Skip to main content

दिलासादायक : बायकी हलकटपणाला उतारा सापडला...

'बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवर खटला चालवा'

“काहीजण सहमतीने संबंध ठेवतात. पण काही बिनसल्यानंतर तक्रार केली जाते आणि नंतर सेटलमेंट करून तक्रार मागेही घेतली जाते. हा सध्या ट्रेण्ड होत चालला आहे. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं” कोर्टाने म्हटलं आहे.

http://www.abpmajha.newsbullet.in/mumbai/103/31978

मला "लवकर बरे व्हा" असा संदेश देणारे, बायकांचा सरसकट कैवार घेणारे तसेच
माझ्याकडे विदा मागणा-या सर्वांची तोंडे आता बंद होतील ही अपेक्षा करतो...

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/08/2013 - 00:07

"ही बातमी वाचली का" नामक धागे सुरू असतात. यातल्या चालू धाग्याचा दुवा उजव्या कॉलमच्या वरच्या कोपर्‍यात मिळेल. सध्याचा धागा हा: http://www.aisiakshare.com/node/1983

तीनोळी धागे काढून एक लिंक डकवायची असेल तर कृपया तो धागा वापरावा.

Nile Fri, 02/08/2013 - 01:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

युयुत्सुंच्या आंतरजालीय आयुष्याची इतिकर्तव्यता फळाला आलेल्या बातमीला इतर कोणत्याही लल्लूपंजू बातम्यांच्या धाग्यात टाकावे अशी सुचना करू धजणार्‍या तुमच्या निर्दय मनाचा मी जड अंतःकरणाने निषेध करतो!

माचीवरला बुधा Fri, 02/08/2013 - 01:40

'ईनोसंट अंटिल प्रोव्ह्न गिल्टी' या कायद्याच्या मूळ तत्वाला धक्का बसू नये याची सर्व सम्बन्धितान्नी काळजी घ्यावी. आजकाल वर्तमानपत्रात गुन्ह्यासंबंधी बातमी देताना 'अमुकने .... केले असा आरोप केला गेला आहे' ऐवजी सर्रास 'अमुकने ... केले' असे लिहितात. ते गैर वाटते.

तर्कतीर्थ Fri, 02/08/2013 - 06:59

In reply to by माचीवरला बुधा

अशा प्रकारच्या खटल्यात "गिल्टी अण्टील प्रुव्हन इनोसंट" हे तत्त्व असते म्हणुन अशी भाषा वापरत असावेत.

गवि Fri, 02/08/2013 - 10:11

'बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवर खटला चालवा'

अश्या प्रकारच्या बातमीवर

बायकी हलकटपणाला उतारा सापडला...

अशी प्रतिक्रिया आपण दिली आहे.

ती योग्य वाटत नाही. समजा उद्या बलात्काराला फाशी देण्याचा कायदा पास झाला तर "पुरुषी लिंगपिसाटपणाला उतारा सापडला.." अशी प्रतिक्रिया देणं योग्य आहे का?

शिक्षा ही गैरफायदा घेणार्‍या, गुन्हेगारी प्रवृत्तीला आहे.. स्त्रीजातीला किंवा पुरुषजातीला नाही.

मग इतका स्त्रीद्वेष (-किंवा अन्य कोणाबाबत पुरुषद्वेष-) का बाळगावा?

मनीषा Fri, 02/08/2013 - 10:18

हा उतारा कितपत प्रभावी ठरेल या बद्दल शंका वाटते ...
कारण साधारणपणे प्रथम तक्रार करणारा पिडीत आणि ज्याच्याबद्दल तक्रार केली गेली आहे, तो(च) गुन्हेगार (असणारच) अशी सर्वसाधारणपणे समजूत असते. त्यामुळे नंतर खरोखरीच नीट तपास/ चौकशी करून जर तक्रारदारच दोषी अढळला तरी व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते. अनेकवेळा ज्याच्याविरूद्ध अशी खोटी तक्रार केली गेली असते, त्याचेच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त झालेले असते. आणि हे नुकसान कशानेही भरून येणारे नसते.

तर्कतीर्थ Fri, 02/08/2013 - 10:41

गवि,

तुमच्या म्हणण्यातली त्रुटी अशी - बायकांनी केलेल्या काही गुन्ह्याना (ज्याला मी हलकटपणा म्हणतो) आजवर काही शिक्षा नव्हती. आजही माझ्यामाहिती प्रमाणे ४९८-अ आणि छ्ळ या कायद्याखाली खोटे आरोप करता येतात आणि स्त्रीला उजळमाथ्याने वावरता येते. बलात्काराच्या काही केसेस मध्येही असेच होत होते जे आता उघड झाले आहे.

