चंद्रयान मोहीम आणि सोशल मीडिया
आज चंद्रयान आकाशी उडाले आणि सोशल मीडियावर महापूर आला. पुरोगाम्यांनी देवाचा आशीर्वाद घेणाऱ्या वैज्ञानिकांवर प्रश्न उपस्थित केला.काहींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. शेटजी बाहेर होते म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. भक्तांनी मोदी है तो मुमकिन है चा नारा बुलंद केला. बर्नल ट्रेंड ही सुरू केला. शौचालय बांधणे म्हणजे विकास. याला काय कळते इत्यादी.ऐसीकरांचे याबाबत काय मत आहे हेही जाणून घेणे गरजेचे वाटले म्हणून हा धागा
ललित लेखनाचा प्रकार
चांद्रयान लॉन्चिंग
ही विज्ञान शी संबंधित घटना आहे.
ज्यांना जी जबाबदारी दिली आहे ती त्यांनी प्रामाणिक पने पार पाडली की मिशन यशस्वी होणारच.
आणि हे टीम work आहे प्रतेक घटकाची जबाबदारी महत्वाची च आहे.
पैसे पुरवणे आणि बाहेरच्या देशातून तांत्रिक मदत मिळवून देणे इतकेच सरकार च काम आहे.
बाकी सरकार च काही ही संबंध नाही.
यश हे तांत्रिक गोष्टींवर अवलंबून आहे.
मंगळयान व बालाजी पहा कि. तोच
मंगळयान व बालाजी पहा कि. तोच प्रकार
आनंद
चांद्रयान ३ मोहिमेची सुरुवात उत्तम झाली ह्याचा खूप आनंद झाला आहे.
आता ४० दिवसांनी रोवर सुखरूप चंद्रावर उतरावा ही सदिच्छा.
ह्यात इसरोच्या वैज्ञानिकांचं हार्दिक अभिनंदन - त्यांच्या कामाबद्दल नेहेमीच आत्मियता राहिलीये.
मोदींशी ह्याचा काही संबंध जोडावासा वाटला नाही. (चांगला/वाईट काहीही)
(उ.दा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप अवकाशात सुखरूप पोचला होता आणि त्याचं कार्य उत्तम सुरु झालं होतं तेव्हाही असाच आनंद झाला होता - त्यात बायडेन काकांचा काहीही संबंध नव्हता)
एकूण काय? आपलं पृथ्वीवासीयांचं काहीही यंत्र पृथ्वी सोडून दूरवर चाललं की जरा काळजी वाटते, आणि त्या यंत्राचं सगळ सुखरूप असल्याची इलेक्टॉनिक चिठ्ठी मिळाली की जीव भांड्यात पडतो.
ह्याला एकमेव अपवाद म्हणजे एलॉन मस्काची टेस्ला गाडी. तिचं काहीही झालं तरी घंटा फरक पडतो मला.