४. आईने एका लहान बाळाला त्यानंतरचे बाळ झाल्यावर पून्हा थोडे दूध पाजवणे

अजो१२३ Wed, 28/08/2013 - 17:25

१. मला पुसटसं वाटत आहे कि रक्षाबंधन शब्द केवळ हिंदीत आहे. मराठीत त्या उत्सवाला/दिवसाला राखी पैर्णिमा म्हणतात.

२. वर मी राखी उत्तर भारतात पुरुषांसाठी कशी अन्यायकारक परंपरा आहे ते लिहिले आहे. त्याने मी दक्षिण भारतातल्या एक छोट्याश्या उपगटावर अन्याय केला आहे हे मी विसरलो. लिंगायत समाजात राखीची कल्पना इतर दक्षिण भारतासारखीच आहे पण त्यात एक फरक आहे. त्यात भावाने बहिणीच्या पाया पडायचे असते. मला छोट्या बहिणीकडून घरात पाया पडून घ्यायची सवय. (सवय पाया पडून घ्यायची नसते. पाया पडणाराची पाया पडायची सवय असते. असो.) बाहेर चक्क मला (मी ११-१२ वीला असताना) लिंगायत लोकांच्या शेंबड्या पोरींच्या पाया पडावे लागायचे. माझे तर सोडाच, ७० वर्षाच्या म्हातार्‍यांना दूरच्या नात्याने बहिण पडणार्‍या शाळकरी पोरींना दंडवत घालावे लागायचे. अश्या धाग्याचा मला प्रस्तुतकार भविष्यात बनवले जाणार आहे हे माहित असते तर मोठ्यांकडून अश्या पाया पडून घेण्याची ती ऐट मी कॅमेर्‍यात (तेव्हा नव्हता माझ्याकडे, उगाच एक कल्पना) कैद करून इथे टाकली असती.

१०००-२००० वर्षापूर्वी बस्वेश्वरांनी हिंदु धर्मातल्या स्त्रीविषयक, इतर मागास गोष्टी ओळखून लिंगायत समाज बनवला. http://en.wikipedia.org/wiki/Basava लिंगायत लोकात मासिक पाळीने स्त्रीच्या घरातल्या/धार्मिक कार्यक्रमात काही फरक पडत नाही. (पण आमच्या लिंगायत शेजारणी आमच्या घरातला धार्मिक कार्यक्रम असताना आईला तशी कल्पना द्यायच्या असे आठवते. 'शकुची पाळी चालू आहे म्हणून ती आली नाही' हे वाक्य मला पाळी म्हणजे काय ते कळत नसताना ऐकल्याचे आठवते.) http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20111001135605AAj6FWT पुरोहित आणि अपुरोहित वगळले तर इतर कोणत्या जाती, उपजाती नाहीत.

मी आतापर्यंत काढलेल्या एकाही धाग्याचा (नीट) समारोप झाला नाही. राखी देखिल सरली आहे. या धाग्याचा (तसे इथे मला मारून मुसलमान बनवले आहे हा भाग अलहिदा)मी समारोप करू इच्छितो.

सण, उत्सव, परंपरा अनेक आहेत. त्या प्रत्येक परंपरेची ची कितीतरी जातीय, प्रांतिक, इ इ व्हर्जन्स आहेत. अशा काही परंपरांचा आज अभिप्रेत असलेला उद्देश आहे तर काही परंपरांची केवळ प्रक्रिया आहे, उद्देश माहित नाही. कितीतरी परंपराबाबत मूल प्राचीन उद्देश आणि क्रियाविधी माहितच नाही, किंवा मुद्दामच आहेच असे म्हणता येत नाही. तेव्हा अनेक, खरेतर सर्वसाधारणतः सर्वच, परंपरा कोणत्या ना कोणत्या वर्गास, लिंगास, जातीस, वयोगटास, इ इ एकतर मूल ऐतिहासिक उद्देशाने किंवा अगदी आजही त्या जश्या पाळल्या जात आहेत त्याप्रमाणे हिन लेखत आहेत. तेव्हा सर्व परंपरा ऐरणीवर आणून अभ्यासाव्यात, सुधरावाव्यात (एक वा जास्त झाला का स्पेलिंग मधे?) मग ठेवाव्यात वा त्यागाव्यात. परंतु आपल्या व्यक्तिगत जीवनात व्यवहार्यतेसाठी समोरील नात्याचा (जसे राखीत भावाचा) सदुद्देश माहित असेल तर, आणि व्यक्तिगत आवडनिवड पाहून, परंपरा प्रतिकात्मक रित्या चालू ठेवावी.

That is the end of this bulletin.