दुस-या एका हायकोर्टाने बलात्काराचा खोटा आरोप हा छळच असल्याचे अलिकडे मान्य केले होते (दुवा सापडणे अवघड आहे)

तेव्हा "शिक्षा ही गैरफायदा घेणार्‍या, गुन्हेगारी प्रवृत्तीला आहे." हे आजवर पुरुषांना लागु होते, स्त्रियांना,नाही!

असो. माझे बरेच विचार हे "नावडतीचं मीठ अळणी" या न्यायाने टीकेचे लक्ष्य ठरत होते. जर्मनी प्रमाणे जर आपली न्यायालये शिकलेल्या कमवु शकणा-या पण पोटगी मागणा-या महिलांना जर बाहेरचा रस्ता दाखवु लागली तर तो भारतीय पुरुषांसाठी सोन्याचा दिवस ठरेल.

तर्कतीर्थ Fri, 02/08/2013 - 10:51

ऋषिकेश

आपल्याला गैरसोयीचे, पचायला जड असं सत्य जेव्हा ठळकपणे पुढे येतं तेव्हा ते हसण्यावारी नेणं हे मानवी इतिहासात सतत घडत आलं आहे. तुमची प्रतिक्रिया नवीन नाही.

सविता Fri, 02/08/2013 - 10:57

In reply to by तर्कतीर्थ

कट्टर स्त्रीवादी आणि कट्टर पुरूषवादी दोघेही तितकेच मुर्ख आणि टोकाचे असतात असा निष्कर्ष मी काढलाय, चला या बाबतीत तरी समानता आहे.

ऋषिकेश Fri, 02/08/2013 - 11:03

In reply to by तर्कतीर्थ

आपल्याला गैरसोयीचे, पचायला जड असं सत्य जेव्हा ठळकपणे पुढे येतं तेव्हा ते हसण्यावारी नेणं हे मानवी इतिहासात सतत घडत आलं आहे. तुमची प्रतिक्रिया नवीन नाही.

सहमत आहे. ही/अशी प्रतिक्रीया नवीन नाही
गैरसोयीचं आणि पचायला जड सत्य (हा धागा हास्यास्पद असल्याचं) पुढे आल्यावर काय होतं हे तुमच्या प्रतिक्रीयेतून दिसते आहेच.

तिरशिंगराव Fri, 02/08/2013 - 10:51

काही बायकांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून त्याचे सरसकटीकरण करता येणार नाही. हलकटपणा हा कुठल्याही मानवी प्रजातीत असू शकतो. तुलनेने तो पुरुषांमधेच जास्त असतो.

सविता Fri, 02/08/2013 - 10:53

तुम्ही संध्यानंद किंवा गेला बाजार मटा, किंवा चॅनेल्सचा विचार करता इंडिया टिव्ही, आज तक मध्ये सनसनाटी (आणि अर्थात तितकेच) निरर्थक बातमीचे मथळे बनवायच्या कामाला रूजू व्हा, अतिशय उत्तम जमते तुम्हाला!

काळा मठ्ठ बैल … Fri, 02/08/2013 - 11:07

हल्कट बायका...
पिडले पुरुष...
फोलपट पुरुष...
चिडल्या बायका...

:tired:

भलत्या तर्काचं तीर्थ पिते
एक्मेका शिव्या घालते
साला माणूस्जातच वाया
शहाणे असाल तर ढोर व्हा

बारा गाव्चं पाणी प्या
माजावर या मजेत घ्या
पीनेवाले को बहाना
रोनेवाले को वहाणा

ॲमी Fri, 02/08/2013 - 11:34

दुस-या एका हायकोर्टाने बलात्काराचा खोटा आरोप हा छळच असल्याचे अलिकडे मान्य केले होते (दुवा सापडणे अवघड आहे) >> मला वाटतं 'नवर्याचे अनैतिक संबंध आहेत असा सतत आरोप करणे हा मानसीक छळ आहे' अशी बातमी होती.
दुसर्या एका बातमीत 'educated women should not cry rape' असं होत.
बाकी 'बलात्काराचा खोटा आरोप' असं कधी ऐकलं नव्हतं. 'लग्नाच्या अमिषाने बलात्कार' ऐकलेलं.
याबद्दल आधीदेखील चर्चा झालेली. सध्यातरी माझे वैयक्तिक मत 'लग्न अमिष बलात्कार असले शब्द काढुन टाकुन, अशा केसेस साठी ब्रीच ऑफ प्रॉमिस अशी प्रोव्हीजन असायला पाहीजे' असे आहे.

