स्वामी समर्थ आहेत
सौभाग्यलेणी
अंगारा
पैपाहुणा
सणवार
गोडधोड
पोथी
उद्यापन
वेळच्या वेळी सग्गळं काही
शंभर आवडी निवडी
नातवंडी आणि पत्वंडी
गावामध्ये दवंडी
स्वामी समर्थ आहेत
जग पुढे चाललंय
(म्हणजे कै हो? )
शेवटी नातू होऊदे म्हणजे झालं
कार कशाला बुडाशी
आमचा काळ भारी
तुमचा काळ फालतू
पण विडीओ च्याट लावून देई
बारशाला नवीन साडी
ईश्वरा सोडव रे बाबा
आता काही इच्छा नाही राहिली
शेवटी
स्वामी समर्थ आहेत
विशेषांक प्रकार
दणदणीत दीर्घ कविता होवू
दणदणीत दीर्घ कविता होवू शकते.
हे तर केवळ जोत आहे . ज्यावर एक बुलंद इमारत उभी राहू शकते .
हे पटलं. मात्र श्रद्धा-अंधश्रद्धा यापेक्षा एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्रणातून एकंदरीत आज्जीबाईंचं चित्रण यातून होऊ शकेल. सुरूवात उत्तम झालेली आहे. मला वाटतं ही कविता अनेक भागांची व्हावी. या आजींचा भूतकाळ काय होता? याचंही चित्रण केलं तर त्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर दिसून येऊ शकतील.
आवडली!
आवडली!