नितिन थत्ते Fri, 02/08/2013 - 16:28

कोर्टाचा निर्णय ठीकच आहे.

पण इतक्यात हुरळून जाऊ नये. तक्रार खोटी असल्याचे सिद्ध व्हावे लागेल. त्यानंतर खटला भरता येईल.

तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाल्यावर असा खटला भरता येणे यापूर्वीही शक्य असावे. पण ते तक्रारपीडिताच्या मर्जीवर सोडलेले असावे.

कोर्टाने कदाचित तक्रारपीडिताने खटला दाखल केला नाही तरी पोलीसांनी तो करावा असे न्यायालयाचे म्हणणे असावे.

अवांतर: एखाद्या केसमध्ये सेटलमेंट झाली तर तक्रार खोटी होती असे सिद्ध होत नाही (उलट तक्रार खरी असण्याचा संशय बळावतो). त्यामुळे अशा केसमध्ये उलट खटला दाखल करता येईल का याबाबत साशंक आहे.

रमताराम Sun, 04/08/2013 - 12:23

सामान्यपणे तुमच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या फंदात मी पडत नाही (का ते इतरांना वेगळं सांगायला नको नि तुम्हाला सांगूनही फरक पडत नाही). तुम्ही स्वतःला 'तर्कतीर्थ' वगैरे म्हणवून घेता आहात हे एक नि न्यायव्यवस्थेचा इथे संबंध येतो हे दुसरे कारण म्हणून हा प्रपंच. काही प्रश्न आहेत ते इथे टाकून देतो. चर्चा म्हणजे 'माझं मत इतरांनी मान्य करावं म्हणून केलेले संभाषण (संवाद हा शब्द अर्थातच इथे चुकीचा आहे)' असं समजणार्‍यांशी खंडन-मंडन खेळण्यात कालापव्यय करण्यात अर्थ नसतो हे फार लहानपणी उमगलं आम्हाला. ते असो.

न्यायालयाने केलेली एक टिपण्णी हे ब्रह्मवाक्य आहे काय? तसा तुमचा समज असतो का? असल्यास याच न्यायाने राजकीय नेत्यांना न्यायालयाने निरपराध सोडताना दिलेले निर्णय तुम्ही असेच विनाशंका स्वीकारता का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी नेमके उलट स्वरूपाचे म्हणजे बलात्कार्‍यांना, स्त्रियांचा छळ केल्याबद्दल शिक्षा देणारे न्यायालयाचे निर्णय ऐकून तुमचेही 'तोंड बंद झाले होते का?' जर तुम्ही ते निर्णय चुकीचे वा सदोष मानत असाल तर असाच हक्क इतरांना या निर्णयाबाबत असू शकतो हे तुम्हाला मान्य आहे का? तुमच्याशी वाद करू पाहणारे, मुद्दे खोडून काढणारे 'सरसकट बायकांचे कैवारी' असे सरसकटीकरण करण्याचा तुम्हाला हक्क असेल तर दुसर्‍या बाजूला 'तुम्ही स्त्रीद्वेष्टे आहात' असे सरसकटीकरण करण्याचा हक्क आहे हे तुम्ही मानता का? तसे कुणी म्हटल्यास तुम्हाला अपमानास्पद वाटत असेल तर एखाद्या निरक्षीरविवेकाने दोन्ही बाजू तपासणार्‍या पण या मुद्द्यावर तुमच्याशी मतभेद असणार्‍या एखाद्याला तुम्ही 'बायकांचा कैवार घेणारा' असा एकांगी शिक्का मारल्यावर अपमानास्पद वाटत असेल असा विचार तुम्ही कधी केला आहे का? आता विदाची गरज नाही असे म्हणताना न्यायालयाने आधीच विदा तपासला आहे असा याचा अर्थ आहे का? तसे असल्यास तो विदा तुम्ही पाहिला आहे का? असल्यास उगाच तोंडच्या वाफा दवडण्यापरिस तो तुम्ही इथे उघड करून लोकांचे 'तोंड बंद' का करत नाही? जर तुम्हाला तो विदा पहायला मिळालेला नसेल तर विदा नि निष्कर्ष सुसंगत आहेत असा दावा तुम्ही कसा करता? पुन्हा न्यायालयाच्या निर्णयक्षमतेवर तुमचा विश्वास आहे म्हणून हे उत्तर आहे तर पहिले दोन तीन प्रश्न पुन्हा एकवार पहा. न्यायालयाचा निर्णय विदाधारित नसेल, विदाच नसेल तर विदा मागणार्‍यांचे तोंड बंद कसे होईल? अशा तुमच्या मताला अनुकूल असणार्‍या बातम्या निवडून तुम्ही जालावर टाकून इतरांचे तोंड बंद केल्याचे दावे करता, तर अशा प्रत्येक एका केसमागे दहा उलट स्वरूपाच्या केसेस तुम्हाला दाखवून दिल्या तर तुमचे 'तोंड बंद' झाल्याची कबुली देणार का? की 'श्रद्धाळू सज्जन असतातच, जे गैर वागतात ते खरे श्रद्धाळू नसतात' या पळवाटेप्रमाणे तुम्ही दाखवलेल्या केसेस मधे तेवढी न्यायालये नि:पक्ष वगैरे होती नि विरुद्ध बाजूच्या केसेस दिसल्या की न्यायव्यवस्थेत 'बायकांचा कैवार' घेणारे बसलेत असा दावा करणार आहात? वर विचारलेल्या बहुतेक प्रश्नांना जिथे जिथे इतरांचे हक्क तुम्ही मान्य करता असा दावा करता तिथे समोरच्यांचा अनुभव खरंच तसा आहे का असा प्रश्न तुम्ही त्यांना विचारून पाहिला आहे का? तुमच्या मुद्द्यांची मांडणीच मुळी 'या मूर्खांना काही समजत नाही, हा घ्या पुरावा' अशा स्वरूपात समोरच्या व्यक्तीच्या विचारक्षमतेचा थेट उपमर्द करणार्‍या भाषेत लिहिलेले असतात, अशा वेळी तुमची मते मात्र इतरांनी विचारपूर्वक तपासावीत हा आग्रह अनाठायी नाही का? जर तुमची मते बदलू शकत नाही, ती १००% बरोबरच आहेत केवळ इतरांना 'ज्ञानाचा प्रकाश' किंवा 'सत्य काय ते मलाच ठाऊक आहे' असे तुम्हाला वाटत असेल नि आजूबाजूला बहुसंख्य तुमच्या विरोधी मताचे असतील नि तुम्ही नाही तर ते दुराग्रही आहेत असा तुमचा आरोप असेल तर उगाच 'पालथ्या घड्यांवर पाणी ओतून' तुम्ही आपली शक्ती वाया का घालवत आहात?

सर्वात शेवटी महत्त्वाचा प्रश्न. सर्वस्वी अप्रस्तुत असे 'तर्कतीर्थ' हे आयडीनाम तुम्ही केव्हा बदलणार?

आपला नम्र
-तर्कदुष्ट

तर्कतीर्थ Sun, 04/08/2013 - 13:25

सामान्यपणे तुमच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या फंदात मी पडत नाही

सेम हिअर!

...तुमचे बाकीचे मुद्दे माझ्यादृष्टीने निरर्थक आणि हास्यास्पद आहेत.

सविता Mon, 05/08/2013 - 10:39

In reply to by तर्कतीर्थ

समूहाची मानसिकता / शहाणपण याबद्दल हे संस्थळ बोलते. रमताराम यांच्या प्रतिसादाला (+५ मार्मिक ) मिळते आणि तुमच्या प्रतिसादाला (-१ निरर्थक) मिळते यातच सर्व काही आले.

बाकी त्यांच्या प्रतिसादामुळे तुमचे तोंड बंद झाले हे दिसतेच आहे.

अजो१२३ Sun, 04/08/2013 - 14:33

तर्कतीर्थजी,

मुद्दा मांडणार्‍या व्यक्तिचा इतिहास, शैली यांच्यामुळे एखाद्या मुद्यातील मूळ तथ्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. तो प्रकार या धाग्याबाबतही होऊ शकतो. म्हणून मी दोन गोष्टी इथे लिहू इच्छितो.

समाजाच्या काही घटकांत शीलशुचिता फार महत्त्वाची समजली जाते. त्यामुळे स्वत:हून कोणी आपले शील धोक्यात घालेल, बाजारात आणेल असे या घटकांना वाटत नाही. परंतु शील वैगेरे कल्पनचे समाजातल्या इतर कितीतरी घटकांना महत्त्व नसते. ते त्याचा (शील रक्षणाचे कायदे, इ चा) 'आर्थिक' किंवा 'इतर' कारणांसाठी गैरवापर करु शकतात. अशा गैरवापराविरुद्ध लोकांना संरक्षण गरजेचे आहे. न्यायालयाने अशा संरक्षणाची दखल घेतली आहे ही आनंदाची बाब आहे या आपल्या मताशी सहमत आहे.

मंदार कात्रे Sun, 15/12/2013 - 19:26

In reply to by अजो१२३

अरुणजोशी जी आपण अतिशय सन्यमित शब्दात वस्तुस्थिती माण्डली आहे. धन्यवाद !

तर्कतीर्थ Sat, 14/12/2013 - 10:49

दिलासादायक -

लैंगिक छ्ळाचा बनाव रचल्यास (त्या स्त्रीला) नोकरीला मुकावे लागेल - मटा.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/---/articleshow/27320884…?

...आणि हो, अशा कडक तरतुदी बलात्काराच्या खोट्या तक्रारींसाठीही हव्यात.

अरविंद कोल्हटकर Sat, 14/12/2013 - 22:26

मला असे वाटते की पुरुष वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापर्यंत बर्‍यापैकी 'स्त्रीद्वेष्टे'असतात. 'स्त्रियांच्या' म्हणजे मुलींच्या विरोधात पॉइंट स्कोअर करण्यात त्यांना मजा वाटते. बहुतेक पुरुष आठव्या-नवव्या वर्षानंतर ह्या भूमिकेतून बाहेर पडतात आणि त्यांना स्त्रीजातीबद्दल चक्क प्रेम निर्माण होते!

काही पुरुष ह्या बाळपणीच्या भूमिकेत कायमचे अडकून पडतात असे दिसते.

Nile Sat, 14/12/2013 - 23:26

In reply to by अरविंद कोल्हटकर

पहिलीते चौथी पासून मुलं विरुद्ध मुली मार्‍यामार्‍या होत असत आमच्या शाळेत. त्यामध्ये भाग न घेणार्‍या थोडक्यांपैकी मी एक होतो. पुढे ह्या सगळ्या मुली मला राखी बांधू लागल्या.. वगैरे. त्या अल्पसंख्यांक गटाचा सदस्य असल्याचे दुष्परिणाम मी आजवर भोगतो आहे!

बॅटमॅन Sun, 15/12/2013 - 00:34

In reply to by Nile

पहिली ते चौथी"पासून"??????? नक्की कुठे शिकलात हो नायलोबा?

चौथी ही तशा मारामार्‍यांसाठी टर्मिनस पोस्ट क्वेम होती. पाचवीपासून तो वायझेड कोड ऑफ शिव्हालरी लागू होतो सगळीकडे.

बॅटमॅन Sun, 15/12/2013 - 00:36

In reply to by अरविंद कोल्हटकर

अनेक स्त्रिया या भूमिकेतून कधी बाहेर येत नाहीत. त्याला कधी बाळपणीची औटग्रो न झालेली भूमिका असे म्हटलेले ऐकिवात नाही. उलटपक्षी असे काही असेल तर "असेल बाळपणीचा ट्रॉमा" म्हणून जालीय फुंकरी घातल्या जातात. एखाद्या पुरुषाने असे म्हणायचा अवकाश, सगळे तुटून पडतात. यामागचे कारण र्‍याडिकल फेमिनाझिझम फ्याशनमध्ये आहे, परंतु म्यास्क्युलिझमचे मात्र खच्चीकरण (डॅम यू जेंडरसेंट्रिझम) केल्या जाते हेच असावे.

एकंदरीतच, पुरुषांच्या शक्य तितक्या वर्तणुकीच्या पैलूंना शक्य तितके पोरकट ठरवायची एक स्त्रीसुलभ मूर्ख प्रवृत्ती असते तिच्यावर कोणी टीका करताना दिसत नाही. ती प्रवृत्ती हा एक प्रकारचा पुरुषद्वेषच म्हटला तरी चालेल. शेवटी सगळे फ्याशनचे बळी! त्याच्या अगेन्स्ट जायचे साहस अनेक शीतमुद्दाभिलाषी करू शकत नाहीत-उनसे वो नही हो पायेगा हे तर कधीचेच दिसते आहे.

प्रकाश घाटपांडे Sun, 15/12/2013 - 13:08

In reply to by बॅटमॅन

शेवटी सगळे फ्याशनचे बळी! त्याच्या अगेन्स्ट जायचे साहस अनेक शीतमुद्दाभिलाषी करू शकत नाहीत-उनसे वो नही हो पायेगा हे तर कधीचेच दिसते आहे.

:)

विसुनाना Mon, 16/12/2013 - 13:27

In reply to by बॅटमॅन

पुरुषांच्या शक्य तितक्या वर्तणुकीच्या पैलूंना शक्य तितके पोरकट ठरवायची एक स्त्रीसुलभ मूर्ख प्रवृत्ती असते>>>>>>> ही प्रवृत्ती (तुमच्या)लग्नाआधीच (तुम्हाला) स्पष्टपणे कशी कळाली? ;) अभिनंदन!

तुमचे लग्न ठरले (-स/ की) कळवा. पुढे आम्ही पाहून घेऊ. पुरावा म्हणून हा उपरोक्त प्रतिसाद आहेच! ;)

गब्बर सिंग Sat, 14/12/2013 - 23:07

या धाग्यावर द्वेष हा शब्द अनेकांनी वापरलेला आहे. व ध्वनित असे होते की द्वेषावर अनेकांचे आक्षेप आहे.

प्रेमाप्रमाणेच द्वेष ही एक भावना आहे. व भावनेवर आक्षेप घेणे आक्षेपार्ह आहे का (असल्यास का) याबद्दल कोणीतरी मला उत्तर द्या ओ ?

Am I not free to hate anyone ? Either in plurals or singular ?

मेनिंजायटिस च्या व्हायरस बद्दल मला द्वेष आहे. तो एक व्हायरस असो वा अनेक.

If I am allowed to hate all the viruses of HIV & all viruses of meningitis then why am I not allowed to hate a "group of men" or "group of women" or "group of pink men" or "group of green women" ?

I expect an ambitiously excessively basic answer ->>>> the objection is not on the भावना but on the action that follows in accordance with that भावना .

-----

चढली की मला असेच प्रश्न सुचतात (आज सकाळीसकाळी चढवून बसलोय)

मी Mon, 16/12/2013 - 13:36

In reply to by गब्बर सिंग

I expect an ambitiously excessively basic answer ->>>> the objection is not on the भावना but on the action that follows in accordance with that भावना .

सहमत, हेट समर्थनीय नाही पण तुच्छता समर्थनीय असावी.

गब्बर सिंग Wed, 18/12/2013 - 10:30

In reply to by मी

सहमत, हेट समर्थनीय नाही पण तुच्छता समर्थनीय असावी.

हेट आक्षेपार्ह नसायला हवी असे माझे म्हणणे आहे.

गब्बर सिंग Wed, 18/12/2013 - 10:30

In reply to by मी

सहमत, हेट समर्थनीय नाही पण तुच्छता समर्थनीय असावी.

हेट आक्षेपार्ह नसायला हवी असे माझे म्हणणे आहे.

माझ्या प्रतिसादावर अजूनही आपलं काही भाश्य आलेलं नाही.
इथे दोन प्रतिसाद देणयैअवजी इथे एक आणि तिथे दुसरा असं चाललं नसतं का

मन Mon, 16/12/2013 - 14:07

In reply to by गब्बर सिंग

समजा -->
व्यक्तीसमूहाबद्दल तुम्ही प्रेम बाळगता.
त्यामुळे आपुलकी युक्त कृती करता, एखादी प्रेमयुक्त ऑफर देता(एखाद डिस्काउंट, स्वतःहून केलेले श्रमदान, डोनेशन) किंवा नुसतीच आस्था बालगता.
हे कुणालाच नको नसते. त्यामुळे कुणाचे ऑब्जेक्शन नाही.
.
.
तुम्ही द्वेष करता.
मग द्वेषाने उद्युक्त झालेल्या कृती तुम्ही करण्याचे शकता असते.(भावना ह्या सदैव मनाच्या कोपर्‍यात भावना म्हणूनच राहतील, प्रत्यक्ष कृतीत कधीच येणार नाहित ह्याची
काहीही ग्यारंटी नाही.) ह्या कृती सरळसरळ हानीकारक असतात. त्या तुम्ही का कराव्यात?
इतरांना हानी का पोचवावी?
.
.
थोडक्यात, तुमच्या प्रश्नाचं रुप हे असं आहे "हे उगीचच दुसर्याला त्याच्या जगण्यत मदत केली तर त्याला, इतरांना चालते पण मी इतरांच्या जगण्यात उगीच अडथळा आणला तर चालत नाही."
का?
कारण ते चालायला नको; म्हणून चालत नाही.
ते विध्व्म्सक, विध्व्म्सपूरक आहे, म्हणून चालत नाही.
विध्वंसबीजरोपक आहे म्हणून चालत नाही.
( "शक्ती" मध्ये बाप दिलीपकुमार पुत्र अमिताभला म्हणतो त्याप्रमाणे "...फिर भी जो गल़त है वो गल़त है")
ते का चालू नये ह्याचे उत्तर मला स्वयंस्पष्ट वाटते.

ऋषिकेश Mon, 16/12/2013 - 14:25

In reply to by गब्बर सिंग

प्रेमाप्रमाणेच द्वेष ही एक भावना आहे. व भावनेवर आक्षेप घेणे आक्षेपार्ह आहे का (असल्यास का) याबद्दल कोणीतरी मला उत्तर द्या ओ ?

मुळात द्वेष ही एक वेगळी भावना आहे का ती "प्रेमाचा अभाव" आहे?
जसे प्रत्यक्षात अंधार असे काही नसते. असतो तो केवळ "प्रकाशाचा अभाव".

बॅटमॅन Mon, 16/12/2013 - 14:29

In reply to by ऋषिकेश

मुळात द्वेष ही एक वेगळी भावना आहे का ती "प्रेमाचा अभाव" आहे?

या प्रश्नाचे निरपेक्ष उत्तर कसे काय संभवते?

ऋषिकेश Mon, 16/12/2013 - 14:33

In reply to by बॅटमॅन

माहित नाही. गब्बरसिंग यांचे अवतरणात दिलेले विधान व एकूणच प्रतिसाद वाचुन सुचलेला हा ताजा ताजा विचार आहे. :)
यावर एकूणच काही संशोधन झालेले कोणाला माहित असेल या विचाराने इथे दिले.

जसे भारतीय लोकांत काम/क्रोध/मोफ/मद/मत्सर आदी दुर्गूण म्हणून आले आहेत त्यातही द्वेष आलेला नाही ;)

मन Mon, 16/12/2013 - 14:35

In reply to by ऋषिकेश

जसे भारतीय लोकांत काम/क्रोध/मोफ/मद/मत्सर आदी दुर्गूण म्हणून आले आहेत त्यातही द्वेष आलेला नाही

दुर्गुण करोडो असू शकतात. त्यांची यादी बनविणयत भारतीयांनी वेळ घालविला नसेल.
पण म्हणून तो दुर्गुण नाहीच ह्याची ग्यारंटी नाही.

बॅटमॅन Mon, 16/12/2013 - 14:38

In reply to by ऋषिकेश

ओह अच्छा. हा प्रश्न मुळात संशोधनाच्या अखत्यारीत येतो किंवा कसे याबद्दलच संभ्रम आहे मनात खरे तर. असो.

ऋषिकेश Mon, 16/12/2013 - 15:47

In reply to by बॅटमॅन

येत असावा असे वाटते. म्हणजे एखादी भावना (पक्षी इथे प्रेम) वाटते म्हणजे मेंदूतील ही ही केंद्रे उद्दीपित होतात. मात्र एखादेवेळी ही केंद्रे उद्दीपीत होत नाहीत तेव्हा ही भावना असल्यासारखे वाटते (पक्षी इथे द्वेष). द्वेष ही भावना जागृत होण्यासाठी काही विशेष केंद्रांच्या उद्दीपनांची गरज असेल तर त्याला मुळ भावना म्हणता यावं.

असचं काहीसं.

प्राथमिक उचकपाचक केल्यावर हे कळलं की भावनांमध्ये वर्गीकरण आहे. इथे बघा. पॉल एकमन याने सहा भावनांना 'बेसिक भावना' म्हटले होते. इतर भावना या या भावनांचे कमी/जास्त स्वरूप किंवा काही भावनांचे एकत्रीकरण असावे असे म्हटले होते.

या व्यतिरिक्त हेट्रेट च्या विकीपानावर लिहिले आहे:

In psychoanalysis, Sigmund Freud Defined hate as an ego state that wishes to destroy the source of its unhappiness

Many psychologists consider it to be more of an attitude or disposition than a temporary emotional state

बॅटमॅन Mon, 16/12/2013 - 15:52

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद!

म्हणजे संशोधक त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करतात तर. मागे कधीतरी उडत उडत वाचले होते त्यानुसार प्रेम आणि द्वेष/तिरस्कार इ. व्यक्त करताना मेंदूतील सारखीच/जवळजवळचीच केंद्रे उत्तेजित होतात म्हणे.

मन Mon, 16/12/2013 - 15:55

In reply to by बॅटमॅन

विरोधभक्ती!
तसेही गब्बर ह्यांना द्वेषाबद्दल फारच प्रेम आणि
प्रेमाबद्दल फारच द्वेष असलेला दिसतो ;)
.
.
वैयक्तिक टिप्पणी नाहिये, भारी कमेंट द्यायची, म्हणून फक्त प्लेसहोल्डर म्हणून गब्बरचं नाव वापरलय.

बॅटमॅन Mon, 16/12/2013 - 16:12

In reply to by मन

द्वेषाचे प्रेम अन प्रेमाचा द्वेष- लाईक इट, द सेल्फ रेफरन्शियल सैकल!

च्यायला आता इतिहास वैग्रे बाजूला ठेवतो काही दिवस.

'न'वी बाजू Mon, 16/12/2013 - 18:05

In reply to by मन

वैयक्तिक टिप्पणी नाहिये, भारी कमेंट द्यायची, म्हणून फक्त प्लेसहोल्डर म्हणून गब्बरचं नाव वापरलय.

अगदी!

व्यक्तिगत काही नाही, पण आमच्या 'भडकाऊ' श्रेणीकरिता ग्राहक म्हणून फक्त प्लेसहोल्डर म्हणून आम्ही मनोबांना वापरतोच की नाही? अगदी तस्सेच आहे हे.

समजू शकतो.

गब्बर सिंग Wed, 18/12/2013 - 10:44

In reply to by मन

तसेही गब्बर ह्यांना द्वेषाबद्दल फारच प्रेम आणि
प्रेमाबद्दल फारच द्वेष असलेला दिसतो

http://www.dhingana.com/pyar-mujhse-jo-kiya-tumne-song-jagjit-chitra-th…

'न'वी बाजू Mon, 16/12/2013 - 17:57

In reply to by ऋषिकेश

मुळात द्वेष ही एक वेगळी भावना आहे का ती "प्रेमाचा अभाव" आहे?
जसे प्रत्यक्षात अंधार असे काही नसते. असतो तो केवळ "प्रकाशाचा अभाव".

मला तुमच्याबद्दल अजिबात प्रेमबीम वगैरे काही वाटत नाही.

याचा सरळसरळ अर्थ मी तुमचा द्वेष करतो, असा व्हावा का? साशंक आहे. (मी तुमचा द्वेष करत असणे पूर्णपणे अशक्य नाही, परंतु त्याकरिता इतर अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. केवळ "मला तुमच्याबद्दल अजिबात प्रेम वाटत नाही" एवढा आधार या निष्कर्षाप्रत यायला पुरेसा होणार नाही. थोडक्यात, नेसेसरी बट नॉट सफीशियण्ट कण्डीशन...)

'न'वी बाजू Mon, 16/12/2013 - 18:13

In reply to by बॅटमॅन

...या केवळ प्रेम आणि द्वेष या दोन(च) टर्म्समध्ये मोजण्याइतक्या शिम्पल नसतात कै!

(थोडक्यात, बाई-नरी रिलेशनशिप्स आर हार्डली बाईनरी.)

गब्बर सिंग Tue, 17/12/2013 - 09:27

In reply to by 'न'वी बाजू

मला तुमच्याबद्दल अजिबात प्रेमबीम वगैरे काही वाटत नाही.
याचा सरळसरळ अर्थ मी तुमचा द्वेष करतो, असा व्हावा का? साशंक आहे.

यही तो मै कह रहा हू मालिक.

मन Tue, 17/12/2013 - 10:08

In reply to by गब्बर सिंग

वरच्या एका प्रतिसादातील मजकूर वाचलात का ?

समजा -->
व्यक्तीसमूहाबद्दल तुम्ही प्रेम बाळगता.
त्यामुळे आपुलकी युक्त कृती करता, एखादी प्रेमयुक्त ऑफर देता(एखाद डिस्काउंट, स्वतःहून केलेले श्रमदान, डोनेशन) किंवा नुसतीच आस्था बालगता.
हे कुणालाच नको नसते. त्यामुळे कुणाचे ऑब्जेक्शन नाही.
.
.
तुम्ही द्वेष करता.
मग द्वेषाने उद्युक्त झालेल्या कृती तुम्ही करण्याचे शकता असते.(भावना ह्या सदैव मनाच्या कोपर्‍यात भावना म्हणूनच राहतील, प्रत्यक्ष कृतीत कधीच येणार नाहित ह्याची
काहीही ग्यारंटी नाही.) ह्या कृती सरळसरळ हानीकारक असतात. त्या तुम्ही का कराव्यात?
इतरांना हानी का पोचवावी?
.
.
थोडक्यात, तुमच्या प्रश्नाचं रुप हे असं आहे "हे उगीचच दुसर्याला त्याच्या जगण्यत मदत केली तर त्याला, इतरांना चालते पण मी इतरांच्या जगण्यात उगीच अडथळा आणला तर चालत नाही."
का?
कारण ते चालायला नको; म्हणून चालत नाही.
ते विध्व्म्सक, विध्व्म्सपूरक आहे, म्हणून चालत नाही.
विध्वंसबीजरोपक आहे म्हणून चालत नाही.
( "शक्ती" मध्ये बाप दिलीपकुमार पुत्र अमिताभला म्हणतो त्याप्रमाणे "...फिर भी जो गल़त है वो गल़त है")
ते का चालू नये ह्याचे उत्तर मला स्वयंस्पष्ट वाटते.